Thursday, January 1, 2026
Home Blog Page 340

गरोदरपणात बीपी, शुगर वाढणे बाळासाठी आहे धोकादायक; अशाप्रकारे घ्या काळजी

Pregnency

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आई होणे हा प्रत्येक स्त्रीसाठी सर्वात खास क्षण असतो. बाळाला ९ महिने पोटात ठेवणे अनेक आव्हानांनी भरलेले असते. या काळात आईच्या तब्येतीची चांगली काळजी घेतली जाते, त्यामुळे मुलाचे आरोग्य चांगले राहून त्याची वाढ चांगली होते.नुकत्याच झालेल्या एका संशोधनात असे म्हटले आहे की, जर घरामध्ये कोळसा किंवा लाकडाचा वापर केला जात असेल तर गर्भावस्थेतील मधुमेहाचा धोका असतो. गर्भावस्थेदरम्यान अनेक दुष्परिणाम दिसू शकतात. चला जाणून घेऊया या अभ्यासाबद्दल…

चीनच्या जुनी मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये ४,३३८ महिलांवर संशोधन करण्यात आले. या महिलांचे सरासरी वय 27 वर्षे होते. त्यापैकी 302 महिलांमध्ये गर्भधारणा मधुमेह आढळून आला. प्रदूषणामुळे गर्भधारणेचा धोका वाढू शकतो हे यातून समोर आले आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जर एखाद्या महिलेला मधुमेह असेल किंवा धूम्रपान करत असेल किंवा तिचे बीपी वाढले असेल तर गर्भातील बाळाच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की अनेक कारणांमुळे गर्भातील मुलाच्या विकासावर परिणाम होऊ शकतो. प्रदूषण, आईची रक्तातील साखर वाढणे, पोषक तत्वांचा अभाव, तणाव आणि दारू-सिगारेट यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, गर्भधारणेच्या पहिल्या तिमाहीत जर एखाद्या महिलेला अनियंत्रित मधुमेह असेल तर गर्भपात, जन्म दोष, हृदयविकार आणि इतर अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. याशिवाय, उच्च बीपीमुळे नाळेतील रक्त परिसंचरण प्रभावित होते आणि रक्तवाहिन्या आकसतात, ज्यामुळे गर्भातील रक्त प्रवाह कमी होतो आणि अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात.

गर्भधारणेदरम्यान बीपी आणि साखर वाढल्यास काय करावे?

  • गर्भवती महिलेचे बीपी किंवा रक्तातील साखर वाढल्यास तिने ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
  • अन्नाकडे विशेष लक्ष दिले पाहिजे.
  • व्यायाम नियमित केला पाहिजे.
  • नियमित तपासणी जसे की सिरीयल अल्ट्रासाऊंड स्कॅन करणे आवश्यक आहे. मुलाचा आकार, वजन आणि एकंदरीत आरोग्य जाणून घेता येते.

    Top Innovations in 2024 | 2024 मध्ये झाले हे इनोव्हेशन; आरोग्य आणि रोबोटिक्स क्षेत्रात झाली क्रांती

    Top Innovations in 2024

    Top Innovations in 2024 | तंत्रज्ञानाने मानवाच्या आयुष्यात खूप प्रगती केलेली आहे. तंत्रज्ञानामुळे जीवनात अनेक सकारात्मक बदल आलेले आहेत. आणि अनेक गोष्टी अगदी सोप्या आणि कमी वेळात झालेल्या आहेत. 2024 मध्ये देखील अनेक मोठमोठे इंवेंशन झालेले आहेत. आज आपण 2024 मध्ये झालेल्या या काही मोठ्या तंत्रज्ञानाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. ज्यामुळे आरोग्य आणि रोबोटीक्स या क्षेत्रांमध्ये खूप कामगिरी गेलेली आहे.

    ॲजिलिटी रोबोट्स डिजिट | Top Innovations in 2024

    हे रोबोट्स ॲजिलिटी रोबोट्स डिजिट नावाच्या कंपनीने बनवले आहेत. हे AI क्षमतेने सुसज्ज रोबोट्स आहेत. जे गोदामांसाठी उपयुक्त आहेत. मॅन्युफॅक्चरिंग आणि लॉजिस्टिक्समध्ये शारीरिक कामासाठी कामगार शोधणे कठीण होत आहे. ऍजिलिटी रोबोटिक्सचे सीईओ पेगी जॉन्सन म्हणतात की अमेरिकेत 1 दशलक्षाहून अधिक रिक्त नोकऱ्या आहेत. ज्या भरल्या जाऊ शकत नाहीत. येथेच ॲजिलिटी रोबोट्स डिजिट येतो, ज्याला एआय वापरून काम करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. डिजिट आधीच लॉजिस्टिक प्रदाता GXO आणि Amazon सारख्या ठिकाणी काम करत आहे. जॉन्सनला आशा आहे की 2025 च्या अखेरीस हे रोबोट मानवांसोबत एकत्र काम करण्यास सुरुवात करतील.

