Tuesday, December 16, 2025
Home Blog Page 204

पुणेकरांसाठी GoodNews ! ‘या’ दोन शहरासाठी सुरू होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन

pune railway

मुंबईनंतर राज्यातील मोठे शहर म्हणून पुणे शहराचं नाव येते. येथे नोकरी आणि शिक्षणाच्या निमित्ताने अनेक लोक ये -जा करीत असतात. बाहेरील भागातून पुण्यात ये- जा करण्यासाठी रेल्वे महत्वाच्या साधनांपैकी एक आहे. होळीच्या सणानिमित्त, पुणे शहरातून दोन नवीन विशेष एक्सप्रेस गाड्या सुरू होणार आहेत. या गाड्या पुणे ते दानापूर आणि पुणे ते मालदा टाउन या मार्गांवर धावणार आहेत. यामुळे सणाच्या काळात होणारी गर्दी कमी होईल आणि पुण्याहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल.

पुणे-दानापूर स्पेशल ट्रेन

प्रवास सुरु होईल: 11 मार्च 2025 रोजी पुणे रेल्वे स्थानकावरून, ट्रेन क्रमांक 01419 रात्री 19:55 वाजता.
दानापूर पोहोचेल: 13 मार्च 2025 रोजी, सकाळी 04:30 वाजता.
परतीचा प्रवास: 13 मार्च 2025 रोजी, ट्रेन क्रमांक 01420 दानापूर येथून सकाळी 06:30 वाजता सुटेल.
पुण्यात परत येईल: 14 मार्च 2025 रोजी, 17:35 वाजता पुणे रेल्वे स्थानकावर.

ही विशेष गाडी सणाच्या काळात होणारी गर्दी कमी करण्यासाठी खूप महत्त्वाची ठरेल.

पुणे-मालदा टाउन स्पेशल ट्रेन

प्रवास सुरु होईल: 23 मार्च 2025 रोजी पुणे रेल्वे स्थानकावरून, ट्रेन क्रमांक 03426 रात्री 22:00 वाजता.
मालदा टाउन पोहोचेल: 25 मार्च 2025 रोजी, दुपारी 16:30 वाजता.
परतीचा प्रवास: 21 मार्च 2025 रोजी, ट्रेन क्रमांक 03425 मालदा टाउन येथून सायं 17:30 वाजता सुटेल.
पुण्यात परत येईल: 23 मार्च 2025 रोजी, सकाळी 11:35 वाजता पुणे रेल्वे स्थानकावर.

या विशेष गाड्यांमुळे पुण्याहून या मार्गावर प्रवास करणाऱ्या लोकांना होळीच्या सणाच्या काळात अधिक सोयीस्कर प्रवास करण्याची संधी मिळणार आहे.

CNG अन् LPG वाहने महागणार! सरकारचा मोठा निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्राचा अर्थसंकल्प मांडण्यात आला. त्यात निर्मला सीतारामन यांनी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. अन आता उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्याचा अर्थसंकल्प (Budget) मांडला असून, यामध्ये विविध क्षेत्रासाठी वेगवेगळे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये CNG आणि LPG व्यक्तिगत मालकीच्या परिवहनेतर चारचाकी वाहनांवरील करात 1 % ची वाढ करणार असल्याचे सांगितले आहे. सध्याच्या घडीला वाहनाच्या प्रकारावरून अन किमतीनुसार 7 ते 9% दराने मोटार वाहन कर आकारतात, पण आता या करात 1 टक्क्याने वाढ होणार आहे. यामुळे कार खरेदी करणे महाग होणार आहे. यामुळे राज्याला तब्बल 150 कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. या निर्णयानुसार 1 एप्रिलपासून या करात 1 टक्क्याची वाढ लागू होणार आहे.

इलेक्ट्रिक वाहने –

याशिवाय, 30 लाखांपेक्षा जास्त किमतीच्या इलेक्ट्रिक वाहनांवर 6 टक्के दराने मोटार वाहन कर आकारण्याचा प्रस्ताव देखील ठेवला गेला आहे. या प्रकरणी, मोटार वाहन कराची कमाल मर्यादा 20 लाख रुपये वरून 30 लाख रुपये केली आहे.

