Wednesday, December 31, 2025
Home Blog Page 352

वाहन खरेदीदारांसाठी दिलासा ; आता घरबसल्या निवडा आवडीचा नंबर, प्रक्रिया झाली ऑनलाइन

RTO

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आवडीच्या गाडीसोबत आपल्या पसंतीची नंबर प्लेट भेटणे कठीण असते. अनेकदा नंबर प्लेटमुळे लोकांचे लक्ष वेधले जाते, त्यामुळे बरेचजण लकी नंबर भेटावा यासाठी धडपड करत असतात. अशा वाहन खरेदीदारांसाठी राज्य परिवहन विभागाने नंबर प्लेटबाबत दिलासा देणारी बातमी दिली आहे. आता वाहनासाठी आवडीचा क्रमांक (चॉइस नंबर) निवडण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे चॉइस नंबरसाठी आरटीओ ऑफिसला जाण्याची गरज भासणार नाही . या निर्णयामुळे बरेच फायदे होणार आहेत.

फॅन्सी परिवहन नावाचे संकेतस्थळ सुरू –

हि सेवा २५ नोव्हेंबरपासून राज्यभर सुरु झाली आहे. नवीन वाहनासाठी चॉइस नंबर रिझर्व करणे तसेच त्यासाठी भरावे लागणारे पैशाची प्रक्रिया हि पूर्णपणे फेसलेस करण्यात आली आहे. त्यामुळे तुम्हाला आरटीओ ऑफिसमध्ये जाऊन प्रक्रिया पूर्ण करण्याची गरज भासणार नाही . यासाठी तुम्हाला आरटीओने फॅन्सी परिवहन नावाचे संकेतस्थळ सुरू केले आहे. ज्यामुळे तुमची प्रोसिजर सहज आणि सुलभ होईल.

रजिस्ट्रेशन कसे करावे –

फॅन्सी परिवहन संकेतस्थळावर रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्ही प्रथम संकेतस्थळावर जावा आणि नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा. नोंदणीसाठी आपला मोबाईल नंबर आणि ई मेल आयडी वापरून OTP द्वारे खाते तयार करा. त्यानंतर उपलब्ध चॉइस नंबरमधून आपल्या पसंतीचा क्रमांक निवडा. तसेच रक्कम ऑनलाइन भरून ई पावती मिळवा आणि त्याची प्रिंटआउट काढा. हि प्रिंट घेतलेली ई पावती वाहन विक्रेत्याला द्या . जर एकाच नंबरसाठी खूप अर्ज आल्यास , त्याचा लिलाव केला जाईल . या लिलावाची प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने होणार आहे. लिलावात सर्वात जास्त बोली लावणाऱ्याला तो क्रमांक दिला जाईल.

6000 हून अधिक चॉइस नंबर विक्री –

आरटीओने चॉइस नंबरची रक्कम दुपटीने वाढवले आहे. विशेषतः 0001 या क्रमांकासाठी प्रमुख शहरांमध्ये तब्बल 6 लाख रुपये मोजावे लागत आहेत. या बदलांमुळे गेल्या दोन महिन्यांत केवळ मुंबईतील आरटीओ कार्यालयांमधून 6000 हून अधिक चॉइस नंबर विक्री झाली आहे, ज्यातून १२ कोटी रुपयांहून अधिक महसूल गोळा झाला आहे. ही सेवा ऑनलाइन उपलब्ध झाल्यामुळे वाहन खरेदी करणाऱ्यांचा वेळ वाचणार असून, संपूर्ण प्रक्रिया सोपी व पारदर्शक होणार आहे.

