Tuesday, December 16, 2025
Home Blog Page 205

महाराष्ट्रात समुद्रात बांधले जाणार पहिले विमानतळ; अजित पवारांची घोषणा

airport in sea

राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी 2025-26 चा अर्थसंकल्प सादर करताना सोमवारी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. यामध्ये महाराष्ट्रात तिसऱ्या विमानतळाच्या उभारणीचा समावेश आहे. पालघर जिल्ह्यातील वाढवणजवळ समुद्रात कृत्रिम बेट तयार करून त्या ठिकाणी विमानतळ उभारण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. हा प्रस्ताव सध्या केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे, आणि जर तो मंजूर झाला तर हे विमानतळ समुद्रात बांधले जाणारे महाराष्ट्रातील पहिले विमानतळ ठरेल.

याशिवाय, अजित पवार यांनी ठाणे ते मुंबई-नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मध्यवर्ती मार्गाचे उन्नतीकरण करण्याची घोषणा केली. यामुळे ठाणे, डोंबिवली, कल्याण आणि आसपासच्या शहरांना आंतरराष्ट्रीय विमानतळाशी जोडण्याचा मार्ग खुला होईल.नवी मुंबई विमानतळावरील विस्ताराच्या योजनेत VVIP प्रवाशांसाठी खास टर्मिनलची उभारणी करण्यात येणार आहे. 2030 पर्यंत या टर्मिनलचे काम पूर्ण होईल, आणि हा टर्मिनल उच्चप्रोफाईल व्यक्तींंसाठी, जसे की अभिनेते, उद्योगपती आणि महत्त्वाच्या राजकीय नेत्यांसाठी बनवला जाणार आहे.

छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक

सोमवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पीय भाषणात अजित पवार यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याच्या रक्षणासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी प्रचंड शौर्य आणि धैर्य दाखवले. संगमेश्वर येथील युद्धामुळे याठिकाणाचे महत्त्व विशेष आहे, कारण येथे आणि याच्या आसपासच्या प्रदेशात संभाजी महाराजांनी आपल्या महाकाय शत्रूंसोबत युद्ध केले आणि स्वराज्याच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती दिली. त्या ऐतिहासिक पराक्रमाची स्मृती कायम ठेवण्यासाठी संगमेश्वरमध्ये त्यांचे भव्य स्मारक उभारले जाईल.

याशिवाय, छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने पुरस्कार देण्याची घोषणा केली गेली आहे. “छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत” पुरस्कार दरवर्षी दिला जाईल. तुळापूर आणि वढु बुद्रुक येथील महाराजांचे बलिदानस्थळे आणि समाधीस्थळे याठिकाणी देखील स्मारक उभारण्याचे काम सुरु आहे.

Konkan Railways: ‘होळी’ निम्मित कोकणासाठी विशेष 34 रेल्वे गाड्या; वेळापत्रक पाहा

Konkan Railways

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Konkan Railways – रेलवे प्रशासन नेहमीच प्रवाशांच्या सोयीसाठी अन सणाच्या पार्श्वभूमीवर विशेष सेवा पुरवत असते. होळीच्या अन शिमग्याच्या सणानिमित्य अधिक 34 विशेष गाड्या धावणार असल्याचे रेल्वेने सांगितले आहे. त्यामुळे लाखो प्रवाशांना मोठी खुशखबर मिळाली आहे. या गाड्या एलटीटी, पनवेल आणि इतर ठिकाणांहून कोकण आणि इतर मार्गांवर धावणार आहेत. या निर्णयामुळे प्रवाशांचा प्रवास अत्यंत सुलभ अन आरामदायी होण्यास मदत होईल. तर या विशेष रेल्वे (Konkan Railways) गाड्या कधी पासून धावणार , त्या कुठल्या ठिकाणाहून सुटणार हे सर्व जाणून घेऊयात , आजच्या बातमीत .

