Sunday, December 7, 2025
Home Blog Page 19

Ladki Bahin Yojana : ‘या’ लाडक्या बहिणींचे पैसे बंद होणार; मुख्यमंत्री फडणवीसांचा दे धक्का!!

Ladki Bahin Yojana fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Ladki Bahin Yojana। महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली. सुरुवातीला २१ ते ६५ वर्ष वयोगटातील सर्वच महिलांना याचा लाभ देण्यात आला. मात्र आता काही दिवसांपासून अपात्र महिलांचा शोध सरकार घेत आहे. पात्रतेच्या निकषात न बसणारे आणि बोगस नाव नोंदवलेल्या महिलांना या योजनेतून वगळण्याचा धडाका सरकारने लावला आहे. आज घडीला राज्यात एकूण 2 कोटी 63 लाख लाडक्या बहिणींनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेत नोंदणी केली. त्यापैकी 2 कोटी 41 लाख महिला पात्र ठरल्या. म्हणजेच जवळपास राज्यभरात 26 लाख 34 हजार बोगस ‘लाडक्या बहिणीं’नी दरमहा दीड हजारांचा निधी घेऊन सरकारची फसवणूक केल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे या अपात्र ‘लाडक्या बहिणीं’ नावे वगळली जाणार आहेत. अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.नागपूरमधील सातनवरी येथे एका कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

फडणवीस काय म्हणाले? Ladki Bahin Yojana

काही दिवसांपूर्वी लाडक्या बहीण योजनेची (Ladki Bahin Yojana) छाननी केल्यानंतर राज्यभरात तब्बल 26 लाख 34 हजार बोगस ‘लाडक्या बहिणीं’नी दरमहा दीड हजारांचा निधी घेऊन सरकारची फसवणूक केल्याचं समोर आलं आहे. यामध्ये काही महिला तर सरकारी कर्मचारी आहेत, काही महिला इन्कम टॅक्स भरत आहेत. सध्या महायुती सरकारला या लाडक्या बहीण योजणेमुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे सरकारने या योजनेच्या पात्र महिलांची ई- केवायसी पद्धतीने पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात मोठा घोटाळा होत असल्याचे समोर आलं आहे. विशेष म्हणजे दोन्ही उपमुख्यमंत्राच्या जिल्ह्यात अपात्र महिलांची संख्या ही सर्वाधिक आहे. त्यामुळे या अपात्र महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळले जाईल

लाडकी बहीण योजनेच्या (Ladki Bahin Yojana) गैरवापराची चौकशी सुरु आहे. ज्या लाभार्थ्यांनी चुकीच्या मार्गाने या योजनेचा लाभ घेतला आहे, त्यांचा लाभ बंद केला जाईल. मुंबई, पुणे आणि इतर मोठ्या शहरांमध्ये सुमारे 26 लाख महिलांनी या योजनेचा गैरवापर केला आहे. त्यामुळे यापुढे या योजनेचा लाभ थांबविण्यात येईल अशी भूमिका सरकारने घेतली असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना मोठा धक्का बसला आहे.

Manoj Jarange Patil : …. तर तुमचं सरकार उलथवून टाकेन; जरांगेंचा फडणवीसांना इशारा

Manoj Jarange Patil fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या मागणीवरून मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. २७ ऑगस्टला आंतरवाली सराटीपासून थेट मुंबईपर्यंत मराठ्यांचा भव्य दिव्य मोर्चा ते काढणार आहेत. तत्पूर्वी आज पत्रकार परिषद घेऊन मनोज जरांगे पाटील यांनी महायुती सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याना इशारा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या मागण्या मान्य केल्या तर आम्हाला मुंबईला जाण्याचीही गरज नाही, परंतु जर मराठ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर आम्ही तुमचं सरकारही उलथवून टाकू शकतो असा इशारा जरांगे पाटलांनी फडणवीसांना दिला.

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) म्हणाले, मी आजपासून काहीही बोलणार नाही. मी सरकारला दोन दिवसांचा वेळ देतोय. आम्ही २७ ऑगस्टला सकाळी १० वाजता मुंबईकडे निघणार आहोत. आम्ही अंतरवालीहून मंकाळा, शहागड, शहागड चौक, आंबळटाकळी, तुळजापूर, वाघाडी, पैठणहून मुंबईकडे जाऊ. २७ ऑगस्टला आमचा मुक्काम शिवनेरीवर असेल, त्यानंतर २८ ऑगस्टला आम्ही चाकणला जाऊ… तिथून पुढे तळेगाव, लोणावळा पनवेल, वाशी, चेंबूर या मार्गे आझाद मैदानात पोहचू. २९ ऑगस्टला आपले बेमुदत उपोषण सुरु होईल. आम्हाला कोणाला त्रास द्यायचा नाही, मुंबईत वाहतूक कोंडी करायला जायचे नाही, तर आम्हाला न्यायासाठी जायचे आहे. तुम्ही आम्हाला कोणताही एक रस्ता द्या असं जरांगे पाटलांनी म्हंटल.

