Tuesday, December 30, 2025
Home Blog Page 374

बंद होण्याआधी सरकारच्या ‘या’ योजनेत गुंतवणूक करा; मिळेल उत्तम नफा

mahila sanman yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकार महिलांच्या कल्याणासाठी नेहमी प्रत्नशील असते . त्यांच्यासाठी ते नवनवीन योजना घेऊन येतात . केंद्र सरकारने महिलासाठी सन्मान सेविंग्स सर्टिफिकेट योजना 2023 मध्ये सुरू केली होती . हि येत्या वर्षी बंद होण्याची शक्यता आहे. सरकारने दिलेल्या माहितीनुसार पुढील वर्षी म्हणजेच 2025 च्या मार्चपर्यंत गुंतवणूक करता येणार आहे. याचाच अर्थ कि महिलांकडे गुंतवणुकीसाठी केवळ चार महिने बाकी राहिलेले आहेत. आतापर्यंत या योजनेत सुमारे 30000 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे , ही योजना एफडीपेक्षा जास्त व्याजदर देते असून , ती जोखीममुक्त आहे. त्यामुळे महिलांसाठी ही योजना जास्त आकर्षक ठरत आहे.

फिक्स्ड रिटर्न

महिला सन्मान सेविंग्स सर्टिफिकेट योजनेत गुंतवणुकीवर दरवर्षी 7.5% व्याज मिळते. हे व्याज तिमाही आधारावर मोजले जाते . समजा एखाद्या महिलेने 2 लाख रुपयांची गुंतवणूक केली, तर दोन वर्षांनी तिला एकूण 232044 रुपये परत मिळणार आहेत . या योजनेचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे फिक्स्ड रिटर्न मिळतो आणि शेअर बाजारासारख्या जोखमींचा सामना करावा लागत नाही. त्यामुळे त्यांना अधिक नफा कमवण्याची संधी प्राप्त होते.

आवश्यक पात्रता

या योजनेचे खाते ओपन करण्यासाठी 18 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या कोणत्याही महिला पात्र असून , त्यांना ते खाते उघडता येते . महिलांच्या मुलींसाठी देखील त्यांच्या नावाने खाती उघडता येतील. खाती कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये किंवा ठराविक बँकांमध्ये उघडता येतील. त्यात बँक ऑफ बडोदा, केनरा बँक, बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक आणि युनियन बँक ऑफ इंडिया यांचा समावेश आहे.

योजनेचा कालावधी

तुम्हाला यामध्ये किमान 1000 रुपयांची गुंतवणूक करता येईल . तसेच जास्तीत जास्त 2 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करू शकता. या योजनेचा कालावधी दोन वर्षांचा असून , काही इमर्जन्सी परिस्थितीत खाते उघडल्यानंतर एक वर्षानंतर एकूण रकमेच्या 40% पर्यंत रक्कम काढता येईल. हि योजना 2023 मध्ये सुरू झाल्यानंतर तत्कालीन केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी देखील या योजनेत आपले खाते उघडले होते. महिलांसाठी ही योजना सुरक्षित आणि फायदेशीर आहे. योजना बंद होण्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर महिलांसाठी हा गुंतवणुकीचा उत्तम पर्याय ठरू शकतो. त्यामुळे लवकरात लवकर या योजनेत गुंतवणूक करून महिलांनी या योजनेचा फायदा घ्यावा.

म्हाडाच्या पुणे मंडळाच्या लॉटरीबाबत आली महत्वाची अपडेट ; जाणून घ्या

mhada pune update

परवडणारी घरं देणारी संस्था म्हणून म्हाडा प्रचलित आहे. मुंबई पुण्यासारख्या ठिकाणांमध्ये घरांची किंमत गगनाला भिडली असताना म्हाडा कडून घर घेण्यासाठी गृह खरेदीदारांना दिलासा मिळतो. जर तुम्ही देखील म्हाडाच्या पुणे विभागाकडून अर्ज भरला असेल किंवा भरू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास महामंडळ पुणे, पिंपरी चिंचवड, पीएमआरडीए, सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील विविध गृहनिर्माण योजनेतील 6 हजार 294 घरांच्या विक्रीसाठी आयोजित सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी 10 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

7 जानेवारी ला सोडत

या नवीन वेळापत्रकानुसार पुणे मंडळाच्या कार्यालयात 7 जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता सोडत काढली जाणार आहे. 10 ऑक्टोबर रोजी सोडती साठी ऑनलाईन अर्ज नोंदणी, अर्ज भरणा प्रक्रिया सुरुवात करण्यात आली. नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार तसेच सुविधा मिळावी यासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे गृह खरेदीदारांना दिलासा मिळाला आहे.

