Tuesday, December 30, 2025
Home Blog Page 376

Bombay High Court Bharti 2024 | बॉम्बे उच्च न्यायालयात मोठी भरती सुरु; असा करा अर्ज

Bombay High Court Bharti 2024

Bombay High Court Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. ज्याचा फायदा आजपर्यंत अनेक उमेदवारांना झालेला आहे. आज देखील आम्ही नोकरीची एक अशी संधी घेऊन आलेलो आहोत. अनेक लोकांना मुंबईमध्ये नोकरी करण्याची इच्छा असते. आता त्यांची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. कारण आता मुंबई उच्च न्यायालया (Bombay High Court Bharti 2024) अंतर्गत एक मोठी भरती जाहीर झालेली आहे. ही भरती जिल्हा न्यायाधीश आणि वरिष्ठ दिवानी न्यायाधीश या पदांसाठी आहे. या पदांच्या एकूण 6 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहे. हे अर्ज तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाइन पद्धतीने करू शकता. 25 नोव्हेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव | Bombay High Court Bharti 2024

या भरती अंतर्गत भरती जिल्हा न्यायाधीश आणि वरिष्ठ दिवानी न्यायाधीश या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

रिक्त पदसंख्या

या भरती अंतर्गत 06 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

नोकरीचे ठिकाण | Bombay High Court Bharti 2024

या भरती अंतर्गत तुमचे निवड झाली तर तुम्हाला मुंबई या ठिकाणी नोकरी करावी लागेल.

अर्ज पद्धती

या भरतीचा अर्ज तुम्ही ऑफलाईन किंवा ऑनलाईन ईमेलने करू शकता.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

रजिस्ट्रार (कार्मिक), उच्च न्यायालय, अपील बाजूला, बॉम्बे, 5 वा मजला, नवीन मंत्रालय इमारत, जीटी हॉस्पिटल कंपाउंड, अशोका शॉपिंग सेंटरच्या मागे, क्रॉफर्ड मार्केट जवळ, एल.टी. मार्ग, मुंबई – ४००००१

अर्ज सादर करण्याचा ई – मेल पत्ता

[email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख

25 नोव्हेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अर्ज कसा करावा | Bombay High Court Bharti 2024

  • या भरतीचा अर्ज तुम्ही ऑफलाईन किंवा ऑनलाईन ईमेलच्या पद्धतीने भरू शकता.
  • 25 नोव्हेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • या तारखे अगोदरच तुम्ही अर्ज करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

Skin Care | थंडीत ड्राय स्किनपासून मुक्तता मिळवण्यासाठी; खोबरेल तेलात मिक्स करा हे पदार्थ

Skin Care

Skin Care | हिवाळा सुरू झालेला आहे. हा हिवाळा अनेक लोकांना आवडतो. पण हिवाळ्यासोबत त्वचेचे आणि आरोग्याचे अनेक आजार उद्भवतात. खास करून त्वचेच्या बाबत अनेक समस्या निर्माण होतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्वचा अत्यंत कोरडे पडते. आणि बारीक सुरकुत्या यायला लागतात. तसंच आपली त्वचा उकलायला लागते. त्यामुळे हिवाळ्याच्या सुरुवातीपासूनच त्वचेची काळजी घेणे खूप गरजेचे असते. अन्यथा पुढे जाऊन संपूर्ण त्वचेची आग होते.

अनेक वेळा काही लोकांची त्वचा एवढी कोरडी पडते की, त्याला खाज सुटते आणि तडे देखील जायला सुरुवात होतात. आणि हळूहळू संपूर्ण भाग कोरडा पडून तिथली त्वचा काळी पडू लागते. अशावेळी तुमच्या त्वचेतील ओलावा टिकून राहण्यासाठी बॉडीला मॉइश्चरायजर किंवा बॉडी लोशन लावणे खूप गरजेचे असते. किंवा तुम्ही त्वचेवर तेल देखील लावू शकतात. तेलाने देखील तुमची त्वचा मऊसर राहते.

