Friday, August 1, 2025
Home Blog Page 202

Mumbai Nashik Highway : महत्वाची बातमी ! कसारा घाट 6 दिवस राहणार बंद ; काय आहे पर्यायी मार्ग ? जाणून घ्या

kasara ghat

Mumbai Nashik Highway : तुम्ही जर मुंबई- नाशिक महामार्गावर प्रवास करणार असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. मुंबई – नाशिक महामार्गावरील जुना कसारा घाट रस्ता पुढचे सहा दिवस बंद करण्यात येणार आहे. दुरुस्तीच्या कारणास्तव घाट रस्ता पुढचे सहा दिवस बंद असणार आहे. या रस्त्यावर सकाळी आठ ते संध्याकाळी सहा पर्यंत ट्रॅफिक ब्लॉक घेतला जाणार असून सोमवार ते गुरुवार दरम्यान तसेच 3 ते 6 मार्च या कालावधीत या घाटातील वाहतूक बंद असणार आहे. त्यामुळे तुम्ही जर या मार्गावरून प्रवास करणार असाल तर बंद दरम्यान (Mumbai Nashik Highway) प्रवास करू नका.

म्हणून मार्ग राहणार बंद (Mumbai Nashik Highway)

राज्यातील विविध मार्गांवर पावसाळ्यापूर्वी दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत. जुना कसारा घाटात देखील रस्ता दुरुस्ती आणि पावसाळ्याच्या पूर्वतयारीसाठी दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं असून दिलेल्या कालावधीमध्ये मुंबई कडून नाशिक कडे जाणारी वाहने नवीन कसारा घाटा मार्गे जातील. संध्याकाळनंतर सकाळी आठ वाजेपर्यंत ही वाहतूक जुन्या कसारा घाटातील नेहमीच्या मार्गाने होईल या कालावधीत घाटातील अवजड वाहनांची वाहतूक ही पूर्णतः बंद राहणार आहे. वाहतूक निर्बंधाची अधिसूचना अप्पर पोलीस महासंचालक वाहतूक कार्यालयाने काढली आहे.

वाहतुकीतील बदल (Mumbai Nashik Highway)

दरम्यान दुरुस्तीच्या काळामध्ये कोणतीही वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी नाशिक मुंबई दरम्यानच्या वाहतुकीत बदल करून काही निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यानुसार या कालावधीमध्ये जुन्या घाटातील दोन्ही मार्गावर मध्यरात्रीपासून ते दुसऱ्या दिवशी रात्रीपर्यंत अवजड वाहनांची वाहतूक पूर्णतः बंद ठेवण्यात आली आहे. जुन्या कसारा घाटात सकाळी 8 ते संध्याकाळी 6 या वेळेत वाहतूक बंद राहील. या काळात नाशिक कडे जाणारी सर्व वाहने नवीन कसारा घाटातून मार्गक्रमण करतील. चिंतामणवाडी पोलीस चौकी समोरून एकेरी मार्गाने वाहनांना मार्गस्थ होता येईल. संध्याकाळी सहा नंतर जुना कसारा घाट वाहतुकीसाठी पूर्णपणे खुला राहणार आहे.

दरम्यान दिनांक 24 ते 27 फेब्रुवारी आणि 3 मार्च ते 6 मार्च या कालावधीमध्ये मुंबई ते नाशिक आणि नाशिक ते मुंबई या कसारा घाटातील दोन्ही मार्गावर अवजड वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. या काळात नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 60 वरून यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरून इच्छित स्थळी जाता येणार आहे. वाहतुकीचे हे निर्बंध राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत अमलात राहणार आहे.

मदत केंद्रांची उभारणी (Mumbai Nashik Highway)

दरम्यान रस्त्यातील बदल लक्षात घेता मुंबई नाशिक शिर्डी दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना काही अडचण असल्यास मदतीसाठी कसारा पोलीस महामार्ग पोलीस, घोटी केंद्र महामार्ग पोलीस, शहापूर केंद्र आपत्ती व्यवस्थापन टीमही नवीन कसारा घाटात (Mumbai Nashik Highway) कार्यरत राहणार आहे. तसेच पोलीस कर्मचाऱ्यांची मदत केंद्र ही उभं राहणार असल्याचा प्रशासनाने सांगितले आहे.

