Wednesday, December 17, 2025
Home Blog Page 34

वसई- विरारमध्ये ७ नवीन उड्डाणपूल; वाहतूक कोंडी कायमची मिटणार

Vasai Virar Flyover

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वसई- विरार महापालिका मुंबई विभागातील अतिशय महत्वाची महापालिका म्हणून ओळखली जाते. नाशिक आणि पालघर जिल्हातील लोकांना मुंबईत यायचे असेल तर या शहरातूनच जावे लागते. त्यामुळे कायमच वसई विरार भागात गर्दी असते. याचाच विचार करून काही वर्षापूर्वी महानगर पालिकेने १२ उड्डाणपुलाचा प्रस्ताव राज्य सरकारला दिला होता, परंतु बजेट अभावी तेव्हापासून काम रखडले आहे. लोकांच्या वारंवार मागणीनंतर, महानगरपालिकेने पुन्हा प्रस्ताव पाठवला आणि ऑगस्ट २०२४ मध्ये प्रस्तावित उड्डाणपुलांच्या डिझाइनमध्ये बदल करण्यात आला असून, उड्डाण पुलांची संख्या १२ वरून ७ करण्यात आली. या बदलामुळे ३ उड्डाणपूल एकत्र जोडण्यात येणार आहेत आणि काही स्थानिक जंक्शन्सवर प्रस्ताव स्वतंत्र ठेवण्यात आले आहेत. या उड्डाणपुलाचा थेट फायदा वसई विरार मधील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

मुंबई,नवी मंबई आणि ठाणे या तिन्ही शहराला जवळ असणारी वसई विरार महानगर पालिका आहे.त्यामुळे मुंबईतील बाधकाम व्यावसायिकांचा नवीन बांधकामासाठी वसई विरार हा सोयीचा पर्याय ठरतो. त्यामुळे या भागात नवीन वस्त्या आणि बाधकाम संकुल मोठ्या प्रमाणात विकसित झाले आहे.आजच्या परिस्थितीचा विचार केला तर वसईची लोकसंख्या जवळपास ३० लाखाच्या घरात गेली आहे. वाढत्या नागरीकरणामुळे वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे. वाहनांची संख्या हि आता दुप्पट झालेली पहायेला मिळत आहे.या सर्वांचा विचार करत एमएमआरडीएने प्रस्तावित उड्डाणपुलाला निधी मंजूर केला आहे.

२०१४ मध्ये १२ उड्डाणपुलांचा प्रस्ताव

भविष्यातील लोकसंख्या लक्षात घेऊन प्रमुख जंक्शन आणि रस्त्यांवर १२ उड्डाणपुल बांधण्याची गरज व्यक्त करण्यात आली होती. वसई विरार महानगरपालिकेने २०१४-१५ मध्ये १२ उड्डाणपुलांचा पहिला प्रस्ताव हा राज्य सरकारला पाठविला होता , परंतु बजेट अभावी काम रखडले होते . लोकांच्या सततच्या मागणीनंतर, महानगरपालिकेने पुन्हा प्रस्ताव पाठवला आणि ऑगस्ट २०२४ मध्ये प्रस्तावित उड्डाणपुलांच्या डिझाइनमध्ये काही बदल केले. त्यानुसार, १२ पैकी ३ उड्डाणपुल एकमेकांना जोडले जातील आणि २ उड्डाणपुलांचे रेल्वे उड्डाणपुलांमध्ये रूपांतर केले जातील.यामुळे पुलाची संख्या ७ करण्यात आली आहे.

या ठिकाणी ७ उड्डाणपुल उभारण्यात येणार –

१) बोलिंग-सायन्स गार्डन (विरार)
२) मनवेल पाडा-फुलपाडा (विरार)
३) वसंत नगरी एव्हर शाईन सिटी (वसई)
४. माणिकपूर-बाभोला नाका (वसई)
५) चंदन नाका (नालासोपारा)
६) रेंज ऑफिस (गोखीवारे, वसई)
७) पाटणकर पार्क- लक्ष्मी शॉपिंग सेंटर (नालासोपारा)

Manikrao Kokate Rummy : माणिकराव कोकाटे तब्बल इतका वेळ रम्मी खेळले; चौकशी अहवालात धक्कादायक खुलासा

Manikrao Kokate Rummy

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Manikrao Kokate Rummy। भर विधिमंडळ सभागृहात रम्मीचा डाव खेळल्याने आणि त्याचे विडिओ व्हायरल झाल्याने अडचणीत आलेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे. मला रमी खेळता येत नाही, मी फक्त रमीची जाहिरात स्किप करत होतो अशी सारवासारव माणिकराव कोकाटेंनी केली होती. मात्र आता विधिमंडळ चौकशी समितीच्या अहवालात मात्र वेगळीच खळबळजनक माहिती समोर आली आहे. अधिवेश चालू असताना माणिकराव कोकाटे तब्बल १८ ते २२ मिनिटे रम्मी खेळत असल्याची माहिती समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी याबाबत ट्विट केलं आहे.