नव्या वेळापत्रकानुसार 10 डिसेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत अर्जदारांना ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. तर दहा डिसेंबर रोजी रात्री अकरा वाजून 59 पर्यंत अर्ज करण्यास मुदत वाढ देण्यात आलेली आहे. १२ डिसेंबर रोजी रात्री अकरा वाजून 59 मिनिटांपर्यंत ऑनलाईन अनामत रकमेची स्वीकृती केली जाईल. तसेच 13 डिसेंबर रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेत आरटीजीएस किंवा एनईएफटी द्वारे अनामत रकमेचा भरणा करण्यात येणार आहे.

घरांची विभागणी

  • प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत 2340 घर
  • म्हाडा गृहनिर्माण योजनेअंतर्गत 93 घर
  • प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 418 घर
  • 20% सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत 3312 घर
  • 15% सामाजिक गृहनिर्माण योजनेत 131 घरांचा समावेश आहे.

म्हाडाच्या या योजनेसाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत म्हाडाच्या वेबसाईटवरून सहभाग घ्यावा तसेच इतर योजनांसाठी http://housing.mhada. gov. In या वेबसाईटवरून सहभाग घ्यावा

WhatsApp ने आणले नवे फीचर , चॅटिंग होणार आणखी सोपे, जाणून घ्या

whats app update

जगातील सर्वात लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या WhatsApp मध्ये वापरकर्त्यांच्या सोयी आणि गरजा लक्षात घेऊन दररोज नवीन वैशिष्ट्ये जोडली जातात, जेणेकरून जगभरातील दोन अब्जाहून अधिक वापरकर्ते त्याचा जास्तीत जास्त फायदा घेऊ शकतील. या प्रयत्नात व्हॉट्सॲपने आपल्या लाखो वापरकर्त्यांसाठी एक नवीन फीचर आणले आहे.

मार्क झुकरबर्गने केली नवीन अपडेटची घोषणा

व्हॉट्सॲपच्या मालकीची कंपनी मेटाचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी नवीन ‘कस्टम लिस्ट’ फीचरची घोषणा केली आहे. या फीचरच्या मदतीने, व्हॉट्सॲप वापरकर्ते त्यांचे आवडते संपर्क आणि गट वेगवेगळ्या श्रेणींमध्ये व्यवस्थापित करू शकतील आणि नंतर त्यांचे मित्र, नातेवाईक किंवा इतर महत्त्वाच्या लोकांशी अगदी सहजपणे चॅट करू शकतील. हे फीचर हळूहळू अँड्रॉइड आणि आयओएस वापरकर्त्यांसाठी आणले जात आहे.

सहज मिळणार कॉन्टॅक्ट लिस्ट

  • नवीन कस्टम लिस्ट फीचरचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला आधी व्हॉट्सॲप अपडेट करावे लागेल.
  • यानंतर तुम्हाला चॅट टॅबवर जावे लागेल.
  • येथे चॅट लिस्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला ‘+’ आयकॉनवर क्लिक करावे लागेल.
  • कस्टम लिस्ट फीचरच्या मदतीने तुम्ही वापरकर्त्याची वैयक्तिक यादी तयार करू शकता.
  • आवडत्या लोकांची आणि गटांची यादी देखील स्वतंत्रपणे तयार केली जाऊ शकते.