महाराष्ट्रात लवकरच स्कुबा गियरशिवाय करता येणार पाण्याखालील समुद्री सफर , MTDC चा नवा प्रकल्प

scuba

पर्यटकांना लवकरच स्कुबा गियरशिवाय समुद्राच्या अद्भुत दुनियेचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे. भारतीय नौदलाच्या निवृत्त युद्धनौका INS गुलदार च्या आधारे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (MTDC) एक नाविन्यपूर्ण प्रकल्प राबवत आहे. यामध्ये अत्याधुनिक पाणबुडी (submersible) च्या सहाय्याने पर्यटकांना मालवणजवळील निवती रॉक्स येथे समुद्रतळाचा रोमांचक प्रवास घडवून आणण्यात येणार आहे.

समुद्री पर्यटनाला चालना

या उपक्रमामुळे महाराष्ट्रातील समुद्री पर्यटन वाढणार असून पर्यटकांना विविध रंगीबेरंगी प्रवाळ (coral reefs), जलचर प्राणी आणि ऐतिहासिक युद्धनौकेचे अवशेष जवळून पाहण्याची संधी मिळणार आहे.

INS गुलदार

निवृत्त झालेली INS गुलदार येत्या १५ दिवसांत निवती रॉक्सजवळ पाण्यात उतरवली जाणार, जी सिंधुदुर्ग किल्ल्यापासून सुमारे १० नॉटिकल मैलांवर असेल.
जहाजातील तेल, अॅस्बेस्टोससारख्या हानिकारक पदार्थांचे स्वच्छिकरण करूनच ती पाण्यात सोडण्यात येईल.जहाजाचे दरवाजे उघडण्यात येतील, त्यामुळे ते पाण्याने भरून सुमारे ५० मीटर खोल समुद्रतळाशी स्थिर बसेल. INS गुलदार एक कृत्रिम प्रवाळभित्ती (artificial reef) बनणार, जी जलचर जीवसृष्टीला आधार देईल आणि समुद्रातील जैवविविधता वाढवेल.

या प्रकल्पाचा खर्च

या प्रकल्पाचा एकूण खर्च रु. ९७ कोटी आखण्यात आला असून यातील रु. ४७ कोटी – जहाजाच्या तयारीसाठी आणि पाण्यात उतरण्यासाठी केला जाईल. तर
रु. ५० कोटी पाणबुडी आणि त्यासाठी आवश्यक मदरशिप तयार करण्यासाठी वापरण्यात येईल. २२ आसनी अत्याधुनिक पाणबुडी तयार केली जाईल, ज्यामध्ये २ कर्मचारी आणि २० पर्यटक एकावेळी प्रवास करू शकतील. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ ३ महिन्यांत आंतरराष्ट्रीय निविदा काढणार असून माझगाव डॉक लिमिटेड यांना प्राधान्य दिले जाईल.

पुढील ७-८ महिन्यांत पाणबुडी कार्यान्वित होणार

अनोखी पर्यटन सफर मालवणहून सुरू होईल, जिथून पर्यटकांना मदरशिपने समुद्रातील डायव्ह साइटपर्यंत नेले जाईल. तिथून २२-सीटर पाणबुडीमध्ये प्रवेश करून पर्यटकांना INS गुलदारच्या जलमय दुनियेचे थेट दर्शन घेता येईल. पाणबुडी समुद्रतळाशी उतरत असताना, पर्यटकांना समुद्रातील निसर्गसौंदर्याचे आणि जलचरांच्या जीवनाचे मनोहारी दर्शन घेता येईल.

नवीन पर्यटनाची दिशा

हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर, महाराष्ट्रातील समुद्री पर्यटन क्षेत्रात एक नवे पर्व सुरू होईल. साहसी प्रवासाचा अनुभव घेणाऱ्या पर्यटकांसाठी ही संधी नक्कीच अविस्मरणीय ठरणार आहे.

