Wednesday, December 17, 2025
Home Blog Page 206

Maharashtra Budget 2025: अजित पवार यांची लाडक्या बहिणींसाठी मोठी घोषणा ! मायक्रोसॉफ्टसोबत AI सुद्धा जोडले जाणार

ladaki bahin yojana

Maharashtra Budget 2025: महाराष्ट्रासाठीचा अर्थसंकल्प सोमवारी अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडला. अजित पवार यांनी महिला, कृषी, जेष्ठ नागरिक यांच्यासाठी तरतुदी असणारा अर्थसंकल्प सादर केला. महत्त्वाची म्हणजे लाडक्या बहिणींच्या संदर्भात देखील अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात (Maharashtra Budget 2025) एक मोठी घोषणा केली आहे. चला जाणून घेऊया

सर्वांसाठी घरे (Maharashtra Budget 2025)

अजित पवार यांनी सांगितले की, महाराष्ट्र सरकार लवकरच ‘सर्वांसाठी घरे’ योजनेतून नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर करणार आहे. या धोरणाचे मुख्य उद्दीष्ट येत्या पाच वर्षांत प्रत्येक कुटुंबाला घर मिळवून देणे आहे.

मायक्रोसॉफ्टसोबत AI प्रशिक्षणासाठी करार

महिलांसाठी आणखी एक मोठा उपक्रम म्हणजे टेक क्षेत्रातील दिग्गज कंपनी मायक्रोसॉफ्टसोबत राज्य सरकार (Maharashtra Budget 2025) करार करणार आहे. या कराराद्वारे राज्यातील हजारो महिलांना कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) यावर प्रशिक्षण दिले जाईल, ज्यामुळे महिलांच्या करिअरला नवीन दिशा मिळेल. मुलींच्या व्यावसायिक शिक्षणासाठी 100% शालेय आणि परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती देण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत, ज्यांच्या कुटुंबाचा वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपये पेक्षा कमी आहे, अशा विद्यार्थिनींना हा लाभ मिळेल.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील वाढ

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजने अंतर्गत, 2024 च्या जुलैपासून सुमारे 2 कोटी 53 लाख महिलांना आर्थिक लाभ दिले जाणार आहेत. यासाठी 33 हजार 232 कोटी रुपये खर्च होणार असून, 2025-26 मध्ये या योजनेसाठी 36 हजार कोटी रुपयांचा निधी (Maharashtra Budget 2025) प्रस्तावित करण्यात आला आहे.

दीनदयाल अंत्योदय योजना – लखपती दिदी” संकल्प

राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानांतर्गत 22 लाख महिलांना ‘लखपती दिदी’ म्हणून मान्यता मिळाली आहे. 2025-26 मध्ये आणखी 24 लाख महिलांना ‘लखपती’ करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे.

दुसरीकडे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेंतर्गत 2100 रुपये कधी मिळणार? त्याची विचारणा (Maharashtra Budget 2025) काही सदस्यांनी केली. त्यावर अजित पवार यांनी अर्थसंकल्प होऊ द्या, असे उत्तर दिले. त्यामुळे अद्यापतरी राज्यातील लाडक्या बहिणींना आहे त्या निधीवरच समाधान मानावे लागेल.

मोठी बातमी! दरवर्षी 3 ऑक्टोंबरला साजरी केला जाणार “अभिजात मराठी भाषा सन्मान दिन”

Classic Marathi Language Appreciation Day

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| महाराष्ट्राच्या 2025-26 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Budget Session) राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. या घोषणेनुसार, आता दरवर्षी 3 ऑक्टोबर हा ‘अभिजात मराठी भाषा सन्मान दिन’ (Classical Marathi Language Honor Day) म्हणून साजरा केला जाणार आहे. तसेच 3 ते 9 ऑक्टोबरदरम्यान ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ आयोजित करण्यात येणार आहे.

अजित पवार यांनी यावेळी 3 ऑक्टोबर 2024 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने मराठीला ‘अभिजात भाषा’ म्हणून दिलेल्या मान्यतेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे आभार मानले. मराठी भाषेच्या समृद्ध परंपरेचा सन्मान राखण्यासाठी आणि तिच्या संवर्धनासाठी हे उपक्रम राबवले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. आता अजित पवार यांनी केलेल्या घोषणामुळे मराठी साहित्य प्रेमींना याचा प्रचंड आनंद झाला आहे.

