Wednesday, December 17, 2025
Home Blog Page 35

TCS Layoffs 2025 : TCS 12000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार; IT क्षेत्रात मोठा उलटफेर

TCS Layoffs 2025

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन TCS Layoffs 2025 देशातील आणि जगातील आघाडीची IT कंपनी असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS ) ने कर्मचाऱ्यांना मोठा धक्का दिला आहे. यावर्षी तब्बल १२,२६१ कर्मचाऱ्यांची कपात करण्याची घोषणा कंपनीकडून करण्यात आली आहे. विशेष म्हणजे टीसीएसने या वर्षी एप्रिल-जून तिमाहीत ५,००० नवीन कर्मचाऱ्यांची भरती देखील केली होती. त्यामुळे अनेकांच्या कुटुंबावर मोठा परिणाम होणार आहे. IT क्षेत्रांत मागच्या काही वर्षांपासून मुलांहूचा इंटरेस्ट वाढला आहे. परंतु TCS सारख्या आघाडीच्या कंपनीनेच कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याषचा निर्णय घेतल्याने IT मध्ये मोठा उलटफेर तर होणार नाही ना? या चर्चाना बळ मिळताना दिसतंय.

का घेतला निर्णय? TCS Layoffs 2025

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने याबाबत दिलेल्या निवेदनानुसार, भविष्यासाठी तयार संघटना एक लांबचा विचार आणि दीर्घकालीन धोरणाचा भाग म्हणून सध्या कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला हं. या माध्यामातून कंपनी आपली गुंतवणूक नवनवीन तंत्रज्ञानात करत आहे. खास करून AI म्हणजेच आर्टिफिशल इंटेलिजन्स मध्ये कंपनी जास्त फोकस करेल. कंपनी नव्या जागतिक बाजारात प्रवेश करण्यावर भर देत आहे. नवीन तंत्रज्ञान आणि एआयचा अवलंब करून आम्ही स्वतःला आणि आमच्या क्लायंटना भविष्यासाठी तयार करत आहोत. या प्रक्रियेचा एक भाग म्हणून काही कर्मचाऱ्यांना कंपनीतून काढून टाकले जाईल (TCS Layoffs 2025) ज्यांना पुन्हा नियुक्त करण्याची शक्यता नाही असं TCS ने आपल्या निवेदनात म्हंटल आहे.

टीसीएसच्या कपातीच्या (TCS Layoffs 2025) निर्णयाचा परिणाम ही कंपनी जिथे काम करते त्या सर्व देश आणि प्रदेशांमधील कर्मचाऱ्यांवर होईल. ही प्रक्रिया २०२६ च्या आर्थिक वर्षापर्यंत (एप्रिल २०२५ ते मार्च २०२६) लागू असेल. जूनमध्ये संपलेल्या तिमाहीत टीसीएसच्या कर्मचाऱ्यांची संख्या ६,१३,००० होती. त्यामुळे जरी कंपनीने २ टक्के कर्मचाऱ्यांची कपात केली तरी तब्बल १२,२०० कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा येईल. टीसीएसकडून काढून टाकण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना विमा लाभ आणि आउटप्लेसमेंट संधींव्यतिरिक्त नोटिस कालावधीचा पगार आणि अतिरिक्त सेव्हरन्स पॅकेजसाठी विचारात घेतले जाईल असं बोललं जातंय.

इतका कंपन्यांही देतायत कर्मचाऱ्यांना दणका –

दरम्यान, फक्त TCS च नव्हे तर या व्यतिरिक्त मायक्रोसॉफ्टने २०२५ मध्ये आतापर्यंत १५,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे. हे प्रमाण त्यांच्या एकूण कर्मचाऱ्यांच्या सुमारे ७% आहे. आर्टिफिशल इंटेलिजन्सचा वाढता प्रभाव, आर्थिक मंदीची भीती यामुळे भविष्यात इतर IT कंपन्या सुद्धा आपल्या कर्मचाऱ्यांबाबत मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

Hydrogen Train : देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन!! या मार्गावर धावणार; स्पीड किती?

Hydrogen Train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Hydrogen Train । मागच्या काही वर्षात भारतीय रेल्वेचा चेहरामोहराच बदलला आहे. रेल्वेच्या ताफ्यात वंदे भारत एक्सप्रेस, वंदे भारत साधारण, वंदे मेट्रो, मोनोरेल यांसारख्या नव्या अत्याधुनिक ट्रेन दाखल झाल्या. दुसरीकडे बुलेट ट्रेनचे कामही प्रगतीपथावर असून भारतीय रेल्वेसाठी हि मोठी उपलब्धी मानली जातेय. त्यातच आता रेल्वे विभागाने आणखी एक मोठा कारनामा केला आहे. भारतात प्रथमच हायड्रोजन ट्रेन पाहायला मिळाली आहे. नुकतंच रेल्वेमंत्र्यांकडून या हायड्रोजन ट्रेनची यशस्वी चाचणी पार पडली. त्यामुळे लवकरच ती प्रवाशांच्या सेवेत येण्याची शक्यता आहे. देशातील या पहिल्यावहिल्या हायड्रोजन ट्रेनची वैशिष्ट्ये काय आहेत ते आपण आज जाणून घेऊयात.

तर केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शुक्रवारी घोषणा केली की चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF) येथे देशातील पहिल्या हायड्रोजन-चालित कोचची (Hydrogen Train) यशस्वी चाचणी करून भारतीय रेल्वेने एक मोठा टप्पा गाठला आहे. भारत 1,200 HP हायड्रोजन ट्रेन विकसित करत असून यामुळे हायड्रोजन-चालित ट्रेन तंत्रज्ञानात भारत आघाडीवर असेल,” असे वैष्णव यांनी X वरील एका पोस्टमध्ये म्हंटल. त्यामुळे या हायड्रोजन ट्रेनबाबत देशातील नागरिकांना मोठी उत्सुकता लागली आहे. हि ट्रेन धावते तरी कशावर? तीच वर्किंग कस आहे? याबाबत माहिती घेणं आवश्यक बनलं आहे.

कोणत्या मार्गावर धावणार?-

मित्रांनो, देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन (Hydrogen Train) हि एक नॉन-एसी ट्रेन असेल आणि जगातील सर्वात लांब हायड्रोजन ट्रेन असेल. ज्यामध्ये 2 हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या पॉवर कार म्हणजेच इंजिन बसवले आहेत. या ट्रेन मध्ये ८ प्रवासी कोच असतील. ही ट्रेन सर्वात आधी हरियाणामध्ये धावेल. त्याठिकाणी जिंद आणि सोनीपत या रेल्वेमार्गावर ती सर्वात आधी धावताना दिसेल. प्रतितास 110 किमी या वेगाने ती धावेल. खास करून कमी अंतराच्या प्रवासासाठी या हायड्रोजन ट्रेनची निर्मिती करण्यात आली आहे.

कोणत्या इंधनावर धावणार? Hydrogen Train

आता राहिला महत्वाचा प्रश्न तो म्हणजे हि हायड्रोजन ट्रेन नेमकी कोणत्या इंधनावर धावणार.. कारण कोणत्याही ट्रेनला चालवण्यासाठी ऊर्जा स्त्रोताची आवश्यकता असते.. पूर्वी रेल्वे कोळशावर चालायच्या, त्यानंतर हळूहळू ती वीज आणि डिझेलवर धावू लागली . परंतु हि हायड्रोजन ट्रेन हि पूर्णपणे हायड्रोजनवर चालवली जाणार आहे. यामध्ये हायड्रोजन वायू टाकीमध्ये भरला जाईल. बाहेरील हवेतून ऑक्सिजन घेतला जाईल. दोन्हीच्या रासायनिक अभिक्रियेतून ऊर्जा तयार केली जाईल आणि त्यावर हि रेल्वे धावेल. ट्रेनमध्ये बॅटरी सिस्टम देखील असेल, जी हायड्रोजन इंधन सेलद्वारे चार्ज केली जाईल. हायड्रोजनपासून तयार होणारी वीज बॅटरीमध्ये साठवली जाईल. त्यानंतर ते एका तांत्रिक प्रक्रियेतून जाईल आणि ट्रेनच्या एक्सलवर बसवलेल्या ट्रॅक्शन मोटर्सपर्यंत पोहोचेल. या ऊर्जेचा वापर करून ट्रेन धावेल.

Ration Card : ‘या’ लोकांचं रेशन बंद होणार!! सरकारचा मोठा निर्णय

Ration Card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Ration Card । देशातील गरीब जनतेला २ वेळच खायला मिळावं यासाठी केंद्र सरकार कडून मोफत रेशन वाटप करण्यात येत. देशातील जवळपास ८० कोटी जनता रेशनचा लाभ घेते. यामाध्यमातून लोकांना गहू, तांदूळ सह इतर काही वस्तू मिळतात. मात्र आता रेशन कार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. जे रेशन कार्ड धारक सलग सहा महिने रेशनवरील धान्याचा लाभ घेत नाहीत त्यांचा लाभ सरकारकडून बंद केला जात आहे. यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून प्रत्येक सहा महिन्यांनी यादी पाठवली जात आहे. त्यामुळे जर तुम्हीही मागील ६ महिन्यापासून रेशन घेतलं नसेल तर तुमचंही रेशन इथून पुढे बंद होऊ शकते.

७% ते १८% कार्ड रद्द होऊ शकतात – Ration Card

केंद्र सरकारने २२ जुलै रोजी लक्ष्यित सार्वजनिक वितरण प्रणाली (नियंत्रण) सुधारणा आदेश, २०२५ अधिसूचित केला आहे. या अंतर्गत, ज्या रेशन कार्ड धारकांनी मागील ६ महिन्यांपासून रेशन घेतले नाही त्यांचे कार्ड (Ration Card) सक्रिय राहणार नाहीत. त्यानंतर ३ महिन्यांत, घरोघरी पडताळणी आणि ई-केवायसीद्वारे पुन्हा पात्रता निश्चित केली जाईल. सरकारच्या या निर्णयानंतर किती कार्ड रद्द केले जातील हे चौकशीनंतरच स्पष्ट होईल. मात्र महाराष्ट्रात अंदाजे ७% ते १८% कार्ड रद्द होऊ शकतात असं बोललं जात आहे. अपात्र लोकांना या रेशन कार्ड यादीतून वगळणे हाच या निर्णयामागचा मुख्य उद्देश आहे. ज्या लोकांना रेशन वरील धान्याची गरज नाही अशा लोकांची ओळख पटवण्यासाठी आणि त्यांचा लाभ बंद करण्यासाठी सरकारने हे पाऊल उचललं आहे.

उदाहरणार्थ, सोलापूर जिल्ह्यातील ५००० पक्ष जास्त रेशन कार्ड R(ation Card) धारकांचा रेशनवरील धान्याचा लाभ गेल्या काही महिन्यांच्या काळात बंद करण्यात आला असल्याची माहिती प्रशासनाच्या माध्यमातून समोर आली आहे.त्यानंतर हि रेशनकार्ड सायलेंट समजून त्यांचं धान्य बंद करण्यात आलं आहे. सलग ६ महिने ज्यांनी रेशन घेतलं नाही त्यांना या धान्याची गरज नाही असं समजून हे धान्य बंद केलं जाणार आहे.

दरम्यान, ग्राहक व्यवहार आणि अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांच्या मते, रेशनकार्डची पात्रता यादी दर 5 वर्षांनी तपासली जाईल. कार्डमध्ये नोंदणीकृत 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी आधार क्रमांक वापरला जाईल. ५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर केवायसी अनिवार्य असेल. ज्यांच्या नावावर २ -२ रेशन कार्ड आहेत त्यांचे कार्ड ३ महिन्यांसाठी निलंबित केले जातील.

Mumbai Airport Bomb Threat : मुंबई विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी; सलग 3 फोनमुळे खळबळ

Mumbai Airport Bomb Threat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mumbai Airport Bomb Threat । मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची धमकी एका अज्ञात कॉलवरून देण्यात आली आहे. महत्वाची बाब म्हणजे एकामागून एक सलग ३ फोन कॉल आल्यामुळे खळबळ उडाली आहे. मुंबई विमानतळावर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. हा फोन कोणी केला? यामागच्या सूत्रधार कोण आहे? याचा शोध पोलिसांकडून सुरु आहे.

टर्मिनल 2 वर बॉम्ब- Mumbai Airport Bomb Threat

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर बॉम्ब ठेवण्यात (Mumbai Airport Bomb Threat) आला आहे आणि थोड्याच वेळात मोठा स्फोट होणार असल्याचा दावा सदर कॉल वरून करण्यात आला होता. या कॉलनंतर, मोठी खळबळ उडाली. खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई पोलिसांचे पथक तत्काळ सतर्क झाले आणि पोलिस अधिकाऱी, तसेच बॉम्ब शोध पथकाने थेट विमानतळ गाठलं. पोलिसांनी बराच वेळ विमानतळावर शोध मोहीम राबवली, परंतु कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नाही. मुंबई पोलिस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, एका अज्ञात क्रमांकावरून फोन आला होता, ज्यामध्ये मुंबई विमानतळाच्या टर्मिनल २ वर बॉम्ब ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी तातडीने बॉम्ब पथकाला घटनास्थळी बोलावून शोध मोहीम सुरू केली. मात्र हाती काहीच लागलं नाही.