    फिल्टर कॅप्स

    दक्षिण अमेरिकेतील विकासकांनी त्यांच्या कार्यादरम्यान प्रत्यक्षपणे पाहिलेल्या तातडीच्या गरजेला प्रतिसाद देत, बेलर इंटरनॅशनल फिलसा वॉटर, कोलंबियन रेड क्रॉस आणि ओगिल्वी कोलंबिया यांनी फिल्टर कॅप्स तयार करण्यासाठी भागीदारी केली. जेणेकरून दूषित पाणी पिण्यासाठी सुरक्षित करता येईल. या टोपीमध्ये धातू, खनिजे आणि इतर घटक (जसे की सक्रिय कार्बन) यांचे रासायनिक मिश्रण असते. ते दूषित आणि अशुद्धता फिल्टर करते आणि पाणी पिण्यासाठी सुरक्षित बनवते. पहार फिल्टरची किंमत $6 पेक्षा कमी आहे आणि ते दिवसाला 5 लिटर पाणी फिल्टर करू शकते. कंपनीचा अंदाज आहे की त्यांनी वितरित केलेल्या 1,000 युनिट्समधून सुमारे 10,000 लोकांना शुद्ध पाणी मिळेल.

    Kangsters Wheelie-X

    पाच वर्षांपूर्वी, जॉन चोच्या वडिलांची वैद्यकीय प्रक्रिया चुकीची झाल्याने अर्धांगवायू झाला, ज्यामुळे त्यांना व्यायामाचा फारसा मार्ग उरला नाही. त्यामुळे दक्षिण कोरियन स्टार्टअप Kangsters चे सह-संस्थापक चो यांनी AWheelie-X तयार करण्यात मदत केली. ही व्हीलचेअर ट्रेडमिल आहे जी ॲपशी कनेक्ट होते. व्हीलचेअर रेसिंग गेम्स आणि बैठे योगा सारखे व्यायाम ऑफर करते. कंपनीने 2024 पॅरालिम्पिक गेम्समध्ये ही प्रणाली प्रदर्शित केली आणि खाजगी वापरकर्ते, जिम, रुग्णालये आणि पुनर्वसन केंद्रांना विकण्यास सुरुवात केली.

    मूनबर्ड

    अनेकांना निद्रानाशाचा त्रास होतो. मूनबर्ड नावाचा हा शोध अशा लोकांना मदत करू शकतो. तिच्या दीर्घकालीन निद्रानाशामुळे निराश झालेल्या आणि तिच्या श्वासोच्छवासाच्या व्यायामासाठी अधिक चांगले मार्गदर्शक हवे असल्याने, स्टेफनी ब्रॉस आणि तिचा भाऊ मायकेल यांनी मूनबर्ड तयार केले, एक पाम-आकाराचा स्क्रीन-मुक्त श्वास प्रशिक्षक. ब्रोस म्हणतात, ‘पारंपारिक ध्यान साधने जबरदस्त वाटू शकतात आणि स्क्रीन त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी असलेल्या विश्रांतीमध्ये व्यत्यय आणू शकतात. हे अर्गोनॉमिक उपकरण तुमच्या हातात धरून ठेवावे लागते आणि जेव्हा ते हळूहळू विस्तारते तेव्हा तुम्हाला श्वास घ्यावा लागतो आणि जेव्हा ते आकुंचन पावते तेव्हा तुम्हाला श्वास सोडावा लागतो. सुखदायक मार्गदर्शन धारकास जलद किंवा विसंगत श्वासोच्छवास अधिक आरामशीर पॅटर्नमध्ये बदलण्यास प्रोत्साहित करते, त्यांच्या शरीराला ‘विश्रांती आणि पचन’ स्थितीत ठेवते जेणेकरून त्यांना शांत, अधिक आरामशीर वाटेल आणि अधिक सहजपणे झोपू शकेल. मूनबर्ड प्रौढ किंवा मुलांद्वारे वापरले जाऊ शकते.

    Top 5 political news | लोकसभेत महायुतीचा सुफडा साफ ते अजित पवार 6 व्यांदा उपमुख्यमंत्री; 2024 मध्ये बदलले राज्याचे राजकारण

    Top 5 political news

    Top 5 political news | 2024 मध्ये राज्याच्या राजकारणात अधिक घडामोडी घडलेल्या आहेत. लोकसभा निवडणुकीपासून ते विधानसभा निवडणुकीपर्यंत अनेक चक्र फिरलेली आहेत. ज्यामध्ये काही घटनांचा उल्लेख हा अत्यंत महत्त्वाचा आहे. या घटनांमुळे आणि त्या नेत्यांमुळेच राज्याचे राजकारण पूर्णपणे फिरलेले आहे. आज आपण 2024 मध्ये राज्याच्या राजकारणामध्ये कोणकोणत्या मोठमोठ्या घडामोडी घडल्या आहेत. आणि त्याचा परिणाम कशा प्रकारे झाला हे जाणून घेणार आहोत.

    लोकसभेला महायुतीचा सुफडा साफ

    महाराष्ट्रमध्ये महायुती सरकार सत्तेत होते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीला महायुतीला महाराष्ट्रातून चांगला प्रतिसाद मिळेल, असे अनेकांना वाटत होते. परंतु त्यांच्या या आशांवर पूर्णपणे पाणी फेरले. आणि महायुतीमधील अनेक उमेदवारांना पराजय पत्करावा लागला. याउलट महाविकास आघाडीला लोकांकडून प्रतिसाद मिळणार नाही, असे वाटत असताना देखील महाविकास आघाडीच्या अनेक जागा निवडून आल्या. आणि हा लोकसभा निवडणुकीला महायुतीला एक खूप मोठा फटका बसलेला आहे.

