Wednesday, December 31, 2025
Home Blog Page 357

Nubia V70 Design स्मार्टफोन लाँच ; दमदार फीचर्ससह कमी बजेटमध्ये उपलब्ध

nubia

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ZTE च्या सबसिडियरी कंपनीने V सीरिजमधील नवीन स्मार्टफोन Nubia V70 Design लाँच केला आहे. हा स्मार्टफोन ग्राहकांना 28 नोव्हेंबरपासून उपलब्ध होणार असून, या फोनमध्ये 6.7 इंचाची LCD स्क्रीन आणि Apple च्या डायनॅमिक आयलंड फीचरप्रमाणे Live Island 2.0 फीचर आहे. हा फोन 4GB रॅम आणि 256GB स्टोरेजसोबत उपलब्ध आहे. तसेच यात 5000mAh क्षमतेची बॅटरी आहे, जी 22.5W फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. हा स्मार्टफोन Android 14 वर आधारित MyOS 14 वर चालतो. त्यामुळे अनेक ग्राहकांचे लक्ष वेधले आहे.

Nubia V70 Design फीचर्स –

Nubia V70 Design ड्युअल सिम सपोर्टसह येतो आणि Android 14 बेस्ड MyOS 14 वर चालतो. यामध्ये 120Hz रिफ्रेश रेट असलेली 6.7 इंच IPS LCD स्क्रीन आहे. फोनमध्ये 12nm ऑक्टाकोर Unisoc T606 प्रोसेसरसह 4GB रॅमचा समावेश आहे. कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर फोनच्या मागील बाजूस 50 मेगापिक्सलचा प्रमुख कॅमेरा असलेल्या ट्रिपल कॅमेरा सेटअपचा समावेश आहे. पण इतर कॅमेऱ्यांची माहिती अजून दिलेली नाही. सेल्फीसाठी 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 256GB स्टोरेज, 4G, Wi-Fi, ब्लूटूथ, GPS, आणि USB Type-C पोर्ट यांसारखे कनेक्टिव्हिटी पर्याय उपलब्ध आहेत. 5000mAh क्षमतेची बॅटरी आणि 22.5W फास्ट चार्जिंग सपोर्टसह हा फोन नोटिफिकेशन्ससाठी Live Island 2.0 फीचर देखील प्रदान करतो.

फोनची किंमत आणि रंग –

याआधी चीनमध्ये Nubia Z70 Ultra लाँच करण्यात आला होता. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8 एलीट प्रोसेसर, 6150mAh बॅटरीसह 80W फास्ट चार्जिंग, 6.85-इंच AMOLED डिस्प्ले आणि 50 मेगापिक्सल ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. Nubia V70 Design ची किंमत PHP 5299 सुमारे 7600 रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन फिलीपिन्समध्ये प्री ऑर्डरसाठी उपलब्ध आहे आणि 28 नोव्हेंबरपासून Lazada, Shopee आणि अन्य रिटेल चॅनेल्सवर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. तसेच हा फोन ग्राहकांना नारंगी , हिरवा , करड्या , गुलाबी या आकर्षित रंगामध्ये उपलब्ध आहे.

कमी बजेटमध्ये लाखोंची कमाई करणारा ‘हा’ व्यवसाय ; महिलांसाठी ठरेल फायदेशीर

business for woman

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर तुम्हाला कमी गुंतवणुकीत लाखोंची कमाई करायची असेल तर अगरबत्ती, मेणबत्ती आणि धूपबत्ती बनविण्याचा व्यवसाय तुमच्यासाठी योग्य ठरेल . फक्त 5 ते 10 हजार रुपयांमध्ये हा व्यवसाय सुरू करता येतो. विशेष म्हणजे सरकारकडून या व्यवसायाला प्रशिक्षण मिळत असल्यामुळे तुम्ही या व्यवसायाचे सर्व बारकावे शिकू शकता. हा व्यवसाय तुम्ही घरी बसूनही करू शकत असल्यामुळे ,अनेक महिला या व्यवसायाशी जोडलेल्या आहेत. त्यामुळे त्यांना आर्थिक बळकटी मिळालेली आहे. तर चला जाणून घेऊयात या व्यवसायाबद्दल अधिक माहिती.

