Monday, December 29, 2025
Home Blog Page 379

सिडकोच्या घरांसाठी अर्ज भरण्याची मुदतवाढ; ही आहे शेवटची तारीख

Cidco

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्या स्वतःचे हक्काचे घर असावे. असे प्रत्येक सर्वसामान्य माणसाचे स्वप्न असते. आणि त्यांचे हे स्वप्न साकार करण्यासाठी सीडीको महानिर्वाण ही योजना सर्वसामान्य नागरिकांना हातभार लावत असतात. आता या योजनेअंतर्गत घरांची नोंदणी करण्यासाठी सीडीकोने त्यांच्या नोंदणी प्रक्रियेत मुदत वाढ केलेली आहे. या सिडको अंतर्गत घर मिळण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करावी लागते. परंतु जर काही कारणांमुळे तुम्ही अजूनही ऑनलाईन पद्धतीने अर्ज केले नसेल, तर आता त्या लोकांसाठी ही एक चांगली संधी आहे. कारण सीडीकोने त्यांच्या अर्ज करण्याच्या प्रक्रियेमध्ये वाढ केलेली आहे.

सिडीकोच्या माध्यमातून आता शहरातील विविध नोट मधील 27 ठिकाणी जवळपास 60 हजार घरे बांधली जात आहे. त्यातील पहिल्या टप्प्यात 43 हजार घरांना महारेरा परवानगी मिळालेली आहे. आणि बांधकाम देखील आता चांगलेच प्रगतीवर आलेले आहे. त्यातील आता 26000 घरांची योजना 11 ऑक्टोबर पासून सुरु झाली आहे आणि त्या ऑनलाईन नोंदणी करण्याची मुदत 11 नोव्हेंबर पर्यंत होती. परंतु आता अर्ज करण्याची शेवटची तारीख सीडीकोने वाढवलेली आहे. त्यामुळे तुम्ही अजूनही अर्ज करू शकता.

ज्या लोकांनी अर्ज केले नाहीत, त्यांनी लवकरात लवकर नोंदणी करा. दिवाळी आणि निवडणुकांमुळे अनेक लोकांना अर्ज करता आलेले नाहीत. परंतु आता सीडीकोने अर्ज करण्याची प्रक्रिया 11 डिसेंबर पर्यंत वाढवलेली आहे. त्यामुळे अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे अजून एक महिना आहे. कालपर्यंत जवळपास 81,900 ग्राहकांनी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी केलेली आहे. तसेच 22100 ग्राहकांनी अर्ज नोंदणी शुल्क देखील भरलेली आहे. परंतु आता अर्ज भरण्याला अजून एक महिना आहे. त्यामुळे यापेक्षाही खूप जास्त अर्ज प्राप्त होऊ शकतात. अशी आशा सिडीकोने व्यक्त केली आहे.

National Education Day | 11 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय शिक्षण दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास

National Education Day

National Education Day | आपल्या आयुष्यात शिक्षणाला खूप जास्त महत्त्व आहे. शिक्षणामुळेच आपला देश प्रगती प्रगती आहे. तसेच माणसाची प्रगती होते, सुसंस्कृत होतो. शिक्षणाच्या आधारावरच आजकाल मानवाची गुणवत्ता ठरवली जाते. माणूस जेवढा शिकतो तेवढा तो जास्त बुद्धिमान होतो. आणि याच शिक्षणाचा आदर करण्यासाठी दरवर्षी 11 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय शिक्षण दिन (National Education Day) साजरा केला जातो.

2008 पासून हा राष्ट्रीय शिक्षण दिन (National Education Day) साजरा करण्यास सुरुवात झालेली आहे. संपूर्ण देशात शिक्षणाबाबतची जनजागृती व्हावी. तळागाळातील अगदी गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटावे. आणि त्यांनी शिक्षण घ्यावे यासाठी हा राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा केला जातो. शाळा, कॉलेज आणि शैक्षणिक संस्थांमध्ये हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. पण हा राष्ट्रीय शिक्षण दिनानिमित्त आज आपण त्याचा इतिहास समजून घेणार आहोत.