विशिष्ट वाहनांवरील कर –

बांधकाम क्षेत्रातील वाहने जसे की क्रेन्स, कॉम्प्रेसर, प्रोजेक्टर व एक्सकॅव्हेटर यांच्यावर 7 टक्क्यांच्या दराने एकरकमी कर आकारला जाईल. हा कर 1 एप्रिलपासून लागू होईल.

आर्थिक सुधारणांची दिशा –

राज्य सरकारने आर्थिक सुधारणांच्या माध्यमातून भांडवली खर्चात वाढ करून विकास चक्रास चालना देण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. यामुळे राज्याच्या विकास दरात वाढ होईल आणि विविध पायाभूत सुविधांच्या कामामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला उंचीवर नेण्यात मदत होईल.

मुंबई महानगर प्रदेशाची आर्थिक वाढ –

मुंबई महानगर प्रदेशाची अर्थव्यवस्था 140 बिलीयन डॉलर वरून 2030 पर्यंत 300 बिलीयन डॉलर, तर 2047 पर्यंत 1.5 ट्रिलियन डॉलरपर्यंत वाढवण्याचे उद्दीष्ट आहे. वाढवण बंदर, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, बुलेट ट्रेन, मल्टीमोडल कॉरीडॉर, भुयारी मार्ग आणि मेट्रो प्रकल्प यामुळे मुंबई क्षेत्र विकासाचे केंद्र ठरणार आहे.

नवीन औद्योगिक धोरण आणि गुंतवणूक –

‘मेक इन महाराष्ट्र’ या संकल्पनेच्या माध्यमातून राज्याने नवीन औद्योगिक धोरण तयार केले आहे, ज्याद्वारे आगामी पाच वर्षांत 40 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि 50 लाख रोजगार निर्माण करण्याचे लक्ष्य आहे.

आर्थिक वर्षासाठी कर महसूलाचे उद्दिष्ट –

2024-25 आर्थिक वर्षाचे प्रारंभिक कर महसुलाचे उद्दिष्ट – 3 ,43 ,40 कोटी रुपये होते.
2024-25 साठी सुधारित कर महसुलाचा अंदाज – 3,67,467 कोटी रुपये आहे.
2025-26 आर्थिक वर्षासाठी कर महसूलाचे उद्दिष्ट – 3,87,674 कोटी रुपये आहे.

बलात्काऱ्यांना नपुंसक करा; भाजप नेत्याचं विधान, शिवरायांचा दिला दाखला

Haribhau Bagde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्या महाराष्ट्र आणि इतर राज्यांमध्ये देखील महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत चालल्या आहेत. मात्र तरीदेखील सरकारकडून कोणतेही ठोस पाऊल उचलण्यात आलेले नाही. या पार्श्वभूमीवर राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे (Haribhau Bagade) यांनी एक मोठे विधान केले आहे. त्यांनी, “महिलांना छेडणाऱ्यांना बदडून काढा आणि बलात्कार करणाऱ्यांना नपुंसक करा. तेव्हा कुठे असे गुन्हे कमी होतील” असे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या याच वक्तव्याचे राज्यभरात चर्चा सुरू झाली आहे.

सोमवारी भरतपूर जिल्हा बार असोसिएशनच्या शपथ ग्रहण समारंभात हरिभाऊ बागडे उपस्थित राहिले होते. यावेळी बोलताना, “आमच्याकडे (महाराष्ट्रात) जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य होते, तेव्हा गावच्या एका पाटलाने बलात्कार केला. यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचे हात-पाय तोडण्याचे आदेश दिले होते.” असे त्यांनी म्हणले.

त्याचबरोबर, “लोक महिलांवरील अत्याचाराचे व्हिडिओ तयार करतात. हे बरे नाही. एखाद्या महिलेसोबत छेडछाड झाली, तर त्या माणसाला पकडा, आपल्यासोबत आणखी दोन-चार लोक येतील. जोवर, आपण घटनास्थळी जाऊन छेडछाड, बलात्कार करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना रोखावे आणि बदडून काढावे, अशी आपली मानसिकता होणार नाही, तोवर हे गुन्हे थांबणार नाहीत.” असेही त्यांनी सांगितले.