हा फोन कुठून केलाय ते तपासण्यासाठी पोलिस फोन कॉल ट्रेस करण्याचा प्रयत्न करत आहेत. मुंबई पोलिसांच्या प्राथमिक तपासात बॉम्बची धमकी देणारा (Mumbai Airport Bomb Threat) फोन नंबर आसाम किंवा पश्चिम बंगालचा असल्याचे समोर आले आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. खरच यामागे कोणते षडयंत्र आहे का? कि कोणीतरी मस्करी म्हणून धमकीचे कॉल केले? याचा तपास केला जाईल. कारण यापूर्वी असं अनेकदा घडलं आहे.

यापूर्वीही मुंबई विमानतळावर बॉम्बची धमकी अनेकदा मिळाली होती. गेल्या ३ महिन्यांत मुंबई विमानतळावर अनेक वेळा बॉम्बच्या धमक्या मिळाल्या आहेत. १७ मे, २७ मे आणि १७ जुलै रोजी विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली होती. मात्र पोलीस तपासात या सगळ्या धमक्या खोट्या असल्याच निष्पन्न झालं. परंतु अशा धमक्यांमुळे लोकांच्या सुरक्षेला धोका निर्माण होतो. तसेच गैरसोयीचा सामना करावा लागतो.

Maharashtra Railway : राज्याला मिळणार नवा रेल्वेमार्ग!! पश्चिम महाराष्ट्राला कोकणाशी जोडणार

Maharashtra Railway kolhapur vaibhavwadi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Maharashtra Railway  । मागच्या काही वर्षांपासून भारतीय रेल्वेचा मोठा कायापालट झाला आहे. अनेक मार्गांवर नवीन ट्रेन धावत आहेत. यामुळे कनेक्टिव्हिटी चांगलीच वाढत आहे. तसेच प्रवास आणि दळणवळण सोप्प झालं आहे. महाराष्ट्राला आता आणखी एक नवीन रेल्वेमार्ग मिळाला आहे. कोल्हापूर ते वैभववाडी (Kolhapur Vaibhavwadi Railway Line) असा हा प्रस्तावित रेल्वेमार्ग आहे. केंद्र सरकार या रेल्वेमार्गाबाबत सकारात्मक असून यामुळे पश्चिम आणि कोकण एकमेकांना जोडलं जाईल. कोल्हापूर जिल्हा सहित कोकणातील एकात्मिक विकासासाठी हा प्रकल्प फारच महत्त्वाची भूमिका बजावेल.

रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार आणि भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनी कोकणातील रेल्वे प्रवाशांच्या विविध मागण्यांसाठी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची नुकतीच भेट घेतली. या भेटीत खासदार नारायण राणे यांनी कोल्हापूर वैभववाडी रेल्वे मार्गाचा प्रश्न उपस्थित केला. यानंतर कोल्हापूर-वैभववाडी या रेल्वे मार्गाला लवकरच चालना देण्याची ग्वाही केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. तसेच रेल्वे मार्गाचा प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे कोल्हापूर- वैभववाडी या बहुप्रतिक्षित रेल्वे मार्ग प्रकल्पाला गती मिळेल अशी आशा आहे.

कोकणातील अर्थव्यवस्थेला चालना मिळेल- Maharashtra Railway

खरं तर कोकणातील उद्योगाला चालना मिळावी, थेट पश्चिम महाराष्ट्र कोकणाशी रेल्वेने (Maharashtra Railway) जोडला जावा, येथील मत्स्य उद्योगालाही नव्याने चालना मिळावी यासाठी कोल्हापूर-वैभववाडी हा रेल्वे मार्ग गेले कित्येक वर्षे प्रस्तावित आहे. हा रेल्वे मार्ग झाल्यास प्रवासाबरोबरच नवीन औद्योगिक क्षेत्राला ही चालना मिळणार आहे. जलमार्गे इम्पोर्ट, एक्स्पोर्ट या औद्योगिक धोरणालाही नव्याने बळ मिळू शकते. परिणामी यामुळे कोकणातील अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.

दुसरीकडे कराड ते चिपळूण हा रेल्वेमार्ग प्रकल्पही अनेक वर्षांपासून रखडला आहे. तो सुद्धा तयार झाला तर पश्चिम महाराष्ट्रातून कोकणात जाण्यासाठी आणखी एक जवळचा पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात मोठी बाजारपेठ आहे.. कोकणातील उत्पादने याठिकाणी विकता येतील. तसेच दुसरी बाब म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातून कोकणात जाणाऱ्या पर्यटकांनाही रेल्वेचा फायदा होईल.

