Tuesday, December 30, 2025
Home Blog Page 375

अशाप्रकारे सुरु करू शकतो आधार कार्ड सेंटर; ‘या’ ठिकाणी करा अर्ज

Adhar Card center

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आज-काल आधार कार्ड सेंटरचा उद्योग मोठ्या प्रमाणात चालत आहे. अनेक शासकीय कागदपत्र काढण्यासाठी आधार कार्ड सेंटरला लोक भेट देत असतात. जर तुम्ही देखील आधार सेंटर सुरू करण्याचा विचार करत असा, तर आज आम्ही तुम्हाला आधार सेंटर कसे उभे करायचे? त्यासाठी किती खर्च येईल,? याबद्दलची सविस्तर माहिती आम्ही सांगणार आहोत.

आधार सेंटर चालू करण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड सेंटरची फ्रेंचाईची विकत घ्यावी लागते. त्यासाठी तुम्हाला एक परीक्षा देखील द्यावी लागते. ही परीक्षा पास झाल्यानंतरच तुम्हाला आधार सेंटर चालू करता येईल. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाकडून ही परीक्षा आयोजित केली जाते. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्हाला आधार सर्विस सेंटर सुरू करण्यासाठी लायसन देण्यात येते. याद्वारे तुम्हाला आधार एनरोलमेंट आणि बायोमेट्रिक पडताळणी करण्याची मान्यता मिळते.

या स्टेप्स करा फॉलो

  • सर्वात आधी तुम्हाला https://uidai.nseitexams.com/UIDAI/LoginAction_input.action या वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
  • त्यानंतर Create New User या बटणावरवर क्लिक करा. तिथं तुम्हाला कोड शेअर करण्यास सांगितलं जाईल.
  • Share Code साठी https://resident.uidai.gov.in/offline-kyc या लिंकवर जाऊन ऑफलाइन ई-आधार डाऊनलोड करा.
  • त्यानंतर तुम्हाला XML File आणि Share Code मिळेल.
  • त्यानंतर अर्ज दाखल करण्याची माहिती तुम्हाला त्या फॉर्ममध्ये भरावी लागेल.
  • नंतर तुमचा फोन नंबर ईमेल आयडी आणि पासवर्ड येईल.
  • तुम्ही युजर आयडी आणि पासवर्डच्या माध्यमातून आधार टेस्टिंग अँड सर्टिफिकेशन या पोर्टलवर लॉगिन करा.
  • त्यानंतर एक फॉर्म येतो फॉर्म भरा आणि त्यानंतर तुमचा फोटो आणि तुमची डिजिटल सही अपलोड करा.
  • नंतर Proceed to submit form पर्यायवर क्लिक करा. शेवटी तुम्हाला शुल्क भरावं लागेल.
  • सेंटर बुक करण्याची प्रक्रिया केल्यानंतर तुम्हाला दोन दिवस वाट पाहावी लागेल.
  • त्यानंतर तुम्ही त्या वेबसाईटला लॉग इन करा आणि बुक सेंटर या पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर तुम्ही तुमच्या जवळचं कोणतेही सेंटर निवडा आणि परीक्षेची वेळ आणि तारीख निवडा.
  • ऍडमिट कार्ड डाउनलोड करा आणि ठरलेल्या दिवशी परीक्षेच्या सेंटरवर जा.

पेपर पास झाल्यावर काय करायचं?

तुम्ही ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर तुम्हाला आधार कार्ड सेंटर सुरू करण्याची परवानगी मिळते. आणि आधार कार्ड संबंधित कामकाज सुरू होते. ही फ्रेंचायजी तुम्हाला मोफत मिळते. मात्र सेंटरचा सेटअप उभा करण्यासाठी तुम्हाला इतर गोष्टी स्वतः कराव्या लागेल. जसं की तुमचे असणारे ऑफिस, संगणक, इंटरनेट या सगळ्याची व्यवस्था तुम्हाला करावी लागेल.

घरी आणा Maruti Dzire 2024 चे बेस व्हेरिएंट LXI, किती भरावा लागेल EMI?

maruti Dzire 2024

Dzire 2024 मारुतीने 11 नोव्हेंबर 2024 रोजी भारतीय बाजारात लॉन्च केले आहे. कॉम्पॅक्ट सेडान कार सेगमेंटमध्ये नवीन पिढीची डिझायर ऑफर करण्यात आली आहे. जर तुम्ही या SUV चे बेस व्हेरिएंट LXI घरी आणण्याचा विचार करत असाल, तर 2 लाख रुपयांचे डाउन पेमेंट केल्यानंतर, दरमहा किती रुपयांची EMI भरून ते घरी आणता येईल. चला जाणून घेऊया …


Maruti Dzire 2024 LXI Price

Dzire 2024 चे बेस व्हेरियंट म्हणून मारुतीने LXI ऑफर केले आहे. कंपनी या सेडान कारचे बेस व्हेरिएंट 6.79 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत विक्रीसाठी उपलब्ध करून देत आहे. जर ते दिल्लीत खरेदी केले असेल तर, 6.79 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीसह, तुम्हाला त्यावर नोंदणी कर आणि आरटीओ देखील भरावा लागेल. ही कार खरेदी करण्यासाठी तुम्हाला आरटीओसाठी 47530 रुपये आणि विम्यासाठी 37744 रुपये द्यावे लागतील. यानंतर दिल्लीत वाहनाची ऑन रोड किंमत ७६४२७४ रुपये होईल.