    विधानसभा निवडणुकीत शरद पवारांचा झंझावाती प्रचार

    विधानसभा निवडणुकीच्या वेळी शरद पवार यांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली होती. शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यांमध्ये जवळपास 56 जाहीर सभा घेतलेल्या होत्या. राज्यातील 45 मतदार संघातून 56 सभांचे नियोजन देखील करण्यात आलेले आहे होते. एका दिवशी ते जवळपास चार ते पाच सभा घेत होते. त्यांनी बारामती मतदार संघातून गावातील प्रचाराला सुरुवात केली होती. या प्रचारादरम्यान ते अगदी गावोगावी जाऊन सभा घेत होते. लोकसभा निवडणुकीच्या वेळी शरद पवारांना प्रचार सभेचा चांगला फायदा झाला होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीला देखील हा फायदा होईल. म्हणून त्यांनी हा झंझावती प्रचाराला सुरुवात केली होती.

    विधानसभा निवडणुकीत महायुतीला यश

    लोकसभा निवडणूकीमध्ये राज्यातील महायुती सरकारला अपयश आले होते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीला देखील काहीसे असेच चित्र दिसेल, असे सगळ्यांना वाटले होते. परंतु विधानसभा निवडणुकीत हे चित्र पूर्णपणे बदलले. आणि राज्यामध्ये महायुती सरकार भरघोस मतांनी निवडून आलेले आहे. महाविकास आघाडीतील अनेक उमेदवारांना पराजय पत्करावा लागला आहे. तिथेच महायुती सरकारचे अनेक उमेदवार निवडून आल्याने, राज्यांमध्ये महायुती सरकार स्थापन झालेले आहे.

    देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री

    महायुती सरकारमध्ये भाजप शिंदे गट आणि अजित पवार गट असे मिळून महायुती सरकार स्थापन झालेले आहे. परंतु यंदाच्या विधानसभा निवडणूकीत भाजप पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे यावर्षी पुन्हा एकदा राज्यांमध्ये भाजप सरकार आलेले आहे. आणि देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे.

    अजित पवार 6 व्यांदा उपमुख्यमंत्री

    महायुती सरकारमध्ये अजित पवार गट, शिंदे गट आणि भाजप मिळून महायुती आहे. यावर्षी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे. तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. अजित पवार हे राज्याचे एकमेव असे नेते आहेत, ज्यांनी सहाव्यांदा राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे.

    Top political personalities of the 2024 | 2024 मधील राजकारणातील ‘ही’ आहे प्रभावी नेत्यांची यादी; ठरले गेम चेंजर

    Top political personalities of the 2024

    Top political personalities of the 2024 | 2024 मध्ये देशाच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडलेल्या आहेत. यामध्ये काही नेत्यांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. त्यांच्या काही निर्णयामुळे तसेच काही वक्तव्यांमुळे देशाचे राजकारणाने चांगलीच उभारी घेतलेली आहे. नक्कीच सगळ्या नागरिकांना हे नेते आणि राजकारण लक्षात राहतील. आता आपण 2024 मधील देशातील अशा काही राजकीय व्यक्तिमत्वांबद्दल जाणून घेणार आहोत. जे नेहमी चर्चेत राहिलेले आहेत. तसेच त्यांनी राजकारणाची बाजी पलटवलेली आहे.

    नरेंद्र मोदी | Top political personalities of the 2024

    लोकसभा निवडणुक 2024 मध्ये NDA विजयी झाले आहे. आणि नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा देशाच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतलेली आहे. 2024 मध्ये त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. ज्यामुळे ते नेहमी चर्चेत राहिलेले आहेत. देशाचे पंतप्रधान होण्यासोबतच त्यांच्यातील मानवता तसेच सोशल मीडिया पोस्टद्वारे ते नेहमीच चर्चेचा विषय बनले आहेत. शेतकऱ्यांसाठी त्यांनी घेतलेल्या अनेक नियम देखील चर्चेत राहिलेले आहेत. त्याचप्रमाणे नरेंद्र मोदी हे सलग तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान झालेले आहेत.

    नितीश कुमार

    2024 मध्ये बिहार राज्यात एनडीए सरकारने आलेले आहे आणि नितीश कुमार हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले. नितीश कुमार हे बिहार राज्याचे 9 व्यांदा मुख्यमंत्री झालेले आहेत. मुख्यमंत्री होण्याचा नितीश कुमार यांनी एक खूप मोठा विक्रम रचलेला आहे. 2024 मधील राजकारणातील एक खूप मोठे व्यक्तिमत्त्व म्हणून यांच्याकडे पाहिले जाते.

    देवेंद्र फडणवीस

    महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदावर निवडून आलेले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस गट मिळून महायुती स्थापन केली. त्यांनी “मी पुन्हा येईल” त्यांचे हे वक्तव्य खरे केलेले आहे. आणि महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचे नाव आणि पक्ष पुन्हा एकदा वरचढ बनवलेला आहे. उपमुख्यमंत्री पदावर असताना देखील देवेंद्र फडणवीस यांनी राज्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. त्यासाठी ते नेहमीच चर्चेत आलेले आहेत.