Jasprit Bumrah : मोठी बातमी!! जसप्रीत बुमराह निवृत्त्त होणार?? भारतीय क्रिकेटला झटका

Jasprit Bumrah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Jasprit Bumrah । भारतीय क्रिकेट संघाचा हुकमी एक्का असलेल्या जसप्रीत बुमराहबाबत एक धक्कादायक दावा करण्यात आला आहे. जसप्रीत बुमराह हा लवकरच कसोटी क्रिकेट मधून निवृत्त होऊ शकतो मत माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ (Mohammad kaif) याने व्यक्त केलं आहे. बुमराह हा सध्या दुखापतींशी झुंज देतोय. परंतु तो स्वाभिमानी आहे. ज्या दिवशी त्याला समजेल कि त्याच शरीर भारतीय संघासाठी आणि देशासाठी १०० टक्के साथ देत नाही त्याच दिवशी तो स्वतःहून थांबण्याचा निर्णय घेईलअसं मोहम्मद कैफ ने म्हंटल आहे. याबाबत एक विडिओ कैफने शेअर केला आहे.

बुमराहचे बॉलिंग स्पीड कमी झालं- Jasprit Bumrah

लॉर्ड्स कसोटी सामन्यात ७ बळी घेणारा भारतीय संघाचा हा वेगवान गोलंदाज मँचेस्टर कसोटी सामन्यात पूर्णपणे फिका दिसत होता. या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आतापर्यंत इंग्लंडविरुद्ध फक्त एकच बळी घेऊ शकला आहे. संपूर्ण खेळात तो आपली लय शोधण्यासाठी संघर्ष करत असल्याचे दिसून आले. महत्वाची बाब म्हणजे बुमराहचे बॉलिंग स्पीड सुद्धा कमालीचे कमी झालं आहे. यामुळेच कैफने बुमराहच्या निवृत्तीबाबत शंका उपस्थित केली आहे.

मोहम्मद कैफ म्हणाला, बुमराह लवकरच कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होऊ शकतो. मला वाटते की तो आगामी कसोटी सामन्यांमध्ये खेळताना दिसणार नाही आणि तो निवृत्तही होऊ शकतो. बुमराह दुखापतींशी झुंजत आहे. म्हणूनच तो त्याच्या लयीत दिसत नाही. परंतु तो एक स्वाभिमानी व्यक्ती आहे, जर त्याला वाटत असेल की तो त्याचे शंभर टक्के योगदान देऊ शकत नाही, देशासाठी सामना जिंकू शकत नाही, तर तो स्वतः खेळण्यास नकार देईल.

कैफ पुढे म्हणाला की विकेट न मिळणे ही वेगळी गोष्ट आहे, परंतु मँचेस्टर कसोटीत बुमराह (Jasprit Bumrah) ज्या वेगाने गोलंदाजी करत होता तो वेग खूपच कमी होता. मँचेस्टर कसोटी सामन्यात त्याच्या चेंडूवर पुढे डायव्ह करून विकेटकीपरने घेतलेला झेल हेच सांगतो कि जसप्रीत बुमराह पूर्णपणे तंदुरुस्त नाही. कारण बुमराह जेव्हा फिट असतो तेव्हा विकेटकिपर झेल घेताना बॉल त्याच्या छातीपर्यंत उसळी घेत असतो. बुमराहचा चेंडू ईतक्या वेगाने झिप करतो कि फलंदाजांची भंबेरी उडते.. मग तो रूट असो किंवा बेन स्टोक्स, कोणीही येऊ द्या. बुमराह असा गोलंदाज आहे जो केव्हाही फलंदाजाला बाद करू शकतो.

बुमराहमध्ये अजूनही जोश आहे, देशासाठी खेळण्याची इच्छा आहे परंतु शरीर त्याला साथ देत नाही… शरीरापुढे तो हरला आहे, त्यामुळे पुढच्या कसोटी सामन्यांमध्ये सुद्धा त्याच्यासमोर अडचणी येतील. आधी रोहित गेला, मग विराट आणि अश्र्विन गेला… आता कदाचित बुमराहचा नंबर असू शकतो … मी प्रार्थना करतो की मी जे म्हणतोय ते चुकीचे ठरो असं मोहम्मद कैफने म्हंटल.