Indian Railway : रेल्वेच्या प्रवाशांना हवा आहे आरामदायी प्रवास ; एसी 3-टियर ला पसंती, रेल्वेही मालामाल

railway news

Indian Railway : लोक आता अधिक आरामदायक प्रवासाला प्राधान्य देत आहेत आणि त्यासाठी अधिक खर्च करण्यास तयार आहेत. त्यामुळेच गेल्या पाच वर्षांत एसी 3-टियरमधून होणाऱ्या कमाईत 19.5% वार्षिक वाढ (CAGR) झाली आहे. 2019-20 मध्ये एसी 3-टियरमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या 11 कोटी होती, जी एकूण प्रवाशांच्या 1.4% होती. 2024-25 मध्ये ही संख्या वाढून 26 कोटींवर पोहोचली, म्हणजेच वार्षिक सुमारे 19% वाढ दर्शवते. याशिवाय, एसी 3-टियरमधून होणारी कमाई आर्थिक वर्ष 2019-20 मधील 12,370 कोटी (Indian Railway) रुपयांवरून 2024-25 मध्ये 30,089 कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

रेल्वेची सर्वाधिक कमाई कुठून? (Indian Railway)

कोविडपूर्व काळात म्हणजेच 2019-20 मध्ये, स्लीपर क्लासमधील प्रवाशांकडून रेल्वेला सर्वाधिक कमाई होत होती. त्या वर्षी रेल्वेने स्लीपर क्लासमधून 13,641 कोटी रुपयांची कमाई केली, जी त्या वर्षाच्या एकूण 50,669 कोटी रुपयांच्या महसुलाच्या 27% होती. मात्र, त्या वर्षी एकूण 809 कोटी प्रवाशांपैकी फक्त 37 कोटी प्रवासी स्लीपर क्लासमध्ये प्रवास करत होते, जे फक्त 4.6% होते. 2024-25 मध्ये स्लीपर क्लासमधून रेल्वेची कमाई 15,603 कोटी रुपयांवर पोहोचली, जी एकूण महसुलाच्या 19.5% आहे. तसेच, एकूण प्रवाशांमध्ये स्लीपर क्लासच्या प्रवाशांची (Indian Railway) संख्या 38 कोटींवर पोहोचली, जी 5.25% आहे.

एसी 3-टियरच्या भाड्यात वाढ कशी झाली?

2019-20 ते 2024-25 या पाच वर्षांच्या रेल्वेच्या प्रवासी आकडेवारीनुसार, एसी 3-टियरच्या भाड्यात वाढ झाली असली, तरी ही वाढ एसी 1-क्लास, एसी 2-टियर, एसी चेअर कार आणि स्लीपर क्लासच्या तुलनेत कमी आहे. 2019-20 मध्ये एसी 3-टियरचे प्रति (Indian Railway) प्रवासी भाडे 1,090 रुपये होते, जे 2024-25 मध्ये वाढून 1,171 रुपये झाले. म्हणजेच 7.4% वाढ झाली आहे.

इतर वर्गांच्या भाड्यात झालेली वाढ (Indian Railway)

गेल्या पाच वर्षांत एसी फर्स्ट क्लासच्या भाड्यात 25.38%, एसी चेअर कारमध्ये 23.24%, आणि एसी 2-टियरमध्ये 18.22% वाढ झाली आहे.
एसी फर्स्ट क्लासचे भाडे प्रति प्रवासी 458 रुपयांनी वाढले आहे. एसी चेअर कारच्या भाड्यात 119 रुपयांची वाढ झाली आहे. एसी 2-टियरचे भाडे 2019-20 मध्ये 1,267 रुपये होते, ते 2024-25 मध्ये 1,498 रुपये झाले. स्लीपर क्लासच्या भाड्यात 10.64% वाढ झाली आहे.

गेल्या काही वर्षांत लोक अधिक आरामदायक प्रवास करण्यास प्राधान्य देत असल्यामुळे एसी 3-टियरची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे या विभागातील कमाईत लक्षणीय वाढ झाली आहे. भविष्यात, रेल्वे आणखी सोयी-सुविधा वाढवून अधिक महसूल मिळवू शकते.

