हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. यामुळे लोकांशी संवाद साधने अगदी सोप्पे झाले आहे. एका जागी बसून तुम्ही कितीही मैलो दूर असलेल्या व्यक्तीशी संवाद साधू शकता. whatspp हे लोकप्रिय मेसेजिंग अँप आहे. यात आता प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲपने स्टेटस सेक्शनच्या लेआउटमध्ये मोठा बदल केला आहे. आता युजर्ससाठी मित्रांचे स्टेटस अपडेट पाहणे खूप सोपे झाले आहे. यूजर्स आता स्टेटस न उघडताही पाहू शकतात. नवीन अपडेट iOS आणि Android दोन्ही प्लॅटफॉर्मसाठी उपलब्ध झालेले आहे.
आता युजर्सला Meta च्या मालकीच्या ॲपमध्ये स्टेटस अपडेटसाठी एक विभाग मिळाला आहे. यापूर्वी, प्रोफाइल फोटोसह परिपत्रक दर्शविली जात होती. परंतु नवीन लेआउटमध्ये, उभ्या स्थिती दृश्यमान आहेत आणि त्यावर टॅप न करता किंवा उघडल्याशिवाय एक झलक मिळू शकते. त्याचा फायदा असा आहे की अशा प्रकारे स्टेटस पाहिल्यानंतर तुमचे नाव स्टेटस पाहणाऱ्यांच्या यादीतील इतर व्यक्तींना दिसणार नाही.
जर तुम्हाला स्टेटस अपडेटचे हे नवीन फीचर मिळाले नसेल तर तुम्ही ॲपला नवीनतम आवृत्तीवर अपडेट करू शकता. यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोअर किंवा ऍपल स्टोअरवर जावे लागेल आणि तिथून व्हॉट्सॲपचे लेटेस्ट व्हर्जन अपडेट करावे लागेल. या नवीन फीचरचा लुक काहीसा इंस्टाग्राम स्टोरीसारखाच आहे.
व्हॉट्सॲपने नुकतेच एक नवीन फीचर लाँच केले आहे, जे व्हॉइस मेसेज वाचणे आणखी सोपे करते. या फीचर अंतर्गत, व्हॉइस मेसेजचे टेक्स्ट ट्रान्सक्रिप्शन आता उपलब्ध असेल, ज्यामुळे तुम्ही ते ऐकण्याऐवजी ते वाचू शकाल. हे वैशिष्ट्य Android आणि iOS दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे आणि तुम्ही व्यस्त वातावरणात किंवा गोंगाटाच्या ठिकाणी असता तेव्हा विशेषतः उपयुक्त ठरते.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपले केंद्र सरकार हे देशातील नागरिकांचा विचार करून अनेक योजना आणलेल्या आहेत. अशीच एक योजना सरकारने आपल्या देशात आणलेली आहे. देशात सौर ऊर्जा उपलब्ध व्हावी यासाठी केंद्र सरकारने सोलर पॅनल बसवण्यासाठी योजना आणलेली आहे. लोकांना त्यांच्या घरावर रूफटॉप सोलर पॅनल बसवण्यासाठी सरकारकडून अनुदानाचा स्वरूपात काही रक्कम दिली जाणार आहे. देशातील नागरिकांना सोलर बसवण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने ही योजना आणलेली आहे. जर तुम्ही सोलर पॅनल बसवले, तर मोफत वीज निर्मिती करू शकता. आणि सरकारकडून सबसिडीच्या रकमेचा देखील लाभ घेऊ शकता.
अक्षय ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने ही योजना आणलेली आहे. जर तुम्ही तुमच्या घराच्या छतावर सौर पॅनल बसवले, तर सरकारकडून अनुदान देखील मिळणार आहे. तुम्ही जर हे सौर पॅनल लावले तर पुढील 20 ते 21 वर्षापर्यंत वीज निर्मिती करू शकता. तसेच कमाई देखील करू शकता. जर तुम्हाला देखील या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता. सरकारच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन तुम्ही ऊर्जा घेण्यासाठी अर्ज करू शकता.
अनुदानाची रक्कम किती ?
