सातारा प्रतिनिधी शुभम बोडके
सातारा जिल्ह्यातील जगप्रसिध्द असलेले कास पठाराला पर्यटन चालना मिळावी, यासाठी पर्यटन विभाग जिल्हा प्रशासन आणि वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कास महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 7 ते 9 ऑक्टोबर असे तीन दिवसीय हा महोत्सव आयोजित करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी दिली.
कास पुष्प पठारला वर्ल्ड हेरिटीजचा दर्जा आहे. येथे सप्टेंबर, आॅक्टोंबर महिन्यात येत असलेली वेगवेगळ्या रंगाची फुले पाहण्यासाठी पर्यटक मोठी गर्दी करत असतात. या कास पठाराची आणि परिसराची माहिती पर्यटकांना मिळावी आणि पर्यटनाला चालना मिळावी. या उद्देशाने कास महोत्सावाचे आयोजन करण्यात आले आहे. या तीन दिवसीय महोत्सवाची तयारी अंतिम टप्यात आली आहे. महोत्सवात परिसराची व कास पठाराची संपर्ण माहिती मिळण्यास मदत होणार आहे.
जिल्हाधिकारी श्री. जयवंशी म्हणाले, या महोत्सवाच्या निमित्ताने कास परिसराची आणि गावांमधील वैशिष्ट्यपूर्ण माहिती या महोत्सवात दिली जाणार आहे. यासाठी प्रत्येक गावाला मोफत स्टॉल देण्यात येणार आहे. त्याबाबतची व्यवस्था जिल्हा प्रशासनाने केली आहे. याबरोबरच कास पठारावर जी वेगवेगळ्या प्रजातीची फुले फुलतात, याविषयी देखील वनविभागाच्या वतीने महोत्सवात परिपूर्ण माहिती मिळणार आहे. यादरम्यान कास महोत्सव भरवलेल्या ठिकाणी तीन दिवसात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी रुपेश जयवंशी यांनी दिलीये. कास पुष्प पठारला मोठ्या प्रमाणावर पर्यटक भेट देत असतात. एक छोटेखानी महोत्सावाचे आयोजन केले आहे.