Mahanirmiti Technician Bharti 2024 | महानिर्मिती अंतर्गत तंत्रज्ञ-3 साठी 800 पदासाठी भरती सुरु; असा करा अर्ज

Mahanirmiti Technician Bharti 2024

Mahanirmiti Technician Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही नोकरीची अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड यांच्या अंतर्गत एक मोठी भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत तंत्रज्ञ 3 पदाच्या रिक्त जागा आहेत. या पदाच्या एकूण 800 रिक्त जागा आहेत. त्या भरण्यासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. तसेच 26 नोव्हेंबर 2024 पासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. तर 26 डिसेंबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. म्हणजे अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे पूर्ण एक महिना आहेत. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव | Mahanirmiti Technician Bharti 2024

या भरती अंतर्गत तंत्रज्ञ 3 या पदाचा रिक्त जागा भरल्या जाणार आहेत

रिक्त पदसंख्या

या भरती अंतर्गत 800 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत

वयोमर्यादा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 18 ते 36 वर्ष दरम्यान असणे गरजेचे आहे.

अर्ज पद्धती

या भरतीचा अर्ज तुम्ही ऑनलाईन पद्धतीने करू शकता.

अर्ज सुरू होण्याची तारीख

26 नोव्हेंबर 2024 पासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

26 डिसेंबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अर्ज कसा करावा ? | Mahanirmiti Technician Bharti 2024

  • या भरतीचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील अर्ज करू शकता.
  • 26 डिसेंबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • या तारखे अगोदरच अर्ज करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

SBI Bharti 2024 | स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची मोठी संधी; अशाप्रकारे करा अर्ज

SBI Bharti 2024

SBI Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. त्याचा फायदा आजपर्यंत अनेक उमेदवारांना झालेला आहे. अनेक लोकांना बँकेमध्ये काम करण्याची इच्छा असते. आता त्यांची इच्छा लवकर पूर्ण होणार आहे. कारण स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत एक मोठी भरती जाहीर झालेली आहे. ही भरती सहाय्यक व्यवस्थापक (अभियंता), जीएम आणि डेप्युटी सीआयएसओ (इन्फ्रा सुरक्षा आणि विशेष प्रकल्प), डीजीएम (घटना प्रतिसाद) या पदांसाठी आहे. या पदांच्या एकूण 171 जागा आहेत. त्या जागा भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. तसेच 12 डिसेंबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या तारखे अगोदरच अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव

सहाय्यक व्यवस्थापक (अभियंता), जीएम आणि डेप्युटी सीआयएसओ (इन्फ्रा सुरक्षा आणि विशेष प्रकल्प), डीजीएम (घटना प्रतिसाद)

रिक्त पदसंख्या | SBI Bharti 2024

या भरती अंतर्गत 171 रिक्त जागांची भरती केली जाणार आहे

वयोमर्यादा

या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 18 ते 50 वर्षे दरम्यान असणे गरजेचे आहे.

अर्ज शुल्क

या भरतीचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला 750 रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे

अर्ज पद्धती | SBI Bharti 2024

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अधिकृत वेबसाईटला भेट देऊन करावा लागणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

12 डिसेंबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अर्ज कसा करावा ?

  • या भरतीचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे
  • तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून देखील अर्ज करू शकता.
  • 12 डिसेंबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • या तारखे अगोदर अर्ज करा

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

संविधानाला 75 वर्षे पूर्ण ! राष्ट्रपती मुर्मू यांनी 75 ₹ चे नाणे केले जारी ; पहा झलक

75 coin

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंगळवारी देशाच्या संविधानाचा स्वीकार केल्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त संसदेत 75 रुपयांचे स्मारक नाणे आणि टपाल तिकीट जारी केले. नवी दिल्लीतील संविधान सदनाच्या सेंट्रल हॉलमध्ये झालेल्या एका समारंभात हे ऐतिहासिक नाणे प्रसिद्ध करण्यात आले. संविधान दिनानिमित्त संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करताना मुर्मू म्हणालया की, संविधान हा जिवंत आणि प्रगतीशील दस्तावेज आहे. राष्ट्रपतींनी संविधानाच्या पहिल्या संस्कृत प्रत आणि त्याच्या मैथिली आवृत्तीचे अनावरणही केले.