प्रवासासाठी विशेष रेल्वे गाड्या धावणार (Konkan Railways) –

नागरिकांना मुंबईतून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस अन पनवेलहून विशेष सेवा प्रदान केली जाणार आहे. यासाठी मध्य रेल्वेने (Konkan Railways) हि सेवा 10 ते 25 मार्च या कालावधीत देणार असल्याचेही सांगितले आहे. यासोबतच कोकणासाठी एलटीटी-मडगाव 17 व 23 मार्चला विशेष गाड्या धावणार आहेत. पनवेल-मडगाव 15 व 22 मार्चला सुटेल आणि पनवेल-चिपळूण मेमू अशा 8 फेऱ्या हि रेल्वे 13 ते 16 मार्चपर्यंत करणार आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळालाय. त्याचप्रमाणे, पुणे-दानापूर-पुणे , मुंबई-बनारस, मऊ, दानापूर, मडगाव, पुणे-हिसार, दानापूर, मालदा टाउन आणि कलबुर्गी-बेंगळुरू मार्गांवरही विशेष रेल्वे धावणार आहेत.

एसटी महामंडळाची मोठी घोषणा –

रेल्वेसोबत आता जे लोक एसटी महामंडळाच्या गाड्यांनी प्रवास करतात , त्यांच्यासाठीही महामंडळाने कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी अधिक 195 एसटी गाड्या चालणार असल्याची घोषणा केली आहे. 17 मार्चपर्यंत या विशेष गाड्या मुंबई, ठाणे, अन पालघर जिल्ह्यातून कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील विविध बस स्थानकावरून धावणार आहेत . यासोबतच गुहागर, चिपळूण, खेड, कणकवली, रत्नागिरी, गणपतीपुळे अशा ठिकाणी अधिक गाड्याचे आयोजन करण्यात आले आहे. सणाच्या आनंदात प्रवास करत असताना, या विशेष गाड्या आणि एसटी सेवांमुळे प्रवाशांना आरामदायक आणि सोयीस्कर यात्रा अनुभवता येईल.

प्रवाशांसाठी महत्त्वाची सुविधा –

उन्हाळ्यातील प्रचंड गर्दी आणि प्रवासाच्या त्रासावर मात केली जाऊ शकेल. मध्य रेल्वेने (Konkan Railways) या विशेष रेल्वे सेवा सुरू करण्याचा निर्णय घेऊन, राज्यातील पर्यटक आणि स्थानिक प्रवाशांसाठी महत्त्वाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यातून कोकण आणि इतर भागांतील संपर्क वाढवण्यात मदत होईल आणि पर्यटन क्षेत्रातही प्रगती होणार आहे.

छावाचा बजेटवरही प्रभाव ? ‘या’ ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार

sambhaji maharaj

महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याची दखल घेऊन एक ऐतिहासिक घोषणा करण्यात आली आहे. छावा चित्रपटामुळे छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जनतेपर्यंत पोहोचला असून, त्याचा मोठा प्रभाव आता राज्यभर दिसून येत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यस्थळावर भव्य स्मारक उभारण्याची घोषणा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी केली.

सोमवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पीय भाषणात अजित पवार यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याच्या रक्षणासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी प्रचंड शौर्य आणि धैर्य दाखवले. संगमेश्वर येथील युद्धामुळे याठिकाणाचे महत्त्व विशेष आहे, कारण येथे आणि याच्या आसपासच्या प्रदेशात संभाजी महाराजांनी आपल्या महाकाय शत्रूंसोबत युद्ध केले आणि स्वराज्याच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती दिली. त्या ऐतिहासिक पराक्रमाची स्मृती कायम ठेवण्यासाठी संगमेश्वरमध्ये त्यांचे भव्य स्मारक उभारले जाईल.

