Thursday, January 1, 2026
Home Blog Page 341

Top 5 Hindi movies of 2024 | 2024 मध्ये या चित्रपटांनी घातला धुमाकूळ; बॉक्स ऑफिसवर केली छपरफाड कमाई

Top 5 Hindi movies of 2024

Top 5 Hindi movies of 2024 | 2024 हे वर्ष बॉलिवूडसाठी देखील खूप चांगले वर्ष ठरलेले आहेम या वर्षांमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट रिलीज झालेले आहेत. ज्यांनी बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई देखील केलेली आहे. तसेच प्रेक्षकांच्याही ते सिनेमे चांगलेच पसंतीस पडलेले आहेत. 2024 या वर्षी बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट रिलीज झालेले आहेत. परंतु त्यातील काही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगल्यात जम बसवलेला आहे. आता आज आपण 2024 च्या अखेरीस (Top 5 Hindi movies of 2024) वर्षातील असे काही सिनेमा पाहणार आहोत त्यांनी 2024 मध्ये चांगली बॉक्स ऑफिस कमाई केलेली आहे.

कल्की 2898 AD

नाग अश्विन दिग्दर्शित Kalki 2898 AD हा चित्रपट 2024 मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटात प्रभास, अमिताभ बच्चन, कमल हसन यांसारखी तगडी स्टार कास्ट होती. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातलेला आहे. 550 करोड बजेटमध्ये बनणाऱ्या या सिनेमाने जवळपास 1052 करोड रुपयाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन जमा केलेले आहे. त्यामुळे हा सिनेमा 2024 मधला एक हिट सिनेमा ठरलेला आहे.

स्त्री 2

स्त्री 2 हा सिनेमा अमर कौशिक यांनी दिग्दर्शित केलेला आहे. या सिनेमांमध्ये राजकुमार राव, श्रद्धा कपूर, पंकज त्रिपाठी यांसारखे कलाकार आहेत. या सिनेमाचा पहिला पार्ट प्रेक्षकांना चांगलाच पसंतीस पडलेला होता. त्यामुळे दुसऱ्या पार्टची देखील सगळेजण आतुरतेने वाट पाहत होते. स्त्री 2 हा सिनेमा 100 करोड मध्ये बनलेला होता. तर या सिनेमाने जवळपास 858. 4 कोटी रुपयांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन जमा केलेले आहे.

देवरा पार्ट 1

देवरा या चित्रपटात ज्युनिअर एनटीआर, जानवी कपूर, सैफ अली खान या कलाकारांनी काम केलेले आहे. हा सिनेमा देखील या वर्षातील बहुप्रतिक्षित सिनेमा होता. या सिनेमाचा दुसरा भाग देखील लवकरच रिलीज होणार आहे. हा सिनेमा 250 करोड रुपयांमध्ये बनवला गेला होता. तर या सिनेमाने 443.8 कोटी रुपयांचा बॉक्स ऑफिस कलेक्शन जमा केलेले आहे.

भुल भुलैया 3

अनिस अजमी यांनी भुल भुलैय्या 3 हा चित्रपट दिग्दर्शित केलेला आहे. या चित्रपटाच्या पहिल्या दोन फ्रेंचाईज आलेल्या आहेत. या तिसऱ्या फ्रॅंचायजीची सगळेजण उतरतेने वाट पाहत होते. अखेर 2024 मध्ये हा सिनेमा रिलीज झाला. या सिनेमांमध्ये कार्तिक आर्यन, विद्या बालन, माधुरी दीक्षित यांसारखे कलाकार होते. हा चित्रपट 150 करोड रुपयांमध्ये बनवला गेला होता. परंतु या सिनेमाने 396.7 कोटी रुपयांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन जमा केलेले आहे

पुष्पा 2 द रुल

2024 या वर्षातील पुष्पा 2 हा चित्रपट सर्वात बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक होता. 2021 साली या चित्रपटाचा पहिला भाग आलेला होता. त्यानंतर दुसऱ्या भागाची सगळ्यात प्रेक्षकांना आतुरता लागलेली होती. 350 कोटी रुपये बजेट असणाऱ्या या सिनेमाने पहिल्या दोन दिवसातच जवळपास 90% बजेट कव्हर केलेले आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना हे कलाकार आहेत. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर 294 कोटी रुपयांचा व्यवसाय केलेला आहे. तर दुसऱ्या दिवशी 90 कोटी रुपयांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन जमा केलेले आहे. या चित्रपटाने आतापर्यंत संपूर्ण जगभरात 400 कोटी रुपयांचा आकडा क्रॉस केलेला आहे. आणि आणखी काही दिवसात हा सिनेमा आतापर्यंतचा सर्वात जास्त बॉक्स ऑफिस कलेक्शन जमा करणारा सिनेमा ठरणार आहे.