इतकेच नव्हे तर, “गुन्हेगारांना कायद्याची भीती वाटते की नाही, हे माहित नाही. मात्र, जर १२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलाचा-मुलीचा कुणी विनयभंग केला, बलात्कार केला तर त्याला फाशीची शिक्षा आहे. तरीही असे गुन्हे थांबत नाहीत. असे प्रकार दररोज ऐकायला मिळतात. यावरून, गुन्हेगारांना कायद्याची भीती राहिलेली नाही, असे दिसते. कायद्याची भीती वाटावी, यासाठी काय करायला हवे, आपण विचार करू शकता? कायदे अस्तित्वात असूनही अशा घटना का घडत आहेत, याबद्दल आपण सूचना देऊ शकता? यावर विचार व्हायला हवा,” असे वक्तव्य या कार्यक्रमांमध्ये हरिभाऊ बागडे यांनी केले आहे.

दरम्यान, राज्यामध्ये दिवसेंदिवस महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत चालली आहे. त्यामुळे राज्यात महिला सुरक्षित आहेत का नाहीत याबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या मुद्द्याला धरूनच विरोधक सरकारवर जोरदार टीका करत आहेत. तर दुसऱ्या बाजूला बलात्कार करणाऱ्यांविरोधात कठोर कायदा करण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे.

Anandacha Shidha: अखेर आनंदाचा शिधा योजना बंद!! फडणवीसांचा जनतेला झटका

Anandacha Shidha

Anandacha Shidha| राज्यातील गोरगरीब जनतेसाठी राज्य सरकारकडून “आनंद शिधा योजना” राबविण्यात येत होती. मात्र आता ही योजना बंद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ही योजना बंद केल्यामुळे लाखो लाभार्थी नाराज झाले आहेत. तसेच आता राज्य सरकारवर विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे. कारण की या योजनेचा लाभ राज्यातील तब्बल एक कोटी पेक्षा अधिक लोक घेत होते.

काय होती योजना? (Anandacha Shidha)

माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत दसरा, दिवाळी, गुढीपाडवा आणि आंबेडकर जयंती या सणांच्या निमित्ताने 100 रुपयांत गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचा किट पुरवला जात होता. यात एक किलो रवा, एक किलो साखर, एक किलो चना डाळ आणि एक लिटर पामतेल समाविष्ट होते. राज्यातील 1 कोटी 63 लाख लोकांना या योजनेचा लाभ मिळत होता. मात्र, नवीन सरकारच्या अर्थसंकल्पात या योजनेसाठी कोणतेही आर्थिक वाटप न केल्याने ती अखेर बंद करण्यात आली आहे.

लाडकी बहीण योजनेचा परिणाम

अद्याप ही योजना का बंद करण्यात आली याबाबत राज्य सरकारने अधिकृतरीत्या कोणतंही कारण दिलेलं नाही. पण आर्थिक परिस्थितीचा परिणाम म्हणून हा निर्णय घेतल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुसऱ्या बाजूला ‘लाडकी बहीण योजना’ राबवण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी वाटप करण्यात आल्याने इतर काही योजनांवर आर्थिक गंडांतर आल्याची चर्चा आहे. त्यामुळेच आनंदाचा शिधा योजनेसाठी निधी उपलब्ध करणे सरकारला शक्य झाले नसावे, असा अंदाज वर्तवला जात आहे.

विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल

राज्य सरकारच्या या निर्णयावरून विरोधकांनी जोरदार टीका सुरू केली आहे. काँग्रेस नेते भाई जगताप यांनी सरकारवर आरोप करत म्हटलं की, “निवडणुकीपूर्वी गरिबांना मदतीचं गाजर दाखवून मतं मिळवण्याचं काम झालं आणि आता योजना बंद करून त्यांची फसवणूक केली जात आहे.” याआधीही शिवभोजन थाळी योजनेवरही गदा आणण्यात आली होती, असे त्यांनी म्हणले.

दरम्यान, अनेक गोरगरीब नागरिकांना आनंद शिधा योजना (Anandacha Shidha) फायदेशीर ठरत होते. परंतु सध्याच्या घडीला राज्यात लाडक्या बहिणी योजनेसाठी अधिक निधी खर्च केला जात आहे. तसेच इतर काही योजनांमुळे देखील सरकारच्या तिजोरीवर याचा भार पडत आहे. परिणामी सरकार अनेक योजना बंद करण्याच्या मार्गावर असल्याचे म्हटले जात आहे. इतकेच तवेदार थोड्या दिवसांनी लाडकी बहीण योजना देखील बंद केली जाईल अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे.

