नवी दिल्ली । नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS) ही एक सरकारी रिटायरमेंट सेव्हींग स्कीम आहे, जी केंद्र सरकारने 2004 मध्ये लाँच केली. 2009 पासून ही योजना खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठीदेखील उघडली गेली. आपण एनपीएस खाते सहजपणे ऑनलाइन देखील उघडू शकता. येथे आम्ही घर बसल्या एनपीएस (NPS) मध्ये खाते कसे उघडायचे ते सांगणार आहोत.
वास्तविक, आता पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाने (Pension Fund Regulatory and Development Authority) केवायसीची प्रक्रिया सुलभ केली आहे. पीएफआरडीए (PFRDA) ने आधार-आधारित केवायसी प्रक्रिया पेपरलेस केली आहे. म्हणजेच आता ऑफलाइन आधारचा वापर करून अकाउंट उघडता येईल. त्यामध्ये फिजिकल कॉपीची गरज भासणार नाही.
या नवीन प्रक्रियेअंतर्गत यूआयडीएआय (UIDAI) च्या पोर्टलवर जाऊन पासवर्ड प्रोटेक्टेड आधार XML फाइल करून ई-एनपीएस (eNPS) द्वारे ऑफलाइन मोडमध्ये डाउनलोड करु शकता आणि केवायसीसाठी अपलोड करु शकता.
ही संपूर्ण प्रक्रिया आहे
1. सर्वप्रथम ऑफलाइन आधार पेपरलेस e-KYC झिप फॉरमॅटमध्ये अपलोड करा. जर XML झिप फाईल तयार केली नसेल तर ती डाउनलोड करण्यासाठी यूआयडीएआय पोर्टल नेव्हिगेट करावे लागेल. आधार पेपरलेस ई-केवायसी डाउनलोड केल्यानंतर, 4-अंकी पासवर्ड एंटर करुन ते सुरक्षित केले जाऊ शकते.
- eNPS पोर्टलवर आपला रजिस्ट्रेशन पर्याय निवडा आणि येथे यूआयडीएआय मध्ये रजिस्टर्ड असलेला मोबाइल नंबर द्या आणि e-KYC कॉन्टॅक्टलेस ऑफलाइन पद्धतीसाठी 4 अंकी पास कोडसह झिप फाइल अपलोड करा.
- OTP सबमिट केल्यावर यूआयडीएआयच्या डेटाबेसमधून नाव, लिंग, जन्मतारीख, मोबाइल नंबर, पत्ता आणि प्रोटोग्राफ तयार केला जाईल आणि इतर माहिती देखील भरावी लागेल.
- आपल्या पॅनकार्डची स्कॅन केलेली कॉपी अपलोड करा. JPEG, PNG फाइलमध्ये 4 MB ते 2KB साईज असलेली फाईल अपलोड करा आणि आपल्या स्वाक्षरीची एक कॉपी देखील अपलोड करा. पेमेंट करण्यासाठी ग्राहकाला एनपीएस खात्याच्या पेमेंट पोर्टलवर पाठविला जाईल. पेमेंट सक्सेफुल झाल्यानंतर PRAN दिले जाईल.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.