PM Viksit Bharat Rojgar Yojana : केंद्र सरकारची नवीन योजना!! 3.50 कोटी लोकांना नोकऱ्या मिळणार

PM Viksit Bharat Rojgar Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन PM Viksit Bharat Rojgar Yojana नोकरीच्या शोधात असणाऱ्या लोकांसाठी खुशखबर आहे. केंद्रातील मोदी सरकारने एक नवीन योजना सुरु केली आहे. ‘प्रधानमंत्री विकासशील भारत रोजगार योजना असं या योजनेचं नाव असून या योजनेच्या माध्यमातून पुढील २ वर्षात ३.५० कोटी लोकांना नोकऱ्या मिळणार आहेत. रोजगाराशी संबंधित प्रोत्साहन देण्यासाठी सरकारनं हि योजना सुरु केली आहे. केंद्रिय मंत्रिमंडळ बैठकीत हि योजना मंजूर करण्यात आली असून 99 हजार 446 कोटी रुपयांची तरतूद यासाठी करण्यात आली आहे. लोकांना रोजगार देणारी हि योजना 1 ऑगस्ट 2025 पासून लागू होणार आहे.

काय आहे खास ? PM Viksit Bharat Rojgar Yojana

‘प्रधानमंत्री विकासशील भारत रोजगार योजने’च्या (PM Viksit Bharat Rojgar Yojana) माध्यमातून 2 वर्षांत 3.5 कोटींहून अधिक नोकऱ्या निर्माण करण्यास प्रोत्साहन देण्याचे उद्दिष्ट आहे. यापैकी 1.92 कोटी लाभार्थी पहिल्यांदाच कामगार दलात सामील होतील. या योजनेचा लाभ 1 ऑगस्ट 2025 ते 31 जुलै 2027 दरम्यान निर्माण झालेल्या नोकऱ्यांना लागू होईल. या योजनेचे दोन भाग आहेत. भाग A पहिल्यांदाच गुंतवणूक करणाऱ्यांवर लक्ष केंद्रित करतो तर भाग B नियोक्त्यांवर लक्ष केंद्रित करतो. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत (EPFO) पहिल्यांदा नोंदणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लक्षात घेऊन, भाग अ अंतर्गत १५,००० रुपयांपर्यंतचे एका महिन्याचे ईपीएफ योगदान दोन हप्त्यांमध्ये उपलब्ध असेल. फक्त १ लाख रुपयांपर्यंत मासिक वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांनाच या योजनेचा लाभ घेता येईल. पहिला हप्ता सहा महिन्यांच्या नोकरीनंतर तर दुसरा हप्ता १२ महिन्यांच्या सेवेनंतर आणि आर्थिक साक्षरता कार्यक्रम पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळेल. PM Viksit Bharat Rojgar Yojana

बचत करण्याची सवय लावण्यासाठी, या प्रोत्साहन रकमेचा एक भाग निश्चित कालावधीसाठी बचत साधन किंवा ठेव खात्यात ठेवला जाईल आणि नंतर कर्मचारी तो काढू शकतील. पहिल्यांदाच नोकरी शोधणाऱ्यांना आधार ब्रिज पेमेंट सिस्टम (ABPS) वापरून DBT (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) मोडद्वारे पैसे दिले जातील, तर नियोक्त्यांना त्यांच्या पॅन-लिंक्ड खात्यांमध्ये थेट पैसे दिले जातील.

Hinjewadi IT Park : हिंजवडीचं IT पार्क बंगळुरू, हैद्राबादला चाललंय; अजितदादांनी कोणाला सुनावलं??

Hinjewadi IT Park

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Hinjewadi IT Parkपुण्यातील IT पार्क असलेल्या हिंजवडीतील सर्व समस्या जाणून घेण्यासाठी उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज सकासकाळीच पाहणी दौरा केला. या दौऱ्यावेळी त्यांनी एकूण परिस्थितीचा आढावा घेतला तसेच हिंजवडीसह परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी अधिकाऱ्यांना कडक सूचना दिल्या. यावेळी त्यांनी हिंजवडीच्या सरपंचाना खडेबोल सुनावताना एक मोठं वक्तव्य केलं. आपलं वाटोळं झालंय, हिंजवडीचं IT पार्क बंगळुरू, हैद्राबादला चाललंय असं अजित पवार म्हणाले. त्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा झटका बसण्याची शक्यता आहे.

अजित पवार नेमकं काय म्हणाले?- Hinjewadi IT Park

हिंजवडीचे सरपंच गणेश जांभुळकर याना अजित पवार याना काहीतरी सांगत होते, त्यावर उत्तर देताना अजितदादा म्हणाले, अहो असू द्या हो असू द्या हो साहेब, धरण करताना मंदिर जातात की नाही. तुम्हाला सांगायचं ते सांगा, मी ऐकून घेतो, पण मी काय करायचं तेच करतो… आपलं वाटोळं झालंय, आपलं हिंजवडीचं सगळं आयटी पार्क (Hinjewadi IT Park) बाहेर चाललंय …माझ्या पुण्यातून आणि महाराष्ट्रातून बाहेर….बेंगलोरला हैदराबादला चाललंय …काय तुम्हाला पडलं नाही….कशाला मी सहा वाजता पाहणी करायला येतो इथं, यांच्यामुळेच बघतोय ना …. मला कळत नाही माझी माणसं नाहीत… परंतु हे केल्याशिवाय गत्यंतर नाही… असं म्हणत अजित पवार यांनी हिंजवडीचे सरपंच गणेश जांभुळकर खडेबोल सुनावले.