सिंधुदुर्गच्या समुद्रात सापडला नवा तेलसाठा; उत्पादन 4 पटीने वाढणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील कोकण क्षेत्रासाठी एक आनंदाची बातमी आहे. तळ कोकणाजवळील अरबी समुद्रात नवे खनिज तेल साठे सापडल्याची माहिती मिळाली आहे. कोकणातील पालघर अन सिंधुदुर्गमध्ये हे मोठे तेल साठे सापडले असल्यामुळे भारतातील तेल साठा अजून भक्कम होण्यास मदत मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार लवकरच केंद्रीय तेल उत्पादन कंपन्या संशोधन करून या ठिकाणावरील उत्खनन करणार आहेत. अन आता सापडलेल्या या तेल साठ्यामुळे भारतातील तेल उत्पादन चार पटीने वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर चला याबदल अधिक माहिती जाणून घेऊयात.

कोकणात सापडले नवीन तेलसाठे –

पालघर अन सिंधुदुर्गच्या समुद्राच्या खोल पाण्यात सुमारे 18 हजार चौरस किमी क्षेत्रफळात हे तेलसाठे शोधले गेले आहेत. बॉम्बेहाय नावाने ओळखला जाणारा साठा 1974 मध्ये मुंबईच्या समुद्रात सापडला , हा तेल साठा आजही उत्खननासाठी महत्त्वाचा आहे, आणि त्यानंतर 2017 मध्ये देखील तेल साठे सापडले होते. मात्र या वेळीस सापडलेला हा मोठा तेल साठा इतर साठ्यांच्या तुलनेत जास्त मोठा असल्याचे दिसून येते.

तेल उत्पादन चार पटीने वाढणार ? –

आता सापडलेल्या या तेल साठ्यामुळे भारतातील तेल उत्पादन चार पटीने वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या संशोधन व उत्खनन कार्याला गती देण्यासाठी केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. या नवीन साठयामुळे अर्थव्यवस्थेला साहाय्य होण्यास मदत होणार आहे.

उद्योग क्षेत्राला नवी दिशा मिळणार –

डहाणूच्या समुद्रात 5, 338.. 03 आणि व तळ कोकणात सिंधुदुर्गजवळील समुद्रात 19 हजार 131.72 चौरस किमी क्षेत्रफळावर हे तेलसाठे आहेत. या नव्या तेल विहिरींच्या उत्खननामुळे कोकणातील उद्योग क्षेत्राला नवी दिशा मिळणार आहे. तसेच महाराष्ट्रात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत. भारताची तेल उत्पादन क्षमता देखील वाढणार आहे. कोकणातील डहाणू आणि मालवण या ठिकाणी तेल विहिरींचे उत्खनन सुरू होईल, जे स्थानिक उद्योगांना चालना देईल आणि रोजगाराच्या अनेक संधी निर्माण करतील. यामुळे महाराष्ट्रातील विकास प्रक्रियेला नवी दिशा मिळणार आहे. अन आशा आहे की, हे नवे तेल साठे भारताला तेल उत्पादनात आत्मनिर्भर बनवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतील.

Gold Rate Today : मागील 3 दिवसांच्या घसरणीनंतर आज काय आहे सोने दराची स्थती ? जाणून घ्या

golda rate today

Gold Rate Today : मागच्या 2-3 दिवसात सोन्याच्या दरात झालेल्या घसरणीनंतर आज मंगळवार दिनांक 11 मार्च रोजी सोन्याच्या दरामध्ये वाढ झालेली दिसून येत आहे. देशातील मोठ्या शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव 87,800 रुपयांच्या जवळपास आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 80 हजार 500 रुपयांवर आहे. चांदीच्या दराबद्दल सांगायचं झाल्यास एक किलोग्रॅम चांदीचा दर 98 हजार 900 रुपयांवर जाऊन (Gold Rate Today) पोहोचला आहे.

चांदी दर (Gold Rate Today)

11 मार्च 2025 रोजी चांदीचा दर प्रति किलोग्राम 98 हजार 900 रुपये इतका आहे. चांदीच्या भावामध्ये कालच्या तुलनेत आज दोनशे रुपयांची घसरण झाली आहे.