या योजनेअंतर्गत तुमच्या घराच्या छतावर जर तुम्हाला सौर पॅनल बसवायचे असेल, तर सरकारकडून अनुदान मिळते. ही अनुदानाची रक्कम व्यक्तीला क्षमतेनुसार दिली जाणार आहे. जर तुम्ही तुमच्या घराच्या छतावर 3 किलो वॅटचे सोलर पॅनल बसवले तर तुम्हाला जवळपास 78 हजार रुपयांपर्यंतची सबसिडी होणार आहे.
सोलार पॅनल बसवण्यासाठी पात्रता काय आहे ?
या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवार हा भारताचा नागरिक असावा. तसेच सोलार पॅनल हे देखील भारतात बनवलेला असावा. देशातील सर्व नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | केंद्र सरकारने देशातील नागरिकांसाठी अनेक योजना आणलेल्या आहेत. त्यातीलच एक महत्त्वाची योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना. ही योजना खास शेतकऱ्यांसाठी तयार करण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत दरवर्षाला सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात. आता ज्या शेतकऱ्यांनी या योजनेअंतर्गत नवीन नोंदणी केलेली आहे. त्याच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे.
पीएम किसान योजनेची ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी पूर्ण केलेली आहे. त्यांच्यासाठी सरकारने लाभार्थी यादी उपलब्ध करून दिलेली आहे. आता या यादीत तुमचे नाव आहे की नाही हे तुम्हाला चेक करावे लागेल. जर या अधिक तुमचे नाव असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहात. पीएम किसान लाभार्थी यादी सरकारने पीएम किसानच्या अधिकृत पोर्टलवर जाहीर केलेली आहे. तुम्ही मोबाईलद्वारे किंवा कम्प्युटरद्वारे ही यादी तपासू शकता.
यादीत नाव कसे चेक करावे?
पीएम किसान सन्मान निधीच्या यादीत तुमचे नाव चेक करायचे असेल, तर तुम्हाला सगळ्यात आधी पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. ते पोर्टल ओपन झाल्यावर तुम्हाला मेन पेजवर जावे लागेल. तिथे तुम्हाला लाभार्थीचा पर्याय दिसेल. आता या पर्यायावर क्लिक करा आणि एक नवीन पेज उघडेल. त्या पेजमध्ये तुमचे राज्य निवडा. तसेच इतर आवश्यक माहिती निवडा. आणि रिपोर्ट ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला पीएम किसानची लाभार्थी यादी दिसेल. ही यादी तुम्ही डाऊनलोड करू शकता.
पीएम किसान योजनेची नोंदणी पूर्ण करण्यासाठी तुम्हाला काही आवश्यक कागदपत्रांची गरज देखील लागेल.यासाठी तुम्हाला तुमचे आधार कार्ड, पासबुक, उत्पन्न प्रमाणपत्र, पत्त्याचा पुरावाबाबत ओळखपत्र आणि जमिनी संबंधित काही कागदपत्रे जमा करावी लागते.
केवळ सरकारीच नव्हे तर खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही नवीन वर्षापूर्वी चांदी होणार आहे. नवीन वर्षापूर्वी खासगी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये वाढ करण्यात येणार आहे, असे निर्देश सरकारने दिले आहेत. अलीकडेच सरकारने यूपीएस प्रणाली लागू केली आहे. मात्र त्याच्या अंमलबजावणीचा फायदा फक्त सरकारी कर्मचाऱ्यांना झाला. खासगी क्षेत्रात काम करणारे कर्मचारी आजही निराशेच्या भावनेत जगत आहेत. सरकार लवकरच EPFO मधील मूळ वेतनात वाढ करण्यास मंजुरी देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही निवृत्तीनंतर दरमहा 10,500 रुपये पेन्शन मिळणार आहे.