Kitchen Tips : 5 जबरदस्त किचन टिप्स ; ज्यामुळे तुमचे रोजचे काम होईल सोपे

Kitchen Tips : प्रत्येक गृहिणीचे हक्काचे आणि आवडीचे ठिकाण म्हणजे स्वयंपाक घर… स्वयंपाकघर व्यवस्थित ठेवणे आणि तिथले खाद्यपदार्थ ताजे राखणे ही एक कला आहे. योग्य साठवणुकीच्या सवयी अवलंबल्यास अन्नपदार्थ जास्त काळ टिकतात आणि चवही कायम राहते. म्हणूनच आजच्या लेखात आम्ही काही टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे तुमच्या स्वयंपाकघरातील व्यवस्थापन करणे तुम्हाला सोपे जाईल.

शिवाय टिप्स अवलंबल्यास स्वयंपाकघर स्वच्छ, सुगंधी आणि अन्नपदार्थ चविष्ट राहतील. योग्य साठवणुकीमुळे अन्नपदार्थांचे आयुष्य वाढते आणि किचन व्यवस्थापन सुकर होते. या सोप्या सवयी अंगीकारून तुम्हीही तुमच्या स्वयंपाकघराला अधिक सुटसुटीत आणि स्वच्छ ठेवू शकता. चला तर मग जाणून घेऊया

मसाले कसे साठवायचे? (Kitchen Tips)

मसाल्यांचा योग्य प्रकारे साठवण केल्यास त्यांचा सुगंध आणि चव दीर्घकाळ टिकून राहते.

मसाले हवाबंद डब्यात ठेवा, कारण ओलसरपणा आणि हवेचा संपर्क झाल्यास त्यांची चव कमी होऊ शकते.

मसाले नेहमी थंड आणि कोरड्या ठिकाणी ठेवा. गॅसजवळ किंवा थेट सूर्यप्रकाशात ठेवू नका.

मसाल्यांसाठी काचेच्या किंवा स्टीलच्या कंटेनरचा वापर करावा.

लवंग, मिरी यांसारखे मसाले जास्त काळ टिकवण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवू शकता.

पीठ साठवण्याची पद्धत

पीठ दीर्घकाळ ताजे ठेवण्यासाठी योग्य साठवणुकीची आवश्यकता असते.

गव्हाचे पीठ, बेसन, ज्वारी किंवा बाजरीचे पीठ कोरड्या आणि हवाबंद डब्यात ठेवा.

पीठात सुका नीमपत्र किंवा बडीशेप टाकल्यास कीड लागू शकत नाही.

पीठ नेहमी थंड आणि अंधाऱ्या ठिकाणी ठेवा, उष्णतेमुळे त्याचा रंग आणि चव बदलू शकते.

दूध कसे टिकवायचे? (Kitchen Tips)

दूध ताजे राहण्यासाठी योग्य पद्धत आवश्यक आहे.

दूध नेहमी फ्रीजमध्ये ठेवा आणि त्याचे तापमान 4°C पेक्षा कमी ठेवा.

दुधाला जास्त काळ टिकवायचे असल्यास ते उकळून गार करून फ्रिजमध्ये ठेवा.

उष्ण हवामानात दूध आंबू नये म्हणून त्यात थोडी साखर किंवा एक चिमूटभर सोडा टाकू शकता.

दूध काचेच्या किंवा स्टीलच्या भांड्यात साठवा; प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये ठेवल्यास त्याची चव बदलू शकते.

स्वयंपाकघरातील दुर्गंधी दूर करण्यासाठी

कधी कधी स्वयंपाकघरात विविध पदार्थांचे वास मिसळून दुर्गंधी निर्माण होते. हे टाळण्यासाठी खालील उपाय करा.

लिंबू आणि बेकिंग सोडा एकत्र करून गॅसशेजारी ठेवल्यास वास शोषला जातो.

व्हिनेगर आणि पाणी मिसळून स्वयंपाकघरातील फडके पुसल्यास ताजेपणा राहतो.

गॅसशेजारी तुपात रोझमेरी किंवा लवंग टाकून जाळल्यास स्वयंपाकघराला चांगला सुवास येतो.

कचरा वेळेवर फेकून द्या आणि डस्टबिनमध्ये बेकिंग सोडा टाका, त्यामुळे वास येणार नाही.

डाळी कशा साठवायच्या?

