Tuesday, December 30, 2025
Home Blog Page 372

तुम्हालाही रिल्स बनवायला आवडत असतील तर; मिळणार 1.5 लाख रुपये, कसे ते वाचा

Reels

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. तरुण पिढीतील तर सोशल मीडियाचे अक्षरशः वेड लागलेले आहे. सोशल मीडियावर रील्स बनवणे, त्या व्हायरल होणे. यासारख्या गोष्टी सर्रास घडत असतात. परंतु आता या रील्स बनवण्याच्या आवडीमुळे तुम्ही नक्कीच लखपती होऊ शकता. कारण आजची ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. जर तुम्ही देखील चांगले रील्स बनवत असाल, आणि चित्रपटात काम करण्याची तुम्हाला आवड असेल, तर आता तुम्ही रील्सच्या माध्यमातून चांगले पैसे कमवू शकता. कारण आता राष्ट्रीय राजधानी क्षेत्र परिवहन निगम यांच्या वतीने नमो भारत शॉर्ट फिल्म मेकिंग स्पर्धेच्या आयोजन करण्यात आलेले आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ही स्पर्धा सगळ्यांसाठी आहे. कोणीही या स्पर्धेत सहभागी होऊ शकतो. जर तुम्ही या स्पर्धेतील विजयी झाला, तर स्पर्धकाला दीड लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आलेले आहे. तुम्ही या स्पर्धेत सहभागी झाल्यानंतर शॉर्ट फिल्मचा किंवा रील्सचा विषय तुम्ही स्वतः निवडू शकता. तसेच त्याचे कथानक करण्याचा अधिकार त्यांना आहे. परंतु तुम्ही ही शॉर्ट फिल्म किंवा रिलीज बनवताना आरआरटीएस स्टेशन आणि नमो भारत ट्रेन हे क्रिएटिव्ह स्वरूपात दिसले पाहिजे.

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तुम्हाला कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. फक्त तुमच्या मधील तुम्हाला गुणवत्ता दाखवायची आहे. यासह स्पर्धेत तुम्ही हिंदी किंवा इंग्रजी भाषेत अर्ज करू शकता. तसेच शॉर्ट फिल्मचे चित्रीकरण देखील हिंदी किंवा इंग्लिश भाषेमध्ये करायचे आहे. या फिल्मचा फॉरमॅट हा mp4 1080p असा आहे.

या स्पर्धेमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी देखील सहभाग घेऊ शकता. पहिल्या तीन क्रमांकासाठी बक्षीस देखील ठेवण्यात येणार आहेत. या स्पर्धेमध्ये ज्याचा प्रथम क्रमांक येईल त्याला दीड लाख रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. दुसऱ्या क्रमांकासाठी एक लाख रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. तर तिसऱ्या क्रमांकाला पन्नास हजार रुपयांच्या बक्षीस देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे प्रथम, द्वितीय तृतीय असलेल्या शॉर्ट फिल्म ह्या एनसीआरटीसी च्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर देखील दाखवल्या जाणार आहे.

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तुम्हाला एनसीआरटीसी कडे एक अर्ज करावा लागणार आहे. त्यामध्ये तुम्हाला अर्जाचा विषघेताना नमो भारत शॉर्ट फिल्म मेकिंग स्पर्धेसाठी अर्ज असं लिहावं लागणार आहे. या शॉर्ट फिल्मची कथा जास्तीत जास्त तुम्हाला शंभर शब्दात लिहावी लागणार आहे. त्यानंतर तुम्ही त्यांच्या ऑफिशियल मेल आयडीवर अर्ज करू शकता. 20 डिसेंबर 2024 पर्यंत ही या स्पर्धेचा अर्ज करण्यासाठी मुदत ठेवण्यात आलेली आहे.

इलॉन मस्कची सॅटेलाइट इंटरनेट सेवा जिओ आणि एअरटेलपेक्षा स्वस्त असेल ? किती येईल खर्च ?

starlink

भारतात लवकरच नवी सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू होणार आहे. दूरसंचार नियामकाने यासाठी मार्ग मोकळा केला आहे. रेग्युलेटरने अलीकडेच सॅटेलाइट कम्युनिकेशन्ससाठी स्पेक्ट्रम वाटपाशी संबंधित फीडबॅक मागितला होता. ज्याला 15 डिसेंबरपर्यंत अंतिम स्वरूप दिले जाईल. स्पेक्ट्रम वाटपाशी संबंधित सर्व सूचनांचे पुनरावलोकन केल्यानंतर, त्यांच्या सेवा प्रदात्यांना स्पेक्ट्रमचे वाटप केले जाईल. यानंतर भारतात सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू होईल.

Jio व्यतिरिक्त, Airtel, Voda, Elon Musk’s Starlink आणि Amazon Quiper प्रोजेक्टने भारताच्या सॅटेलाइट इंटरनेट मार्केटमध्ये अर्ज केला आहे. जिओ आणि एअरटेलला टेलिकॉम रेग्युलेटरकडून सेवा सुरू करण्यासाठी ग्रीन सिग्नल मिळाला आहे. त्याच वेळी, एलोन मस्कच्या स्टारलिंक आणि ॲमेझॉनला अनुपालन पूर्ण करावे लागेल, त्यानंतर त्यांना सेवा सुरू करण्याची परवानगी दिली जाईल. स्टारलिंकने म्हटले आहे की कंपनी सरकारच्या अनुपालनाची पूर्तता करण्यास तयार आहे.

इलॉन मस्कची सॅटेलाइट कम्युनिकेशन कंपनी स्टारलिंकने ऑक्टोबर 2022 मध्येच देशात उपग्रह इंटरनेट सेवा सुरू करण्यासाठी अर्ज केला होता. यापूर्वी, कंपनीने आपल्या वेबसाइटवर उपग्रह इंटरनेट कनेक्शन बुकिंगशी संबंधित तपशील, किंमत इत्यादी प्रकाशित केले होते, जे नंतर कंपनीने काढून टाकले. सध्या, भारतातील उपग्रह इंटरनेट सेवेसाठी नियामक मान्यता आणि नेटवर्क वाटप आवश्यक आहे.

स्टारलिंक उपग्रह सेवेची किंमत सध्या भारतात अधिकृतपणे पुष्टी केलेली नाही. तथापि, कंपनीच्या माजी प्रमुखांनी सांगितले होते की पहिल्या वर्षासाठी वापरकर्त्याला यासाठी सुमारे 1,58,000 रुपये खर्च करावे लागतील. त्याच वेळी, दुसऱ्या वर्षापासून त्याची किंमत 1,15,000 रुपये असेल. तथापि, सेवा वापरण्यावर 30 टक्के कर लावून हा खर्च कव्हर केला जाईल. पहिल्या वर्षासाठी, वापरकर्त्याला स्टारलिंक सॅटेलाइट रिसीव्हर खरेदी करण्यासाठी खर्च करावा लागेल. यामुळे, वापरकर्त्याला पहिल्या वर्षी जास्त खर्च करावा लागू शकतो. स्टारलिंकच्या वेबसाइटनुसार, वापरकर्त्यांना 1 महिन्यासाठी मोफत सॅटेलाइट इंटरनेट सेवा ट्रायल म्हणून दिली जाईल.

Whatsapp Scam | Whatsapp च्या माध्यमातून होतोय मोठा स्कॅम; हा मेसेज अजिबात ओपन करू नका

Whatsapp Scam

Whatsapp Scam | तंत्रज्ञानाच्या युगामध्ये मोठ्या प्रमाणात प्रगती झालेली आहे. त्यातही सोशल मीडिया आजकाल तंत्रज्ञानाचा एक मूलभूत पाया आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातूनच आपल्याला घरबसल्या अनेक गोष्टी समजतात. या सोशल मीडियामुळे संपूर्ण जग एकमेकांशी जोडले गेलेले आहे. परंतु तंत्रज्ञानाने केलेल्या या प्रगतीचा माणसांना जेवढा फायदा होतो, तेवढाच त्याचा तोटा देखील झालेला आहे. या सोशल मीडियाच्या माध्यमातून आता सायबर क्राईमचे धोके देखील मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत.

सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म पैकी whatsapp चा वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. आणि अशाच आता व्हाट्सअपच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात होत आहेत. अनेक स्कॅमर्स हे व्हाट्सअपच्या माध्यमातून वेडिंग इन्व्हाईट म्हणजे डिजिटल वेडिंग कार्ड लोकांना पाठवत आहेत. आणि त्या माध्यमातून पैसे लुटत आहेत. हे लोक आपली वैयक्तिक माहिती देखील चोरण्याचे काम करतात. त्यामुळे आता सायबर क्राईम डिपार्टमेंटने देखील लोकांना सावध राहण्याचा इशारा दिलेला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून व्हाट्सअप वर डिजिटल वेडिंग कार्ड खूप प्रसिद्ध होत आहे. अनेक लोक दूर राहिल्याने त्याच्या नातेवाईकांना घरी जाऊन लग्नाची पत्रिका देता येत नाही. त्यामुळे ते व्हाट्सअपच्या माध्यमातून हे वेडिंग कार्ड पाठवतात. परंतु आता स्कॅमर्स साठी पैसे लुटण्याचा एक नवीन साधन झालेले आहे. नवीन पत्र देण्याच्या माध्यमातून स्कॅमर्सने एक वेडिंग इन्व्हाईट तयार केलेले आहे. स्कॅमर्स व्हाट्सअपवर वेडिंग इन्व्हाईटमध्ये एक APK फाईल पाठवतात.

त्यानंतर तुम्ही या इन्व्हाईट लिंकवर क्लिक केले की, तुमच्या फोनमध्ये एक मालवेअर डाऊनलोड होता. आणि त्यामुळे त्याच्या मदतीने तुमच्या माहितीचा एक्सेस घेतात. आणि तुमची वैयक्तिक माहिती मिळून ऑनलाईन फ्रॉड करण्याचा प्रयत्न करतात. यामुळे जर तुम्हाला अशा कोणत्याही फाईल आल्या, तर त्यावर अजिबात क्लिक करू नका.

सायबर क्राईम डिपार्टमेंटने देखील लोकांना यांसारख्या स्कॅमपासून सावध राहण्याचे आवाहन केलेले आहे. जर तुमच्यापैकी कोणासोबत असा स्कॅम झाला, तर त्यांनी नॅशनल सायबर क्राईम हेल्पलाइन नंबर 1930 वर कॉल करून तक्रार करू शकता. परंतु अशा प्रकारची कोणतीही फाईल जर तुमच्या whatsapp वर आली तर त्यापासून सावध रहा.

मुलांचे भविष्य करा सिक्युअर ; सुरक्षित गुंतवणुकीसाठी ‘हे’ आहेत बेस्ट पर्याय

investment for kids

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत सरकार छोट्या मुलांच्या उज्वल भविष्यासाठी अनेक योजना सुरु करत आहेत. त्यामुळे पालकांना मुलांचे आर्थिक भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. ज्यामुळे हे पर्याय मुलांच्या आर्थिक स्थैर्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. पण पालकाना या विविध योजनेबद्दल माहिती नसल्यामुळे इतर ठिकाणी केलेली गुंतवणूक फसू शकते . तर आज आम्ही अशा योजनांबद्दल माहिती सांगणार आहोत , ज्यामुळे तुमची गुंतवणूक सुरक्षित राहील आणि मुलांना भविष्यात येणाऱ्या आर्थिक अडचणींपासून वाचवाल . त्यामुळे तुम्ही केलेली छोटी बचत हि मोठी बचत ठरू शकते.