पगार मर्यादा वाढवण्याची मागणी
कर्मचाऱ्यांचे पेन्शन, जे सध्या ₹15,000 वरून मोजले जात आहे, ते आता ₹21,000 पर्यंत वाढवले पाहिजे. सन 2014 पासून पेन्शन 15 हजार रुपयांवरून मोजली जात आहे आणि त्याची मर्यादा वाढवण्याची चर्चा आहे. लवकरच याची अंमलबजावणी होईल, अशी अपेक्षा आहे. तसे झाल्यास कर्मचाऱ्यांच्या पगारात दरमहा मोठी वाढ होणार आहे. म्हणजे खासगी कर्मचाऱ्यांना चांगली पेन्शन मिळेल.
दर महिन्याला मिळणारा पगार कमी
म्हणजेच दरमहा तुम्हाला मिळणाऱ्या पगारातून जास्त रक्कम ईपीएफओकडे जाईल. त्यामुळे दर महिन्याला मिळणारा पगार कमी होईल. पण हे तुमच्या भविष्यासाठी चांगले असेल. जर सरकारने पगार मर्यादा 15 हजार रुपयांऐवजी 21 हजार रुपये केली, तर तुम्हाला दरमहा 2550 रुपये अधिक पेन्शनचा लाभ मिळेल.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल लोकांची जीवनशैली मोठ्या प्रमाणात बदललेली आहे आणि या बदलत्या जीवनशैलीचा प्रभाव त्यांच्या शरीरावर होत आहे. त्यामुळे अनेकांना डायबिटीस सारख्या समस्या निर्माण झालेल्या आहे. अगदी कमी वयात देखील लोकांना डायबिटीस होत आहे. यावेळी आपण आपल्या रक्तातील साखरेची पातळी चेक करतो. तेव्हा उपाशीपोटी त्यानंतर जेवल्यानंतर दोन वेळा रक्ताचे नमुने घेतले जातात. त्यानंतर ते चेक करून त्याचा रिपोर्ट दिला जातो. आणि आपली शुगर किती आहे हे तपासले जातात.
परंतु रक्त घेताना सुईत टाकल्यावर अनेकांना खूप जास्त त्रास होतो. रक्त ओढून घेताना देखील त्रास होतो. परंतु आता हा त्रास होणार नाही. कारण आता संशोधनानुसार इथून पुढे रक्तातील साखरेची पातळी तपासण्यासाठी रक्त घेण्याची गरज लागणार नाही. केवळ तुमचे डोळे पाहूनच तुमच्या रक्तातील साखर किती आहे, हे समजणार आहे. यासाठी एक नवीन उपकरण तयार केले आहे. या उपकरणामुळे रक्त न घेता तुमच्या साखरेचा स्तर तपासला जाणार आहे.
आर्टिफिशल इंटेलिजन्सचा वापर करून हे डिवाइस तयार करण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे. ही या उपकरणाच्या माध्यमातून एक हजार रुग्णांची तपासणी देखील करण्यात आलेली आहे. त्यांपैकी 90 ते 95 टक्के रुग्णांचे अहवाल बरोबर आलेले आहे. यामध्ये सगळ्यात आधी रुग्णांच्या डोळ्यांची बुबुळ आणि पापण्याचे फोटो घेतले जातात आणि डिवाइसच्या माध्यमातून त्याची तपासणी केली जाते. अगदी कमी काळामध्ये ही तपासणी पूर्ण होते. दहा ते पंधरा मिनिट अहवाल येतो. मग परंतु दोन वेळा चाचणीसाठी दोन फेऱ्या माराव्या लागतात. परंतु या डिवाइसच्या माध्यमातून आपल्याला एका मिनिटातच रिपोर्ट मिळतो. सध्या डिवाइसवर जास्त संशोधन चालू आहे.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारत सरकारने पॅन कार्ड धारकांसाठी एक मोठी घोषणा केलेली आहे. ती म्हणजे आता भारतामध्ये पॅन कार्ड 2.0 प्रकल्पाला नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मंजुरी देण्यात आलेली आहे. भारत आता या प्रोजेक्टसाठी जवळपास 1435 कोटी रुपये खर्च करणार असल्याची माहिती देखील आलेली आहे. परंतु आता जे पॅनकार्ड धारक आहेत. त्यांच्या मनात पॅनकार्ड बद्दल अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. आता करदात्यांना नवीन क्यू आर कोड असलेले पॅन कार्ड तयार करावे लागणार आहे. परंतु हे नवीन कार्ड बनवताना आधीच्या कार्डचे काय करावे? की दोन्ही कार्ड गरजेचे आहेत का? यांसारखे अनेक प्रश्न त्यांच्या मनात आहेत. आता याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.
