सातारा प्रतिनिधी। शुभम बोडके
जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेच्यावतीने उद्या रविवारी दि. 19 फेब्रुवारी 2023 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त किल्ले प्रतापगड येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या निमित्ताने पुढीलप्रमाणे कार्यक्रम होणार आहेत. सकाळी 7 वा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते भवानी मातेचा अभिषेक, 8 वा महापूजा, 9 वा. ध्वजबुरुज येथे मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण, 9.30 वा. भवानी माता मंदीरसमोर ध्वजारोहण. 9.35 वा. पालखी मिरवणूक, 10 वा. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन व जय जय महाराष्ट्र माझा या गीतास राज्य गीत म्हणून अंगिकरण्याचा कार्यक्रम. राज्य गीत गायन, पोवाडा गायन व सांस्कृतिक कार्यक्रम या प्रमाणे कार्यक्रम संपन्न होणार आहे.
छ. शिवाजी महाराज जयंतीनिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रम होणार असून सध्या शिवज्योत आणण्याची लगबग पहायला मिळत आहे. प्रतापगड येथून शिवज्योत आणण्यासाठी शिवभक्त गर्दी करू लागले आहेत. तर रविवार सुट्टीचा दिवस असल्याने अनेकजण प्रतापगड याठिकाणी जयंतीसाठी येवू लागले आहेत.