हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन : 118 पद्मश्री पुरस्काराची घोषणा झाली असून मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते सय्यदभाईंचाही यामध्ये समावेश आहे. समाजसुधारक हमीद दलवाई यांच्यासोबत काम केलेले निष्ठावान कार्यकर्ते म्हणून सय्यदभाईंची ओळख आहे. गेली अनेक वर्षे ते मुस्लिम सत्यशोधक मंडळासोबत कार्यरत आहेत. त्यांना पुरस्कार जाहिर झाल्याबद्दल मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष शमसुद्दीन तांबोळी यांनी आनंद व्यक्त केला आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने देण्यात येणाऱ्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यावेळी 16 नामांकित व्यक्तींना पद्मविभूषण तर 16 व्यक्तींना पद्मभूषण आणि 118 व्यक्तींना पद्मश्री देण्याची घोषणा करण्यात आली आहे. माजी अर्थमंत्री अरुण जेटली आणि माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना मरणोत्तर पद्मविभूषण जाहिर झाला आहे. पीव्ही सिंधू आणि मनोहर पर्रीकर यांना पद्मभूषण पुरस्कार देण्यात येणार आहे. पद्मश्री पुरस्काराने 118 नामांकित व्यक्तींचा सन्मान करण्यात येणार आहे. पोपटराव पवार, राहीबाई पोपरे,सुरेश वाडकर, झहीर खान यांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात येणार आहे.