    एकनाथ शिंदे

    महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 2024 मध्ये उपमुख्यमंत्री झालेले आहेत. मुख्यमंत्रीपदावर असताना त्यांनी राज्यातील जनतेसाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेले आहेत. त्यातीलच महायुती सरकारची माझी लाडकी बहीण योजना त्यांच्यासाठी अत्यंत फायद्याचे ठरलेली आहे. या योजनेमुळेच महायुती सरकार निवडून आल्याचा दावा अनेक लोक करत आहेत. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून काही आमदारांसोबत एक्झिट घेतली. आणि भाजप सोबत त्यांनी महायुती करून एक नवीन इतिहास घडवलेला आहे.

    Top champions of Paris Olympic | पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतातील ‘या’ खेळाडूंनी मिळवले यश; वाचा यादी

    paris Olympic

    Top champions of Paris Olympic | 2024 ची पॅरिस ऑलिंपिक स्पर्धा पार पडलेल्या आहेत. या पॅरिस ऑलिंपिकमध्ये एकट्या भारताने तब्बल 6 पदके जिंकलेली आहेत. यामध्ये एक रौप्य पद आहे तर पाच कांस्यपद भारताने मिळवलेली आहे. ऑलिंपिक मध्ये भारताला सुवर्णपदकापर्यंत पोहोचता आले नाही. परंतु त्यासाठी पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. भारताला नेमबाजी, हॉकी, कुस्ती, भालाफेकमध्ये ही पदके मिळालेली आहे. आता पॅरिस ऑलिंपिक मध्ये भारतासाठी खेळणाऱ्या कोणत्या खेळाडूंनी पदके जिंकली आहेत. हे आज आपण जाणून घेणार आहोत.

    मनु भाकर | Top champions of Paris Olympic

    मनू भाकर ही नेमबाजीची खेळाडू आहे. नेमबाजी मध्ये मनू भाकर हिने कांस्य पदक मिळवलेले आहे. 22 वर्षीय मनु भाकर हिने नेमबाजींमध्ये दहा मीटर एअर पिस्तूलमध्ये कांस्यपद मिळवून नवीन इतिहास रचलेला आहे.

    मनू भाकर आणि सरबज्योत सिंग

    10 मीटर एअर पिस्तूलमध्ये कांस्यपदक जिंकण्याबरोबरच, मनू भाकर याने मिश्र नेमबाजी स्पर्धेतही आपले कौशल्य दाखवले. मनू भाकर आणि सरबज्योत सिंग यांनी मिश्र नेमबाजी स्पर्धेत भारतासाठी कांस्यपदक जिंकले.

    स्वप्नील कुसळे | Top champions of Paris Olympic

    मनू भाकर आणि सरबज्योत सिंग यांच्याशिवाय नेमबाज स्वप्नील कुसळे याने पदक जिंकले. स्वप्नील कुसळे याने 50 मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये कांस्यपदक पटकावले.

    भारतीय पुरुष हॉकी संघ

    भारतीय पुरुष हॉकी संघ कांस्यपदक जिंकण्यात यशस्वी ठरला. या संघाने कांस्यपदकाच्या लढतीत स्पेनचा 2-1 असा पराभव करून सलग दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकण्यात यश मिळविले.

    नीरज चोप्रा

    भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राकडून सुवर्णपदकाची अपेक्षा होती, पण पाकिस्तानच्या अर्शद नदीमने सुवर्णपदक जिंकले. नीरज चोप्राने 89.45 मीटर फेक करून रौप्यपदक जिंकले. यापूर्वी नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये सुवर्णपदक जिंकले होते.

    अमन सेहरावत | Top champions of Paris Olympic

    भारतीय कुस्तीपटू अमन सेहरावतने कांस्यपदक जिंकले. अमन सेहरावतने पोर्तो रिकोच्या डेरियन क्रूझचा १३-५ असा पराभव करून भारतासाठी पदक जिंकले. त्याने 57 किलो गटात हे कांस्यपदक जिंकले.

    Top Web Series of 2024 | 2024 मध्ये ‘या’ वेब सीरिजने गाजवले OTT; पाहा या 5 सिरीज

    Top Web Series of 2024

    Top Web Series of 2024 | 2024 मध्ये ओटीटीवर अनेक वेब सिरीज आलेल्या आहेत. आज काल तरुण वर्गाचा वेबसिरीज कडे जास्त कल आहे. अनेक लोक थेटरमध्ये जाऊन सिनेमा पाहण्यापेक्षा घरी बसून ओटीटीवर वेबसिरीज पाहण्याला जास्त महत्त्व देतात. यावर्षी देखील ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक वेब सिरीज प्रदर्शित झाल्या आहे. आज आपण 2024 मधील टॉप 5 वेब सिरीज पाहणार आहोत. ज्यांनी प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले होते.

    हीरामंडी | Top Web Series of 2024

    संजय लीला भन्साळी दिग्दर्शित हीरामंडी ही नेटफ्लिक्सवरील एक भव्य पीरियड ड्रामा वेबसितिज आहे. ही वेबसिरीज लाहोरच्या हिरा मंडीच्या दोलायमान, ऐतिहासिक परिसरात गणिका (तवायफ) यांच्या जीवनाचे चित्रण करते. मनीषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा, अदिती राव हैदरी आणि ऋचा चढ्ढा यांच्या प्रमुख भूमिकांसह अनेक कलाकारांचा समावेश आहे. हीरामंडी प्रेक्षक आणि समीक्षकांनाही आवडते. ही वेबसिरीज एक मे 2024 रोजी नेट फिक्स वर रिलीज झाली आहे.