काय म्हणाले रोहित पवार – Manikrao Kokate Rummy

खरं तर माणिकराव कोकाटे यांचं रम्मी प्रकरण (Manikrao Kokate Rummy) सुरुवातीपासूनच रोहित पवारांनी उचलून धरलं आहे. कोकाटे यांचे रम्मी खेळतानाचे विडिओ सुद्धा रोहित पवारांनी यापूर्वी जनतेसमोर आणले होते. आज तर त्यांनी विधिमंडळ चौकशी समितीचा दाखला देत माणिकराव कोकाटेंवर नवा बॉम्ब टाकला आहे. रोहित पवारांनी ट्विट करत म्हंटल, कृषिमंत्री सभागृहात केवळ ४२ सेकंद पत्ते खेळत नव्हते तर तब्बल १८ ते २२ मिनिटे पत्ते खेळत असल्याचा विधानमंडळाच्या चौकशीचा अहवाल असून हा अहवाल मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांच्याकडे देखील सादर केला असल्याची माहिती आहे. सरकार याबाबत खुलासा करेल का? सभागृहात तब्बल १८ ते २२ मिनिटे पत्ते खेळणाऱ्या कृषिमंत्र्यावर हे सरकार कारवाई करणार नसेल तर मुख्यमंत्र्यांना स्व. अटलजींच्या तर उपमुख्यमंत्री अजितदादांना स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांचा वारसा सांगण्याचा नैतिक अधिकार उरतो का? असा सवालही रोहित पवारांनी केला. तसेच हॅशटॅग पत्ते खेळणारा मंत्री असं म्हणत रोहित पवारांनी माणिकराव कोकाटे याना डिवचलं सुद्धा आहे.

दरम्यान यापूर्वीही रोहित पवारांनी कोकाटे यांचा एक व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओत माणिकराव कोकाटे हे सभागृहात बसलेले असताना मोबाईलवर जंगली रम्मी खेळत (Manikrao Kokate Rummy) असल्याचे पाहायला मिळत होते. या व्हिडीओला रोहित पवारांनी कॅप्शन देत जंगलीरमीपेआओना_महाराज…! असे म्हटले होते. सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही म्हणूनच शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना, राज्यात रोज ८ शेतकरी आत्महत्या करत असताना सुद्धा काही कामच नसल्याने कृषिमंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येत असावी. रस्ता भरकटलेल्या या मंत्र्यांना आणि सरकारला पिकविमा-कर्जमाफी-भावांतर ची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची “कभी गरीब किसानो कीं खेतीपर भी आओ ना महाराज” ही आर्त हाक ऐकू येईल का?” असा सवाल रोहित पवारांनी केला होता.

Nanded Pune Vande Bharat : मराठवाड्यासाठी आणखी एक वंदे भारत एक्सप्रेस; या 4 जिल्ह्यांतुन धावणार

Nanded Pune Vande Bharat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Nanded Pune Vande Bharat । मागच्या काही महिन्यापासून महाराष्ट्रात नवनवीन वंदे भारत एक्सप्रेस सुरु होत आहे. वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनमुळे प्रवाशांना आरामदायी प्रवासाचा लाभ घेता येतोय. सध्या महाराष्ट्रात सुमारे १० वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन धावत आहेत. आता यात आणखी एका ट्रेनची भर पडणार आहे. हि नवी वंदे भारत एक्सप्रेस पुण्याहून नांदेडसाठी धावेल. यामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील कनेक्टिव्हिट्री आणखी वाढेल. नांदेड, लातूर आणि धाराशिव मार्गे पुणे असा तिचा रूट असेल.