Top records of IPL in 2024 | IPL 2024 ठरला रेकॉर्ड ब्रेक सिझन; रचले हे नवीन विक्रम

Top records of IPL in 2024

Top records of IPL in 2024 | आयपीएल 2024 चा हंगाम सगळ्यांना लक्षात राहणारा सिझन होता. कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादचे 8 प्लेअर राखून पराभव करून आयपीएल 2024 ची ट्रॉफी जिंकली. या वर्षी असे काही विक्रम झाले आहेत. जे भविष्यात मोडणे खूप कठीण आहे. T20 सामन्यातील सर्वाधिक षटकारांव्यतिरिक्त, यामध्ये सर्वात मोठी धावसंख्या, सर्वाधिक वेळा 200 किंवा त्याहून अधिक धावा केल्यासारखे अनेक मोठे विक्रम देखील समाविष्ट आहेत. या आयपीएल हंगामातील विक्रम आणखी मोडणे कठीण आहे. आता आपण IPL 2024 मध्ये कोणते विक्रम झाले आहेत ते जाणून घेणार आहोत.

सर्वात जास्त स्कोअर | Top records of IPL in 2024

आयपीएल 2024 च्या 30 व्या सामन्यात, सनरायझर्सने बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगलोरविरुद्ध इतिहास रचला, तीन विकेट्सवर 287 धावा करून आयपीएलची सर्वोच्च धावसंख्या बनवली. हैदराबादने त्याच आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध केलेल्या तीन विकेट्सवर 277 धावांची सर्वात जास्त रन केले. या हंगामापूर्वी, आयपीएलची सर्वात जास्त धावसंख्या 263/5 होती, जी बेंगळुरूने 2013 मध्ये पुणे वॉरियर्सविरुद्ध केली होती. 2024 च्या हंगामात यापेक्षा मोठा विक्रम तयार झाला आहे. त्यापैकी 3 सनरायझर्स हैदराबादच्या नावावर आहेत. एवढेच नाही तर टी-20 क्रिकेटमधील ही आतापर्यंतची दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे. T20 क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या 3 विकेट्सवर 314 धावा आहे, जी नेपाळने 2023 मध्ये मंगोलियाविरुद्ध केली होती.

दोन्ही डावात मिळून सर्वाधिक धावा

या वर्षी आयपीएल हंगामात, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चिन्नास्वामी येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात, दोन्ही डावात मिळून 549 धावा झाल्या, जे आयपीएलमधील एकाच सामन्यातील दोन्ही डावांमध्ये मिळून केलेल्या सर्वाधिक धावा आहेत. या सामन्यात सनरायझर्सने 20 षटकात 3 गडी गमावून 287 धावा केल्या. त्याच वेळी, बेंगळुरू संघाने 20 षटकांत 7 गडी गमावून 262 धावा केल्या होत्या.

सर्वाधिक शतके

आयपीएल 2024 मध्ये आतापर्यंत 14 शतके झाली आहेत, जी मागील कोणत्याही हंगामापेक्षा जास्त आहे. यापूर्वी 2023 मध्ये 12 शतके झाली होती. त्याच वेळी, 2022 मध्ये 8 शतके झाली होती, 2016 मध्ये 7 शकते आणि 2008 मध्ये 6 शतके झाली होती.

सर्वाधिक स्कोअर 250+

IPL 2024 मध्ये आतापर्यंत 8 वेळा 250 किंवा त्याहून अधिक धावा केल्या गेल्या आहेत. या सीझनपूर्वी, 16 सीझनमध्ये 250+ स्कोअर बनवलेले फक्त दोनच प्रसंग आले होते. मात्र, या मोसमाने सर्वांना मागे सोडले.

एका सामन्यात सर्वाधिक षटकार

आयपीएल 2024 च्या 42 व्या सामन्यात पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्यात दोन्ही डावात एकूण 42 षटकार मारले गेले. पंजाबकडून 24 षटकारांसह कोलकाता संघाकडून 18 षटकार मारले गेले. एकाच टी-20 सामन्यात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम 42 षटकारांचा आहे. या प्रकरणात दुसऱ्या क्रमांकाची तुलनाही आयपीएलशी केली जाते. याच हंगामात हैदराबादमध्ये सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्यात झालेल्या सामन्यात 38 षटकार ठोकले होते. त्याचवेळी याच हंगामात चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात झालेल्या सामन्यात 38 षटकार ठोकले होते.