मराठा- कुणबी एकच आहेत- Manoj Jarange Patil

आमची प्रमुख मागणी हीच आहे कि मराठा कुणबी एकच आहेत. आणि याची अंमलबजावणी झाल्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही. तुम्ही गेल्या 13 महिन्यांपासून अभ्यास सुरू करताय असा टोलाही त्यानी लगावला. जर तुम्हाला अजूनही अभ्यासच करायचा असेल तर त्याला आमचा नाईलाज आहे. आम्ही ऐकू शकत नाही. देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्याचे विषय समजून घ्यावे. १० टक्के आऱक्षण आम्हाला नकोय , आम्हाला आमचं हक्काचे घर पाहिजे. भाड्याने घर देऊ नका. आम्हाला हक्काचे आरक्षण हवे आहे. आमच्या दीडशे वर्षापूर्वीच्या नोंदी आहेत. सगेसोयरेची अधिसूचना तुम्ही काढली. तिची अंमलबजावणी नाही. तुम्ही त्यावेळेस सांगितले होते की, आम्ही 2012 च्या कायद्यात दुरुस्ती केली. आम्हाला सहा महिन्यासाठी अंमलबजावणीला वेळ द्या. आता दीड वर्ष झाले, तरी तुम्ही काही केलं नाही. सरकारकडूनच नेमण्यात आलेल्या शिंदे समितीकडून 58 लाख कुणबी नोंदी सापडल्या होत्या. समिती तुमचीच होती. समितीचा अहवाल सुद्धा स्वीकारण्यात आला, तर मग आडमुठे कोण? असा सवालही मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केली.

Bermuda Triangle : बर्म्युडा ट्रँगलमध्ये एलिअन्सची एंट्री?? नव्या दाव्याने जगात खळबळ

Bermuda Triangle alien

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Bermuda Triangle । उत्तर अटलांटिक महासागरात वसलेला बर्म्युडा ट्रँगल हा परिसर नेहमीच माणसासाठी गूढ राहिलेला आहे. बर्म्युडा ट्रँगलच्या समुद्रात अनेक विमाने, जहाजे बुडाल्याने मनुष्याला या परिसराची जेवढी भीती आहे, तितकंच त्याबद्दल कुतूहल सुद्धा आहे. बर्म्युडा ट्रँगलमधील विमाने आणि जहाजे बुडण्याच्या घटनांमागे अनेक सिद्धांत आणि कथा असल्या तरी, त्याचे खरे कारण अद्याप पूर्णपणे समजलेले नाही. त्यातच आता एक खळबळ उडवून देणारा दावा समोर आला आहे. बर्म्युडा ट्रँगल हे एलिअन्सचे गुप्त ठिकाण आहे असा दावा अनेक तज्ज्ञांनी आणि खलाश्यांनी केला आहे.

कोलंबसला दिसले होते एलियन्सचे यान- Bermuda Triangle

बर्म्युडा ट्रँगल (Bermuda Triangle) हे ठिकाण उत्तर अटलांटिक महासागरात स्थित असून अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर मियामी (फ्लोरिडा) पासून १७७० किलोमीटर अंतरावर आणि नोव्हा स्कॉशिया, (कॅनडा) येथील हॅलिफॅक्सच्या दक्षिणेस १३५० किलोमीटर (८४० मैल) अंतरावर आहे. १४९२ मध्ये अमेरिकेचा शोध लावणारा महान संशोधक क्रिस्टोफर कोलंबस त्याच्या रोजच्या डायरीत बर्म्युडा ट्रँगल बाबत खळबळजनक लिखाण लिहिले होते. कोलंबसच्या मते, १९४२ साली त्याला विचित्र दिवा दिसला आणि थेट समुद्रात पडला. या घटनेमुळे, कोलंबसचा होकायंत्र खराब झाला. त्याला हा प्रकार अजबच वाटला. ही काही भुताटकी तर नाही ना, अशी शंका त्याच्या मनात त्यावेळी आली होती.