एनपीएस वात्सल्य योजनेचे

या योजनेत पालक किंवा त्यांच्या नातेवाईक मुलांसाठी बचत करू शकतात. ही योजना मुलांच्या आर्थिक भविष्याचा विचार करून सुरू केली गेली आहे. पालक या योजनेमध्ये 1000 रुपयांपासून बचत सुरू करू शकतात. ही छोटी रक्कम असली तरी, वेळोवेळी मोठा निधी जमवता येतो. एनपीएस वात्सल्य योजना ही एक मार्केट लिंक्ड योजना आहे, म्हणजेच यामध्ये केलेली गुंतवणूक शेअर बाजाराच्या स्थितीवर आधारित असते, ज्यामुळे दीर्घकालीन गुंतवणुकीवर चांगला नफा मिळतो . तसेच गुंतवणूक करणाऱ्यांना करसवलतीचा लाभ देखील मिळतो. यामुळे पालकांची करदेयता कमी होण्यास मदत होते. मुलांच्या भविष्याशी संबंधित आर्थिक सुरक्षितता यासाठी एनपीएस वात्सल्य योजना एक उत्कृष्ट पर्याय आहे, ज्यामुळे पालक आपल्या मुलांसाठी एक मजबूत वित्तीय आधार तयार करू शकतात.

सुकन्या समृद्धी योजना

या योजनेत खाते फक्त मुलींच्या नावावर उघडता येते. खातं उघडण्याची वयोमर्यादा 10 वर्षांपर्यंत आहे. तुम्ही एका वर्षात किमान 250 रु व जास्तीत जास्त 1.5 लाख पर्यंत गुंतवणूक करू शकता . त्याचबरोबर तुम्हाला योजनेवर एक आकर्षक व्याज दर देखील मिळतो, जो दरवर्षी सरकारतर्फे निश्चित केला जातो. या योजनेचा कालावधी 21 वर्षे असतो, ज्यामुळे मुलीला वयाच्या 18 वर्षांनंतर या खात्यातून पैसे काढता येतात. या योजनेत योगदान करणाऱ्यांना 80C कलमाअंतर्गत कर सवलत मिळते.

म्युच्यूअल फंड

मुलांसाठी SIP योजना सुरू करणे एक उत्कृष्ट पर्याय असू शकतो. यामध्ये प्रत्येक महिन्याला ठराविक रक्कम गुंतवणूक केली जाते, आणि ती रक्कम मुलांच्या भविष्यासाठी मोठ्या प्रमाणावर वाढू शकते. या योजनांमध्ये दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास मुलांच्या शिक्षण, विवाह इत्यादीसाठी पैशांची सोय होऊ शकते. तरी पालकांसाठी हा उत्तम पर्याय ठरू शकतो .

पीपीएफ अकाऊंट

पीपीएफ (पब्लिक प्रोविडंट फंड) अकाऊंट एक सरकारी बचत योजना आहे, जी दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी आणि कर कपातीसाठी उपयुक्त आहे. या अकाऊंटमध्ये पैसे गुंतवून आपल्याला सुरक्षित आणि जास्त नफा मिळतो . पीपीएफ अकाऊंट भारतीय पोस्ट ऑफिस आणि बँकांमध्ये उघडता येतो. पालक या योजनेत मुलांच्या नावाने गुंतवणूक करू शकतात आणि मुलांच्या भविष्यासाठी निधी साठवू शकतात. याचा लॉक-इन कालावधी 15 वर्षांचा असतो .

मोदी सरकारचा मोठा निर्णय; ‘या’ योजनेअंतर्गत 8 लाखांच्या गृहकर्जावर 4 टक्के व्याज अनुदान

Pradhanmantri Awas Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | केंद्र सरकारच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक योजना चालू केलेल्या आहेत. त्याचा फायदा अनेक विद्यार्थ्यांना देखील झालेला आहे. अशातच आता केंद्र सरकारने याआधी पण प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली होती. याबाबत सरकारने मोठा निर्णय घेत आता प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0 ला मान्यता दिलेली आहे. यामुळे या योजनेचा फायदा होणार आहे. तसेच आर्थिक दृष्ट्या दुर्बल विभाग, निम्न उत्पन्न गट, मध्य उत्पन्न गट यांना मिळणार आहे. सर्वसामान्य लोकांना या योजनेचा चांगला लाभ मिळणार आहे.