भारतीयांना मूलभूत कर्तव्यांचे पालन करण्याचे आवाहन

यावेळी संबोधित करताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 75 वर्षांपूर्वी राज्यघटनेचा स्वीकार केला आणि हा ऐतिहासिक क्षण असल्याचे सांगितले. देशाच्या पायाभूत मजकूराला आकार देण्यासाठी संविधान सभेच्या 15 महिला सदस्यांच्या योगदानावरही त्यांनी भर दिला. राष्ट्रपतींनी सर्व भारतीयांना त्यांच्या आचरणात घटनात्मक आदर्श आत्मसात करण्याचे आणि त्यांची मूलभूत कर्तव्ये पार पाडण्याचे आणि 2047 पर्यंत विकसित भारताचे राष्ट्रीय उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कार्य करण्याचे आवाहन केले.

संविधान हा आपल्या देशाचा सर्वात पवित्र ग्रंथ आहे.

राष्ट्रपती मुर्मू म्हणालया की, संविधान दिनाच्या शुभ मुहूर्तावर तुम्हा सर्वांसमवेत आल्याने मला खूप आनंद होत आहे. संविधान हा आपल्या देशाचा सर्वात पवित्र ग्रंथ आहे. आपली राज्यघटना हा आपल्या लोकशाही प्रजासत्ताकाचा भक्कम पाया आहे. आपली राज्यघटना आपला सामूहिक आणि वैयक्तिक स्वाभिमान सुनिश्चित करते. आपल्या देशाच्या विविधतेची अभिव्यक्ती आपल्या संविधान सभेत दिसून आली. संविधान सभेत सर्व प्रांत आणि प्रदेशांचे प्रतिनिधी उपस्थित राहिल्याने अखिल भारतीय चैतन्याला आवाज मिळाला.

एकत्र काम करा

त्या पुढे म्हणाल्या की , संविधानाच्या भावनेनुसार सामान्य लोकांचे जीवन सुसह्य करण्यासाठी कार्यपालिका, विधिमंडळ आणि न्यायपालिका यांची एकत्रितपणे काम करणे ही जबाबदारी आहे. गेल्या काही वर्षांत सरकारने समाजातील सर्व घटकांच्या, विशेषत: दुर्बल घटकांच्या विकासासाठी अनेक पावले उचलली आहेत. अशा निर्णयांमुळे लोकांचे जीवनमान सुधारले असून त्यांना प्रगतीच्या नव्या संधी मिळत आहेत.

भक्तिमय यात्रेत रंगून जा ! IRCTC देत आहे कमी पैशात पुरी ते प्रयागराज फिरण्याची संधी

puri - praygraj

भारतीय रेल्वेची उपकंपनी असलेली IRCTC वेळोवेळी प्रवाशांसाठी टूर पॅकेज आणत असते. दरम्यान, IRCTC ने देशातील प्रमुख तीर्थक्षेत्रांचे संयुक्त पॅकेज सुरू केले आहे. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनच्या अधिकृत वेबसाइटनुसार, या टूर पॅकेजमध्ये पुरी, कोणार्क, वाराणसी, अयोध्या आणि प्रयागराजचा प्रवास भारत गौरव पर्यटक स्पेशल प्रवास ट्रेनमधून केला जाईल.

हे पॅकेज सिकंदराबादपासून सुरू होईल. IRCTC चे हे पॅकेज 9 रात्री 10 दिवसांसाठी आहे. यामध्ये तुम्हाला भारत गौरव टुरिस्ट ट्रेनने प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. या पॅकेजमध्ये तुम्हाला खाण्यापिण्याची काळजी करण्याची गरज नाही. 11 डिसेंबरपासून हा प्रवास सुरू होणार आहे. या पॅकेजमधील एकूण जागांची संख्या 718 आहे.