ज्यावेळी शरीरातील आद्रता कमी होते. त्यावेळी त्वचेच्या कोरडी पडायला लागते. अनेकदा ही त्वचा इतकी कोरडी पडते की. सगळीकडे खाज सुटते. अनेक वेळा त्वचा प्रमाणापेक्षा जास्त कोरडी पडल्याने कोड ही येतात. अशावेळी तुम्ही घरगुती उपचार करणे खूप गरजेचे असते. थंडीत तुम्ही त्वचेचे रक्षण केले पाहिजे. यासाठी खोबरेल तेलाचा वापर देखील करू शकता. तुम्ही खोबरेल तेलामध्ये काही पदार्थ मिक्स करून जर तुमच्या त्वचेवर टाकले तर त्वचेवरील कोरडेपणा दूर होईल.

खोबरेल तेल आणि ग्लिसरीन | Skin Care

हिवाळ्यात जर सारखी तुमची त्वचा कोरडी पडत असेल, तर तुम्ही खोबरेल तेल सोबत ग्लिसरीन वापरू शकता. हे तुमच्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. खोबरेल तेलसोबत ग्लिसरीन वापरणे हा ड्राय स्किनसाठी चांगला पर्याय आहे. यामुळे त्वचेतील आद्रता भरून निघते. आणि कोरडेपणा कमी होतो. तसेच खोबरेल तेलात त्वचेसाठी आवश्यक असणारे विटामिन्स आणि मिनरल असतात. जे त्वचेला पोषण देतात. यासाठी तुम्ही एका बाऊलमध्ये खोबरेल तेल आणि ग्लिसरीन सारख्या प्रमाणात घ्या. ते मिश्रण एकत्र करून त्वचेला मालिश करून घ्या. तुम्ही रात्रभर देखील तसेच ठेवू शकता आणि सकाळी उठून धुवू शकता.

खोबरेल तेल आणि कॉफी पावडर

थंडीमध्ये त्वचा जास्त कोरडी पडते. अशावेळी त्वचेचे एक्सपोलेशन करणे गरजेचे असते. यासाठी त्वचेवरील डेड स्किन काढून टाकण्यासाठी तुम्ही खोबरेल तेलात एका बाऊलमध्ये कॉफी पावडर टाकून मिक्स करा. हे एकत्र मिश्रण करा आणि त्वचेवर लावून मसाज करा दहा ते पंधरा मिनिट तुम्ही हा मसाज करा. आणि नंतर स्वच्छ पाण्याने तोंड धुवा.

खोबरेल तेल आणि एलोवेरा जेल

त्वचेचा कोरडेपणा कमी करण्यासाठी तुम्ही खोबरेल तेलात एलोवेरा जेल मिक्स करून देखील लावू शकता. एलोवेरा जेल आणि तेलामुळे त्वचेमध्ये ओलावा टिकून राहतो. आणि आपल्या त्वचेला अनेक फायदे होतात. एलोवेरा जेलमध्ये विटामिन असते. त्यामुळे तुमच्या त्वचेतील कोरडेपणा दूर होईल. आणि त्वचा अत्यंत मुलायम आणि सुंदर होईल.

महाविकास आघाडीकडे उलेमांच्या धक्कादायक मागण्या ?

mahavikas aghadi

राज्यात विधानसभा निवडणुकीचे प्रचाराचे वादळ जोरदार घुमत आहे. अशातच प्रत्येक पक्ष आपल्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी रणनीती आखतो आहे. मुख्य लढत असलेल्या काँग्रेस आणि भाजप मध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. अशातच मुस्लिमांना प्रत्येक बाबतीत प्राधान्य देणारी भूमिका काँग्रेसने नेहमीच घेतली आणि त्याचा मोठा फटका हिंदूंसह अन्य धर्मियांना बसला, असा आरोप भाजप नेत्यांकडून केला जातो आहे.

मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड, शरियत अशा कायद्यांना मोकळीक देण्यात आली, असा दावा भाजपचे नेते सातत्याने करीत असतात. तीन तलाक सारख्या जुलमी प्रथेला काँग्रेसने कधीही विरोधच केला नाही. मुस्लिम महिलांना पोटगीचा अधिकार देखील नाकारण्यात काँग्रेस पुढे होती. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय देखील राजीव गांधी यांच्या सरकारने फिरवला होता.