देशातील दोन मोठी शहरे दिल्ली आणि मुंबईमध्ये सोन्याचे काय दर आहेत ? पाहुयात… 11 मार्च 2025 रोजी दिल्लीमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 80,660 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 87 हजार 980 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे. तर मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव 80,510 आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 87,830 रुपये प्रति दहा ग्रॅम वर सुरू आहे.

सोन्याच्या दरात वाढ (Gold Rate Today)

सोन्याच्या दराच्या वाढीमागे गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तींची सतर्कता आणि जागतिक आर्थिक स्थिती हे कारण असल्याचा तज्ञांकडून सांगण्यात येत आहे. खास करून अमेरिकेमध्ये टॅक्स नियमामध्ये बदल करून आणि रोजगार सोबत जोडलेल्या काही गोष्टींमुळे बाजारात अनिश्चितता असल्याचे सांगितलं जात आहे. सोनं म्हणजे एक इफेक्टिव्ह आणि सेफ इन्व्हेस्टमेंट म्हणून लोक सोन्यामध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक करत आहेत आणि हेच मोठं कारण सोनं (Gold Rate Today) महाग असल्याचं मानलं जात आहे.

महाराष्ट्रात समुद्रात बांधले जाणार पहिले विमानतळ; अजित पवारांची घोषणा

airport in sea

राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी 2025-26 चा अर्थसंकल्प सादर करताना सोमवारी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. यामध्ये महाराष्ट्रात तिसऱ्या विमानतळाच्या उभारणीचा समावेश आहे. पालघर जिल्ह्यातील वाढवणजवळ समुद्रात कृत्रिम बेट तयार करून त्या ठिकाणी विमानतळ उभारण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. हा प्रस्ताव सध्या केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे, आणि जर तो मंजूर झाला तर हे विमानतळ समुद्रात बांधले जाणारे महाराष्ट्रातील पहिले विमानतळ ठरेल.

याशिवाय, अजित पवार यांनी ठाणे ते मुंबई-नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मध्यवर्ती मार्गाचे उन्नतीकरण करण्याची घोषणा केली. यामुळे ठाणे, डोंबिवली, कल्याण आणि आसपासच्या शहरांना आंतरराष्ट्रीय विमानतळाशी जोडण्याचा मार्ग खुला होईल.नवी मुंबई विमानतळावरील विस्ताराच्या योजनेत VVIP प्रवाशांसाठी खास टर्मिनलची उभारणी करण्यात येणार आहे. 2030 पर्यंत या टर्मिनलचे काम पूर्ण होईल, आणि हा टर्मिनल उच्चप्रोफाईल व्यक्तींंसाठी, जसे की अभिनेते, उद्योगपती आणि महत्त्वाच्या राजकीय नेत्यांसाठी बनवला जाणार आहे.

छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक

सोमवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पीय भाषणात अजित पवार यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याच्या रक्षणासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी प्रचंड शौर्य आणि धैर्य दाखवले. संगमेश्वर येथील युद्धामुळे याठिकाणाचे महत्त्व विशेष आहे, कारण येथे आणि याच्या आसपासच्या प्रदेशात संभाजी महाराजांनी आपल्या महाकाय शत्रूंसोबत युद्ध केले आणि स्वराज्याच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती दिली. त्या ऐतिहासिक पराक्रमाची स्मृती कायम ठेवण्यासाठी संगमेश्वरमध्ये त्यांचे भव्य स्मारक उभारले जाईल.

याशिवाय, छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने पुरस्कार देण्याची घोषणा केली गेली आहे. “छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत” पुरस्कार दरवर्षी दिला जाईल. तुळापूर आणि वढु बुद्रुक येथील महाराजांचे बलिदानस्थळे आणि समाधीस्थळे याठिकाणी देखील स्मारक उभारण्याचे काम सुरु आहे.