डाळी जास्त काळ ताज्या ठेवण्यासाठी योग्य साठवण महत्त्वाची आहे.

डाळी हवाबंद डब्यात ठेवा आणि त्यात सुका लसूण, मिरच्या किंवा कडिपत्ता घाला, त्यामुळे कीड लागत नाही.

डाळी कोरड्या ठिकाणी ठेवा आणि त्यात जास्त आर्द्रता येणार नाही याची काळजी घ्या.

मोठ्या प्रमाणात डाळी साठवत असल्यास दर महिन्याला उन्हात वाळवून पुन्हा डब्यात भरा.

डाळी फ्रीजमध्ये ठेवल्यास त्या जास्त काळ ताज्या राहतात.

IRCTC : विसरून जाल फॉरेन-वॉरेन, ‘या’ टूर पॅकेजच्या पुढे मालदिव सुद्धा फिके

IRCTC

IRCTC : जर तुम्ही पैशांमुळे पत्नीच्या फॉरेन टूरच्या स्वप्नाला पूर्ण करू शकत नसाल, तर चिंता करण्याची गरज नाही. आज आम्ही तुम्हाला IRCTC च्या अशा एका अप्रतिम टूर पॅकेजबद्दल सांगणार आहोत, ज्याच्या समोर मालदीवसुद्धा फिके वाटेल. येथेले निसर्गसौंदर्य पाहिल्यावर तुमची पत्नी परदेश विसरून जाईल! यात शंका नाहीहल्लीच्या काळात विदेशातील टूर्स आणि पर्यटन स्थळाला भेटी देण्याची क्रेझ वाढली आहे. तुम्ही देखील तुमच्या पत्नीला फॉरेन टूर ला घेऊन जाऊ इच्छित असाल तर तुमच्यासाठी आंनदाची बातमी आहे. कारण ही टूर परदेशात नसून भारतातच (IRCTC) असेल. पण तुम्हाला यात परदेशात फिरल्याचा आनंद मिळेल ते देखील बजेटमध्ये. चला तर मग जाणून घेऊया…

तर आम्ही बोलत आहोत IRCTC च्या अंदमान टूर बद्दल.. IRCTC च्या या पॅकेजमध्ये प्रवाशांना कोझिकोडहून अंदमानपर्यंत हवाई प्रवासाची सुविधा मिळेल. हे पॅकेज 6 रात्री आणि 7 दिवसांचा असेल. या प्रवासात पर्यटकांना पोर्ट ब्लेअर, हॅवलॉक आयलंड, नील आयलंड आणि बाराटांग फिरण्याची संधी मिळेल. या पॅकेजमध्ये हॉटेलमध्ये राहण्याची सोय, फ्लाइट तिकिटे, भोजन आणि इतर अनेक सुविधा मिळतील.

टूर पॅकेजसंबंधी माहिती (IRCTC)

पॅकेजचे नाव – Alluring Andaman Ex Kozhikode (SEA35)
टूरची कालावधी – 6 रात्री आणि 7 दिवस
तारीख – 16 मार्च, 2025
प्रवासाचा प्रकार – फ्लाइट
क्लास – कंफर्ट

किती येईल खर्च ? (IRCTC)

यात ऑक्युपंसीनुसार खर्च ठरवण्यात आला आहे.

एक व्यक्तीसाठी शुल्क – ₹75,400
दोन व्यक्तींसोबत प्रति व्यक्ति शुल्क – ₹55,300
तीन व्यक्तींसोबत प्रति व्यक्ति शुल्क – ₹53,350
बुकिंगसाठी प्रवासी IRCTC च्या अधिकृत वेबसाइट irctctourism.com वर जाऊन (IRCTC) आरक्षण करू शकतात.

न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात रोहित- शमी मुकणार?? समोर आले मोठे अपडेट्स

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) मध्ये भारतीय संघाने पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात दमदार कामगिरी केली आणि 45 चेंडू शिल्लक असताना 6 विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला दुखापतींचा सामना करावा लागला. रोहित शर्माला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती, तर मोहम्मद शामीला अँकलच्या दुखापतीमुळे त्रास होत होता. त्यांच्या फिटनेसच्या स्थितीबद्दलचे अपडेट्स क्रिकेट प्रेमींना उत्सुक करत आहेत. हे प्रश्न न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या मालिकेच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे ठरत आहेत.