वक्फ सुधारणा विधेयकाला काँग्रेसचा विरोध ?

शाहबानो प्रकरणात काँग्रेसची मुस्लिमांच्या संदर्भातील भूमिका प्रकर्षाने स्पष्ट झाली, असे आरोप भाजपकडून सातत्याने होत असतात. देशातील संसाधनांवर अल्पसंख्याक समुदायाचा पहिला अधिकार आहे, अशी भूमिका माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी घेतली होती. तर देशातील संपत्तीचे सर्वांना समान वाटप केलेपाहिजे अशी भूमिका काँग्रेस नेत्यांनी लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान घेतली. आता वक्फ सुधारणा विधेयकाला विरोध करण्याची भूमिका काँग्रेसने घेतली आहे.

ऑल इंडिया उलेमा बोर्डाने काँग्रेसला आपले समर्थन जाहीर केले आहे. या बदल्यात काँग्रेसने उलेमा बोर्डाच्या 17 मागण्या पूर्ण करण्याचे वचन दिल्याची जोरदार चर्चा सध्या सुरु आहे. काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग यांनी यावरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांना सबुरीचा सल्ला दिला आहे.

वक्फ बोर्डाला एक हजार कोटींचा निधी

काँग्रेस सत्तेत आली, तर महाराष्ट्र वक्फ बोर्डला एक हजार कोटींचा निधी देण्याची मागणी उलेमा बोर्डाकडून करण्यात आली आहे अशी चर्चा आहे. वक्फ बोर्डाच्या धुमाकुळामुळे आज उत्तर कर्नाटकात हाहाकार माजला आहे.वक्फ नोंदीमुळे सामान्य शेतकरी हवालदिल झाला आहे. गावोगावी वक्फची दहशत पसरली आहे.त्याच वक्फ बोर्डाला महाराष्ट्रात सक्षम करण्याची भूमिका काँग्रेसने घेतल्याची चर्चा समाज माध्यमांवर सुरु झाली आहे.”हिंदूंनो आज कुत्र्यांचा टाइम सुरु आहे, उद्या आमचा दौर येईल” अशा प्रकारची उघड भूमिका घेणारा मौलाना सलमान अजहरी आज कारागृहात आहे. सत्तेत आल्यास त्याला सोडून देण्याचे आश्वासन काँग्रेसकडून उलेमानी मागितले असल्याची माहिती आहे.

वेगळा न्याय का ?

उलेमांच्या मागणीच्या अनुसार 2012-2024 पर्यंत जी मुस्लिम मुले दंगलीत सामील होती त्या सर्वांवरचे गुन्हे मागे घेतले जाणार आहेत. समाजकंटकांना मैदान खुले करून देण्याचा हा प्रयत्न आहे. इतरवेळी कायद्याचं राज्य, संविधान यांच्या नावाने उर बडवणारे गुन्हेगारी प्रकरणात सहभागी असलेल्या मुस्लिमांना वेगळा न्याय अन इतरांना वेगळा न्याय अशी भूमिका का घेत आहेत,असा प्रश्न आता भाजपच्या नेत्यांकडून विचारला जात आहे. हिंदू मंदिरांत किंवा ख्रिश्चन बांधवांच्या चर्चमध्ये असलेल्या पुजाऱ्यांना सरकार वेतन देत नाही.

काँग्रेसकडे केली संघावर बंदी आणण्याची मागणी ?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही राष्ट्रवादी विचारांची संघटना आहे. देशात कुठेही नैसर्गिक आपत्ती आली तरी संघाचे स्वयंसेवक घटनास्थळी धावून जातात.समर्पित भावनेने संघाचे स्वयंसेवक देशभरात कार्यरत आहेत. संघ परिवाराच्या संस्था दुर्गम भागात सेवाभावी कार्यात व्यस्त आहेत. हिंदू बांधवांच्या धर्मांतराची षडयंत्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने उधळून लावली आहेत. हिंदूंसाठी झटणारी एकमेव संघटना म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ओळख आहे. काँग्रेसचे सरकार आल्यावर आर.एस.एस.आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांवर बंदी घालण्याचे आश्वासन मागण्यात आले आहे. तसेच हिंदू संत रामगिरी महाराजांना जेल मध्ये टाकावे अशी मागणीही काँग्रेसकडे करण्यात आली आहे.

