नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनमध्ये काही महिन्यांपूर्वी ओप्पोने फ्लॅगशिप Reno 6 हि सिरीज लाँच केली होती. या सीरिजमध्ये Oppo Reno 6, Oppo Reno 6 Pro आणि Oppo Reno 6 Pro+ लाँच करण्यात आले होते. या सिरीजमधला Oppo Reno 6 स्मार्टफोन भारतात लाँच करण्याची तयारी करत आहे. ओप्पोचा हा स्मार्टफोन भारतात पुढच्या आठवड्यात लाँच होण्याची शक्यता आहे. ओप्पो कंपनी भारतात Oppo Reno 6 Pro आणि Oppo Reno 6 Pro+ देखील लाँच करू शकते.
Oppo Reno 6ची वैशिष्ट्ये
Oppo Reno 6 मध्ये 6.43 इंचाचा डिस्प्ले दिला गेला आहे. ज्याचे रिजोल्यूशन FullHD+ 2400 x 1080 पिक्सल आहे. हा डिस्प्ले 90हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. या स्मार्टफोनमध्ये Mediatek Dimensity 900 SOC आणि Mali G78 जीपीयू देण्यात आला आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये Android 11 आधारित ColorOS 11.3 कस्टम युजर इंटरफेस मिळणार आहे.
याव्यतिरिक्त Oppo Reno 6 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमध्ये 64 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेन्सर, 8 मेगापिक्सलची वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स देण्यात आली आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरादेखील आहे. Reno 6 मध्ये सिक्योरिटीसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 4300mAh ची बॅटरी असणार आहे जी 65W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. या फोनची साधारण किंमत 32,200 रुपये असणार आहे.