कधीपासून सुरु होणार – Nanded Pune Vande Bharat

खरं तर नांदेड हुन पुण्याला शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी मोठ्या प्रमाणावर तरुण येत असतात. पुणे हे नोकरीचे मोठे केंद्र असल्याने फक्त नांदेडच नव्हे तर लातूर, धाराशिव सह मराठवाड्यातील लोकांचा याठिकाणी मोठा वावर आहे. परंतु सध्याच्या स्थितीत नांदेडहुन पुण्याला ये जा करण्यासाठी एकही ट्रेन उपलब्ध नाही. यामुळे या भागातील हजारो विद्यार्थी आणि नोकरदारांना प्रवास करताना मोठ्या अडचणी निर्मांण होतात. याच पार्श्वभूमीवर नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी नांदेड-पुणे वंदे भारत एक्सप्रेससाठी (Nanded Pune Vande Bharat) सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या या प्रयत्नांना यश आलं असून केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नांदेड पुणे वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला आहे. येत्या डिसेंबर पासून हि ट्रेन प्रवाशांच्या सेवेत येईल.

रेल्वेमंत्र्यांनी दिलेल्या निवेदनात खासदार रवींद्र चव्हाण यांनी म्हंटल की नांदेड, लातूर आणि धाराशिव मार्गे हाय-स्पीड ट्रेनमुळे (Nanded Pune Vande Bharat) या भागातील लाखो प्रवाशांना फायदा होईल. ५५० किमी लांबीची वंदे भारत एक्सप्रेस जलद आणि अधिक आरामदायी पर्याय देत प्रवासाचा वेळ खूप मोठ्या प्रमाणावर कमी करेल अशी अपेक्षा आहे. तसेच लातूर रोड आणि परळी वैजनाथ येथे लोको-मोटिव्ह बदलांमुळे होणाऱ्या विलंबामुळे ६४६ किमीचा प्रवास पूर्ण करण्यासाठी १६ तासांपेक्षा जास्त वेळ लागणारा पनवेल-नांदेड एक्सप्रेस (१७६१३) बद्दलही चव्हाण यांनी चिंता व्यक्त केली. त्यांनी सांगितले की पनवेल-कुर्डूवाडी लेग (३०३ किमी) ६ तास २० मिनिटे घेते, तर कुर्डूवाडी-नांदेड लेग (३७० किमी) १० तास २० मिनिटे घेते. त्यामुळे हे टाळण्यासाठी लातूर रोड आणि परळी वैजनाथ स्टेशनवरील लाईन चौपट करावी अशी मागणी रवींद्र चव्हाण यांनी केली. यामुळे इंजिन बदलण्याचा वेळ कमी होईल, दररोज १०-१२ गाड्यांचा फायदा होईल आणि भारतीय रेल्वेच्या खर्चात बचत होईल असं त्यांनी म्हंटल.

ST महामंडळाची नवी योजना; पार्सल सेवा आता चालक-वाहकांच्या जबाबदारीवर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एस.टी.) आपली सेवा अधिक व्यापक आणि फायदेशीर करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचले आहे. महामंडळाने आता पार्सल वाहतूक सेवेसाठी चालक आणि वाहक यांच्यावरच जबाबदारी सोपवली असून, ही सेवा सुरू करण्याची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे.यासाठी २०२७ पर्यंत खासगी कंपनीला टेंडर दिले आहे. यामुळे नागरिकांची अधिक सोय होणार असून, पार्सल सेवा सुरक्षित होणार आहे.

खासगी कंपनीला २०२७ पर्यंतचे टेंडर

एस.टी मंडळाच्या निर्णयानुसार आता बसमधून छोट्या-मोठ्या वस्तूंचे पार्सल देखील पाठवता येणार आहे.ही जबाबदारी संबंधित गाड्यांचे चालक आणि वाहक यांच्यावर असणार आहे. पार्सलची नोंद, सुरक्षितता, पोहोचवण्याची प्रक्रिया यावर नियंत्रण ठेवण्याचे काम आता त्यांच्यावर असणार आहे. महसूल वाढवणे आणि एस.टी.ची सेवा अधिक उपयुक्त बनवणे, गावोगावी आणि तालुक्यांमधील पार्सल वाहतुकीसाठी खासगी वाहनांवर असलेली निर्भरता कमी करणे. यासाठी महामंडळाने हा निर्णय घेतला आहे. तसेच पार्सल बाबतीत अनेक तक्रारी एस टी. मंडळाकडे आल्या होत्या.त्यामध्ये पार्सलची मोडतोड होणे, वेळेवरती पार्सल न जाणे, यामुळे एस टी.मंडळाने खासगी कंपनीला पार्सल सुविधेचे काम दिले आहे. यापुढे खासगी कंपनीकडे पार्सल पाठविण्याची जबाबदारी असणार आहे. यासाठी कंपनी बसस्थानकावर पार्सलसाठी ऑफिस काढणार आहे.