TISS Mumbai Bharti 2024 | TISS मुंबई अंतर्गत मोठी भरती सुरु; असा करा अर्ज

TISS Mumbai Bharti 2024

TISS Mumbai Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय आनंदाचे आणि महत्त्वाची बातमी आहे. आम्ही नेहमीच तुमच्यासाठी नवनवीन नोकरीच्या संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मुंबई यांच्या अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत “कार्यक्रम कार्यकारी, कार्यक्रम समन्वयक, लेखापाल, उच्च विभाग लिपिक, कार्यक्रम सहाय्यक सह क्षेत्र अधिकारी, क्षेत्र अन्वेषक, कार्यालय सहायक” या पदांच्या रिक्त जागा आहेत. या पदांच्या एकूण 33 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. त्याचप्रमाणे 15 नोव्हेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव |TISS Mumbai Bharti 2024

या भरती अंतर्गत समन्वयक, लेखापाल, उच्च विभाग लिपिक, कार्यक्रम सहाय्यक सह क्षेत्र अधिकारी, क्षेत्र अन्वेषक, कार्यालय सहायक या पदांचा रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

रिक्त पदसंख्या

या भरती अंतर्गत 33 रिक्त जाग्या भरल्या जाणार आहेत.

नोकरीचे ठिकाण

या भरती अंतर्गत निवड झाल्यावर तुम्हाला मुंबई या ठिकाणी नोकरी करावी लागेल.

अर्ज पद्धती |TISS Mumbai Bharti 2024

या भरतीचा अर्ज तुम्ही ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील करू शकता.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

15 नोव्हेंबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

रिक्त पद संख्या

  • कार्यक्रम कार्यकारी – 01
  • कार्यक्रम समन्वयक – 01
  • लेखापाल – 01
  • उच्च विभाग लिपिक – 02
  • कार्यक्रम सहाय्यक सह क्षेत्र अधिकारी – 02
  • क्षेत्र अन्वेषक – 25
  • कार्यालय सहायक -01

अर्ज कसा करावा?

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील अर्ज करू शकता.
  • 15 नोव्हेंबर 2024 ला अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या तारखे अगोदरच अर्ज करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

OnePlus Nord 2T 5G लॉंच ; खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या महत्वाच्या गोष्टी

one plus

स्मार्टफोन सेगमेंटमध्ये, OnePlus ही भारतातील एक सुप्रसिद्ध स्मार्टफोन उत्पादक कंपनी आहे जिचे स्मार्टफोन आजकाल प्रत्येकाला आवडतात. अलीकडेच, कंपनीने एक शक्तिशाली स्मार्टफोन बाजारात आणला आहे. ज्याचे नाव आहे OnePlus 2T 5G चला जाणून घेऊया याचे फीचर्स …

डिस्प्ले

सर्वप्रथम, जर आपण OnePlus 2T 5G स्मार्टफोनच्या डिस्प्लेबद्दल बोललो, तर आम्ही तुम्हाला सांगूया की कंपनीने यामध्ये 6.7 इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले वापरला आहे, ज्यासोबत आम्हाला 120 Hz चा फास्ट रीफ्रेश रेट पाहायला मिळत आहे. यात 1500 nits ची शिखर ब्राइटनेस देखील आहे ज्यासह इतर स्मार्टफोन अधिक योग्य आहेत.

प्रोसेसर

OnePlus 2T 5G स्मार्टफोनच्या प्रोसेसर आणि बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 +G प्रोसेसर मजबूत कामगिरीसाठी वापरण्यात आला आहे. यासोबतच हा स्मार्टफोन Android 14 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. बॅटरीच्या बाबतीत, यात 4500 mAh चा मोठा बॅटरी पॅक वापरण्यात आला आहे आणि वेगवान चार्जर सपोर्ट देखील उपलब्ध आहे.

कॅमेरा, स्टोरेज

OnePlus 2T 5G स्मार्टफोनच्या कॅमेरा आणि स्टोरेजबद्दल बोलायचे झाले तर, यात 108 मेगापिक्सेलचा प्राथमिक कॅमेरा आहे, याशिवाय यात 8 मेगापिक्सेल मायक्रो लेन्ससह 48 मेगापिक्सलचा वाईड अँगल लेन्स आहे. सेल्फीसाठी 64 मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे. स्टोरेज बद्दल बोलायचे झाले तर हा स्मार्टफोन 8GB रॅम 128GB इंटरनल स्टोरेज आणि 12GB RAM 256GB इंटरनल स्टोरेज सह उपलब्ध आहे.

