Tuesday, December 16, 2025
Home Blog Page 199

Gold Price Today: होळीच्या मुहूर्तावर सोन्याच्या दरात मोठी वाढ; पहा आजचे भाव

Gold Price Today

Gold Price Today| सध्या सोन्याच्या दरात मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यात आज होळीचा सण असल्यामुळे या शुभमुहूर्तावर अनेकजण सोन्या-चांदीची खरेदी करण्याकडे वळत आहेत. मात्र या सोन्याने आपल्या ग्राहकांना चांगलाच मोठा फटाका दिला आहे. कारण की, ऐन सणासुदीच्या दिवशी म्हणजेच आजच्या दिवशी सोन्याच्या किंमतींमध्ये मोठी वाढ झालेली आहे.

सोन्याच्या आजच्या किंमती (Gold Price Today)

गुडरिटर्न्स वेबसाईटनुसार, १३ मार्च रोजी आज २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम ६०० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत ८८,७३० रुपयांवर पोहोचली आहे. यासह १०० ग्रॅम सोन्याची किंमत ८,८७,३०० रुपये झाली आहे.

२२ कॅरेट सोन्याचे दर

१ ग्रॅम – ८,१३५ रुपये

१० ग्रॅम – ८१,३५० रुपये

१०० ग्रॅम – ८,१३,५०० रुपये

२४ कॅरेट सोन्याचे दर (Gold Price Today)

१ ग्रॅम: ८,८७३ रुपये

१० ग्रॅम: ८८,७३० रुपये

१०० ग्रॅम: ८,८७,३०० रुपये

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांतील सोन्याचे दर

आज महाराष्ट्रातील बहुतांश शहरांमध्ये सोन्याच्या दरात (Gold Price Today) समान वाढ झाली आहे. मुंबई, पुणे, जळगाव, नागपूर, अमरावती, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर येथे २२ कॅरेट सोन्याचा दर ८,१२० रुपये प्रति ग्रॅम आहे. त्याचबरोबर, २४ कॅरेटसाठी हा दर ८,८५८ रुपये प्रति ग्रॅम आहे.

दरम्यान, होळी दिवशीच सोन्याच्या दरात वाढ झाल्यामुळे काही ग्राहकांना आजच्या दिवशी खरेदी करणे परवडणार नाही. मात्र, भाव आणखीन वाढण्याची शक्यता असल्याने गुंतवणूक करणाऱ्यांसाठी ही योग्य वेळ ठरू शकते. महत्वाचे म्हणजे, पुढे जाऊन सोन्याच्या किमतींमध्ये वाढ होईल की घट हे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर अवलंबून असेल.

मालवण आणि पालघरच्या समुद्रात सापडला मोठा तेलसाठा; सरकारकडून उत्खननास सुरुवात

oil reserves

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| महाराष्ट्रतील तेल (Oil) खजिण्याबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मालवण (Malvan) आणि पालघरच्या(Palghar) सागरी हद्दीत मोठ्या प्रमाणात खनिज तेलाचे साठे सापडले आहेत. याठिकाणी केलेल्या संशोधनानुसार, मालवणजवळ सुमारे १९,१३१.७२ चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर तर पालघर जिल्ह्यातील डहाणूच्या समुद्रात ५,३३८ चौरस किलोमीटर क्षेत्रावर हे साठे असल्याचे निष्पन्न झाले आहे. या नव्या शोधामुळे भारताच्या तेल उत्पादनात मोठी वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

केंद्र सरकारकडून उत्खननास गती

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या आठ वर्षांपासून अरबी समुद्रात तेलसाठ्यांचा शोध सुरू होता. या मोहिमेअंतर्गत १८,००० चौरस किलोमीटरहून अधिक क्षेत्रात संशोधन करण्यात आले आहे. त्यातून महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत मोठ्या प्रमाणात तेलसाठे असल्याचे स्पष्ट झाले आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने याबाबत तत्काळ हालचाली सुरू केल्या आहेत. कारण आता, केंद्र सरकारच्या (Central Government) तेल उत्पादन कंपन्या या भागात उत्खननासाठी प्रयत्नशील होणार आहेत.

