पुण्यात रंगतोय सर्वात मोठा दांडिया महोत्सव!! याठिकाणी करा फ्री रेजिस्ट्रेशन अन् तुम्हीही व्हा सामील

'Plesco Dandiya Nights 2.0'
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या सर्वत्र नवरात्र उत्सव (Navratri 2023) आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जात आहे. नवरात्रीच्या या काळात रास दांडिया मोठ्या प्रमाणात खेळला जातो. खास करून तरुणाईसाठी हा एन्जॉय करण्याचा सण असतो. त्याच पार्श्वभूमीवर मागील वर्षीप्रमाणे यावर्षी देखील पिंपरी चिंचवड व पिंपळे सौदागर येथील सगळ्यात मोठ्ठा दांडिया महोत्सव ‘प्लेस्को दांडिया नाईटस 2.0’चे (PLESCO Dandiya Night’s 2.0) आयोजन केले आहे. हा कार्यक्रम दि. 20 ते 22 ऑक्टोबर दरम्यान पिंपळे सौदागर येथील कै. बाळासाहेब कुंजीर मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 10 हजारांहून अधिक दांडिया प्रेमींनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. तुम्ही सुद्धा यामध्ये सहभागी होणार असेल तर खाली दिलेल्या लिंक वरून मोफत मध्ये रजिस्ट्रेशन करू शकता.

काय आहेत कार्यक्रमाची वैशिष्ठे-

या कार्यक्रमाची वैशिष्ठे अशी आहेत कि, यामध्ये थेट संगीत, दांडिया रास, लाईव्ह बँड, रुचकर व स्वादिष्ट खाद्यपदार्थांचे स्टॉल्स यासह सहभागी व विजेत्या स्पर्धकांना बक्षिस, सोबतच सांस्कृतिक व सुरक्षित वातावरणाची खात्री अशा अनोख्या संस्कृतीचा संगम याठिकाणी अनुभवायला मिळणार आहे. दांडिया महोत्सव दि. 20 ते 22 ऑक्टोबर दरम्यान सायंकाळी 7.00 वाजता सुरु होणार आहे. या कार्यक्रमासाठी ऑनलाईन नोंदणी करण्यात येत असून दांडिया महोत्सवासाठी सर्वांना प्रवेश मोफत देण्यात येत आहे. त्यासाठी मोफत पासची सुविधा प्लेसकोचे फांऊडर उमेश काटे यांच्या जनसंपर्क कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आली आहे.

तसेच नवरात्री दुर्गा उत्सवानिमित्त नवनाथ मित्रमंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले आहे. दि. 15 ऑक्टोबर रोजी सायंकाळी देवीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. तसेच 17 ऑक्टोबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 19 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 8.00 वाजता महिलांच्या वतीने “महिला महाआरती” करण्यात येणार आहे. दि. 22 ऑक्टोबर सकाळी 9.00 वाजता होमवहन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच दि. 24 ऑक्टोबर रोजी विसर्जन सोहळा पार पडणार आहे.

उमेश काटे युथ फाऊंडेशन, नाना काटे सोशल फाऊंडेशन, नवनाथ मित्र मंडळाच्या माध्यमातून माजी विरोधी पक्षनेता नाना काटे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमामध्ये नागरिक आणि दांडियाप्रेमींनी अधिक मोठ्या संख्यने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक उमेश काटे यांनी केले आहे. हा कार्यक्रम २०-२२ ऑक्टोबर रोजी बाळासाहेब कुंजीर मैदान (PCMC मैदान) इथे पार पडणार असून, या कार्यक्रमाची सुरुवात सायंकाळी ७.०० नंतर होणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रवेश हा मोफत असून या कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवण्यासाठी umeshkate.org/dandiyanights/ या वेबसाईट वर जाऊन नाव नोंदणी करता येईल.