संशोधन केंद्र आणि अनुवाद अकादमी स्थापन होणार

महत्वाचे म्हणजे, मराठी भाषेच्या अभ्यासाला अधिक चालना देण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथे ‘मराठी भाषा विद्यापीठा’त एक उच्चस्तरीय संशोधन केंद्र आणि अनुवाद अकादमी स्थापन केली जाणार आहे. या अकादमीतून मराठीतील महत्त्वपूर्ण ग्रंथांचे इतर भाषांमध्ये भाषांतर आणि अभिजात मराठी साहित्याचा सखोल अभ्यास केला जाणार आहे.

संवर्धनासाठी विशेष पुरस्कार आणि उपक्रम

मराठीच्या समृद्ध वारशाला पुढे नेण्यासाठी आणि नव्या पिढीत भाषेची गोडी निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले जाणार आहेत. मराठी भाषेच्या संशोधनात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अभ्यासकांना विशेष पुरस्कार दिले जातील. तसेच भाषेच्या प्रचारासाठी कार्य करणाऱ्या संस्थांना आर्थिक मदत देण्यात येणार आहे.

दरम्यान, अजित पवार यांनी केलेल्या या घोषणांमुळे मराठी भाषा अधिक बळकट होईल आणि तिचा अभिजात दर्जा अधिक अधोरेखित केला जाईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयामुळे साहित्य, शिक्षण आणि सांस्कृतिक क्षेत्रात सकारात्मक बदल घडण्याची देखील अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

कृषी विभागासाठी किती रुपयांची तरतूद?

राज्याच्या 2025-26 च्या अर्थसंकल्पात कृषी विभागासाठी 9,710 कोटी रुपये, मृद व जलसंधारण विभागासाठी 4,247 कोटी रुपये, तर जलसंपदा व खारभूमी विभागासाठी 16,456 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्य व्यवसायासाठी 635 कोटी, फलोत्पादन विभागासाठी 708 कोटी, सहकार व पणन विभागासाठी 1,178 कोटी, तसेच रोहयोसाठी 2,205 कोटी रुपये वाटप करण्यात आले आहेत.

मुंबईहून गोवा आता फक्त 5 तासांत! लवकरच सुरु होतोय ‘हा’ महामार्ग

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यंदा प्रवाशांसाठी मोठी खुशखबर मिळणार आहे. तब्बल 13 वर्षांपासून सुरु असलेले मुंबई-गोवा NH 66 राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण होणार आहे. अन येत्या 9 महिन्यातच हा मार्ग प्रवाशांसाठी खुला केला जाणार आहे. तसेच या महामार्गामुळे प्रवासाचा कालावधी 13 तासावरून फक्त 5 ते 6 तास होणार आहे. त्यामुळे अनेक प्रवाशांना हे ऐकून आनंद झाला आहे कि , सुमारे 460 ते 471 किलोमीटरची लांबीचे अंतर निम्या वेळेत गाठता येणार . तर नेमका हा प्रकल्प काय आहे , तो कुठून गेलाय , आणि प्रवाशांना काय फायदा होणार आहे , हेच आपण आज जाणून घेणार आहोत. तर चला याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊयात.

महामार्ग डिसेंबर 2025 पर्यंत सुरु होणार –

विधानसभेच्या तारांकित प्रश्नांमध्ये आमदार रोहित पवार अन इतर सदस्यांनी या महामार्गाच्या प्रलंबित कामाबद्दल प्रश्न मांडला. त्यावेळी त्यांच्या प्रश्नाचे उत्तर म्हणून बांधकाम विभागमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी महत्वाची माहिती सांगितली ,त्यात ते म्हणाले कि, “हा महामार्ग डिसेंबर 2025 पर्यंत सुरु केला जाईल”. त्यामुळे मागील काही वर्षांपासून रखडलेला हा प्रकल्प लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. तसेच आतापर्यंत या राष्ट्रीय महामार्गावर तब्बल 15 हजार 600 कोटी रुपये खर्च करण्यात आलेत.

NH 66 ‘या’ प्रमुख शहरांना जोडणार –

हा NH 66 महामार्ग प्रमुख शहरांना अन गावांना जोडणार आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील पनवेल , पेण, माणगाव, महाड, पोलादपूर, खेड, चिपळूण, रत्नागिरी, लांजा, राजापूर, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, पणजी, कानाकोना आणि मरगाव यांचा समावेश आहे. महाराष्ट्रासोबतच हा मार्ग गोवा , कर्नाटक, केरळ,तामिळनाडूतील लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे.