सरकारच्या या निर्णयानंतर जवळपास 1 कोटी कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.हाती आलेल्या माहितीनुसार प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0 अंतर्गत 1 कोटी शहरी गरीब आणि मध्यमवर्ग कुटुंबांना प्राथमिक कर्ज देणाऱ्या संस्थेमार्फत येत्या पाच वर्षांमध्ये शहरी भागात घर बांधण्यासाठी त्याचप्रमाणे भाड्याने घेण्यासाठी आर्थिक सहाय्य प्रदान केले जाणार आहे. या योजनेअंतर्गत 2.30 कोटी रुपयांपर्यंतची मदत नागरिकांना देण्यात येणार आहे.सरकारच्या या योजनेअंतर्गत आता लाभार्थी आधारित बांधकाम तसेच भागीदारीतील घरे परवडणारी भाडे निर्माण आणि व्याज अनुदान योजना समावेश करण्यात आलेला आहे. तुम्ही तुमच्या पात्रतेनुसार या चार घटकांपैकी एक घटक निवडू शकता.

व्याज अनुदान योजना काय आहे?

सरकारच्या या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ईडब्ल्यूएस, एलआयसी या कुटुंबासाठी गृह कर्जावर सबसिडी देखील दिली जाणार आहे. या योजनेअंतर्गत 35 लाखांपर्यंतच्या घरांसाठी 25 लाखांपर्यंतचे गृह कर्ज घेणारे लाभार्थी 12 वर्षाच्या कालावधीसाठी पहिल्या 8 लाखाच्या कर्जावर चार टक्के अनुदानास पात्र असणार आहेत.तसेच पात्र विद्यार्थ्यांना 1.80 लाखांच्या अनुदान पाच वर्षाच्या हप्त्यामध्ये दिले जाणार आहे.

केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास शहरी योजना 2015 साली सुरू केली होती. या योजनेअंतर्गत 1.18 कोटी घरांना मंजुरी देखील देण्यात आली होती. परंतु आता सरकारने ही योजना पुन्हा एकदा नवीन स्वरूपात चालू केलेली आहे.

शिक्षण घेणाऱ्या प्रत्येकाला मिळणार अपार कार्ड; अशाप्रकारे भविष्यात होणार उपयोग

Apar Card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल शिक्षण पद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होत चाललेले आहे. अशातच आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये काही महत्त्वाचे बदल करण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहे. आणि यामध्ये अनेक छोट्या-छोट्या गोष्टीत बदल करण्यात आलेला आहे. आणि यावर प्रत्येक विद्यार्थ्यांचा एक वेगळा क्रमांक देखील असणार आहे. या अपार कार्डमुळे विद्यार्थ्यांची आता एक वेगळी ओळख निर्माण होणार आहे. तसेच डीजी लॉकरची सोय उपलब्ध करणे करून दिली जाणार आहे. हा उपक्रम एक देश एक विद्यार्थी या संकल्पनेवर आधारित असणार आहे.

अपार कार्ड म्हणजे काय ?

अपार म्हणजे ऑटोमेटेड परमनंट अकॅडमी अकाउंट रजिस्ट्री. पूर्व प्राथमिक ते उच्च शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना हे कार्ड मिळणार आहे. यावर तुमचा 12 अंकी ओळख क्रमांक दिला जाणार आहे. यामध्ये तुम्हाला युनिफाईड डिस्ट्रिक्ट अँड इन्फॉर्मेशन सिस्टीम फॉर एज्युकेशन प्लसमध्ये नोंदणी केली जाणार आहे.

या अपार कार्डद्वारे प्रत्येक विद्यार्थ्यांची माहिती ही एकाच ठिकाणी सुरक्षित असणार आहे. डिजिलॉकर मध्ये तुम्ही तुमचे सगळे कागदपत्रे देखील देऊ शकता. याद्वारे जर तुम्हाला पुढील शिक्षणासाठी कोणतेही कागदपत्र लागले, तर ते सहज शोधता येईल. तसेच याद्वारे विद्यार्थ्याला त्याची सर्व कागदपत्रे शाळेत जमा करण्याची गरज नाही. ही सर्व कागदपत्रे डिजी लॉकरमध्ये असणार आहे.

