हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Aadhar Card हे सध्याच्या काळात अनेक महत्वाच्या डॉक्युमेंटपैकी एक बनले आहे. यामुळे आधारमधील सर्व माहिती योग्य आणि अचूक असणे अत्यंत महत्वाचे आहे. मात्र आधार कार्ड बनवताना त्यामध्ये अनेकदा चुकीची किंवा अर्धवट माहिती टाकली जाते. ज्यामुळे आधार कार्ड वापरताना अडचणींचा सामना करावा लागतो. UIDAI कडून आपल्याला आधार कार्डमधील नाव, जन्मतारीख, पत्ता, मोबाईल नंबर, लिंग इत्यादी अपडेट करण्याची सुविधा मिळते. मात्र, इथे हे लक्षात घ्या कि, यामधील प्रत्येक माहिती पुन्हा पुन्हा अपडेट करता येत नाही.
आधार कार्डमध्ये नागरिकांची बायोमेट्रिक इन्फॉर्मेशन दिलेली असल्याने ते सतत अपडेट ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. जर आपल्याही आधार कार्डमध्ये काही चुकीची माहिती टाकण्यात आली असेल तर ती लवकरात लवकर दुरुस्त करा. मात्र असे करत असताना सर्व तपशील पुन्हा बारकाईने तपासा.
2 वेळा नाव बदलता येईल नाव
जर आपल्या Aadhar Card मधील नावाच्या स्पेलिंगमध्ये काही चूक असेल किंवा महिलांना लग्नानंतर आपले आडनाव बदलायचे असेल तर ते ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने करता येऊ शकेल. मात्र आधार कार्डमधील नाव फक्त दोन वेळाच अपडेट करता येईल.
1 वेळा बदलता येईल जेंडरची माहिती
आधार कार्ड बनवताना अनेकदा लिंग देखील चुकीचे टाकले जाते. UIDAI च्या नियमांनुसार ते देखील बदलले बदलता येते. मात्र आधार कार्डमढील जेंडरची माहिती अपडेट करण्याची फक्त एकच संधी मिळते.
1 वेळा बदलता येईल जन्मतारीख
Aadhar Card मधील चुकीची जन्मतारीख फक्त एकदाच अपडेट करता येते. यानंतर त्यामध्ये कोणतेही बदल करता येणार नाहीत.
‘ही’ माहिती कितीही वेळा बदलता येईल बदला
हे लक्षात घ्या कि, Aadhar Card मधील आपल्या घराचा पत्ता, ईमेल आयडी, मोबाईल नंबर, फोटो, फिंगर प्रिंट आणि रेटिना स्कॅन वारंवार अपडेट करता येईल. ते अपडेट करण्यासाठी कोणतीही मर्यादा निश्चित केलेली नाही.
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://uidai.gov.in/
हे पण वाचा :
Edible Oil : खाद्यतेलाच्या किंमतींतील घसरण सुरूच, जाणून घ्या भाव
HDFC Bank कडून ग्राहकांना झटका, कर्जावरील व्याजदरात पुन्हा केली वाढ
UAN नंबरशिवाय अशा प्रकारे तपासा PF Account मधील बॅलन्सची माहिती
Indian Bank ने महिलांसाठी सुरु केली खास FD स्कीम, असे असतील व्याजदर
म्युच्युअल फंड SIP मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी लक्षात घ्या ‘या’ महत्वाच्या गोष्टी, अन्यथा होऊ शकेल नुकसान