Tuesday, December 30, 2025
Home Blog Page 371

मोदी सरकारचा मोठा निर्णय ! आता ‘या’ लोकांना द्यावा लागणार नाही टोल टॅक्स

toll tax

टोल टॅक्सबाबत मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाने टोल टॅक्सबाबत नवे नियम केले आहेत. आता ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम वापरणाऱ्या खासगी वाहन चालकांना टोल टॅक्स भरावा लागणार नाही. यासोबतच जर टोल रस्त्याचा वापर केल्यास 20 कि.मी. च्या आत केला तर त्यांना कोणताही कर भरावा लागणार नाही. यासोबतच हे नियम संपूर्ण देशात लागू करण्यास सांगितले आहे.

परिवहन मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, महामार्ग आणि द्रुतगती मार्गांवर दररोज 20 किलोमीटरपर्यंत प्रवास करण्यासाठी खाजगी वाहनधारकांना कोणताही कर भरावा लागणार नाही. तथापि, ज्यांच्या वाहनांमध्ये GNSS प्रणाली कार्यरत आहे त्यांना ही सूट मिळेल. तर खासगी वाहनचालकांनी २० किलोमीटरपेक्षा जास्त अंतर कापले, तर प्रत्यक्ष अंतराच्या आधारेच टोल आकारला जाईल.

सरकारने GNSS लागू केले

काही दिवसांपूर्वी रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाने फास्टॅगसह ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टमवर आधारित टोल प्रणाली लागू केली आहे. ही प्रणाली संपूर्ण देशात वापरली जात नसली तरी सध्या, एक सरकारी पथदर्शी प्रकल्प म्हणून, कर्नाटकातील राष्ट्रीय महामार्ग 275 च्या बेंगळुरू-म्हैसूर विभागात आणि हरियाणातील राष्ट्रीय महामार्ग 709 च्या पानिपत-हिसार महामार्गावर लागू करण्यात आला आहे. या अहवालाच्या आधारे सरकार देशातील इतर महामार्गांवरही ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम लागू करणार आहे.

पोस्ट ऑफिसची जबरदस्त RD योजना; 100 रुपयांच्या गुंतवणूकीतून लाखो रुपये कमवण्याची संधी

post rd

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण हळू हळू केलेली छोटी गुंतवणूक भविष्यात मोठी गुंतवणूक ठरू शकते. एखाद्या अडीअडचणीच्या काळात हि गुंतवणूक तुमचा आधार ठरत असते. त्यामुळे योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी केलेली गुंतवणूक दीर्घकाळात फायदेशीर ठरते. याच दृष्टीकोनातून पोस्ट ऑफिसमधील एक विशेष योजना समोर आली आहे, ज्यात दररोज फक्त 100 रुपये गुंतवल्यास पाच वर्षांनंतर तुम्हाला लाखो रुपये मिळतील. तर चला जाणून घेऊया या पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट (आरडी) योजनेबद्दल अधिक माहिती .

पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट (आरडी) योजना

पोस्ट ऑफिसमधील गुंतवणूक देशातील सर्वात सुरक्षित पर्यायांपैकी एक मानली जाते. रिकरिंग डिपॉझिट (RD) ही योजना दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवण्याचा पर्याय देते, ज्यामुळे नियमित बचत सहज शक्य होते. या योजनेचा कालावधी पाच वर्षांचा असून, त्यासाठी दररोज फक्त 100 रुपये जमा केल्यास तुम्हाला पाच वर्षांनंतर मोठी रक्कम मिळेल.

