हा तर दडपशाहीचा प्रकार, ईडीच्या धाडीत काही सापडणार नाही; पवारांचा देशमुखांना फुल्ल सपोर्ट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर छापेमारी करत त्यांच्या कुटुंबियांना त्रास देण्यात आला. पण त्यांच्या हाती काही लागणार नाही त्यामुळे आम्हांला त्याबद्दल चिंता नाही अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहितेंच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश वेळी शरद पवार बोलत होते.

शरद पवार म्हणाले, अनिल देशमुख यांच्या बाबत आम्हांला काहीही चिंता नाही. ईडी ची चौकशी आमच्यासाठी काही नवीन नाही. ईडीची धाड हा त्रास देण्याचा हा प्रयत्न आहे असे पवार म्हणाले. तसेच अनिल देशमुख यांच्यावर पहिल्यापासून केंद्राची वक्रदृष्टी आहे पण ईडी च्या धाडीत काहीच सापडणार नाही असेही पवारांनी म्हंटल.

काय आहे प्रकरण –

माजी मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या लेटरबॉम्ब नंतर अडचणीत आलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर आणि मुंबई येथील निवासस्थानी ईडी ने छापमारी सुरू केलीं आहे. आज सकाळी ईडीचे पाच अधिकारी अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत.