Tuesday, December 30, 2025
Home Blog Page 378

यंदाच्या हिवाळयात भेटी द्या प्रदूषणमुक्त निसर्गरम्य ठिकाणांना ; मिळेल स्वच्छ हवेसोबत सही रिफ्रेशमेंट

pollutionfree places

सध्याच्या शहरी वातावरणातील प्रदूषणामुळे अनेक रोगांना आमंत्रण मिळत आहे. म्हणूंच शहरातील लोक निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त ठिकणांना भेटी देणे पसंत करतात. भारतात देखील अशी काही ठिकाणे आहेत जिथे प्रदूषण कमी असून तेथील हवा स्वच्छ आहे. त्यामुळे पर्यटकांचा ओढा नेहमी या ठिकाणांवर असतो. चला जाणून घेऊया या ठिकाणांबद्दल …

मनाली

तुम्हाला सुंदर पर्वत पहायचे असतील आणि स्वच्छ हवेत श्वास घ्यायचा असेल तर तुम्ही मनालीला भेट देऊ शकता. हे ठिकाण पर्यटकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. हिवाळ्यात येथे पर्वतांवर बर्फ पडतो त्यामुळे अनेक लोक खास बर्फ अनुभवण्यासाठी या ठिकाणी जात असतात.

कोल्लम

तुम्हाला हिरवाई, निसर्गरम्य दृश्ये आणि मोकळ्या हवेत फिरायचे असेल तर तुम्ही केरळमधील कोल्लमला भेट देऊ शकता. तुम्हाला इथे खूप छान वाटेल.

गंगटोक

प्रदूषणापासून दूर चांगल्या हवेत श्वास घ्यायचा असेल तर सिक्कीममधील गंगटोकला जाता येईल. इथल्या हवेत तुम्हाला खूप ताजेपणा जाणवेल.

तेजपूर

तेजपूर हे सर्वात कमी प्रदूषित ठिकाणांपैकी एक आहे. हे आसाम मध्ये वसलेले आहे. तुम्हाला इथे खूप कमी प्रदूषण आढळेल. अशा परिस्थितीत, तुम्ही तेजपूरमध्ये काही दिवस सहलीचा प्लॅन करू शकता. या ठिकाणी इतरही काही पर्यटनस्थळे पाहण्यासारखी आहेत.

पुद्दुचेरी

तुम्हाला सुंदर नजारे पहायचे असतील आणि प्रदूषणापासून दूर राहायचे असेल तर तुम्ही तामिळनाडूतील पुडुचेरीला जाऊ शकता. इथल्या वातावरणात फिरून तुम्हाला नक्कीच रिफ्रेशमेंट मिळेल यात शंका नाही.

जबरदस्त फीचर्ससह मारुतीने लॉन्च केली न्यू जनरेशन Dzire 2024, काय आहे किंमत ?

Dzire 2024

भारतातील आघाडीची ऑटोमोबाईल उत्पादक कंपनी मारुती सुझुकीची अनेक उत्कृष्ट वाहने विकली जातात. कंपनीने कॉम्पॅक्ट सेडान कार सेगमेंटमध्ये नवीन जनरेशन मारुती सुझुकी डिझायर 2024 लॉन्च केली आहे.या वाहनात कोणत्या प्रकारची वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत? किती दमदार इंजिन देण्यात आले आहे. ते कोणत्या किंमतीला लॉन्च केले गेले आहे? चला जाणून घेऊया…

मारुती डिझायर 2024 लाँच

मारुती सुझुकीने भारतीय बाजारपेठेत कॉम्पॅक्ट सेडान कार विभागात नवीन जनरेशन मारुती डिझायर 2024 लॉन्च केली आहे. यामध्ये कंपनीने अनेक उत्कृष्ट फीचर्स दिले आहेत. तसेच तिसऱ्या पिढीच्या डिझाईनच्या तुलनेत नवीन पिढीला अतिशय नवीन लूक देण्यात आला आहे.

काय आहेत वैशिट्ये ?