पूल-उड्डाणपुलांचे काम –

84.60 किमी लांबीच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण – 74.80 किमी पूर्ण, उर्वरित 42.3 किमी लांबीचे पूल-उड्डाणपुलाचे काम मार्च 2025 पर्यंत पूर्ण होणार.

कासू ते इंदापूर रस्ता – 42.3 किमी लांबीच्या मार्गावरील पूल-उड्डाणपुलांचे काम डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण होईल.

कशेडी घाट चौपदरीकरण – एका बोगद्याचे काम पूर्ण झाल्यामुळे वाहतूक सुरू केली आहे. तसेच दुसऱ्या बोगद्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून मार्च 2025 अखेर वाहतुकीसाठी खुले केले जाणार.

Maharashtra Budget 2025: सर्वसामान्यांसाठी खुशखबर! येत्या 5 वर्षांत वीजदर होणार स्वस्त; अजित पवारांची मोठी घोषणा

Maharashtra Budget 2025

Maharashtra Budget 2025 : सर्वसामान्यांसाठी खुशखबर! येत्या 5 वर्षांत वीजदर होणार स्वस्त; अजित पवारांची मोठी घोषणा| उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा 2025-26 चा अर्थसंकल्प सादर केला आहे. नव्याने स्थापन झालेल्या महायुती सरकारचा हा पहिला अर्थसंकल्प आहे. खास म्हणजे, अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांचा हा अकरावा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पामध्ये त्यांनी सर्वसामान्यांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. यावेळी त्यांनी, येत्या पाच वर्षांत वीजदर होणार स्वस्त, अशी देखील घोषणा केली आहे.

वीज दराबाबत बोलताना अजित पवार यांनी स्पष्ट केले की, महावितरण कंपनीने पुढील पाच वर्षांसाठी वीजदर निश्चित करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे पाठवला आहे. ऊर्जा क्षेत्रातील नियोजन आणि कमी दराच्या हरित ऊर्जेच्या खरेदीमुळे वीज खरेदी खर्चात मोठी कपात होईल. त्यांनी अंदाज वर्तवला की, यामुळे राज्य सरकारला तब्बल १ लाख १३ हजार कोटी रुपयांची बचत होईल. परिणामी, महाराष्ट्रातील औद्योगिक वीज दर हे इतर राज्यांच्या तुलनेत कमी होण्याची शक्यता आहे.

याबरोबर, शेतकऱ्यांसाठीही अनेक घोषणा करण्यात आल्या. “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना,” “नमो शेतकरी महासन्मान निधी योजना” आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यांवर सरकार लवकरच महत्त्वाचे निर्णय घेणार आहे, असे संकेतही अजित पवार यांनी दिले आहेत. (Maharashtra Budget 2025)

दरम्यान, अर्थसंकल्पाच्या सुरुवातीलाच अजित पवार यांनी “महाराष्ट्र आता थांबणार नाही, विकास लांबणार नाही. राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येत आहे,” असे ठामपणे सांगितले. तसेच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, ताराराणी, अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन करत हा अर्थसंकल्प लोककल्याणाच्या दृष्टीने तयार करण्यात आल्याची माहिती दिली. तसेच, महायुती सरकारला जनतेने विधानसभा निवडणुकीत दिलेला कौल लक्षात घेऊन हा अर्थसंकल्प मांडण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

त्याचबरोबर, “विकासाची कामं केली म्हणून आम्ही पुन्हा आलो. 2047 पर्यंत भारताला विकसित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ध्येय ठेऊन आहेत.शाश्वत विकासाची रूपरेषा पुढे घेऊन आम्ही चालत आहोत महाराष्ट्र आता थांबणार नाही. थेट गुंतवणूक राज्यात आता केली जात आहे” असे अर्थसंकल्प(Maharashtra Budget 2025) सादर करताना अजित पवार म्हणाले.

खुशखबर ! मुंबईहुन ‘या’ शहरासाठी सुरू होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, ‘या’ स्थानकांवर घेणार थांबे

train news

महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. 16 मार्च 2025 पासून मुंबई आणि गोव्याच्या दरम्यान एक नवीन एक्सप्रेस ट्रेन सुरू होणार आहे. हा निर्णय मध्य रेल्वे कडून घेण्यात आला आहे, ज्यामुळे होळी सणाच्या निमित्ताने मुंबई आणि गोव्याच्या दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास वेगवान आणि आरामदायी होईल.