दरम्यान, भारतात सागरी तेलसाठ्यांचा शोध घेण्याचे काम गेल्या अनेक दशकांपासून सुरू आहे. १९७४ मध्ये मुंबईपासून ७५ सागरी मैल अंतरावर ‘मुंबई हाय’ येथे खनिज तेलाचा मोठा साठा आढळला होता. तो आजही भारतातील सर्वात मोठा सागरी तेलसाठा मानला जातो. मात्र, आता मालवण आणि पालघरजवळ सापडलेल्या साठ्यांमुळे महाराष्ट्राच्या तेल उत्पादनात मोठी भर पडणार आहे.

महत्वाचे म्हणजे, उथळ समुद्रात सापडलेले हे साठे किनाऱ्यापासून ८६ सागरी मैल अंतरावर आहेत. त्यामुळे त्यांचे उत्खनन तुलनेने सोपे होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे. केंद्र सरकारने यासाठी प्रगत तंत्रज्ञान वापरण्याची तयारी दाखवली आहे. त्यामुळे आता मालवण आणि पालघरजवळ सापडलेल्या या तेलसाठ्यांमुळे महाराष्ट्राचा तेल क्षेत्रातील आलेख वाढणार आहे.

Pakistan Train Hijack: पाकिस्तान ट्रेन हायजॅकमध्ये 21 प्रवासी, 4 जवानांचा मृत्यू; 33 दहशतवाद्यांचा खात्मा

Pakistan Train Hijack

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Pakistan Train Hijack – जागतिक स्तरावर खळबळ माजवणारी धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी पाकिस्तानमध्ये घडली आहे. या घटनेत पाकिस्तानच्या ट्रेनला हायजॅक करण्यात आले. आता याच घटनेची मोठी माहिती समोर आली आहे. लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे कि , बलुचिस्तानमध्ये रेल्वे अपहरण हल्ल्यात 21 प्रवासी व 4 जवानांचा मृत्यू झाला असून , या मोहिमेत सुरक्षा दलांनी 33 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. क्वेट्टाकडून पेशावरकडे जात असलेल्या जाफर एक्सप्रेसमध्ये 440 प्रवासी होते त्यातील सुरक्षा दलांनी 190 प्रवाशांची सुटका केली आहे.

प्रवाशांना बंदी बनवून त्यांच्या जीवाशी खेळ .. –

हल्ल्याचे शिकार झालेले जाफर एक्सप्रेसचे प्रवासी डोंगराळ प्रदेशातून जात असताना गुदलार आणि पिरू कुनरी येथील बोगद्यात स्फोट घडवून रेल्वे ताब्यात घेतली. हल्ल्यानंतर, ‘बलोच लिबरेशन आर्मी’ (बीएलए) या कट्टरपंथी गटाने या हल्ल्याची जबाबदारी घेतली. या गटाने या भागातील बलोच स्वातंत्र्यसंग्रामासाठी आपला विरोध व्यक्त केला आहे. हल्ल्याच्या (Pakistan Train Hijack) सुरुवातीला दहशतवाद्यांनी प्रवाशांना बंदी बनवून त्यांच्या जीवाशी खेळ सुरु केला होता. यामध्ये 21 प्रवाशांचा मृत्यू झाला, तर 4 जवान शहीद झाले. सुरक्षा दलांनी वेळेत कारवाई करून 190 प्रवाशांची सुटका केली आणि दहशतवाद्यांचा खात्मा केला. हल्ल्यानंतर, दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानमधील त्यांच्या सूत्रधारांशी सातत्याने संपर्क साधला, ज्यामुळे हे स्पष्ट होते की, यामध्ये परकीय हातांचा संभाव्य सहभाग असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ –

लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ यांनी एका स्थानिक वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले, “सुरक्षा दलांनी अत्यंत धैर्य आणि समर्पणाने या मोहिमेची अंमलबजावणी केली. आम्ही सर्व 33 दहशतवाद्यांना ठार केले आणि नागरिकांना सुरक्षितपणे सुटकेसाठी कारवाई केली.”