पाच वर्षांमध्ये लाखोंची कमाई

दररोज 100 रुपये जमा केल्यास महिन्याला 3000 रुपये गुंतवले जातात . या प्रमाणे वर्षाला 36000 रुपये जमा होतील आणि पाच वर्षांत एकूण 180000 रुपये जमा होतील. सध्या पोस्ट ऑफिसच्या आरडी योजनेवर 6.7% वार्षिक व्याज दिलं जातं, ज्यामुळे पाच वर्षांनंतर तुम्हाला एकूण 217097 रुपये मिळतील. यामध्ये 180000 रुपये मुद्दल तर 34097 रुपये व्याज म्हणून मिळेल. त्यामुळे तुम्हाला अधिक नफा प्राप्त होतो.

कर्जाचा लाभ घेता येणार

या योजनेचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे आरडी खात्यावर तुम्ही गरजेच्या वेळी कर्ज घेऊ शकता. 12 हप्ते पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला खात्यातील जमा रकमेच्या 50% पर्यंत कर्ज घेता येईल. कर्जाची परतफेड एकदम किंवा हप्त्यांनी करता येते आणि या कर्जावर आरडीच्या व्याजदरापेक्षा 2% जास्त व्याज आकारले जाते. त्याचप्रमाणे जर गरज लागली तर तुम्ही आरडी खाते मुदतीपूर्वी बंद करून पैसे काढू शकता. खाते उघडल्यापासून किमान तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतर हे खाते बंद करण्याचा पर्याय आहे, तसेच मुदत संपण्याच्या एक दिवस आधीही पैसे काढता येऊ शकतात. त्यामुळे हि योजना भविष्यातील अडचणींच्या काळात तुमच्या गरजांसाठी लाखोंची मदत होऊ शकते. कमी गुंतवणुकीतून मोठ्या उत्पन्नाची संधी देणारी ही योजना गुंतवणूकदारांसाठी एक उत्तम पर्याय ठरू शकते.

मोदी सरकारची मोठी भेट ! गृहकर्जावर द्यावं लागणार कमी व्याज, जाणून घ्या इत्यंभूत माहिती

pm awas yojana

स्वतःचे घर असण्याचे स्वप्न पूर्ण करणे सोपे नाही. या महागाईच्या युगात घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेकजण धडपड करीत असतात. यासाठी लोक गृहकर्जाचा अवलंब करतात. तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी सरकारकडून विविध योजना सुरू केल्या जातात. प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभही देशातील सरकार म्हणजेच मोदी सरकारने दिला आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत स्वस्तात घर कसे मिळवायचे ते जाणून घेऊया?

1 कोटी कुटुंबांना मिळणार लाभ

प्रधानमंत्री आवास योजना अर्बन 2.0 अंतर्गत 5 वर्षात 1 कोटी कुटुंबांनी लाभ घेतला आहे. या अंतर्गत, सरकार 1 कोटी शहरी गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना शहरी भागात घरे बांधण्यासाठी, खरेदी करण्यासाठी किंवा भाड्याने देण्यासाठी लाभ देईल. पीएम आवास योजनेंतर्गत 2.30 लाख कोटी रुपयांची सरकारी मदत दिली जाते.

चार प्रकारच्या घटकांचा समावेश

  • आधारित बांधकाम (BLC)
  • भागीदारीत परवडणारी घरे (AHP)
  • परवडणारी भाड्याची घरे (ARH)
  • व्याज अनुदान योजना (ISS)

प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत, पात्र लाभार्थी वर नमूद केलेल्या चार घटकांमधून कोणताही एक घटक निवडू शकतो. व्याज अनुदान योजनेनुसार गृहकर्जावरील व्याज अनुदान मिळते.

व्याज अनुदान योजना काय आहे ?

प्रधानमंत्री आवास योजना नागरी 2.0 मध्ये चार घटकांचा समावेश आहे. त्यापैकी एक व्याज अनुदान योजना आहे, ज्या अंतर्गत गृहकर्जावर सबसिडी मिळेल. उदाहरणार्थ, जर तुमच्या घराची किंमत रु. 35 लाखांपर्यंत असेल, तर रु. 25 लाखांपर्यंतचे गृहकर्ज घेतल्यावर, लाभार्थीला 12 वर्षांच्या कालावधीसाठी पहिल्या 8 लाख रुपयांच्या कर्जावर 4% व्याज अनुदानाचा लाभ मिळेल. वर्षे लाभार्थ्यांना 5 वर्षांच्या कालावधीत हप्त्यांमध्ये पुश बटणाद्वारे 1.80 लाख रुपये अनुदान मिळेल.