याशिवाय, छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने पुरस्कार देण्याची घोषणा केली गेली आहे. “छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत” पुरस्कार दरवर्षी दिला जाईल. तुळापूर आणि वढु बुद्रुक येथील महाराजांचे बलिदानस्थळे आणि समाधीस्थळे याठिकाणी देखील स्मारक उभारण्याचे काम सुरु आहे.

मराठी भाषेच्या सन्मानासाठी ऐतिहासिक निर्णय

आजीत पवार यांनी यावेळी आणखी एक महत्त्वाची घोषणा केली. 3 ऑक्टोबर या दिवशी अभिजात मराठी भाषा सन्मान दिन म्हणून साजरा करण्यात येईल, आणि याच दिवशी 3 ते 9 ऑक्टोबर दरम्यान अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा केला जाईल. महाराष्ट्र सरकारने या दिवसाला अधिकृतपणे सन्मान दिला आहे. यासोबतच, मराठी भाषा संशोधन व अध्ययनासाठी उच्च दर्जाचे संशोधन केंद्र आणि अनुवाद अकादमी स्थापन केली जाणार आहे.

अशाप्रकारे, अर्थसंकल्पामध्ये राज्य सरकारने छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाची आणि मराठी भाषेच्या अभिजात दर्जाची मोठी दखल घेतली आहे.

सर्वांकरिता घरे ! नवीन गृहनिर्माण धोरणाची लवकरच होणार घोषणा

housing

महाराष्ट्र राज्य सरकारने आपल्या आगामी अर्थसंकल्पात गृहनिर्माणाच्या क्षेत्रात मोठे बदल आणि सुधारणा जाहीर केली आहेत. “सर्वांसाठी घरे” या उद्दीष्टाच्या अंमलबजावणीसाठी राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. या धोरणानुसार, घरकुलांच्या बांधकामात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर, हरित इमारती आणि सौर ऊर्जा प्रणालींचा समावेश करण्यात येणार आहे.

44 लाख 7 हजार घरकुल मंजूर

आता, राज्यात विविध केंद्र पुरस्कृत आणि राज्यस्तरीय गृहनिर्माण योजनांची अंमलबजावणी केली जात आहे. यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) चा समावेश आहे, ज्याअंतर्गत आतापर्यंत एकूण 44 लाख 7 हजार घरकुल मंजूर केली गेली आहेत. या योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्र देशभरात प्रथम क्रमांकावर आहे.

अनुदानात 50 हजार रुपयांची वाढ

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण (पं.आ.व.य.ग्रामीण) टप्पा-2 अंतर्गत 2024-25 मध्ये 20 लाख घरकुलांची उद्दीष्ट आहे, ज्यापैकी 18 लाख 38 हजार घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. याअंतर्गत 14 लाख 71 हजार लाभार्थींना 2 हजार 200 कोटी रुपये वितरित केले गेले आहेत. या योजनेच्या अनुदानात लोकप्रतिनिधी आणि लाभार्थींच्या मागणीला प्रतिसाद म्हणून 50 हजार रुपयांची वाढ करण्यात येणार आहे.

शहरी भागातील प्रधानमंत्री आवास योजना 1 अंतर्गत 4 लाख 42 हजार 748 घरकुल मंजूर केली गेली आहेत, ज्यापैकी 2 लाख 8 हजार 304 घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. उर्वरित घरकुलांचे बांधकाम 31 डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण होईल. याशिवाय, प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0 अंतर्गत पुढील पाच वर्षांसाठी 5 लाख घरकुलांचा उद्दीष्ट असून त्यासाठी 8 हजार 100 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करणे अपेक्षित आहे. सर्व घरकुलांच्या छतावर सौर ऊर्जा संच बसविण्याची योजना आहे, ज्यामुळे पर्यावरणास मदत होईल.

अशाप्रकारे, राज्य सरकारचे गृहनिर्माण धोरण नव्या तंत्रज्ञानाचा वापर करत, सर्वांसाठी घरे मिळवून देण्याच्या उद्दीष्टाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊले उचलत आहे.

