…अन्यथा एसटी कर्मचाऱ्यांच्या रोषाला या सरकार ला सामोरे जावे लागेल, अ‍ॅड. गुणरत्ने सदावर्ते यांचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – एसटी विलीनीकरणाच्या लढ्यात अनेक अनुभवी लोकांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे. सगळा पिटारा मी उघडणार नाही, 20 डिसेंबरला सरकारने पूर्ण तयारीनिशी यावे. आम्ही विलनिकरण घेऊनच राहणार. नसता शाळकरी मुलांपासून ते दूध वाटप करणाऱ्यांपर्यंत सर्वांना सेवा देणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या रोषाला या सरकार ला सामोरे जावे लागेल, असा इशारा अ‍ॅड. गुणरत्ने सदावर्ते यांनी आज औरंगाबाद येथील संपकरी एसटी कर्मचाऱ्याची भेट घेतली यावेळी दिला.

राज्य शासनात एसटी महामंडळाच्या विलीनीकरणाच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी मागील महिनाभरापासून संप पुकारला आहे. सोमवारी परिवहन मंत्री अनिल परब यांनी 13 डिसेंबर हि कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याची डेडलाईन दिली होती. मात्र, संप अजूनही सुरुच असून सर्व कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. दरम्यान, आज अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी शहरातील मध्यवर्ती बस स्थानकातील संपकरी कर्मचाऱ्यांची आज दुपारी ३ वाजेच्या सुमारास भेट घेतली. यावेळी त्यांनी संपकरी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण होणार असून आम्ही जिंकणार आहोत. आमच्यासोबत संविधान आहे, अशी ग्वाही दिली.

तसेच यावेळी अ‍ॅड. गुणरत्ने सदावर्ते यांनी राजकारणात नव्याने सुरुवात करणाऱ्या राज ठाकरे यांनी एसटीचे विलानीकरण होणार नाही असे वक्तव्य केले आहे, या त्यांच्या खाजगी मताला मी जास्त महत्व देत नाही, असा खोचक टोला अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी लगावला. तसेच म्हाडाची प्रश्नपत्रिका फुटली. आरोपींना अटक झाली यातून कायद्याचा बट्ट्याबोळ झाला. त्यामुळे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अटक करा, अशी मागणी देखील अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी राज्याच्या पोलिस महासंचालकांकडे केला आहे.

Leave a Comment