गृहमंत्री मोहसीन नक्वी यांनी केले कौतुक –

हल्ल्यानंतर (Pakistan Train Hijack) , पाकिस्तानच्या गृहमंत्री मोहसीन नक्वी यांनी सुरक्षा दलांच्या कार्याची प्रशंसा केली. “सुरक्षा दलांनी अत्यंत शौर्य आणि समर्पणाने हल्ल्यावर नियंत्रण मिळवले. हल्ल्यात सहभागी सर्व 33 दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे, जो एक मोठा विजय आहे,” असे ते म्हणाले. तसेच त्यांनी एकच ठाम सांगितले की, “निरपराध मुलं आणि महिलांचा मानवी ढाल म्हणून वापर करणं अत्यंत चुकीचं आहे. या प्रकारच्या घृणास्पद कृत्यांना कुठलीही माफी नाही. या घटनेमागील सुत्रधारांवर कठोर कारवाई केली जाईल.”

होळीदिवशी सर्वसामान्यांसाठी आनंदवार्ता!! पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त, पहा आजचे दर

Petrol-diesel

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आज होळी सणाच्या (Holi Festival) मुहूर्तावरच सर्वसामान्य नागरिकांसाठी एक आनंदवार्ता समोर आली आहे. देशभरातील महागाईच्या आकडेवारीनुसार किरकोळ महागाईचा निर्देशांक 4 टक्के खाली आला आहे. परिणामी पेट्रोल आणि डिझेलचे (Petrol And Diesel) दर स्वस्त झाले आहेत. खास म्हणजे, मुंबईत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत लक्षणीय घट झाली आहे. मात्र दुसऱ्या बाजूला, दिल्ली, चेन्नई आणि कोलकत्ता या महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किमतीत दरवाढ झाली आहे.

मुंबईकरांना इंधन दरात मोठी कपात

देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईत इंधन दर कमी झाल्याने वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या (IOCL) नव्या आकडेवारीनुसार, मुंबईत पेट्रोलच्या दरात 44 पैशांनी घट होऊन प्रति लिटर 103.50 रुपये झाला आहे. तर डिझेलच्या दरात तब्बल 2.12 रुपयांची कपात झाल्याने नवीन दर 90.03 रुपये प्रति लिटर झाला आहे.

दिल्ली, चेन्नई आणि कोलकत्तामध्ये इंधन दरवाढ

मुंबई वगळता इतर महानगरांमध्ये इंधन दरवाढ झाली आहे. दिल्ली आणि चेन्नईमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत प्रत्येकी 5 पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे दिल्लीत आता पेट्रोल 94.77 रुपये आणि डिझेल 87.67 रुपये प्रति लिटर दराने मिळत आहे. चेन्नईत पेट्रोल 100.80 रुपये तर डिझेल 92.39 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे.

त्याचबरोबर, कोलकत्ता येथे इंधन दरात सर्वाधिक वाढ झाली आहे. येथे पेट्रोलच्या किमतीत 1.07 रुपयांची वाढ होऊन तो 105.01 रुपये प्रति लिटर झाला आहे, तर डिझेलच्या किमतीत 1.06 रुपयांची वाढ होऊन तो 91.82 रुपये प्रति लिटरपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे नागरिकांना इंधनासाठी अधिक पैसे मोजावे लागत आहेत.

कच्च्या तेलाच्या दरात घसरण

जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत किरकोळ घट झाली आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, आखाती देशांमध्ये ब्रेंट क्रूड तेलाच्या किमतीत 0.14 टक्क्यांची घसरण झाली असून, त्याची किंमत 70.85 डॉलर प्रति बॅरलवर आली आहे. गेल्या दोन महिन्यांत कच्च्या तेलाच्या किमतीत सुमारे 14% घसरण झाली आहे. अमेरिकन क्रूड तेलाच्या किमतीत देखील किंचित घट झाली आहे.

दरम्यान, सध्याच्या महागाईच्या काळात इंधन दरातील चढ-उतार नागरिकांसाठी महत्त्वाचे ठरत आहेत. मुंबईत इंधन दर घसरल्याने वाहनचालकांना दिलासा मिळाला असला, तरी इतर भागातील वाढीव दर नागरिकांच्या खिशाला फटका देणारे ठरू शकतात. महत्त्वाचे म्हणजे गेल्या एक दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने देशातील महागाईचा आलेख जाहीर केला होता. ज्यात महागाई कमी झाल्याचे म्हटले होते. अशातच पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी झाल्यामुळे नागरिकांची महागाईपासून सुटका होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

औरंगजेबाची कबर जमीनदोस्त करा; शिंदेंच्या खासदाराची संसदेत मागणी

Aurangzeb Tomb

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसापासून औरंगजेबाची कबर हा मुद्दा जोरदार चर्चेचा विषय बनला आहे. यावर अनेकांनी आपली मते मांडून हि कबर हटवण्याची मागणी केली. पण आता औरंगजेबाची कबर जमीनदोस्त करण्याची मागणी संसदेत शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी केली आहे. संसदेत (Parliament) हि मागणी त्यांनी 12 मार्च रोजी लोकसभेत शून्य प्रहराच्या वेळी केली.