तांब्याच्या भांड्यातून पाणी पीत असाल तर सावधान; शरीराला होते हे नुकसान

Copper Vessels

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल अनेक लोक तांब्याच्या भांड्यांमध्ये पाणी तसेच जेवण ठेवतात. कारण तांबे आपल्या शरीरासाठी अत्यावश्यक असे खनिज म्हणून काम करतो. आणि यामुळे आपल्या हाडांची ताकद देखील वाढते. आणि आपले आरोग्य देखील चांगले राहते. हृदयासाठी देखील तांब्याचा चांगला फायदा होतो. तांब्याचे आपल्या शरीराला फायदा व्हावे, त्यामुळे अनेक लोक तांब्याच्या भांड्यांमध्ये अन्न शिजवायचे तसेच तांब्याच्या भांड्यांचा वापर देखील करायचे. आणि यामुळेच आजकाल तांब्याची बॉटल तसेच तांब्याचा पिंप यांच्यामधून पाणी पिण्याची फॅशन आली आहे. परंतु अनेक लोकांना या तांब्याच्या बाटलीतून पाणी पिण्याचे तोटे माहित नाही. त्यामुळे तुम्हाला या तांब्याच्या भांड्यांमधून पाणी पिण्याचे आपल्या शरीराला काय फायदे होतात आणि काय होते होतात ते जाणून घेणे गरजेचे आहे.

तांब्याच्या भांड्यातून पाणी पिण्याचे फायदे

तांब्याच्या भांड्यातून पाणी पिले तर तुमचे पोट स्वच्छ होते. तसेच तुमच्या त्वचेला देखील एक उजाळा प्राप्त होतो. तांब्याच्या भांड्यांमध्ये पाणी ठेवल्याने हानिकारक जंतूची वाढ होत नाही. आणि चांगले पाणी आपल्या पोटात जाते. परंतु जर कुठल्याही गोष्टीचा अतिरेक केला, तर त्याचा फायदा होण्याऐवजी आपले नुकसान होते. तुमच्या शरीराला तर रोज दहा मिलीग्राम तांब्याची आवश्यकता असते. परंतु त्यापेक्षा कमी तांबे आपल्या शरीराला मिळाले तर आपला मेंदू व्यवस्थित काम करणार नाही. यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. यामुळे अनेक लोक तांब्याच्या भांड्यांमध्ये पाणी ठेवतात. जेणेकरून तांब्याचा अंश त्यामध्ये उतरायला सुरुवात होत. आणि तुमच्या शरीरासाठी याचा फायदा होतो.

तांब्याच्या भांड्यातून पाणी पिण्याचे तोटे

तांब्याच्या भांड्यातून पाणी पिणे फायदेशीर आहे. परंतु तुम्ही केलेली एक चूक तुमच्या शुद्ध पाण्याला विषारी देखील बनवू शकतो. अनेक वेळा आपण तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवतो. त्यावेळी तांब्याचा अर्क त्यामध्ये उतरतो. तो जर योग्य प्रमाणात असेल तर ठीक. परंतु तांब्याचे प्रमाण जास्त प्रमाणात असेल तर ते मात्र तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. तांब्याचे प्रमाण जर जास्त असेल, तर ते आपल्या शरीराच्या विविध भागांमध्ये साचून राहते. आणि त्यानंतर ते आपल्या शरीरासाठी विषारी देखील ठरते.

Bussiness Idea | नोकरी सांभाळून करा हे 3 व्यवसाय; महिन्याला होईल लाखोंची कमाई

Bussiness Idea

Bussiness Idea | आजकाल अनेक स्त्रियांना तसेच पुरुषांना देखील नोकरी करण्याचा अत्यंत कंटाळा आलेला आहे. नोकरी सोडून व्यवसाय करावा किंवा नोकरी करता करता देखील जर एखादा नवीन व्यवसाय करता आला, तर त्यांचा आर्थिक हातभार वाढेल. परंतु आता कोणता व्यवसाय (Bussiness Idea) करायचा? हे त्यांना समजत नाही. तसेच बाजारात कोणत्या व्यवसायाला जास्त मागणी आहे? हे माहीत असणे देखील गरजेचे आहे. त्यासाठी एवढे भांडवल देखील जमा करावे लागते. आजकाल तरुण पिढीला पाहिले तर नोकरी करण्यापेक्षा त्यांचा स्वतःचा व्यवसाय करण्याकडे जास्त कल आहे. आज आपण तीन प्रकारच्या व्यवसायांबद्दल जाणून घेणार आहे. यातून तुम्ही दर महिन्याला लाखो रुपये कमवू शकता. तर या बिझनेस आयडिया कोणत्या आहेत हे आपण जाणून घेणार आहोत.