कुणाला मिळेल लाभ ?

  • कमकुवत विभाग (EWS)
  • कमी उत्पन्न गट (LIG)
  • मध्यम उत्पन्न गट (MIG)

कसा घेता येईल योजनेचा लाभ ?

तुम्ही घरी बसूनही प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेऊ शकता. तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता. यासाठी तुम्हाला पीएम आवास योजनेच्या (PMAYMIS) अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.

मुलींना येतीये अगदी लहान वयातच मासिक पाळी ; जाणून घ्या कारणे

Early Periods

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल लोकांची जीवनशैली मोठ्या प्रमाणात बदललेली आहे. आणि या बदलत्या जीवनशैलीचा प्रभाव त्यांच्या थेट आरोग्यावर होताना दिसत आहे. या सगळ्याचा मोठा परिणाम हा मुलींच्या मासिक पाळीवर होताना दिसत आहे. ती म्हणजे आजकाल खूप लवकरच मुलींना मासिक पाळी यायला सुरुवात झालेली आहे. अगदी आठ ते नऊ वर्षांमध्ये मुलींना देखील मासिक पाळी सुरू होत आहे. डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे इतक्या लहान वयात मुलींना मासिक पाळी येणे ही अत्यंत चिंतेची बाब आहे. परंतु ही मासिक पाळी लवकर येण्यामागे अनेक कारणं आहेत. ती कारणे जाणून घेणे आणि त्यावर तसे उपाय करणे खूप गरजेचे आहे. आता आपण मासिक पाळी वयाच्या लवकर का येते हे जाणून घेऊया.

वंशाचा प्रभाव

मुलींना जर लहान वयात मासिक पाळी सुरू होत असेल तर हा वंशाचा प्रभाव असू शकतो. जर मुलीच्या आई किंवा आजीला लहान वयातच मासिक पाळी सुरू झाली, तर त्याचा थेट परिणाम पुढच्या पिढीवर होऊ शकतो. आणि मुलींना लवकर पाळी येऊ शकते

वातावरणाचा परिणाम

आजकाल लहान मुलांवर मोठ्या प्रमाणात अभ्यासाचा ताण असतो. तसेच आई-वडिलांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी ते ताण घेतात. घरात बसूनच अभ्यास करतात किंवा घरातील गेम खेळतात. मैदानामध्ये जाऊन खेळणे बंद झाले आहे. शारीरिक हालचाली त्यांच्या कमी झालेल्या आहेत. या सगळ्याचा परिणाम त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर होतो. त्यामुळे मुलींना कमी वयात मासिक पाळी सुरू होते.

पालकांचा प्रभाव

आजकाल अनेक जोडप्यांचे घटस्फोट होण्याचे प्रमाण वाढलेले आहे. आणि याचा परिणाम थेट त्यांच्या मुलांवर होत असतो. याचा परिणाम मुलांच्या मानसिक आरोग्यावर होतो. आणि त्यामुळे त्यांची शारीरिक आरोग्यावर देखील होतो. आणि त्यामुळे मुलींना कमी वयातच मासिक पाळी सुरू होते. त्याचप्रमाणे जर लहान वयात एखाद्या मुलीचे शारीरिक शोषण झाले असेल तरी देख लवकर मासिक पाळी येते. त्याचप्रमाणे तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी देखील तुम्ही मुलींच्या लवकर मासिक पाळी येण्याला कारणीभूत असतात.