अनेक उत्तम फीचर्स देण्यात आले आहेत. यात नऊ इंची इन्फोटेनमेंट सिस्टीम, अँड्रॉइड ऑटो, ऍपल कार प्ले, १६ इंची अलॉय व्हील, एलईडी डीआरएल, एलईडी लाईट्स, एलईडी फॉग लॅम्प,बॉडी कलर्ड बंपर, हाय माऊंट एलईडी स्टॉप लॅम्प, शार्क फिन अँटेना, फ्रंट फूटवेल इल्युमिनेशन, लेदर रॅप्ड स्टीयरिंग व्हील, ड्युअल टोन इंटिरियर्स, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, 360 डिग्री व्ह्यू कॅमेरा, TPMS, सनरूफ, क्रूझ कंट्रोल, वायरलेस चार्जर, Push स्टार्टर स्टॉप, ऑटो हेडलॅम्प रियर एसी व्हेंट, डिजिटल एसी पॅनल, सुझुकी कनेक्ट यांसारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. त्यात दोन ॲक्सेसरीज पॅकेजेसही देण्यात आल्या आहेत.

मारुती डिझायर 2024 ची लांबी

या गाडीची एकूण लांबी 3995 मिमी आहे. त्याची रुंदी 1735 मिमी ठेवण्यात आली आहे. मारुती डिझायर 2024 ची उंची 1525 मिमी आहे आणि त्याचा व्हीलबेस 2450 मिमी आहे. त्याचे ग्राउंड क्लीयरन्स 163 मिमी ठेवलेले आहे आणि 4.8 मीटरच्या टर्निंग त्रिज्यासह, याला सामानासाठी 382 लीटरची बूट जागा मिळते.

काय आहे किंमत ?

Dzire 2024 भारतीय बाजारपेठेत 6.79 लाख रुपयांच्या प्रास्ताविक एक्स-शोरूम किंमतीत लॉन्च करण्यात आली आहे. याच्या टॉप व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 10.14 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. कंपनी सबस्क्रिप्शनसह देखील देत आहे. कारची प्रास्ताविक किंमत 31 डिसेंबर 2024 पर्यंत वैध असेल.

लाडकी बहीण योजनेमुळे महिलांना मोठा लाभ, महिला बनू लागल्या आत्मनिर्भर

ladaki bahin yojana

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्यातील महायुतीची सर्वात महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थी महिलांना दरमहा दीड हजार रुपये देण्यात येतात. या योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत ७५०० रुपये महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले असून, तब्बल अडीच कोटी महिलांनी या योजनेसाठी नोंदणी केली आहे. मात्र हि योजना जाहीर झाल्यापासूनच विरोधकांकडून या योजनेवर सातत्याने टीका करण्यात येत आहे.

योजना जाहीर होताच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी नकारात्मक सूर लावण्यास सुरुवात केली. ” सरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे, पैसे कुठून देणार?” असा प्रश्न सर्वात आधी विचारण्यात आला. पण सरकारने या योजनेसाठी 46000 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करून विरोधकांची बोलती बंद करून टाकली. त्यानंतर ” जमा झालेले पैसे ताबडतोब काढून घ्या, नाहीतर सरकारच ते काढून घेईल” असे टोमणे सुप्रिया सुळे, संजय राऊत आदी नेत्यांनी लावण्यास सुरुवात केली.. मात्र, “कोणत्याही परिस्थितीत हे पैसे परत घेतले जाणार नाहीत” असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी विविध व्यासपीठावर ठणकावून सांगितले. “सत्तेत आल्यानंतर या योजना बंद करू” असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी प्रचार सभेत बोलताना केले.

दिवाळीच्या आधीच एक हप्ता महिलांना देण्यात आला

ही योजना बंद पाडण्यासाठी प्रचंड प्रयत्न करण्यात आले. योजना बंद पाडायला विरोधक कोर्टात गेले. काहींनी महिलांचे चुकीचे फॉर्म भरले. योजनेचा लाभ त्यांना मिळू नये आणि लाडकी बहीण योजना बदनाम व्हावी, हाच उद्देश त्यामागे होता. तंत्रज्ञानाचा आधार घेऊन विरोधकांनी लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर जंक डाटा अपलोड केला आणि ते पोर्टल बंद पाडण्याचाही प्रयत्न केला.. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरपणे हा आरोप केला आहे. विरोधकांचे इतके प्रयत्न होऊनही महायुतीने ही योजना नेटाने राबवली. निवडणूक काळात या योजनेच्या अंमलबजावणीस आयोगाकडून स्थगिती येईल हे लक्षात घेऊन दिवाळीच्या आधीच एक हप्ता महिलांना देण्यात आला, त्यामुळे या योजनेबद्दलची विश्वासार्हता आणखी वाढली आहे.

आता समाज माध्यमातून विष पेरणी ?

अत्यंत जबाबदारीने आणि पारदर्शकपणे ही योजना माहिती सरकार राबवत आहे. महिलाही योजनेवर खुश आहेत हे लक्षात आल्यानंतर समाज माध्यमांतून या योजनेची बदनामी करण्याचा आणखी एक प्रयत्न सध्या विरोधकांच्या माध्यमातून होत असल्याचे दिसून येत आहे. या योजनेचा काहीही उपयोग नाही, लोकांचेच पैसे लोकांना दिले यात नवल काय, महागाई वाढली अशी अनेक प्रश्नचिन्हे समाज माध्यमातून तसेच अन्य माध्यमातून उपस्थित केली जात आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत अनेक सरकारे येऊन गेली, काँग्रेसने जवळपास 65 वर्षे देशावर राज्य केले, पण एकाही सरकारला महिलांसाठी अशी योजना आणण्याची बुद्धी सुचलेली नाही. या उलट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची किसान सन्मान योजना दिमाखात सुरू आहे. आणि आता लाडकी बहीण योजना ही भाजपशासित विविध राज्यात अखंडित सुरू आहे.

भाजपकडून गोव्यात पहिल्यांदा योजना

महिलांच्या प्रश्नांना राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आणत, भाजप सरकारने देशात पहिल्यांदा लाडकी बहीण सारखी योजना राबवली. गोव्यामध्ये बारा वर्षांपूर्वी या योजनेची सुरवात झाली. नंतर भाजपने मध्यप्रदेश, छत्तीसगढ ओडिशा सारख्या राज्यांत ही योजना यशस्वीपणे राबवून दाखवली. या सर्व राज्यात कोणताही अडथळा न येता या योजनेची अंमलबजावणी झाली.. काँग्रेस शासित राज्यांमध्ये नियोजनाच्या अभावी अशा योजनांचा बोजवारा उडाल्याचे दिसून आले. भाजपने विविध राज्यात राबवलेल्या महिला विषयक योजनांमुळे महिलांना मोठ्या प्रमाणात लाभ झाला. मध्य प्रदेशातील कित्येक महिलांची उदाहरणे समोर आली आहेत. कोणी आपल्या लहान भावंडांच्या शिक्षणासाठी हा पैसा वापरला, तर कोणी यातून शिलाई मशीन विकत घेऊन आपले व्यवसाय सुरु केले. या योजनांनी महिलांना आत्मनिर्भर होण्यास मदत केली.

महाराष्ट्रातील महिलांकडून पैशांचा सदुपयोग

महाराष्ट्रातही रक्षाबंधनच्या मुहूर्तावर सुरु केलेल्या लाडकी बहीण योजनेचे भाऊबीजेपर्यंतचे ७,५०० महिलांच्या खात्यात थेट जमा झाले आहेत महाराष्ट्रातही महिलांनी या योजनेचे पैसे चांगल्या कारणासाठी वापरल्याची उदाहरणे आहेत. या योजनेच्या माध्यमातून कित्येक गृहिणींना उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण झाला आहे. किरकोळ करण्यासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची गरज आज महाराष्ट्रातील महिलाना उरलेली नाही. अनेक महिलांनी लाडकी बहीण योजनेच्या पैशातून छोटे छोटे स्वतःचे व्यवसाय सुरू केले आहेत. आणि त्यातून चांगला नफा देखील मिळवला आहे. अनेक महिलांनी या पैशाच्या माध्यमातून आपल्या मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळवून दिले आहेत. लाडकी बहीण योजनेतून युतीने महिलांना आत्मसन्मान मिळवून दिला आहे. आपल्या हक्काचे पैसे हाती असल्याने कित्यकांना आत्मविश्वास मिळतोय. आणि हा आत्मविश्वासच त्यांना नवी उमेद देत आहे.