खासदार नरेश म्हस्के काय म्हणाले –

भारतीय पुरातत्व विभागाने संरक्षित केलेल्या एकूण 3,691 स्मारके व कबरींपैकी 25 टक्के वास्तू या मुघल व ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या नावाने उभारल्या आहेत, अन या लोकांनी भारत देश, देशाची संस्कृती व परंपरेविरोधात कामे केली होती. औरंगजेबाची कबर ही त्यापैकी एक असून , त्याची कबर जमीनदोस्त करण्याची मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी केली आहे. तसेच औरंगजेबाने आपल्या क्रूरपणे छत्रपती संभाजी महाराजांची हत्या करून सगळी हिंदू मंदिरे पाडली. अन या सर्व मंदिरातील संपत्ती लुटली. त्याचसोबतच त्याने शिखांच्या नवव्या व दहाव्या धर्मगुरूंची हत्या केली.

भारताविरोधात कामे केलेल्या सर्वांची स्मारके व कबरी नष्ट –

“खुलताबादमध्ये औरंगजेबाची कबर असून ASI ने ती संरक्षित व संवर्धित केली आहे. हि कबर संरक्षित करण्याची गरज आहे का ? औरंगजेबासह भारताविरोधात कामे केलेल्या सर्वांची स्मारके व कबरी नष्ट करायला हव्यात.” असे देखील खासदार नरेश म्हस्के म्हणाले

औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा –

औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा चर्चेत येण्यामागे छावा चित्रपट असून , त्यावेळी आमदार अबू आझमी यांनी एक वक्तव्य केले होते. त्यामुळे या हा मुद्दा उफाळून निघाला आहे. भारताला गुलाम बनविणाऱ्या आणि आपल्या शूर स्वातंत्र्यसैनिकांवर अत्याचार करणाऱ्यांच्या आठवणी आपण आपला वारसा म्हणून जपतो आहोत, पण हे सर्वांसाठी योग्य आहे का? असा प्रश्न म्हस्के यांनी केला आहे.

IPL 2025: अशी असेल Mumbai Indians ची Playing XI; कोणाकोणाला संधी मिळणार?

IPL 2025

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । IPL 2025 – आताच काही दिवसांपूर्वी भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये (champions trophy 2025) दमदार विजय मिळवला आहे. आता क्रिकेटप्रेमी आयपीएल 2025 (IPL) च्या स्पर्धेची प्रतीक्षा करत आहेत. इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या सीजनला 22 मार्च पासून सुरुवात होणार असून , मुंबई इंडियन्स चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध 23 मार्च रोजी पहिला सामना रंगताना दिसणार आहे. पण मेगा ऑक्शननंतर मुंबई इंडियन्सच्या संघात काही महत्वाचे बदल झाल्याचे चित्र दिसून येत आहे. या बदलामध्ये काही आधीचे खेळाडू बाहेर पडून , दुसऱ्या खेळाडूंचा समावेश झाला आहे. त्यामुळे फॅन्सची उत्सुकता वाढली आहे.

कर्णधारपदाची संधी (IPL 2025)

मुंबई इंडियन्सने 5 आयपीएल ट्रॉफी जिंकल्या असून, संघाचा कर्णधार रोहित शर्मा होता. पण आयपीएल 2024 च्या आधी पंड्याला नेतृत्व देण्यात आले होते. अन यंदाही आयपीएल 2025 साठी त्याला पुन्हा कर्णधारपदाची संधी देण्यात आली आहे.

मुंबई इंडियन्सची प्लेइंग 11 –

रोहित शर्मा (ओपनिंग बॅट्समन) – मुंबई इंडियन्सचा सलामीवीर खेळाडू रोहित शर्मा यंदाही ओपनिंगला (IPL 2025) उतरू शकतो.