पुढे २००९ मध्ये, बर्म्युडा ट्रँगलजवळ उड्डाण करणाऱ्या काही लोकांनी आकाशात विचित्र प्रकाश पाहिल्याचा दावा केला होता. हे दिवे एका विशिष्ट प्रकारच्या भोवर्याच्या आकाराचे होते. अनेक सिद्धांतकार म्हणतात की हा विचित्र प्रकाश दुसरे तिसरे काही नसून एक एलियन जहाज होता. त्यांच्या मते, बर्म्युडा ट्रँगल हा एलियन्सच्या तळाकडे जाणारा मार्ग आहे. आजपर्यंत, बर्म्युडा ट्रँगलचे (Bermuda Triangle) रहस्य पूर्णपणे कळलेले नाही. ते खरोखरच एलियन्सचे लपण्याचे ठिकाण आहे की ते केवळ नैसर्गिक आणि वैज्ञानिक कारणांमुळे घडलेल्या घटनांचे परिणाम आहे? हे प्रश्न अजूनही आहेत. वैज्ञानिक दृष्टिकोन या रहस्याला नैसर्गिक कारणांशी जोडतो. बर्म्युडा ट्रँगल हे असं ठिकाण आहे जिथे चुंबकीय अडथळा खूप जास्त आहे. तसेच, येथे वारे ताशी २५० किलोमीटर वेगाने वाहतात आणि समुद्राच्या लाटा ५० फूट उंच असू शकतात. अशा नैसर्गिक आणि हवामानाच्या कारणांमुळे अनेक जहाजे आणि विमाने या भागात आल्यावर समुद्रात बुडतात.

Ameet Satam : भाजपने मुंबई अध्यक्ष बदलला; ठाकरेंना नडण्यासाठी नवा डाव

Ameet Satam Mumbai President

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Ameet Satam । आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाने मुंबईत मोठी खेळी खेळली आहे. भाजपने मुंबई अध्यक्षपदी अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमित साटम यांची मुंबई अध्यक्षपदी निवड केली आहे. अमित साटम हे मुंबई भाजपचा आक्रमक चेहरा म्हणून ओळखले जातात. एकीकडे मुंबईत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची चर्चा सुरु असताना आणि दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता असताना ठाकरेंना घेरण्यासाठी भाजपने हा मोठा डाव टाकलाय असं म्हणाव लागेल.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमीत साटम (Ameet Satam) यांची भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) मुंबई युनिटचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्याची घोषणा केली. अमित साटम यांनी विधानसभा आणि विविध व्यासपीठांवर भाजपची बाजू आक्रमकपणे मांडण्याचे काम केले आहे. त्यांना मुंबईकरांच्या प्रश्नांची, मुंबईतील नागरी समस्यांची चांगलीच जाण आहे. याशिवाय भाजपच्या वरिष्ठांच्या ते अतिशयम खास मर्जीतील म्हणून ओळखले जातात. यामुळे अमित साटम यांना मुंबई भाजपच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली असल्याचे बोललं जात आहे.

फडणवीस काय म्हणाले?

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटल, अमित साटम ३ वेळा (Ameet Satam) आमदार म्हणून निवडून आले आहेत, त्यापूवी ते नगरसेवक होते. पक्षात काम करत असताना त्यांनी अनेक संघटनात्मक जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. अभ्यासू आणि आक्रमक अशी अमित साटम यांची ओळख आहे. मुंबईच्या राजकारणाची जाण आणि कल्पकता त्यांच्याकडे आहे. येत्या काळात त्यांच्या नेतृत्वाखालील भाजप मुंबईत घोडदौड राखेल. अमित साटम सर्व संघटनात्मक जबाबदाऱ्या चांगल्या पद्धतीनं पार पडतील आणि मुंबई महापालिकेत पुन्हा एकदा महायुतीची सत्ता येईल असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

कोण आहेत अमित साटम ? Ameet Satam

अमित साटम हे मुंबईतील अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. २०१४, २०१९ आणि २०२४ अशा सलग ३ वेळा त्यांनी अंधेरी पश्चिम मधून विजय मिळवला आहे. अमित साटम यांचा जन्म 15 ऑगस्ट 1976 रोजी मुंबईत झाला. 1998 मध्ये मुंबई विद्यापीठाच्या मिठीबाई कॉलेज ऑफ आर्ट्समधून राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र या विषयात बॅचलर ऑफ आर्ट्स पूर्ण केले. शिक्षणानंतर अमित साटम मुंबईतील भाजप युवा मोर्चा आणि स्थानिक समित्यांमध्ये कार्यरत होते. त्यांनी अंधेरी पश्चिम मतदारसंघातून सलग ३ वेळा दणदणीत विजय मिळवला. अमित साटम यांना मुंबईच्या प्रश्नांची जाण आहे. विधानसभेतही मुंबईकरांचे प्रश्न ते आक्रमकपणे मांडताना दिसतात. महत्वाची बाब म्हणजे साटम हे आक्रमक राजकारणी असल्याने आणि ठाकरे बंधूना थेट शिंगावर घेण्यासाठीच त्यांना मुंबई भाजपचे अध्यक्षपद देण्यात आलं आहे कि काय अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.