2 लाखांच्या डाउन पेमेंटनंतर किती EMI

तुम्ही Maruti Dzire 2024 चे बेस व्हेरिएंट LXI विकत घेतल्यास, बँकेकडून फक्त एक्स-शोरूम किंमतीवर वित्तपुरवठा केला जाईल. अशा परिस्थितीत, 2 लाख रुपयांचे डाउन पेमेंट केल्यानंतर, तुम्हाला सुमारे 564274 रुपयांची रक्कम बँकेकडून फायनान्स करावी लागेल.बँकेने तुम्हाला सात वर्षांसाठी नऊ टक्के व्याजासह ५६४२७४ रुपये दिले, तर तुम्हाला पुढील सात वर्षे दरमहा केवळ ९२३९ रुपयांचा ईएमआय भरावा लागेल.

कारची किंमत किती असेल?

जर तुम्ही बँकेकडून 564274 रुपयांचे कार कर्ज सात वर्षांसाठी नऊ टक्के व्याजदराने घेतले तर तुम्हाला सात वर्षांसाठी दरमहा 9239 रुपयांचा ईएमआय भरावा लागेल. अशा परिस्थितीत, सात वर्षांमध्ये तुम्हाला मारुती डिझायर 2024 च्या LXI प्रकारासाठी सुमारे 2.01 लाख रुपये व्याज द्यावे लागेल. त्यानंतर तुमच्या कारची एक्स-शोरूम, ऑन-रोड आणि व्याजासह एकूण किंमत सुमारे 9.76 लाख रुपये असेल.

कोणाशी स्पर्धा ?

मारुतीने कॉम्पॅक्ट सेडान कार सेगमेंटमध्ये नवीन जनरेशन डिझायर आणली आहे. या सेगमेंटमध्ये, या गाडीची थेट स्पर्धा Hyundai Aura, Honda Amaze, Tata Tigor यांसारख्या कॉम्पॅक्ट सेडान कारशी आहे. याशिवाय काही प्रीमियम हॅचबॅक कार्सकडून किमतीच्या बाबतीतही आव्हान आहे.

Ration Card | रेशन कार्डधारकांसाठी सरकारने लाँच केले नवीन अँप, मिळणार ‘हे’ फायदे

Ration Card

Ration Card | सरकारने देशातील गोरगरीब जनतेसाठी अनेक योजना आणलेल्या आहेत. त्याचा फायदा सगळ्याच नागरिकांना होत आहे. त्यातील एक सगळ्यात मोठी आणि हितकारी योजना म्हणजे रेशन कार्ड (Ration Card) योजना. या योजनेमुळे देशातील गरिबांना रेशन कार्ड अंतर्गत अन्नधान्य मिळते. तसेच आरोग्य उपचार देखील मिळत असतात. अशातच आता केंद्र सरकारने रेशन कार्ड धारकांसाठी एक मोठा निर्णय घेतलेला आहे. तो म्हणजे आता रेशन संबंधित तुम्हाला कोणतीही तक्रार असेल, तर त्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी सरकारने एक नवीन ॲप लॉन्च केलेला आहे. या ॲपचे नाव रेशन न्यू ॲप असे आहे. या ॲपद्वारे सरकार जवळपास 80 कोटी लोकांना रेशनचे वाटप करत असते याची माहिती आहे. परंतु तुम्हाला रेशनबाबत कोणतीही तक्रारी असेल तर तुम्ही या ॲपवर तक्रार करू शकता.

सरकारने वन नेशन वन रेशन कार्ड ही योजना अत्यंत महत्त्वाकांशी दृष्टीने सुरू केलेली आहे. या योजनेचा उद्देश हा देशातील स्थलांतरित कामगारांसाठी अन्न सुरक्षितता निश्चित करणे तसेच अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागामार्फत राबवण्याची राबवण्यात येणारी, ही योजना राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदे अंतर्गत देशभरात शिधापत्रिका परवानगी देते.

या शिधापत्रिकाधारकांना आता त्यांच्या अन्न हक्काचा देशातून कुठूनही लाभ घेता येणार आहे. सर्व 36 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या या योजनेमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. सरकारनेही वन नेशन वन रेशन कार्ड योजना 2019 मध्ये सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत देशातील नागरिकांना अन्नधान्य मिळत असते. यासाठी आता रेशन कार्डला आधार कार्ड क्रमांक लिंक करणे देखील खूप गरजेचे आहे.

आता रेशन कार्ड द्वारे (Ration Card) जे रेशन घेतात, त्यांच्यासाठी 1 नोव्हेंबर पासून नियम बदल करण्यात आलेले आहेत. यानुसार जर तुम्ही तुमचे इ केवायसी केलेले नसेल, तर तुम्हाला रेशनवरील धान्य मिळणार नाही. त्यामुळे केवायसी करणे खूप गरजेचे आहे. तुम्ही जर अजूनही की ई केवासी केले नसेल, तर लवकरात लवकर करून घ्या. कारण 31 डिसेंबर ही केवायसी करण्याची शेवटची तारीख आहे. अन्यथा तुम्हाला इथून पुढे अन्नधान्याचा लाभ घेता येणार नाही.

