Satara News : 3 लाखांचा अफू जप्त, पोलिसांची धडक कारवाई; सदर शेतकऱ्यावर गुन्हा दाखल

Opium seized by satara police
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
शेतात अंमली पदार्थ अफुची लागवड केल्याप्रकरणी सदर शेतकऱ्यावर कारवाई करत तब्बल 3 लाखांचा अफू जप्त करण्यात सातारा पोलिसाना यश आलं आहे. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी थेट शेतात जाऊन धडक कारवाई करत सदर शेतकऱ्याला ताब्यात घेतलं आहे. पोलीस या संपूर्ण प्रकाराचा अधिक तापस करीत आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, मुळिकवाडी ता. फलटण गावाच्या हद्दीत बाचकी नावाच्या शेतात सुरेश शिवराम पवार या शेतकऱ्याने त्याच्या मालकीच्या शेतात अंमली पदार्थ अफुची लागवड केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यांनतर पोलिसांनी शेतात छापा मारला असता एकुण 2737 झाडांची लागवड करुन त्याची जोपासना करत असलयाचे पोलिसांना आढळून आले.

शेतकरी मित्रानो, तुम्हाला तुमच्या शेतात कोणत्याही रोपांची लागवड करायची असेल तर आजच Hello Krushi हे अँप मोबाईल मध्ये डाउनलोड करा. हॅलो कृषी मध्ये तुमच्या आसपासच्या सर्व रोपवाटिका आणि खत दुकानदार यांच्याशी तुम्हाला थेट संपर्क साधता येईल. यांमुळे तुमचा वेळ वाचण्यास मदत होईल. मुख्य म्हणजे ही सुविधा १ रुपयाही खर्च न करता तुम्हाला मिळत आहे. याव्यक्तिरिक्त हॅलो कृषी मध्ये तुम्हाला रोजचा बाजारभाव, जमीन मोजनी, सातबारा उतारा, हवामान अंदाज यांसारख्या सुविधाही अगदी मोफत मध्ये मिळत आहेत. त्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवर जाऊन हॅलो कृषी अँप डाउनलोड करून इन्स्टॉल करा.

Hello Krushi डाउनलोड करण्यासाठी Click Here

विशेष म्हणजे त्यातील काही झाडांची बोंडे तोडून ती मक्याच्या पिकामध्ये लपवून ठेवली असल्याचे मिळून आले . त्याच्याकडे अंमली पदार्थ अफुचा एकुण 277200/- रूपयेचा माल मिळून आला . याबाबतची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल वैभव सावंत यांनी दिली असुन सुरेश पवार याच्यावर लोणंद पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आलाय . या प्रकाराबाबत पुढील तपास महिला पीएसआय एसएन पवार करीत आहेत .