Mumbai Metro : मुंबई मेट्रो रात्री उशिरापर्यंत धावणार; गणेशोत्सवानिमित्त MMRDA चा निर्णय

Mumbai Metro

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mumbai Metro । मुंबईकरांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. गणेशोत्सवानिमित्त मुंबई मेट्रो रात्री उशिरापर्यंत धावणार आहे. गणेशभक्ताना रात्री उशिरापर्यंत प्रवास करता यावा आणि उशीर झाला तरी घरी व्यवस्थित जाता यावे यासाठी MMRDA म्हणजे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणने हा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सव हा केवळ एक सांस्कृतिक उत्सव नाही तर शहरातील सर्वात व्यस्त प्रवास कालावधींपैकी एक आहे. या काळात मेट्रोच्या फेऱ्या वाढवून जागतिक दर्जाची शहरी गतिशीलता प्रदान करणे महत्वाचं आहे असं अधिकाऱ्यांनी म्हंटल.

कोणत्या मेट्रो 12 पर्यंत धावणार – Mumbai Metro

Metro Line 2A (अंधेरी पश्चिम–दहिसर) आणि Metro Line 7 (गुंदवली–दहिसर) या मार्गिकांवरील गाड्या रात्री 11:00 ऐवजी 12:00 वाजेपर्यंत धावणार आहेत. मेट्रोची ही विशेष सेवा 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर 2025 या 11 दिवसांसाठी उपलब्ध असेल. या ११ दिवसात मुंबईकर वेगवेगळ्या मंडळाचे गणपती बघायला रात्री उशिरापर्यंत बाहेर असतात. परिणामी घरी परत जाताना रेल्वे आणि बस मध्ये मोठी गर्दी बघायला मिळते. अशावेळी गणेशभक्तांना या काळात रात्री उशिरापर्यंत सोयीस्कर प्रवास मिळावा यासाठी MMRDA ने हा निर्णय घेतला आहे.

अधिकाऱ्यांनी म्हंटल कि, गणेशोत्सवाच्या काळात भाविकांचा प्रवास सोप्पा करण्यासाठी आणि भाविकांना रात्री उशिरा प्रवासासाठी सुरक्षित प्रवासाची सुविधा देण्यासाठी मेट्रोने (Mumbai Metro) हे पाऊल उचललं आहे. यामध्ये सोमवार ते शुक्रवार दरम्यान, ३१७ सेवा सुरू होतील, ज्यामध्ये गर्दीच्या वेळी दर ५ मिनिटे ५० सेकंदांनी आणि गर्दी नसलेल्या वेळी ९ मिनिटे ३० सेकंदांनी मेट्रो धावतील. शनिवारी २५६ मेट्रो धावतील. Peak hours मध्ये दर 8 मिनिटांनी मेट्रो धावेल तर Non-peak hours मध्ये दर 10 मिनिटे 25 सेकंदांनी मेट्रो धावतांना दिसेल. तर रविवारी २२९ मेट्रो सेवेत असतील. या ट्रेन दर 10 मिनिटांनी धावतील. गर्दी हाताळण्यासाठी गरज पडल्यास अतिरिक्त गाड्या सुरू केल्या जाऊ शकतात.

दरम्यान, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे मेट्रोनेही रात्रीच्या मेट्रो वेळेत मोठा बदल केला आहे. गणेश विसर्जनाच्या दिवशी म्हणजे 06 सप्टेंबरला सकाळी 6 ते दुसऱ्या दिवशी रात्री 11 पर्यंत मेट्रो सेवा 41 तास अखंड मेट्रो सुरू राहणार आहे. तर 27 ते 29 ऑगस्ट या गणेशेत्सवाच्या पहिल्या तीन दिवसांत मेट्रो सकाळी 6 ते रात्री 11 पर्यंत सुरू राहील, तर 30 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर या काळात मेट्रोसेवा सकाळी 6 ते रात्री 2 पर्यंत सुरू राहणार आहे. मेट्रो प्रशासनाने भाविकांना आवाहन केले आहे की, या विशेष सोयीचा लाभ घ्यावा, गर्दी टाळून सार्वजनिक वाहतूक वापरावी आणि सुरक्षित गणेशोत्सव साजरा करावा.