कोकणरेल्वेच्या प्रवाशांसाठी आनंदवार्ता ! ‘या’ तारखेपासून सुरु होणार नवी एक्सप्रेस ट्रेन

konkan railway

देशात सार्वजनिक वाहतुकीमध्ये रेल्वेचा मोठा वाटा आहे. दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करीत असतात. ज्या मार्गावर रेल्वे नाही तिथे सुद्धा आता रेल्वे ट्रॅक आणण्याचा प्रयत्न केला जातो आहे. महाराष्ट्रात सुद्धा रेल्वेचे प्रवासी अधिक आहेत. कोकण रेल्वेचा सुद्धा मोठा वाटा महाराष्ट्रातील सार्वजनिक वाहतूक सेवेमध्ये आहे. कोकण रेल्वेच्या बाबतीत रेल्वे विभागामार्फत एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेने कोकण रेल्वे मार्गावर होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर एक नवीन एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतलाय.

सावंतवाडी ते पनवेल रेल्वे

मध्य रेल्वे सावंतवाडी ते पनवेल यादरम्यान ही गाडी चालवणार आहे. ही स्पेशल ट्रेन १२ नोव्हेंबरला धावणार आहे आणि परतीच्या प्रवासात ही गाडी १३ नोव्हेंबरला चालवली जाणार अशी माहिती हाती आली आहे.यामुळे या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नक्कीच मोठा दिलासा मिळणार आहे. या गाडीमुळे प्रवाशांचे अतिरिक्त गर्दी नियंत्रणात राहण्यास मदत होणार आहे.

कसे असेल वेळापत्रक ?

सावंतवाडी-पनवेल साप्ताहिक स्पेशल ट्रेन सावंतवाडी येथून रात्री ११.२५ वाजता सोडली जाणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ८.४० वाजता पनवेल येथे पोहोचणार आहे. ही गाडी परतीच्या प्रवासात पनवेल येथून सकाळी ९.४० वाजता सोडली जाणार आहे अन त्याच रात्री ८ वाजून ५ मिनिटांनी सावंतवाडी येथे पोहोचणार आहे.

‘या’ स्थानकांवर घेणार थांबे

मिळालेल्या माहितीनुसार ही विशेष रेल्वे २० एलएचबी डब्यांची असून कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, राजापूर, रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण, खेड, रोहा या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे.

सलग पाचव्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण ; पहा काय आहेत आजचे दर ?

gold rate 13-11-24

ऐन लग्नसराई तोंडावर आली असताना सोने खरेदीदारांसाठी आता दिलासादायक बातमी आहे. कारण सोन्याच्या दरामध्ये सलग पाचव्या दिवशी दिनांक 13 नोव्हेंबर रोजी घसरण झाली आहे. बुधवारी राजधानी दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव कमी होऊन 77,430 रुपये प्रति दहा ग्रॅम वर आलाय तर मुंबईमध्ये 77 हजार 280 रुपये प्रति दहा ग्रॅम वर आला आहे. चला जाणून घेऊया सोन्याच्या दारात किती झाली आहे घसरण?

चांदी दर

चांदीच्या दराबद्दल बोलायचं झालं तर 13 नोव्हेंबर रोजी चांदीच्या दरात सुद्धा घसरण झाली असून 90 हजार 900 रुपये प्रति किलोग्राम वर चांदी आली आहे. 12 नोव्हेंबरला आशियाई बाजारात कॉमेक्स चांदी वायदा 0.6% घसरला आणि 30.43 डॉलर प्रती औस वर ट्रेंड करत होता. तर दिल्ली सराफा बाजारात चांदीची किंमत 2700 रुपयांनी घसरली असून 91,300 रुपये प्रति किलोग्राम वर राहिली.

22 कॅरेट

आज 22 कॅरेट एक ग्रॅम सोनं तुम्हाला घ्यायचं असेल तर सात हजार 45 रुपये मोजावे लागतील. काल दिनांक १२ नोव्हेंबर रोजी 22 कॅरेट सोन्याचा दर 785 रुपये इतका होता. आज सोन्याच्या दरामध्ये चाळीस रुपयांची घसरण झाली आहे. तर 22 कॅरेट 10 तोळे सोने खरेदी करण्यासाठी 70,450 रुपये तुम्हाला मोजावे लागतील आज दहा ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याच्या दरामध्ये चारशे रुपयांची घसरण झाली आहे.

24 कॅरेट

दुसरीकडे एक ग्राम 24 कॅरेट सोन्याचा आजचा दर 7685 रुपये इतका आहे हा दर काल 729 रुपये इतका होता आज 24 कॅरेट एक ग्रॅम सोन्याच्या दारात 44 रुपयांची घसरण झाली आहे. तर आज दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 76,850 रुपये इतका आहे. दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याच्या दरात आज 440 रुपयांची घसरण झाली आहे.