काय असेल वेळापत्रक ?

ही विशेष गाडी मुंबईहून एलटीटी (लोकमान्य टिळक टर्मिनस) ते मडगाव पर्यंत चालवली जाणार आहे. विशेष गाडी क्रमांक 01103, 17 आणि 24 मार्च रोजी सकाळी 8:20 वाजता एलटीटी येथून सुटेल आणि रात्री 9:40 वाजता मडगाव पोहोचेल. त्याचप्रमाणे, गाडी क्रमांक 01104 16 आणि 23 मार्च रोजी मडगाव येथून दुपारी 4:30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 6:25 वाजता मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस पोहोचेल.

या स्थानकांवर थांबणार

ही नवीन विशेष एक्सप्रेस ट्रेन ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवी आणि करमळी या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर थांबणार आहे. म्हणजेच, मुंबई ते गोवा दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या गाडीचा मोठा फायदा होईल, आणि होळी सणाच्या पूर्वी एक महत्त्वपूर्ण सोयीची रेल्वे सेवा सुरू होईल.

Budget 2025-26: राज्यात 50 लाख रोजगार निर्मिती करणार; अजित पवारांची घोषणा

Budget 2025-26

Budget 2025-26| उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात 2025 -26 या आर्थिक वर्षासाठीचे अर्थसंकल्प सादर केले आहे. या अर्थसंकल्पामध्ये त्यांनी महाराष्ट्राच्या औद्योगिक आणि सागरी विकासासंदर्भात मोठ्या घोषणा करत राज्याच्या प्रगतीला नवा वेग देण्याचा संकल्प व्यक्त केला आहे.

राज्याच्या आगामी औद्योगिक धोरणाची घोषणा करताना अजित पवार यांनी सांगितले की, “औद्योगिक धोरण 2025 लवकरच जाहीर करण्यात येणार असून त्याअंतर्गत 20 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि 50 लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. औद्योगिक क्षेत्रात अधिक गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी सरकार नवे कामगार नियम तयार करणार असून, चक्रीय अर्थव्यवस्थेसाठी स्वतंत्र क्षेत्रीय धोरण लागू करण्याचाही सरकारचा मानस आहे.”

त्याचबरोबर, “औद्योगिक धोरणाच्या माध्यमातून राज्यातील विविध क्षेत्रांमध्ये उद्योगधंदे वाढवले जातील. यासोबत रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील. नव्या धोरणामुळे महाराष्ट्र देशातील आघाडीचे औद्योगिक राज्य म्हणून अधिक सक्षमपणे पुढे येईल” असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

वाढवण बंदर विकासासाठी मोठी गुंतवणूक (Budget 2025-26)

यावेळी, औद्योगिक धोरणासोबतच अजित पवार यांनी राज्यातील सागरी वाहतूक क्षेत्रासाठी महत्त्वाच्या वाढवण बंदर विकास प्रकल्पाची माहिती दिली. त्यांनी सांगितलेकी, जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण आणि महाराष्ट्र सागरी मंडळ संयुक्तरीत्या पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर विकसित करणार आहेत. या प्रकल्पासाठी 76,220 कोटी रुपयांची भव्य गुंतवणूक करण्यात येणार आहेत, राज्य सरकारचा त्यात 26% सहभाग असेल. वाढवण बंदराच्या माध्यमातून दरवर्षी 300 दशलक्ष मेट्रिक टन मालवाहतूक करण्याची क्षमता निर्माण केली जाणार आहे.

दरम्यान, सन 2030 पर्यंत वाढवण बंदरातून मालवाहतूक सुरू होण्याचा अंदाज आहे. (Budget 2025-26) त्यामुळे हे बंदर जागतिक स्तरावर कंटेनर हाताळणाऱ्या पहिल्या दहा बंदरांमध्ये स्थान मिळवेल. त्यामुळे महाराष्ट्र सागरी वाहतुकीतील एक महत्त्वाची महासत्ता म्हणून उदयास येईल. या बंदराच्या विकासासोबतच अजित पवार यांनी आणखी एका महत्त्वाच्या योजनेची घोषणा केली आहे. अजित पवार यांनी माहिती दिली की, वाढवण बंदराजवळ मुंबईसाठी तिसरे विमानतळ उभारले जाईल. याच परिसरात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे स्थानक असेल.