चिकन खाणाऱ्यांनो सावधान! 9 राज्यांना बर्ड फ्लूचा अलर्ट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तुम्ही जर चिकन खात असला तर तुमच्यासाठी हि बातमी महत्वाची ठरणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून बर्ड फ्लू या संसर्गजन्य रोगाने धुमाकूळ घातला आहे. अन आता या रोगाच्या संख्येत वाढ होत निघाली आहे. त्यामुळे अनेक लोकांच टेन्शन वाढलंय , या विषाणूच्या प्रसारावर नियंत्रण ठेवण्यासाठीच सरकारने तातडीचे उपाय जाहीर केलेत. तसेच या उपाय योजनेसाठीच केंद्र सरकारने पशुसंवर्धन आणि मत्स्यव्यवसाय मंत्रालयाच्या माध्यमातून 9 राज्यांसाठी बर्ड फ्लूविरुद्ध अलर्ट जारी केला आहे. यासोबतच वेगवेगळ्या योजनांची आखणी केली आहे. तर चला यासाठी सरकारने केलेल्या उपाययोजना अन 9 राज्यांना अलर्ट , याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया.

पंजाबसहित 9 राज्यांना अलर्ट जारी –

वाढत्या बर्ड फ्लूमुळे सरकारने देशभरात पंजाबसहित 9 राज्यांना अलर्ट जारी केला असून, पोल्ट्री फार्मसाठी अत्यंत कठोर जैवसुरक्षा उपायांची अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे. याच बरोबर या योजनेत जलद प्रतिसाद पथकांची सक्रिय करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे कि , ‘आता वेळ आहे तातडीने उपाययोजना करण्याची, अन्यथा या विषाणूचा प्रसार रोखता येणार नाही’.

कर्मचाऱ्यांसाठी जागरूकता कार्यक्रम –

बर्ड फ्लू हा संक्रमित पक्ष्यांचा संपर्क, दूषित वातावरण आणि नीट न शिजवलेले चिकन यामुळे होऊ शकतो. याचसोबत H5N1 विषाणू संक्रमित पक्ष्यांना हाताळताना किंवा पोल्ट्री फार्ममध्ये काम करत असताना देखील होण्याची शक्यता आहे. यासाठीच पोल्ट्री फार्मसाठी जैवसुरक्षा लेखापरीक्षण, कर्मचाऱ्यांसाठी जागरूकता कार्यक्रम, आणि असामान्य मृत्यूंचे वेळेवर अहवाल देण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. जलद प्रतिसाद पथकांची स्थापना आणि पशुवैद्यकीय व प्रयोगशाळांच्या संसाधनांचा विस्तार यावरही भर देण्यात आला आहे.

फ्लूची प्रमुख लक्षणे अन उपाय –

बर्ड फ्लूची प्रमुख लक्षणे आहेत, ज्यामध्ये मानवाला ताप येणे , खोकला, डोळे लाल होणे , नाकातून रक्त येणे , मळमळणे अशा अनेक समस्या येऊ शकतात. यासाठी सरकारने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. तसेच चिकन अन अंडी पूर्णपणे शिजवूनच खावीत असा सल्लाही दिला आहे. यासाठी नागरिकांनी विशेष काळजी घ्यायची आहे. बाहेरून आल्यास हात धुणे , इन्फ्लूएन्झाच्या प्राण्यांशी संपर्क टाळणे , वेळोवेळी डॉक्टरचा सल्ला घेणे अन सर्वात महत्वाचे गंभीर आजाराचा धोका कमी करण्यासाठी फ्लूची लस घेणे. पोल्ट्री फार्ममधून ते आपल्या घरापर्यंत पोहचू नये म्हणून केंद्र सरकारने राष्ट्रभरात तत्परतेने आणि सर्वसमावेशक पावले उचलली आहेत.