जबाबदारी घेण्यास टाळाटाळ

या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसने दिल्याचे पत्र समाज माध्यमांवर व्हायरल झाले आहे. पण पवार गटाच्या नेत्यांनी त्याचा इन्कार केला आहे.काँग्रेसने अधिकृत इन्कार केलेला नाही. पण उलेमानी आपल्या मागण्यांचे पत्र महाविकास आघाडीला दिल्याचे स्पष्ट आहे.

लोकसभा निवडणुकीत मुस्लिम मतदारांनी महाविकास आघाडीला मतदान करावे, असे फतवे निघाल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला होता. तर अनेक मतदारसंघात व्होट जिहाद झाल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. आता महाविकास आघाडीला सत्तेत बसविण्यासाठी या मागण्या महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडे करण्यात उलेमांकडून आल्या आहेत. आणि त्याला सकारात्मक प्रतिसादाची चर्चा समाज माध्यमांवर सुरु आहे.

विसराल ब्युटी पार्लर ; घरीच ट्राय करा इन्स्टंट ग्लो देणारा फेस पॅक

glowing skin

मैत्रिणींनो सध्या हिवाळा सुरु झाला आहे. त्यामुळे थंड हवेसोबत त्वचेच्या समस्या सुद्धा आपसूकच येतात. याबरोबरच आता लागणसरे सुद्धा सुरु झाली आहे. त्यामुळे तुमच्याही नातलगांमध्ये कार्यक्रम असतील आणि तुम्हाला उठावदार दिसायचे असेल तर आम्ही तुमच्यासाठी काही झकास होम रेमेडीज घेऊन आलो आहोत. ज्यामुळे तुमचिया स्किन काही मिनिटांतच ग्लो करायला लागेल. तुम्हाला फक्त रात्री झोपण्यापूर्वी हा घरगुती फेसपॅक लावावा लागेल, ज्यामुळे तुमच्या चेहऱ्याला पार्लरसारखी चमक येईल आणि तुमचे सौंदर्य वाढेल. चला जाणून घेऊया इन्स्टंट ग्लो देणाऱ्या फेस पॅक बद्दल …

साहित्य

  • 3 चमचे तांदळाचे पीठ
  • 1 टीस्पून एलोवेरा जेल
  • 4 चमचे गुलाबजल
  • आवश्यकतेनुसार कच्चे दूध
  • 1 व्हिटॅमिन ई कॅप्सूल

फेस पॅक कसा बनवायचा

  • झटपट ग्लो फेस पॅक बनवण्यासाठी प्रथम एका भांड्यात तांदळाचे पीठ, कोरफडीचे जेल आणि गुलाबपाणी घालून चांगले मिसळा.
  • आता आवश्यकतेनुसार कच्चे दूध घाला आणि नंतर व्हिटॅमिन ई कॅप्सूल घाला आणि सर्वकाही पुन्हा चांगले मिसळा.
  • तुमचा झटपट ग्लो फेस पॅक तयार आहे.
  • आता 20 मिनिटे चेहऱ्यावर हा फेसपॅक राहू द्या आणि नंतर पाण्याने चेहरा धुवा.
  • यानंतर रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर सौम्य मॉइश्चरायझर काळजीपूर्वक लावा.
  • मग काय! हा घरगुती झटपट फेस पॅक लावल्यानंतर, तुम्ही पार्लरमध्ये न जाता पार्लरसारखी चमक मिळवू शकता आणि तुमच्या पतीकडून प्रशंसा मिळवू शकता.

उद्योग विभागांच्या आस्थापनांना मतदानादिवशी सुट्टी

voting

राज्यात विधानसभा निवडणुकांचा प्रचार मोठ्या जोरात सुरू असून येत्या २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क सर्वांना बजावता यावा यासाठी उद्योग विभाग अंतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापनांना मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे.