SBI ची म्युच्युअल फंड योजना!! 10 हजार रुपये गुंतवल्यास होईल कोट्यावधींचा फायदा

SBI Scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्याच्या काळात भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी योग्य गुंतवणुकीची निवड करणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी अनेक पर्याय उपलब्ध असले तरी दीर्घकालीन आणि शिस्तबद्ध गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंडातील SIP (Systematic Investment Plan) हा एक उत्तम पर्याय मानला जातो. त्यामुळे आज आपण SIP प्रक्रियेविषयी जाणून घेणार आहोत.

SIP म्हणजे काय?

SIP म्हणजे निश्चित कालावधीसाठी ठराविक रक्कम म्युच्युअल फंडात गुंतवण्याची एक योजना आहे. यामध्ये तुम्ही महिन्याला ठराविक रक्कम गुंतवू शकता आणि दीर्घकाळात भांडवल वाढवू शकता. ही गुंतवणूक बाजाराच्या चढ-उतारांवर आधारित असली तरी, लाँग-टर्ममध्ये ती अधिक सुरक्षित आणि फायद्याची ठरू शकते.

गुंतवणुकीचे फायदे

जर तुम्ही आर्थिक स्थैर्य आणि मोठ्या परताव्याच्या शोधात असाल, तर म्युच्युअल फंडाच्या इक्विटी स्कीममध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकते. या गुंतवणुकीत दीर्घकालीन काळात अधिक परतावा मिळण्याची शक्यता असते. उदाहरणार्थ, जर तुम्ही दरमहा १०,००० रुपये गुंतवले, तर दीर्घकालीन गुंतवणुकीमुळे तुम्ही कोट्यधीश होऊ शकता.

लार्जकॅप आणि मिडकॅप स्टॉक्समध्ये गुंतवणूक का करावी?

लार्जकॅप कंपन्या या स्थिर असतात आणि दीर्घकाळ टिकणारे परतावे देतात, तर मिडकॅप कंपन्यांमध्ये वाढीची क्षमता अधिक असते. त्यामुळे, दोन्ही प्रकारच्या स्टॉक्समध्ये गुंतवणूक केल्यास संतुलित आणि फायदेशीर पोर्टफोलिओ तयार करता येतो.

SBI लार्ज अँड मिडकॅप फंड

SBI लार्ज अँड मिडकॅप फंड हा ओपन-एंडेड इक्विटी फंड आहे. जो लार्जकॅप आणि मिडकॅप दोन्ही प्रकारच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतो. हा फंड विविध क्षेत्रांतील कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतो, त्यामुळे जोखीम कमी होते आणि परताव्याच्या संधी वाढतात.

१०,००० रुपयांची गुंतवणूक केल्यास ६.७५ कोटी रुपयांचा नफा

जर तुम्ही दरमहा १०,००० रुपये या फंडात गुंतवले, तर दीर्घकाळात तुम्हाला मोठा फायदा होऊ शकतो. जसे की,

  • – ३२ वर्षांत ही रक्कम तब्बल ६.७५ कोटी रुपये होऊ शकते.
  • – याचा सरासरी १५.७१% वार्षिक परतावा आहे.
  • – १०-१५ वर्षांसाठी परतावा १५% पर्यंत, तर
  • – ५ वर्षांसाठी १८.४४% आणि ३ वर्षांसाठी १३.६५% परतावा आविचार

SBI म्युच्युअल फंड

SBI म्युच्युअल फंड ही भारतातील आघाडीची असेट मॅनेजमेंट कंपनी आहे. एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे ही एक शिस्तबद्ध आणि फायदेशीर पद्धत आहे. खास म्हणजे, SBI लार्ज अँड मिडकॅप फंडासारख्या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास तुमच्या संपत्तीमध्ये मोठी वाढ होऊ शकते. त्यामुळे इच्छुक ग्राहकांनी लवकरात लवकर या योजनेत गुंतवणूक करण्याचा विचार करावा.