लाडक्या बहिणींना 2100 दिले का? महायुती सरकारवर उद्धव ठाकरेंची जोरदार टीका

Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आज महायुती सरकारकडून (Mahayuti Government) राजाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. या अर्थसंकल्पामध्ये शेतकरी, सर्वसामान्य जनता यांच्यासह विविध क्षेत्रांसाठी सरकारकडून मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवरच विरोधकांकडून सरकारवर टीका करण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये ठाकरे गटाचे प्रमुख नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा देखील समावेश आहे. त्यांनी, पत्रकार परिषदेत सरकारचा जाहीरनामा दाखवत त्यांना केलेल्या घोषणांची आठवण करून दिली आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले की, आचार्य अत्रे असते तर म्हणाले असते की गेल्या 10 हजार वर्षात इतका बोगस अर्थसंकल्प झाला नसेल. निवडणूक काळात वारेमाप जाहीराती केल्या होत्या. थापा मारायचे थांबणार नाही असे घोषवाक्य हवे. मारल्या होत्या थापा भारी, महाराष्ट्र केला कर्जबाजारी.

मी शेतक-यांना कर्जमुक्त केले

त्याचबरोबर, लाडक्या बहिणींना 2100 दिले का? शेतक-यांना कर्जमुक्त केले का? असा सवाल ही त्यांनी सरकारला विचारला आहे. पुढे बोलताना, स्थगिती द्यायला मी काही उद्धव ठाकरे नाही असे मुख्यमंत्री म्हणाले होते. तुम्हाला उद्धव ठाकरे होता येणार नाही. मी शेतक-यांना कर्जमुक्त केले होते. वीजबिलात 30 टक्के कपात केली का? असेही त्यांनी पुढे विचारले. यासह कंत्राटदारांसाठी 64 हजार कोटींची कामे मुंबईत होणार आहेत. दोन विमानतळे जोडण्याचे काम हे अदानींचे असेल, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

दरम्यान, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत, 2024 च्या जुलैपासून सुमारे 2 कोटी 53 लाख महिलांना आर्थिक लाभ दिले जाणार आहेत. यासाठी 33 हजार 232 कोटी रुपये खर्च होणार आहे. आता सरकारकडून 2025-26 मध्ये या योजनेसाठी 36 हजार कोटी रुपयांचा निधी (Maharashtra Budget 2025) प्रस्तावित करण्यात आला आहे. त्यामुळे आता या योजनेचे पुढे नेमके काय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अजित पवारांची मोठी घोषणा ! राज्यात 237 किमी मेट्रो मार्ग आणि 6 हजार कोटींचे रस्ते प्रकल्प होणार

ajit pawar

Maharashtra Budget 2025: महाराष्ट्रातील सार्वजनिक वाहतूक आणि रस्त्यांच्या क्षेत्रात ऐतिहासिक सुधारणा होणार आहेत. राज्यात येत्या पाच वर्षांत 237 किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग सुरू होणार असल्याची महत्त्वाची घोषणा अजित पवार यांनी 2025-26 च्या राज्य अर्थसंकल्प सादर करताना केली.

अजित पवार यांनी सांगितले की, उत्तन ते विरार दरम्यान 55 किलोमीटर लांबीच्या सागरी सेतू आणि जोडरस्त्यांचा प्रकल्प 87 हजार 427 कोटी रुपयांच्या खर्चाने राबवला जाईल. पुणे ते शिरुर या 54 किलोमीटर लांबीच्या मार्गावर 7 हजार 515 कोटी रुपये खर्च करणार असून, तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्याच्या तळेगाव ते चाकण या 25 किलोमीटर लांबीसाठी 6 हजार 499 कोटी रुपये खर्च होईल.