विल जॅक (ओपनिंग बॅट्समन) – इंग्लंडचा स्टार फलंदाज विल जॅक आयपीएल 2024 मध्ये आरसीबीकडून खेळला होता आणि त्याच्या दमदार फलंदाजीमुळे तो यंदा मुंबईसाठी ओपनिंग करू शकतो.

नमन धीर (तिसऱ्या क्रमांकावर) – युवा फलंदाज नमन धीर त्याच्या प्रभावी परफॉर्मन्सने आयपीएल 2024 मध्ये सर्वांचे लक्ष वेधले होते. त्यामुळे त्याला मुंबई इंडियन्ससाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरवले जाऊ शकते.

सूर्यकुमार यादव (चौथ्या क्रमांकावर) – भारताचा टी 20 कर्णधार सूर्यकुमार यादव, जो गेल्या काही सीजनमध्ये मुंबई इंडियन्सचा मॅच विनिंग खेळाडू ठरला आहे, यंदा चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरेल.

तिलक वर्मा (पाचव्या क्रमांकावर) – डावखुरा फलंदाज तिलक वर्मा, जो मुंबईचा एक महत्त्वाचा खेळाडू आहे, पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो.

हार्दिक पंड्या (नंबर 6) IPL 2025 मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्या, जो फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये प्रभावी आहे, त्याला नंबर 6 वर फलंदाजीसाठी उतरवले जाऊ शकते.

रॉबिन मिन्झ (नंबर 7) – झारखंडचा खेळाडू रॉबिन मिन्झ मोठ्या शॉट्ससाठी प्रसिद्ध आहे. तो मुंबईसाठी सातव्या क्रमांकावर उतरण्याची शक्यता आहे.

दीपक चहर (गोलंदाज) – चेन्नई सुपरकिंग्सकडून खेळलेल्या दीपक चहरला मुंबई इंडियन्समध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. तो पॉवरप्लेमध्ये विकेट घेण्याचे महत्त्वपूर्ण काम करेल.

मिचेल सॅंटनर (फिरकीपटू) – न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सॅंटनर, जो आपल्या फिरकीगोलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे, मुंबईच्या संघात फिरकीपटू म्हणून भूमिका निभावू शकतो.

मुजीब उर रहमान (फिरकीपटू) – अफगाणिस्तानचा फिरकीपटू मुजीब उर रहमान, जो अल्लाह गझनफरची जागा घेईल, तो मुंबईसाठी (IPL 2025) महत्त्वपूर्ण गोलंदाज ठरू शकतो.

जसप्रीत बुमराह (गोलंदाज) – जसप्रीत बुमराह सध्या पाठीच्या दुखापतीमुळे त्रस्त असला तरी, तो काही दिवसांमध्ये पुन्हा आगमन करू शकतो. त्याच्या अनुभवामुळे तो मुंबईसाठी महत्त्वपूर्ण गोलंदाज राहील. संपूर्ण संघात एकत्रित केलेल्या विविध खेळाडूंच्या सहाय्याने मुंबई इंडियन्स यंदा आयपीएल 2025 मध्ये एक भक्कम संघ तयार करून दमदार कामगिरी करेल.

SBI ची जबरदस्त योजना! कमी कालावधीत मिळेल भरघोस परतावा; 31 मार्चपर्यंत घेता येणार लाभ

Amrut Kalash FD Scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ही देशातील अग्रगण्य बँक आहे. त्यामुळे ती आपल्या ग्राहकांसाठी सतत आकर्षक बचत आणि गुंतवणूक योजना सादर करत असते. परंतु सध्या स्टेट बँक ऑफ इंडियाची कमी कालावधीत चांगला परतावा मिळवून देणारी “अमृत कलश एफडी योजना” (Amrit Kalash FD Scheme) फायदेशीर आणि लोकप्रिय ठरत आहे. आज आपण याच योजनेविषयी जाणून घेणार आहोत.

काय आहे SBI अमृत कलश एफडी योजना?

ही एक ४०० दिवसांची मुदत ठेव (FD) योजना आहे. जिथे गुंतवणूकदारांना निश्चित आणि आकर्षक व्याजदर दिला जातो. स्टेट बँकेने ही योजना प्रथम २०२३ मध्ये सुरू केली होती. सुरुवातीला या योजनेची मर्यादित मुदत होती, मात्र ग्राहकांच्या मोठ्या प्रतिसादामुळे ती अनेकदा वाढवण्यात आली. आता ३१ मार्च २०२५ ही शेवटची मुदत ठरवण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी अवघे २० दिवस शिल्लक आहेत.