अपार कार्ड कसे बनवायचे ?

प्रत्येक शाळा आता आपार कार्ड बनवण्यासाठी त्यांच्या पालकांची संपर्क साधणार आहे. अपारसाठी यु-डायस नोंदणी नंबर, जन्मतारीख, मोबाईल नंबर, आई-वडिलांची नावे, आधार कार्ड वरील नावे या सगळ्या गोष्टी विचारल्या जाणार आहेत. जर विद्यार्थी 18 वर्षापेक्षा कमी वयाचा असेल, तर या संपूर्ण प्रोसेस साठी पालकांची संमती लागणार आहे. त्यानंतर तुमचे अपार कार्ड तयार झाल्यावर ते डीजीलॉकर सोबत कनेक्ट केले जाणार आहेत. जेणेकरून तुमची संपूर्ण शैक्षणिक माहिती एका ठिकाणी सुरक्षित राहील.

नेटवर्क नसतानाही करता येणार कॉल आणि मेसेज; BSNL ने लॉन्च केली नवी सुविधा

BSNL

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जुलै महिन्यामध्ये अनेक खाजगी टेलीकॉम कंपनी यांनी त्यांच्या रिचार्जच्या दरामध्ये वाढ केलेली आहे. आणि त्यानंतर बीएसएनएल (BSNL) या सरकारी कंपनीचे मात्र अच्छे दिन यायला सुरुवात झालेली आहे. कारण अनेक ग्राहक हे बीएसएनएल कडे वळालेले आहेत. नुकतेच कंपनीने त्यांचा लोगो देखील बदललेला आहे. आणि आता ही कंपनी देशभरातील त्यांच्या युजरसाठी अनेक सुविधा देखील सुरू करणार आहे. खाजगी टेलीकॉम कंपनी भारत दूरसंचार निगम लिमिटेडने भारत देशातील पहिली सॅटेलाईट टू डिवाइस सर्विस लॉन्च केलेली आहे. याबाबतची माहिती दूर संचार विभागाने त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केलेली आहे. त्यामुळे आता बीएसएनएल वरून तुम्हाला कॉल आणि एसेमेस करण्यासाठी नेटवर्कची गरज भासणार नाही. बीएसएनएलने यासाठी अमेरिकेच्या वीएसाट कंपनीसोबत पार्टनरशिप देखील केलेली आहे.

बीएसएनएलने त्यांच्या एक्स मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ शेअर केलेला आहे. या व्हिडिओमध्ये यात्रेकरू डोंगराळ भागातून प्रवास करत आहे. परंतु त्यांचे नेटवर्क जाते. आणि बीएसएनएलची सॅटॅलाइट टू सर्विस मदत करते. या सर्विसच्या माध्यमातून तो व्यक्ती कॉल करतो आणि या सर्विस चा लाभ घेतो.

बीएसएनएलच्या या सॅटॅलाइट टू डिवाइस सर्विस ट्रायल देखील पूर्ण झालेले आहे. बीएसएनएलच्या या सर्विस मधून आता इमर्जन्सी कॉल, मेसेज, यूपीआय पेमेंट देखील करता येते. आयफोन 14 ने पहिल्यांदा ही सर्विस लाँच केली होती. यानंतर इतर मोबाईल कंपन्यांनी देखील या सर्विसला सपोर्ट करणारे डिव्हाईस आणलेले होते. परंतु आता बीएसएनएलने पहिल्यांदाच भारतात फायबर आधारित इंटरनेट टीव्ही सुविधा सुरू केलेली आहे. आणि याला त्यांनी आयएफटीव्ही असे नाव दिलेले आहे. या सुविधेतून आता लाईव्ह टीव्ही चॅनल आणि पे टीव्ही सुद्धा मिळणार आहे. तसेच लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म देखील तुम्हाला मिळणार आहे.