या टूरची वैशिष्ट्ये

  • पॅकेजचे नाव- अयोध्या-काशी: पुण्य क्षेत्र यात्रा
  • टूर कोड- SCZBG33
  • भेट देण्याची ठिकाणे – पुरी, कोणार्क, वाराणसी, अयोध्या आणि प्रयागराज
  • दौरा किती दिवस चालेल – 9 रात्री आणि 10 दिवस
  • प्रस्थान तारीख- 11 डिसेंबर 2024
  • जेवणाची योजना- सकाळचा चहा, नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण
  • प्रवास मोड- ट्रेन

ही ठिकाणे पहाण्याची संधी

  • पुरी: भगवान जगन्नाथ मंदिर, कोणार्क सूर्य मंदिर
  • गया: विष्णुपद मंदिर
  • वाराणसी: काशी विश्वनाथ मंदिर आणि कॉरिडॉर, काशी विशालाक्षी आणि अन्नपूर्णा देवी मंदिर, संध्याकाळची गंगा आरती
  • अयोध्या: रामजन्मभूमी, हनुमानगढी आणि सरयू नदीवर आरती.
  • प्रयागराज : त्रिवेणी संगम

कसे कराल बुकिंग ?

पॅकेज 16,800 रुपये प्रति व्यक्ती पासून सुरू होईल. IRCTC वेबसाइट irctctourism.com ला भेट देऊन प्रवासी या टूर पॅकेजसाठी बुकिंग करू शकतात.

भारीच की !!! भारतातल्या ‘या’ ट्रेनमध्ये करा फुकटात प्रवास, ना आरक्षणाची झंझट, ना गर्दीची कटकट

free train

फुकट म्हटल्यानंतर अनेकांचे डोळे विस्फारतात यात काही शंका नाही. त्यातही ट्रेनचा एखादा प्रवास जर तुम्हाला फुकट मिळत असेल तर मात्र तुमचे डोळे आणखीनच मोठे होतील. कारण भारतातील दळणवळणाचे प्रमुख साधन असलेल्या ट्रेनमध्ये तसे पाहायला गेले तर कायम गर्दी आणि तिकीट,आरक्षण, TTE हे सगळे प्रकार आपसूक असतात. विना तिकीट रेल्वेमध्ये प्रवास करणे गुन्हा आहे. मात्र तुम्हाला माहित आहे का भारतात एक अशी ट्रेन आहे जिथे तुम्ही विना तिकीट प्रवास करू शकता. चला जाणून घेऊया याबद्दल अधिक माहिती…

75 वर्षांपासून मोफत प्रवास

भारतात एक अशी ट्रेन धावत आहे ज्यामध्ये प्रवास करण्यासाठी तुम्हाला तिकीटाची गरज नाही. या ट्रेनने तुम्ही विना तिकीट प्रवास करू शकता. या ट्रेनमध्ये कोणताही TTE नाही किंवा तुम्हाला तिकीट बुकिंगचा त्रास नाही. या ट्रेनमधून तुम्ही कोणत्याही तिकीटाशिवाय तुम्हाला हवे तितक्या वेळा मोफत प्रवास करू शकता. या स्पेशल ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी दूरवरून लोक आणि पर्यटक येतात. विशेष म्हणजे ही ट्रेन गेल्या 75 वर्षांपासून लोकांना मोफत प्रवास करत आहे.

भाकरा-नांगल ट्रेन

पंजाब आणि हिमाचल प्रदेश दरम्यान धावणाऱ्या या ट्रेनचे नाव भगरा-नांगल ट्रेन आहे. भागडा-नांगल ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी तुम्हाला एक रुपयाही भाडे द्यावे लागणार नाही. या ट्रेनमध्ये कोणीही न घाबरता आरामात प्रवास करू शकतो. ही ट्रेन पंजाब आणि हिमाचल प्रदेश दरम्यान 13 किमीचा प्रवास करते. भाकरा -नांगल धरणावरून धावणाऱ्या या ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी लोक दूरवरून येतात.

काय आहे मार्ग ?

भाकरा -नांगल ट्रेन हिमाचल प्रदेश आणि पंजाब सीमेवर भाक्रा आणि नांगल दरम्यान धावते. शिवालिक टेकड्यांमध्ये 13 किलोमीटरचा प्रवास करून ही ट्रेन सतलज नदी पार करते.

