Wednesday, December 31, 2025
Home Blog Page 358

राज ठाकरेंना मोठा धक्का; माहीम मतदारसंघातून राजपुत्र अमित ठाकरेंचा पराभव

Raj Thackery

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आज दिनांक 23 नोव्हेंबर रोजी संपूर्ण राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. एक एक फेरी करून संपूर्ण मतदारसंघातील निकाल जाहीर होत आहेत. कोणते उमेदवार आघाडीवर आहेत? तसेच कोणते उमेदवार पिछाडीवर आहेत? याचा निकाल सकाळपासूनच पाहत आहोत. विधानसभा मतदारसंघातून एक मोठी बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे राज ठाकरे यांचे पुत्र आम्ही ठाकरे यांचा पराभूत झालेला आहे. या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत यांनी त्यांचा भगवा फडकवलेला आहे. महेश सावंत यांनी शिवसेनेचे शिंदे गटाचे उमेदवार सरवणकर आणि राजपुत्र अमित ठाकरे यांचा पराभूत करून बाजी मारलेली आहे.

राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना मनसेकडून उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच संपूर्ण राज्यांमध्ये या निवडणुकीबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा चालू झालेली आहे. परंतु आता अमित ठाकरेंचा पराभव झाल्याने राज ठाकरे यांना मात्र मोठा धक्का बसलेला आहे. राजकारणाच्या आखाड्यामध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अमित ठाकरे यांना उतरवले आहे. परंतु आता या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्याने त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

गड राखला ! बारामतीत प्रतिष्ठेच्या लढतीत अजित पवारांचा विजय

baramti

संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष हे बारामतीच्या निकालावर लागलेलं होतं. अखेर बारामतीच्या निवडणुकांचा निकाल आता हाती आला असून यंदाच्या या निवडणुकीमध्ये काकांचा विजय झालेला आहे. कारण ही लढत एकाच कुटुंबातील काका आणि पुतण्या यांच्यातील म्हणजेच अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार यांच्यातील होती. बारामतीच्या जनतेने अजित पवारांनाच कौल दिल्याचं यंदाच्या निवडणुकांच्या निकालातून स्पष्ट होत आहे.

दादांचा विजय

अजित पवारांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी मोठे कष्ट घेतले होते. अखखी बारामतीच पिंजून काढली होती. एवढेच नाही तर शेवटी शेवटी प्रचार सभेमध्ये बोलताना भावनिक आवाहन सुद्धा अजित पवार यांनी केलं होतं.” लोकसभेला ताईला निवडून दिलं आता विधानसभेला दादाला निवडून द्या !”असं ते सभेमध्ये बोलताना म्हणाले होते. आता त्यानुसारच बारामतीकरांनी दादांना निवडून देत अजित पवार यांना साथ दिल्याचे दिसून येत आहे.

प्रतिष्टेची लढाई

दुसरीकडे ही लढाई केवळ अजित पवार आणि युगेंद्र पवार यांच्यामध्ये नव्हती तर ही खरी लढाई अजित पवार विरुद्ध शरद पवार अशी असल्याचे बोलले जात होतं. कारण मातब्बर राजकारणी म्हणून शरद पवार यांचे नाव राज्यामध्ये घेतलं जातं मात्र अजित पवार यांनी महायुतीमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्यावर बरेच आरोप करण्यात आले होते. त्यामुळे हे आरोप खोडून काढण्यासाठी हा विजय महत्त्वाचा होता आणि अखेर हा विजय अजित पवार यांनी खेचून आणल्याचं बोललं जात आहे.

मावळातही महायुतीचाच डंका; सुनील शेळकेंनी उधळला विजयाचा गुलाल

Sunil Shelake

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालाची रणधुमाळी चालू असताना मावळ विधानसभा मतदारसंघातून एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे आता सुनील शेळके यांचा बहुमताने विजय झालेला आहे. अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांचा पराभूत करत सुनील शेळके यांनी विजयाचा गुलाल उधळला आहे. मावळ तालुक्यातील तळेगाव या ठिकाणी मावळ मतदार संघाची मतमोजणी झालेली आहे. आणि सुनील शेळके हे विजयी झालेले आहेत. जवळपास एक लाखाच्या फरकाने ते निवडून आलेले आहेत.

राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये मतमोजणी झालेली आहे. आज सकाळी आठ वाजल्यापासूनच या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. अगदी सुरुवातीपासूनच सुनील शेळके हे आघाडीवर राहिलेले आहे. त्यामुळे विजयी होणे त्यांच्यासाठी सोप्पे होते. गेल्या पाच वर्षात त्यांनी अनेक विकास कामे केलेली आहेत. यामुळे मावळकरांनी त्यांना पुन्हा एकदा निवडून दिलेले आहे.

संपूर्ण मावळ तालुक्यामध्ये सध्या उत्साहाचे वातावरण दिसत आहे. सुनील शेळके यांनी केलेल्या कामाची पोच पावती त्यांना या विधानसभा निवडणुकीच्या निकालात पुन्हा एकदा मिळालेली आहे. तसेच इथून पुढे देखील ते विविध कामकाज करणारच त्याची माहिती त्यांनी या आधीच दिलेली आहे.

अभूतपूर्व विजय ! भाजपने मोडला स्वात:चाच रेकॉर्ड ; आतापर्यंत इतक्या जागांवर आघाडी

bjp

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या निकालाचे चित्र आता जवळपास स्पष्ट होताना दिसते आहे. महाराष्ट्राच्या जनतेने स्पष्टपणे महायुतीला कौल दिल्याचे दिसते आहे. त्यातही भाजपला सर्वाधिक जागांवर यश मिळवता आले आहे. 2024 च्या विधानसभा निकालाचा भाजपच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा विजय म्हणावा लागेल. कारण यापूर्वी 2019 साली झालेल्या भाजपच्या विजयापेक्षा यंदाच्या निवडणुकांच्या विजयामध्ये भाजपचा वाटा हा अधिक राहिल्याचे दिसून येत आहे.

भाजपने तोडाला आपलाच रेकॉर्ड

आज दिनांक १२ वाजून 55 मिनिटांनी मिळालेल्या माहितीनुसार महायुती सरकारला 220 जागांवर आघाडी मिळालेली आहे. तर एकट्या भाजपाला 127 जागांवर आघाडी मिळालेली आहे. 2019 च्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात भाजपने 105 जागांवर विजय मिळवला होता तर यंदाच्या वर्षी हा रेकॉर्ड देखील भाजपकडून मोडला आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला जनतेने प्रचंड बहुमत दिलय आणि विजयाच्या दिशेने भाजपची वाटचाल सुरू आहे त्यामुळे भाजप मोठ्या मताधिक्याने आघाडीवर असल्याचा दिसताय.

कोणाला किती जागा

मुंबईत 36 जागांपैकी 16 जागांवर भाजप आघाडीवर आहे. शिवसेना शिंदे गट आठ जागांवर, राष्ट्रवादी अजित पवार गट एका जागेवर पुढे आहे. तर काँग्रेस केवळ दोन जागांवर आघाडीवर आहे. तर शिवसेना ठाकरे गट सात जागांवर आघाडीवर आहे. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला आपला भोपळाही मुंबईमध्ये फोडता आलेला नाही.

दुसरीकडे कोकणाचा विचार करता कोकणातील 39 जागांपैकी 13 जागांवर भाजपा आघाडीवर आहे. तर शिवसेना शिंदे गट 13 राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दोन उमेदवार आघाडीवर आहेत तर शिवसेना ठाकरे गट तीन आणि राष्ट्रवादी पवार गटाचे चार उमेदवार आघाडीवर आहे. काँग्रेसला कोकणामध्ये वीजय मिळवता आलेला नाही.