महामंडळाच्या निर्णयामागील उद्देश म्हणजे महसूल वाढवणे आणि एस.टी.ची सेवा अधिक उपयुक्त बनवणे, गावोगावी आणि तालुक्यांमधील पार्सल वाहतुकीसाठी खासगी वाहनांवर असलेली निर्भरता कमी होईल, तसेच अवैध्यारित्या पार्सल पाठविण्यावर पायबंध बसेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

परिवहन खात्याच्या महसुलात वाढ

महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी म्हणाले, “सध्या अनेक बसगाड्या अर्धवट प्रवाशांसह धावत आहेत. या रिकाम्या जागेचा उपयोग पार्सल वाहतुकीसाठी केल्यास, महसूलात चांगली वाढ होऊ शकते. त्यामुळे चालक आणि वाहक यांना त्याचं प्रशिक्षण देऊन, त्यांना हे काम सोपवण्यात येत आहे.” कारण यापूर्वी पार्सल सेवा सुरू झाल्यानंतर ग्रामीण भागातील नागरिकांना विशेषतः मोठा फायदा होणार आहे. स्थानिक व्यापाऱ्यांना तसेच सर्वसामान्य जनतेला सुलभ, विश्वासार्ह आणि वेळेवर पार्सल सेवा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Mumbai Solapur Vande Bharat Train : आजपासून मुंबई-पुणे-सोलापूर वंदे भारत ट्रेनमध्ये मोठा बदल

Mumbai Solapur Vande Bharat Train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mumbai Solapur Vande Bharat Train। मुंबई ते सोलापूर व्हाया पुणे वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनमध्ये आजपासून मोठा बदल पाहायला मिळणार आहे. मुंबई -सोलापूर या वंदे भारत एक्सप्रेसच्या डब्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला आहे. आजपासून या एक्सप्रेस ट्रेनला २० डब्बे मिळणार आहे. यापूर्वी मुंबई -पुणे – सोलापूर एक्सप्रेस ट्रेनला १६ डब्बे होते. मात्र आता आजपासून २० डब्यांना घेऊन हि वंदे भारत ट्रेन धावेल. त्यामुळे प्रवाशांना गर्दीपासून सुटका मिळेल आणि अधिकाधिक सोयीचा लाभ घेता येईल. रेल्वे विभागाने ४ डब्बे वाढवल्याने २० ते ३० टक्के प्रवासी संख्या आणखी वाढेल.

खरं तर मुंबई पुणे सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस (Mumbai Solapur Vande Bharat Train) ट्रेनच्या डब्यांची संख्या वाढवण्यासाठी गेल्या ४-५ महिन्यांपासून मागणी केली जात होती. या वाढत्या मागणीनंतर रेल्वे बोर्डाकडे यासंदर्भात प्रस्ताव पाठवण्यात आला होता. अखेर हा प्रस्ताव मंजूर झाला. आजपासून या मार्गावर २० डब्याची वंदे भारत ट्रेन धावेल. रेल्वे विभागाच्या या निर्णयामुळे प्रवाशांना तिकीट उपलब्ध होण्यासही मदत झाली आहे आणि महत्वाची बाब म्हणजे वाढत्या गर्दीपासून सुटका मिळाली आहे. दररोज हजारो प्रवासी या ट्रेनमधून प्रवास करतात. मुंबई वरून सोलापूरला देवदर्शनाला जाणाऱ्या भाविकांची संख्या जास्त आहे, त्यामुळे या ट्रेनला गर्दी असते. आणि दुसरी बाब म्हणजे हि वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन पुण्यावरून जात असल्याने पुणेकर प्रवाशांची संख्याही मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते.

वंदे भारत एक्सप्रेसचे डबे वाढवावेत, अशी मागणी अनेक महिन्यांपासून होत होती. रेल्वे बोर्डाने अखेर या प्रस्तावास मान्यता दिली आहे. आजपासून ही वंदे भारत एक्सप्रेस (Mumbai Solapur Vande Bharat Train) गाडी नियोजित वेळापत्रकानुसार 20 प्रवासी डब्यांसह धावणार आहे. अशी माहिती मध्य रेल्वे, पुण्याचे जनसंपर्क अधिकारी हेमंत कुमार बेहरा यांनी दिली.