BJP Menifesto | भारतीय जनता पक्षाने सादर केला जाहीरनामा; शेतकऱ्यांसाठी विविध योजनांची तरतूद

BJP Menifesto

BJP Menifesto | राज्यातील विधानसभा निवडणुका अगदी काही दिवसांवर आलेल्या आहेत. आणि या काळामध्ये सगळेच राजकीय पक्ष त्यांच्या प्रचारांमध्ये व्यस्त आहेत. तसेच अनेक पक्षांनी त्यांचा निवडणुकीचा जाहीरनामा देखील सादर केला आहे. अशातच आता भारतीय जनता पार्टीने देखील त्यांचा जाहीरनामा सादर केलेला आहे. या जाहीरनाम्यानमध्ये त्यांनी अनेक विविध घोषणा केलेल्या आहेत. तळागाळातील प्रत्येक माणसाचा, त्यांच्या प्रगतीचा विचार करून भाजपने हा जाहीरनामा (BJP Menifesto) सादर केलेला आहे. यामध्ये गोरगरिबांसाठी अनेक कल्याणकारी योजनांची हमी देखील त्यांनी दिलेली आहे. आता या जाहीरनामात नक्की कोणत्या घोषणा केलेल्या आहेत? हे आज आपण जाणून घेणार आहोत.

लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार | BJP Menifesto

जुलै महिन्यामध्ये महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत त्यांनी राज्यातील पात्र असणाऱ्या महिलांना दर महिना 1500 रुपये द्यायला सुरुवात केली होती. परंतु आता याच लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार असल्याचे आश्वासन भाजपकडून करण्यात आलेले आहेत. म्हणजेच वर्षाला जवळपास 25 हजार रुपये प्रत्येक महिलेच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. यासोबतच भाजपने पीएम किसान सन्मान योजना अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला दर वर्षाला 15000 रुपये देण्याचे देखील आश्वासन दिले आहे. तसेच वृद्ध पेन्शन धारकांना दर महिन्याला 2100 रुपये देणार आहे. आणि म्हणजेच ही रक्कम दरवर्षी 25 हजार रुपये होणार आहे. तसेच जीवनावश्यक वस्तूंचे दर देखील स्थिर ठेवण्यात येणार असल्याची त्यांनी सांगितलेले आहे.

भाजपने दिलेल्या या जाहीरनाम्यामध्ये दहा लाख विद्यार्थ्यांना दर महिन्याला 10 हजार रुपये शिक्षणासाठी देण्याचे सांगितलेले आहे. तसेच ग्रामीण भागातील विकासाला चालना देण्यासाठी 45 हजार गावांमध्ये पांदन रस्ते बांधणार असल्याचे देखील त्यांनी निवडून जाहीरनाम्यात सांगितलेले आहे .

आशा आणि अंगणवाडी सेविकांसाठी योजना

ग्रामीण भागांमध्ये ज्या आशा आणि अंगणवाडी सेविका काम करतात. त्यांना दर महिन्याला 15 हजार रुपये मानधन देणार असल्याचे देखील भाजपने जाहीरनाम्यात सांगितलेले आहे. तसेच शेतकऱ्यांच्या कृषी वीज पंपाचे बिल शून्य रुपये या आधीच केले होते .परंतु आता भविष्यात जाऊन 30 टक्के कपात होणार असून सौर उर्जेवर जास्त भर देण्याचे भाजपने सांगितलेले आहे. निवडणूक संपल्यानंतर 100 दिवसात व्हिजन महाराष्ट्र 2029 सादर करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितलेले आहे.

सोयाबीनला 6000 रुपये हमीभाव

शेतीसाठी जी आवश्यक खते लागतात, त्यावरील राज्य आणि वस्तू सेवा कर यामध्ये पूर्णपणे सवलत देण्याचे भाजपने सांगितलेले आहे. त्याचप्रमाणे सोयाबीनला प्रत्येक क्विंटल 6 हजार रुपये हमीभाव देण्याचे आश्वासन देखील भाजपकडून देण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे पुढील तीन वर्षात 50 लाख महिलांना ते लखपती दिदी बनवणार आहेत. यासाठी 500 बचत गटांकरता 1000 कोटींचा फिरता निधी तयार करून देणार आहे. त्याचप्रमाणे अक्षय अन्न योजनेच्या माध्यमातून गोरगरिबांना मोफत अन्नधान्य देण्याचे देखील आश्वासन दिलेले आहे. सर्व शासकीय शाळांना त्या रोबोटिक आणि आर्टिफिशल इंटेलिजन्सचे प्रशिक्षण देखील देणार आहे.

दहा लाख उद्योजक घडवणार | BJP Menifesto

महाराष्ट्रातील कौशल्य जनगणना उद्योगांच्या गरजेनुसार कुशल मनुष्यबळ निर्मिती करण्याचे आश्वासन देखील भाजपने दिलेले आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज आकांक्षा केंद्र स्थापन करणार आहेत. आणि दहा लाख उद्योजक घडवणार आहे.