सामन्यानंतर दुखापतीबद्दल खुलासा –

रोहित शर्माने सामन्यानंतर त्याच्या दुखापतीबद्दल खुलासा केला आणि सांगितले की तो सध्या पूर्णपणे ठीक आहे. त्याने स्पष्टपणे सांगितले की त्याला कोणतीही समस्या येत नाही. दुसरीकडे, श्रेयस अय्यरने पत्रकार परिषदेत शमी आणि रोहित दोघांच्या दुखापतीबद्दल अपडेट दिले आणि सांगितले की दोघेही ठीक आहेत आणि टीम इंडियासाठी कोणतीही चिंता नाही.

श्रेयस अय्यरची अपडेट –

भारताचा पुढील सामना 2 मार्च रोजी न्यूझीलंड होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाला संपूर्ण आठवडा मिळाला आहे, ज्यामुळे रोहित आणि शमीला त्यांच्या दुखापतींवर काम करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल. भारतीय फॅन्सनी या दुखापतींबाबत चिंता व्यक्त केली होती, परंतु श्रेयस अय्यरच्या अपडेटनंतर त्यांच्या चिंता दूर झाल्या आहेत.

चॅम्पियन्स ट्रॉफी –

चॅम्पियन्स ट्रॉफी (Champions Trophy 2025) ही एक महत्त्वाची आंतरराष्ट्रीय स्पर्धा असून, त्यासाठी भारतीय संघाची तयारी सुरू आहे. रोहित शर्मा आणि मोहम्मद शमी यांच्या फिटनेसचा या स्पर्धेवर परिणाम होऊ शकतो. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताला मजबूत प्रदर्शन करणे आवश्यक आहे आणि त्यासाठी सर्व खेळाडूंची फिटनेस महत्त्वाची आहे.

मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा! शेतकऱ्यांना दरवर्षी 15 हजार रुपये मिळणार

CM Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आज प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा (PM Kisan Samman Nidhi) 19 वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने वितरित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम नागपूरच्या (Nagpur) वनामती सभागृहात पार पडला. यावेळी बोलताना, इथून पुढे शेतकऱ्यांना (Farmers) दरवर्षी पंधरा हजार रुपये दिले जातील अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केली आहे. या घोषणामुळे शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे.

वनामती सभागृहात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “मी मुख्यमंत्री असताना कृषी क्षेत्रात अनेक काम केलेत. त्यात जलयुक्त शिवार, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना आणली. आता त्याचा दुसरा टप्पा सुरू होतोय, पूर्ण विदर्भ, मराठवाडा यात समाविष्ट होईल. यासाठी 6 हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत. तर दुसरीकडे कृषी प्रक्रिया उद्योग, कॅश क्रॉपसाठी मदत केली जाणार आहे. किंबहुना चांगलं काम करणाऱ्यांचा हप्ता थांबवू नका”

त्याचबरोबर, “ऍग्रीस्टॉकमुळे दलाल विरहित शेतीपर्यंत पोहोचण्याचा साधन होत आहे. आतापर्यंत 54 टक्के शेतकरी यात शामिल झाले असून पुढील काळात 100 टक्के शेतकरी यात आणायचे आहे. शेतकरी उत्पादन खर्च कमी करून शेतकऱ्यांना बाजाराशी जोडण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. गावातील सोसायटी डिजिटल केले जात आहे. त्यांना आणखी मजबूत केलं जातं आहे. शेतकऱ्यांचे वीज बिल माफ केलं असून पुढील पाच वर्ष वीज बिल येणार नाही. वैनगंगा, नळगंगा हा नदी जोड प्रकल्प सुरू होत असून यातून 7 जिल्ह्यातील 10 लाख एकर जमीन ओलिताखाली येणार आहे.” असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हणले.