दरम्यान, कामाच्यामध्ये कोणी आला तर त्यावर 353 दाखल करा.तो कोणीही असेल तरी करा. अजित पवार जरी मध्ये आले, तरी 353 टाका 353 लावल्याशिवाय हे काम होणार नाही. नाहीतर प्रत्येक जण माझं हे करा आणि माझं ते करा सुरु राहिलं. ते आपल्याला होऊ द्यायच नाही. एकदाच संपूर्ण कामच करुन टाकायचय अशा सूचना अजित पवारांनी अधिकाऱ्यांना दिल्या. अजित पवार हे त्यांच्या वक्तशीरपणासाठी आणि पहाटे उठून काम करण्यासाठी ओळखले जातात. दादांचा दौरा म्हणजे अधिकाऱ्यांची भंबेरी उडतेच. आजही सकासकाळी याचा प्रत्यय बघायला मिळाला.

Pune Metro : पुणे मेट्रोमध्ये फुकट प्रवास!! सुरु झाली नवी योजना

Pune Metro

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Pune Metro । पुणे मेट्रोतून प्रवास करणाऱ्यांना मोठी आनंदाची बातमी आहे. आता मेट्रोतून अगदी मोफत प्रवास करता येणार आहे. त्यासाठी पुणे मेट्रो कडून ‘एक पुणे विद्यार्थी पास कार्ड योजना सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून २५ जुलै ते १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत, पदवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत प्रवास करता येणार आहे. या योजनेमुळे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पैशाची बचत होणार आहे. तसेच मेट्रो प्रवासही चालना मिळणार आहे.

कशी काम करेल योजना – Pune Metro

पुणे मेट्रोची (Pune Metro) दैनंदिन प्रवासी संख्या १ लाख ९० हजार पेक्ष्या जास्त आहे. यामध्ये शाळा आणि कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा मोठा वाटा आहे. पुण्यात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मेट्रोने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. आता नवीन शैक्षणिक वर्ष सुद्धा नुकतंच सुरु झालं आहे. त्यामुळे मेट्रोतून प्रवास करणाऱ्या पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील विद्यार्थ्यांसाठी ‘एक पुणे विद्यार्थी पास कार्ड योजना सुरु करण्यात आली आहे. सध्या , विद्यार्थी पास कार्डसाठी ११८ रुपये मोजावे लागतात. परंतु हाच पास २५ जुलै ते १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत विद्यार्थ्यांना मोफत दिला जाईल. परंतु यासाठी , विद्यार्थ्यांनी किमान ₹२०० च्या टॉप-अपसह कार्ड रिचार्ज करावे लागेल, जे कोणत्याही कपातीशिवाय किंवा शुल्काशिवाय कार्डमध्ये पूर्णपणे जमा केले जाईल.

या पासचा वापर करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रवासाच्या वैधतेदरम्यान सर्व मेट्रो राईड्सवर ३०% सूट सुद्धा मिळेल. विद्यार्थ्यांसाठी प्रवास करणे सोपे आणि परवडणारे बनवणे, सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवणे आणि पुण्यातील विद्यार्थी समुदायासाठी एक सहाय्यक आणि समावेशक वातावरण निर्माण करणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. तसेच मोफत प्रवासामुळे विद्यार्थ्यांची प्रवासी संख्याही वाढेल आणि मेट्रोला (Pune Metro) चालना सुद्धा मिळेल.

पुणे मेट्रोचा विस्तार होणार –

दरम्यान, पुण्यातील वाहतूक कोंडी मिटवण्यासाठी आता या मेट्रोचा विस्तार होणार आहे. पुणे मेट्रोला आणखी १२ नवीन सेट मिळणार आहेत. प्रत्येक मेट्रो ट्रेनला ३ डबे असतील. पुणे मेट्रोने टीटागड रेल सिस्टम्स लिमिटेड आणि टीटागड फायरमा यांच्याकडून या १२ ट्रेन सेटसाठी खरेदी ऑर्डर दिली आहे. हे नवीन ट्रेन सेट पूर्णपणे ‘मेक इन इंडिया’ उपक्रमांतर्गत तयार केले जातील आणि विद्यमान रेकप्रमाणेच अॅल्युमिनियमपासून बनवले जातील.