युवक आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा

भाजपने युवकांसाठी स्वामी विवेकानंद युवा स्वास्थ कार्ड आणि वार्षिक आरोग्य तपासणी त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील गौरवशाली किल्ल्यांचे संवर्धन करून, त्याचे जतन करण्याच्या आश्वासन दिलेले आहे. जेष्ठ नागरिकांसाठी त्यांनी प्राधान्य धोरण, आधार सक्षम सेवा त्याचप्रमाणे शासकीय रुग्णालयांमध्ये स्वतंत्र बाह्य रुग्णांनी सेवा देण्याचे आश्वासन देखील दिलेले आहे.

धर्मांतराला आळा

भाजपने त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये शक्तीचे धर्मांतर करण्या विरोधात कायदा करणार असल्याचे सांगितलेले आहे. तसेच फसव्या धर्मांतराला आळा घालण्यात येणार आहे. यासाठी अनेक कायदे बनवले जाणार आहेत. हे देखील त्यांच्या जाहीरनाम्यात सांगितलेले आहेत. त्याचप्रमाणे आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे मानव आणि वनजीव संघर्ष टाळणार असल्याचे देखील त्यांनी सांगितलेले आहे.

Post Office | पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना; महिना 1500 भरून मिळवा 4 लाख रुपये

Post Office

Post Office | आपल्या भविष्याचा आणि महागाईचा विचार करता आपण आपल्या उत्पन्नातील काही भाग भविष्यासाठी गुंतवून ठेवणे, खूप गरजेचे आहे. कारण आपल्याला पुढे भविष्यात जाऊन कोणतीही आर्थिक अडचण आल्यानंतर आपल्याकडे तेवढा आर्थिक फंड जमा असावा. त्यामुळे आत्तापासूनच थोडेफार आर्थिक गुंतवणूक करणे खूप गरजेचे आहे. तुम्ही अगदी लहान गुंतवणुकीपासून देखील सुरुवात करू शकता. अनेक लोकांना आता गुंतवणुकीचे महत्त्व पटलेले आहेत. त्यामुळे ते त्यांच्या मासिक पगारातून काही भाग हा भविष्यासाठी गुंतवून ठेवत असतात. बाजारात अशा अनेक योजना आहेत. त्यामध्ये तुम्हाला गुंतवणूक करता येते. परंतु याच गोष्टीचा फायदा घेत अनेक लोक फ्रॉड देखील करतात. आणि लोकांचे पैसे वाया जातात. यामुळेच तुम्ही योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे खूप गरजेचे आहे.

या गुंतवणुकीसाठी सरकारने देखील अनेक योजना आणलेल्या आहेत. अशा वेळी जर तुम्ही सरकारी योजनांमध्ये पैसे गुंतवले तर त्याबाबत सुरक्षिततेची हमी आपल्याला मिळते. आणि भविष्यात जाऊन चांगला परतावा देखील मिळतो. आज देखील आम्ही तुम्हाला अशाच एका सरकारी योजनेबद्दल सांगणार आहोत. ज्याचा तुम्हाला भविष्यात जाऊन खूप चांगला फायदा होईल.

सरकारच्या या योजनेचे नाव पोस्ट ऑफिस (Post Office) पब्लिक प्रॉव्हिडंट फंड असे आहे. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हा गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय आहे. यामध्ये तुम्हाला परतावा चांगला मिळतो. आणि कर लाभ देखील मिळतो. तुम्ही अगदी छोट्यात छोटी गुंतवणूक करून देखील हा फंड चालू करू शकता. सरकारच्या या पोस्ट ऑफिस पब्लिक प्रोव्हीडेंट फंड योजनेवर तुम्हाला दर वर्षाला 7.1% व्याज मिळते. तसेच सरकारी दरची माहिती सुधारित होते. तसेच चक्रवाढ व्याजाचा देखील तुम्हाला फायदा होतो. आणि तुम्हाला चांगला परतावा मिळतो.

या पीपीएफ खात्यामध्ये तुम्ही दर वर्षाला कमीत कमी 500 आणि जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये जमा करू शकता. जर तुम्ही दर महिन्याला 1500 रुपये जमा केले, आणि 15 वर्षे सतत जमा केले, तर मॅच्युरिटी नंतर तुम्हाला एकूण 4 लाख 73 हजार रुपये मिळू शकतात.

गुंतवणुकीचा कालावधी आणि मर्यादा | Post Office

या सरकारी योजनेचा मूळ कालावधी हा 15 वर्षाचा आहे. परंतु तो तुम्ही 5 वर्षाच्या ब्लॉकमध्ये देखील वाढवू शकतात. तुम्ही पीपीएफ खात्यातून 3 वर्ष पूर्ण झाल्यानंतर कर्ज देखील घेऊ शकता. तसेच 7 वर्षानंतर 80 पैसे देखील काढू शकता. म्हणजेच तुम्हाला गरजेच्या वेळी तुमचे गुंतवलेले पैसे वापरता देखील येतात. यासाठी तुम्ही पोस्ट ऑफिस किंवा सरकारी बँकेत जाऊन पीपीएफ खाते उघडू शकता. यासाठी तुम्हाला आधार, कार्ड पॅन कार्ड आणि पासपोर्ट आकाराचा फोटो आवश्यक आहे. पीपीएफ मधून मिळणारे व्याज गुंतवणूक आणि परिपक्वता रक्कम हे पूर्णपणे खरं असते. त्यामुळे तुम्हाला या योजनेचा चांगला फायदा होईल.