Ganesh Puja Mantra : गणपतीच्या ‘या’ मंत्राचा जप करा आणि मिळवा सुख- समृद्धी

Ganesh Puja Mantra

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Ganesh Puja Mantra । गणपती हा बुद्धीच्या शक्तीचा देव म्हणून ओळखला जातो. . कोणत्याही महत्वाच्या कार्यक्रमाची सुरुवात गणेशाच्या पूजणाने होते. सनातन धर्मात श्रीगणेशालाअग्रपूजक मानले जाते. त्यांची पूजा केल्याने जीवनातील सर्व वाईट गोष्टी दूर होतात आणि सर्व अडथळे दूर होतात असं मानले जाते. श्रीगणेशाच्या पूजणाने आपल्या आयुष्यात अनेक चांगल्या गोष्टी घडतात. तसेच गणपती मंत्राचा जप केला तर जीवनात सुख शांती लाभते. हिंदू धर्मात श्रीगणेशाच्या मंत्राचे अनेक फायदे आहेत. या मंत्राचे जप केला तर गणेशाचा आशीर्वाद मिळतो असेही बोलालले जाते..

श्रीगणेशाच्या मंत्राचे फायदे – Ganesh Puja Mantra

रोज सकाळी गणेशाच्या मंत्राचा जप केल्यानंतर मनाला आणि शरीराला शांती, समाधान मिळते. तसेच जीवनात सुख,समृद्धी आणि यश मिळते. श्रीगणेशाच्या मंत्रांचा जप केल्याने बाप्पाच्या कृपेने मनुष्याला ज्ञान आणि बुद्धी प्राप्त होते. याशिवाय मंत्रांचा जप केल्याने व्यक्तीचे मन आणि आत्मा शुद्ध होते.

श्रीगणेशाचा मंत्र म्हणण्याची पद्धत

रोज सकाळी आंघोळ करावी. आंघोळीनंतर शांत ठिकाणी बसून मंत्राचा जप (Ganesh Puja Mantra) करावा . त्यानंतर कमीत कमी 100 वेळ गणेशाच्या मंत्राचा जप करा. मंत्र जप केल्यानंतर मन एकाग्र ठेवा.

गणपतीचे मंत्र

ॐ गणेशाय नमः

ॐ गणपतये नमः

ॐ श्री गणेशाय नमः

ॐ गणेश शरणम्

वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥

विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लम्बोदराय सकलाय जगद्धितायं।
नागाननाथ श्रुतियज्ञविभूषिताय गौरीसुताय गणनाथ नमो नमस्ते॥

एकदन्ताय शुद्घाय सुमुखाय नमो नमः ।
प्रपन्न जनपालाय प्रणतार्ति विनाशिने ॥

ॐ एकदन्ताय विद्धमहे, वक्रतुण्डाय धीमहि,
तन्नो दन्ति प्रचोदयात्

ॐ नमो सिद्धि विनायकाय सर्व कार्य कर्त्रे सर्व विघ्न प्रशमनाय
सर्व राज्य वश्यकरणाय सर्वजन सर्वस्त्री पुरुष आकर्षणाय श्रीं ॐ स्वाहा

महाकर्णाय विद्महे, वक्रतुण्डाय धीमहि, तन्नो दंती प्रचोदयात्।।
गजाननाय विद्महे, वक्रतुण्डाय धीमहि, तन्नो दंती प्रचोदयात्।।

ॐ ग्लौम गौरी पुत्र, वक्रतुंड, गणपति गुरु गणेश।
ग्लौम गणपति, ऋद्धि पति, सिद्धि पति. करो दूर क्लेश ।।

गजाननाय विद्महे, वक्रतुण्डाय धीमहि, तन्नो दंती प्रचोदयात्।।
श्री वक्रतुण्ड महाकाय सूर्य कोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व-कार्येशु सर्वदा॥

ॐ श्रीं ह्रीं क्लीं ग्लौं गं गणपतये वर वरद सर्वजनं मे वशमानय स्वाहा॥ एकदन्ताय विद्महे । वक्रतुण्डाय धीमहि । तन्नो दन्ती प्रचोदयात् ॥ ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥

(टीपः वरील विषयांवरील लेख बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. hello maharastra या तथ्यांची पुष्टी करु शकत नाही)

Uddhav Thackeray Attack On Bjp : भाजप म्हणजे बोगस जनता पार्टी; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