    मिर्झापूर 3

    मिर्झापूर 3 ही सर्वात लोकप्रिय हिंदी वेब सिरीजपैकी एक आहे. या सीझनमध्ये गोलू, बीना (रसिका दुगल) आणि माधुरी यादव (ईशा तलवार) या महिला पात्रांसाठी अधिक प्रमुख भूमिका आहेत, ज्यात महत्त्वाकांक्षा आणि जगण्याची सूक्ष्म चित्रण आहे. जर तुम्हाला क्राइम थ्रिलर मालिका पहायची, तर तुम्ही Amazon Prime Video वर मिर्झापूर पाहू शकता. मिर्झापूर 3 ही वेब सिरीज 5 जुलै 2024 रोजी रिलीज झाली आहे.

    पंचायत 3

    पंचायती 3 ही देखील एक बहुप्रतिक्षित वेब सिरीज पैकी एक आहे. हा तिसरा सीझन मनापासून कथाकथन, सूक्ष्म विनोद आणि बारकावे सादरीकरणाने त्याचे आकर्षण निर्माण करतो. पंचायत नाटक आणि जीवनातील काही क्षणांचे मिश्रण देते जे प्रेक्षकांना खूप आवडले आहे. Amazon Prime Video ची ही सर्वोत्कृष्ट मालिका आहे. ही वेब सिरीज 28 मे 2024 रोजी रिलीज झाली आहे.

    सिटाडेल हनी बनी

    सिटाडेल हनी बनी ही हेरगिरीच्या जगात सेट केलेली एक उच्च-ऑक्टेन ॲक्शन वेब सिरीज आहे. बनी (वरूण धवनने साकारलेला) आणि हनी (सामंथा रुथ प्रभू) यांच्या पात्रांवर लक्ष केंद्रित करून हा जागतिक सिटाडेल फ्रँचायझीचा स्पिन-ऑफ आहे. तुम्ही ही वेबसिरीज Amazon Prime Video वर स्ट्रीम करू शकता. ही वेब सिरीज 6 नोव्हेंबर 2024 रोजी रिलीज झाली आहे..

    कॉल मी बे

    कॉल मी बे ही अनन्या पांडे अभिनीत हिंदी भाषेतील नाटक वेब सिरीज आहे. हा शो Bae या तरुण स्त्रीला फॉलो करतो, जिला सार्वजनिक घोटाळ्यानंतर एका अनपेक्षित जीवनाच्या संक्रमणात सापडते आणि तिला विलासी जीवनातून कठोर परिश्रमाने भरलेल्या जीवनाकडे जाण्यास भाग पाडते. ही मालिका Amazon Prime Video वर उपलब्ध आहे. 6 सप्टेंबर 2024 रोजी ही वेब सिरीज रिलीज झाली आहे.

    Top 5 political news | 2024 मध्ये भारताच्या राजकारणात घडल्या या महत्वपूर्ण घटना; जाणून घ्या एका क्लिकवर

    Top 5 political news | 2024 मध्ये देशाच्या राजकारणात देखील अनेक घडामोडी घडलेल्या आहेत. राजकीय वर्तुळातून मोठ्या घटना समोर आलेल्या आहेत. आणि त्या सगळ्यांसाठी अत्यंत आश्चर्यकारक होत्या. राजकारणातील याच घटनांमुळे सगळ्या गोष्टी बदललेल्या आहेत. आज आपण 2024 मध्ये देशाच्या राजकारणात नक्की कोणत्या महत्त्वपूर्ण घटना घडल्या? आणि त्याचा देशातील जनतेवर नक्की कशा प्रकारे परिणाम झाला? हे आज आपण जाणून घेणार आहोत.

    लोकसभेमध्ये एनडीए विजयी | Top 5 political news

    यावर्षीच्या लोकसभा निवडणुकीमध्ये एनडीए पक्ष विजयी झालेला आहे. एनडीएला सगळ्यात जास्त बहुमत मिळाल्याने विजयी झालेले आहेत. या वर्षी ममता बॅनर्जी दूर गेल्यामुळे आणि नितेश कुमार हे एनडीएमध्ये गेल्यामुळे इंडिया आघाडी कमकुवत होईल असे चित्र दिसत होते. परंतु या निवडणुकीत कामगिरी अपेक्षेपेक्षा खूप चांगली दिसून आलेली आहे. त्याचप्रमाणे मोदी सरकार विरोधात लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. त्याचा फायदा देखील इंडिया आघाडीला झाला. आणि यावर्षी एनडीए सरकार लोकसभेमध्ये सर्वाधिक मताने विजयी झालेले आहे. देशातील राजकारणातील ही एक मोठी घटना होती.

    महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीला शिंदे गट, भाजप भुईसपाट

    यावर्षीचा महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचा निकाल अत्यंत आश्चर्यकारक होता. या निवडणुकीमध्ये महायुती सरकार मधील शिंदे गटाने आणि भाजप यांना चांगली मते मिळून विजयी होतील, अशी अनेकांची इच्छा होती. सुरुवातीला तसे संपूर्ण चित्र दिसत होते. परंतु या लोकसभा निवडणूकित शिंदे गट आणि भाजप मात्र भुई सपाट झाल्याचे दिसले. या उलट शरद पवार गटातच्या अनेक आणि काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी विजय मिळवलेला आहे.