किंमत ?

आजच्या काळात, जर तुम्हाला उत्कृष्ट कॅमेरा गुणवत्ता, कमी किंमत आणि दमदार परफॉर्मन्स असलेला स्मार्टफोन घ्यायचा असेल, तर OnePlus 2T 5G स्मार्टफोन तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरणार आहे, त्याच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, हा स्मार्टफोन बाजारात उपलब्ध आहे. दोन रूपे. ज्याची सुरुवातीची किंमत 28,999 रुपये आहे तर टॉप मॉडेलची किंमत 33,999 रुपये आहे.

Lung Cancer | प्रदुषणामुळे वाढतोय फुफ्फुसाच्या कर्करोगाचा धोका; सुरुवातीला दिसतात ‘ही’ लक्षणे

Lung Cancer

Lung Cancer | आज काल दिल्लीसह संपूर्ण देशामध्ये प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. हवेच्या गुणवत्तेत बदल होताना दिसत आहे. अत्यंत खराब श्रेणीमध्ये हवेची गुणवत्ता येत आहे. त्यामुळे मानवाच्या आरोग्याला देखील मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झालेला आहे. प्रदूषणामुळे अनेक लोकांना आजार होत आहेत.

याबाबत दिल्लीच्या डॉक्टर प्रज्ञा शुक्ला म्हणाल्या की, “दिल्ली एनसीआरमध्ये फुफुसाचा कर्करोग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आणि याचे मुख्य कारण म्हणजे हवेचे प्रदूषण होत आहे. फुफुसाचा कर्करोग हा एक गंभीर आजार आहे. त्याची लक्षणे गंभीर अवस्थेत पोहोचल्यानंतर दिसतात. त्यामुळे जर तुम्हाला सुरुवातीच्या काळातच काही लक्षणे दिसली तर डॉक्टर चे उपचार सुरू करा.

फुफ्फुसाचा कर्करोगाची लक्षणे | Lung Cancer

सतत खोकला येणे

तुम्हाला जर आठवडाभरापेक्षाही जास्त काळ खोकला राहत असेल, तसेच खोकलातून रक्त येत असेल. तर तुम्ही लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण हे एक फुफुसाच्या कर्करोगाचे गंभीर लक्षण आहे.

श्वास घेताना त्रास

ज्यावेळी फुफुसाचा कर्करोग होतो. त्यावेळी रुग्णांना श्वास घेण्यामध्ये मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण होते. अशावेळी छाती, खांदे, पाठ आणि इतर भागात वेदना होतात. हा कर्करोग जर हाडापर्यंत पसरला, तर संपूर्ण शरीरात वेदना होतात.

अचानक वजन घटणे | Lung Cancer

ज्यावेळी फुफुसाचा कर्करोग होतो. त्यावेळी व्यक्तीचे वजन अचानक कमी होते. आणि त्यांची रोगप्रतिकारशक्ती देखील कमी होते. कर्करोग पेशी शरीरातील सर्व ऊर्जा वापरून घेतात. आणि तुमचे वजन झपाट्याने कमी होते.

यापासून कसे वाचाल?

तुम्हाला जर फुफुसाच्या कर्करोगापासून वाचायचे असेल, तर तुम्ही धूम्रपान सोडून द्या. तसेच धुर आणि धूळ असलेल्या ठिकाणी जाणे टाळा. त्याचप्रमाणे प्रदूषित शहरात जाताना मास्क वापरा. घरात एयर प्युरिफायर लावा. स्वच्छ हवेसाठी घराच्या आजूबाजूला झाडे लावा. आणि स्वच्छ ऑक्सिजन घ्या.

क्या बात ! पुढच्या महिन्यात भारतात धावणार पाण्यावर चालणारी ट्रेन ; कसा असेल मार्ग ?

first hydrogen train

भारतीय रेल्वेने 2030 पर्यंत स्वतःला ‘नेट झिरो कार्बन एमिटर’ बनवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यासाठी रेल्वे अनेक नवीन पावले उचलत आहे. यामध्ये हायड्रोजनवर धावणाऱ्या ट्रेनचाही समावेश आहे. पहिली हायड्रोजन ट्रेन लवकरच म्हणजे डिसेम्बर म्हणजे २०२४ मध्ये सुरू होऊ शकते. याआधी, या वर्षाच्या अखेरीस त्याची चाचणी सुरू होईल. ही पहिली हायड्रोजन ट्रेन दिल्ली विभागाच्या 89 किमी लांबीच्या जिंद-सोनीपत मार्गावर धावणार आहे.

रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ‘भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन उत्तर रेल्वेच्या दिल्ली विभागात धावणार आहे. डिसेंबरमध्ये या ट्रेनची चाचणी सुरू होईल.

35 हायड्रोजन ट्रेन चालवण्याची तयारी

पाण्यावर धावणाऱ्या 35 हायड्रोजन ट्रेन भारतात चालवण्याची तयारी सुरू आहे. या हायड्रोजन ट्रेनची किंमत सुमारे 80 कोटी रुपये आहे, अशी माहिती रेल्वेचे पीआरओ दिलीप कुमार यांनी सांगितली आहे. खरं तर, भारतीय रेल्वेने 2030 पर्यंत स्वतःला ‘नेट झिरो कार्बन एमिटर’ बनवण्याचे लक्ष्य ठेवले आहे, हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी रेल्वेने हायड्रोजन ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

यासाठी रेल्वे आणखी अनेक पावले उचलत आहे. यामध्ये पॉवर सेव्हिंग एचओजी तंत्रज्ञानाचा वापर आणि ट्रेनमध्ये एलईडी दिवे, कमी वीज वापरणारी उपकरणे आणि झाडे लावणे यांचा समावेश आहे. याशिवाय रेल्वे स्थानकांवर आणि जमिनीवरही सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत आहेत.

2800 कोटींची तरतूद

हायड्रोजन ट्रेन प्रकल्पावर रेल्वे खूप पैसा खर्च करत आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात 35 हायड्रोजन ट्रेनसाठी 2800 कोटी रुपये ठेवण्यात आले आहेत. तसेच, हेरिटेज मार्गावरील हायड्रोजनशी संबंधित पायाभूत सुविधांसाठी 600 कोटी रुपये स्वतंत्रपणे देण्यात आले आहेत.

याशिवाय डिझेलपासून हायड्रोजनवर धावणारी डेमू ट्रेन चालवण्याचा प्रकल्पही रेल्वेने सुरू केला आहे. यासाठी 111.83 कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले आहे. या प्रकल्पांतर्गत ट्रेनमध्ये हायड्रोजन फ्युएल सेल बसवण्यात येणार आहे. जमिनीच्या पातळीवर आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील.

Jio Recharge Plan | Jio ने आणला सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन; आता 3 महिने रिचार्जच टेन्शन मिटलं

Jio

Jio Recharge Plan | अनेक खाजगी टेलिफोन कंपन्यांनी जुलै महिन्यामध्ये त्यांच्या रिचार्जच्या दरामध्ये वाढ केलेली होती. जीओ, एअरटेल, व्होडाफोन आयडिया या टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या रिचार्जच्या दरात वाढ केलेली आहे. ही वाढ जवळपास 22 टक्क्यांनी केलेली होती. त्यामुळे त्यांचे रिचार्ज प्लॅन्स खूप महाग झाले. आणि त्यानंतर त्यांचे ग्राहक देखील त्यांच्यावर नाराज होऊन अनेक ग्राहकांनी त्यांचे सीम देखील पोर्ट केले होते.

त्यानंतर आता जिओ तसेच इतर खाजगी टेलिकॉम कंपन्या त्यांच्या ग्राहकांना परत आणण्यासाठी आणि खुश करण्यासाठी नवनवीन रिचार्ज प्लॅन लॉन्च करत आहेत. यामध्ये ते ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग इंटरनेट डाटा आणि एसएमएसचा लाभ देत आहेत. जर तुम्ही देखील जिओ युजर असाल आणि तुम्ही 84 दिवसांसाठी एक चांगला स्वस्त प्लॅन शोधत असाल, तर आजची ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत फायद्याची ठरणार आहे. कारण जिओनी 489 रुपयांचा एक प्लॅन लॉन्च केलेला आहे. या प्लॅनमध्ये देशभरातील युजर्सला अनलिमिटेड कॉलिंग तसेच फ्री नॅशनल रोमिंग दररोज 2 जीबी डाटा आणि 100 sms चा लाभ मिळणार आहे.