फूड स्टॉल | Bussiness Idea

आज काल अनेक विद्यार्थी तसेच कामाला जाणारे लोक देखील फूड स्टॉलवर खात असतात. जर तुमच्या जेवनाला चांगला सुवास असेल, तसेच जेवण देखील चविष्ट असेल, तर आपोआपच लोक तुमच्याकडे येऊ शकतात. त्यामुळे जर तुम्हाला चांगल्या प्रकारे जेवण बनवता येत असेल, तर तुम्ही फूड स्टॉलचा व्यवसाय चालू करू शकता स्ट्रीट फूड खाण्यासाठी लोकांची प्रचंड गर्दी होत असते. आणि या व्यवसायातून तुम्ही दर महिन्याला चांगली कमाई करू शकाल. यासाठी तुम्हाला योग्य लोकेशन देखील निवडावे लागेल. ज्या ठिकाणी शाळा, कॉलेज किंवा एखाद्या ऑफिस आहे. त्या ठिकाणी तुम्ही हा स्टॉल लावू शकता. जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल.

योगा ट्रेनर

आजकाल बदलत्या जीवनशैलीचा परिणाम लोकांच्या आरोग्यावर होत आहे. आणि यामुळेच अनेक पुरुषांना तसेच स्त्रियांना लठ्ठपणाचा त्रास सुद्धा होत आहे. काम आणि ऑफिस हे सगळं सांभाळताना ते स्वतःकडे मात्र दुर्लक्ष करतात. आणि शरीरावर याचे विपरीत परिणाम होतात. त्यामुळे आजकाल अनेक ठिकाणी जिम आणि योगा सेंटर आहेत. परंतु अनेक लोकांना या महागड्या जिममध्ये जायला जमत नाही. किंवा तिथे जाण्यासाठी वेळही नसतो. अशा वेळी जर तुम्ही ऑनलाइन पद्धतीने योगा क्लास घेतले, तर यामध्ये तुम्हाला खूप चांगला फायदा होऊ शकतो.

कपड्यांचा व्यवसाय

कपडा हा मानवाच्या जीवनातील सगळ्यात महत्त्वाचा आहे. कुठलेही सणवार असले, उत्सव असले किंवा इतर वेळी देखील अनेक वेळा लोक कपडे खरेदी करतात. अशावेळी तुम्ही तुमचा स्वतःचा कपड्यांचा एखादा स्टॉल देखील सुरू करू शकता. सुरुवातीला छोट्या प्रमाणात हा बिजनेस चालू करून नंतर तुम्ही हळूहळू हा बिजनेस वाढवून एक मोठे शोरूम देखील करू शकता. यातून तुम्ही दर महिन्याला चार ते पाच लाखांची कमाई करू शकता.

UPI Lite च्या ट्रांजेक्शनच्या मर्यादेत वाढ; इंटरनेटशिवाय पेमेंट करणे होणार शक्य

UPI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय रिझर्व्ह बँकेकडून डिजिटल पेमेंटला अधिक सुलभ बनवण्यासाठी UPI Lite च्या ट्रांजेक्शन अमाऊंटची मर्यादा वाढवली आहे. यामुळे ग्राहकांना एका वेळेस 1000 रुपयांपर्यंतचे ट्रांजेक्शन करता येणार आहे. तसेच त्यांनी वॉलेटची एकूण मर्यादा 5000 रुपये करून , हा निर्णय त्वरित लागू केला आहे. UPI Lite चा वापर प्रामुख्याने लहान ट्रांजेक्शन आणि कमी इंटरनेट कनेक्टिव्हिटी असणाऱ्यांसाठी करण्यात आला आहे. तर चला पाहुयात इंटरनेटशिवाय सहज पेमेंट कसे करता येणार आहे.