महिलांसाठी फायदेशीर –

या व्यवसायात अनेक महिला जोडलेल्या असून , प्रथम बाजारातून कच्चा माल आणला जातो. त्यानंतर त्यावर प्रक्रिया होऊन पक्का माल तयार केला जातो. एका किलो मोमापासून 20 ते 25 पॅकेट मेणबत्या तयार होतात. अगरबत्ती बनवण्यासाठी एका किलो कच्च्या अगरबत्तीपासून 30 ते 35 पॅकेट तयार होतात. तसेच महिलांनी परफ्यूम टाकून अगरबत्तीला आकर्षक बनवल्यानंतर ती पॅकिंग करून बाजारात विक्रीसाठी पाठवली जाते. या व्यवसायातून महिला महिन्याला लाखोंची कमाई करत आहेत.

कमी खर्चात दुप्पट नफा –

हा व्यवसाय कमी खर्चात दुप्पट नफा देणारा आहे. मोमबत्ती बनवण्यासाठी एका पॅकेटवर 10 ते 15 रुपये खर्च येतो, तर ती बाजारात 20 ते 25 रुपयांना विकली जाते. त्यामुळे त्यांना एका पॅकेटवर 10 रुपये नफा मिळत असतो. तसेच रंगीत आणि आकर्षक मोमबत्त्यांना बाजारात अधिक मागणी असून त्याची किंमतही जास्त मिळते. त्यामुळे हा व्यवसाय सुरु करणे फायदेशीर ठरू शकते.

व्यवसाय सुरु करण्यासाठी आवश्यक गोष्टी –

तुम्ही जर हा व्यवसाय सुरु करणार असाल तर सर्वप्रथम त्या व्यवसायाची पूर्ण माहिती काढून प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. त्यानंतर कच्चा माल जसे की मोम, अगरबत्तीची स्टिक्स, परफ्यूम, साचे, आणि पॅकिंग साहित्य बाजारातून खरेदी करावे लागेल . तसेच तयार माल विकण्यासाठी थेट विक्री, किरकोळ दुकाने किंवा ऑनलाइन माध्यमांचे साहाय्य घ्यावे . जर तुम्हाला कमी बजेटमध्ये मोठ्या कमाईचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर अगरबत्ती, मोमबत्ती आणि धूपबत्तीचा व्यवसाय उत्तम पर्याय ठरू शकतो. हा व्यवसाय तुम्हाला आर्थिक स्वावलंबनाकडे घेऊन जाईल .

Vi, Jio आणि Airtel कंपन्यांना मोठा फटका ; वाढत्या रिचार्जमुळे असंख्य ग्राहक गमावले

telecom

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जून 2024 मध्ये देशातील तीन प्रमुख टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या रिचार्जच्या दरांमध्ये मोठी वाढ केली होती, ज्याचा परिणाम ग्राहक संख्येवर होताना दिसत आहे. हि ग्राहक संख्या घटल्यामुळे या कंपन्यांना मोठा धक्का बसला आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) च्या आकडेवारीनुसार, रिलायन्स जिओ, भारती एअरटेल, आणि व्होडाफोन आयडियाला मोठा फटका बसला आहे, तर सरकारी कंपनी BSNL यासाठी अपवाद ठरली आहे. कारण यांनी त्यांचे रिचार्ज स्वस्त दरात ग्राहकांना प्रदान केले आहेत.

जिओला ग्राहक गमावण्यात मोठा फटका

देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असलेल्या रिलायन्स जिओला ग्राहक गमावण्यात मोठा फटका बसला आहे. सप्टेंबर महिन्यात जिओच्या ग्राहक संख्येत 7.9 मिलियन, म्हणजेच 79 लाखांची घट झाली आहे. ऑगस्ट 2024 मध्ये जिओचे 47.17 कोटी ग्राहक होते, जे सप्टेंबरमध्ये कमी होऊन 46.37 कोटींवर आले आहेत. ही सलग तिसऱ्या महिन्यातील घट असून यामुळे जिओला मोठ्या आर्थिक आव्हानांचा सामना करावा लागत आहे.

