हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतातील युवा वर्ग मोबाईल (Oppo Reno 8 Pro) फोनचा मोठा चाहता असून नवनवीन अपडेटेड मोबाइल खरेदी करण्याकडे अनेकांचा कल असतो. अशा लोकांसाठी आता आनंदाची बातमी आहे. चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Oppo आपली Reno 8 सिरीज लॉन्च केली आहे, यामध्ये Reno 8 तसेच Reno 8 Pro या मोबाईलचा समावेश आहे. आज आपण जाणून घेऊया Oppo Reno 8 Pro या स्मार्टफोनची वैशिष्ट्ये आणि किंमत याबाबत…
मोबाईल डिस्प्ले-
या स्मार्टफोनमध्ये (Oppo Reno 8 Pro) 120Hz रिफ्रेश रेट आणि HDR10+ सपोर्टसह 6.62-इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे. Oppo Reno 8 Pro ला स्नॅपड्रॅगन 7 Gen 1 SoC प्रोसेसर आहे. यामध्ये MediaTek Dimensity 8100-Max चिपसेट आहे. हा स्मार्टफोन Android 12-आधारित ColorOS 12.1 वर काम करतो.
50-मेगापिक्सेल कॅमेरा-(Oppo Reno 8 Pro)
oppo च्या या स्मार्टफोनच्या कॅमेराबाबत (Oppo Reno 8 Pro) बोलायचं झालं तर 50 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा, 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 2-मेगापिक्सलचा मैक्रो कैमरा आहे. तसेच सेल्फीसाठी 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
मोबाईल बॅटरी-
Oppo Reno 8 Pro ला 80W चार्जरसह 4,500mAh मोबाईल बॅटरी आहे. कंपनीने असाही दावा केला आहे की ही बॅटरी फक्त 11 मिनिटांत 50% पर्यंत चार्ज होऊ शकते.
स्टोरेज आणि किंमत-
Reno8 Pro ला (Oppo Reno 8 Pro)12GB RAM आणि 256GB चे मजबूत स्टोरेज आहे.5Gत्यामुळे तुम्ही आरामात कितीही गाणी, movies पाहू शकता किंवा गेम खेळू शकता. या डिव्हाईस ची किंमत 45,999 रुपये असून आजपासून म्हणजेच १९ जुलै पासून हा स्मार्टफोन बाजारात खरेदीसाठी उपलब्ध होईल.
Nothing Phone 1 : Nothing ब्रँड चा पहिला स्मार्टफोन घालणार धुमाकूळ; पहा फिचर्स आणि किंमत
iQOO 10 Pro : फक्त 12 मिनिटांत चार्जिंग फुल्ल; iQOO चा नवा स्मार्टफोन बाजारात छाप पाडणार
OnePlus 10T लवकरच होणार लॉन्च; पहा फीचर्स आणि किंमत
Whatsapp ने आणले नवे फीचर्स; 2 दिवसांपूर्वीचा मेसेजही डिलीट करता येणार
GST चा दणका !! आजपासून या जीवनावश्यक वस्तू महागणार