हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ज्याप्रमाणे SEBC च्या विद्यार्थ्यांसाठी सेट भवनच्या संकेतस्थळावर Form For SEBC Candidate ही लिंक ओपन केली आहे अगदी त्याचप्रमाणे Open आणि EWS प्रवर्गातून फॉर्म भरलेल्या आणि 26 जानेवारी 2024 च्या परिपत्रकानुसार ओबीसी प्रमाणपत्र मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी Form For OBC Candidate या शीर्षकांतर्गत प्रवर्ग बदलण्यासाठी लिंक ओपन करण्यात यावी अशा विनंतीचे पत्र सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार याना दिले आहे.
विद्यार्थ्यांचे पत्र जसच्या तस
प्रति,
अजितदादा पवार साहेब
मा. उप मुखयमंत्री
महाराष्ट्र राज्य
विषय :- Open आणि EWS प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी Form For OBC Candidate ही लिंक ओपन करण्याबाबत.
संदर्भ
१) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सेट भवन OW/2024/109 जाहीर प्रकटन . दि.१९/०७/२०२४.
२) महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती,भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन ) अधिनियम 2000 ( अधिसूचना: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अधिसूचना 26 जानेवारी 2024)
महोदय,
उपरोक्त विषयास अनुसरून आपणास विनंती करण्यात येते की, आपल्या सेट भवन कडून महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गाकरिता आरक्षण अधिनियम 2024 नुसार मराठा समाजातील विद्यार्थ्यांना SEBC प्रवर्गामध्ये समाविष्ट झालेत आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी सेट भवनाच्या संकेतस्थळावर Form For SEBC Candidate या शीर्षकांतर्गत 19 जुलै 2024 ते 25 जुलै 2024 पर्यंत प्रवर्ग बदलण्यासाठी लिंक ओपन केली आहे.
परंतु ज्या विद्यार्थ्यांनी सेट परीक्षेचा फॉर्म भरत असताना EWS प्रवर्गातून भरला आहे अशा अनेक विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या 26 जानेवारी 2024 च्या अधीसूचनेनुसार ओबीसी प्रमाणपत्र मिळाले आहेत. ( सगळे सोयरे परिपत्रक २६ /०१/२०२४).
अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी ज्याप्रमाणे SEBC च्या विद्यार्थ्यांसाठी सेट भवनच्या संकेतस्थळावर Form For SEBC Candidate ही लिंक ओपन केली आहे अगदी त्याचप्रमाणे Open आणि EWS प्रवर्गातून फॉर्म भरलेल्या आणि 26 जानेवारी 2024 च्या परिपत्रकानुसार ओबीसी प्रमाणपत्र मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी Form For OBC Candidate या शीर्षकांतर्गत प्रवर्ग बदलण्यासाठी लिंक ओपन करावी ही नम्र विनंती, तसेच सदर बदल करण्यासाठी 05 ऑगस्ट 2024 पर्यंत प्रवर्ग बदलण्यासाठी लिंक ओपन करून मिळावी हि विनंती