त्याचप्रमाणे अनेक मुली आजकाल तासानंतर मोबाईलवर कंटेंट पाहत असतात. या एडल्ट कंटेनचा देखील प्रभाव मुलींवर होत असत. आणि त्यांच्या हार्मोन्समध्ये बदल झाल्याने वेळेच्या आधी त्यांना मासिक पाळी यायला सुरुवात होते.

काय करावं?

मुलींच्या जन्मापासूनच त्यांच्या शारीरिक हालचालींवर पालकांनी लक्ष दिले पाहिजे. त्यांना मानसिक ताण देऊ नये. त्यांना आहारात जास्त सकस अन्न खायला द्यावे. जास्तीत जास्त फळ खायला द्यावी. दूध, दही, पनीर यांसारख्या गोष्टींवर भर द्यावा. जर कमी वयात मासिक पाळी सुरू झाली तर मुलींच्या उंचीवर याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे लहानपणापासूनच त्यांना मैदानी खेळ खेळायला सांगावे.

BKC मेट्रो स्टेशनच्या गेटबाहेर लागली मोठी आग, वाहतूक सेवा तात्पुरती ठप्प

BKC Metro

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईतून आगीची एक मोठी बातमी समोर आली आहे. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) मेट्रो स्टेशनच्या गेटबाहेर अचानक आग लागल्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरली. या घटनेनंतर मेट्रो सेवा तात्पुरती बंद करण्यात आली. अग्निशमन दलाच्या गाड्याही घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) हे मेट्रो स्टेशन मुंबईत आहे, जेथे ए4 प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या बाहेर शुक्रवारी अचानक आग लागली. या घटनेमुळे संपूर्ण स्थानकात धुराचे लोट शिरल्याने प्रवाशांना आग लागल्याचे वाटून त्यांच्यात घबराट पसरली. प्रवाशांची इकडून तिकडे धावपळ सुरू झाली.

एंट्री आणि एक्झिट गेटच्या बाहेर आग लागली

मुंबई मेट्रोच्या म्हणण्यानुसार, बीकेसी स्थानकावरील प्रवासी सेवा तात्पुरत्या स्वरूपात एंट्री आणि एक्झिट गेट्सच्या बाहेर आग लागल्याने तात्पुरती बंद करण्यात आली आहे, त्यामुळे धुराचे लोट स्थानकात घुसले आहेत. अग्निशमन दलाचे पथक आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहे. एमएमआरसी आणि डीएमआरसीचे वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी पोहोचले आहेत.

मेट्रो स्टेशन सेवा तात्पुरती बंद

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मेट्रो स्थानक सेवा बंद करण्यात आली आहे. पर्यायी प्रवासाच्या व्यवस्थेसाठी लोकांनी वांद्रे कॉलनी स्थानकावर जावे, जेथे मेट्रो सेवा सुरू आहे. प्रवाशांच्या गैरसोयीबद्दल मुंबई मेट्रोने खेद व्यक्त केला. त्यांनी प्रवाशांना संयम राखण्याचे आवाहन केले.

महिलांनो व्हा आर्थिक सक्षम ! पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजना ठरतील जबरदस्त फायदेशीर

post office scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महिलांना आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर बनवण्यासाठी पोस्ट ऑफिस विविध योजना घेऊन येत असते. ज्यामुळे त्यांची गुंतवणूक सुरक्षित राहून , त्यातून चांगला नफा प्राप्त होईल . पोस्ट ऑफीसच्या विविध बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणे एक लाभदायक पर्याय ठरू शकतो . या योजनांमध्ये कमी जोखीम असून चांगले व्याजदर मिळते . त्यामुळे महिलांना बँकांच्या तुलनेत पोस्टाच्या योजनांमधून जास्त परतावा मिळवता येतो . तर आज आपण अशा काही योजनांबद्दल माहिती पाहणार आहोत ज्यामुळे महिला आर्थिक स्वावलंबी होऊन चांगला नफा मिळवतील.