विरोधकांनी कितीही कांगावा केला, योजनेची कितीही बदनामी केली, षड्यंत्र रचले, अविश्वास निर्माण केला तरी राज्यातले भाजप महायुती सरकार आपल्या बहिणींच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. विरोधकांनी उभे केलेले अडचणींचे डोंगर लिलया पार करून महायुती सरकारने आपल्या लाडक्या बहिणींच्या साथीने ही योजना यशस्वी करून दाखवली आहे.

AAI Bharti 2024 | भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी; एवढा मिळणार पगार

AAI Bharti 2024

AAI Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. ज्याचा फायदा आजपर्यंत अनेक उमेदवारांना झालेला आहे. आज देखील आम्ही नोकरीच्या अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI Bharti 2024) यांच्या अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत ग्रॅज्युएट अप्रेंटिस, डिप्लोमा अप्रेंटिस आयटीआय अप्रेंटिस या पदाचा रिक्त जागा आहेत. या पदाच्या एकूण 90 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. तसेच 20 नोव्हेंबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या तारखे अगोदरच अर्ज करा.

पदाचे नाव |AAI Bharti 2024

या भरती ग्रज्युएट ॲप्रेंटिस, डिप्लोमा ॲप्रेंटिस, आयटीआय ॲप्रेंटिस या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

पदसंख्या

या भरती अंतर्गत 90 जागा भरल्या जाणार आहेत.

वयोमर्यादा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 18 तर 26 वर्ष दरम्यान असणे गरजेचे आहे.

अर्ज पद्धती

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

20 नोव्हेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

वेतन श्रेणी | AAI Bharti 2024

  • ग्रॅज्युएट ॲप्रेंटिस 15,000/-
  • डिप्लोमा ॲप्रेंटिस 12,000/-
  • आयटीआय ॲप्रेंटिस 9,000/

अर्ज कसा करावा

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून देखील अर्ज करू शकता.
  • 20 नोव्हेंबर 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखेपर्यंत अर्ज करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

North Western Railway Bharti 2024 | उत्तर पश्चिम रेल्वे अंतर्गत 1791 पदांसाठी भरती सुरु; असा करा अर्ज

North Western Railway Bharti 2024

North Western Railway Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. त्याचा फायदा आजपर्यंत अनेक उमेदवारांना झालेला आहे. आज देखील आम्ही अशीच एक नोकरीची संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता उत्तर पश्चिम रेल्वे अंतर्गत (North Western Railway Bharti 2024) एक मोठी भरती निघालेली आहे. ही भरती शिकाऊ पदांसाठी आहे. या पदाच्या एकूण 1791 रिक्त जागा आहेत. आणि त्या रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अधिकृत वेबसाईटला भेट देऊन करावे लागणार आहेत. त्याचप्रमाणे 10 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखे अगोदरच अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव | North Western Railway Bharti 2024

या भरती अंतर्गत शिकाऊ पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

पदसंख्या

या भरती अंतर्गत शिकाऊ पदांच्या 1791 रिक्त जागा आहेत.

शैक्षणिक पात्रता | North Western Railway Bharti 2024

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार दहावी किंवा बारावी पास असणे गरजेचे आहे.

वयोमर्यादा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 15 ते 24 वर्ष दरम्यान असणे गरजेचे आहे.

अर्ज शुल्क

या भरतीचा अर्ज करण्यासाठी 100 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल.

अर्ज पद्धती

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे.