पश्चिम महाराष्ट्रातील 58 जागांपैकी भाजप 20, शिवसेना शिंदे गट आठ, राष्ट्रवादी दहा जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेसच्या शिवसेना ठाकरे घडतील आणि राष्ट्रवादी शरद पवार गट सहा जागांवर आघाडीवर आहे.

मराठवाड्याच्या बाबतीत बोलायचं झाल्यास मराठवाड्यात जरांगे फॅक्टर हा पूर्णपणे फेल गेलेला दिसतोय. कारण मराठवाड्यात 46 जागांपैकी भाजपाला 15 जागांवर आघाडी मिळालेली आहे. शिवसेना शिंदे गट दहा जागांवर राष्ट्रवादी अवचित पवार गट दोन जागांवर पुढे आहे तर काँग्रेस सहा शिवसेना ठाकरे गट तीन आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला एकही जागेवर आघाडी मिळवता आलेली नाही.

विजयानंतर एकनाथ शिंदेने दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ‘लाडक्या बहिणींनी…’

Eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यामध्ये 2024 ची विधानसभा निवडणूक मोठ्या चुरसेने पार पडत आहे. यावर्षी नक्की कोणाचे सरकारी येईल कोण विजयी मिळवेल याबाबत सगळ्यांना उत्सुकता आहे. अशातच 20 नोव्हेंबर रोजी मतदान झालेले आहे. तर आज म्हणजे 23 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. आज सकाळी 8 वाजल्यापासूनच मतमोजणी चालू झालेली आहे. आणि सुरुवातीपासूनच महायुतीने आघाडी घेतलेली आहे. यामध्ये महायुतीने आत्तापर्यंत 200 जागांचा टप्पा देखील पार केलेला आहे. तर भाजप 125 जागांवर आहे.

महायुती सतत आघाडीवर असल्याने राज्यातील महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून चांगला जल्लोष होताना पाहायला मिळत आहे. अशातच महायुद्ध एकनाथ शिंदे यांनी निकालाबाबत त्यांची पहिली प्रतिक्रिया दिलेली आहे. निवडणुकीचा निकाल जाहीर होताना सुरुवातीपासूनच महायुती आघाडीवर आहे. आणि याबद्दल शिंदे हे प्रसार माध्यमांशी बोलले आहेत. यावेळी त्यांनी सांगितले की, जनता ही महायुतीच्या पाठीशी ठामपणे उभी राहिलेली आहे. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्रतील संपूर्ण जनतेचे आभार मानलेले आहेत. तसेच विजयी झालेल्या उमेदवारांना वर्षा बंगल्यावर येण्याचे देखील त्यांनी सांगितलेले आहे.

एकनाथ शिंदे यांनी प्रसार माध्यमांची संवाद साधताना सांगितले की, “मतदारांचे सगळ्यात आधी आभार मानतो. महायुतीला खूप मोठे यश दिलेले आहे. लाडक्या बहिणींनी मतदान केलेले आहे. त्याचप्रमाणे लाडके भाऊ आणि लाडके शेतकऱ्यांनी देखील आम्हाला भरभरून मतदान केले आहे. गेल्या दोन वर्षात आम्ही जे केले. त्याचे आम्हाला पोचपावती मिळालेली आहे. पुढील काळात आम्ही आमची जबाबदारी आमची वाढली आहे. मी सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानतो. मतदारांना धन्यवाद देतो की त्यांनी मोठ्या लीडने विजयी केले.”

आज दुपारी 12 वाजेपर्यंत 288 जागांपैकी महायुती 121 जागांवर आघाडीवर आहे. तर महाविकास आघाडी 50 जागांवर आहे. यामध्ये महायुतीत भाजप हे 127 जागांवर तर एकनाथ शिंदे गट 56 जागांवर आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे 38 जागांवर आहे. त्याचप्रमाणे महाविकास आघाडीत आपण जर पाहिले तर काँग्रेसने 18 जागांवर उद्धव ठाकरे गट 17 जागांवर शरद पवार गट हे 15 जागांवर आघाडीवर आहेत.