पुणे, मुंबई आणि ठाणे मेट्रोचे विस्तारीकरण

अजित पवार यांनी सांगितले की, महानगरातील प्रवाशांसाठी वातानुकुलित मेट्रो सेवा कार्यान्वित केली जाईल. मुंबई आणि पुणे येथे 64 किमी मेट्रो मार्ग सुरू होणार आहेत. पुढील पाच वर्षांत 237 किमी मेट्रो मार्ग तयार होईल. तसेच, नागपूर मेट्रोच्या 40 किमी टप्प्याचे यशस्वी उद्घाटन झाले आहे. ठाणे आणि पुणे मेट्रोच्या विस्तारीकरणाला मंजुरी देण्यात आली आहे.

मुंबई-नवी मुंबई मेट्रो सेवा

आणखी एक महत्त्वाची घोषणा करत अजित पवार यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबईतील विमानतळ जोडणारी मेट्रो सेवा लवकरच सुरू केली जाईल.

वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी 6,500 कोटींचा प्रकल्प

पुणे जिल्ह्यातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी 6,500 कोटी रुपये खर्च करणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली. पुणे ते शिरुर मार्गावर नव्या उन्नत रस्त्याच्या कामाला सुरुवात होईल. आज सादर झालेल्या अर्थसंकल्पात सार्वजनिक वाहतूक आणि रस्ते विकास क्षेत्रातील या मोठ्या घोषणा राज्यातील लोकांसाठी महत्वपूर्ण ठरतील.

नर्सिंग ऑफिसरच्या तब्बल 1794 पदांसाठी भरती जाहीर; अर्ज प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखा पहा

Nursing Officer

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्या नर्सिंग क्षेत्रात (Nursing Field) काम करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची ठरू शकते. कारण की, अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (AIIMS), दिल्लीने नर्सिंग ऑफिसर भरती सामान्य पात्रता परीक्षा (NORCET)-8 साठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 1794 पदे भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवार 17 मार्च 2025 पर्यंत अर्ज करू शकतात.

महत्त्वाच्या तारखा आणि अर्ज प्रक्रिया

NORCET-8 साठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 24 फेब्रुवारी 2025 पासून सुरू झाली आहे. अर्ज भरण्याची अंतिम तारीख 17 मार्च 2025 आहे. इच्छूक उमेदवारांना एम्सच्या अधिकृत वेबसाइट aiimsexams.ac.in वर जाऊन अर्ज भरावा लागेल.

कोणती पदे भरली जाणार

या भरतीत विविध एम्स आणि आरोग्य संस्थांमध्ये नर्सिंग ऑफिसर पदांसाठी जागा उपलब्ध आहेत. त्यापैकी प्रमुख संस्थांमध्ये पदसंख्या खालीलप्रमाणे आहे.

  • एम्स पटना – 308 पदे (यामध्ये दिव्यांग उमेदवारांसाठी 29, महिलांसाठी 24 आणि पुरुषांसाठी 5 जागा आरक्षित)
  • CAPFIMS, मैदानगढ़ी – 300 पदे
  • एम्स दिल्ली – 202 पदे

एकूण 23 संस्थांमध्ये NORCET-8 स्कोरच्या आधारावर भरती प्रक्रिया पार पडणार आहे.

शैक्षणिक पात्रता आणि इतर अटी

अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे भारतीय नर्सिंग परिषद (INC) किंवा राज्य नर्सिंग परिषदाद्वारे मान्यता प्राप्त संस्थेतून बीएससी (ऑनर्स) नर्सिंग, बीएससी नर्सिंग, किंवा जनरल नर्सिंग मिडवाइफरी (GNM) मध्ये डिप्लोमा असणे आवश्यक आहे. तसेच, बीएससी पोस्ट-सर्टिफिकेट किंवा पोस्ट-बेसिक बीएससी नर्सिंग डिग्री असलेल्या उमेदवारांनाही अर्ज करण्याची संधी आहे.

याशिवाय, अर्जदारांचे भारतीय नर्सिंग परिषद किंवा राज्य नर्सिंग परिषदेमध्ये नोंदणीकृत नर्स म्हणून रजिस्ट्रेशन असणे बंधनकारक आहे.