या रिचार्ज प्लॅन मध्ये जिओच्या ग्राहकांना 84 दिवसांमध्ये एकूण 168 जीबीचा डाटा मिळणार आहे. तसेच तुमच्याकडे 5G स्मार्टफोन असेल, तर तुम्ही जिओच्या प्रोफाईल नेटवर्क मध्ये असाल, तर तुम्ही अनलिमिटेड डेटा वापरू शकता. या प्रीपेड प्लॅनमध्ये तुम्हाला जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ क्लाउड यांचे ॲक्सेस मिळू शकतात.

479 रुपयांचा प्लॅन | Jio Recharge Plan

जिओनी आणखी एक प्रीपेड प्लॅन लॉन्च केला आहे. या प्रीपेड प्लॅनची वैधता देखील 84 दिवसांची आहे. या प्रीपेड प्लॅनसाठी तुम्हाला 479 रुपये खर्च करावे लागतील. यामध्ये देखील तुम्हाला अनलिमिटेड मोफत कॉलिंग, इंटरनेट डाटा तसेच 1000 मोफत एसएमएसचा लाभ मिळणार आहे. यामध्ये तुम्हाला 6 जीबी हाय स्पीड डेटा मिळणार आहे.

ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डचे नियम बदलणार; वैयक्तिक आयुष्यावरही होणार परिणाम

ICICI Credit Card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल क्रेडिट कार्ड वापरण्याचा एक ट्रेंड आलेला आहे. अनेक लोक क्रेडिट कार्ड वापरतात. परंतु आता याच क्रेडिट कार्ड असणाऱ्या लोकांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आम्ही आलेलो आहोत. ती म्हणजे जर तुमच्याकडे आयसीआयसीआय बँकेचे क्रेडिट कार्ड असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत चांगली बातमी आहे. कारण 15 नोव्हेंबर पासून क्रेडिट कार्ड संबंधित अनेक नियम बदलणार आहे. आणि त्याचा परिणाम तुमच्या वैयक्तिक आयुष्यभर देखील होणार आहे. या बदलणाऱ्या नियमांमध्ये विमानतळ लाउंज प्रवेशापासून ते युटिलिटी व्यवहार आणि रिवॉर्ड पॉइंट पर्यंत अनेक गोष्टींचा समावेश आहे.

येत्या दोन दिवसात म्हणजेच 15 नोव्हेंबर पासून आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये बदल होणार आहे. आणि या बदललेल्या नियमांमुळे आता रिवॉर्ड पॉइंट्स ट्रांजेक्शन फीवर यांच्यावर परिणाम होणार आहे. या बदलणाऱ्या नियमांपैकी आता icici बँकेच्या क्रेडिट कार्डधारकांना विमानतळावरील लाऊंजमध्ये मोफत प्रवेशासाठी त्यांच्या कार्ड मधून 75 हजार रुपये खर्च करावे लागणार आहे. यापूर्वी ही रक्कम केवळ 35 हजार रुपये एवढी होती.

त्याचप्रमाणे आयसीआयसीआय बँकेने क्रेडिट कार्डधारकांसाठी इंधन अधिभार माफीचा नियम बदलण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आता क्रेडिट कार्ड पोर्टफोलिओ साठी दर महिना 50 हजार रुपयांपर्यंतच्या व्यवहारांवर बँकेकडून इंधन अधिकार मोफत असणार आहे. ही मर्यादा प्रति महिना 1 लाख रुपये एवढी असणार आहे.