इंटरनेटशिवाय सहज पेमेंट करता येणार

UPI Lite म्हणजे Unified Payments Interface होय . UPI Lite ही सुविधा इंटरनेटशिवाय लहान रक्कम डिजिटल पेमेंट करण्यासाठी उपयुक्त आहे. यामुळे कमी इंटरनेट कनेक्टिव्हिटी असलेल्या ठिकाणीही सहज पेमेंट करता येते. या प्रणालीत रिअल-टाइम अलर्ट येत नसल्यामुळे SMS नोटिफिकेशन्स कमी होतात, ज्यामुळे मोबाईलमध्ये वारंवार त्रास होत नाही. तसेच UPI Lite सुरक्षित असून वेगवान पेमेंटसाठी अतिरिक्त ऑथेंटिकेशनची गरज नसते, त्यामुळे दैनंदिन व्यवहार अधिक सोपे आणि जलद होतात.

RBI चा नवीन नियम

RBI ने UPI Lite च्या मर्यादांमध्ये सुधारणा केली आहे. आता एका ट्रांजेक्शनसाठी 1000 पर्यंतची मर्यादा लागू करण्यात आली आहे, जी पूर्वी 500 होती. तसेच वॉलेटची एकूण मर्यादा 2000 वरून 5000 पर्यंत वाढवण्यात आली आहे. यामुळे किराणा सामान खरेदी, बस ऑटोचे भाडे देणे किंवा छोट्या बिलांची पेमेंट करणे अधिक सोयीचे झाले आहे. यामुळे लोकांच्या कामत गती मिळाली आहे.

ग्रामीण भागातील लोकांना फायदा

UPI Lite ग्रामीण भागातील नागरिकांसाठी जास्त फायदेशीर ठरत आहे. कमी नेटवर्क असलेल्या भागांमध्येही पेमेंट करणे आता शक्य झाले आहे. हा निर्णय डिजिटल पेमेंट्सला अधिक चालना देऊन भारतातील डिजिटल अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यास मदत करेल. या सुविधेमुळे डिजिटल व्यवहार अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचतील आणि भारताच्या डिजिटल इंडिया मोहिमेला पाठिंबा मिळणार आहे.

दुग्धव्यवसायात ‘या’ म्हशींच्या जातीची करा विक्री; होईल भरघोस नफा

Dairy Farming

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा कृषी व्यवसाय मानला जातो, ते दूध, खत आणि इतर कृषी उत्पादने प्रदान करते. ग्रामीण अर्थव्यवस्थेत पशुपालनाला विशेष महत्त्व दिले जाते, कारण हा अनेक लोकांच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत आहे. अशा परिस्थितीत जर तुम्हाला दुग्धव्यवसाय सुरू करायचा असेल, तर आम्ही तुमच्यासाठी अशाच 5 म्हशींच्या जातींची माहिती घेऊन आलो आहोत, ज्याचे पालन करून तुम्ही मोठी कमाई करू शकता. या जातींच्या म्हशींचे संगोपन केल्याने अधिक दूध उत्पादन मिळते आणि त्यांच्या देखभालीवरही फारसा खर्च येत नाही.

मुर्राह म्हैस

दुभत्या जातींमध्ये म्हशीची मुर्राह जात सर्वात प्रमुख मानली जाते. म्हशीची ही जात देशातील अनेक राज्यांतील शेतकरी आणि पशुपालकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. हरियाणा, दिल्ली आणि पंजाबमधील बहुतांश शेतकरी मुर्राह म्हशी पाळणे पसंत करतात. मुर्रा जातीची म्हैस एका बछड्यात 1750 ते 1850 लिटर दूध देऊ शकते. या म्हशीच्या दुधात फॅटचे प्रमाण ९ टक्क्यांपर्यंत आढळते. त्याचप्रमाणे मुर्राह म्हशी ओळखल्यास ही म्हैस गडद काळ्या रंगाची असून शेपटीच्या खालच्या भागावर पांढरे डाग दिसतात.

जाफराबादी म्हैस

जाफराबादी जातीच्या म्हशी गुजरातच्या बहुतांश भागात आढळतात. या जातीची म्हैस एका बछड्यात सुमारे 1000 ते 1200 लिटर दूध देऊ शकते. जाफराबादी म्हशीचे डोके व मान आकाराने जड असते, तिचे कपाळ रुंद असते आणि शिंगे मागे वाकलेली असतात. या जातीच्या म्हशींचा रंग गडद काळा असतो.

मेहसाणा म्हैस

मेहसाणा जातीच्या म्हशीचा रंग काळा आणि तपकिरी असतो. या म्हशीचे सरासरी एकूण वजन सुमारे 560 किलो आहे. या म्हशीची शिंगे विळ्याच्या आकाराची असतात. मेहसाणा म्हैस काहीशी मुर्राह जातीच्या म्हशीसारखी दिसते. मेहसाणा जातीची म्हैस एका बछड्यात 1200 ते 1500 किलो दूध देऊ शकते.