अर्ज शुल्क

सामान्य आणि ओबीसी वर्ग: 3000

SC/ST/EWS वर्ग: 2400

दिव्यांग उमेदवारांसाठी अर्ज शुल्क माफ

निवड प्रक्रिया

NORCET-8 साठी उमेदवारांची निवड दोन टप्प्यातील परीक्षांच्या आधारे केली जाणार आहे.

  1. प्राथमिक परीक्षा – 12 एप्रिल 2025 रोजी घेतली जाईल.
  2. मुख्य परीक्षा – 2 मे 2025 रोजी आयोजित केली जाईल.

अर्ज कसा करावा?

  1. एम्सच्या अधिकृत वेबसाइट (aiimsexams.ac.in) वर जा.
  2. “रिक्रूटमेंट” टॅबमधून “नर्सिंग ऑफिसर” विभाग निवडा.
  3. NORCET-8 लिंकवर क्लिक करून नवीन रजिस्ट्रेशन करा.
  4. आवश्यक माहिती भरून, दस्तऐवज अपलोड करा आणि शुल्क जमा करा.
  5. अर्ज सबमिट करून त्याची प्रिंट काढा.
  6. अधिक माहितीसाठी aiimsexams.ac.in या वेबसाईटला भेट द्या.

राज्याच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांवर घोषणांचा पाऊस!! वाचा कृषी क्षेत्रासाठी किती निधी जाहीर

Budget2025

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी महायुती सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प (Budget Session 2025) आज विधीमंडळात सादर केला आहे. “महाराष्ट्र आता थांबणार नाही, विकास लांबणार नाही,” असे सांगत त्यांनी शेतकरी, सिंचन आणि गृहनिर्माण यासह विविध क्षेत्रांसाठी महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. मात्र या सगळ्यात सरकारने शेतकऱ्यांसाठी कोणत्या घोषणा केल्या याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अर्थसंकल्प सादर करताना अजित पवार म्हणाले की, शेती हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. कृषी क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धीमतेचे धोरण राबवण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने पिकांचे नियोजन करण्यास, उत्पादन खर्च कमी करण्यास आणि शेतीमालाला हमीभाव मिळवून देण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर करण्यात येणार आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात 50 हजार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.

सिंचन प्रकल्पांना गती

राज्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आणि कालव्यांचे आधुनिकीकरण करण्यासाठी 5,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमांतर्गत कालवे वितरण प्रणाली सुधारण्यासाठी नाबार्डकडून या प्रकल्पांना पहिल्या टप्प्यात अर्थसहाय्य मंजूर झाले आहे. तसेच, जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गत 5,818 गावांमध्ये 4,227 कोटी रुपये खर्चून तब्बल 1 लाख 48 हजार 888 कामे केली जाणार आहेत.

शेतकऱ्यांसाठी वीज बिल सवलत

शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री मोफत बळीराजा वीज योजनेअंतर्गत मोठी सवलत जाहीर करण्यात आली आहे. या योजनेसाठी डिसेंबरपर्यंत 7,978 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ज्यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल.

नवे गृहनिर्माण धोरण लवकरच

राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या घरांची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सरकार लवकरच नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर करणार आहे. यात प्रधानमंत्री आवास योजना, पीएम जनमन, रमाई आवास, शबरी आवास, पारधी आवास, यशवंतराव चव्हाण वसाहत, धर्मवीर आनंद दिघे घरकुल यांसारख्या योजनांचा समावेश असेल.

कृषी विभागासाठी 9,710 कोटी रुपये

राज्याच्या 2025-26 च्या अर्थसंकल्पात कृषी विभागासाठी 9,710 कोटी रुपये, मृद व जलसंधारण विभागासाठी 4,247 कोटी रुपये, तर जलसंपदा व खारभूमी विभागासाठी 16,456 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्य व्यवसायासाठी 635 कोटी, फलोत्पादन विभागासाठी 708 कोटी, सहकार व पणन विभागासाठी 1,178 कोटी, तसेच रोहयोसाठी 2,205 कोटी रुपये वाटप करण्यात आले आहेत.