15 ते 20 नोव्हेंबर पर्यंत राज्यातील शाळा राहणार बंद; शासनाचा मोठा निर्णय

maharashtra School

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यातील विधानसभा निवडणुका अगदी काही दिवसांवर आलेल्या आहेत. आणि यातच राज्य सरकारने राज्यातील सरकारी शाळांबाबत महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. सध्या निवडणुकांचे काम असल्याने शाळांमध्ये शिक्षक निवडणुकीच्या कामात व्यस्त असणार आहे. त्यामुळे या दिवशी शाळा भरणार नाही. त्यामुळे शाळांना सुट्टी जाहीर केलेली आहे. त्यामुळे आता दिवाळीनंतर लगेचच विद्यार्थ्यांना एक मोठा वीकेंड मिळणार आहे.

विधानसभा निवडणुकीमुळे राज्यातील सरकारी शाळांना 18 ते 20 नोव्हेंबर पर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे 15 नोव्हेंबर रोजी गुरुनानक जयंती असल्यामुळे या दिवशी सुट्टीच असणार आहे. त्याचप्रमाणे शहरातील अनेक शाळांना शनिवारी आणि रविवारी आठवड्याची दोन दिवस सुट्ट्या असतात. त्याचप्रमाणे सोमवार ते 18 तारखेपासून 20 तारखेपर्यंत सरकारने सुट्टी जाहीर केलेली आहे. त्यामुळे या दिवशी देखील सुट्टी असणार आहे. या सगळ्यांमध्ये ज्या विद्यार्थ्यांची शाळा शनिवारी असणार आहे, त्यांनाच फक्त शाळेत जावे लागणार आहे. अन्यथा इतर दिवशी सुट्टी असणार आहे.

20 नोव्हेंबरला राज्यात मतदान असल्याने राज्य सरकारने या दिवशी सुट्टी जाहीर केलेली आहे. परंतु आता एक मोठा वीकेंड आल्यामुळे पालक मुलांसोबत बाहेर सुट्टी एन्जॉय करण्यासाठी जाऊ शकतात. आणि याचा परिणाम मतदानावर देखील होऊ शकतो. मोठ्या प्रमाणात शाळेतील शिक्षक हे निवडणुकीच्या ड्युटीवर आहेत. अनेक विद्यार्थी जरी शाळेत आले तरी त्यांना शिकवू शकत नाही. या शिक्षकांना मतदान केंद्रे आधीच ठरवून दिलेली आहेत. शिक्षकांना निवडणुकीच्या काळामध्ये खूप जास्त काम असल्याने आता त्यांना शाळा भरवणे शक्य नसल्याने विद्यार्थ्यांना एक मोठा वीकेंड मिळालेला आहे.

पॅनला आधारशी लिंक करणे आता पडणार महागात, ठोठावला जाणार दंड

pan -adhar link

आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी केंद्र सरकारने पॅनला आधारशी लिंक करणे अनिवार्य केले आहे. आयकर विभागाने यासाठी ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत मुदत दिली आहे. तुम्ही 31 डिसेंबरपर्यंत पॅन आणि आधार लिंक न केल्यास तुमचे पॅन कार्ड डी-ॲक्टिव्हेट केले जाईल. यामुळे तुम्हाला कर भरणे, व्यवहार करणे आदींसह इतर अडचणींना सामोरे जावे लागेल.

पॅन-आधार लिंक करण्यासाठी दंड

30 जून 2023 पर्यंत पॅन कार्ड आधारशी लिंक करण्याची सुविधा मोफत करण्यात आली होती. मात्र, आता विलंब शुल्क म्हणून एक हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. यापूर्वी दंडाची रक्कम 500 रुपये होती, ती आता 1000 रुपये करण्यात आली आहे. म्हणजेच आधार कार्ड पॅनशी लिंक केल्यानंतर तुम्हाला आता 1,000 रुपये दंड भरावा लागेल.

किती जणांना ठोठावला दंड ?