GST Council Meeting : नवीन वर्षात मिळणार खुशखबर ! जीवन आणि आरोग्य विम्यावरील GST होणार रद्द ?

GST

GST Council Meeting : नवीन वर्ष 2025 मध्ये जीवन विमा आणि आरोग्य विम्यावरील जीएसटीमध्ये कपात होऊ शकते. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली 21-22 डिसेंबर 2024 रोजी राजस्थानमध्ये राज्यांच्या अर्थमंत्र्यांची बैठक होणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या बैठकीत एका दिवशी अर्थमंत्री 2025-26 या आर्थिक वर्षाच्या आधीच्या अर्थसंकल्पाबाबत राज्यांच्या अर्थमंत्र्यांकडून सूचना आणि शिफारशी घेतील आणि दुसऱ्या दिवशी अर्थसंकल्पाची 55वी बैठक होणार आहे. जीएसटी कौन्सिलमध्ये जीएसटी कमी करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.

GST मध्ये होणार बदल

GST कौन्सिलच्या आगामी बैठकीत, मुदत विमा योजनांवरील 18 टक्के GST पूर्णपणे रद्द करण्यास मान्यता दिली जाऊ (GST Council Meeting) शकते. तर ज्येष्ठ नागरिक आणि इतर लोकांसाठी जे 5 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा घेतात, त्यांच्यासाठी जीएसटी रद्द केला जाऊ शकतो. पीटीआयने एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगितले की जीएसटी परिषद काही उत्पादने आणि सेवांवरील जीएसटी दर तर्कसंगत करू शकते आणि काही वस्तूंवरील जीएसटी दर 12 टक्क्यांवरून 5 टक्के कमी करू शकते.

आरोग्य आणि जीवन विम्यावरील जीएसटीचा विचार करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मंत्र्यांच्या गटाने मुदतीच्या विम्यावरील जीएसटी काढून टाकण्यास आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य विम्याला जीएसटीमधून सूट देण्याचे मान्य केले आहे.याशिवाय 5 लाख रुपयांपर्यंतच्या आरोग्य विम्यावर व्यक्तींनी भरलेल्या प्रीमियमवरील जीएसटी रद्द करण्याचाही प्रस्ताव आहे. तथापि, 5 लाख रुपयांवरील आरोग्य विम्याच्या प्रीमियमवर 18 टक्के जीएसटी आकारला जाईल. सप्टेंबर 2024 मध्ये झालेल्या GST कौन्सिलच्या बैठकीत मंत्र्यांच्या गटाला अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले होते.

जीएसटी दर तर्कसंगत करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मंत्र्यांच्या गटाने पॅकेज केलेले पिण्याचे पाणी, सायकली, व्यायामाच्या नोटबुक, लक्झरी घड्याळे आणि शूजवरील जीएसटी दरांमध्ये बदल सुचवले आहेत. जीएसटी दरातील या बदलामुळे सरकारला 22000 कोटी रुपयांचा महसूल लाभ होणार आहे. GoM ने 20 लिटरच्या पॅकबंद पिण्याच्या पाण्यावरील GST दर 18 टक्क्यांवरून 5 टक्के, 10,000 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या सायकलींवर 12 टक्क्यांवरून 5 टक्के करण्याचा प्रस्ताव दिला आहे. व्यायामाच्या नोटबुकवरील जीएसटी दर १२ टक्क्यांवरून ५ टक्के करण्याचाही प्रस्ताव आहे. 15,000 रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या चपलांवरील जीएसटी दर 18 टक्क्यांवरून 28 टक्के आणि 25,000 रुपयांहून अधिक किमतीच्या घड्याळांवर जीएसटी दर 18 टक्क्यांवरून 28 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे.

Railway News: काउंटरवर घेतले होते आरक्षण तिकीट, आता बदलायचे आहे बोर्डिंग स्टेशन ? वापरा सोपी ऑनलाईन पद्धत

railway news

जर तुम्ही ट्रेनमध्ये तुमचे आरक्षण काउंटरवर केले असेल आणि काही परिस्थितीमुळे किंवा तुमच्या सोयीमुळे तुम्हाला तुमचे बोर्डिंग स्टेशन बदलायचे असेल, तर तुम्ही ते घरी बसून करू शकता. यासाठी तुम्हाला तिकीट घरात जाण्याचीही गरज नाही. रेल्वे हे काउंटर तिकिटांवर करण्याची सुविधा देते. हे काम आयआरसीटीसीच्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन सहज करता येते. त्याची ऑनलाइन प्रक्रिया खूप सोपी आहे. तुम्हाला येथे प्रथम एक गोष्ट समजून घेणे आवश्यक आहे की, काउंटरवर तिकीट बुकिंगच्या वेळी वैध मोबाइल क्रमांक दिलेला असेल तरच तुम्ही हे करू शकाल.