Konkan Railways: ‘होळी’ निम्मित कोकणासाठी विशेष 34 रेल्वे गाड्या; वेळापत्रक पाहा

Konkan Railways

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Konkan Railways – रेलवे प्रशासन नेहमीच प्रवाशांच्या सोयीसाठी अन सणाच्या पार्श्वभूमीवर विशेष सेवा पुरवत असते. होळीच्या अन शिमग्याच्या सणानिमित्य अधिक 34 विशेष गाड्या धावणार असल्याचे रेल्वेने सांगितले आहे. त्यामुळे लाखो प्रवाशांना मोठी खुशखबर मिळाली आहे. या गाड्या एलटीटी, पनवेल आणि इतर ठिकाणांहून कोकण आणि इतर मार्गांवर धावणार आहेत. या निर्णयामुळे प्रवाशांचा प्रवास अत्यंत सुलभ अन आरामदायी होण्यास मदत होईल. तर या विशेष रेल्वे (Konkan Railways) गाड्या कधी पासून धावणार , त्या कुठल्या ठिकाणाहून सुटणार हे सर्व जाणून घेऊयात , आजच्या बातमीत .

प्रवासासाठी विशेष रेल्वे गाड्या धावणार (Konkan Railways) –

नागरिकांना मुंबईतून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस अन पनवेलहून विशेष सेवा प्रदान केली जाणार आहे. यासाठी मध्य रेल्वेने (Konkan Railways) हि सेवा 10 ते 25 मार्च या कालावधीत देणार असल्याचेही सांगितले आहे. यासोबतच कोकणासाठी एलटीटी-मडगाव 17 व 23 मार्चला विशेष गाड्या धावणार आहेत. पनवेल-मडगाव 15 व 22 मार्चला सुटेल आणि पनवेल-चिपळूण मेमू अशा 8 फेऱ्या हि रेल्वे 13 ते 16 मार्चपर्यंत करणार आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळालाय. त्याचप्रमाणे, पुणे-दानापूर-पुणे , मुंबई-बनारस, मऊ, दानापूर, मडगाव, पुणे-हिसार, दानापूर, मालदा टाउन आणि कलबुर्गी-बेंगळुरू मार्गांवरही विशेष रेल्वे धावणार आहेत.

एसटी महामंडळाची मोठी घोषणा –

रेल्वेसोबत आता जे लोक एसटी महामंडळाच्या गाड्यांनी प्रवास करतात , त्यांच्यासाठीही महामंडळाने कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी अधिक 195 एसटी गाड्या चालणार असल्याची घोषणा केली आहे. 17 मार्चपर्यंत या विशेष गाड्या मुंबई, ठाणे, अन पालघर जिल्ह्यातून कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील विविध बस स्थानकावरून धावणार आहेत . यासोबतच गुहागर, चिपळूण, खेड, कणकवली, रत्नागिरी, गणपतीपुळे अशा ठिकाणी अधिक गाड्याचे आयोजन करण्यात आले आहे. सणाच्या आनंदात प्रवास करत असताना, या विशेष गाड्या आणि एसटी सेवांमुळे प्रवाशांना आरामदायक आणि सोयीस्कर यात्रा अनुभवता येईल.

प्रवाशांसाठी महत्त्वाची सुविधा –

उन्हाळ्यातील प्रचंड गर्दी आणि प्रवासाच्या त्रासावर मात केली जाऊ शकेल. मध्य रेल्वेने (Konkan Railways) या विशेष रेल्वे सेवा सुरू करण्याचा निर्णय घेऊन, राज्यातील पर्यटक आणि स्थानिक प्रवाशांसाठी महत्त्वाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यातून कोकण आणि इतर भागांतील संपर्क वाढवण्यात मदत होईल आणि पर्यटन क्षेत्रातही प्रगती होणार आहे.

छावाचा बजेटवरही प्रभाव ? ‘या’ ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार

sambhaji maharaj

महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याची दखल घेऊन एक ऐतिहासिक घोषणा करण्यात आली आहे. छावा चित्रपटामुळे छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जनतेपर्यंत पोहोचला असून, त्याचा मोठा प्रभाव आता राज्यभर दिसून येत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यस्थळावर भव्य स्मारक उभारण्याची घोषणा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी केली.

सोमवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पीय भाषणात अजित पवार यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याच्या रक्षणासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी प्रचंड शौर्य आणि धैर्य दाखवले. संगमेश्वर येथील युद्धामुळे याठिकाणाचे महत्त्व विशेष आहे, कारण येथे आणि याच्या आसपासच्या प्रदेशात संभाजी महाराजांनी आपल्या महाकाय शत्रूंसोबत युद्ध केले आणि स्वराज्याच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती दिली. त्या ऐतिहासिक पराक्रमाची स्मृती कायम ठेवण्यासाठी संगमेश्वरमध्ये त्यांचे भव्य स्मारक उभारले जाईल.