नदी आणि टेकड्यांवरून प्रवास

हिमाचल प्रदेश आणि पंजाबच्या सीमेवर बांधलेले भाकरा -नांगल धरण पाहण्यासाठी लोक या ट्रेनने प्रवास करतात. ही ट्रेन सतलज नदी आणि शिवालिक टेकड्यांमधून जाते. वाटेत ही ट्रेन तीन बोगदे आणि सहा स्थानकांमधून जाते. डिझेलवर चालणाऱ्या या ट्रेनचे डबे लाकडाचे आहेत. 3 डब्यांची ही ट्रेन पहिल्यांदा 1948 मध्ये धावली होती. तेव्हापासून आतापर्यंत ही ट्रेन कोणाकडून एक रुपयाही न घेता मोफत प्रवास करते. आजही या ट्रेनमधून दररोज सुमारे 800 लोक प्रवास करतात.

या ट्रेनचे व्यवस्थापन रेल्वेकडे नसून भाक्रा हित व्यवस्थापन मंडळाकडे आहे. ट्रेन चालवण्याचा खर्च असूनही व्यवस्थापन लोकांना या ट्रेनमधून मोफत प्रवास करण्याची संधी देते. भाक्रा नांगल धरण बांधले जात असताना, या ट्रेनचा वापर मजूर आणि मालाची वाहतूक करण्यासाठी केला जात होता, नंतर पर्यटनाला चालना देण्यासाठी ही रेल्वे सेवा सुरू ठेवण्यात आली होती.

ही ट्रेन वाफेच्या इंजिनने चालवली जात होती, ती 1953 मध्ये डिझेल इंजिनने बदलण्यात आली. ट्रेनचे डबे कराचीत बनवले गेले. आजही या ट्रेनमधील खुर्च्या ब्रिटिशकालीन आहेत.

सोलापूरकरांसाठी खुशखबर ! स्वस्तात विमानाने जाता येणार थेट मुंबई, गोव्याला

solpur news

सोलापूरकरांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे. आता सोलापूरहून मुंबई आणि गोव्यासाठी थेट स्वस्तातला विमानप्रवास करण्याची संधी आहे. तसे पाहायला गेल्यास नामवंत कंपन्यांचा तिकीट दर याच ठिकाणांसाठी थोडा अधिक आहे. मात्र फ्लाय 91 कंपनीचे तिकीट दर जाहीर झाले असून हे तिकीट दर प्रवाशांना परवडणारे आहेत. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या कामानिमित्त कमी वेळात गोवा किंवा मुंबईला थेट प्रवास करायचा असेल तर ही चांगली संधी आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर विकास मंचचे सदस्य विजय कुंदन जाधव यांनी फ्लाय 91 कंपनीच्या अधिकाऱ्यांना या संदर्भात ईमेल द्वारे माहिती मागितली होती आणि त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. सोलापूर विमानतळाच्या या सेवेमुळे प्रवाशांना जलद आणि परवडणाऱ्या किमतीमध्ये प्रवासाचा आनंद घेता येणार आहे. या मार्गावर महाराष्ट्र शासनाच्या व्हायबीलिटी गॅप फंड आणि रिजनल कनेक्टिव्हिटी योजना म्हणजेच आरसीएस अंतर्गत विमान सेवा देण्याचा प्रस्ताव केंद्रात असल्याने काही मार्गावर फक्त जीएसटी लागू होतो त्यामुळे प्रवास परवडणारा होतो.

सोलापूर – मुंबई

फ्लाय नाईन्टी वन या कंपनीद्वारे सोलापूर ते मुंबई थेट प्रवासासाठी 1488 रुपयांपासून तिकीट सुरू होते विविध स्लॅब मध्ये दर वाढत जातात प्रवाशांच्या मागणीनुसार त्याची उपलब्धता काय आहे यावरून ठरवले जातात. 9584 रुपयांपर्यंत हे दर आहेत अतिरिक्त शुल्क मध्ये 217 रुपये यूजर डेव्हलपमेंट फी म्हणजेच (UDF), 236 विमान सुरक्षा शुल्क (ASF) आणि पाच टक्के जीएसटी यांचा समावेश होतो.