संभाजीनगरमध्ये ऊसाचा ट्रक पलटी, 17 मजूर ऊसाच्या मोळ्यांखाली दबले, 6 जणांचा मृत्यू

sambhajinagar

रस्ते अपघातांमध्ये दिवसेंदिवस मोठी वाढ झालेली दिसून येत असतानाच छत्रपती संभाजी नगर मधून आणखी एक मोठ्या अपघाताची बातमी समोर येत आहे. उसाने भरलेल्या ट्रक चा मोठा अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की या घटनेमध्ये आत्तापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला असून 11 जण गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना रात्री बारा ते एक यादरम्यान घडली असल्याचे बोलले जात आहेत तसंच कन्नड पिसोर रस्त्यावर ह्या ट्रकचा भीषण अपघात झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार उसाने भरलेल्या ट्रकवर 17 मजूर बसून चालले होते. त्यावेळी अचानक ट्रक पलटी झाला आणि त्यामुळे मजूर उसाखालील दाबले गेले. मध्यरात्रीची वेळ असल्यामुळे कोणतीही मदत यांना मिळू शकली नाही आणि त्यामुळेच या घटनेमध्ये 6 मजुरांचा मृत्यू झाला असून जखमी झालेल्या 11 मजुरांना वाचवण्यात यश आलं आहे. जखमी झालेल्या व्यक्तींवर सध्या उपचार सुरू असून ही घटना नेमकी कशी झाली याचा तपास आता पोलीस करत आहेत.

मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे

प्राप्त झालेल्या माहितीनुसार या अपघातामध्ये
किसन धनु राठोड
मनोज नामदेव चव्हाण
विनोद नामदेव चव्हाण
मिथुन महारु चव्हाण
कृष्णा मूलचंद राठोड सर्व राहणार सातकुंड
ज्ञानेश्वर देविदास चव्हाण राहणार बेलखेडा असे मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे असल्याची माहिती समोर आली आहे.

नमो शेतकरी महासन्मान निधीत वाढ होणार? शेतकऱ्यांना दरमहा 3000 मिळण्याची शक्यता

Namo Shetkar Mahasamman Fund

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक साह्य करण्यासाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना (Namo Shetkari Mahasamman Fund Scheme) सुरू केली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi) योजनेतून मिळणाऱ्या वार्षिक 6000 च्या मदतीव्यतिरिक्त, राज्य सरकारही तितकीच रक्कम देत आहे. यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सध्या एकूण 12,000 वार्षिक मदत मिळत आहे.

महत्वाचे म्हणजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी या योजनेतील मदतीत 3000 ची वाढ करण्याची घोषणा केली होती. त्यामुळे भविष्यात शेतकऱ्यांना वार्षिक 15,000 अनुदान मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता आज उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात नमो शेतकरी महासन्मान निधीतील वाढीबाबत सरकार घोषणा करेल का, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

शेतकऱ्यांना किती मदत मिळाली?

राज्य सरकारने सन 2023-24 पासून ही योजना राबवायला सुरुवात केली होती. या योजनेअंतर्गत ऑक्टोबर 2024 पर्यंत राज्यातील 91.45 लाख शेतकऱ्यांना एकूण 9055.83 कोटी निधी थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे. याचा शेवटचा हप्ता ऑक्टोबर 2024 मध्ये वर्ग करण्यात आला होता.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी

केंद्र सरकारने अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी 2018-19 मध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM-Kisan) सुरू केली. या योजनेत पात्र शेतकरी कुटुंबांना 6000 वार्षिक मदत तीन हप्त्यांमध्ये मिळते. योजना सुरू झाल्यापासून ऑक्टोबर 2024 पर्यंत महाराष्ट्रातील 117.55 लाख शेतकऱ्यांना एकूण 33,468.55 कोटी रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली.

त्याचबरोबर, पीएम-किसान योजनेचे लाभार्थी असलेल्या शेतकऱ्यांना एकूण 19 हप्त्यांचे 38,000 मिळाले आहेत. यामुळे केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांच्या मदतीने शेतकऱ्यांना सध्या मोठा आर्थिक आधार मिळत आहे.