या योजनेत गुंतवणूक का करावी?

  1. आकर्षक व्याजदर – सर्वसामान्य गुंतवणूकदारांना ७.१०% व्याजदर मिळतो. ज्येष्ठ नागरिकांसाठी हा व्याजदर ७.६०% आहे.
  2. कमी कालावधीत चांगला परतावा – ही योजना केवळ ४०० दिवसांसाठी असून, मोठ्या कालावधीची वाट न पाहता चांगला परतावा मिळतो.
  3. सुरक्षित गुंतवणूक – स्टेट बँक ऑफ इंडिया ही सरकारी बँक असल्याने या योजनेतील गुंतवणूक पूर्णतः सुरक्षित आहे.

१ लाख रुपयांवर किती परतावा मिळेल?

  • जर एखाद्या व्यक्तीने १ लाख रुपये गुंतवले, तर त्याला ७,१०० रुपये व्याज मिळेल.
  • ज्येष्ठ नागरिकांना ७,६०० रुपये व्याज मिळू शकते.
  • १० लाखांची गुंतवणूक केल्यास ७१,००० रुपयांपर्यंत परतावा मिळू शकतो.

परतावा कसा मिळेल?

या योजनेत गुंतवणूकदारांना व्याजाची रक्कम मासिक, तिमाही आणि सहामाही पद्धतीने मिळू शकते. तसेच, मुदतपूर्ती (Maturity) झाल्यानंतर संपूर्ण रक्कम एकत्रही मिळू शकते.

गुंतवणूक कशी करावी?

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी दोन पर्याय उपलब्ध आहेत:

  1. ऑनलाइन अर्ज: SBI च्या मोबाईल अॅप किंवा इंटरनेट बँकिंगद्वारे सहज गुंतवणूक करता येईल.
  2. बँकेच्या शाखेत प्रत्यक्ष भेट: ग्राहकांनी जवळच्या SBI शाखेत जाऊन अर्ज भरू शकतात.

दरम्यान, SBI ची अमृत कलश एफडी योजना ही कमीत कमी कालावधीत जास्तीत जास्त परतावा मिळवून देणारी आकर्षक योजना आहे. परंतु ३१ मार्च २०२५ नंतर ही योजना बंद होणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी लवकरात लवकर या योजनेचा लाभ घ्यावा.

पुण्यापासून जवळ असलेली उन्हाळ्यात भेट देण्यासारखी 5 अप्रतिम ठिकाणे

pune tourism

उन्हाळा सुरू होताच तापमानाचा पारा झपाट्याने वाढतो आणि शहरात उन्हाच्या काहिलीने जीव हैराण होतो. अशा वेळी आपल्याला निसर्गाच्या सान्निध्यात, थंड हवामानात आणि शांततेत काही निवांत क्षण घालवायची इच्छा होते. पुण्याजवळ अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे उन्हाळ्यात आरामदायक वातावरण मिळते. डोंगरदऱ्या, नद्यांचे काठ, हिरवीगार दऱ्या आणि धबधबे यामुळे या ठिकाणी पर्यटकांचे विशेष आकर्षण असतात.पुण्यापासून काही तासांच्या अंतरावर असणारी महाबळेश्वर, लव्हासा, भंडारदरा, मुळशी आणि पंचगणी ही ठिकाणे उन्हाळ्यातील थंड हवेची मेजवानी देतात. चला तर मग, या प्रत्येक ठिकाणाबद्दल सविस्तर माहिती घेऊया

महाबळेश्वर

महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध हिल स्टेशन असून येथील आल्हाददायक वातावरण, हिरवीगार दऱ्या आणि स्ट्रॉबेरीच्या बागा प्रसिद्ध आहेत. उन्हाळ्यात येथे गारवा असतो, त्यामुळे उन्हापासून सुटका मिळते. तुम्ही वेण्णा तलावात बोटिंग करू शकता, मॅपरो गार्डनमध्ये ताज्या स्ट्रॉबेरीचा आस्वाद घेऊ शकता आणि प्रतापगड किल्ल्यावर इतिहासाची सफर घडवू शकता.