सुरती म्हैस

म्हशीची ही जात सरासरी 900 ते 1300 लिटर प्रति व्हॅट दूध उत्पादन क्षमता देते. या म्हशीच्या दुधात फॅटचे प्रमाण 8 ते 12 टक्के असते. या म्हशीचे डोके लांब असून शिंगांचा आकार विळ्यासारखा असतो. या जातीच्या म्हशींचा रंग तपकिरी ते चांदीचा राखाडी आणि काळा असतो.

पंढरपुरी म्हैस

पंढरपुरी म्हशीची जात इतर म्हशींपेक्षा खूपच वेगळी आहे. या म्हशीची शिंगे बरीच लांब, 45 ते 50 सें.मी. या जातीच्या म्हशींचा रंग गडद काळा असतो. याशिवाय या जातीच्या म्हशीच्या डोक्यावर पांढरे डाग असतात. पंढरपुरी म्हशीच्या जातीची सरासरी दूध उत्पादन क्षमता 1700 ते 1800 किलो प्रति डोके आहे.

RBI चा मोठा निर्णय; ग्राहकांना UPI द्वारे स्मॉल फायनान्स बँकांकडून मिळणार कर्ज

RBI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय रिझर्व्ह बँकेची 6 डिसेंबर रोजी मॉनेटरी पॉलिसीची एक महत्वपूर्ण बैठक पार पडली आहे . या बैठकीत कर्जाच्या संदर्भात महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये स्मॉल फायनान्स बँकांचे जे ग्राहक आहेत, त्यांच्यासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. लोकांना आता UPI सुविधेच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध होणार असून, याआधी हि सुविधा फक्त शेड्युल्ड कमर्शियल बँकांसाठी मर्यादित होती. पण या झालेल्या बैठकीत स्मॉल फायनान्स बँकांनाही हि सुविधा उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे लहान बँकांमध्ये खाते असलेल्या लोकांसाठी हा निर्णय अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.

विविध अँपच्या साह्याने कर्ज उपलब्ध

सप्टेंबर 2023 रोजी UPI च्या माध्यमातून कर्ज मिळवण्याची प्रक्रिया सुरु झाली होती. यामध्ये ग्राहकांना BHIM, Paytm, GPay, PayZapp यासारख्या अँपच्या माध्यमातून सहज कर्ज घेता येते. ग्राहकांसाठी आधीच क्रेडिट लिमिट निश्चित केली जाते आणि त्यानंतर ग्राहक सुलभपणे UPI चा वापर करून कर्ज घेऊ शकतात. या सर्वामध्ये नेशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) महत्वाची भूमिका बजावताना दिसते.

क्रेडिट प्रोफाईलवरून क्रेडिट लाईन निश्चित

ग्राहकांचे क्रेडिट प्रोफाईल पाहून स्मॉल फायनान्स बँक आणि इतर वित्तीय संस्थांद्वारे क्रेडिट लाईन निश्चित केली जाते. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील लोकांना तसेच शहरी भागातील लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण या निर्णयामुळे लोकांना सहज कर्ज उपलब्ध होणार असून, वित्तीय समावेशनाला चालना मिळणार आहे.

कमी वेळेत कर्ज

UPI सुविधेद्वारे कर्ज घेण्याच्या प्रक्रियेमुळे ग्राहकांना कमी वेळेत कर्ज मिळते. पारंपरिक कर्ज प्रक्रियेच्या तुलनेत ही प्रक्रिया जलद आणि सुलभ आहे. मात्र डिजिटल बँकिंग सुविधांचा वापर करताना ग्राहकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, कारण डिजिटल फसवणुकीचे प्रमाणही वाढत आहे. RBI च्या या निर्णयामुळे अधिकाधिक लोकांना बँकिंग सेवांच्या कक्षेत आणले जाईल. लहान बँकांमध्ये खाते असलेल्या लोकांसाठी हा निर्णय अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.

