आश्चर्यकारक! बांधकामात सापडलेल्या अंड्यातून कृत्रिमरीत्या दिला सरड्यांना जन्म

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर प्रतिनिधी | कुंभारी गावामधील मल्लिनाथ बिराजदार यांच्या घराचे बांधकाम चालू होते. बांधकामासाठी खड्डा खोदत असताना तिथल्या बांधकाम कामगारांना जमिनीत काही अंडी दिसली. खड्डा खोदत असल्याने काही अंडी दबून गेली तर काही अंडी राहिली होती. ही अंडी सापाचे असतील या भीतीने कामगारांनी काढून फेकून देण्याचे ठरविले होते. काही अंडी त्या कामगारांनी फेकून ही दिली. पाच अंडी उरली असताना मल्लिनाथ हे तेथे पोहचले. कामगारांनी त्यांना सदर सर्व माहिती दिली. लगेचच मल्लिनाथ यांनी राहिलेले पाच अंडी बाजूला काढुन ठेवली.

मल्लिनाथ यानी ही माहिती विनय गोटे यांना दिली व त्याचे काही फोटो पाठवले. विनय यांच्या सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही अंडी सरड्याची आहेत हे ठामपणे सांगितले. मल्लिनाथ यांच्या इथे बांधकाम चालू असल्यामुळे त्यांनी सुरक्षितता म्हणून ती अंडी विनय गोटे व अजित चौहान यांच्याकडे सुपूर्द केली. विनय गोटे यांनी संतोषभाऊ धाकपाडे यांच्याकडे ती अंडी कृत्रिमरीत्या उबवण्यासाठी दिली.

मल्लिनाथ यांनी राहिलेलं अंडी इतरत्र न टाकून दिल्यामुळे त्या पाच अंड्यातून दोन पिल्ले २३ जुलै रोजी अंडी सापडल्यापासून ०७ ऑगस्ट रोजी दुपारी १२:४५ च्या दरम्यान बाहेर आली. राहिलेल्या तीन अंड्यातून ३१ रोजी एक पिल्लू बाहेर आले आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच १ सप्टेंबर रोजी दोन अंड्यातून दोन पिल्लं बाहेर पडली.

२३ जुलै दरम्यान मिळालेल्या अंड्यातून पाहिले दोन पिल्लं १५ दिवसात बाहेर पडली तर राहिलेल्या तीन अंड्यातून ४० आणि ४१ दिवसाचा कालावधी लागला. ही सर्व पिल्लं परत निसर्गाच्या सानिध्यात सोडून देण्यात आली. काही तज्ञ व्यक्तींच्या म्हणजेच डॉ. प्रतीक तलवाड, डॉ. वरद गिरी आणि शिवानंद हिरेमठ सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि यु ट्यूबच्या माध्यमातून ही सरड्याचे अंडी कृत्रिम रित्या उबविण्यात आली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

Leave a Comment