Farmer Id Card: केंद्र सरकारचा निर्णय! या सरकारी योजनांसाठी डिजिटल ओळखपत्र अनिवार्य

Digital ID

Farmer Id Card| केंद्र सरकार (Central Government) देशातील शेतकऱ्यांना विविध योजना पूर्वत आहे. या योजनांचा शेतकऱ्यांना अधिक सुलभपणे लाभ घेता यावा म्हणून केंद्र सरकारने डिजिटल ओळखपत्र (Digital ID Card) शेतकऱ्यांसाठी अनिवार्य केले आहे. सरकारने ११ कोटी शेतकऱ्यांना ही ओळख प्रदान करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यामुळे शेतकऱ्यांना विविध सरकारी योजनांचा लाभ एकाच डिजिटल कार्डद्वारे घेता येणार आहे.

शेतकरी ओळखपत्र म्हणजे काय? (Farmer Id Card)

शेतकरी ओळखपत्र आधार कार्डशी जोडलेले असेल. त्यात शेतकऱ्यांची वैयक्तिक माहिती, जमीन नोंदी, पिकांची माहिती आणि शेतीशी संबंधित इतर महत्त्वाचे तपशील असतील. यामुळे किसान क्रेडिट कार्ड, पीएम किसान सन्मान निधी आणि पीक विक्रीसारख्या सेवांसाठी अर्ज करण्याच्या प्रक्रियेत सुलभता येईल. सरकारने स्पष्ट केले आहे की, शेतकरी ओळखपत्र नसल्यास अनेक योजनांचा लाभ मिळणार नाही. यामध्ये पुढील महत्त्वाच्या योजनांचा समावेश आहे.

  1. पीएम किसान सन्मान निधी – शेतकऱ्यांना या योजनेच्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळखपत्र अनिवार्य करण्यात आले आहे.
  2. पीक विमा योजना – शेतकऱ्यांना पिकाचा विमा मिळण्यासाठी हे ओळखपत्र आवश्यक असेल.
  3. किसान क्रेडिट कार्ड (KCC) आणि पीक कर्ज – शेतीसाठी कर्ज मिळवण्यासाठी शेतकरी ओळखपत्राशिवाय अर्ज करता येणार नाही.

या ओळखपत्रांचे वितरण वेगाने व्हावे म्हणून कृषी मंत्रालयाने विशेष शिबिरांचे आयोजन करण्याच्या सूचना राज्य सरकारला दिल्या आहेत. केंद्र सरकार प्रत्येक शिबिराच्या आयोजनासाठी १५,००० रुपयांपर्यंत अनुदान ठेवले आहे. प्रत्येक जारी करण्यात येणाऱ्या ओळखपत्रासाठी १० रुपये अतिरिक्त प्रोत्साहन निधी म्हणून दिले जाणार आहेत.

सध्या गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये ही योजना वेगाने राबवली जात आहे. तर इतर राज्यांमध्येही ती टप्प्याटप्प्याने लागू केली जात आहे. २०२५-२६ पर्यंत ३ कोटी आणि २०२६-२७ पर्यंत २ कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल, असा सरकारचा अंदाज आहे. दरम्यान, डिजिटल शेती व्यवस्थापन सुलभ करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. त्यामुळे अधिक शेतकऱ्यांना डिजिटल (Farmer Id Card) पद्धतीने योजनेचा लाभ घेता येणार आहे.

मोबाइल रेडिएशनमुळे कॅन्सरचा धोका वाढतो का? SAR व्हॅल्यू कशी तपासावी?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मोबाइल फोनच्या वापरामुळे डोक्याचे आजारांचा धोका वाढतो का? हा प्रश्न अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. मोबाइल फोनमधून रेडियो फ्रिक्वेन्सी रेडिएशन (RF) जारी होतात , ज्यामुळे त्याचा वापर करणाऱ्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो की नाही, यावर अनेक संशोधने झाली आहेत. तर चला या लेखात मोबाइल रेडिएशनच्या परिणामांचा आढावा घेऊयात.

मोबाइल रेडिएशनचे परिणाम –

मोबाइल फोनच्या रेडिएशनमुळे कॅन्सर होतो का, यावर अनेकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत. विश्व आरोग्य संघटना (WHO) आणि आंतरराष्ट्रीय कॅन्सर संशोधन संस्था (IARC) यांनी यावर संशोधन केले आहे. त्यानुसार, मोबाइल फोनच्या रेडिएशनमुळे कॅन्सर होत नाही, असे सांगण्यात आले आहे.