याशिवाय, छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने पुरस्कार देण्याची घोषणा केली गेली आहे. “छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत” पुरस्कार दरवर्षी दिला जाईल. तुळापूर आणि वढु बुद्रुक येथील महाराजांचे बलिदानस्थळे आणि समाधीस्थळे याठिकाणी देखील स्मारक उभारण्याचे काम सुरु आहे.

मराठी भाषेच्या सन्मानासाठी ऐतिहासिक निर्णय

आजीत पवार यांनी यावेळी आणखी एक महत्त्वाची घोषणा केली. 3 ऑक्टोबर या दिवशी अभिजात मराठी भाषा सन्मान दिन म्हणून साजरा करण्यात येईल, आणि याच दिवशी 3 ते 9 ऑक्टोबर दरम्यान अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा केला जाईल. महाराष्ट्र सरकारने या दिवसाला अधिकृतपणे सन्मान दिला आहे. यासोबतच, मराठी भाषा संशोधन व अध्ययनासाठी उच्च दर्जाचे संशोधन केंद्र आणि अनुवाद अकादमी स्थापन केली जाणार आहे.

अशाप्रकारे, अर्थसंकल्पामध्ये राज्य सरकारने छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाची आणि मराठी भाषेच्या अभिजात दर्जाची मोठी दखल घेतली आहे.

सर्वांकरिता घरे ! नवीन गृहनिर्माण धोरणाची लवकरच होणार घोषणा

housing

महाराष्ट्र राज्य सरकारने आपल्या आगामी अर्थसंकल्पात गृहनिर्माणाच्या क्षेत्रात मोठे बदल आणि सुधारणा जाहीर केली आहेत. “सर्वांसाठी घरे” या उद्दीष्टाच्या अंमलबजावणीसाठी राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. या धोरणानुसार, घरकुलांच्या बांधकामात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर, हरित इमारती आणि सौर ऊर्जा प्रणालींचा समावेश करण्यात येणार आहे.

44 लाख 7 हजार घरकुल मंजूर

आता, राज्यात विविध केंद्र पुरस्कृत आणि राज्यस्तरीय गृहनिर्माण योजनांची अंमलबजावणी केली जात आहे. यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) चा समावेश आहे, ज्याअंतर्गत आतापर्यंत एकूण 44 लाख 7 हजार घरकुल मंजूर केली गेली आहेत. या योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्र देशभरात प्रथम क्रमांकावर आहे.

अनुदानात 50 हजार रुपयांची वाढ

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण (पं.आ.व.य.ग्रामीण) टप्पा-2 अंतर्गत 2024-25 मध्ये 20 लाख घरकुलांची उद्दीष्ट आहे, ज्यापैकी 18 लाख 38 हजार घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. याअंतर्गत 14 लाख 71 हजार लाभार्थींना 2 हजार 200 कोटी रुपये वितरित केले गेले आहेत. या योजनेच्या अनुदानात लोकप्रतिनिधी आणि लाभार्थींच्या मागणीला प्रतिसाद म्हणून 50 हजार रुपयांची वाढ करण्यात येणार आहे.

शहरी भागातील प्रधानमंत्री आवास योजना 1 अंतर्गत 4 लाख 42 हजार 748 घरकुल मंजूर केली गेली आहेत, ज्यापैकी 2 लाख 8 हजार 304 घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. उर्वरित घरकुलांचे बांधकाम 31 डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण होईल. याशिवाय, प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0 अंतर्गत पुढील पाच वर्षांसाठी 5 लाख घरकुलांचा उद्दीष्ट असून त्यासाठी 8 हजार 100 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करणे अपेक्षित आहे. सर्व घरकुलांच्या छतावर सौर ऊर्जा संच बसविण्याची योजना आहे, ज्यामुळे पर्यावरणास मदत होईल.

अशाप्रकारे, राज्य सरकारचे गृहनिर्माण धोरण नव्या तंत्रज्ञानाचा वापर करत, सर्वांसाठी घरे मिळवून देण्याच्या उद्दीष्टाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊले उचलत आहे.