अर्ज सुरू होण्याची तारीख

10 नोव्हेंबर 2024 पासून या भरतीची अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

10 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अर्ज कसा करावा

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील अर्ज करू शकता.
  • 10 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

दारू पिल्यावर नशा का चढते? जाणून घ्या शास्त्रीय कारण

Alcohol

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अनेक लोक अल्कोहोलचे सेवन करतात. जगातील मद्यपान करणाऱ्या जवळपास 22 टक्के लोकांना मद्यपान केल्यानंतर नशा राहते. याला हँगओव्हर असे म्हणतात. काही लोकांनी जर रात्री पार्टीमध्ये मद्यपान केले, तर दुसऱ्या दिवसापर्यंत हँगओव्हर राहतो. परंतु हा हँगओव्हर सगळ्याच लोकांना होत नाही. काही लोकांना मद्यपान केल्यानंतर हँग ओव्हर होतो. तर काही लोकांना होत नाही. आणि याच भीतीमुळे अनेक लोक दुसऱ्या दिवशी जर ऑफिसला जायचे असेल, तर आदल्या दिवशी दारू देखील पित नाही. परंतु दारू पिल्यानंतर शरीरात असे कोणते बदल होतात? जेणेकरून आपल्याला नशा चढते? हे आज आपण जाणून घेणार आहोत.

आपण जेव्हा अल्कोहोलचे सेवन करतो. त्यावेळी आपल्या शरीरात काही जैविक आणि रासायनिक बदल होतातम हे बदल बराच वेळ आपल्या शरीरात राहतात. याला हँग ओव्हर असे म्हणतात. ज्यामुळे शरीरात विविध लक्षणे उद्भवतात. आता यामागे काय शास्त्रीय कारण आहे? हे आपण जाणून घेणार आहोत.

हँग ओव्हर झाल्यास शरीरात काय बदल होतात

डिहायड्रेशन

अल्कोहोलमुळे शरीरातील लघवीचे प्रमाण वाढते. म्हणजे शरीरातून जास्त पाणी बाहेर टाकले जाते. आणि शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाली की, डोकेदुखी तसेच तोंड कोरडे पडणे, थकवा येणे यांसारख्या समस्या जाणवतात.

रक्तातील साखरेची पातळी

अल्कोहोलचे सेवन केल्याने शरीरातील ग्लुकोजची म्हणजे साखरेची पातळी कमी होते. आणि ऊर्जेची कमतरता जाणवते. यामुळे अशक्तपणा येतो, चिडचिडेपणा येतो, थकवा जाणवतो तसेच मेंदूवर देखील याचा परिणाम होतो

जीवनसत्त्वे आणि खनिजांची कमतरता

अल्कोहोलचे सेवन केल्याने आपल्या शरीरातील बी जीवनसत्वे , पोटॅशियम यांसारखे आवश्यक तत्त्वे आणि खनिजे कमी होतात ज्यामुळे हँग ओव्हर जास्त वाढतो.

हँग ओव्हरची वैज्ञानिक कारणे कोणती?

आपण जेव्हा अल्कोहोलचे सेवन करतो. त्यावेळी आपल्या शरीरात त्याचप्रमाणे मेंदूमध्ये अधिक बदल होत असतात. तसेच अल्कोहोल आपल्या मज्जासंस्थेवर डिप्रेशन मिळून काम करते. म्हणजेच आपल्या मेंदूतील रासायनिक संदेश वाहकांवर याचा परिणाम होतो. याला न्युरोट्रान्समीटर असे म्हणतात. अल्कोहोलचे सेवन केल्यामुळे गामा, अमिनो ब्यूट्रिक ऍसिड वाढते. यामुळे आपल्याला अत्यंत शांत आणि आरामदायी वाटते. तसेच लुटामेट कमी करते. त्यामुळे आपले विचार कमी होतात आणि आपण शांत अवस्थेत पोहोचतो.

अल्कोहोलचा आपल्या शरीरावर प्रभाव संपला की, मेंदू संतुलन तयार करण्यासाठी जीएबीए तयार कमी करण्यासाठी आणि ग्लूटिन वाढवण्यासाठी प्रक्रिया सुरू करतो. हा बदल मेंदूवर उलटा पडतो. आणि अति उत्तेजित होतो. त्यामुळे त्या व्यक्तीला अस्वस्थता आणि चिंता जाणवते. मेंदू अधिक संवेदनशील होतो. आणि व्यक्तीच भीती आणि असुरक्षितता वाटू लागते.