    हरियाणा मध्ये भाजप सरकार

    2024 च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजप पक्षाने विजय मिळवलेला आहे. यावर्षी भाजपने सलग तिसऱ्यांदा विजयी होऊन हॅट्रिक मिळवलेली आहे. हरियाणामध्ये या आधी कुठल्याच एका पक्षाचे सरकार सलग तीन वेळा निवडून आलेले नाही. लोकसभा निवडणूकमध्ये भाजपला हरियाणामध्ये काहीसा फटका बसला होता. भाजपला स्वबळावर सत्ता स्थापन करता येत नसल्याने पक्षाचे कार्यकर्ते देखील निराश झाले होते. परंतु विधानसभा निवडणुकीत मात्र चित्र बदलले आणि हरियाणामध्ये भाजपचा विजय झालेला आहे.

    महाराष्ट्रात विधानसभेला फडणवीस सरकार

    महाराष्ट्रातील विधानसभा 2024 मध्ये फडणवीस सरकार आलेले आहे. यावर्षी भरघोस मतांनी महायुती सरकार विजयी झाली आहे. या महायुतीमध्ये भाजप पक्ष शिवसेना शिंदे गट तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आहे. याआधी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री होते. या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या जास्त जागा निवडून आल्या, त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे.

    झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांनी सत्ता राखली

    झारखंडमधील विधानसभा निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी सत्ता राखलेली आहे. हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस राष्ट्रीय जनता दलाने भाकप माले यांचा समावेश होता. या इंडिया आघाडीने झारखंड विधानसभेमध्ये 81 पैकी 56 जागा मिळवून विजय मिळवलेला आहे. इंडिया आघाडीला दोन तृतीयांश एवढी मते मिळालेली आहे.

    Top mobile launches of 2024 | 2024 मध्ये लॉन्च झाले ‘हे’ जबरदस्त फोन; जाणून घ्या फीचर्स

    Top mobile launches of 2024

    Top mobile launches of 2024 | 2024 या वर्षात अनेक नवनवीन स्मार्टफोन लॉन्च झालेले आहेत. या स्मार्टफोनची वर्षभर चांगली चर्चा झालेली आहे. तसेच परवडणाऱ्या किमतीमध्ये आणि चांगले फीचर्स असणारे हे फोन या वर्षात लॉन्च झालेले आहेत. आज आपण 2024 मधल्या टॉप पाच स्मार्टफोन बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. ज्यांची खूप जास्त प्रमाणात चर्चा झालेली आहे. या फोनच्या किमती आणि फीचर्स आज आपण जाणून घेणार आहोत.

    Google Pixel 8a | Top mobile launches of 2024

    Google Pixel 8a

    Google ने Pixel 8a भारतीय बाजारात लॉन्च केला आहे. Pixel 7a गेल्या वर्षी लाँच झाला होता. आणि Pixel 8a अपग्रेडेड व्हर्जन आहे. Pixel 8a नवीन डिझाइन आणि Tensor G3 चिपसेटसह येतो. जो पूर्वी Pixel 8 आणि Pixel 8 Pro मध्ये वापरला होता.Google Pixel 8a भारतात 128 GB आणि 256 GB स्टोरेजमध्ये सादर करण्यात आला आहे. दोन्ही मॉडेल्समध्ये 8 जीबी रॅम उपलब्ध असेल. 128 GB वेरिएंटची किंमत 52,999 रुपये आणि 256 GB ची किंमत 59,999 रुपये ठेवण्यात आली आहे. Pixel 8a अलॉय, बे, ऑब्सिडियन आणि पोर्सिलीन रंगांमध्ये सादर करण्यात आला आहे. Pixel 8a 14 मे रोजी लॉन्च झाला आहे.

    Samsung Galaxy Z Flip 6

    Samsung Galaxy Z Flip 6

    Samsung Galaxy Z Flip 6 या वर्षी भारतात लॉन्च झाला. या फोनचे डिझाइन नेहमीच ट्रेंडमध्ये असते. यावेळी फोनचे वजन कमी केले आहे. यावेळी फ्लिपचे वजन हलके केले आह. आणि ते फक्त 187 ग्रॅम आहे. Samsung Galaxy Z Flip 6 मध्ये 4000 mAh बॅटरी आहे. त्याच्या बॅटरीसोबत कुलिंग सिस्टिमही उपलब्ध होणार आहे. याशिवाय यामध्ये AI सपोर्ट देखील मिळणार आहे, हा फोन तीन रंगांच्या पर्यायांमध्ये येतो, ज्यामध्ये सिल्व्हर शॅडो, यलो, ब्लू, मिंट यांचा समावेश आहे. या फोनमध्ये ऑटो झूमची सुविधा आहे ज्यामुळे त्याचा कॅमेरा खूपच खास बनतो. फ्लेक्स कॅमही उपलब्ध होणार आहे. हा फोन खरेदी करण्यासाठी तुम्हाला 1,09,999 रुपये खर्च करावे लागतील.

    OnePlus 12 | Top mobile launches of 2024

    OnePlus 12

    OnePlus 12 स्मार्टफोनचे नवीन चारजण भारतात लॉन्च झाले आहे. हा नवीन एडिसन ग्लेशियर व्हाइट कलर ऑप्शनमध्ये येतो. फोनच्या 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 64,999 रुपये आहे. फोनची विक्री 6 जून 2024 पासून लॉन्च झाला आहे.. हा फोन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वरून खरेदी करता येईल. बँक ऑफरद्वारे फोन खरेदी केल्यास 3,000 रुपयांचा झटपट कॅशबॅक दिला जात आहे.