घरी न जाता ऑनलाइन तिकीट कसे बदलावे ?

  • सर्व प्रथम IRCTC वेबसाइट लिंक https://www.operations.irctc.co.in/ctcan/SystemTktCanLogin.jsf वर जा.
  • डावीकडील व्यवहार प्रकार पर्यायामध्ये ‘बोर्डिंग पॉइंट चेंज’ निवडा.
  • कॅप्चासह पीएनआर क्रमांक आणि ट्रेन क्रमांक प्रविष्ट करा.
  • तुम्ही नियम आणि प्रक्रिया वाचल्या आहेत याची पुष्टी करण्यासाठी चेक बॉक्सवर टिक करा.
  • सबमिटवर क्लिक केल्यानंतर बुकिंगच्या वेळी दिलेल्या मोबाइल नंबरवर एक ओटीपी पाठवला जाईल, प्राप्त झालेला ओटीपी प्रविष्ट करा आणि सबमिट वर क्लिक करा.
  • एकदा OTP प्रमाणित झाल्यानंतर, PNR तपशील स्क्रीनवर प्रदर्शित केला जाईल.
  • स्क्रीनवरील तपशीलांची पडताळणी केल्यानंतर, बोर्डिंग पॉइंट लिस्टमधून नवीन बोर्डिंग स्टेशन निवडा आणि नंतर सबमिट वर क्लिक करा.
  • नवीन बोर्डिंग पॉइंटसह PNR तपशील स्क्रीनवर प्रदर्शित केले जातील.

या गोष्टी लक्षात ठेवा

येथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घेणे आवश्यक आहे की काउंटर तिकिटाच्या बोर्डिंग पॉईंटमध्ये बदल केवळ चार्ट तयार होईपर्यंत परवानगी दिली जाईल. ट्रेन सुटल्यापासून २४ तासांच्या आत बोर्डिंग स्टेशन बदलल्यास, सामान्य परिस्थितीत कोणताही परतावा दिला जाणार नाही, तथापि, ट्रेन रद्द करणे, डबे जोडणे, ट्रेन तीन तासांपेक्षा जास्त उशिराने धावणे यासारख्या अपवादात्मक परिस्थितीत सामान्य परतावा नियम लागू होतील.

आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की जर एखाद्या प्रवाशाने बोर्डिंग स्टेशन बदलले असेल तर तो मूळ बोर्डिंग स्टेशनवरून ट्रेनमध्ये चढण्याचे सर्व अधिकार गमावेल. योग्य परवानगीशिवाय प्रवास करताना आढळल्यास, प्रवाशाला मूळ बोर्डिंग स्टेशन आणि बदललेले बोर्डिंग स्टेशन दरम्यान दंडासह भाडे भरावे लागेल. सीट बर्थ बुकिंग केले नसल्यास, या कार्यक्षमतेद्वारे काउंटर तिकिटाच्या बोर्डिंग पॉइंटमध्ये बदल करण्याची परवानगी दिली जाणार नाही.अशा परिस्थितीत तुम्हाला जवळच्या रेल्वे काउंटरवर जावे लागेल.

काय सांगता ! व्हॉट्सॲपवर करू शकता कॉल रेकॉर्ड ? ;जाणून घ्या स्टेप्स

whats app call record

आजकाल प्रत्येकाच्या स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सॲप आहे. संदेश पाठवण्याचा हा एक सोपा मार्गच नाही तर तो ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलद्वारे लोकांना कनेक्ट ठेवतो. पण तुम्हाला माहिती आहे का की व्हॉट्सॲप कॉल्सही रेकॉर्ड केले जाऊ शकतात? बहुतेक लोकांना हे माहित नाही कारण WhatsApp मध्ये अंतर्निहित कॉल रेकॉर्डिंग वैशिष्ट्य नाही. तरीही, काही थर्ड-पार्टी ॲप्सच्या मदतीने तुम्ही व्हॉट्सॲप कॉल रेकॉर्ड करू शकता. या लेखात आम्ही तुम्हाला व्हॉट्सॲप कॉल रेकॉर्डिंग कसे करायचे आणि त्यासंबंधी सर्व महत्त्वाची माहिती सविस्तरपणे जाणून घ्या…

व्हॉट्सॲपवर कॉल रेकॉर्ड का?

बऱ्याच लोकांना त्यांचे WhatsApp कॉल रेकॉर्ड करायचे आहेत जेणेकरून ते नंतर ते ऐकू शकतील, विशेषत: जर ते काही महत्त्वाच्या माहितीशी किंवा संभाषणाशी संबंधित असेल. उदाहरणार्थ, व्यावसायिक कॉल, मुलाखती किंवा कोणत्याही संवेदनशील माहितीची देवाणघेवाण रेकॉर्ड करणे उपयुक्त ठरू शकते.

WhatsApp कॉल रेकॉर्ड करणे शक्य आहे का?

व्हॉट्सॲपमध्ये कॉल रेकॉर्डिंगचा कोणताही पर्याय नाही, परंतु यासाठी काही थर्ड-पार्टी ॲप्स वापरता येतात. हे ॲप्स तुमचे व्हॉट्सॲप कॉल सहज रेकॉर्ड करू शकतात.