राज्यातील वाहतूक व्यवस्थेत क्रांती; मुंबई ते नागपूर दरम्यान सुरु होणार बुलेट ट्रेन

Bullet Train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनके दिवसापासून रेल्वे त्याच्या कामगिरीमुळे प्रचंड चर्चेत आहे. यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे वेगवेगळ्या ट्रेनचे आगमन होताना दिसत आहे. काही काळापासून मुबई ते अहमदाबाद प्रकल्पानंतर आता महाराष्ट्रातील दुसऱ्या बुलेट ट्रेन प्रकल्पाची चर्चा सुरू झाली आहे. या प्रकल्पामध्ये मुंबई ते नागपूर हा मार्ग समाविष्ट असून, यामुळे राज्यातील दोन महत्त्वाच्या शहरांमधील प्रवास सुलभ आणि वेगवान होणार आहे. या प्रकल्पामुळे राज्यातील वाहतूक व्यवस्थेत क्रांती घडणार आहे.

मुंबई ते नागपूर बुलेट ट्रेन

मुंबई ते नागपूर बुलेट ट्रेन प्रकल्पात 766 किमी लांबीचा मार्ग तयार केला जाणार आहे, ज्यावर बुलेट ट्रेन ताशी 350 किमी वेगाने धावेल. या मार्गावर 13 स्थानके असतील, तसेच या मार्गाचे 68 टक्के भाग समृद्धी महामार्गाच्या समांतर असेल. मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामात प्रगती होत असून, 508 किमी लांबीच्या या मार्गावर 2 किमीचा भाग जमिनीखालून बोगद्यातून जाणार आहे. ठाण्यात 7 किमी लांबीचा बोगदा खोदला जात असून, टनेल बोअरिंग मशीन आणि न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथडचा वापर केला जात आहे. या दोन्ही प्रकल्पांमुळे महाराष्ट्रातील प्रवास अधिक जलद आणि सोयीस्कर होईल.

13 प्रमुख स्थानके

नागपूर, खापरी, वर्धा, पुलगाव, करंजा लाड, मालेगाव जहांगीर, मेहकर, जालना, औरंगाबाद, शिर्डी, नाशिक, इगतपुरी, आणि शहापूर या स्थानकांवर बुलेट ट्रेन थांबणार आहे , ज्यामुळे स्थानिक प्रवाशांनाही वेगवान व सोयीस्कर प्रवासाचा लाभ घेता येणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर नागपूर ते मुंबई दरम्यानचा प्रवास केवळ साडेतीन तासांत शक्य होईल. प्रवाशांसाठी हा प्रकल्प सुरक्षित, वेगवान आणि आरामदायी प्रवासाचा नवा अध्याय ठरेल , असे बोलायला हरकत नाही .या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील वाहतूक व्यवस्था आणि आर्थिक विकासाला नवी दिशा मिळणार आहे.

वेळेवर सगळी बिल भरून देखील तुमचा क्रेडिट स्कोर कमी कसा? जाणून घ्या कारणे

Cibil score

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज प्रत्येकजणांना कोणत्या ना कोणत्या कारणांसाठी कर्जाची आवश्यकता भासत असते , मग ते लोन घरासाठी असो किंवा कारसाठी . या कर्जासाठी अर्ज करताना तुमचा क्रेडिट स्कोअर खूप महत्त्वाचा ठरतो. बऱ्याचदा लोकांनी सर्व बिलं वेळेवर भरली तरी त्यांचा क्रेडिट स्कोअर चांगला नसतो. यामुळे अनेकजण नाराज होतात. कर्जाची उपलब्धता न झालयामुळे अनेकांची स्वप्ने अधुरी राहतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला यामागची कारणे सांगणार आहोत .

क्रेडिट स्कोअरवर अनेक घटकांचा परिणाम

तुमच्या क्रेडिट स्कोअरवर अनेक घटकांचा परिणाम होतो. त्यापैकी एक म्हणजे क्रेडिट मिक्स होय . हा तुमच्या सिक्युअर्ड (जामिन असलेला) आणि अनसिक्युअर्ड (जामिन नसलेला) कर्जाच्या प्रमाणावर आधारित असतो. अनसिक्युअर्ड कर्जामध्ये पर्सनल लोन, क्रेडिट कार्ड कर्ज अधिक असेल तर त्याचा तुमच्या स्कोअरवर नकारात्मक परिणाम होतो. होम लोनसारखे कर्ज सिक्युअर्ड कर्जाच्या विभागात येते, जे फायदेशीर ठरते.

