…अन्यथा मंत्र्यांना दिवाळी साजरी करू देणार नाही; हरिभाऊ बागडेंचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – राज्यातील शेतकरी मदतीच्या प्रतिक्षेत आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळाली. सरकारने मदत जाहिर केली, मात्र अद्यापही याचा शासन आदेश आमच्यापर्यंत आला नाही. भाजपबरोबर सत्तेत असताना उध्दव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन हेक्टरी ५० हजार रुपयांची नुकसान भरपाईची मागणी केली होती. तेच आता मुख्यमंत्री झाल्यावर हेक्टरी १० हजार रुपयांची घोषणा करतात. ही भरपाई दिवाळीपूर्वी न मिळाल्यास भाजप रस्त्यावर उतरेल आणि मंत्र्यांना दिवाळी साजरी करु देणार नाही, असा इशारा आमदार हरिभाऊ बागडे यांनी काल पत्रकार परिषदेत दिला.

राज्यातील ५५ लाख हेक्टरहून अधिक शेतजमिनींवरील पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याची सरकारची प्राथमिक आकडेवारी आहे. प्रत्यक्षात १०० लाख हेक्टरहून अधिक जमिनीवरील पिके पूर्ण नष्ट झाली आहेत, आणि पुरामुळे शेतजमिनी नापीक झाल्या आहे. सरकारने दहा हजार रुपयांची मदत जाहिर केली, मात्र केवळ हेक्टरी ६ हजार रुपयेच मिळणार असल्याच्या तक्रारी आमच्याकडे येत आहे. सरकारी अधिकारी व काही दलाल संगनमत करून शेतकऱ्यांची फसवणूक करीत आहे. प्रदेश कार्यकारणी सदस्य एकनाथराव जाधव, जिल्हा संघटन सरचिटणिस लक्ष्मणराव औटे, आमदार प्रशांत बंब,डॉ.राम बुधवंत उपस्थित होते.

भाजप सरकाराने ज्या-ज्या वेळी शेतकऱ्यांवर नैसगिक संकटे आली. त्यांना निकषांपेक्षा जास्त मदत दिली असल्याचे आमदार प्रशांत बंब यांनी सांगितले. या सरकराने २०१९ची मदत आता दिली आहे. अजूनही २०२०वर्षातील मदतही अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेली नाही. शेतकरी तसेच बंद पडलेल्या विकास कामांविषयी मुख्यमंत्र्यांना अनेक वेळा पत्र लिहली, मात्र साधे उत्तरही दिले नाही. मुख्यमंत्री यांना भेटीसाठी वेळ मागितला. मात्र भेट मिळत नसल्याचा आरोपही आमदार बंब यांनी केला.

Leave a Comment