सरकारचा पॅन कार्ड 2.0 प्रकल्प नक्की काय आहे ?
सरकारचा हा पॅन कार्ड 2.0 प्रोजेक्ट पॅन कार्डचे नवीन अपडेटेड व्हर्जन आहे. यावेळी पॅन कार्डला एक क्यूआर कोड असणार आहे. करदात्यांना तो क्यूआर कोड बनवण्यासाठी वेगळे पैसे देण्याची गरज नाही. तसेच कुठे जाण्याची देखील गरज लागणार नाही. तुम्ही ऑनलाईन प्रक्रियेद्वारे कोणतेही पैसे न भरता हे पॅन कार्ड तयार करून घेऊ शकता.
पॅन कार्ड 2.0 उद्दिष्ट काय आहे?
करदात्यांना त्यांची नोंदणी आणि सेवा अत्यंत चांगल्या पद्धतीने आणि जलद गतीने होणार आहेत. तसेच सर्व माहिती एकाच ठिकाणावर सहज उपलब्ध व्हावी. तसेच हे काम पर्यावरणपूरक प्रक्रियेद्वारे ऑनलाईन पद्धतीने केले जाणार आहे. त्यामुळे याला कमी खर्च देखील लागणार आहे. यामध्ये तुम्हाला चांगली सुरक्षा आणि डिजिटल पायाभूत सुविधा देखील मिळणार आहे. त्यामुळे करदात्यांना ऑनलाइन पद्धतीने हे पॅन कार्ड काढले तर त्यांना खूप जास्त फायदा होईल.
महिंद्राच्या दोन नवीन EV ब्रँड्स XEV आणि BE च्या फ्लॅगशिप उत्पादनामध्ये धमाकेदार एंट्री करून भारतातील इलेक्ट्रिक कार दुनियेत एकच खळबळ उडवून दिली आहे. चेन्नई येथील अनलिमिटेड इंडिया इव्हेंटमध्ये महिंद्राने भारत आणि जागतिक बाजारपेठेसाठी XEV 9e आणि BE 6e च्या किमती देखील उघड केल्या आहेत. भविष्यातील मोबिलिटी म्हणून जगभरातील इलेक्ट्रिक कारच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर, महिंद्राच्या या दोन्ही इलेक्ट्रिक SUV आपला ठसा उमटवण्यासाठी सज्ज आहेत. चला जाणून घेऊया या दोन्ही गाड्यांची किंमत आणि वैशिट्ये
Mahindra XEV 9e आणि BE 6e च्या किंमती
Mahindra & Mahindra च्या अगदी नवीन फ्लॅगशिप इलेक्ट्रिक SUV च्या किमतींबद्दल बोलायचे झाले तर, BE 6e ची एक्स-शोरूम किंमत 18.90 लाख रुपयांपासून सुरू होते आणि XEV 9e ची एक्स-शोरूम किंमत 21.90 लाख रुपयांपासून सुरू होते. या दोन्ही इलेक्ट्रिक SUV ची डिलिव्हरी फेब्रुवारी 2025 पासून सुरू होईल.
Mahindra XEV 9e And BE 6e: लुक आणि डिजाइन
महिंद्रा आणि महिंद्राच्या या दोन्ही एसयूव्ही INGLO इलेक्ट्रिक ओरिजिन आर्किटेक्चरवर बांधल्या गेल्या आहेत. XEV 9e ची लांबी 4,789 mm आहे आणि ग्राउंड क्लीयरन्स 207 mm आहे. महिंद्राच्या या फ्लॅगशिप एसयूव्हीमध्ये फ्रंट स्पेस 195 लीटर आणि बूट स्पेस 663 लीटर आहे. त्याच वेळी, BE 6e ची लांबी 4,371 mm आहे आणि 455 लीटर बूट स्पेस आणि समोरच्या ट्रंकमध्ये 45 लिटर जागा आहे.