कुठून कशी धावते मुंबई सोलापूर वंदे भारत – Mumbai Solapur Vande Bharat Train

मुंबई-पुणे-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेस ६ तास ३० मिनिटांत मुंबईवरून सोलापूरला पोहचते. हि वंदे भारत एक्सप्रेस दररोज सायंकाळी ४ वाजता ही एक्स्प्रेस मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सुटते आणि रात्री १० वाजून ३० मिनिटांनी सोलापूर स्थानकावर पोहोचते. दुसऱ्या दिशेने, सकाळी ६ वाजता सोलापूर स्थानकावरून सुटून दुपारी १२ वाजून ३० मिनिटांनी मुंबईत परत येते. वाटेत हि ट्रेन दादर (Dadar), कल्याण (Kalyan), पुणे (Pune), कुर्डूवाडी (Kurduwadi), सोलापूर (Solapur) आणि दौंड स्थानकावर थांबते.

PM Kisan Yojana : PM किसान योजनेचे 2000 रुपये ‘या’ दिवशी शेतकऱ्यांना मिळणार

PM Kisan Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन PM Kisan Yojana । देशभरातील बळीराजा पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या २० व्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत आहे. खरं तर यापूर्वी फेब्रुवारी मध्ये शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे पैसे मिळाले होते. त्यानंतर ४ महिने उलटूनही पीएम किसान योजनेचं पैसे शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. त्यामुळे बळीराजा चिंतेत आहे. मात्र आता पंतप्रधान किसान सन्मान निधीबाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे. मीडिया रिपोर्ट्स नुसार, येत्या २ ऑगस्टल पीएम किसान सन्मान निधीचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होऊ शकतात. मात्र सरकार कडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा जाहीर करण्यात आलेली नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी २ ऑगस्ट रोजी वाराणसीच्या दौऱ्यावर असतील आणि या काळात ते उत्तर प्रदेशला १ हजार कोटी रुपयांचे प्रकल्प भेट देतील. याच कार्यक्रमात ते शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा २० वा हप्ता (PM Kisan Yojana) वितरित करू शकतात. यापूर्वी २० जुलैला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २००० रुपये जमा होतील असं बोललं जात होते. मात्र त्यावेळी पैसे न मिळाल्याने शेतकऱ्यांचा मोठा हिरमोड झाला. आता मात्र बळीराजा २००० रुपयांकडे मोठ्या आशेने बघत आहे.

सरकारनं ट्विट काय केलं ? PM Kisan Yojana

केंद्र सरकारने या योजनेबद्दलच ट्विट केलं आहे. कृषी मंत्रालयाने X वरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) ही एक केंद्रीय योजना आहे, जी २४ फेब्रुवारी २०१९ रोजी सुरू करण्यात आली होती. या योजनेचे उद्दिष्ट शेतीयोग्य जमीन असलेल्या शेतकरी कुटुंबांच्या आर्थिक गरजा पूर्ण करणे आहे. याअंतर्गत, देशभरातील शेतकऱ्यांना दरवर्षी ₹ 6,000/- ची आर्थिक मदत दिली जाते, जी DBT (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) द्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात चार महिन्यांच्या अंतराने तीन समान हप्त्यांमध्ये हस्तांतरित केली जाते.

Nashik Akkalkot Expressway : नाशिक ते अक्कलकोट नवा एक्सप्रेस वे; 9 तासांचं अंतर 4 तासांत पूर्ण

Nashik Akkalkot Expressway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Nashik Akkalkot Expressway । उत्तर महाराष्ट्रतुन अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकासांठी आनंदाची बातमी आहे. लवकरच नाशिक ते अक्कलकोट एक्सप्रेसवे तयार होणार आहे. वास्तविक केंद्र सरकारने हा प्रकल्प बीओटी तत्वावर उभारण्याचा निर्णय जाहीर केला आहे. म्हणजेच बांधा वापरा हस्तांतरित करा … सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे च्या अंतर्गत नाशिक ते अक्कलकोट महामार्ग तयार केला जाणार आहे. जवळपास ३७४ किलोमीटर अंतराचा हा प्रकल्प प्रवाशांचा निम्मा वेळ वाचवेळ. सध्या नाशिकहून अक्कलकोटला जाण्यासाठी ९ तास लागतात, परंतु आता नव्या महामार्गानंतर हेच अंतर ४ तासांवर येईल.