Vi आणि एअरटेललाही फटका

दुसऱ्या क्रमांकावरील व्होडाफोन आयडिया (Vi) ने सप्टेंबर महिन्यात 15 लाख ग्राहक गमावले. यामुळे कंपनीची ग्राहक संख्या ऑगस्टच्या 21.40 कोटींवरून सप्टेंबरमध्ये 21.24 कोटींवर आली आहे. एअरटेललाही सप्टेंबरमध्ये 14 लाख ग्राहक गमवावे लागले असून, तिच्या ग्राहकांची संख्या 38.48 कोटींवरून 38.34 कोटींवर आली आहे. खाजगी क्षेत्रातील कंपन्यांना ग्राहक गमवावे लागत असताना सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL साठी मात्र हा काळ फायदा देणारा ठरला आहे. BSNL ने सप्टेंबर महिन्यात 8.49 लाख नवीन ग्राहक जोडले आहेत. त्यामुळे कंपनीची एकूण ग्राहकसंख्या 9.18 कोटींवर पोहोचली आहे.

ग्राहकांची संख्या कमी

जून 2024 मध्ये या तीन कंपन्यांनी रिचार्ज प्लॅन्सच्या किमती वाढवल्या होत्या. यामुळे ग्राहकांचे आर्थिक ओझे वाढल्याने ते BSNL किंवा इतर पर्यायांकडे वळताना दिसत आहेत. दरवाढीच्या निर्णयाचा परिणाम कंपन्यांच्या महसुलावर सकारात्मक दिसू शकतो, परंतु ग्राहक कमी झाल्याने दीर्घकालीन स्पर्धात्मकता धोक्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ग्राहकांना परवडणाऱ्या दरांमध्ये सेवा देण्याच्या मुद्द्यावर या कंपन्यांनी लवकर तोडगा काढणे आवश्यक आहे, अन्यथा त्यांच्या बाजारपेठेतील हिस्स्यावर परिणाम होऊ शकतो.

लातूरमध्ये धक्कादायक निकाल ! धीरज देशमुख यांचा पराभव ; रितेशची ‘ती’ सभा कारण असल्याची चर्चा

latur result

महाराष्ट्रातील लातूर विधानसभा मतदारसंघांमध्ये आश्चर्यकारक निकाल लागल्याचा दिसून येत आहे. माजी मंत्री कै. विलासराव देशमुख यांचे दोन्ही सुपुत्र धीरज देशमुख आणि अमित देशमुख निवडणुकीच्या रिंगणात होते. या दोन्ही जागा म्हणजे कन्फर्म जागा असं मानलं जात होतं. मात्र तिथेच जनतेने गणित बिघडलेलं असून लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज विलासराव देशमुख यांचा पराभव झालाय. त्यांच्या विरोधात उभे असलेल्या भाजपचे रमेश कराड यांचा विजयी झाला आहे.

धीरज देशमुख आणि अमित देशमुख यांच्या निवडणुकी संदर्भातला प्रचार आणि प्रचार सभा चांगल्या रंगल्या होत्या. त्यापैकी एका सभेला स्वतः त्यांचे बंधू अभिनेता रितेश देशमुख यांनी हजेरी लावत जोरदार भाषण ठोकलं होतं. आणि त्यांची हीच सभा निवडणुकीचा निकाल पलटवणारे ठरली तर नाही ना? अशा चर्चा आता रंगू लागल्यात

कारण रितेशने भाषणात मांडलेले मुद्दे चांगलेच गाजले होते. एवढेच नाही तर रितेशच्या भाषणातील मुद्द्यांवरून त्याला सोशल मीडियावरून ट्रॉलही करण्यात येत होते. या सभेत धर्मावरून त्यांनी विरोधकांना चांगलंच फटकारलं होतं. इतकं करूनही धीरज देशमुख यांचा लातूर ग्रामीणमध्ये पराभव झालाय. धीरज भैय्याच्या पराभवासाठी ती सभा कारणीभूत ठरली की काय? अशी चर्चा आता सुरु झाली आहे.

