आमच्यासाठी गोपीचंद हेच पक्ष आहेत..

Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी

सांगली जिल्हयातील सर्व कार्यकर्ते आणि आमच्यावर प्रेम करणार्‍या जनतेशी संवाद साधून येत्या दोन दिवसांत सांगली लोकसभेच्या उमेदवारीबाबत भूमिका जाहीर केली जाईल. आमच्यासारख्या लाखो कार्यकर्त्यांना गोपीचंद पडळकर हाच पक्ष असून निवडणूक जनतेच्या पाठबळावर निवडणूक लढविणे निश्‍चित आहे. त्यामुळे अफवांवर विश्‍वास न ठेवता कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे, असे आवाहन जिल्हा परिषदेेचे समाजकल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर यांनी केले.

सांगली लोकसभा निवडणूक लढविण्याचे जाहीर करणारे गोपीचंद पडळकर यांच्या भूमिकेबाबत अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत. अनेक अफवाही उठवल्या जात असुन त्या अनुषंगाने समाजकल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर यांनी आज विटा येथे पडळकर गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली

यावेळी माजी समाजकल्याण सभापती किसन जानकर, माजी नगरसेवक शिवाजी हारगुडे, राजू जानकर, संग्राम माने, शरद बाबर, मंथन मेटकरी, सुहास पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.