दिलीप खोडपे यांना पराभूत करत; जामनेरमध्ये गिरीश महाजन यांचा दणदणीत विजय

Girish Mahajan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यात 20 नोव्हेंबर रोजी विधान सभा निवडणुकीचे मतदान एकाच टप्प्यात पार पडले आहे. अशातच आज म्हणजे 23 नोव्हेंबर रोजी राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहेत. प्रत्येक फेऱ्यां अंती वेगवेगळा निकाल हाती येत आहे. अशातच आता जामनेर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार गिरीश महाजन विजयी झालेले आहेत. महाविकास आघाडीचे दिलीप खोडपे यांना पराभूत करून गिरीश महाजन यांनी विजयाचा गुलाल उधळलेला आहे. जामनेर मधून गिरीश महाजन हे सलग सातव्यांदा निवडून आलेले आहेत.

गिरीश महाजन यांना यावर्षी सातव्यांदा उमेदवारी मिळाली होती आणि त्यांनी यासाठी अगदी सगळीकडे जाऊन प्रचारावर भर दिला होता. जळगाव जिल्ह्यामध्ये एकूण 11 मतदार संघ होते हे मतदार संघ राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आणि चर्चेचे होते. परंतु आता मतमोजणीनंतर जळगावच्या या राजकारणात महायुती पुन्हा सरस ठरलेली आहे.

राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे याआधी देखील विजयी झालेले आहेत. या निवडणुकीतही त्यांच्यावर विश्वास व्यक्त करत भाजपकडून त्यांना तिकीट मिळाले होते. आणि आता पुन्हा एकदा त्यांनी विजयाचा गुलाल उधळलेला आहे.

आता कानाकोपऱ्यात अल्लाहु अकबर नाही तर जय श्रीराम ऐकायला मिळणार ; नितेश राणेंची पहिली प्रतिक्रिया

nitesh rane

आज महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीचा निकालाचे चित्र आता जवळपास समोर आले आहे. महायुती या निकालामध्ये विजयी होताना दिसत आहे. 12:40 पर्यंत महायुतीला 218 जागांवर विजय मिळवता आला आहे. तर महायुतीची रणनीती यंदाच्या विधानसभा निवडणुकांमध्ये सक्सेसफुल झालेली दिसून येत आहे. महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला कौल दिलेला दिसतोय…

कणकवली मधलया लढती ह्या अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जात होत्या. तर कणकवली विधानसभा मतदारसंघात जनतेने भाजपला कौल दिल्याचा दिसतोय. नितेश राणे विरुद्ध उद्धव ठाकरे गटाचे संदेश पारकर असा सामना जोरदार रंगला. सध्या आठ फेऱ्यांशी मतमोजणी झालेली आहे. नितेश राणे हे वीस हजारांपेक्षा जास्त मतांनी आघाडीवर आहे. कणकवलीत भाजप कार्यकर्त्यांनी त्यामुळे गुलाल उधळत जल्लोष सुरू केलाय. नितेश राणेंच्या कपाळाला गुलाल लागलाय.

यावेळी बोलताना नितेश राणेंनी प्रतिक्रिया सुद्धा दिली आहे ते म्हणाले की,” मी तुम्हाला पहिला दिवसापासून बोलत होतो कणकवली, देवगड, वैभवाडीच्या जनतेनं मला तिसऱ्यांदा सेवा करण्याची संधी द्यायचा ठरवलेला आहे 262 गावात फिरताना मला ते जाणवलं अशी प्रतिक्रिया नितेश राणे यांनी दिली आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले, वेगवेगळ्या गावात फिरताना लोक मला सांगायचे नितेश राणे तुम्ही चिंता करू नका तुम्ही राज्यात केलेलं हिंदुत्वाचं काम आम्हाला पसंत आहे. आमचे देवेंद्रजी म्हणालेले हे एक धर्मयुद्ध होतो माझ्या मतदारसंघात माझ्याविरुद्ध जिहादींच्या माध्यमातून विषारी प्रचार केला पण माझ्या मतदारसंघातील हिंदू समाज कडवटपणे माझ्यासोबत राहिला अशी प्रतिक्रिया नितेश राणे यांनी दिली आहे.