वेतनात कोणतीही कपात नाही

उद्योग ऊर्जा कामगार आणि खनीकर्म विभागाने ही सूचना जारी केली आहे. लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 मधील कलम 135 ब नुसार निवडणूक क्षेत्रातील कोणत्याही व्यवसाय व्यापार औद्योगिक उपक्रम केव्हा आस्थापनात काम करणाऱ्या आणि विधानसभा निवडणुकीत मतदानाचा अधिकार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला मतदानाच्या दिवशी सुट्टी दिली असेल. ही सुट्टी उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व उद्योगसमूह महामंडळ, कंपन्या, औद्योगिक उपक्रम आणि इतर आस्थापनांसाठी लागू आहे. तसेच पोटकलम (१) नुसार या सुट्टीमुळे संबंधित कर्मचाऱ्यांच्या वेतनात कोणतीही कपात केली जाणार नाही.

उद्योग विभाग अंतर्गत येणाऱ्या सर्व महामंडळे उद्योग, समूह, कंपन्या, औद्योगिक उपक्रम आणि इतर आस्थापनाने या सूचनांचा काटेकोरपणे पालन करावं मतदारांना मतदानासाठी सुट्टी अथवा सवलत न मिळाल्याने मतदान करता न आल्यास संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल असा इशाराही उद्योग ऊर्जा कामगार आणि खाली कर्म विभागाने दिला आहे.

Chrome वापरताय ? सरकारने दिली चिथावणी , अनेक व्हर्जन आहेत असुरक्षित ?

mobile internet data

गुगल क्रोम वापरकर्त्यांसाठी कडक इशारा देण्यात आला आहे. सरकारी एजन्सीने Chrome ब्राउझरच्या अनेक आवृत्त्यांमध्ये त्रुटी शोधल्या आहेत. हे टाळण्यासाठी काही सेफ्टी टिप्सही देण्यात आल्या आहेत. इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) ने सांगितले की, सिस्टममधील त्रुटींचा फायदा घेऊन हॅकर्स तुमची वैयक्तिक माहिती लीक करू शकतात.

एजन्सीच्या मते, विंडोज आणि मॅक वापरकर्ते या त्रुटींमुळे विशेषतः प्रभावित होऊ शकतात. हा इशारा काही दिवसांपूर्वीच देण्यात आला आहे. अशा परिस्थितीत, आपल्या स्वत: च्या सुरक्षिततेसाठी हे महत्वाचे आहे की आपण चुकूनही कोणतीही चूक करू नका.

Chrome वापरकर्त्यांसाठी धोक्याची घंटा

CERT-In ने सांगितले की काही निवडक आवृत्त्यांमध्ये सुरक्षा त्रुटी आढळल्या आहेत. याचा विंडोज आणि लिनक्स सिस्टमवर परिणाम होऊ शकतो. एजन्सीच्या सिक्युरिटी नोटमध्ये असे म्हटले आहे की, ही त्रुटी Google Chrome च्या घटक मालिका आणि कौटुंबिक अनुभवामध्ये आढळून आली आहे.
याचा फायदा घेऊन हल्लेखोर व्यवस्थेवर परिणाम करू शकतात. हॅकर्स सिस्टममध्ये अनियंत्रित कोड कार्यान्वित करू शकतात. सेवा DoS नाकारण्याच्या बाबतीत, हे तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते.

कोणते युजर्स प्रभावित ?

Chrome च्या निवडक आवृत्त्यांसाठी सुरक्षा जोखीम सोडण्यात आली आहे.
Linux साठी 130.0.6723.116 पूर्वीच्या Google Chrome आवृत्त्या प्रभावित होऊ शकतात.
Windows आणि Mac साठी 130.0.6723.116/.117 पूर्वीच्या Google Chrome आवृत्त्या

युजर्सनी काय केले पाहिजे ?

या सुरक्षा दोषांपासून स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी, वापरकर्त्यांनी काही महत्त्वाच्या गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे. Windows किंवा Mac मधील अपडेट तपासण्यासाठी, खालील स्टेप्स फॉलो करा. या चेतावणीचा स्मार्टफोन वापरकर्त्यांवर परिणाम होत नाही. त्यामुळे त्यांनी काळजी करण्याची गरज नाही.

