हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्मार्टफोन कंपनी असलेल्या Oppo कडून भारतात आपल्या A-सिरीजचा विस्तार करत Oppo A17k फोन लॉन्च केला गेला आहे. या बजट स्मार्टफोनची किंमत 10,499 रुपये असेल. Oppo A17k मीडियाटेक प्रोसेसरद्वारे समर्थित असलेल्या या फोनमध्ये फोटोग्राफीसाठी सिंगल कॅमेरा सेटअप दिला गेला आहे. यासोबतच या फोनमध्ये 3 GB रॅम आणि 64 GB इंटरनल स्टोरेज ऑप्शनदेखील दिले गेले आहेत. याच बरोबर हा फोन 4 GB व्हर्च्युअल रॅमला देखील सपोर्ट करतो, ज्यामुळे त्याची एकूण रॅम 7 GB होते.
हा फोन ई-कॉमर्स रिटेलर्स आणि ओप्पोच्या अधिकृत वेबसाइट वरून ऑनलाइन खरेदी करता येईल. तसेच येत्या काही दिवसांत देशभरातील रिटेल दुकानांवरही हा स्मार्टफोन उपलब्ध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हा स्मार्टफोन हँडसेटच्या गोल्ड आणि नेव्ही ब्लू कलर व्हेरियंटमध्ये उपलब्ध असेल. Oppo
या फोनमध्ये कंपनीकडून 6.56 इंच HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हे लक्षात घ्या कि, हा डिस्प्ले 60Hz च्या रीफ्रेश रेट आणि 600 nits च्या पीक ब्राइटनेस लेव्हलसह येतो. तसेच या फोनमध्ये MediaTek Helio G35 चिपसेट दिला गेला आहे. हा हँडसेट Android 12 ऑपरेटिंग सिस्टीमवर आधारित कंपनीच्या स्वतःच्या ColorOS 12.1 वर चालतो.
या स्मार्टफोनमध्ये 5,000mAh बॅटरीअसेल जी 10W चार्जिंगला सपोर्ट करेल. तसेच वॉटर रेसिस्टंट असलेल्या फोनला IPX4 रेटिंग मिळाले आहे. या हँडसेटमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देखील असेल.
हा फोन 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज सह लॉन्च करण्यात आला आहे. तसेच याचे स्टोरेज 1TB पर्यंत वाढवता येईल. याच बरोबर कनेक्टिव्हिटीसाठी या फोनमध्ये वाय-फाय 5, ब्लूटूथ 5.3, मायक्रो यूएसबी पोर्ट आणि 3.5 मिमी हेडफोन जॅक सारखे पर्याय देखील मिळतील. कॅमेरा बाबत बोलायचे झाल्यास यामध्ये पुढील बाजूस 5MP सेल्फी कॅमेरा तर मागील बाजूस 8MP सेंसरसह सिंगल कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय फोनच्या मागील बाजूस एलईडी फ्लॅश देखील देण्यात आला आहे.
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.oppo.com/in/smartphones/series-a/a17k/
हे पण वाचा :
Multibagger Stock : गेल्या काही वर्षांत 200% जास्त रिटर्न देऊन ‘या’ शेअर्सने गुंतवणूदारांना केले मालामाल !!!
Canara Bank ग्राहकांसाठी आनंदाची बातमी !!! ज्येष्ठ नागरिकांना FD वर मिळणार 7.5% व्याज
Bank FD : ‘या’ 102 वर्ष जुन्या बँकेकडून FD वरील व्याजदरात वाढ, नवीन व्याज दर तपासा
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात किंचित वाढ, नवीन दर पहा
Whatsapp Banking : घरबसल्या आपल्या बँकेशी संबंधित सर्व माहिती मिळवण्यासाठी ‘Save’ करा ‘हे’ नंबर