गुगल मॅपची नवी माहिती; अशा पद्धतीने डिलीट करू शकता लोकेशन हिस्ट्री

Google Map

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | तंत्रज्ञानाने खूप जास्त प्रगती केलेली आहे. अगदी मोबाईलवर बसून आपल्याला सगळ्या गोष्टी समजतात. त्यातील सगळ्यात मोठी प्रगती म्हणजे गुगल मॅप. आपण एखाद्या ठिकाणी जे लोकेशन टाकू मोबाईल आपल्याला बरोबर त्या ठिकाणी घेऊन जात असते. या मोबाईल मॅपचा तुम्ही एखाद्या नवीन ठिकाणी गेल्यावर खूप जास्त फायदा होतो. तुम्हाला अगदी शॉर्टकट तसेच माहीत नसलेले रस्ते देखील या google मॅप मुळे माहित होतात.

गुगल मॅपवर आपण सगळी ठिकाणी सर्च करत असतो. परंतु google आपल्याला दिलेल्या या सगळ्या ठिकाणांची माहिती देखील ठेवत असतो. आपण कोणत्या तारखेला कुठे गेलो होतो? कोणत्या ठिकाण सर्च केलं होतं? याची सगळी माहिती आपल्या गुगल मॅप वर सेव होत असते. परंतु तुम्हाला जर ही माहिती इतर कोणालाही कळू द्यायची नसेल. तर तुम्हाला गुगल मॅप वरून ही माहिती डिलीट देखील करता येतील.

परंतु गुगल मॅप वर सेव्ह केलेली माहिती डिलीट कशी करायची? याबद्दलची माहिती अनेकांना नसते. आता आम्ही तुम्हाला गुगल मॅप वरील लोकेशनची सर्च हिस्ट्री तसेच इतर अनेक गोष्टी कशा पद्धतीने डिलीट करता येणार आहेत, हे सांगणार आहोत. यासाठी तुम्हाला प्रायव्हसी सेटिंग देखील दिली जाते. यातून तुम्ही तुमची हिस्ट्री डिलीट करू शकता.

तुम्ही गुगल मॅपवरील प्रायव्हसी फीचर्सचा वापर करून तुम्ही सहज केलेली ठिकाणे, तुमचे हिस्ट्री डिलीट करू शकता. कारण आता गुगल मॅपवरील एक फ्लायओवर फीचर येण्यापूर्वी तुम्हाला ही माहिती देणार आहे. त्यामुळे तुम्हाला कळेल की आपल्याला कोणता फ्लॉयओव्हर घ्यावा लागणार आहे. याशिवाय गुगल मॅप अपने अनेक नवीन फीचर्स अपडेट करून जोडलेली आहे गुगल मॅप सुविधा खूप उपयुक्त आहे.

आजपासून मुंबईहून ‘या’ शहरासाठी सुटणार विशेष रेल्वे ; 20 स्थानकांमध्ये घेणार थांबे, जाणून घ्या

bandra -hisar

मुंबईमध्ये काम करणाऱ्या प्रत्येकासाठी लोकल आणि रेल्वे सेवा ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते. दररोज लाखो लोक लोकल आणि रेल्वेने प्रवास करत असतात. अशातच तुम्ही देखील मुंबईमध्ये रेल्वेने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. पश्चिम रेल्वे आज पासून म्हणजेच दिनांक 11 नोव्हेंबर पासून विशेष गाड्या चालवणार आहे. यामध्ये मुंबई येथील वांद्रे टर्मिनस इथून नवीन गाडी आजपासून सुरू होणार आहे आणि या गाडीच्या दोन फेऱ्या होणार आहेत.

मुंबई ते हिसार दरम्यान ही गाडी चालवली जाणार असून वांद्रे टर्मिनस ते हिसार अशी एक फेरी आणि हिसार ते वांद्रे टर्मिनस अशी एक फेरी अशा या गाडीच्या दोन फेऱ्या असतील.