व्हॉट्सॲप कॉल रेकॉर्डिंगसाठी आवश्यक ॲप्स

WhatsApp कॉल रेकॉर्ड करण्यासाठी, तुम्हाला काही तृतीय-पक्ष ॲप्सची आवश्यकता असेल, कारण WhatsApp मध्ये इन-बिल्ट रेकॉर्डिंग वैशिष्ट्य नाही. येथे काही प्रमुख ॲप्स आहेत जे WhatsApp कॉल रेकॉर्ड करण्यात मदत करू शकतात:

Cube ACR:

क्यूब एसीआर हे एक लोकप्रिय कॉल रेकॉर्डिंग ॲप आहे जे केवळ व्हॉट्सॲपच नाही तर इतर VoIP (व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल) कॉल देखील रेकॉर्ड करू शकते. हे ॲप आपोआप कॉल रेकॉर्डिंग सुरू करते आणि उच्च गुणवत्तेत रेकॉर्डिंग देते.

Salestrail:

हे ॲप व्यावसायिकांसाठी डिझाइन केले आहे, विशेषत: ज्यांना व्यवसाय कॉल रेकॉर्ड करायचे आहेत. Salestrail ॲप सहजपणे WhatsApp कॉल रेकॉर्ड करते आणि क्लाउड बॅकअप आणि इतर व्यावसायिक वैशिष्ट्ये देखील मिळवतात.

ACR Call Recorder:

ACR (दुसरा कॉल रेकॉर्डर) देखील एक उत्कृष्ट कॉल रेकॉर्डिंग ॲप आहे, जो WhatsApp कॉल रेकॉर्ड करण्यास सक्षम आहे. त्याचा यूजर इंटरफेस अतिशय सोपा आहे आणि तो सहज सेटअप करता येतो.

व्हॉट्सॲप कॉल्स कसे रेकॉर्ड करायचे?

  • Google Play Store वरून Cube ACR, Salestrail किंवा ACR कॉल रेकॉर्डरसारखे कोणतेही कॉल रेकॉर्डिंग ॲप डाउनलोड करा. हे ॲप्स विनामूल्य उपलब्ध आहेत आणि त्यांची सेटिंग्ज देखील अगदी सोपी आहेत.
  • ॲप इन्स्टॉल केल्यानंतर ते उघडा आणि आवश्यक परवानग्या द्या. तुम्ही ॲपला मायक्रोफोन आणि स्टोरेज ॲक्सेस देण्याची अनुमती द्यावी जेणेकरून ते कॉल रेकॉर्ड करू शकेल आणि रेकॉर्डिंग स्टोअर करू शकेल.
  • अनेक ॲप्समध्ये तुम्ही WhatsApp कॉल रेकॉर्ड करण्यासाठी चालू करू शकता अशी सेटिंग असते. लक्षात ठेवा की काही ॲप्सना तुम्हाला कॉल रेकॉर्डिंग व्यक्तिचलितपणे सक्षम करण्याची आवश्यकता असू शकते. क्यूब एसीआरमध्ये या सेटिंग्ज आधीच सक्रिय केल्या आहेत, तर सेलेस्ट्रेल आणि एसीआरमध्ये तुम्हाला ॲपची सेटिंग्ज तपासावी लागतील.
  • आता, तुम्ही किंवा तुमचा इतर पक्ष जेव्हा WhatsApp कॉल करतो, तेव्हा ॲप आपोआप कॉल रेकॉर्ड करणे सुरू करेल. कॉलच्या शेवटी, तुम्हाला रेकॉर्डिंगची ऑडिओ फाइल मिळेल, जी तुम्ही नंतर ऐकू शकता.
  • कॉल रेकॉर्ड केल्यानंतर, तुम्ही ॲपद्वारे रेकॉर्डिंगमध्ये सहज प्रवेश करू शकता. यापैकी बहुतेक ॲप्स तुम्हाला क्लाउडवर रेकॉर्डिंग ऐकू देतात, डाउनलोड करतात किंवा बॅकअप घेतात.

लक्षात ठेवा

कॉल रेकॉर्ड करण्यापूर्वी, तुम्ही तुमच्या देशाच्या किंवा राज्याच्या कायद्यांचे पालन करत असल्याची खात्री करा. अनेक देशांमध्ये, कॉल रेकॉर्ड करण्यासाठी दोन्ही पक्षांची संमती आवश्यक असते. परवानगीशिवाय कॉल रेकॉर्ड करणे बेकायदेशीर असू शकते.

कोणतेही थर्ड-पार्टी ॲप वापरत असताना, ॲपची गोपनीयता आणि सुरक्षा धोरण वाचणे खूप महत्वाचे आहे. अनेक ॲप्स तुमचा डेटा सुरक्षित ठेवण्याचा दावा करतात, परंतु काही ॲप्स वापरताना तुमच्या वैयक्तिक डेटाच्या सुरक्षिततेला धोका असू शकतो. तुम्ही फक्त सकारात्मक धोरणे आणि पुनरावलोकने असलेली ॲप्स वापरत असल्याची खात्री करा.