दरम्यान, राज्यातील अनेक शेतकरी अवकाळी पावसामुळे आणि शेतीवरील वाढत्या खर्चामुळे आर्थिक संकटात आहेत. अशा परिस्थितीत नमो शेतकरी महासन्मान निधीमध्ये वाढ झाल्यास शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. आता ही वाढ आजच्या अर्थसंकल्पात जाहीर होते का? याकडे संपूर्ण कृषी क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

पुण्याच्या राजकारणात मोठा भूकंप!! रवींद्र धंगेकर काँग्रेसची साथ सोडून शिवसेनेच्या वाटेवर

Ravindra Dhangekar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| विधानसभा निवडणुकीत 2024 (Assembly Election) मध्ये पुण्यातून काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांना पराभवाचा सामना करावा लागला. तसेच, इतर ठिकाणी ही काँग्रेसला (Congress ) काही जागांवरच समाधान मानावे लागले. त्यामुळे आता काँग्रेसचे अनेक नेते पक्षांतर करण्याच्या तयारीमध्ये असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. महत्वाचे म्हणजे, रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांचे देखील नाव या चर्चेमध्ये आहे. कारण आज स्वतः धंगेकर यांनी काँग्रेस पक्ष सोडणार असून ते शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश करणार असल्याचे सांगितले आहे.

माध्यमांशी बोलताना रवींद्र धंगेकर म्हणाले की, “एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे मी काहीही मागितलं नाही, त्याच्यासोबत काम करायचं आहे. काँग्रेस सोडत असताना वाईट वाटतं आहे. एकनाथ शिंदे यांनी दोन ते तीन वेळा फोन केला. उदय सामंत देखील भेटले होते, त्यांनी आमच्याकडे या असं सांगितलं आहे” अशी माहिती धंगेकर यांनी दिली.

त्याचबरोबर, “ज्या पक्षासोबत मी गेली १०-१२ वर्षे काम करत आहे. त्यामुळे पक्षातील अनेकांसोबत कौटुंबिक नातं तयार झाले आहे. सर्वांनीच माझ्यावर प्रचंड प्रेम केले आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सगळ्यांना माझ्यापाठी ताकद उभी केली. मी निवडणूक हरलो हा नंतरचा विषय,पण सगळ्यांना त्यांच्या ताकदीप्रमाणे कष्ट केले. एखादा पक्ष सोडताना दु:ख होतं याचं कारणच नाही, शेवटी आपण माणूस आहे. कार्यकर्ते बऱ्याच दिवसांपासून ऐकत नव्हते. मी मतदारांशी संवाद साधला. त्यांचं म्हणणं, आता आमची कामं कोण करणार, लोकशाहीत सत्ता असल्याशिवाय आपण सर्वसामान्यांना न्याय देऊ शकत नाही.” असे रवींद्र धंगेकर यांनी सांगितले.

पुढे बोलताना, “मी मध्यंतरी एकनाथ शिंदेंना कामानिमित्त भेटलो होतो. मी उदय सामंत यांच्याशीही मी संपर्कात होतो. त्यांनी वारंवार म्हटलं की, आमच्यासोबत काम करा. याची बरीच चर्चा झाली. मी ज्या भागात वर्षानुवर्षे काम करत आहे, तेथील लोकांशी बोललो. मग लक्षात आलं की, तुम्हाला काम तर करावचं लागेल. पण सत्तेशिवाय काम होत नाही. एकनाथ शिंदे यांनी मी काँग्रेसचा आमदार असतानाही मला मदत केली होती. मी आज माझा निर्णय घेतला, आपण शिंदे साहेबांसोबत काम करावं. आमची संध्याकाळी सात वाजता भेट होईल. त्यानंतर आमचा निर्णय होईल” अशी माहिती धंगेकर यांनी दिली.

काँग्रेस सोडण्याचे कारण काय?

दरम्यान, “शिंदे साहेब आणि उदय सामंत यांनी मला अनेकदा फोन केली. धंगेकर आमच्याकडे या, अशी ऑफर दिली. आमच्यात मित्रत्त्वाचं नातं आहे.त्यामुळे एकत्र काम करण्याचे ठरवले. माझा कोणाच्या बांधाला बांध नाही. त्यामुळे नाराजीचा प्रश्न नाही. माझी काँग्रेस पक्षावर कधीही नाराजी नव्हती. त्यांनी मला भरभरुन दिलं. पण राजकारणात कार्यकर्त्यांच्या भावना महत्त्वाच्या असतात. कार्यकर्त्यांचा कुठेतरी विचार करणं गरजेचे आहे. मी आज एकनाथ शिंदे यांना भेटणार आहे. त्यानंतर मी निर्णय घेईन” असे माध्यम माध्यमांशी बोलताना रवींद्र धंगेकर म्हणाले.