हा 100% हिंदुत्ववादी विचारांचा मतदारसंघ आहे देवेंद्रजी म्हणाले होते. हे धर्मयुद्ध आहेत ही भगवा विरुद्ध फतवा लढाई होती महाराष्ट्रात आणि कणकवलीत भगवा जिंकला असं नितेश राणे यांनी म्हटलाय नितेश राणेंकडे आठव्या फेरी अखेर 20 हजारांपेक्षा जास्त मतांची आघाडी आहे. 24 व्या फेरीअखेर लीड 60 हजारांपेक्षा कमी होणार नाही असा विश्वास नितेश राणेंनी व्यक्त केलाय सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे महायुतीचा बालेकिल्लाय कणकवली कुडाळ आणि सावंतवाडी तिन्ही जागा आम्ही जिंकणार असं नितेश राणे म्हणाले आहेत महाराष्ट्रात महायुती जिंकली भगवाधारांचं राज्य आलं आता कानाकोपऱ्यात अल्लाहु अकबर नाही तर जय श्रीराम ऐकायला मिळणार असंही नितेश राणे यांनी म्हटलं आणि ते असं म्हणतात एकच जल्लोष सुरू झाला.

महाराष्ट्राच्या जनतेचा कौल महायुतीला ; महाविकास आघाडी पिछाडीवर, भाजपच मोठा पक्ष

result

Maharashtra Vidhansabha Election Result 2024 : आज महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीचा निकालाचे चित्र आता जवळपास समोर आले आहे कारण महायुती या निकालामध्ये विजयी होताना दिसत आहे. 11:36 पर्यंत महायुतीला 216 जागांवर विजय मिळवता आला आहे. तर महायुतीची रणनीती यंदाच्या विधानसभा निवडणुकांमध्ये सक्सेसफुल झालेली दिसून येत आहे. महाराष्ट्राच्या जनतेने महायुती ला कौल दिलेला दिसतोय…

भाजप आघाडीवर

आतापर्यंत आलेल्या निकालामध्ये भाजपला सर्वाधिक जागांवर विजयाचा गुलाल लागलेला दिसतोय भाजपाला 126 जागांवर आतापर्यंत विजय मिळालेला आहे. तर शिवसेना 54 जागांवर आणि राष्ट्रवादी 35 जागांवर पुढे आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस 19 जागांवर शिवसेना ठाकरे गट 20 जागांवर तर पवारांच्या राष्ट्रवादी गटाला सर्वाधिक कमी म्हणजेच 14 जागांवर समाधान मानावं लागला आहे.

लाडक्या बहिणींचा महायुतीला कौल

महायुती सरकारची अत्यंत महत्त्वकांक्षी असलेली योजना ‘मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना’ ही या विधानसभा निवडणुकांमध्ये गेम चेंजर ठरलेली दिसून येत आहेत आणि लाडक्या बहिणींनी महायुती सरकारला विजयी केल्याचे दिसून येत आहे. कारण महायुती सरकारला सर्वाधिक 216 जागांवर आतापर्यंत विजय मिळवता आला. असून पुन्हा एकदा राज्यामध्ये महायुती सरकारच येणार असं एकूण निकालावरून दिसत आहे. याशिवाय भाजपाला सर्वाधिक मतं देऊन राज्यातील भाजप हा सर्वाधिक मोठा पक्ष ठरताना दिसतो आहे.