  • डेस्कटॉप क्रोम ब्राउझर उघडा.
  • वरच्या उजव्या कोपर्यात असलेल्या तीन ठिपक्यांवर क्लिक करा.
  • खाली, मदत आणि नंतर Google Chrome बद्दल क्लिक करा.
  • ब्राउझरची नवीन आवृत्ती असल्यास, ते दृश्यमान असेल. जे तुम्ही इन्स्टॉल करू शकता.
  • Windows आणि Mac वापरकर्ते COM च्या या आवृत्त्या स्थापित करू शकतात.
  • Windows आणि Mac साठी Chrome आवृत्ती 130.0.6723.116/117
  • Linux आवृत्ती 130.0.6723.116 साठी Chrome

Destination Wedding India : विवाहाचे क्षण बनतील अविस्मरणीय; भारतात डेस्टिनेशन वेडिंगसाठी ‘ही’ आहेत परफेक्ट ठिकाणं

destination wedding india

Destination Wedding India : लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात खास क्षण असतो. म्हणूनच हा खास दिवस अविस्मरणीय व्हावा आणि लग्नाला येणाऱ्या प्रत्येकाने आपल्या खास दिवसाचा भरपूर आनंद घ्यावा, अशी बहुतेक जोडप्यांची इच्छा असते. अशा परिस्थितीत, नवविवाहित जोडप्यांना डेस्टिनेशन वेडिंग लोकेशनवर लग्न करायला आवडते जिथे त्यांचे लग्न एखाद्या भव्य कार्यक्रमासारखे असते आणि लग्नाचे ठिकाण स्वप्नासारखे असते. तुम्हीही लग्न करणार असाल तर आज या लेखात आम्ही तुम्हाला भारतातील सर्वोत्तम डेस्टिनेशन वेडिंग लोकेशन्सबद्दल सांगणार आहोत.

उदयपूर (Destination Wedding India )

राजस्थानमधील उदयपूर हे वेडिंगचे सर्वोत्तम ठिकाण आहे, प्रियांका चोप्रा आणि कतरिना कैफ सारख्या बड्या स्टार्सनी त्यांच्या लग्नासाठी हे ठिकाण निवडले आहे. उदयपूरमध्ये सिटी पॅलेस, ओबेरॉय उदयविलास यांसारखी अनेक शाही ठिकाणे आहेत जी आता लग्नाची ठिकाणे म्हणून खूप प्रसिद्ध आहेत.

जयपूर आणि उत्तराखंड

राजस्थान आपल्या शाही शैली आणि संस्कृतीसाठी ओळखले जाते. राज्याची राजधानी जयपूर, गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते, हे ठिकाण रॉयल पॅलेस, किल्ला आणि हेरिटेज हॉटेल्ससाठी प्रसिद्ध आहे. तसेच, राजस्थानचे ब्लू सिटी जोधपूर हे लग्नाचे सर्वोत्तम ठिकाण आहे. येथील उम्मेद पॅलेस आणि मेहरानगड किल्ला हे विवाहसोहळ्यासाठी (Destination Wedding India) उत्तम ठिकाण मानले जातात.

हिमाचल आणि उत्तराखंड

भारतातील हिमाचल आणि उत्तराखंड ही दोन राज्ये जगभर प्रसिद्ध आहेत. उत्तराखंडमधील ऋषिकेश आणि हिमाचलमधील शिमला. या दोन राज्यांमध्ये अनेक पर्यटनस्थळे आहेत जिथे सर्वाधिक पर्यटक येतात. अध्यात्म, शांतता आणि पवित्रतेसाठी प्रसिद्ध असलेल्या उत्तराखंडमध्ये लग्न करण्याची मजा काही औरच असते. त्याचबरोबर डेस्टिनेशन वेडिंगसाठी हिमाचल प्रदेशची वेगळी ओळख आहे.

केरळ

बॅकवॉटर, हिरवाई आणि समुद्रकिनारे यासाठी प्रसिद्ध असलेले केरळ आता डेस्टिनेशन वेडिंगसाठी जास्त पसंत केले जात आहे. या राज्यातील हिरवळ आणि हाऊसबोटींनी वेढलेल्या समुद्रकिनाऱ्यांचे सौंदर्य एक वेगळाच अनुभव देते.