युटिलिटी व्यापाराअंतर्गत तुम्ही प्रीमियम क्रेडिट कार्डवर 80 हजार रुपयांपर्यंतचा मासिक खर्च आणि या मर्यादेपर्यंतच्या विमा पेमेंटवर रिवॉर्ड पॉईंट देखील मिळवू शकता. तसेच इतर कार्डसाठी ही मर्यादा मासिक खर्च 40 हजार रुपयांपर्यंतच्या विमा पेमेंटची असेल. ज्यामध्ये तुम्हाला अनेक रिवॉर्ड पॉइंट देखील मिळतील. त्याचप्रमाणे प्रीमियम क्रेडिट कार्ड धारक किराणा मालावर 40000 रुपयांपर्यंत मासिक खर्चावर रिवॉर्ड पॉइंट मिळू शकतात. आयसीआयसीआय बँकेच्या नवीन नियमानुसार आता बँकेने सप्लीमेंट्री कार्ड धारकांवर 199 रुपये वार्षिक शुल्क लागू केलेले आहे.

Air India Express | विमानाने प्रवास करण्याचे स्वप्न होणार स्वस्तात पूर्ण; एअर इंडियाने आणली स्पेशल ऑफर

Air India Express

Air India Express | प्रत्येक सामान्य माणसाची एक ड्रीम लिस्ट असते. आणि यामध्ये आयुष्यात एकदा तरी विमानाने प्रवास करावा, असे प्रत्येकाला वाटत असते. परंतु तिकिटाचे दर एवढे असतात की, सर्वसामान्य माणसांना त्यांचा खर्च भागवून विमानाने प्रवास करणे शक्य होत नाही. परंतु आता तुमचे हे स्वप्न कमी खर्चात देखील लवकरच पूर्ण होऊ शकते. कारण आता इयर इंडिया एक्सप्रेसने एक नवीन ऑफर आणलेली आहे. ज्याद्वारे तुम्ही कमी खर्चात विमानाने प्रवास करू शकता. एअर इंडिया एक्सप्रेसने (Air India Express) त्यांच्या फ्लॅश सेलची घोषणा केली आहे. या सेलमध्ये तुम्ही अत्यंत स्वस्त दरांमध्ये विमान प्रवास करू शकता. या सेलमध्ये तुम्ही केवळ 1444 रुपयांपासून प्रवास करू शकता. तुम्ही जर कधीही विमानाने प्रवास केला नसेल आणि विमानाने प्रवास करण्याची तुमची इच्छा असेल, तर तुम्ही या सेलचा नक्कीच फायदा घ्या.

एअर इंडिया एक्स्प्रेसची ‘फ्लॅश सेल’ ऑफर | Air India Express

एअर इंडिया एक्सप्रेसने फ्लॅश सेल चालू केलेला आहे. या सेलमध्ये एक्सप्रेस लाईटचा प्रवास खर्च हा 1444 रुपयांपासून सुरू होत आहे. तर एक्सप्रेस व्हॅल्यू फेअरची सुरुवातीची किंमत 1599 रुपये एवढी आहे. ही संधी अगदी मर्यादित काळासाठी उपलब्ध आहे. तुम्ही या संधीचा फायदा केवळ 13 नोव्हेंबरपर्यंत घेऊ शकता. म्हणजे तुम्ही बुकिंग करू शकता. एअर इंडिया एक्सप्रेस तुम्हाला स्वस्त दरामध्ये विमान प्रवास येत असेल, तुम्ही 13 नोव्हेंबर 2024 पर्यंत या फ्लॅश सेलसाठी बुकिंग चालू करू शकता. तर 19 नोव्हेंबर 2024 ते 30 एप्रिल 2025 दरम्यान तुम्ही फ्लाईटने प्रवास करू शकता.

एक्सप्रेस लाइटचे तिकीट दर

एफ लाईट ची किंमत 1444 रुपयांपासून सुरू होते. यामध्ये तुम्हाला तीन किलो केबिन बॅगेज मोफत मिळणार आहे. अत्यंत कमी पैशांमध्ये तुम्ही हा प्रवास करू शकता. त्यामुळे तुम्ही या संधीचा लवकर फायदा घ्या.

एक्सप्रेस बिझ तिकीट दर | Air India Express

जर तुम्हाला बिजनेस क्लासमधून प्रवास करायचा असेल तर इयर इंडियाने एक्सप्रेसबीजवर 25% सूट दिलेली आहे. बिजनेस क्लासने प्रवास करून तुम्ही तुमचे हे एक स्वप्न साकार करू शकता.