सुकन्या समृद्धी बचत योजना

सुकन्या समृद्धी योजना ही कन्येच्या उज्ज्वल भविष्यासाठी तयार करण्यात आली आहे. या योजनेत मुलीच्या वयाच्या 10 वर्षांपूर्वी गुंतवणूक करणे आवश्यक आहे. सध्या या योजनेवर 8.2 % वार्षिक व्याज मिळते. योजनेचा कालावधी 15 वर्षांचा असून कलम 80 सी अंतर्गत कर सवलत देखील मिळते. तरी सुरक्षित गुंतवणुकीसाठी तसेच अधिक व्याजदराची हि योजना फायदेशीर ठरणार आहे.

पोस्ट ऑफीस मासिक उत्पन्न योजना (MIS)

महिलांसाठी ही योजना नियमित मासिक उत्पन्नाचा स्रोत ठरू शकते. या योजनेत किमान 1000 रुपयांची गुंतवणूक करता येते . या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला 7.4% वार्षिक व्याज दरावर मासिक उत्पन्न मिळते.

महिला सन्मान बचत पत्र

ही योजना विशेषतः महिलांसाठी बनवण्यात आली आहे. यात कोणत्याही वयाची महिला गुंतवणूक करू शकते. योजनेत एका खात्यात 2 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते आणि 7.5% व्याज दर मिळतो. 1 वर्षानंतर गुंतवणुकीच्या 40% रक्कम काढण्याची परवानगी असते.

राष्ट्रीय बचत पत्र (NSC)

राष्ट्रीय बचत पत्र ही सुरक्षित आणि दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी उत्तम योजना आहे. या योजनेत किमान 100 रुपयांपासून गुंतवणूक करता येते आणि 5 वर्षांच्या कालावधीसाठी 7.5% व्याज मिळते. परंतु, 1 ऑक्टोबरनंतर नवीन एनएससीमध्ये व्याजदर शून्य करण्यात आले आहेत.

पोस्ट ऑफीस सार्वजनिक भविष्य निधी (PPF)

PPF योजना ही दीर्घकालीन सुरक्षित गुंतवणुकीसाठी एक उत्कृष्ट पर्याय आहे. यात किमान 500 रुपयांपासून गुंतवणूक करता येते. योजनेवर 7.1% वार्षिक व्याज मिळते. दीर्घकालीन निधी वाढवण्याचे आणि कर वाचवण्याचे हे एक उत्तम पर्याय आहे. या सर्व योजनांमध्ये गुंतवणूक करून महिलांना आर्थिक सुरक्षितता मिळण्यासोबतच चांगला नफा देखील मिळतो. महिला या योजनांचा वापर करून आपले भविष्य सुरक्षित आणि आर्थिकदृष्ट्या सशक्त बनवू शकतात.

फ्रिजमध्ये ठेवलेली कोथिंबिर पिवळी पडते ? वापरा सोपी ट्रिक, दीर्घकाळ टिकेलही

kitchen tips

ताजी, टवटवीत, हिरवीगार, रसरशीत कोथिंबीर पहिली की तुम्हाला खरेदी करण्याचा मोह आवरत नसेल. कोथिंबीर स्वयंपाकामधला असा घटक आहे त्याच्याशिवाय स्वयंपाक अपूर्ण आहे असे म्हणायला हरकत नाही. जेवणाची लज्जत वाढवण्यासाठी , गार्निशिंग करता , कोथिंबीर वडी, अशा बऱ्याच पदार्थांमध्ये आपण कोथिंबीर वापरतो. मात्र सध्या कोथिंबीरीचे भावही वाढले आहेत. त्यामुळे बाजारातून आणलेली कोथिंबीर जर नीट स्टोअर केली नाही तर ती लवकर खराब होते. म्हणूनच आजच्या लेखात आम्ही काही खास ट्रिक तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत ज्यामुळे तुमची कोथिंबीर दीर्घकाळ टिकेल. चला तर मग जाणून घेऊया…

कोथिंबिरीतले गुणधर्म

कोथिंबीरच्या पानामध्ये प्रथिने, फायबर, कार्बोहायड्रेट, कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, कॅरोटीन, थायामिन, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सी सारखे घटक असतात.