महायुती आघाडीवर; अजित पवार गटाच्या अदिती तटकरे यांचा श्रीवर्धनमधून विजय

Aditi Tatkare

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी चालू झालेली आहे. आणि एक एक फेऱ्या करत विधानसभा निवडणुकीचा निकाल देखील जाहीर होत आहे. अशातच आता राज्याचा पहिला निकाल हाती आलेला आहे. आणि यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटातून आदिती तटकरे या विजेती झालेल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अनिल नगवणे यांना पराभूत करून त्यांनी विजयाचा झेंडा फडकवला आहे. श्रीवर्धन मतदारसंघांमध्ये महिला उमेदवार आदिती तटकरे यांनी पुन्हा एकदा विजयी झालेल्या आहेत.

राज्यात सध्याच्या कलानुसार महायुती ही 220 जागांवर आघाडीवर असून महाविकास आघाडी ही 57 जागांवर आहे. या राज्यात सुरुवातीपासूनच निकाल हा महायुतीच्या बाजूने लागलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या आदित्य ठाकरे यांचा विजय झालेला आहे.

श्रीवर्धनच्या मतदारसंघांमध्ये श्रीवर्धन म्हसळा, तळा या तालुक्यांचा समावेश होतो या मतदारसंघात सुरुवातीपासूनच तटकरे कुटुंबाचे वर्चस्व चांगले आहे. 2009 च्या निवडणुकीमध्ये सुनील तटकरे येथून विजयी झाले होते. 2014 ला देखील सुनील तटकरे लोकसभेमध्ये गेले होते. त्यानंतर 2014 च्या विधान निवडणुकीमध्ये अवधूत अनिल तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून विजयी झालेले होते. 2019 मध्ये अनिल तटकरे यांच्या आदिती तटकरे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारा होत्या. त्या देखील विजयी झाल्या होत्या. आणि आता पुन्हा एकदा 2024 मध्ये श्रीवर्धनमध्ये आदिती तटकरे यांनी विजय मिळवलेला आहे.

विधानसभा निवडणूकींमुळे विद्यापीठाच्या परीक्षा ढकलल्या पुढे; जाणून घ्या नवी तारीख

University Exam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या संपूर्ण राज्यामध्ये विधानसभा निवडणूक चालू आहेत. आज म्हणजेच 23 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. या विधानसभा निवडणुकीच्या निकालामुळे विद्यापीठातील अनेक शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी इलेक्शन ड्युटीवर नेमले होते. यामुळे विद्यार्थ्यांचे परीक्षा फॉर्म देखील वेळेत अपलोड होऊ शकले नाही. अशातच आता निवडणुकांच्या या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या परीक्षा या डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. हा निर्णय पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठाने घेतलेला आहे.

पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठाची परीक्षा या ऑक्टोबरमध्ये नियोजित करण्यात आलेली होती. परंतु आणि कारणांमुळे ही परीक्षा पुढे ढकलून 26 नोव्हेंबर रोजी सुरू करण्याचा निर्णय घेतला. परंतु नंतर इलेक्शन ड्युटी लागल्यामुळे अनेक शिक्षक या इलेक्शन ड्युटीमध्ये गुंतलेले होते. आणि त्यामुळे परीक्षा आणखी 15 दिवस पुढे ढकलण्यात आलेल्या आहे. परीक्षांची नवी तारीख जाहीर केलेली आहे. आणि त्यांनी दिलेले माहितीनुसार आता डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून या परीक्षेत सुरू होणार आहे.

या परीक्षेसाठी जवळपास 70 हजार विद्यार्थी बसलेले आहेत. 100 केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार आहे. द्वितीय आणि अंतिम वर्षातील विद्यार्थी वेगवेगळ्या परीक्षा केंद्रांवर परीक्षेसाठी असणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. तसेच कॉपीमुक्त परीक्षासाठी प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे देखील लावण्यात आलेले आहेत. ही परीक्षा 40 ते 45 दिवसांची असेल आणि परीक्षेचा निकाल देखील वेळेत लावण्यात येईल अशी माहिती समोर आलेली आहे.