खरं तर सुरत – चेन्नई ग्रीन फिल्ड एक्सप्रेस वे चे दोन भाग करण्यात आले आहेत. या मार्गाचे सुरत ते सोलापूर आणि सोलापूर ते चेन्नई असे दोन महत्त्वाच्या टप्पे करण्यात आले आहेत. यातही काही टप्पे आहेत. त्यातील नाशिक ते अक्कलकोट महामार्ग (Nashik Akkalkot Expressway) २ टप्प्यात बांधला जाईल. त्यातील पहिला टप्पा म्हणजे नाशिक ते अहिल्यानगर आणि दुसरा टप्पा म्हणजे अहिल्यानगर ते अक्कलकोट… यातील नाशिक ते अहिल्यानगर हा प्रवास १५२ किलोमीटर आहे तर अहिल्यानगर ते अक्कलकोट हा महामार्ग २२२ किलोमीटर असेल. म्हणजेच हा एकूण प्रवास हा ३७४ किलोमीटर अंतराचा असेल. बीओटी तत्वावर हा एक्सप्रेस वे तयार करण्यात येणार असल्याने यामुळे सरकारचा मोठा खर्च वाचणार आहे . तसेच या नव्या निर्णयामुळे या प्रकल्पाचे काम जलद गतीने पूर्ण होईल अशी आशा आहे.

कसा आहे प्रकल्प? Nashik Akkalkot Expressway

सुरत – चेन्नई ग्रीन फिल्ड एक्सप्रेस वे हा भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक लांबीचा महामार्ग आहे. या महामार्गाची लांबी 1271 किलोमीटर इतकी आहे. गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यातून जाईल. महारष्ट्राबाबत सांगायचं झाल्यास, राज्यातील नाशिक, अहिल्यानगर, बीड, धाराशिव अन सोलापूर या शहरातून हा एक्सप्रेसवे जाईल. सहा मार्गिकेचा हा महामार्ग प्रवाशांचा प्रवास सोप्पा आणि समृद्ध करेल. सहा महिन्यांपूर्वी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून नाशिक ते अक्कलकोट या टप्प्यासाठी हायब्रिड अॅन्युइटी माॅडेलनुसार निविदा जारी करण्यात आली होती. मात्र काही कारणास्तव हे निविदा प्रक्रिया रद्द झाली. त्यानंतर काही तांत्रिक आणि आर्थिक कारणांमुळे हा प्रकल्प बीओटी तत्वावर करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार एनएचएआयच्या सार्वजनिक- खासगी भागीदारी मूल्यांकन समितीने नुकतीच नाशिक-अक्कलकोट महामार्गाला मान्यता दिल्याची माहिती एनएचएआयच्या नाशिकमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

Donkey Milk : गाढवीच्या दुधाची चमच्याने विक्री!! किंमत वाचून तुम्हीही चाट पडाल

Donkey Milk

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Donkey Milk । मित्रानो, तुम्ही रोज म्हशीचे दूध पीत असाल, काहीजण गायीचे दूध पीत असतील… तर कधी कधी शेळीचे दूध पितानाही आपण अनेकांना बघितलं असेल. सध्याच्या मार्केट मध्ये तुम्ही ७० रुपये लिटर दूध खरेदी करत असाल. परंतु जर तुम्हाला कोणी म्हंटल कि माझ्याकडे फक्त एका चमचाभर दुधाची किंमत ५० रुपये आहे तर?? तुम्ही म्हणाल मला नको… परंतु आपल्या महाराष्ट्र्रात असं एक गाव आहे जिथे चमच्याभर दूध घ्यायला मोठी गर्दी बघायला मिळते.. कारण हे काय साधं सुध दूध नाही, तर गाढवीचे दूध आहे…. आणि आम्ही तुम्हाला ज्या गावाबद्दल सांगतोय त्या गावाचे नाव आहे वाडेगाव

सकाळच्या वेळेला दररोज एक व्यक्ती दोन गाढवींसह हातात लहान भांडं घेऊन परिसरात फिरत असतो.. “गाढवीचे दूध घ्या.. गाढवीचे दूध घ्या .. दूध!” असा आवाज तो देतो आणि हा आवाज ऐकताच नागरिकांची तोबा गर्दी बघायला मिळते. याठिकाणी महत्वाची बाब म्हणजे गाढवीचे हे दूध लिटरमध्ये नव्हे तर चमच्याने विकलं जाते.. आणि बघता बघता अवघ्या काही वेळेतच ते संपूनही जाते. गाढवीचे दूध (Donkey Milk) हे गायी, म्हैस पेक्षा जास्त पौष्टीक असल्यानेच ते महाग असूनही लोक पितात. विशेषताः लहान मुलांसाठी ते फायदेशीर असल्याचं दूध विक्रेत्यांच म्हणणं असते.