कोथिंबीर कशी टिकवाल ?

  • बाजारातून कोथिंबीर आणल्यानंतर स्वच्छ पाण्यात ठेवा आणि त्याची मूळ कात्रीने कापून टाका यानंतर ती स्वच्छ पाण्यात टाका आणि त्याची पानं वर फॉइलने बांधा असे केल्याने कोथिंबीर बरेच दिवस ताजी राहते.
  • ज्या पाण्यात आपण कोथिंबिरीची जुडी ठेवणार आहात त्या पाण्यात थोडं व्हिनेगर घाला. यामुळे कोथिंबीर लवकर खराब होणार नाही.
  • जर आपण कोथिंबिरीची जुडी निवडून घेतली असेल तर आपण कपड्यातही गुंडाळून फ्रिज मध्ये ठेवू शकता. यामुळे कोथिंबीर लवकर खराब होणार नाही शिवाय फ्रीजमध्ये ठेवल्याने त्याचा ताजेपणा कायम राहील.
  • याशिवाय आपण निवडलेली कोथिंबीर एका टॉवेलमध्ये गुंडाळून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. यामुळे कोथिंबीर लवकर खराब होत नाही.

सोलापूरहून ‘या’ शहरांसाठी सुरू होणार थेट विमानसेवा ! कसे असेल वेळापत्रक?

solapur

सोलापूरकरांसाठी आता एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. कारण लवकरच सोलापूरकरांना थेट विमानसेवेचा लाभ घेता येणार आहे. सोलापूर विमानतळाहून पुढील दहा दिवसात उड्डाण होण्याची शक्यता वर्तवली जात असून सोलापूरकरांना आता मुंबई आणि गोव्यासाठी हवाई सफर करता येणार आहे. त्यामुळे सोलापूर -मुंबई आणि सोलापूर -गोवा विमान सेवा सुरू होण्यासाठी आता मोठा अडथळा दूर झाला आहे.

होटगी रोड सोलापूर विमानतळावरून फ्लाय 91 एअरलाइन्सची विमानसेवा २० डिसेम्बर 2024 पासून सुरु होणार असून मुंबई आणि गोवा यासारख्या महत्त्वाच्या शहरांसाठी थेट उड्डाण या सेवेअंतर्गत दिली जाणार आहेत. याबाबतची माहिती सोलापूर विकास मंचचे सदस्य विजय जाधव यांच्याकडून एका माध्यमाला देण्यात आली आहे. ही सेवा सुरू करण्यासाठी सोलापूर विकास मंचच्या अथक प्रयत्न आहेत. सोलापूरकरांसाठी ही अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे.

कसे असेल वेळापत्रक

सोलापूर मुंबई विमानसेवा

सकाळी 9:40 वाजता विमान सोलापूरहून उड्डाण घेईल. तर हेच विमान सकाळी 10:40 वाजता मुंबईत पोहोचेल. तर मुंबई सोलापूर विमानसेवा दुपारी 12 : 45 वाजता मुंबईहून सोलापूरकरिता विमान उड्डाण घेईल आणि दुपारी 1:45 वाजता सोलापुरात पोहोचेल.

सोलापूर गोवा विमानसेवा

दुपारी 2:15 मिनिटांनी सोलापुरातून गोव्यासाठी विमान उड्डाण घेईल. आणि दुपारी 3:15मिनिटांनी गोव्यात पोहोचेल तर गोवा ते सोलापूर सेवेसाठी सकाळी 8:10 मिनिटांनी गोव्याहून सोलापूरकरिता विमान उड्डाण करेल आणि सकाळी 9:10 मिनिटांनी सोलापुरात पोहोचेल.