Uddhav Thackeray Attack On Bjp

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Uddhav Thackeray Attack On Bjp । भाजप म्हणजे बोगस जनता पार्टी, त्यामुळे आपलं मत चोरी होणार नाही याची दक्षता घ्या, प्रामाणिक निवडणूक घेतली तर हे महाराष्ट्र जिंकूच शकत नाही, जे जिंकले आहेत त्यांचे राहुल गांधी यांनी यांचे ढोंग उघडे पाडले अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. तसेच जर रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही, तर मग रक्त आणि क्रिकेट एकत्र कसं चालतं? असा सवालही ठाकरेंनी केला. राज्य शिक्षक सेनेच्या कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार घणाघात केला.

तुमचा गरम सिंदूर कुठे गेला? Uddhav Thackeray Attack On Bjp

उद्धव ठाकरे म्हणाले, पाकिस्तानच्याविरुद्ध कोणीही बोलायला तयार नाही, पण त्याच पाकिस्तान सोबत आता आपण क्रिकेट खेळणार आहोत. पाकिस्तासोबत तुम्ही क्रिकेट खेळायला परवानगी कशी देता? आपल्या हिंदुस्थानची टीम ही पाकिस्तानविरुद्ध आता क्रिकेटचा सामना खेळणार, मग तुमचा गरम सिंदूर कुठे गेला? देशाच्या सैनिकांनी शौर्य गाजवून भाजप त्यांचे श्रेय घेत आहे. सोफिया कुरेशी या सैन्य अधिकाऱ्यांना आतंकवाद्यांची बहीण म्हणणारे भाजपचे गधडे आहेत. तरीही ते डोक्यावर मंत्री म्हणून बसलेत. एवढच नव्हे तर आपलं शिष्टमंडळ संपूर्ण जगात गेलं, एकेक खासदार घेतले आणि जगभर पाठवले, पण एक तरी देश आपल्या बाजूने उभा राहिला का? असा सवालही उद्धव ठाकरेंनी केला. Uddhav Thackeray Attack On Bjp

मग आता काय जगभरात पुन्हा शिष्टमंडळ पाठवणार का ? नाही नाही, आमच्या पहिल्या शिष्टमंडळाचं म्हणणं खोटं होतं, आता या शिष्टमंडळाचं म्हणणं खरं आहे असं सांगणार का? पाकिस्तान हा चांगला गुणाचा पुतळा आहे, आम्ही त्यांच्यासोबत आता क्रिकेट खेळत आहोत,असं ऐकवणार का ?? अशा शब्दात ठाकरेंनी (Uddhav Thackeray Attack On Bjp) संताप व्यक्त केला. आम्हाला खेळ महत्वाचा वाटतो, देश महत्वाचा वाटत नाही, हेच देशाचं दुर्दैव आहे. त्यामुळे अशी बोगस जनता पक्षाची लोकं आपल्या डोक्यावर घेऊन आपला देश त्यांच्या हातात दिला आहे अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी भाजपवर चौफेर हल्ला केला.

Ganesh Puja 2025 : गणेश पूजनाच्या साहित्यांचे महत्व माहितेय का? चला तर जाणून घ्या

Ganesh Puja 2025

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Ganesh Puja 2025 । अवघ्या ४ दिवसांनी म्हणजेच २७ आगस्ट रोजी आपल्याकडे गणपतीबाप्पाचे आगमन होणार आहे. त्या निमित्याने सर्वत्र गणेशोत्सवाची लगबग तयारी चालू आहे. गणेशोत्सवाच्या काळात गणरायाची मनोभावे पूजा केली जाते,…. आरती म्हंटली जाते.. गणरायासाठी त्याच्या आवडीचे गोड पदार्थ केले जातात. सध्या भाविकांकडून गणपतीच्या आगमननिमित्य पूजार्च्या सामानाची खरेदी चालू आहे. यामध्ये महत्त्वाचे म्हणजे गणरायांना आवडणाऱ्या वस्तूंची खरेदी केली जाते. त्यात कुंकू,हळद,कापूर, नैवेद्य, पेठे, नारळ अगरबत्ती, फुले या पूजेच्या सामानाची खरेदी महत्वाची असते. हिंदू संस्कृतीमध्ये पूजेला फार महत्व आहे.पूजा करण्यासाठी लागणाऱ्या सामानाला पूजेचे सामान संबोधले. हे सामान म्हणजे फक्त वस्तू नसतात तर यात भक्तांच्या भावना, श्रद्दा असतात. त्यामुळे हिंदू संस्कृतीमध्ये पूजेच्या सामानाला अनन्य साधारण महत्व असते.