गोवा

समुद्रकिनाऱ्यावर लग्न करू इच्छिणाऱ्यांसाठी गोवा हे एक खास ठिकाण आहे. ताज एक्झोटिक, हयात आणि लीला ब्रीच रिसॉर्ट्ससह लग्नासाठी प्रसिद्ध असलेली अनेक विदेशी ठिकाणे आहेत.

भाजपने जाहीर केली भावांतर योजना; शेतकऱ्यांना कोणते फायदे मिळणार

Farmer

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अनेक वेळा शेतकऱ्यांच्या शेतमालाला बाजारामध्ये चांगला भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण होते. शेतकऱ्यांच्या पिकाला चांगला बाजार भाव न मिळाल्याने शेतीसाठी आलेल्या खर्च देखील त्यांना निघत नाही. आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे संपूर्ण जगाचे पोट भरणारा हा अन्नदाता एक वेळ उपाशी राहून शेतात काबाड कष्ट करत असतो. असेच जातात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप सरकारने शेतकऱ्यांसाठी एक नवीन योजना सुरू केलेली आहे. भावांतर योजना या नावाने ही योजना राबवली जाणार आहे.

त्याचप्रमाणे भाजपने शेतकऱ्यांना सत्तेमध्ये आल्यावर संपूर्ण कर्जमाफी देणार आहे, असे देखील सांगितलेले आहे. तसेच सध्या देण्यात आलेली मोफत कृषी पुरवठा योजना देखील पुढील पाच वर्षासाठी चालू राहणार आहे. अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे. या आधी लोकसभा निवडणुकीत शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून भाजपला खूप मोठा फटका बसलेला आहे. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांचा विचार करून त्याचा फायदा करून देण्याचा प्रयत्न भाजपकडून चालू झालेला आहे

भाजप किसान मोर्चाच्या सरचिटणीस संदीप दिघे यांनी याबाबत त्यांचे मत व्यक्त केलेले आहे. त्यांनी सांगितले की, महायुती सरकारने सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नवीन योजना चालू केलेली आहे. भावांतर ही योजना चालू केलेली आहे. त्यामुळे आता कापूस उत्पादक आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी यांना हेक्टरी 5000 पर्यंत मदत मिळाली आहे. तसेच 27 हजार कोटी रुपये 62 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात जमा देखील झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांची लूज कमी होणार आहे. आणि त्यांच्या शेतमालाला योग्य भाव देखील मिळणार.

भाजपच्या संकल्प पत्रातून शेतकऱ्यांना देण्यात आलेले आश्वासने

  • सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देणार
  • शेतकऱ्यांसाठी भावांतर योजना राबवली जाणार
  • शेतकरी सन्मान निधीत वाढ करून 15 हजारांपर्यंत केली जाणार
  • राज्य व वस्तू कर अनुदानाच्या स्वरूपात दिला जाणार आहे
  • सोयाबीनला 6000 रुपयांचा भाव देणार, तसेच मूल्य साखळी उभारणार

Post Office Scheme | ‘ही’ आहे पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना; 100 रुपये गुंतवून होईल लाखोंची कमाई

Post Office Scheme

Post Office Scheme | आजकाल महागाईचा विचार करून अनेक लोक भविष्यासाठी काही ना काही गुंतवणूक करत असतात. गुंतवणुकीचे महत्त्व आजकाल सगळ्यांनाच पटलेले आहेत. त्यामुळे अनेक लोक हे त्यांच्या मासिक पगारातून काही ना काही हिस्सा त्यांच्या भविष्यासाठी राखून ठेवत असतात. सध्या मार्केटमध्ये गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत, तरी देखील अनेक लोक खात्री करून आपले पैसे कसे सुरक्षित राहतील? आणि चांगला परतावा कसा मिळेल? या दृष्टीने गुंतवणूक करत असतात. त्यातही अनेक लोक एसआयपीच्या माध्यमातून लाखो रुपये गुंतवत आहेत. त्याचप्रमाणे पोस्टमध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांची संख्या देखील वाढलेली आहे. पोस्ट ऑफिस (Post Office Scheme) ही एक विश्वासहार्य योजना आहे.