पुणे मेट्रोच्या नेटवर्कच्या पीसीएमसी ते निगडी आणि स्वारगेट ते कात्रज पर्यंत विस्तारीकरणासाठी मंजुरी मिळाल्यानंतर, पीसीएमसी-निगडी मार्गाचे बांधकाम आधीच वेगाने सुरू आहे. स्वारगेट-कात्रज कॉरिडॉरसाठी कंत्राटदार नियुक्त करण्याची निविदा प्रक्रिया देखील लवकरच पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. या दोन आगामी मार्गांवरील कामकाजाला पाठिंबा देण्यासाठी, पुणे मेट्रोला १२ नवीन मेट्रो ट्रेन सेटची आवश्यकता असेल. एकूण सर्व मेट्रो सेट खरेदीचा खर्च ४३०.५३ कोटी रुपये आहे. पुढील ३० महिन्यांत या गाड्यांची डिलिव्हरी टप्प्याटप्प्याने केली जाईल.

Vande Bharat Express : मुंबईवरून सुटणाऱ्या ‘या’ वंदे भारतला मिळाला आणखी एक थांबा

Vande Bharat Express

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Vande Bharat Express । महाराष्ट्रात वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनने प्रवास करणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. तसेच वंदे भारत रेल्वेगाड्यांची संख्याही जास्त आहे. राज्यात सध्या मुंबई सेंट्रल–अहमदाबाद, सीएसएमटी–सोलापूर, सीएसएमटी–शिर्डी, मुंबई सेंट्रल–गांधीनगर, सीएसएमटी–मडगाव, पुणे–कोल्हापूर, पुणे–हुबळी, नागपूर–सिकंदराबाद, नागपूर–इंदूर आणि नागपूर–बिलासपूर अशा विविध मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस गाड्या धावत आहेत. यातील एका वंदे भारत एक्सप्रेसला आणखी एक थांबा मिळाला आहे. त्यामुळे प्रवाशांना फायदा होणार आहे.

कोणत्या वंदे भारतला अतिरिक्त थांबा – Vande Bharat Express

आम्ही तुम्हाला ज्या वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) बद्दल सांगतोय ती आहे मुंबई सेंट्रल–गांधीनगर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन…. महाराष्ट्र आणि गुजरात या २ राज्यांना जोडणाऱ्या या ट्रेनला वलसाड या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयाची अंमलबजावणी 27 जुलै 2025 पासून करण्यात येणार आहे. त्यामुळे वलसाड येथील प्रवाशांना फायदा होणार आहे. याबाबत पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी सांगितलं कि, ही वंदे भारत एक्सप्रेस (गाडी क्रमांक 20901) 28 जुलै 2025 पासून सकाळी 8 वाजून 19 मिनिटांनी वलसाड स्थानकावर दाखल होईल आणि 2 मिनिटांचा थांबा घेऊन पुढील प्रवास सुरू करेल. वलसाडला मिळालेल्या या नव्या थांब्यामुळे अहमदाबाद, आनंद, वडोदरा आणि सुरत या स्थानकांच्या वेळापत्रकात सुद्धा बदल होणार आहे.

कस असेल नवीन वेळापत्रक-

नव्या वेळापत्रकानुसार, मुंबई सेंट्रल ते गांधीनगर वंदे भारत एक्सप्रेस (Mumbai Central To Gandhinagar Vande Bharat Express) मुंबईहून सकाळी 6 वाजता प्रस्थान करेल. त्यानंतर हि ट्रेन 6:23 वाजता बोरिवली, 7:56 वाजता वापी, 8:19 वाजता वलसाड, 9 वाजता सुरत, 10:18 वाजता वडोदरा, 10:43 वाजता आनंद, 11:30 वाजता अहमदाबाद आणि दुपारी 12:25 वाजता गांधीनगरला पोहचेल. तर परतीच्या प्रवासात हीच ट्रेन दुपारी 2 वाजता गांधीनगरहून रवाना होईल. त्यानंतर ती अहमदाबादला 2:40 वाजता, आनंद येथे 3:25 वाजता, वडोदऱ्याला 3:48 वाजता, सुरतला 5:05 वाजता, वलसाड येथे 5:51 वाजता, वापी येथे 6:13 वाजता, बोरिवलीला 7:32 वाजता पोहोचेल आणि अखेर रात्री 8:30 वाजता मुंबई सेंट्रल स्थानकावर येईल.