नक्की काय होते रितेशच्या भाषणात?

अभिनेता रितेश देशमुखने आपल्या भाषणात म्हटले की, ‘‘आज सगळे पक्ष म्हणतात की धर्म धोक्यात आहे, धर्माला वाचवा.’’ पण खरं तर ते धर्मालाच प्रार्थना करत आहेत की त्यांना या निवडणुकीत वाचवावे. धर्म प्रत्येकाला प्रिय आहे. धर्माचे आचरण प्रत्येक जण करतो. पण धर्माच्या नावाने बोलणाऱ्यांना विचारा आमच्या कामाचं काय झालं? “धर्माचे आम्ही पाहून घेतो, तुम्ही आमच्या पिकांच्या भावाचे सांगा, धर्माचे आम्ही पाहून घेतो तुम्ही आमच्या आया-बहिणींच्या सुरक्षितेचे सांगा” असे विचारा, असे आवाहन रितेशने आपल्या भाषणात केले. निवडणूक काळात बऱ्याचशा, भुलथापा येतील, अफवा येतील, गाफिल राहू नका असे आवाहनही रितेशने केले होते.

अभिनेता रितेश देशमुखचा भाऊ अमित देशमुख येथून निवडणूक लढवत आहे. अमित सध्या 8560 मतांनी पुढे आहेत. भाजपच्या डॉ. अर्चना पाटील चाकूरकर दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तर लातूर ग्रामीण विधानसभेच्या जागेवर रितेश देशमुखचा दुसरा भाऊ धीरज देशमुख पिछाडीवर आहे. येथे भाजपचे रमेश काशीराम कराड 1785 मतांनी पुढे आहेत.

कागलमध्ये हसन मुश्रीफ यांचा विजयी षटकार ; समरजितसिंह घाटगे यांचा पराभव

hasan mushreef

कोल्हापूर जिल्ह्यातील कागल विधानसभा मतदारसंघातील लढत ही अतिशय प्रतिष्ठेची मानली जात होती. एकीकडे पाच वेळा विजयी झालेले हसन मुश्रीफ आणि दुसरीकडं समरजीतसिंह घाटगे अशी लढत होती. मात्र हसन मुश्रीफ यांनी समरजितसिंह घाटगे यांचा 11,609 मतांनी पराभव करत विजय खेचून आणला आहे.

हसन मुश्रीफ यांना यावेळची लढत ही खूप प्रतिष्ठेची होती कारण अजित पवार गटामध्ये सामील झाल्यानंतर शरद पवार यानी अत्यंत आक्रमकपणे हसन मुश्रीफ यांच्या विरोधात प्रचार केला होता. तसेच समरजितसिंह घाटगे यांना पाठबळ दिलं होतं. त्यामुळे कागलची लढाईकडे अख्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं होतं.

2019 मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये जवळपास 28 हजार मतांनी हसन मुश्रीफ यांनी विजय मिळवला होता. मात्र यावेळी मताधिक्य कमी झालं असले तरी विजय मिळवण्यात मात्र ते यशस्वी ठरले आहेत. तर दुसरीकडे प्रतिस्पर्धी असलेले समर्जीत घाटगे यांना पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला आहे. कागलच्या लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलं होतं. शरद पवार यांनी दोन सभा घेतल्या होत्या जयंत पाटील यांनी सुद्धा दोन सभा घेतल्या होत्या त्यामुळे कागल मधला वातावरण चांगलं तापलं होतं अखेर हसन मुश्रीफ यांचा विजय निश्चित झाला आहे.