SAR व्हॅल्यू काय आहे आणि ती कशी तपासावी?

मोबाइल फोनच्या रेडिएशनची पातळी त्याच्या SAR (Specific Absorption Rate) व्हॅल्यूमध्ये मोजली जाते. ही पातळी जितकी कमी, तितके फोन वापरणे सुरक्षित असते . आपल्या फोनची SAR व्हॅल्यू तपासण्यासाठी फोनच्या सेटिंग्जमध्ये जाऊन “About Phone” किंवा “Device Information” विभागात जावे. तिथे फोनच्या तांत्रिक तपशीलांमध्ये SAR व्हॅल्यू दिलेली असते.

आरोग्याच्या दृष्टीने फोनचा वापर –

मोबाइल रेडिएशनमुळे डोक्याच्या आजारांचा संबंध सिद्ध झालेला नाही, मात्र फोनचा वापर योग्य प्रमाणात करणे आवश्यक आहे. फोनची SAR व्हॅल्यू तपासून त्याचा वापर सुरक्षितपणे करणे महत्त्वाचे आहे. यासोबतच, निद्रा आणि मानसिक आरोग्याच्या दृष्टीने फोनचा वापर मर्यादित ठेवणे गरजेचे आहे.

माथेरान-महाबळेश्वरला फिरायला निघालात? तर पहिल्यांदा ही बातमी वाचाच

Matheran-Mahabaleshwar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्या राज्यातील बहुतांश ठिकाणी उन्हाचा तडाखा वाढत आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, दक्षिण भारतातील केरळ आणि तामिळनाडूतही उष्णतेची तीव्रता वाढली आहे. (Weather Update) यासह महाराष्ट्रातही उन्हाचा जोर वाढत असून याची झळ विदर्भ, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी लागत आहे. इतकेच नव्हे तर, थंड हवेची ठिकाणे असलेली महाबळेश्वर (Mahabaleshwar) आणि माथेरान (Matheran) येथे देखील उन्हाचा पारा वाढला आहे.

राज्यात सर्वाधिक उष्णता विदर्भात जाणवत असली तरी कोकणातील रत्नागिरीमध्ये तापमानाने उच्चांकी स्तर गाठला आहे. येथे तब्बल 38.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलं आहे. यामुळे कोकण किनारपट्टीसह मुंबई आणि उपनगरांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर, महाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणीही तापमान झपाट्याने वाढत आहे.

आताच्या घडीला माथेरानमध्ये 36 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. त्याचबरोबर , महाबळेश्वर सारख्या प्रसिद्ध थंड हवेच्या ठिकाणीही दुपारच्या वेळी तापमान 32 अंशांपर्यंत पोहोचत आहे. परिणामी, उन्हापासून सुटका मिळवण्यासाठी या ठिकाणी जाणाऱ्या पर्यटकांनाही उष्णतेचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे तुम्ही जर या दोन्ही ठिकाणी जाण्याचा विचार करत असाल तर तो विचार आताच थांबवा.

तर दुसऱ्या बाजूला, मुंबईत गेल्या काही दिवसांपासून उष्णतेची तीव्रता वाढली आहे. समुद्रकिनाऱ्यालगत आर्द्रतेच्या प्रमाणात वाढ झाल्याने नागरीकांना उष्णतेचा अधिक त्रास जाणवत आहे. आता येत्या काही दिवसांत तापमानाचा पारा आणखी चढणार असल्यामुळे नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घेण्याचा सल्ला हवामान विभागाने दिला आहे.

कोकणाला गारपीटीचा तडाखा

दरम्यान, एकीकडे महाराष्ट्रात उन्हाचा कडाका जाणवत असताना कोकणातील बागायतदारांना गारपीटीचा सामना करावा लागतो आहे. अचानक झालेल्या गारपिटीमुळे आंबा आणि काजू बागायतीचं मोठं नुकसान झालं आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आता गारपीटीचं प्रमाण कमी झालं असलं तरी दमट हवामानामुळे उष्णतेचा त्रास अधिक जाणवणार आहे.