दरम्यान, अर्थसंकल्पात एकूणच महाराष्ट्राच्या विकासाच्या दिशेने महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर करण्यात आले आहे. सिंचन, कृषी, गृहनिर्माण यासारख्या क्षेत्रांना चालना देणाऱ्या या घोषणा राज्याच्या प्रगतीसाठी महत्त्वाच्या ठरणार आहेत. हा अर्थसंकल्प सादर करत, “महाराष्ट्र विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे आणि पुढील काळात आणखी ठोस उपाययोजना केल्या जातील.” असे आश्वासन अजित पवार यांनी दिले आहे.

Maharashtra Budget 2025: अजित पवार यांची लाडक्या बहिणींसाठी मोठी घोषणा ! मायक्रोसॉफ्टसोबत AI सुद्धा जोडले जाणार

ladaki bahin yojana

Maharashtra Budget 2025: महाराष्ट्रासाठीचा अर्थसंकल्प सोमवारी अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडला. अजित पवार यांनी महिला, कृषी, जेष्ठ नागरिक यांच्यासाठी तरतुदी असणारा अर्थसंकल्प सादर केला. महत्त्वाची म्हणजे लाडक्या बहिणींच्या संदर्भात देखील अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात (Maharashtra Budget 2025) एक मोठी घोषणा केली आहे. चला जाणून घेऊया

सर्वांसाठी घरे (Maharashtra Budget 2025)

अजित पवार यांनी सांगितले की, महाराष्ट्र सरकार लवकरच ‘सर्वांसाठी घरे’ योजनेतून नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर करणार आहे. या धोरणाचे मुख्य उद्दीष्ट येत्या पाच वर्षांत प्रत्येक कुटुंबाला घर मिळवून देणे आहे.

मायक्रोसॉफ्टसोबत AI प्रशिक्षणासाठी करार

महिलांसाठी आणखी एक मोठा उपक्रम म्हणजे टेक क्षेत्रातील दिग्गज कंपनी मायक्रोसॉफ्टसोबत राज्य सरकार (Maharashtra Budget 2025) करार करणार आहे. या कराराद्वारे राज्यातील हजारो महिलांना कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) यावर प्रशिक्षण दिले जाईल, ज्यामुळे महिलांच्या करिअरला नवीन दिशा मिळेल. मुलींच्या व्यावसायिक शिक्षणासाठी 100% शालेय आणि परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती देण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत, ज्यांच्या कुटुंबाचा वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपये पेक्षा कमी आहे, अशा विद्यार्थिनींना हा लाभ मिळेल.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील वाढ

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजने अंतर्गत, 2024 च्या जुलैपासून सुमारे 2 कोटी 53 लाख महिलांना आर्थिक लाभ दिले जाणार आहेत. यासाठी 33 हजार 232 कोटी रुपये खर्च होणार असून, 2025-26 मध्ये या योजनेसाठी 36 हजार कोटी रुपयांचा निधी (Maharashtra Budget 2025) प्रस्तावित करण्यात आला आहे.

दीनदयाल अंत्योदय योजना – लखपती दिदी” संकल्प

राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानांतर्गत 22 लाख महिलांना ‘लखपती दिदी’ म्हणून मान्यता मिळाली आहे. 2025-26 मध्ये आणखी 24 लाख महिलांना ‘लखपती’ करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे.

दुसरीकडे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेंतर्गत 2100 रुपये कधी मिळणार? त्याची विचारणा (Maharashtra Budget 2025) काही सदस्यांनी केली. त्यावर अजित पवार यांनी अर्थसंकल्प होऊ द्या, असे उत्तर दिले. त्यामुळे अद्यापतरी राज्यातील लाडक्या बहिणींना आहे त्या निधीवरच समाधान मानावे लागेल.