या पूजेच्या सामानात (Ganesh Puja 2025) सर्वात महत्त्वाचे असतात ती म्हणजे फुले… दैवताला प्रसन्न करण्यासाठी भक्त हा फुले वाहतो. तसेच फुलांना वेगवेगळ्या देवतांचे वाहन देखील समजले जाते. यामुळे पूजा करताना सर्वात महत्वाचे स्थान हे फुलाला असत. यानंतर अगरबत्तीचे महत्व बघितले तर वातावरण शांत ठेवण्यास मदत करते. तर नारळाचे सुद्धा फार मोठं महत्व आहे, नारळाला श्रीफळ म्हणून देखील ओळखले जाते. तर कापूर हे नागरात्मक दूर करते.हळद आणि कुंकू हे सौभाग्याचे प्रतीक म्हणून वापरले जाते. नैवद्य हा देवाला भोजन म्हणून अर्पण केला जातो. दूध, दही, तूप, मध आणि साखरेपासून तयार करण्यात आलेलं पंचामृत गणपतीला अभिषेक करण्यासाठी वापरलं जातं, त्याच सुद्धा गणेश पूजेत मोठं महत्व आहे.

पूजेचे साहित्य म्हणजे वस्तू नसून भक्तांची श्रद्धा – Ganesh Puja 2025

जसं आम्ही सांगितलं कि, पूजेचे साहित्य म्हणजे वस्तू नसून भक्तांची श्रद्धा असते. भक्तीभावाने केलेल्या पूजेमुळे माणसाला मानसिक समाधान मिळाल्याची अनुभूती मिळते. म्हणून आपल्याकडे देवाची पूजाआर्च केली जाते. पूजाअर्चेच्या दरम्यान वापरलेल्या सामानाला संस्कृतीचा अविभाज्य घटक समजला जातो.

Ganeshotsav Celebration 2025 : गणरायासाठी घरच्या घरीच बनवा मोतीचूर लाडू; पहा संपूर्ण रेसिपी

Ganeshotsav Celebration 2025 motichur ladu

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Ganeshotsav Celebration 2025 । सध्या संपूर्ण देशभरात गणेश उत्सवाची तयारी चालू झालेली आहे. २७ तारखेला गणपती बाप्पाचे आगमन होणार असून सर्वत्र गणेशोत्सवाची लगबग सुरु आहे. गणेशोत्सवादरम्यान, संपूर्ण घर चांगल्या प्रकारे सजवले जाते.. गणपती बाप्पासाठी आरास केली जाते… जितका दिवस घरात गणपती आहे त्या दिवशी गणरायाची मनोभावे पूजा केली जाते, त्याला नैवेद्य दाखवला जातो… गणरायाला प्रसन्न करून त्याचे आशीर्वाद घेतले जातात. गणपती बाप्पा घरी येणार म्हंटल्यावर घरातील गृहिणीही कामाला लागतात. बाप्पासाठी गोडधोड पदार्थ बनवले जातात… काही जण बाहेरुन काहीतरी गोड़ आणतात तर काहीजण घरच्या घरी पदार्थ बनवतात. तुम्हीही जर घराच्या घरी चविष्ट असा नैवेद्य बनवणार असाल तर आम्ही तुम्हाला एक मस्त रिसीपी सांगणार आहोत.

तस बघितलं तर गणपती बाप्पाचा सगळ्यात आवडता पदार्थ म्हणजे मोदक…. परंतु त्याचप्रमाणे गणरायाला मोतीचूर लाडू देखील खूप आवडतात.त्यामुळे यंदाच्या गणेशोत्वसासाठी तुम्हीही बाप्पाला मोतीचूर लाडू खाऊ घालू शकता. आता ते कसे बनवायचे हे आपण सोप्या पद्धतीने जाणून घेऊया.

मोतीचूर लाडू बनवण्यासाठी साहित्य – Ganeshotsav Celebration 2025

बेसन, साखर, दूध, तूप, हिरवी वेलची, फूड कलर, बेकिंग सोडा, पाणी.