GAIL India मध्ये अधिकारी स्तरावर मोठी भरती, दरमहा 1.5 लाखापेक्षा जास्त पगार, जाणून घ्या

gail india

सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी, GAIL India Limited (GAIL) मध्ये वरिष्ठ अभियंता आणि वरिष्ठ अधिकारी यासह अनेक पदांवर रिक्त जागा आहेत. या भरतीची अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. 12 नोव्हेंबर 2024 पासून gailonline.com या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. GAIL च्या या भरतीसाठी पात्र उमेदवार एका महिन्यासाठी अर्ज करू शकतात. अंतिम तारीख 11 डिसेंबर 2024 ठेवण्यात आली आहे. अर्ज फी भरण्याचीही ही शेवटची तारीख आहे.

रिक्त जागा

भारत सरकारच्या महारत्न कंपन्यांमध्ये गेल इंडियाचा समावेश आहे. ज्यामध्ये विपणन, अभियांत्रिकी, मानव संसाधन, वैद्यकीय सेवा, सुरक्षा यासह विविध विभागांमध्ये वरिष्ठ अभियंता, वरिष्ठ अधिकारी आणि अधिकारी या पदांसाठी ही जागा देण्यात आली आहे. उमेदवार खाली दिलेल्या तक्त्यावरून पोस्टनिहाय रिक्त पदांची संख्या पाहू शकतात. यापैकी सीनियर इंजिनिअर या पदासाठी 98 रिक्त जागा सीनियर ऑफिसर या पदासाठी 130 ऑफिसर या पदासाठी 33 आणि अशा एकूण 261 जागा रिकाम्या आहेत.

पात्रता

GAIL च्या या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी मान्यताप्राप्त महाविद्यालय, संस्था आणि विद्यापीठातून अभियांत्रिकी केमिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि पॉवर/इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन / एलएलबी / एमबीए / किंवा संबंधित क्षेत्रात किमान 65 टक्के गुणांसह बॅचलर पदवी. उमेदवार अधिकृत भरती अधिसूचनेमधून तपशीलवार पात्रता संबंधित माहिती तपासू शकतात.
डाउनलोड करा – GAIL Recruitment 2024 Official Notification Download PDF

वयाची अट

वयोमर्यादा- वरिष्ठ अभियंता आणि वरिष्ठ अधिकारी पदासाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांचे कमाल वय 28 वर्षे असावे. तर अधिकारी (प्रयोगशाळा) या पदासाठी उमेदवारांचे कमाल वय 32 वर्षे, अधिकारी (सुरक्षा) साठी कमाल वय 45 वर्षे आणि अधिकारी (राजभाषा) साठी उच्च वयोमर्यादा 32 वर्षे आहे. अधिकारी (सुरक्षा) साठी कमाल वय 45 वर्षे आणि अधिकारी (राजभाषा) साठी उच्च वयोमर्यादा 35 वर्षे निश्चित करण्यात आली आहे. राखीव प्रवर्गांना उच्च वयोमर्यादेत सवलत दिली जाते.

पगार

वेतन- वरिष्ठ अभियंता आणि वरिष्ठ अधिकारी या पदांसाठीच्या उमेदवारांना दरमहा 60,000-1,80,000 रुपये वेतन दिले जाईल. तर अधिकारी पदासाठी उमेदवारांचे वेतन 50,000-1,60,000 रुपयांच्या दरम्यान असेल.

निवड प्रक्रिया

शॉर्टलिस्टिंग, गट चर्चा, मुलाखत इत्यादी टप्प्यांद्वारे उमेदवारांची निवड केली जाईल.

अर्ज फी

या पदांसाठी अर्ज करताना, अनारक्षित, EWS, OBC EWS (NCL) श्रेणीतील उमेदवारांना 200 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. तर SC, ST, PWBD प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्कात सूट देण्यात आली आहे.