भोर मतदारसंघात शंकर मांडेकर यांचा दणदणीत विजय; 19453 मतांनी संग्राम थोपटेंना केले पराभूत

Shankar Mandekar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे निकाल आज म्हणजे 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजल्यापासूनच जाहीर होत आहे. प्रत्येक फेरी अंती आपल्याला निकाल समजला आहे. अशातच भोर मतदारसंघातून शंकर मांडेकर विजय झाल्याची माहिती समोर आलेली आहे. अजित पवार गटाचे शंकर मांडेकर यांना दणदणीत विजय मिळवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्षाचे संग्राम थोपटे यांना पराभूत करून त्यांनी विजय मिळवलेला आहे.

दहाव्या फेरीपर्यंत शंकर मांडेकर आघाडीवर होते. परंतु काहीशा प्रमाणात ते पिछाडीवर देखील होते. परंतु जवळपास 19453 मतांनी त्यांनी विजय मिळवलेला आहे. संग्राम थोपटे गेले तीन वर्षापासून भोर मतदार संघातून विजयी झालेले आहेत. परंतु यावर्षी भोर मतदार संघाचे पूर्ण नेतृत्व बदलले. आणि शंकर भाऊ मांडेकर हे पहिल्या प्रयत्नातच विजयी झालेले आहेत.

शंकर मांडेकर विजयी झाल्यामुळे भोर, राजगड आणि मुळशी मध्ये जल्लोषाचे वातावरण दिसत आहे. सर्वत्र गुलाल उधळला जात आहे. एका शेतकऱ्याचा मुलगा ते आमदार पदापर्यंतचा प्रवास शंकर मांडेकर यांनी पूर्ण केलेला आहे. आणि या शेतकऱ्याच्या मुलाला संपूर्ण जनतेने देखील भरघोस पाठिंबा देऊन विजयी केलेले आहे.

कराडमधून काँग्रेसला मोठा धक्का. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव

Pruthviraj Chvhan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे निकाल आज सकाळी आठ वाजल्यापासून चालू झालेले आहे. एक हाती महायुतीची सत्ता येणार हे चित्र आता स्पष्ट दिसायला लागलेले आहे. महायुतीने विधानसभा निवडणुकीत चांगलीच बाजी मारलेली आहे. अशातच आता कराड दक्षिण मतदार संघातून एका धक्कादायक निकाल समोर आलेला आहे. तो म्हणजे आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव झालेला आहे.

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव झालेला आहे. त्यांच्या विरोधात भाजपचे उमेदवार अतुल भोसले होते. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर अतुल भोसले हे सुरुवातीपासूनच आघाडीवर होते. या आधी कराड मतदार संघातून काँग्रेसचा सात वेळा विजय झालेला आहे. परंतु या वर्षी विधानसभा निवडणुकीमध्ये मात्र काँग्रेसचा चांगलाच पराभव झालेला दिसून येत आहे.

अकराव्या फेरीनंतरही भाजपचे अतुल भोसले हे जवळपास 16573 मतांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यापासून पुढे होते. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांचा अखेर पराभव झालेला आहे. त्यांच्या पराभवाने मात्र सगळ्यांनाच मोठा धक्का बसलेला आहे. काँग्रेस पक्षाला देखील हा एक खूप मोठा धक्का सहन करावा लागत आहे.

मोदींचा नारा यशस्वी… मी चाणक्य नाही, सामान्य कार्यकर्ता ! विजयानंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

devendra fadanvis

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चे निकाल आता जवळपास स्पष्ट झाले आहेत. राज्यातील काही ठराविक मतदारसंघाचे निकाल अद्याप बाकी आहेत मात्र एकूणच जे चित्र दिसत आहे ते महायुतीच्या बाजूला झुकलेला दिसत आहे. कारण महायुतीला यंदाच्या विधानसभा निवडणुकांमध्ये घवघवीत यश मिळालेला आहे. आज दुपारी दोन वाजून 45 मिनिटांनी मिळालेल्या आकडेवारीनुसार 225 जागांवर महायुती आघाडीवर आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीला केवळ 50 जागांवर यश मिळाल्याचे दिसते आहे. तर इतर पक्षांना 13 जागा मिळालेल्या आहेत.