कसे असेल वेळापत्रक ?

मिळालेल्या माहितीनुसार ट्रेन क्रमांक 04725 हिस्सार-वांद्रे टर्मिनस सुपरफास्ट स्पेशल हिसारहून सोमवार, 11 नोव्हेंबर 2024 रोजी 05.50 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 07.20 वाजता वांद्रे टर्मिनसला पोहोचणार आहे.

या गाडीची फक्त एक फेरी होणार आहे. तसेच गाडी क्रमांक 04726 वांद्रे टर्मिनस-हिसार सुपरफास्ट स्पेशल ट्रेन वांद्रे टर्मिनस येथून मंगळवार, 12 नोव्हेंबर 2024 रोजी 09.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 11.10 वाजता हिसारला पोहोचणार आहे.

‘या’ स्थानकांवर घेणार थांबे

बोरिवली, वापी, सुरत, भरूच, वडोदरा, गोध्रा, रतलाम, नागदा, भवानी मंडी, कोटा, सवाई माधोपूर, दुर्गापुरा, जयपूर, रिंगास, सीकर, नवलगढ, झुंझुनू, चिरावा, लोहारू आणि सादुलपूर स्थानकावर थांबा घेणार आहे.

बाप रे! तब्बल 23 कोटींचा रेडा; खुराकात खातो काजू आणि बदाम, कोणती आहे जात?

Buffelo

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल अनेक लोक हे पाळीव प्राणी पाळतात. या पाळीव प्राणी पाळण्याची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. परंतु आजकाल अनेक लोक रेडा देखील पाळतात. आणि या रेड्याची किंमत बाजारात खूप जास्त आहे. तुमच्या डोळ्यांवर तुम्हाला विश्वास मिळणार नाही. एवढी किंमत तुम्हाला या रेड्यासाठी मोजावी लागते. जर तुमच्याकडे रेडा असेल आणि तो जर कोणाला विकत घ्यायचा असेल? तर तुम्ही कोट्याधीश झालाच म्हणून समजा.

अनेक पशु मेळावे देखील होत असतात. आणि अशातच आता राजस्थान आंतरराष्ट्रीय पुष्कर पशु मेळाव्याला सुरुवात झालेली आहे. अजमेर पासून 15 किलोमीटर अंतरावर हा मेळावा आहे. हा मेळावा 9 ते 15 नोव्हेंबर पर्यंत चालू आहे. आणि या काळात या ठिकाणी विविध प्रजातींचे प्राणी विक्रीसाठी ठेवले जातात. अनेक राज्यातून लोक या ठिकाणी येतात. आणि त्यांना पाहिजे ते प्राणी घेऊन जातात. परंतु या मेळाव्यामध्ये हरियाणाच्या अनमोल नावाच्या रेड्याची मोठ्या प्रमाणात चर्चा चालू झालेली आहे. हा रेडा या मेळाव्याचा एक केंद्रबिंदू ठरलेला आहे. फक्त या रेड्याला पाहण्यासाठी अनेक लोक दूर राज्यातून देखील येत आहे.

अनमोल या रेड्याच्या मालकाचे नाव पलविंदर सिंग असे आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा रेडा मुर्रा प्रजातीचा आहे. तो सध्या आठ वर्षाचा आहे. आणि त्याचा खुराक देखील खूप जास्त आहे. या रेड्याला दररोज जवळपास 1500 रुपयांचा खर्च लागतो. तो ताजी फळे, काजू आणि बदाम देखील खातो.

अनमोलची किंमत किती

या मेळाव्याच्या वेळी अनमोलचे मालक पलविंदर सिंग यांनी सांगितले की, “अनमोलला सध्या बाजारात प्रचंड मागणी आहे. दररोज त्याच्यासाठी अनेक ग्राहक विचारणा करतात. खरंतर मुर्रा प्रजातीचा सर्वच रेड्यांची चांगली किंमत मिळते. त्यात अनमोल दिसायला खूपच रुबाबदार आणि ताकदवान आहे. त्यामुळे त्याची किंमत तब्बल 23 कोटी एवढी आहे. परंतु मी त्याला कधीच विकण्याचा प्रयत्न केला नाही. आणि भविष्यात देखील त्याला विकणार नाही. मी त्याला अगदी भावासारखे वाढवला आहे. आणि तो आता माझ्या कुटुंबाचा एक भाग आहे.”