सोलापूर ते गोवा (मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ) :

सोलापूर ते गोवा थेट मार्गावर तिकिटांचा प्रारंभिक दर फक्त 689 रुपये आहे. या मार्गावरही स्लॅबनुसार दर 8785 रुपयांपर्यंत जातात. अतिरिक्त शुल्कातही UDF, ASF, आणि GST चा समावेश आहे, जो मुंबई मार्गाप्रमाणेच आहे.

काय असेल वेळापत्रक ?

मुंबई ते सोलापूर

निघण्याची वेळ : सकाळी 11:55
पोहोचण्याची वेळ: दुपारी 1:45

सोलापूर ते मुंबई

निघण्याची वेळ: सकाळी 9:40
पोहोचण्याची वेळ: सकाळी 11:20

गोवा ते सोलापूर

निघण्याची वेळ: सकाळी 8:00
पोहोचण्याची वेळ: सकाळी 9:10

सोलापूर ते गोवा

निघण्याची वेळ: दुपारी 2:15
पोहोचण्याची वेळ: दुपारी 3:30

मधुमेहाच्या रुग्णांनी खा ‘या’ झाडाची पाने; महिन्यातच जाणवेल फरक

Diabetes

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे लोकांच्या आरोग्यावर अनेक विपरीत परिणाम होत आहे. अगदी कमी वयात देखील लोकांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. अशातच आजकाल डायबिटीसचा प्रकार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. अगदी कमी वयातील मुलांना देखील डायबिटीस झाल्याचे प्रकार समोर येत आहे. डायबिटीसवर अनेक औषधी देखील उपलब्ध आहेत. परंतु जर तुम्ही घरच्या घरी काही उपाय केले, तर तुम्हाला नक्कीच आराम मिळेल. आपल्या भारतीय पदार्थांना खूप जास्त महत्त्व आहे. त्यातील कढीपत्ता हा खूप उपयुक्त आहे. आयुर्वेदात देखील कढीपत्त्याला खूप जास्त महत्त्व आहे. हृदयविकार तसेच संक्रमण आणि रक्तातील साखर कमी होण्यास मदत होते. तसेच डायबिटीसवर नियंत्रण ठेवण्यासाठी कढीपत्ता अत्यंत उपयुक्त आहे. यामध्ये बीटा कॅरोटीन, व्हिटॅमिन सीएम सारखे अँटिऑक्सिडंट आहेत. ज्यामुळे आपल्याला मधुमेह आणि हृदय विकाराच्या आजारापासून आराम मिळतो. आता मधुमेहाच्या रुग्णांसाठी कढीपत्ता कसा उपयोगच आहे हे आपण जाणून घेणार आहे.

पोषकतत्वानी समृद्ध

कढीपत्त्यामध्ये अनेक जीवनसत्व तसेच अँटिऑक्सिडेंट आढळतात. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मधुमेहावर उपचार करण्यासाठी कढीपत्ता अत्यंत फायदेशीर आहे.

फायबरने समृद्ध

कढीपत्त्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतात. त्यामुळे आपली पचनक्रिया नीट होते. तसेच आपण खाल्लेले अन्न देखील चांगले पचते. त्यामुळे तुमच्या रक्तातील साखर देखील नियंत्रणात राहते. आणि मधुमेहापासून तुम्हाला आराम मिळतो.

इन्सुलिनची क्रिया वाढते

कढीपत्त्यामुळे तुमच्या शरीरातील इन्सुलिनची क्रिया वाढते. आणि शरीर इन्सुलिन वापरण्यास सक्षम होते. आणि तुमच्या रक्तातील पातळी देखील स्थिर होते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी कढीपत्ता अत्यंत फायदेशीर आहे. कढीपत्त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण देखील नियंत्रणात येते.

तुम्ही जर रोज सकाळी सात ते आठ कडीपत्त्याची पाने चावून खाल्ली किंवा त्याचा रस करून पीला, तर तुमच्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे तुमच्या रक्तातील साखरेची पातळी कमी होईल. तसेच तुम्ही कोशिंबीरमध्ये देखील कढीपत्ता घालून खाऊ शकता. अनेकवेळा डॉक्टर देखील कढीपत्ता खाण्याचा सल्ला देतात.