महायुतीच्या आणि भाजपच्या मोठ्या विजयाचे शिल्पकार म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे नाव पुढे घेतलं जात आहे. एवढंच नव्हे तर त्यांना ‘चाणक्य’ म्हटलं जात आहे. मात्र विजयानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी “मी चाणक्य नाही तर सर्वसामान्य कार्यकर्ता आहे! असं वक्तव्य माध्यमांशी बोलताना केलं.

‘एक हे तो सेफ है’

यावेळी माध्यमांशी बोलताना ‘एक हे तो सेफ है’ या मोदींच्या नाऱ्याचं कौतुक करत मोदींच्यामुळं, मोदी पाठीशी असल्यामुळे ही यशस्वीतेची लढाई जिंकू शकलो असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. याशिवाय हा आशीर्वाद हा आमच्या लाडक्या बहिणींचा आहे असं म्हणत त्यांनी लाडक्या बहिणींचे आभार मानले.

याशिवाय पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी या विजयाचे क्रेडिट हे त्यांच्या कार्यकर्त्यांना दिले आहे. ज्या संघटनांनी महायुती सोबत काम केले आहे. त्या संघटनांचा हा विजय आहे. महाराष्ट्राला एक ठेवणाऱ्यांचा हा विजय आहे. हा एकजुटीचा विजय आहे असं म्हटलं आहे.

शिवाय केंद्रीय मंत्री अमित शहा यांचे देखील देवेंद्र फडणवीसांनी आभार मानले. याबरोबरच पत्रकारांनी जेव्हा मुख्यमंत्री पदाबद्दल प्रश्न विचारला तेव्हा मात्र त्यांनी कोणतेही ठोस उत्तर न देता याबाबतीत महायुती सरकारचे तिन्ही नेते आणि आमचे ज्येष्ठ केंद्रीय नेते हे सर्व मिळून चर्चा करून ठरवतील असं उत्तर त्यांनी दिलं.

गड कायम राखला ! आदित्य ठाकरे यांचा विजय ; शिंदे आणि राज ठाकरेंच्या माणसाचा केला पराभव

aditya

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चे निकाल आता जवळपास स्पष्ट झाले आहेत. राज्यातील काही ठराविक मतदारसंघाचे निकाल अद्याप बाकी आहेत मात्र एकूणच जे चित्र दिसत आहे ते महायुतीच्या बाजूला झुकलेला दिसत आहे. कारण महायुतीला यंदाच्या विधानसभा निवडणुकांमध्ये घवघवीत यश मिळालेला आहे. आज दुपारी दोन वाजून 45 मिनिटांनी मिळालेल्या आकडेवारीनुसार 225 जागांवर महायुती आघाडीवर आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीला केवळ 50 जागांवर यश मिळाल्याचे दिसते आहे. तर इतर पक्षांना 13 जागा मिळालेल्या आहेत.

उद्धव ठाकरे गटाला अपयश मिळताना दिसत आहे. मात्र उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांनी मात्र आपला बालेकिल्ला शाबूत ठेवलाय. महायुतीचं सरकार येणार हे जवळपास स्पष्ट असलं तरी उद्धव ठाकरेंच्या चिरंजीवांनी आदित्य ठाकरे यांनी आपला वरळीचा गड कायम राखलाय. त्यांनी शिंदे गटाचे मिलिंद देवरा आणि मनसेचे उमेदवार संदीप देशपांडे यांचा पराभव केला आहे.

वरळी विधानसभा मतदारसंघाची हीच जागा अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात होती. एकीकडे यंदाच्या वर्षीच्या निवडणुकांमध्ये सत्ता समीकरणे बदलली असताना मोठ्या उलथापालती झाल्या असताना उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांचं काय होणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलं होतं शिवाय मनसेने देखील संदीप देशपांडे यांच्या रूपानं इथं दमदार उमेदवार उभा केला होता. तर दुसरीकडे शिवसेनेच्या शिंदे गटांकडून मिलिंद देवरा यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र या सगळ्यांमध्ये आदित्य ठाकरे यांनी आपला गड राखला असून वरळी मतदारसंघात आपलं वर्चस्व कायम ठेवले आहे. वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांनी 8000 मतांनी विजय मिळवला असून वरळीत तिहेरी लढत रंगली होती पण वरळी येथे शिंदे गट आणि मनसेला धूळ चारत आदित्य ठाकरे यांनी विजय खेचून आणला आहे.