    Vivo X100s आणि Vivo X100s Pro

    Vivo X100s Pro

    Vivo ने या फोनमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा सेन्सर वापरला आहे. या फ्लॅगशिप स्मार्टफोनसोबत कंपनीने Vivo X100s आणि Vivo X100s Pro देखील लॉन्च केला आहे. हे दोन्ही फोन जवळपास सारख्याच वैशिष्ट्यांसह येतात. या दोन्ही Vivo स्मार्टफोन्समध्ये 6.78-इंचाचा LTPO AMOLED डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 3,000 nits पर्यंत पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो. फोनच्या डिस्प्लेचे रिझोल्यूशन 2800 x 1260 पिक्सेल आहे. या दोन्ही स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 9300+ फ्लॅगशिप प्रोसेसर आहे Vivo X100 Ultra ची सुरुवातीची किंमत CNY 6499 म्हणजेच अंदाजे 75,000 रुपये आहे.

    Moto G Stylus 5G

    Moto G Stylus 5G

    Motorola चा Moto G Stylus 5G (2024) लाँच करण्यात आला आहे. कंपनीने यामध्ये बिल्ट इन स्टायलस देखील दिले आहेत. ज्याचा वापर नोट्स बनवण्यासाठी आणि फोटो एडिटिंगसाठी करता येईल. फोनमध्ये 6.7 इंच आकारमानाचा POLED डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. फोनमध्ये 50-मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा आहे (Moto G Stylus 5G 2024 कॅमेरा तपशील). हा एक मोठ्या बॅटरीने सुसज्ज असलेला स्मार्टफोन आहे (Moto G Stylus 5G 2024 बॅटरी तपशील). त्याची किंमत आणि सर्व स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया. Moto G Stylus 5G (2024) ची किंमत $399.99 (अंदाजे रु 33,000) आहे.

    RBI चा मोठा निर्णय ; शेतकऱ्यांसाठी को-लॅटरल फ्री कर्जाच्या रक्कमेत वाढ

    RBI

    हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 2025 हे नवीन वर्ष सुरु होण्यास काहीच आठवडे उरले आहेत. त्यातच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) देशातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. या निर्णयामध्ये शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या को-लॅटरल फ्री कर्जाच्या मर्यादेत वाढ करत, आरबीआयने आता ही मर्यादा 1.6 लाख रुपयांवरून 2 लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे. त्यामुळे असंख्य शेतकऱ्यांना आनंदाची बातमी मिळाली आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्याचा अधिक फायदा होणार आहे.

    कोट्यवधी शेतकऱ्यांना फायदा

    आरबीआयच्या या निर्णयामुळे देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना फायदा होणार असून, भांडवलाच्या अभावामुळे शेतीच्या कामांमध्ये होणाऱ्या अडचणी दूर होऊन , व्यवसायाला चालना मिळणार आहे . शेतकऱ्यांना आता कोणतेही तारण ठेवण्याची गरज न पडता शेतीसाठी 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेता येणार आहे. त्यामुळे शेतकरी सहजपणे आपला व्यवसाय प्रगती पथावर घेऊन जाऊ शकतात.

    को-लॅटरल फ्री कर्जासाठी व्याज

    या महत्वपूर्ण निर्णयामुळे शेतकऱ्यांना पीक लागवड, बी-बियाणे खरेदी, भाज्या व फळांची शेती, दूध व मांस उत्पादनासाठी तसेच साठवणुकीसाठी गोदाम बांधकाम, आणि सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी कर्ज उपलब्ध होणार आहे. ज्यामुळे आर्थिक समस्या दूर होण्यास मदत होईल. या को-लॅटरल फ्री कर्जासाठी फक्त 7% दराने व्याज आकारले जाईल. सगळ्यात महत्वाचे म्हणजे, जर शेतकऱ्यांनी कर्ज वेळेत परत केले, तर त्यांना 3% व्याज सवलत मिळणार असून , ज्यामुळे प्रत्यक्ष व्याज दर केवळ 4% होतो. त्यामुळे शेतकऱ्यांचा जास्त नफा होतो.

    निर्णय घेण्यामागचे कारण

    शेतीमधील वाढत्या उत्पादन खर्च आणि महागाईचा विचार करून हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. बऱ्याच वेळा शेतकऱ्यांकडे तारण ठेवण्यासाठी मालमत्ता नसते, ज्यामुळे त्यांना कर्ज घेता येत नाही. आता तारणाशिवाय उपलब्ध होणारे कर्ज शेतकऱ्यांच्या उत्पादन व उत्पन्नवाढीत महत्त्वाची भूमिका बजावेल. यामुळे देशातील कृषी क्षेत्रात सकारात्मक बदल घडताना दिसणार आहे.

    Top 5 Auto launches in 2024 | 2024 मध्ये भारतात लॉन्च झाल्या ‘या’ शानदार गाड्या; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

    Top 5 Auto launches in 2024

    Top 5 Auto launches in 2024 | 2024 मध्ये भारतात ऑटो इंडस्ट्रीमध्ये मोठा बदल झालेला आहे. अनेक बहुप्रतिक्षित आणि नवीन गाड्या भारतामध्ये लॉन्च झालेल्या आहेत. भारतातील अनेक लोकांनी त्या खरेदी देखील केलेल्या आहेत. अत्यंत चांगले फीचर्स आणि परवडणाऱ्या किमतीमध्ये या गाड्या भारतामध्ये लॉन्च झालेल्या आहेत. आज आपण 2024 च्या शेवटी संपूर्ण वर्षात कोणत्या गाड्या भारतात लॉन्च झालेल्या आहेत. हे जाणून घेणार आहोत त्यांच्या किमती आणि फीचर्स देखील जाणून घेणार आहोत.