Mahindra XEV 9E मध्ये स्लीक एरोडायनामिक कूप SUV डिझाइन आहे. यात ठळक त्रिकोणी हेडलॅम्प सेटअप, फ्लेर्ड व्हील आर्च, रुंद एलईडी लाइट बार आणि 19-इंच चाके दिसतात. त्याच वेळी, BE 6E मध्ये इंटिग्रेटेड इन्व्हर्टेड L-shaped DRL, 20-इंच अलॉय व्हीलसह इतर वैशिष्ट्ये आहेत. महिंद्राच्या या दोन्ही एसयूव्ही अतिशय अप्रतिम, स्टायलिश आणि भविष्यवादी दिसतात.
Mahindra XEV 9e आणि BE 6e: बॅटरी-पॉवर आणि रेंज
Mahindra & Mahindra च्या अगदी नवीन इलेक्ट्रिक SUVs XEV 9e आणि BE 6e 59 kWh आणि 79 kWh पर्यंतच्या बॅटरी पॅक पर्यायांसह येतात. यामध्ये LFP केमिस्ट्री असलेल्या बॅटरी आहेत आणि अल्ट्रा फास्ट चार्जिंग सपोर्टसह आहेत, ज्या 175 kW चार्जरच्या मदतीने फक्त 20 मिनिटांत 20 ते 80 टक्के चार्ज केल्या जाऊ शकतात. पॉवर आणि रेंजबद्दल बोलायचे झाले तर, महिंद्रा XEV 9E आणि BE 6E चा 59kWh बॅटरी पॅक 231 HP ची पॉवर जनरेट करतो. त्याच वेळी, 79 kWh बॅटरी पॅक 286 HP पॉवर आणि 380 न्यूटन मीटरचा पीक टॉर्क जनरेट करतो. या दोन्ही एसयूव्ही फक्त 6.7 सेकंदात 0-100 किमी प्रतितास वेगाने चालवल्या जाऊ शकतात. रेंजबद्दल बोलायचे झाले तर, महिंद्रा BE 6E ची सिंगल चार्ज रेंज 682 किमी पर्यंत आहे आणि XEV 9E ची सिंगल चार्ज रेंज 656 किमी पर्यंत आहे. महिंद्राच्या या दोन्ही इलेक्ट्रिक SUV वर लाइफटाइम बॅटरी वॉरंटी देण्यात आली आहे.
Mahindra XEV 9e आणि BE 6e: वैशिष्ट्ये
फ्युचरिस्टिक केबिन डिझाइन आणि आरामदायी आसनांसह, XEV 9E मध्ये 43-इंचाचा ट्रिपल स्क्रीन सेटअप आहे, ज्यामध्ये प्रवासी, ड्रायव्हर आणि सेंट्रल इन्फोटेनमेंट प्रदान केले आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते एकत्र करून थिएटर मोडमध्ये रूपांतरित केले जाऊ शकतात . Bring Your Own Device हा पर्याय मागच्या प्रवाशासाठी मनोरंजन देखील देतो. BE 6E मध्ये फक्त 12.3 इंच ड्युअल स्क्रीन सेटअप आहे. या उर्वरित इलेक्ट्रिक SUV मध्ये 360 डिग्री कॅमेरा, ऑटो ॲडजस्टिंग हेडअप डिस्प्ले व्हिजन, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कार प्ले, मल्टिपल ड्राइव्ह मोड्स, कनेक्टेड कार फीचर्स, 6 एअरबॅग्ज, आणि अनेक वैशिष्ट्ये देखील आहेत.
रेल्वे विभागाकडून महाराष्ट्रासाठी एक महत्वाची बातमी आहे. केंद्र सरकारने रेल्वे विभागाच्या माध्यमातून तीन मोठ्या रेल्वे मार्गासाठी मंजुरी देण्यात आली आहे. या तीन मार्गापैकी महाराष्ट्रातल्या दोन मार्गांचा समावेश असल्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेसाठी ही आनंदाची बातमी असून याचा फायदा थेट शेतकऱ्यांना होणार आहे. आता हे दोन्ही रेल्वे मार्ग कोणत्या भागातून जाणार आहे त्यामुळे कोणत्या भागाला अधिक फायदा होणार आहेत जाणून घेऊयात…
‘या’ रेल्वे मार्गांचा समावेश
मिळालेल्या माहितीनुसार केंद्र सरकार आणि रेल्वे विभाग या दोघांच्या माध्यमातून तीन रेल्वे मार्गांना मंजुरी देण्यात आली असून या प्रकल्पामध्ये जळगाव मनमाड चौथा रेल्वे मार्ग 160 किलोमीटर, भुसावळ ते खंडवा तिसऱ्या आणि चौथा रेल्वे मार्ग 131 किलोमीटर आणि प्रयागराज ते माणिकपूर असा तिसरा रेल्वे मार्ग 84 किलोमीटरचा आहे. याबाबतची माहिती रेल्वेचे व्यवस्थापक धर्मेंद्र मीना यांनी भुसावळ येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे.
एवढेच नाही तर हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 7,927 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. हा रेल्वे मार्ग मंजूर झाल्यामुळे या मार्गावरून होणारी मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक या दोन्ही वाहतुकीला चालना मिळणार आहे. त्यामुळे प्रवासी संख्या देखील वाढणार आहे. या कामामुळे स्थानिक रोजगार निर्मितीला चालना मिळणार असून पर्यटनावर सुद्धा याचा चांगला परिणाम होणार आहे अशी माहिती यावेळी बोलताना मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मेंद्र मीना यांनी दिली. मनमाड ते जळगावदरम्यान 160 किमी लांबीची चौथी रेल्वे लाइन टाकली जाणार आहे. यावर 2773 कोटी रुपये खर्च येणार आहे. भुसावळ ते खंडवा या मार्गावर 131 किमी लांबीची तिसरी आणि चौथी रेल्वे लाइन टाकली जाणार आहे. यावर 3514 कोटी रुपये खर्च येणार आहे.
पर्यटनाला मिळणार चालना
या प्रकल्पामुळं महाराष्ट्रातील जागतिक वारसा स्थळ असलेले अंजठा-एलोरा, देवगिरी किल्ला, रेवा किल्ला, यावळ अभयारण्य, केवोती धबधबा, असीरगड किल्ला यासारख्या विविध आकर्षणाचे केंद्र असलेल्या ठिकाणी पर्यटनाला चालना देण्याचा विचार आहे, असंही सरकारने नमूद केलं आहे.
कनेक्टिव्हीटी वाढवणार
दरम्यान, हा प्रस्तावित प्रकल्प मुंबई-प्रयागराज-वाराणसी मार्गावर अतिरिक्त प्रवासी गाड्या चालवण्यासाठी कनेक्टिव्हीटी वाढवणार आहे. तसंच, याचा फायदा नाशिक (त्र्यंबकेश्वर), खंडवा (ओंकारेश्वर), आणि वाराणसी (काशी विश्वनाथ) येथील ज्योतिर्लिंगांना जाणाऱ्या यात्रेकरूंना तर होईलच पण त्याचबरोबर प्रयागराज, चित्रकूट, गया आणि शिर्डी येथील धार्मिक स्थळांवरील पर्यटनदेखील वाढणार आहे, असं सरकारने सांगितले.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल इंटरनेट आणि स्मार्टफोनचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. परंतु यासोबत अनेक प्रकारचे धोकेही वाढले आहेत. स्मार्टफोनने आपली अनेक कठीण कामे तर सोपी केली आहेतच पण यामुळे सायबर गुन्हेगारांना लोकांची फसवणूक करण्याचा एक स्मार्ट मार्गही दिला आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ने अलीकडच्या काळात लोकांना घोटाळे आणि ऑनलाइन फसवणूकीपासून वाचवण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत.
अलीकडेच ट्रायने दूरसंचार कंपन्यांना ऑनलाइन फसवणूक रोखण्यासाठी ट्रेसिबिलिटी लागू करण्याच्या सूचना दिल्या होत्या. ट्रायने ऑगस्टमध्ये व्यावसायिक संदेश आणि ओटीपीशी संबंधित ट्रेसेबिलिटी नियम लागू करण्यासाठी सूचना जारी केल्या होत्या. ट्रायने त्याच्या अंमलबजावणीची तारीख अनेक वेळा बदलली आहे.
ट्रायने मुदत वाढवली
दूरसंचार कंपन्यांना यापूर्वी TRAI ओटीपी संदेशांची ट्रेसेबिलिटी लागू करण्यासाठी 31 ऑक्टोबरपर्यंत वेळ होता. Jio, Airtel, Vi आणि BSNL च्या मागणीनंतर कंपनीने आपली मुदत 31 नोव्हेंबरपर्यंत वाढवली होती. आता जेव्हा नोव्हेंबरमध्ये त्याची अंतिम मुदत संपणार आहे, तेव्हा टेलिकॉम कंपन्यांना व्यावसायिक संदेश आणि OTP संदेश ट्रॅक करण्यासाठी ट्रेसेबिलिटी नियम लागू करावा लागेल.
OTP येण्यासाठी वेळ लागू शकतो
Jio, Airtel, Vi आणि BSNL ने 1 डिसेंबरपासून ट्रेसिबिलिटी नियम लागू केल्यास, OTP संदेश येण्यास वेळ लागू शकतो. अशा परिस्थितीत, तुम्ही बँकिंग किंवा आरक्षणासारखे कोणतेही काम केल्यास, तुम्हाला OTT मिळण्यास वेळ लागू शकतो. वास्तविक, ट्रायने असे पाऊल उचलले आहे कारण अनेक वेळा घोटाळेबाजांना बनावट OTP संदेशांद्वारे लोकांच्या उपकरणांमध्ये प्रवेश मिळतो आणि यामुळे लोकांचे मोठे नुकसान होते. ट्रायने सर्व टेलिकॉम कंपन्यांना याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मोदी सरकारने नागरिकांच्या हिताच्या अनेक योजना आणलेल्या आहेत. त्याचा फायदा अनेक नागरिकांना झालेला देखील आहे. अशातच आता मोदींनी एक नवीन योजना सुरू केलेली आहे. या योजनेचे नाव वन नेशन वन सबस्क्रीप्शन असे आहे. या योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळातून मंजुरी देखील मिळालेली आहे. आणि या योजनेवर जवळपास 6 हजार कोटी रुपये खर्च देखील करण्यात येणार आहे. या योजनेचा खास फायदा हा विद्यार्थ्यांना होणार आहे. तसेच देशातील जवळपास 1.8 कोटी विद्यार्थी शिक्षक, शास्त्रज्ञ आणि संशोधकांना या योजनेचा लाभ होणार आहे.
काय आहे वन नेशन वन सबस्क्रिप्शन योजना
सरकारची ही वन नेशन वन सबस्क्रिप्शन योजना देशभरातील सर्व विद्यापीठांना जोडणार आहे. यामध्ये सर्व विद्यापीठे त्यांची संशोधन यांनी जर्नल देखील शेअर करणार आहेत. या योजनेमध्ये प्रमुख तीन आंतरराष्ट्रीय जनरल प्रशासकांचा समावेश केला जाणार आहे. यामध्ये राज्य सरकारच्या शैक्षणिक संस्थांमध्ये उत्तीर्ण घेणाऱ्या विद्यार्थी संशोधक आणि शिक्षकांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील तज्ञांनी लिहिलेले जर्नल मिळणार आहे.
विद्यार्थ्यांना कसा कायदा होणार?
सरकारच्या यावर वन नेशन वन सबस्क्रिप्शन योजनेमुळे विद्यार्थ्यांना अगदी सहजपणे आंतरराष्ट्रीय जर्नल प्रकाशकांचे संशोधन उपलब्ध होणार आहे. त्यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे लेख वाचता येणार आहे. हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. जे विद्यार्थी तसेच शिक्षक उच्च शिक्षण घेतात. त्यांच्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा असा प्रकल्प आहे. आंतरराष्ट्रीय प्रकाशित 13000 पेक्षा अधिक ई जर्नल 6 हजार 300 पेक्षा अधिक शैक्षणिक संस्थांमध्ये पोहोचवणार आहे.