मोतीचूर लाडू बनवण्याची पद्धत

मोतीचूर लाडू बनवण्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी साखरेचा पाक तयार करावा लागेलं. यासाठी तुम्ही मध्यम आचेवर एका मोठ्याकडे पाणी गरम करा. त्यात साखर घाला आणि साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत ते पाणी ढवळत रहा. त्यानंतर तुम्ही त्या पाण्यात दूध घालून पाच मिनिटे मंद आचेवर ते पाणी चांगले उकळू द्या. उकळताना त्या पाण्यावर फेस तयार होऊ लागेल. त्यानंतर तुम्ही चमच्याच्या साह्याने पाक घट्ट होईपर्यंत शिजवा त्यानंतर त्या पाकात वेलची पूड आणि केशरी रंग घालून हळूहळू ढवळत रहा. (Ganeshotsav Celebration 2025)

त्यानंतर तुम्ही एका भांड्यात बेसन आणि दूध मऊ होईपर्यंत मिक्स करा. आणि त्यामध्ये बेकिंग सोडा घालून ते चांगले मिक्स करून घ्या. त्यानंतर एका कढईमध्ये तूप गरम करा कढईच्या अगदी वर झारा ठेवा. आणि लाडूसाठी तयार केलेले बॅटर तेलात घाला. बुंदी तेलात टाकल्यानंतर ती सोनेरी रंगावर होईपर्यंत तळून घ्या.आता ही बुंदी ठीशू पेपरवर काढा. जेणेकरून त्यात असलेले जास्त तेल निघून जाईल. आता ही बुंदी साखरेच्या पाकात घालून नीट मिक्स करा .आणि थंड होईपर्यंत तसेच राहू द्या. थंड झाल्यावर या बुंदीपासून लहान लहान आकाराचे लाडू तयार करा.

Mumbai Goa Vande Bharat : गणेशभक्तांसाठी खुशखबर!! मुंबई-गोवा वंदे भारतबाबत मोठा निर्णय

Mumbai Goa Vande Bharat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mumbai Goa Vande Bharat । यंदा २७ ऑगस्टपासून गणेशोत्सवाला (Ganeshotsav) सुरुवात होणार असून गणेश भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. गणपती उत्सवासाठी मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्याही जास्त असते… एकवेळ नोकरीवर लाथ मारायची वेळ आली तरी चालेल पण गणपती उत्सवाच्या काळात कोकणी माणूस मूळगावी कोकणात जाणार म्हणजे जाणारच…. भारतीय प्रशासनाने सुद्धा कोकणी माणसाची हि भावना जाणून कोकणात जाणाऱ्या वाहतूक सेवा वाढवल्या आहेत. चाकरमान्यांना आरामात आणि कमी वेळेत कोकणात जाता यावं यासाठी मुंबई पुण्याहून अनेक स्पेशल एसटी बसेस, रेल्वे, विमानसेवा सुरु करण्यात आल्या आहेत. तरीही कोकणात जाणारी गर्दी आटोक्यात यावी यासाठी आता रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनचे डब्बे आता रेल्वेकडून वाढवण्यात आले आहेत.

खरं तर मुंबईवरून गोव्याला जाणारी मुंबई मडगाव वंदे भारत एक्सप्रेस हि यापूर्वी ८ डब्ब्यांची होती. परंतु आता गणेशभक्तांची वाढती गर्दी रोखण्यासाठी मध्य रेल्वेने गणेश चतुर्थी उत्सवाच्या तीन दिवसांसाठी २२२२९/२२२३० मुंबई गोवा वंदे भारत एक्सप्रेसचे १६ डब्यांच्या सेवेत रूपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. हा बदल हा कायमस्वरूप नाही, तर फक्त गणेशोत्सवानिमित्त असेल. त्यानंतर ती पुन्हा तिच्या नियमित कॉन्फिगरेशनमध्ये आणली जाईल, असे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील नीला यांनी सांगितलं.

कोणकोणत्या दिवशी धावणार ? Mumbai Goa Vande Bharat

16 डब्यांची मुंबई मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस 25,27,29 ऑगस्ट रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून मडगावला धावेल आणि 26,28 आणि 30 ऑगस्ट रोजी मडगावहून पुन्हा मुंबईकडे धावणार आहे. ही सेमी-हाय-स्पीड ट्रेन (Mumbai Goa Vande Bharat) आठवड्यातून सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शनिवार आणि रविवार अशा ६ दिवशी धावते आणि ७ तास ४५ मिनिटांत आपला प्रवास पूर्ण करते. या प्रवासादरम्यान ती दादर, ठाणे, पनवेल, खेड, रत्नागिरी, कणकवली आणि थिविम या रेल्वे स्थानकांवर थांबते. मुंबईतून कोकणात आरामात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही वंदे भारत एक्सप्रेस अतिशय महत्वाची आहे. आता तर ऐन गणेशोत्सवात या ट्रेनला १६ डब्बे जोडल्याने कोकणात जाणाऱ्या लाखो चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे