Sunday, December 7, 2025
Home Blog Page 18

Uddhav Thackeray At Shivtirth : उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या घरी; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन

Uddhav Thackeray At Shivtirth

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Uddhav Thackeray At Shivtirth । महाराष्ट्राच्या राजकारणात आज मोठी घडामोड घडली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल झाले आहेत. राज ठाकरे यांच्या घरी दीड दिवसाचा गणपती असतो, त्यानिमित्ताने उद्धव ठाकरेंनी शिवतीर्थवर पोहचले आहेत. उद्धव ठाकरे पहिल्यांदाच शिवतीर्थावर पोहचले आहेत. त्यांनी गणपती बाप्पाचे आशीर्वाद घेतले आहेत. मागच्या काही महिन्यापासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात जवळीक निर्माण झाली आहे. त्याचाच प्रत्यय आजही बघायला मिळाला. उद्धव ठाकरे आणि कुटुंबियांसाठी राज ठाकरेंकडून खास असा जेवणाचा बेतही आखण्यात आला आहे.

राजकीय पेरण्या होण्याची शक्यता- Uddhav Thackeray At Shivtirth

यापूर्वी मराठी भाषेसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे प्रथमच एकत्र आले होते. त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाला राज ठाकरे स्वतः थेट मातोश्रीवर पोहचले होते. त्यावेळी उद्धव ठाकरेंचा उल्लेख “शिवसेना पक्षप्रमुख” असा करत राज ठाकरेंनी महायुतीला धक्का दिला होता. त्यानंतर राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना फोनवरून गणपती दर्शनाचे निमंत्रण दिले होते, ते स्वीकारून उद्धव ठाकरेंनी आज सहकुटुंब शिवतीर्थवर जाऊन (Uddhav Thackeray At Shivtirth) राज ठाकरेंची भेट घेतली. निमित्त जरी गणपतीचे असलं तर यातून अनेक राजकीय पेरण्या होण्याची शक्यता आहे. आम्ही भाऊ भाऊ आता एक झालो आहोत असा थेट संदेशच या भेटीतून पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.

खरं तर राज ठाकरेंनी शिवसेना सोडल्यापासून म्हणजेच २० वर्षपासून उद्धव ठाकरे कधीही कृष्णकुंज किंवा शिवतीर्थावर गेले नव्हते, आज मात्र प्रथमच ते राज ठाकरेंच्या निवासस्थानी गेले आहेत. या भेटीमुळे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना नवीन ऊर्जा मिळणार आहे. सध्या कुटुंब एक झालं आहे, मात्र जस जशी निवडणूक येईल तस तस दोन्ही पक्षही एकमेकांच्या आणखी जवळ येत जातील. भलेही सध्या दोन्ही ठाकरेंच्या युतीची अधिकृत अशी घोषणा झालेली नाही, परंतु सध्याच्या घडामोडी आणि वाढती जवळीक बघता आगामी काळात शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची युती होण्याची दाट शक्यता आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आले तर आगामी महापालिका निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसू शकतो. खास करून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला याचा फटका बसेल असं राजकीय विश्लेषक सांगतात.

D Mart मधून कमवा लाखो रुपये; फक्त करा ‘हे’ काम

D Mart

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । D Mart तर तुम्हाला माहीतच असेल, तुम्हीही हजार वेळा डीमार्ट ला गेला असेल आणि मोठमोठी खरेदी सुद्धा केली असेल. अंगाच्या साबणापासून ते कपड्यांपर्यंत… किराणा साहित्यापासून ते मुलांच्या खेळण्यापर्यंत… डीमार्टच्या माध्यमातून सर्वच वस्तू एकाच छताखाली मिळत असल्याने फक्त शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातही डीमार्टची क्रेझ वाढली आहे. त्यातच डीमार्ट मध्ये प्रत्येक वस्तूवर डिस्काउंट असल्याने ग्राहकांची मोठी लगबग पाहायला मिळते. परंतु तुम्हाला हे माहित आहे का? कि डीमार्ट मध्ये आपण फक्त वस्तू खरेदी करू शकत नाही, तर डीमार्ट च्या मदतीने आपण लाखो रुपये कमवू सुद्धा शकतो…. नाही ना माहित? चला तर मग आम्ही सांगतो तुम्हाला….

मित्रानो, D Martमध्ये जवळपास सर्वच वस्तूंवर मोठ्या प्रमाणावर सूट दिली आहे. मग ते किराणा माल असो वा कपडे असो.. तुम्हाला तुमच्या आसपासच्या स्थानिक दुकानदारापेक्षा डीमार्ट मध्ये स्वस्त वस्तू मिळतात. अशावेळी तुम्हालाही प्रश्न पडला असेल कि डीमार्ट मध्ये इतक्या कमी किमतीती वस्तू कशा काय मिळतात? तर मित्रानो, यामागेही डीमार्टची मोठी बिझनेस आयडिया आहे, ज्याचा खरं तर तुम्हालाही फायदा होईल. मित्रानो, डीमार्ट अशा व्यापाऱ्यांकडून सामान खरेदी करते जे की त्यांना मार्केट पेक्षा कमी दरात सामान देतात. डीमार्ट व्यापाऱ्यांकडून कमी किमतीत सामान खरेदी करते आणि ग्राहकांनाही कमी किमतीत सामान देते.

डीमार्ट सोबत कसे पैसे कमवाल? D Mart

जर तुमच्याकडे सुद्धा कोणतं प्रॉडक्ट असेल आणि तुम्हाला एकदम त्याची विक्री करायची असेल तर तुम्हीही डीमार्ट सोबत संपर्क करू शकता, डीमार्ट शी जोडू शकता. यासाठी तुम्हाला डीमार्ट सोबत एक करार करावा लागेल. इतरांच्या तुलनेत डीमार्ट तुमच्याकडून कमी पैशात तुमचं प्रॉडक्ट खरेदी करेल, परंतु एकदम जास्तीत जास्त क्वांटिटी तुमच्याकडून डीमार्ट खरेदी करेल. म्हणजेच काय, तर जरी नफा कमी असला तरी एकदम जास्त विक्री झाल्याने तुम्ही शेवटी फायद्याच्याच राहणार आहात. या करारासाठी तुम्हाला https://www.dmartindia.com/partner-with-us या वेबसाईटवर अर्ज करावा लागेल. दर डीमार्ट विक्रेत्यांसोबत संपर्क साधत असते. डीमार्टला तुमचं प्रॉडक्ट आवडलं तर नक्कीच ते तुमच्याशी करार करतील आणि तुमचं प्रॉडक्ट थेट डीमार्ट मध्ये विक्रीसाठी ठेवलं जाईल. मधल्या काळात हि प्रक्रिया बंद होती, मात्र ही ती पुन्हा सुरू झाली आहे.

Maratha Aarakshan : आरक्षणाबाबत सरकारचा मोठा निर्णय!! जरांगे पाटलांची मागणी मान्य

Maratha Aarakshan Shinde committee

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Maratha Aarakshan। राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आरक्षणाच्या मागणीसाठी उद्या मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत. कोणत्याही परिस्थितीत ओबीसी मधूनच आम्हाला आरक्षण पाहिजे, हैद्राबाद गॅजेट लागू करा अशा काही मागण्या मनोज जरांगे यांनी सरकार समोर ठेवल्या आहेत. याच दरम्यान, आता एक मोठी बातमी समोर येत आहे. मराठा आरक्षणासाठीच्या मंत्रिमंडळ उपसमितीने मनोज जरांगे पाटील यांची एक मागणी मान्य केली आहे. या उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील (Radha Krishna Vikhe Patil) यांनी याबाबत माहिती दिली आहे.

शिंदे समितीला 6 महिने मुदतवाढ- Maratha Aarakshan

मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आज मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, जरांगे पाटील यांच्या मागण्यांबाबत आज प्राथमिक चर्चा झाली. हैदराबाद, मुंबई, सातारा गॅझेट, सगेसोयरे मागणीवर चर्चा झाली. हैदराबाद गॅझेटबाबत न्यायमूर्ती शिंदे समितीला मुदतवाढ देण्याची मनोज जरांगे यांनीच मागणी केली होती. त्यानुसार या समितीला आता आणखी सहा महिने मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या गॅजेटचा अभ्यास करून याबाबत निर्णय होईल. कारण ही प्रक्रिया क्लिष्ट आणि गुंतागुंतीची आहे.त्यामुळे कायद्याच्या सर्व बाबी आपल्याला तपासाव्या लागतील.

मृतांच्या नातेवाईकांना सरकारी नोकरी देण्याबाबत त्यांची मागणी होती. त्यातील सर्वाना नोकरी मिळाली आहे, फक्त ९ लोकांना नोकरी देण्याचं बाकी आहे ते सुद्धा पुढील ३ महिन्यात देण्यात येईल. तसेच सानुग्रह अनुदान देण्याचे काम पूर्ण झाले आहे, असेही विखे पाटलांनी सांगितले. मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख मागण्यांबाबत आम्ही पुन्हा एकदा बैठकीला बसणार आहोत. आरक्षणाबाबत सर्वांचीच भूमिका सकारात्मक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर पुढाकार घेऊन मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्यात आले होते. त्यानंतरच्या महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षात हे आरक्षण गेलं. पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आल्यानंतर 10 टक्के आरक्षण दिले होते. हे आरक्षण (Maratha Aarakshan) अजूनही सर्वोच्च न्यायालयात टिकून आहे. आरक्षणाच्या संदर्भात शासनाची कोणतीही नकारात्मक भूमिका नाही. फक्त कायद्याच्या चौकटीत बसवून हे काम करावे लागेल, अशी माहिती राधाकृष्ण विखे पाटलांनी दिली.

Maharashtra Cabinet Decisions : मंत्रिमंडळ बैठकीत 9 मोठे निर्णय; पुणे – नागपूरला फायदा

Maharashtra Cabinet Decisions

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Maharashtra Cabinet Decisions । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत सहकार विभाग, बांधकाम विभाग, विधी व न्याय विभागाच्या अंतर्गत ९ मोठे निर्णय घेण्यात आले. यामध्ये यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या जमीन विक्रीस मान्यता देण्यात आली आहे. या एकूण ९ मंत्रिमंडळ निर्णयाचा फायदा पुण्यासह नागपूर, अमरावती आणि बीड जिल्ह्याला होणार आहे.

मंत्रिमंडळ बैठकीत कोणकोणते निर्णय ? Maharashtra Cabinet Decisions

१) पुणे जिल्ह्यातील यशवंत सहकारी साखर कारखाना लि. चिंतामणीनगर, मु. पो. थेऊर (ता. हवेली) या कारखान्याच्या जमीन विक्रीस मान्यता. (सहकार विभाग)

२) नागपूर गोंदिया प्रवेश द्रुतगती महामार्ग प्रकल्पास मान्यता, प्रकल्प महामंडळामार्फत हाती घेण्यास. प्रकल्पाच्या आखणीस व भूसंपादनाकरीता मान्यता. (सार्वजनिक बांधकाम विभाग)

३) बीड जिल्ह्यात आष्टी येथे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यांचे न्यायालय स्थापन होणार त्या अनुषंगाने न्यायिक अधिकारी व कर्मचारीवृंद यांची पदे निर्मिती व या न्यायालयासाठी येणाऱ्या खर्चास मान्यता. ( विधि व न्याय विभाग)

४) महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, 1950 मध्ये सुधारणा करण्यास मान्यता. (विधि व न्याय विभाग) Maharashtra Cabinet Decisions

५) पुणे जिल्ह्यातील राजगड सहकारी साखर कारखाना लि. अनंतनगर निगडे, (ता. भोर) या साखर कारखान्यास राष्ट्रीय सहकार विकास निगम (NCDC) यांच्याकडून कार्यभांडवलासाठी घेण्यात येणाऱ्या मार्जिन मनी कर्जास मंजुरी तसेच संघर्षयोद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखाना लि. सुमननगर, ता. शेवगाव, अहिल्यानगर या साखर कारखान्यास महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून मुदती कर्ज शासन हमीवर उपलब्ध करून देण्यास मान्यता. (सहकार विभाग)

६) बीड जिल्ह्यातील सिंदफणा नदीवरील निमगाव, ब्रम्हनाथ येळंब (ता. शिरुर (का) टाकळगाव (हिंगणी) ( ता. गेवराई) या तीन कोल्हापूर पध्दतीच्या बंधा-यांचा विस्तार व बॅरेजमध्ये रुपांतरण करण्याच्या कामास मान्यता. (जलसंपदा विभाग)

७) राज्यातील कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करुन महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार करण्यास मान्यता. (कामगार विभाग)

८) विमुक्त जाती व भटक्या जमाती संवर्गातील लाभार्थ्यांना ओळखपत्रे, प्रमाणपत्रे व विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याची कार्यपद्धती प्रभावीरित्या राबविणार. (इतर मागास बहुजन कल्याण विभाग)

९) नागपूर व अमरावती विभागातील निवासी वापरासाठी लिलावाद्वारे प्रिमियम अथवा अन्य प्रकारे भाडेतत्वावर दिलेल्या नझुल जमिनी बाबत विशेष योजनेला आणखी एक वर्षाकरिता मुदतवाढ. (महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग)

मनोज जरांगेंना मोठा झटका!! मुंबईतील आंदोलनाला कोर्टाची मनाई

jarange patil mumbai high court

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा समाजाच्या (Maratha Aarakshan) आरक्षणासाठी लाखोंच्या समुदायाने थेट मुंबईतील आझाद मैदानावर जाऊन उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) याना मुंबई हायकोर्टाने (Bombay High Court) मोठा झटका दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चाला हायकोर्टाने मनाई केली आहे. सध्या सर्वत्र गणेशोत्सव साजरा केला जात आहे. अशावेळी मुंबईतील रहदारी विस्कळीत होऊ नये, यादृष्टीने मनोज जरांगे पाटील यांना मुंबईत येण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे. कमीत कमी दोन आठवड्यापर्यंत मनोज जरांगे पाटील याना मुंबईत येता येणार नाही, असंही मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.

नेमक काय घडलं?

मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील मोर्चा विरोधात मुंबई हायकोर्टात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर आज मुख्य न्यायाधीश आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. या सुनावणींनंतर कोर्टाने आपले निरीक्षण नोंदवत मनोज जरांगे यांना पूर्वपरवानगीशिवाय मुंबईतील आझाद मैदानावर निदर्शने करण्यास मनाई केली आहे. अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय शहरातील प्रमुख ठिकाणी निदर्शने करता येणार नाहीत असं कोर्टाने स्पष्ट केलं. तरीही जर आंदोलन करायचेच असेल तर मुंबईच्या बाहेर, नवी मुंबई, पालघर, ठाणे या परिसरात त्यांना परवानगी देण्यात यावी अशा सूचना मुंबई उच्च न्यायालयाने दिल्या आहेत. लोकशाही आणि मतभेद एकत्र येत असले तरी, निदर्शने फक्त नियुक्त केलेल्या ठिकाणीच केली पाहिजेत असं कोर्टाने म्हंटल. कोर्टाच्या या निर्णयामुळे मनोज जरांगे पाटील याना जबर धक्का बसला आहे.

उच्च न्यायालयाने आंदोलनासाठी परवानगी नाकारल्यानंतर मनोज जरांगे पाटील आणखी आक्रमक झाले. सरकारने न्यायालयाला चुकीची माहिती दिली. त्यामुळेच न्यायालयाने असा निर्णय दिला. आता आम्हीही न्यायालयात जाणार आहे. आम्ही आमची बाजू मांडू, असे जरांगे यांनी म्हंटल. तसेच आम्ही कोर्टाच्या नियमाचं उल्लंघन करणार नाही, न्यायदेवता आम्हाला नक्कीच न्याय देईल असा विश्वास मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला. आम्ही उद्या 10 वाजता सगळे मराठे मुंबईचाय दिशेने रवाना होतोय. आमच्या मागण्या रास्त आहेत.असंही मनोज जरांगेंनी सांगितले.

Nanded Mumbai Vande Bharat Express : अखेर नांदेडकरांचे स्वप्न पूर्ण झालं!! वंदे भारतला मुख्यमंत्र्यांकडून हिरवा झेंडा

Nanded Mumbai Vande Bharat Express

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Nanded Mumbai Vande Bharat Express। नांदेडच्या जनतेसाठी आजचा दिवस खूपच सुखावणारा ठरला आहे. वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनमधून प्रवास करण्याचे नांदेडकरांचं स्वप्न आज खऱ्या अर्थाने पूर्ण झालं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मंत्रालयात नांदेड – मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा ऑनलाईन पद्धतीने शुभारंभ करण्यात आला. खरं तर हीच ट्रेन सुरुवातीला मुंबईपासून जालनापर्यंत धावत होती, मात्र आता तिचा विस्तार थेट नांदेड पर्यंत कऱण्यात आला आहे. या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनमुळे मराठवाड्याला मोठा फायदा होणार आहे.

कोणकोणत्या स्थानकांवर थांबे ? Nanded Mumbai Vande Bharat Express

मुंबईहून मराठवाड्यात धावणारी ही सर्वात वेगवान गाडी (Nanded Mumbai Vande Bharat Express) असून इतर गाड्यांच्या तुलनेत कमी वेळेत प्रवास पूर्ण करते. गुरुवारी 28 ऑगस्टपासून ही वंदे भारत एक्सप्रेस आठवड्यातील सहा दिवस नियमितपणे धावेल. ही गाडी नांदेडहून 5 वाजता निघेल, 5:40 वाजता परभणी, 7:20 वाजता जालना, 8:13 वाजता छत्रपती संभाजीनगर, 9.58 वाजता मनमाड जंक्शन, 11 वाजता नाशिक रोड, दुपारी 1.20 वाजता कल्याण, 1:40 ठाणे आणि 2.08 वाजता दादरला पोहोचेल. यानंतर 2.25 वाजता ही ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहचेल. या नव्या वंदे भारत एक्सप्रेसमुळे नांदेड आणि मुंबईमधील 610 किलोमीटरचे अंतर केवळ 9 तास 25 मिनिटांत पूर्ण होईल. यादरम्यान ती दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड या स्थानकांवर थांबेल.

काय काय सुविधा ?

मुंबई नांदेड वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन (Nanded Mumbai Vande Bharat Express) मध्ये एकूण 20 डबे (2 एक्झिक्युटिव्ह आणि 18 चेअर कार) आहेत. जवळपास १५०० प्रवासी या ट्रेनमधून आरामात प्रवास करू शकतील. नव्या वंदे भारत एक्सप्रेसमध्ये अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत. यामध्ये ऑन-बोर्ड वाय-फाय इन्फोटेनमेंट, आलिशान इंटीरियर, बायो व्हॅक्यूम टॉयलेट्स, प्रत्येक सीटखाली चार्जिंग पॉइंट्स, अत्याधुनिक एअर कंडिशनिंग सिस्टिम यांसारख्या फीचर्सचा समावेश आहे.

मराठवाड्याला काय फायदा –

मराठवाड्यातील जनता थेट मुंबईशी जोडले जाईल.
अतिशय कमी वेळेत आणि आरामात मुंबई गाठता येईल.
मुंबईत नोकरीला असलेला आणि मूळचा नांदेडचा रहिवासी असणाऱ्यांना सर्वात जास्त फायदा
पर्यटनस्थळे आणि तीर्थक्षेत्रांना जाणाऱ्या प्रवाशांसाठी फायदेशीर
नांदेड येथील प्रसिद्ध सचखंड साहिब गुरुद्वारा, जालन्यातील राजूर गणपती मंदिर, छत्रपती संभाजीनगरजवळील घृणेश्वर ज्योतिर्लिंग, अजिंठा-वेरूळ लेणी या तीर्थक्षेत्रांना जाता येणार

Pune Nashik Highway : नाशिक- पुणे हायवेसाठी मोठा प्लॅन; 2 तासांचा प्रवास 20 मिनिटात होणार

Pune Nashik Highway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे- नाशिक हायवेवरून (Pune Nashik Highway) प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची आणि दिलासादायक बातमी आहे. खरं तर पुणे आणि नाशिक हि दोन्हीही औद्योगिक शहरे असल्याने या मार्गावर गाड्यांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते. परिणामी वाहतूक कोंडीचा प्रश्न नित्याचाच झाला आहे. आता यावर उपाय म्हणून नाशिक फाटा ते राजगुरुनगर खेड असा नवीन उन्नत रस्ता तयार होणार आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होणार आहे. तसेच या प्रवाशांच्या वेळेचीही मोठी बचत होणार आहे.  पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून या संदर्भात महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार नाशिक फाटा ते राजगुरुनगर खेड हा उन्नत मार्ग तयार करण्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. नाणेकरवाडी, मेदनकरवाडी, वाकी खुर्द, वाकी बुद्रुक, चिंबळी, कुरुळी व चाकण या गावांमध्ये भूसंपादन सुरू करण्यात आले आहे. तसेच, चाकण शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मेदनकरवाडी, कडाची वाडी, नाणेकरवाडी आणि खराबवाडी येथील जमिनींचे भूसंपादन करून पर्यायी बायपास तयार केले जाणार आहेत. जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) चे आयुक्त योगेश म्हसे यांनी गेल्या आठवड्यात एक आढावा बैठक घेतली, ज्यात संबंधित विभागांना जमीन मोजणी जलद करण्याचे निर्देश दिले होते जेणेकरून अधिग्रहण वेळेवर पूर्ण करता येईल. एका अधिकाऱ्याने सांगितले की, प्रक्रिया जलद करण्यासाठी शक्य असेल तिथे विकास हक्क हस्तांतरण (टीडीआर) किंवा फ्लोअर स्पेस इंडेक्स (एफएसआय) नुसार ती संपादित करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

कसा असेल नवीन उन्नत मार्ग- Pune Nashik Highway

नाशिक फाटा ते राजगुरुनगर खेड हा उन्नत मार्ग सुमारे 28 किलोमीटर लांबीचा असेल. केंद्र सरकारने गेल्या वर्षी या प्रकल्पासाठी ७,८२७ कोटी रुपये मंजूर केले होते. एकदा का हा प्रकल्प पूर्ण झाला कि दोन तासांचा प्रवास या प्रकल्पामुळे अवघ्या वीस मिनिटात पूर्ण होईल, म्हणजेच प्रवाशांचा तब्बल १०० मिनिटांचा वेळ वाचणार आहे. परिणामी चाकण एमआयडीसीला जोडणाऱ्या पुणे-नाशिक महामार्गावरील (Pune Nashik Highway) वाहतूक कोंडी कमी होईल अशी अपेक्षा आहे.

Pune Traffic Changed : पुण्यातील वाहतुकीत मोठा बदल; गणेशोत्सवानिमित्त ‘हे’ रस्ते बंद

Pune Traffic Changed

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Pune Traffic Changed । उद्या २७ ऑगस्ट रोजी गणरायाचे आगमन होणार असून बाजारपेठा चांगल्याच फुलल्या आहेत. गणपती बाप्पासाठी सजावट, आरास, हार, नवनवीन डेकोरेशन साहित्य, मकर घेण्यासाठी भाविकांची लगबग सुरु आहे. खास करून मुंबई- पुणेसारख्या शहरात तर गणेशोत्सवाच्या काळात मुख्य रस्त्यांवर मोठी गर्दी बघायला मिळते. परिणामी वाहतूक कोंडीचा प्रश्न पुन्हा एकदा उदभवतो. यावर उपाय म्हणून पुणे प्रशासनाने काही प्रमुख रस्त्यांवर अवजड वाहनांसाठी बंदी घातली आहे. सदर रस्त्यांवरून प्रवास करताना अवजड वाहने चालवता येणार नाहीत. 25 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर या कालावधीत हि बंदी असेल.

कोणकोणत्या रस्त्यांवर अवजड वाहनांना बंदी? Pune Traffic Changed

शास्त्री रोड (सेनादत्त चौक ते अलका चौक)
टिळक रोड (जेधे चौक ते अलका चौक)
कुमठेकर रोड (शनिपार ते अलकाचौक)
लक्ष्मी रोड (संत कबीर चौक ते अलका चौक)
केळकर रोड (फुटका बुरुज ते अलका चौक)
बाजीराव रोड (पुरम चौक ते गाडगीळ पुतळा)
शिवाजी रोड (गाडगीळ पुतळा ते जेधे चौक
कर्वे रोड (नल स्टॉप चौक ते खंडोजी बाबा चौक)
FC रोड – खंडोजीबाबा चौक ते विर चाफेकर चौक
जंगली महाराज रोड- स.गो. बर्वे चौक चे खंडोजीबाबा चौक
सिंहगड रोड- राजाराम ब्रिज ते सावरकर चौक
गणेश रोड / मुदलियार रोड- पॉवरहाऊस – दारुवाला- जिजामाता चौक- फुटका बुरूज

दरम्यान, शहरातील मध्यवर्ती भागात गणेशमूर्ती खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होते, या पार्श्वभूमीवर २५ ऑगस्ट ते २७ ऑगस्ट दरम्यान शिवाजी रोडवरील वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. पोलिसांनी सांगितले की, दरवर्षी श्रमिक भवन, कसबा पेठ पोलिस चौकी आणि मंडईपर्यंतच्या परिसरात गणेशमूर्ती विक्रीसाठी अनेक स्टॉल लावले जातात, त्यामुळे शिवाजी रस्त्यावरील गगडिल पुतळा ते गोटीराम भैया चौक दरम्यानचा भाग वाहतुकीसाठी बंद राहील. वाहनांची गर्दी टाळण्यासाठी नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे. Pune Traffic Changed

सिंहगड रोडवरील सावरकर पुतळा ते समाधान भेळ दरम्यानच्या रस्त्यावर आणि मुंढवा येथील केशवनगर येथील कुंभारवाडा येथे गणेशमूर्तींची विक्री केली जात असल्याने गर्दी टाळण्यासाठी या भागातून वाहने पर्यायी मार्गांनी वळवण्यात येतील.

भाजपने ‘या’ जिल्ह्याचा पालकमंत्री बदलला; अचानक उचलबांगडीमागे कारण काय?

sanjay sawkare

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय जनता पक्ष (BJP) हा कायमच त्यांच्या धक्कातंत्रासाठी ओळखला जातो. भाजप कधी काय करेल? कोणाला बढती देईल तर कोणाचे डिमोशन करण्यात येईल याचा काहीच नेम नाही. आजही याचा प्रत्यय आला. भाजपने विदर्भात भाकरी फिरवत भंडारा जिल्ह्याचा पालकमंत्री बदलण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी भाजपचे नेते आणि राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे (Sanjay Sawkare) हे भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री होते. मात्र, सोमवारी रात्री अचानक भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री बदलण्यात आल्याचा शासन आदेश जारी झाला. त्यानुसार संजय सावकारे यांच्या ऐवजी गृहराज्यमंत्री पंकज भोयर हे भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री असतील. महत्वाची बाब म्हणजे पंकज भोयर यांच्याकडे वर्धा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचीही जबाबदारी आहे.

भंडाऱ्याचे पालकमंत्री बदलल्याचा शासन आदेश सोमवारी रात्री राज्याचे उपसचिव दिलीप देशपांडे यांनी काढला आहे. या निर्णयामागे काही कारणे असल्याचं सांगितलं जात आहे. पहिले कारण म्हणजे संजय सावकारे यांच्याबद्दल असलेली नाराजी, संजय सावकारे हे फक्त झेंडा पालकमंत्री ठरु नयेत, म्हणजे 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला ध्वजवंदनापुरता मर्यादीत राहू नये, अशी जिल्ह्यात चर्चा होती. संजय सावकारे हे जिल्हा नियोजनाच्या आढावा बैठक याव्यतिरिक्त भंडाऱ्यात जास्त फिरकत नव्हते. त्यामुळे नागरिकांच्या अनेक समस्या प्रलंबित होत्या अशी चर्चा सुरु आहे. भंडाऱ्यात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीनंतरहीसंजय सावकारे भंडाऱ्यात आले नव्हते. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमध्ये पालकमंत्र्यांच्या विरोधात प्रचंड रोष निर्माण झाला होता

दुसरे कारण म्हणजे संजय सावकारे यांच्यासाठी भंडारा जिल्ह्यापर्यंत येणं हा लांबचा प्रवास ठरत होता. तसेच काही स्थानिक भाजप नेते त्यांच्यावर नाराज होते अशी सुद्धा माहिती आहे. दुसरीकडे भंडाऱ्याचे नवे पालकमंत्री केलं आहे ते पंकज भोयर हे भंडाऱ्याच्या जवळच असलेल्या वर्धा जिल्ह्यातील आहेत. पंकज भोयर यांनाही भंडारा जिल्ह्याची आणि तेथील राजकारणाची जाण आहे. अशावेळी आगामी नगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाची पकड आणखी मजबूत करण्यासाठी भोयर यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे का? अशी चर्चा आहे.

मी आमच्या वरिष्ठ नेतृत्वाचे आभार मानतो. मागील ६ महिन्यात केलेल्या कामाची दखल घेत वरिष्ठांनी माझ्यावर हा विश्वास दाखवला आहे. आता माझी जबाबदारी निश्चितपणे वाढली आहे. याची जाण ठेवून भंडारा जिल्ह्यात चांगले काम करू, अशी प्रतिक्रिया पंकज भोयर यांनी दिली.

Manoj Jarange On Chitra Wagh : तेव्हा कुठं झोपली होतीस का? मनोज जरांगे चित्रा वाघ यांच्यावर संतापले

Manoj Jarange On Chitra Wagh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Manoj Jarange On Chitra Wagh । मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईला शिवी दिली असा आरोप भाजपकडून केला जात आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांनी यावरून जरांगे यांच्यावर टीकेची झोड उठवली. परंतु मी शिवी दिलीच नाही, आणि बोलण्याच्या ओघात शिवी दिली असेल तर मी माझे शब्द मागे घेतो असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हंटल. यावेळी जरांगे पाटलांनी चित्रा वाघ यांच्यावर मात्र चांगलंच तोंडसुख घेतलं. आमची आई रक्ताच्या थारोळ्यात पडली होती तेव्हा तू कुठं झोपली होतीस का? असा एकेरी उल्लेख करत मनोज जरांगे पाटील यांनी चित्रा वाघ यांच्यावर संताप व्यक्त केला.

तू माझ्या नादी लागू नकोस- Manoj Jarange On Chitra Wagh

आज प्रसारमाध्यांनी जरांगे यांना शिवीच्या आरोपावर प्रश्न केला असता ते आणखी आक्रमक झाले. चित्रा वाघ यांच्या आरोपांना उत्तर देताना ते म्हणाले, ती जी बाई बोलली, कोण वाघीण , तिला आमची आई रक्ताच्या थारोळ्यात पडली होती, तेव्हा दिसलं नाही का? आमची आई रक्ताच्या थारोळ्यात पडली होती तेव्हा तू कुठं गेली होतीस? कुठं मेली होतीस? आमच्या पोरी रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या तेव्हा झोपली होतीस का तू? तेव्हा नाही का तुला आमची आई दिसली? तेव्हा जात दिसली नाही का? तू कोणाचे खेटर चाटतेस असं म्हणत जरांगे पाटलांनी चित्रा वाघ यांच्यावर हल्लाबोल केला. तू माझ्या नादी लागू नकोस. तू बाई असशील तर आमच्याकडेही बाया आहेत. आमच्या आईवर 307 ची केस लागली, तुझ्यावर तशी केस केली तर चालेल का?, असा सवाल करत मनोज जरांगे पाटील यांनी चित्रा वाघ यांच्यावर संताप व्यक्त केला. Manoj Jarange On Chitra Wagh

फडणवीस तुला लाज वाटली पाहिजे-

यावेळी मनोज जरांगे पाटलांनी मुख्यमंत्र्यांनाही सोडलं नाही. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईविषयी काही बोललोच नाही, परंतु जर मी बोलण्याच्या ओघात शिवी दिली असेल तर मी आज मोठ्या मनाने माझे शब्द मागे घेतो. माझं मन मोठं आहे, तुमच्यासारख नाही.. परंतु देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांना आरक्षण द्यावे अशी मागणी जरांगे पाटलांनी पुन्हा उचलून धरली. देवेंद्र फडणवीस तुला लाज वाटली पाहिजे, तू मुख्यमंत्री आहेस. ज्या पोलिसांना सस्पेंड करायला पाहिजे होते, त्यांना तू मोठी पदं दिली. पोलिसांनी आमच्या आई-बहि‍णींना मारले तेव्हा त्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. तुझी आई तुला प्रिय आहे तशी आम्हाला आमची आई प्रिय आहे. तुमच्या आईप्रमाणे आमच्या आईकडे पहा आणि तिच्या लेकरांना आरक्षण द्या असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.