एका भावाचा विजय आणि दुसऱ्याचा पराजय

दरम्यान आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे हे चुलत भाऊ यंदा निवडणुकीच्या रिंगणात होते. यातील एका भावाला विजय तर दुसऱ्या भावाला पराजयाचा सामना करावा लागला आहे. माहीमी मतदारसंघाच्या निकालाकडं अवघ्या मुंबईचा लक्ष लागलं होतं. माहीम मतदारसंघातून धक्कादायक निकाल आला असून पहिल्यांदाच निवडणुकीला उभे राहिलेले राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांचा पराभव झाला आहे. विशेष म्हणजे अमित ठाकरे यांच्यासाठी शिंदे गटाचे आमदार सदा सर्वणकर यांनी अर्ज मागे घ्यावा अशी विनंती केली होती पण सरवणकर निवडणूक लढण्यावर ठाम होते. त्यामुळे ही निवडणूक सरवण कर विरुद्ध अमित ठाकरे होईल असा अंदाज होता मात्र या ठिकाणी महेश सावंत यांनी बाजी मारली.

कोल्हापुरात काँग्रेसला खिंडार ! अमल महाडिकांनी विजय खेचून आणला

kolhapur

कोल्हापूर जिल्ह्याचा एकूण राजकीय इतिहास पाहता कोल्हापुरात हात म्हणजेच काँग्रेसचाच विजय होताना दिसत आला आहे. कोल्हापूर जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र यंदाच्या वर्षी विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या या बालेकिल्लाला मोठा खिंडार पडताना दिसत आहे. एवढेच नव्हे तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये यंदाच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल पाहता महाविकास आघाडीचा पुरता धुव्वा उडाल्याचे दिसत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात १० पैकी ९ जागांवर महाविकास आघाडीला झटका बसला असून सर्व जागांवर महायुतीचे उमेदवार आघाडीवर आहेत.

दरम्यान, कोल्हापूर दक्षिण मधील ऋतुराज पाटील आणि अमल महाडिक या दोघांच्या मधली लढाई ही अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात होती. कारण सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील हे मागील काळामध्ये आमदार होते आणि यंदाच्या वेळी कोल्हापूरची जनता कुणाला साथ देते हे पाहणं महत्वाचं मानलं जात होतं.

मात्र इथे ऋतुराज पाटील यांचा दारुण पराभव झाला असून भाजपचे अमल महाडिक यांनी पुन्हा एकदा आमदारकी खेचून आणली आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील पहिला निकाल कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघांमध्ये लागला आहे. या निकालामुळे सतेज पाटील यांना झटका लागला आहे . तर अमल महाडिक यांनी पुन्हा एकदा विजय खेचून आणला आहे.

कोल्हापूर दक्षिणची लढाई ही अत्यंत प्रतिष्ठित मानली जात होती. धनंजय महाडिक यांनी लाडक्या बहिणींवरून केलेल्या वक्तव्यावरून राज्यपातळीवरती गेली होती त्यामुळे कोल्हापूर दक्षिणच्या हाय व्होल्टेज लढाईमध्ये कोण बाजी मारणार याकडे केवळ जिल्ह्याचे नव्हे तर अख्या राज्याचे लक्ष लागून राहिलं होतं. त्यामुळे सतेज पाटील यांची सुद्धा प्रतिष्ठा पणाला लागली होती मात्र कोल्हापूरच्या जनतेने एकूणच महायुतीला कौल दिला असून कोल्हापुरात झालेली सीएम योगींची सभा, लाडकी बहिणी योजना ही या विजयामध्ये महत्त्वाचे फॅक्टर दिसत आहेत.