गाढवीणीच्या दुधाचे फायदे– Donkey Milk

१) गाढवीणीचे दूध कमी चरबी आणि कमी कोलेस्टेरॉलयुक्त असते, ज्यामुळे वजन नियंत्रित ठेवणाऱ्यांना आणि हृदयाच्या दृष्टीने फायदेशीर ठरते.

२) गाढवीणीच्या दुधात lactoferrin, lysozyme, immunoglobulins सारखी अँटीमायक्रोबिअल आणि अँटीवायरल प्रोटीन असतात. या बॅक्टीरिया विरुद्ध आपली रोगप्रतिकारशक्ती सुधारतात.

३) या दुधातील उच्च lactose आणि vitamins D, Ca, Mg मुळे कॅल्शियमचे शोषण अधिक होते. त्यामुळे हाड, दात व स्नायूंचे आरोग्य सुधारते.

४) विटॅमिन्स, ट्रिप्टोफॅन, अँटीऑक्सिडंट गुणधर्म या गुणांमुळे स्मरणशक्ती, एकाग्रता व मानसिक ताजेपणा वाढतो.

५) गाढविणीचे दूध शक्तीदायक असून त्यात स्निग्ध पदार्थाचे प्रमाण कमी असतं.

६) व्हिटॅमिन A, बी -1, बी -2, व्हिटॅमिन D आणि व्हिटॅमिन E चे प्रमाण असून गाढविणीचे दूध श्वसनविकारावर जालीम औषध आहे.

Awsaneshwar Temple Stampede : श्रावणाच्या पहिल्याच सोमवारी शंकराच्या मंदिरात चेंगराचेंगरी!! 2 ठार 38 जखमी

Awsaneshwar Temple Stampede

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Awsaneshwar Temple Stampede । आज श्रावण महिण्याचा पहिलाच सोमवार आहे. त्यामुळे शंभू महादेवाच्या मंदिरात भक्तांची मोठी गर्दी बघायला मिळतेय.. महादेवाला अभिषेक घातला जातोय, तसेच त्याची पूजा केली जातेय. परंतु याच दरम्यान, उत्तरप्रदेशात एक भीषण दुर्घटना घडली आहे. उत्तर प्रदेश येथील अवसनेश्वर मंदिरात शंभू महादेवाला जलाभिषेक सुरू असताना, एक विजेचा तार तुटला आणि पडला, ज्यामुळे टिन शेडमधून करंट गेला. विजेच्या धक्क्यामुळे चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरी दरम्यान सुमारे ३८ भाविक जखमी झाले, तर २ जणांचा मृत्यू झाला.

नेमकं काय घडलं? Awsaneshwar Temple Stampede

ही घटना आज पहाटे ३ वाजता घडली. श्रावणी सोमवार असल्याने पहाटे ३ वाजताही भाविकांची मोठी गर्दी अवसनेश्वर मंदिरात पाहायला मिळाली. यावेळी एका माकडाने विजेच्या तारेवर उडी मारल्याने तार तुटली. यानंतर अशी बातमी पसरली कि वायर तुटली आणि लोकांना करंट बसलाय… हे ऐकताच भाविकांना धक्का बसला.. जीव वाचवण्यासाठी भाविक धावू लागले आणि चेंगराचेंगरी झाली. यामध्ये २ लोकांचा मृत्यू झाला तर ३८ जखमी झाले.

या घटनेनंतर (Awsaneshwar Temple Stampede) मोठ्या संख्येने पोलिस घटनास्थळी दाखल झाले. सर्व जखमींना रुग्णवाहिकेने हैदरगड आणि त्रिवेदीगंज येथील आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले. एकूण १० जखमींना त्रिवेदीगंज सीएचसीमध्ये आणण्यात आले, त्यापैकी पाच जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना रेफर करण्यात आले आहे. त्याच वेळी, २६ जखमी भाविकांवर हैदरगढ सीएचसीमध्ये उपचार सुरू आहेत, त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याचं बोललं जातंय. ही घटना कशी घडली याचा तपास अजूनही सुरू आहे.