चुकीच्या माहितीमुळे स्कोअर कमी

कधीकधी क्रेडिट रिपोर्टमध्ये चुकीची माहिती असल्याने स्कोअर कमी होतो. या चुकीच्या माहितीमध्ये एखादं कर्ज किंवा अकाउंट बंद केल्याची माहिती क्रेडिट एजन्सीकडे पोहोचत नाही. यामुळे चुकून डिफॉल्ट दाखवला जातो. म्हणून वेळोवेळी तुमचे क्रेडिट रिपोर्ट तपासणे महत्त्वाचे आहे. चुकीची माहिती सुधारल्यावर स्कोअर सुधारतो. या सुधारणा करून तुम्ही सहज कर्ज मिळवू शकता. तसेच जर तुम्ही सतत कर्ज किंवा क्रेडिट कार्डसाठी अर्ज करत असाल, तर त्याचा वाईट परिणाम होतो. बऱ्याच अर्जांमुळे क्रेडिट संस्थांना तुमचं आर्थिक व्यवस्थापन कमकुवत वाटू शकतं. त्यामुळे फक्त गरज असेल तेव्हाच कर्जासाठी अर्ज करा.

कर्ज सेटलमेंट

तुम्ही सर्व ईएमआय किंवा बिलं वेळेवर भरत असाल, तरी एखादे पेमेंट उशिरा झाले असेल किंवा चुकले असेल, तर त्याचा परिणाम स्कोअरवर दिसतो. चुकलेलं पेमेंट त्वरित भरल्यास स्कोअर पुन्हा सुधारण्यास मदत मिळते. तसेच जर तुम्ही संपूर्ण कर्ज फेडण्याऐवजी कमी रक्कम देऊन सेटलमेंट केली असेल, तर तुमच्या क्रेडिट स्कोअरवर वाईट परिणाम होतो. तसंच जर बँक किंवा NBFC ने तुमचं कर्ज राइट ऑफ केलं असेल, तर तुमचा स्कोअर कमी होऊ शकते. त्यामुळे, कर्ज सेटलमेंट हा शेवटचा पर्याय ठेवा.

व्हॉट्सॲप कॉलद्वारे करता येते तुमचे लोकेशन ट्रॅक ! ही सेटिंग लगेच चालू करा

Whatsapp

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | हे जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग ॲप आहे, ज्याचे भारतात 55 कोटींहून अधिक युजर्स आहे. याद्वारे तुम्ही तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना मेसेज पाठवू शकता आणि त्यांच्यासोबत व्हिडिओ आणि ऑडिओ कॉल देखील करू शकता. मात्र, अलीकडे व्हॉट्सॲपच्या माध्यमातून डिजिटल घोटाळ्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. ॲप अतिशय सुरक्षित असल्याचा दावा करत असला तरी, सावधगिरी बाळगणे महत्त्वाचे आहे, कारण एक चूक तुम्हाला अडचणीत आणू शकते.

एक चिंता अशी आहे की, व्हॉट्सॲप कॉल दरम्यान तुमचे लोकेशन ट्रॅक केले जाऊ शकते. सुदैवाने, हे टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या फोनच्या काही सेटिंग्ज बदलू शकता. व्हॉट्सॲपमध्ये ‘प्रोटेक्ट आयपी ॲड्रेस इन कॉल्स’ हे फिचर आहे. हे वैशिष्ट्य चालू असताना, कॉल दरम्यान तुमचे स्थान ट्रॅक करणे इतरांना कठीण होते. हे वैशिष्ट्य तुमच्या संभाषणांमध्ये अतिरिक्त सुरक्षा स्तर जोडते.

अशाप्रकारे करा वापर

  • तुमच्या फोनवर WhatsApp उघडा.
  • स्क्रीनच्या वर उजवीकडे असलेल्या तीन बिंदूंवर टॅप करा.
  • “सेटिंग्ज” पर्यायावर जा, नंतर “Privacy” शोधा.
  • “Advanced” असे लेबल असलेला विभाग शोधा आणि त्यावर टॅप करा.

तुम्हाला “कॉल्समध्ये आयपी ॲड्रेस आरक्षित करा” हा पर्याय दिसेल. हे वैशिष्ट्य चालू करा. या पद्धतींचा वापर करून, तुम्ही ज्यांच्याशी बोलत आहात अशा कोणालाही तुमचा IP पत्ता कळू शकणार नाही. म्हणजे तुमचे लोकेशन गुप्त राहील. दरम्यान, व्हॉट्सॲप एक नवीन फीचर आणत आहे ज्यामुळे लोकांना ॲपवर चॅनेल जॉईन करणे सोपे होईल. हे वैशिष्ट्य सध्या चाचणीत आहे आणि लवकरच Android आणि iOS दोन्ही उपकरणांवर वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होईल. चॅनेलला अधिक चांगले काम करण्यास आणि त्यांना वाढण्यास मदत करणे हे त्याचे ध्येय आहे.