औरंगाबाद : महापालिकेच्या मेल्ट्रॉन येथील केअर सेंटरसाठी उभारण्यात येणाºया आॅक्सीजन प्लांटचे भिजत घोंगडे कायम असून, निधी प्राप्त नसल्याने काही काळ बांधकाम थांबवण्यात आले होते. आता निधी प्राप्त झाल्यानंतरही कामाला मुहूर्त मिळालेला नाही. विशेष म्हणजे कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असून महापालिकेला या काळात आॅक्सिजन बेडची गरज पूर्ण झाली असती.
कोरोना बाधित रुग्ण गतवर्षी मोठ्या प्रमाणात आढळून येत होते, त्यावेळी आॅक्सीजन बेडची गरज भासत होती. त्यामुळे पालक मंत्री सुभाष देसाई यांनी मेल्ट्रोन येथील कोविड केअर सेंटरसाठी स्वतंत्र आॅक्सीजन प्लांट उभारण्याचा निर्णय घेत महापालिकेला निधी देण्याचे आश्वासन दिले. मात्र प्रत्यक्षात निधी मिळाला नाही. महापालिकेच्या पाठपुराव्यानंतर चार कोटी पन्नास लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याचे पत्र जिल्हाधिकाºयांंनी महापालिकेला दिले; पण निधी दिला नाही. त्यामुळे निविदा प्रक्रिया अंतिम झालेली असताना देखील महापालिकेने कंत्राटदाराला कायार्रंभ आदेश दिले नाहीत.
दरम्यान जिल्हा प्रशासनाने गेल्या महिन्यात साडेचार कोटी रुपयाचा निधी दिला व महापालिकेने कंत्राटदाराला कायार्रंभ आदेश दिले. मात्र अद्याप कंत्राटदाराने आॅक्सिजन प्लांटची काम सुरू केले नाही. यासंदर्भात आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नीता पाडळकर यानी सांगितले की, कंत्राटदाराला काम सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. काम सुरू झाल्यावर प्लांट पूर्ण होण्यासाठी किमान 45 दिवस लागणार आहेत. तोपर्यंत मात्र कोरोना कहर कमी होऊ शकतो.
औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group