अंतर: पुण्यापासून 120 किमी
विशेष आकर्षण: वेण्णा लेक, प्रतापगड किल्ला, एलिफंट पॉइंट, मॅपरो गार्डन

लव्हासा

लव्हासा हे भारतातील पहिले नियोजनबद्ध हिल स्टेशन असून ते सुंदर तलाव, रंगीबेरंगी युरोपियन शैलीतील इमारती आणि साहसी खेळांसाठी प्रसिद्ध आहे. येथे तुम्ही बोटिंग, जेट स्कीइंग आणि कयाकिंगसारख्या वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेऊ शकता. या ठिकाणी आल्हाददायक वातावरण असल्यामुळे उन्हाळ्यात येथे जाणे हा उत्तम पर्याय ठरतो.

अंतर: पुण्यापासून 60 किमी
विशेष आकर्षण: वॉटर स्पोर्ट्स, इटालियन थीम पार्क, साहसी खेळ

भंडारदरा

भंडारदरा हे पश्चिम घाटाच्या कुशीत वसलेले निसर्गरम्य ठिकाण आहे. येथील हिरवीगार पर्वतरांगांमधून वाहणारे धबधबे आणि सुंदर तलाव उन्हाळ्यात प्रचंड आकर्षक वाटतात. शांतता आणि आल्हाददायक वातावरणाचा आनंद लुटायचा असेल, तर हे ठिकाण सर्वोत्तम आहे.

अंतर: पुण्यापासून 170 किमी
विशेष आकर्षण: रंधा धबधबा, अंब्रेला फॉल्स, आर्थर लेक, कोकणकडा

मुळशी

मुळशी हे पुण्याजवळील एक सुंदर ठिकाण असून येथे प्रचंड शांतता असते. ताम्हिणी घाटातील हिरवेगार डोंगर, मुळशी धरणाचा शांत किनारा आणि निसर्गाच्या कुशीत घालवलेले क्षण उन्हाळ्यात खूप सुखावणारे असतात. ट्रेकिंगप्रेमींसाठी अंडारबन हे जंगल एक उत्तम अनुभव देतं.

अंतर: पुण्यापासून 50 किमी
विशेष आकर्षण: ताम्हिणी घाट, मुळशी धरण, अंडारबन ट्रेक

पाचगणी

पाचगणी हे सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेले एक सुंदर हिल स्टेशन आहे. येथे आल्हाददायक थंड हवामान, टेबल लँडसारखे विस्तीर्ण पठार आणि सुंदर व्ह्यू पॉइंट्स आहेत. उन्हाळ्यात येथील हवामान अतिशय सुखदायक असते, त्यामुळे उन्हाळी सहलीसाठी हे ठिकाण उत्तम पर्याय आहे.

अंतर: पुण्यापासून 100 किमी
विशेष आकर्षण: टेबल लँड, सिडनी पॉइंट, देवळे सृष्टी पार्क

पुण्याच्या आसपास उन्हाळ्यात भेट देण्यासारखी ही पाच अप्रतिम ठिकाणे पर्यटकांना थंड आणि आरामदायक वातावरण देतात. जर तुम्हाला उन्हाळ्यात गारवा आणि निसर्गसौंदर्याचा आनंद घ्यायचा असेल, तर महाबळेश्वर, लव्हासा, भंडारदरा, मुळशी आणि पंचगणी ही ठिकाणे तुमच्या यादीत असायलाच हवीत!

उन्हाळ्यात Healthy राहायचंय? डायटमध्ये करा ‘या’ गोष्टींचा समावेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । थंडीचे दिवस संपले अन आता गरमीचे दिवस सुरू झाले आहेत. कडक उन्हाळा देखील आता आपल्याला जाणवायला लागला आहे. उन्हाळा येताच आपली शरीराची आवश्यकताही बदलते म्हणजेच शरीराला योग्य प्रमाणात पाणी, ताजे फळे आणि पोषण तत्वांची आवश्यकता असते. उन्हाळ्यात, विशेषतः जास्त तापमानामुळे शरीराला घाम जास्त येतो आणि शरीरातील पाणी कमी होतं तर या गोष्टी नॉर्मल आहेत. त्यामुळे आपण आपल्या आहारात कुठल्या पदार्थांचा समावेश करतोय यावर देखील खूप गोष्टी निर्भर असतात. उन्हाळ्यात शरीराची ताकद वाढवण्यासाठी आणि उन्हाळ्याची झळ कमी करण्यासाठी खालील पद्धतीने आहार ठेवणे गरजेचे आहे. चला तर मग जाणून घेवूयात उन्हाळ्यात आपल्या डायटमध्ये कोणते पदार्थ असणे आवश्यक आहे.

