अन्यथा सरकारने तलाठी पदे रद्द करावीत : सचिन नलवडे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

ई -पीक पाणी तलाठ्यांनी करावी, अन्यथा सरकारने तलाठी पदे रदद् करावी, अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे नेते सचिन नलवडे यांनी केली. याबाबतचे निवेदन प्रांताधिकारी यांना देण्यात आले. यावेळी शिवाजी पाटील, योगेश झांबरे, शिवाजी पवार, शिवाजी गायकवाड, समाधान पवार उपस्थित होते.

शेतकऱ्यांना पीक पाणी नोंद करणे सोईचे व्हावे यासाठी राज्य शासनाने ई-पीक पाणी करण्याचे आदेश काढला आहे. शेतकऱ्यांनी स्वतःच्या मोबाईल वरुण शेतात जाऊन ऑनलाईन पीक नोंद करायची आहे. यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांकडे स्मार्ट फोन असने गरजेचे आहे. राज्यातील बहुतांश ग्रामीण भागात मोबाईल टॉवर नसल्याने मोबाईलला रेंज येत नाही. त्यामुळे पिक पाणी अपलोड करताना, फोटो काढातान अडचणींचा सामना करावा लागत आहे. पीक नोंद होत नाही.आजही अनेक शेतकऱ्यांकडे स्मार्ट फोन नाहीत. काही शेतकरी स्मार्ट मोबाईल वापरण्याबाबत अडाणी आहेत. त्यामुळे त्यांना कुणाची तरी मदत घ्यावी लागत आहे.

शासनाने ई-पीक पाणी नोंदी दिलेल्या मुदतीत झाल्या नाहीत तर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा राहणार आहे. शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळणार नाही, साखर कारखान्याला उस नोंद होणार नाही, दुष्काळ, महापूर, इतर नैसर्गिक आपत्तीमुळे मिळणारी नुकसान भरपाई मिळणार नाही. ई पीक नोंदीच्या निर्णयाने शेतकऱ्यांचा फायदा कमी नुकसान जास्त होईल. यासाठी लवकर योग्य तो निर्णय घेवून शेतकऱ्यांच्या ई-पीक पाण्याची समस्या सोडवावी. सरकारने एखाद्या एजन्सीला हे काम द्यावे अन्यथा तलाठ्यांना करण्यास सांगावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.