कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी
पंडित अतुलशास्त्री भगरे गुरुजी सादर करणार ‘महिमा साडेतीन शक्तीपिठांचा’
यशवंत बँक आयोजित ‘यशवंत महोसव’ सातारा जिल्ह्याच्या सांस्कृतिक क्षेत्रात सुपरिचित आहे. कराडची विशेष ओळख असणारा ‘यशवंत महोत्सव’ दिनांक 24, 25 व 26 डिसेंबर 2022 रोजी संपन्न होत आहे. भागवत भूषण, ज्योतिषाचार्य पंडित अतुलशास्त्री भगरे गुरुजी, नाशिक हे यावर्षी ‘महिमा साडेतीन शक्तीपिठांचा’ या विषयावर तिन्ही दिवशी संगीतमय कथा सादर करणार आहेत, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष शेखर चरेगांवकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
तीन दिवस रोज सायंकाळी 6 वाजता श्री कृष्णामाई घाट, कराड येथे हा महोत्सव साजरा होणार आहे. महोत्सवात दररोज सामाजिक, राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी व प्रशासकीय अधिकारी यांचेसह पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. यावेळी दररोज तीन दिवस रात्री मान्यवरांच्या हस्ते महाआरती होणार आहे.
लोकवर्गणीतून व प्रायोजकांच्या आर्थिक सहकार्यातून हा 12 वा यशवंत महोत्सव साजरा केला जातो. प्रतिवर्षीप्रमाणे सर्वांनी मोठ्या संख्येने यशवंत महोत्सवास उपस्थित राहण्याचे आवाहन बँकेचे अध्यक्ष शेखर चरेगांवकर यांनी केले आहे.