गव्हाच्या पिकाला नष्ट करतात हे रोग; सुरुवातीला दिसतात ही लक्षणे

Wheat crop

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या देशातील शेतकरी रब्बी हंगामात पेरणी करावयाच्या पिकांच्या तयारीत व्यस्त आहेत. या हंगामात गहू हे सर्वाधिक पेरणी करणारे पीक आहे. देशातील लाखो शेतकरी चांगल्या नफ्याच्या आशेने गव्हाची शेती करतात, परंतु अनेक वेळा गव्हाच्या पिकावर रोग पडल्याने शेतकऱ्याला मोठा फटका बसतो. अशा परिस्थितीत या रोगांपासून पिके वाचवण्यासाठी शेतकरी नवनवीन पद्धती अवलंबतात. आज आपण या रोगांची लक्षणे जाणून घेऊया.

तपकिरी गंज रोग

हा रोग मुख्यतः गव्हाच्या खालच्या पानांवर होतो, ज्याचा रंग नारिंगी आणि तपकिरी असतो. ही लक्षणे पानांच्या वरच्या आणि खालच्या पृष्ठभागावर दिसतात. पिकांची अवस्था जसजशी वाढते तसतसा या रोगांचा प्रभावही वाढतो. हा रोग प्रामुख्याने पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, पंजाब इत्यादी देशाच्या उत्तर-पूर्व भागात आढळतो. काही प्रमाणात मध्य भारताच्या प्रदेशातही त्याचा प्रादुर्भाव दिसून येतो.

काळा गंज रोग

काळा गंज रोग तपकिरी रंगाचा असून गव्हाच्या देठावर दिसून येतो. या रोगाचे परिणाम देठांमधून पानांवर पसरतात. त्यामुळे देठ कमकुवत होतात आणि संसर्ग तीव्र होतो तेव्हा गव्हाचे दाणे अगदी लहान आणि जाळीदार होतात त्यामुळे उत्पादनात घट येते. दक्षिणेकडील डोंगराळ प्रदेशातील पिकांवर या रोगाचा प्रादुर्भाव जास्त होतो आणि काही प्रमाणात मध्य भारताच्या भागात त्याचा प्रादुर्भाव दिसून येतो.

पिवळा गंज रोग

गहू पिकावरील पिवळ्या गंज रोगामुळे पानांवर पिवळे पट्टे दिसतात. या पानांना स्पर्श केल्यावर हाताला पिवळ्या रंगाचा चूर्णाचा पदार्थ चिकटू लागतो. जे या आजाराचे मुख्य लक्षण आहे. या रोगाचा गहू पिकावर झपाट्याने परिणाम होऊन पिकांचे मोठे नुकसान होते. या रोगाचा प्रादुर्भाव प्रामुख्याने हिमाचल प्रदेश आणि जम्मू आणि काश्मीर सारख्या उत्तरेकडील डोंगराळ भागात आणि पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश इत्यादी वायव्य मैदानी भागात आढळतो.

दीमक

गहू पिकांमध्ये दीमकांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळतो. ते पिकांच्या वसाहतींमध्ये राहतात. दिसायला ते पंख नसलेले, लहान आणि पिवळे/पांढरे रंगाचे असतात. वालुकामय चिकणमाती आणि दुष्काळी परिस्थितीत दीमक प्रादुर्भाव शक्यतो शक्य आहे. हे कीटक गोठलेल्या बिया आणि झाडांची मुळे खाऊन नुकसान करतात. या किडीने प्रभावित झाडे कुरतडलेली दिसतात.

ऍफिड

हे पंख नसलेले किंवा पंख असलेले हिरव्या रंगाचे डंकणारे आणि चोखणारे मुखभाग असलेले छोटे कीटक आहेत. जे पाने आणि कानांमधून रस शोषतात आणि मध स्त्रवतात, ज्यामुळे काळ्या बुरशीचा प्रादुर्भाव होतो आणि पिकांचे मोठे नुकसान होते.