Wednesday, February 1, 2023

दहावीच्या विद्यार्थ्यांना नाव, स्वाक्षरी दुरुस्तीची संधी

- Advertisement -

औरंगाबाद : कोरोनामुळे राज्य शासनाकडून दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. या परीक्षेत बसणाऱ्या विद्यार्थ्यांना आता तत्यांचे नाव, स्वाक्षरी, जन्मतारीख, विषय आणि इतर महत्वाची माहिती बदलन्याची संधी देण्यात आली आहे.

दहावीच्या विद्यार्थ्यांना मंडळाने प्रवेश उपलब्ध करून दिले नाही. मात्र सुधारित मूल्यमापन पद्धतीनुसार विद्यार्थीनिहाय गुणदान करण्यासाठी विद्यार्थ्यांचे नाव, बैठक क्रमांक व अनुषंगिक तपशील शाळांना उपलब्ध करून दिला आला आहे.

- Advertisement -

यात विद्यार्त्यांना त्यांचे नाव, स्वाक्षरी, विषय, माध्यम, फोटो, जन्मतारीख, जन्मस्थान, आणि इतर दुरुत्या सुधारून शाळांनी विभागीय मंडळाकडे प्रस्ताव सादर करावा, असे आवाहन शिक्षण मंडळाने केले आहे.