आता तर होळी सण देखील आला आहे आणि एकदाचा हा सण झाला की अजून जास्त तापमानात वाढ होताना आपल्याला दिसेल आणि अशा या कडक उन्हाचा सामना करायचा असेल तर खालील पद्धतीने तुम्हांला शरीराची काळजी घ्यावी लागेल.

पाणी आणि फ्लुईड्स –

जेव्हा बाहेरील तापमानात वाढ होते तेव्हा आपल्या शरीरातील पाण्याचे प्रमाण हे कमी व्हायला लागते. त्यामुळे जर तुम्ही उन्हाळ्यात पाणी जास्त नाही प्यायलात तर वाढत्या तापमानात शरीर हायड्रेट राहणार नाही. याचाच परिणाम उन्हाचा भयानक त्रास तुम्हांला सहन करावा लागेल. यासाठी दिवसभरात तुम्ही किमान 3 ते 4 लिटर पाणी पिणे गरजेच आहे. त्यासोबतच नारळपाणी, लिंबू पाणी, आणि ताज्या फळांचे ज्यूस देखील प्यायला हवे , यामुळे शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत होईल.

डायटमध्ये करा या गोष्टींचा समावेश –

उन्हाळ्यात जास्त चांगली निवडक फळे मिळतात. खरबूज, पपई, सफरचंद, आंबा आणि लिंबू ह्या फळांमध्ये पाणी आणि फायबर्स भरपूर असतात. या फळांचा डायटमध्ये समावेश केल्याने शरीराला आवश्यक पोषण मिळेल आणि हि फळे खाल्यामुळे शरीर हायड्रेटेड राहील. भाज्या आणि सैलड्स हे देखील अत्यंत महत्वाचे आहेत त्यामध्ये काकडी, टोमॅटो, गाजर, बीट, आणि शाकाहारी पद्धतीने तयार केलेल सैलड् उन्हाळ्यात ताजेपणा आणि पोषण दोन्ही देतात.

यासोबतच दही आणि ताक शरीरातील पचनक्रिया सुधारण्यासाठी फायदेशीर ठरतात. दही मध्ये प्रोटीन आणि प्रोबायोटिक्स असतात, जे पचन आणि हाडांसाठी उपयुक्त असतात. उन्हाळ्यात हलकं आणि चवदार असलेलं ताक हे शरीरात उष्णता कमी करण्यात मदत करते.

अक्रोड आणि ओट्स हे हाय फाइबर आणि हाय प्रोटीन असलेले ड्रायफ्रुट्स आहे, हे उन्हाळ्यात सकाळी उठल्या उठल्या खाल्लं तर उत्तमच. यासोबतच नट्स आणि बीज, लिंबू आणि हळद यांचा देखील समावेश रोजच्या आहारात ठेवायला हवा. लिंबू मध्ये व्हिटॅमिन C चे प्रमाण खूप जास्त असते, जे शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीला बळकट करतं.

उन्हाळ्यात कोणत्या गोष्टी टाळाव्यात –

उन्हाळ्यात हायड्रेटेड राहणे, हलके आणि पोषक अन्न खाणे, आणि शरीराला उष्णतेपासून सुरक्षित ठेवण्यासाठी काही गोष्टी टाळाव्या लागतात. उन्हाळ्यात जास्त तिखट आणि तेलकट पदार्थां खावू नयेत. यामुळे पोटात जळजळ, ऍसिडिटीचे प्रमाण वाढते त्यामुळे हे पदार्थ टाळावेत. उन्हाळ्यात उष्णतेमुळे हॉट ड्रिंक्स, जसे की चहा, कॉफी इत्यादींचा अधिक वापर केल्यास शरीराच तापमान वाढू शकते. तसेच तुम्ही जेव्हा उन्हातून चालत जाता आणि घरी गेल्यावर लगेच पाणी पिता तर ही चूक देखील करू नका. उन्हातून आल्यावर 5 मिनिट तरी पाणी किंवा इतर थंड पेय घेवू नका.