मोफत मुदत संपल्यानंतर २ कोटींहून अधिक करदात्यांनी पॅनला आधारशी लिंक केले. सरकारने त्यांच्याकडून 2,125 कोटी रुपये दंड म्हणून वसूल केले आहेत. आयकर कायदा, 1961 च्या कलम 234H मध्ये तरतूद आहे की एखाद्या व्यक्तीने कलम 139AA च्या उप-कलम (2) अंतर्गत आधारची माहिती द्यावी. तसे न केल्यास त्या व्यक्तीला एक हजार रुपयांपर्यंतचा दंड सरकारला भरावा लागेल.

आधारशी पॅन लिंक कसे कराल ?

  • आयकर वेबसाइटला भेट द्या – eportal.incometax.gov.in किंवा incometaxindiaefiling.gov.in वर क्लीक करा.
  • युजर आयडीच्या जागी पॅन क्रमांक भरून नोंदणी करा.
  • आता पॅनला आधारशी लिंक करण्यासाठी एक पॉप विंडो दिसेल.
  • असे न झाल्यास प्रोफाइल सेटिंगमध्ये जाऊन आधार लिंकवर क्लिक करा.
  • येथे तुम्हाला पॅन कार्ड माहिती जसे की जन्मतारीख, लिंग आणि नाव दिसेल.
  • ही माहिती आधारशी जुळवा. त्यानंतर Link Now बटणावर क्लिक करा.
  • यानंतर, तुमच्या स्क्रीनवर असे लिहिले जाईल की तुमचा पॅन आधारशी लिंक झाला आहे.

नोव्हेंबर महिन्यात सलग सुट्ट्या ; शेअर बाजार आणि बँकांचे आर्थिक व्यवहार ठप्प

bank holiday november

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जागतिक परिस्थिती आणि आर्थिक स्थिती या बाबी लक्षात घेऊनच गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक करावी . त्याचसोबत मार्केटचा परिपूर्ण अभ्यास असणेही महत्वाचे असते. सध्याच्या घडीला शेअर मार्केटमध्ये मोठे चढ उतार पाहण्यास मिळत आहेत. त्यातच या आठवड्यात शेअर बाजार आणि बँकांना तीन दिवस सुट्ट्या असणार आहेत . तरी याबाबतची सर्व माहिती ट्रेडर्स आणि गुंतवणूकदारांना असणे गरजेचं आहे. तर आज आपण कोणत्या दिवशी बँका आणि शेअर बाजाराला सुट्ट्या असतील याची माहिती बघणार आहोत.

सार्वजनिक सुट्टी जाहीर

गुरु नानक जयंतीनिमित्त 15 नोव्हेंबर 2024 रोजी देशभरात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे या दिवशी शेअर बाजार आणि बँका बंद असणार आहेत . त्याचबरोबर 16 नोव्हेंबर रोजी शनिवार असल्यामुळे शेअर मार्केट बंद राहील . 17 नोव्हेंबरला रविवारामुळे बँका आणि शेअर बाजार बंद राहील . 20 तारखेला विधानसभा मतदानामुळे बँकांना सुट्या जाहीर करण्यात आल्या आहेत . म्हणजेच शेअर बाजाराला सलग तीन दिवस 15 नोव्हेंबरपासून 17 नोव्हेंबरपर्यंत सुट्ट्या राहतील तसेच बँकांना 15, 17 आणि 20 ला सुट्टी असणार आहे.

कोणत्या भागातील बँका बंद

शुक्रवारी 15 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र, मिझोरम, मध्य प्रदेश, ओडिशा, उत्तर प्रदेश, चंदिगड, नागालँड, उत्तराखंड, अरुणाचल प्रदेश, हैदराबाद, जम्मू, तेलंगाणा, राजस्थान, पश्चिम बंगाल, नवी दिल्ली, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, आणि श्रीनगर या भागातील बँका बंद राहतील. त्यामुळे या भागातील नागरिकांना आपल्या बँकिंग कामकाजाचे नियोजन 16 नोव्हेंबरनंतर करावे लागणार आहेत. तसेच सुट्ट्याचे दिवस बघून त्याआधी कामे करावीत .