तहानलेला पोपटाची हुशारी !!!तहान भागवण्यासाठी लढवली वेगळीच शक्कल ; व्हिडिओ वायरल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | लहानपणी आपण सर्वानीच तहानलेला कावळ्याची गोष्ट वाचली होती पण आपण कधी तहानलेला पोपट पहिला आहे का ??? आज आपण पाहूया तहानलेला पोपट आणि त्याने पाण्यासाठी लढवलेली शक्कल ….आयएफएस ऑफिसर सुसंता नंदा यांनी आपल्या ट्विटवरवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. एक सुंदर पोपट नारळाच्या झाडावर चढून नारळपाणी पितानाचा हा व्हिडीओ आहे.

पाण्याच्या शोधात असलेला हा पोपट एका नारळाच्या झाडावर येतो. नारळाच्या झाडावर बसून तो एक नारळ तोडतो. या नारळाला आपल्या चोचीने छेद पाडतो आणि चोचीत नारळ धरून त्यातील पाणी तो घटाघटा पिऊ लागतो. अशा पध्दतीने नारळपाणी पिऊन पोपट आपली तहान भागवतो.  व्हिडीओतील पोपट हा मकाऊ प्रजातीचा आहे. ज्याचा रंग निळा असून त्याची शेपटी पिवळी आहे.

सुसंता नंदा यांनी हा व्हिडीओ शेअर करताना नारळ पाणी प्यायला कुणाला आवडतं असं कॅप्शन दिलं आहे. याशिवाय त्यांनी नारळपाण्याचे फायदेही सांगितले आहेत.नारळपाणी प्यायल्याने खाल्ल्यानंतर होणारी मळमळ जाणवत नाही.तसेच नारळपाणी पचनक्रिया चांगली ठेवण्यात मदत करतं.

Leave a Comment