बाराबंकी जिल्हा दंडाधिकारी शशांक त्रिपाठी म्हणाले की, माकडांच्या उपद्रवामुळे तार तुटून टिन शेडवर पडली, ज्यामुळे करंट पसरला आणि नंतर चेंगराचेंगरीसारखी (Awsaneshwar Temple Stampede) परिस्थिती निर्माण झाली. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. दर्शन सुरळीत सुरू आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दुर्घटनेनंतर दुःख व्यक्त केलं आहे. तसेच मृतांच्या कुटुंबांबद्दल शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पोहोचून मदतकार्याला गती देण्याचे निर्देश दिले आहेत. या दुर्घटनेनंतर आता परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आली आहे. आणि मंदिरात आलेले लोक नियमित पद्धतीने दर्शन आणि पूजा करत आहेत.

TCS Layoffs 2025 : TCS 12000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार; IT क्षेत्रात मोठा उलटफेर

TCS Layoffs 2025

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन TCS Layoffs 2025 देशातील आणि जगातील आघाडीची IT कंपनी असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS ) ने कर्मचाऱ्यांना मोठा धक्का दिला आहे. यावर्षी तब्बल १२,२६१ कर्मचाऱ्यांची कपात करण्याची घोषणा कंपनीकडून करण्यात आली आहे. विशेष म्हणजे टीसीएसने या वर्षी एप्रिल-जून तिमाहीत ५,००० नवीन कर्मचाऱ्यांची भरती देखील केली होती. त्यामुळे अनेकांच्या कुटुंबावर मोठा परिणाम होणार आहे. IT क्षेत्रांत मागच्या काही वर्षांपासून मुलांहूचा इंटरेस्ट वाढला आहे. परंतु TCS सारख्या आघाडीच्या कंपनीनेच कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याषचा निर्णय घेतल्याने IT मध्ये मोठा उलटफेर तर होणार नाही ना? या चर्चाना बळ मिळताना दिसतंय.

का घेतला निर्णय? TCS Layoffs 2025

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने याबाबत दिलेल्या निवेदनानुसार, भविष्यासाठी तयार संघटना एक लांबचा विचार आणि दीर्घकालीन धोरणाचा भाग म्हणून सध्या कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला हं. या माध्यामातून कंपनी आपली गुंतवणूक नवनवीन तंत्रज्ञानात करत आहे. खास करून AI म्हणजेच आर्टिफिशल इंटेलिजन्स मध्ये कंपनी जास्त फोकस करेल. कंपनी नव्या जागतिक बाजारात प्रवेश करण्यावर भर देत आहे. नवीन तंत्रज्ञान आणि एआयचा अवलंब करून आम्ही स्वतःला आणि आमच्या क्लायंटना भविष्यासाठी तयार करत आहोत. या प्रक्रियेचा एक भाग म्हणून काही कर्मचाऱ्यांना कंपनीतून काढून टाकले जाईल (TCS Layoffs 2025) ज्यांना पुन्हा नियुक्त करण्याची शक्यता नाही असं TCS ने आपल्या निवेदनात म्हंटल आहे.

टीसीएसच्या कपातीच्या (TCS Layoffs 2025) निर्णयाचा परिणाम ही कंपनी जिथे काम करते त्या सर्व देश आणि प्रदेशांमधील कर्मचाऱ्यांवर होईल. ही प्रक्रिया २०२६ च्या आर्थिक वर्षापर्यंत (एप्रिल २०२५ ते मार्च २०२६) लागू असेल. जूनमध्ये संपलेल्या तिमाहीत टीसीएसच्या कर्मचाऱ्यांची संख्या ६,१३,००० होती. त्यामुळे जरी कंपनीने २ टक्के कर्मचाऱ्यांची कपात केली तरी तब्बल १२,२०० कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा येईल. टीसीएसकडून काढून टाकण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना विमा लाभ आणि आउटप्लेसमेंट संधींव्यतिरिक्त नोटिस कालावधीचा पगार आणि अतिरिक्त सेव्हरन्स पॅकेजसाठी विचारात घेतले जाईल असं बोललं जातंय.

इतका कंपन्यांही देतायत कर्मचाऱ्यांना दणका –

दरम्यान, फक्त TCS च नव्हे तर या व्यतिरिक्त मायक्रोसॉफ्टने २०२५ मध्ये आतापर्यंत १५,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे. हे प्रमाण त्यांच्या एकूण कर्मचाऱ्यांच्या सुमारे ७% आहे. आर्टिफिशल इंटेलिजन्सचा वाढता प्रभाव, आर्थिक मंदीची भीती यामुळे भविष्यात इतर IT कंपन्या सुद्धा आपल्या कर्मचाऱ्यांबाबत मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.