अनमोलच्या शुक्राणूंना मोठी मागणी!

अनमोल ला सध्या बाजारात खूप जास्त मागणी आहे. तरी देखील पलविंदर सिंग त्याची विक्री करत नाही. तर तो कसा रुबाबदार आणि सुदृढ दिसेल याकडे ते स्वतःच्या खिशातून खर्च करत असतात. त्याचा दररोजचा खर्च देखील भागवत असतात. सध्या बाजारामध्ये अनमोलच्या शुक्राणूंना देखील खूप जास्त मागणी आहे. या प्रजातीचे आणखी रेडी आणि म्हशी जन्माला याव्यात यासाठी हे शुक्राणू खरेदी केले जातात.

आज पुन्हा घसरले सोन्याचे दर ; पहा 22,24 आणि 18 कॅरेट सोन्याचे दर

golda rate 11-11

मागच्या दोन चार दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण झालेली पाहायला मिळत आहे. आज सोमवारी पुन्हा सोन्याच्या दरात 600 रुपयांनी तर चांदीच्या दरात 1000 रुपयांनी घसरण झाली आहे. नवीन दरांनंतर सोन्याचा दर 78,000 रुपये आणि चांदीचा दर 93,000 रुपयांवर पोहोचला आहे.

सोमवारी सराफा बाजाराने जाहीर केलेल्या सोन्या-चांदीच्या नवीन किमतींनुसार, आज 11 नोव्हेंबर 2024 रोजी, 22 कॅरेट सोन्याची किंमत 72,350 रुपये, 24 कॅरेटची किंमत 78,910 रुपये आणि 18 ग्रॅमची किंमत रु. ५९,२००. 1 किलो चांदीची किंमत 93,000 रुपये आहे. वेगवेगळ्या शहरांमध्ये 18, 22 आणि 24 कॅरेट सोन्याच्या किंमती जाणून घेऊया.

24 कॅरेट

आज एक ग्रॅम 24 कॅरेट सोनं तुम्हाला घ्यायचा असेल तर राज्यामध्ये त्याचा दर 7876 रुपये इतका आहे. तर दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा आजचा दर 78,760 रुपये इतका आहे.

22 कॅरेट

जर तुम्हाला बावीस कॅरेट सोनं एक ग्रॅम खरेदी करायचे असेल तर तुम्हाला आज राज्यात 7220 मोजावे लागतील. शिवाय बावीस कॅरेट दहा ग्राम सोन्याचा आजचा दर 72 हजार दोनशे रुपये इतका आहे.

18 ग्रॅम

तर 18 ग्रॅम एक कॅरेट सोन्याचा आजचा दर पाच हजार नऊशे सात रुपये इतका आहे आणि दहा ग्रॅम 18 कॅरेट सोन्याचा आजचा दर 59 हजार 70 रुपये इतका आहे.

सोने खरेदी करण्यापूर्वी शुद्धता कशी जाणून घ्यावी

  • सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात.
  • 24 कॅरेट सोने 99.9 टक्के शुद्ध आणि 22 कॅरेट सोने अंदाजे 91 टक्के शुद्ध आहे.
  • 24 कॅरेट सोन्यामध्ये 1.0 शुद्धता असावी (24/24 = 1.00). सोन्याचे वर्गीकरण ९९९.९ शुद्धता (२४ कॅरेट) असे केले जाते.
  • साधारणपणे 20 आणि 22 कॅरेटमध्ये सोने विकले जाते, तर काही लोक दागिन्यांसाठी ते खरेदी करतात.
  • 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 असे लिहिलेले असते.
  • 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यासारखे 9% इतर धातू मिसळून दागिने तयार केले जातात.