पोस्टाची (Post Office Scheme) अशीच एक आरडी योजना आहे. जी रिपेरिंग डिपॉझिट नावाने चालू आहे. या योजनेमध्ये तुम्हाला खूप चांगला परतावा मिळतो. तसेच तुमचे पैसे खात्रीशीर राहतात. या योजनेत तुम्ही केवळ 100 रुपये गुंतवून देखील सुरुवात करू शकता. या योजनेमध्ये तुम्हाला जवळपास 6.7% दराने व्याजदर मिळते.

पोस्टाची आरडी योजना | Post Office Scheme

जर तुम्ही पोस्टाच्या खात्यात दर महिन्याला 3000 रुपयांची गुंतवणूक केली. आणि ही गुंतवणूक पुढील पाच वर्षासाठी केली, तर मॅच्युरिटी नंतर गुंतवणूक करायला 2. 14 लाख रुपये मिळतात. या योजनेत तुम्ही गुंतवलेली एकूण रक्कम ही 1 लाख 80 हजार रुपये एवढी असेल तर व्याजामध्ये तुम्हाला 34 हजार 97 रुपये मिळतील. तुम्ही जर 100 रुपयांपासून देखील सुरुवात केली तरी तुम्ही चांगला फंड जमा करू शकता.

पोस्टाच्या आरडी योजनेबद्दल महत्वाची माहिती

पोस्टाच्या या योजनेमध्ये तुम्हाला विविध सुविधा मिळतात यामध्ये तुम्ही दहा-दहा रुपयांची मल्टिपल गुंतवणूक देखील करू शकतात. तसेच स्मॉल सेविंग स्कीममध्ये तुम्ही एकापेक्षा अधिक खाते देखील चालू करू शकता. यामुळे तुमचा चांगला आर्थिक फायदा होईल.

Onion Price | गेल्या 5 वर्षांच्या तुलनेत कांद्याचा दर उच्चांकावर ; जाणून घ्या किलोचा भाव

Onion Price

Onion Price | सध्या कांद्याचे दर हे उच्चांकाला पोहोचलेले आहेत. गेल्या पाच वर्षाच्या तुलनेत यावर्षी कांद्याचे दर उच्चांकावर गेलेलं आहे. केंद्र सरकारने देखील आता कांद्याचे दर कमी करण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. गेल्या चार दिवसांमध्ये कांद्याच्या दरांमध्ये (Onion Price) लक्षणीय वाढ झालेली आहे. कांद्याचे दर हे 21 टक्क्यांनी वाढलेले असून सध्या 60 रुपये प्रति किलो पेक्षाही जास्त दराने कांदा विकला जात आहे. यामुळे अन्नधान्याच्या महागाईवर देखील परिणाम होताना दिसत आहे.

जर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये महागाईच्या आकडेवारीमध्ये वाढ झाली तर रिझर्व बँकेच्या व्याजदर देखील कपात होण्याच्या लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. ज्या राज्यांमध्ये कांदा तयार झालेला नाही. त्या राज्यांमध्ये रेल्वेने कांद्याचा (Onion Price) पुरवठा करण्याचा प्रयत्न गेल्या एक महिन्यापासून केंद्र सरकार करत आहे.

यामुळे कांद्याची उपलब्धता वाढली आहे. परंतु दर मात्र अजिबात कमी झालेले नाही. आता तो दर पाच वर्षांच्या उच्चांकावर गेलेला आहे. महाराष्ट्रात नोव्हेंबर महिन्यामध्ये निवडणूका चालू होत आहेत. परंतु कांदा उत्पादक शेतकरी यामुळे नाराज होऊ नये. यासाठी कांद्यावरील निर्यात बंदी उठवण्यात आली असल्याचे देखील बोलले जात आहे. कांद्याचे दर काही दिवस असेच वाढत राहिले, तर राष्ट्रीय पातळीवर महागाई आणखी भडकण्याची भीती वर्तवण्यात आलेली आहे. ऑक्टोबर महिन्यात महागाईचा दर हा 5.5 पेक्षा जास्त झालेला आहे. याबद्दलची माहिती रिझर्व बँकेचे गव्हर्नर लक्ष्मीकांत दास यांनी दिलेली आहे.