    Mahindra XEV 9e आणि BE 6e

    Mahindra XEV 9e आणि BE 6e

    Mahindra XEV 9e आणि BE 6e 26 नोव्हेंबर 2024 मध्ये भारतात लॉन्च झालेल्या आहे. महिंद्राने शेवटी XEV 9e आणि BE 6e इलेक्ट्रिक कार त्याच्या उप-ब्रँड्स XEV आणि BE च्या बॅनरखाली सादर केल्या आहेत. BE 6e ची किंमत रु. 18.90 लाख आहे, तर XEV 9e ची किंमत रु. 21.90 लाख आहे. दोन्ही इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये अनेक सेगमेंट फर्स्ट वैशिष्ट्ये प्रदान करण्यात आली आहेत. आणि विविध प्रकारचे पॉवरट्रेन पर्याय प्रदान करण्यात आले आहेत, ज्याच्या आधारे ते मर्सिडीज-बेंझ EQA आणि BMW ix1 सारख्या प्रीमियम इलेक्ट्रिक कारला कठीण स्पर्धा देऊ शकतात. महिंद्राने अनेक प्रीमियम फीचर्स प्रदान केले आहेत या इलेक्ट्रिक चारचाकी वाहनांमध्ये ऑगमेंटेड रिॲलिटी (एआर) आधारित हेड-अप डिस्प्ले देखील देण्यात आला आहे.

    Honda Amaze 8

    Honda Amaze 8

    Honda Amaze चे नवीन जनरेशन मॉडेल 6 डिसेंबर रोजी लाँच करण्यात आले. ही होंडा कार एका नव्या रुपात बाजारात आली आहे. नवीन Honda Amaze ची किंमत 8 लाख रुपयांपासून सुरू होते. जसजसे त्याचे प्रकार वाढत जातात, तसतसे त्याची वैशिष्ट्ये देखील वाढतात. नवीन अमेझ छान दिसत आहे. ही कार होंडा एलिव्हेट आणि होंडा सिटीचे कॉम्बिनेशन म्हणता येईल. या वाहनात एलईडी लाईट आणि 15-इंच चाके वापरण्यात आली आहेत, ज्यामुळे या कारच्या रस्त्यावरील उपस्थितीत आणखी सुधारणा झाली आहे. या कारची लांबी केवळ 4 मीटरच्या मर्यादेत ठेवण्यात आली आहे. ही कार ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल ट्रान्समिशनच्या पर्यायासह येते.

    Skoda Kayak SUV

    Skoda Kayak SUV

    Skoda Auto India ने भारतीय बाजारपेठेत Kayak SUV लाँच केली आहे, जी सब-4 मीटर कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटमध्ये सर्वाधिक विकली जाणारी मारुती सुझुकी ब्रेझा तसेच टाटा नेक्सॉन, ह्युंदाई व्हेन्यू आणि किया सोनेट सारख्या वाहनांशी स्पर्धा करते. Skoda Kaylak च्या फक्त बेस व्हेरिएंटची किंमत 7,89,000 रुपये आहे. Kaylak चे बुकिंग 2 डिसेंबरपासून सुरू झाले आहे. Skoda Kaylak मध्ये 1.0 लिटर TSI पेट्रोल इंजिन आहे, जे 85 kW ची कमाल पॉवर आणि 178 न्यूटन मीटरचा पीक टॉर्क जनरेट करेल. कायलाकमध्ये 6 स्पीड मॅन्युअल तसेच 6 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्याय असतील. कायलाक मायलेजच्या बाबतीतही चांगला असल्याचा कंपनीचा दावा आहे.

    Maruti Suzuki Dzire

    Maruti Suzuki Dzire

    मारुती सुझुकीची सर्व नवीन डिझायर सेडान 2024 मध्ये भारतीय बाजारपेठेत लॉन्च झाली आहे आणि तिची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 6.79 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. जुन्या मॉडेलच्या तुलनेत अनेक नवीन वैशिष्ट्यांसह आणि उत्तम लुक-डिझाइनसह, मारुती सुझुकीची पहिली 5 स्टार सुरक्षा रेटिंग असलेली ही कार खास आहे आणि भविष्यात सेडान सेगमेंटला नवीन उंचीवर नेऊ शकते. मारुती सुझुकीची नवीन Dezire दोन CNG प्रकारांसह LXI, VXI, ZXI आणि ZXI Plus सारख्या 4 ट्रिम्समध्ये एकूण 9 प्रकारांमध्ये सादर करण्यात आली आहे. त्यांची एक्स-शोरूम किंमत 6.79 लाख ते 10.14 लाख रुपये आहे. ही कॉम्पॅक्ट सेडान सिल्व्हर, ग्रे, ब्लॅक, ब्लू, व्हाईट, रेड आणि ब्राऊन अशा 7 आकर्षक रंगांच्या पर्यायांमध्ये सादर करण्यात आली आहे. या कारचे बुकिंग सुरू असून डिलिव्हरी सुरू होणार आहे.