राष्ट्रीय शिक्षण दिनाची सुरूवात | National Education Day

भारत स्वतंत्र झाल्यानंतर मौलाना अबुल कलाम हे आपल्या स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री होते. 5 ऑगस्ट 1947 ते 2 फेब्रुवारी 1958 पर्यंत ते भारताचे शिक्षण मंत्री होते. त्यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांचे खूप जास्त योगदान योगदान दिलेले आहेत. आणि अनेक नवीन बदल देखील केलेले आहेत. त्यांच्या काळात त्यांनी विविध साहित्य, अकादमी, ललित कला आणि संगीत नाटक यांची स्थापना केलेली आहे. 11 नोव्हेंबरला त्यांची जयंती अस.ते आणि त्यांच्या या कार्याचे कौतुक करण्यासाठी आणि संपूर्ण देशात शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

मौलाना अबुल कलाम आझाद कोण होते?

मौलाना अबुल कलाम हे महान स्वतंत्र सैनिक शिक्षण तज्ञ पत्रकाराने एक चांगले उत्कृष्ट होते. त्यांचा जन्म 11 नोव्हेंबर 1888 रोजी झाला होता. ते गांधीजींचे समर्थक होते. त्यांनी जवळपास दहा वर्ष भारताचे शिक्षणमंत्रीपद भूषवले आहे. 22 फेब्रुवारी 1958 रोजी त्यांचे निधन झाले. त्यांनी केलेल्या कार्याची माहिती संपूर्ण देशाला व्हावी. तसेच शिक्षणाचे महत्त्व पटावे. यासाठी त्यांच्या जन्मदिवसाच्या दिवशी म्हणजेच आज 11 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा केला जातो.

राष्ट्रीय शिक्षण दिनाचे महत्त्व | National Education Day

आजकाल प्रत्येकासाठी शिक्षण खूप महत्त्वाचे आहे. शिक्षण हे व्यक्ती आणि समाजामध्ये एक पारदर्शकता आणते. आणि एक महत्त्वाची भूमिका बजावते. शिक्षणाबद्दल अधिकाधिक जागृती निर्माण व्हावी. आणि शिक्षणाच्या प्रवाहात प्रत्येकाने सामील व्हावे. यासाठी हा राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा केला जातो.

अशाप्रकारे आधार कार्डला लिंक करा मोबाईल नंबर; जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

Adhar Card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | प्रत्येक भारतीयांसाठी आधार कार्ड हे सगळ्यात महत्त्वाचे असे डॉक्युमेंट आहे. आपल्या भारतीय नागरिकत्वाचा हा एक महत्त्वाचा आपला ओळखीचा पुरावा आहे. त्यामुळे प्रत्येक कामात आपल्याला आधार कार्ड लागतेच. अगदी शाळांपासून ते सरकारी कामांकरिता आधार कार्ड लागते. आधार कार्डवर आपली बायोमेट्रिक इन्फॉर्मेशन असते. आपला पत्ता,लिंग त्याचप्रमाणे मोबाईल नंबर या सगळ्याची माहिती असते. ज्यावेळी आपण कोणत्याही ठिकाणी आपल्या आधार कार्ड जमा करतो. त्यावेळी लॉगिन केल्यानंतर त्यांना एक ओटीपीची गरज असते. आपल्या ओटीपीशिवाय आपल्याला आधार कार्ड कुठेही लॉगिन करता येत नाही.

आणि आधार कार्डचा हा ओटीपी येण्यासाठी आपल्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे खूप गरजेचे असते. जर तुमच्या आधार कार्डसोबत तुमचा मोबाईल नंबर लिंक नसेल तर अनेक समस्या येतात. त्यामुळे जर तुमच्या आधार कार्ड लिंक नसेल, तर ते आत्ताच लिंक करून घ्या. यासाठी तुम्हाला जास्त पैसे देण्याची देखील गरज नसते. अगदी कमी पैशांमध्ये तुम्ही हे काम करू शकता. आता मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक कसा करायचा? याची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर जर लिंक नसेल तर तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. तुम्हाला अनेक बँकिंग सेवा उपलब्ध होत नाही. तसेच मोबाईलच्या सेवा देखील मिळत नाही. कारण आधार कार्ड कुठल्याही कामाची लिंक करताना त्याचा ओटीपी द्यावा लागतो. आणि तो ओटीपी आपल्या मोबाईल नंबर वर येत असतो.

आधार कार्डला मोबाईल नंबर कसा लिंक करायचा ?

आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी अधिकृत वेबसाईटला जावे लागेल. आणि अपॉइंटमेंट घ्यावी लागेल. त्यानंतर तुम्हाला बायोमेट्रिक डिटेलसाठी नोंदणी केंद्रावर जाऊन त्यासाठी प्रक्रिया करावी लागेल.तुम्ही ऑनलाईन अपॉइंटमेंट घेतल्यानंतर केवळ आधार नोंदणी केंद्रावर जाऊन तुमची बायोमेट्रिक डिटेल्स द्यावे लागणार आहे. आणि हे काम ऑफलाइन केले असेल, तर सर्व कागदपत्र सोबत जोडावी लागणार आहे. यासाठी जास्त वेळ देखील लागणार नाही.

Intestine Swelling | आतड्यांमध्ये सूज आल्यास दिसतात ‘ही’ लक्षणे; दुर्लक्ष न करता त्वरित घ्या उपचार

Intestine Swelling

Intestine Swelling | आजकालच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे खूप गरजेचे असते. अन्यथा पुढे जाऊन आपल्याला मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागते. आपण छोट्या-मोठ्या दुखापतींकडे दुर्लक्ष करतो. परंतु नंतर जाऊन त्याच एका मोठ्या गंभीर आजाराचे रूप धारण करतात. आतडे हा आपल्या शरीराचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. आपले अन्न पचण्यासाठी आपल्या आतडे महत्त्वाचे असते. अन्नाचे पचन करणे यासारखी महत्त्वाची कामे आतडे करतात.

जर तुमच्या आतड्याला कोणत्याही प्रकारचा त्रास झाला, तर थेट परिणाम तुमच्या आरोग्यावर होतो. जसे की, बॅक्टेरियाचा संसर्ग असंतुलित आहार, अल्सरेटिव्ह यांसारख्या अनेक आजारांमुळे आतड्यांमध्ये समस्या उद्भवतात. आणि यामुळे माणसाचे पचन देखील नीट होत नाही. आणि शरीराला वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावे लागते. त्यामुळे आपल्या आतड्या संबंधित काही समस्या असतील, तर त्या वेळेवर ओळखणे आणि त्यावर योग्य उपचार घेणे खूप गरजेचे आहे. आता आतड्यांमध्ये (Intestine Swelling) काही बिघाड झाल्यास तुम्हाला कोणती लक्षणे दिसतात? हे आज आपण जाणून घेणार आहे.

पोटदुखी आणि गोळे येणे | Intestine Swelling

ज्यावेळी तुमच्या आतड्यांना सूज येते. त्यावेळी पोटात खूप जास्त वेदना होतात. आणि गोळे येतात. ही वेदना ओटी पोटात वेदना होतात. जेव्हा आपण कोणताही पदार्थ खातो. तेव्हा पोटातील दुखणे जास्त वाढते. जर तुम्हाला देखील अशी समस्या उद्भवत असेल, तर तुम्ही लवकरात लवकर डॉक्टरांशी संपर्क साधा.

अतिसार

आजकाल बाहेरील पदार्थ जास्त प्रमाणात खाण्याचे प्रमाण वाढलेले आहे. आणि यामुळेच तुम्हाला जुलाबाची समस्या होते. अनेक वेळा लोक ही सामान्य समस्या आहे, असे समजून याकडे दुर्लक्ष करतात. परंतु जर तुम्हाला खूप दिवसापासून असा त्रास होत असेल आणि आतड्यांमध्ये जळजळ होत असेल. त्यावेळी तुमच्या आठवड्यात सूज येत असते. आणि याचा परिणाम तुमच्या पचन प्रक्रियेवर झालेला असतो. त्यामुळेच डायरीयाची समस्या देखील होऊ शकते.

शौचामधून रक्तस्त्राव

जर तुमच्या आतड्यात कोणत्याही प्रकारचा बिघड झाला असेल किंवा जळजळ झाली असेल, तर तुमच्या शौचासह रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते. यावेळी गुदशय भागात देखील खूप वेदना होतात. आणि आतड्याच्या हालचाली देखील वेदनादायक असतात. हे अत्यंत गंभीर लक्षण आहे. त्यामुळे याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका

थकवा आणि अशक्तपणा | Intestine Swelling

ज्यावेळी आपल्या आतड्यांना सूज येते. किंवा जळजळ होते. त्यावेळी आपल्याला सतत थकवा जाणवतो आणि अशक्तपणा येतो. आतड्यांमध्ये जळजळ झाल्याने पोषक तत्त्वावर त्याचा परिणाम होतो. आणि तुम्हाला थकवा येतो. अशी लक्षणे दिसत असतील तर तुम्ही डॉक्टरांचे संपर्क साधा.

HDFC Bank Home Loan | HDFC बँकेकडून गृहकर्ज घेण्यासाठी किती पगार असायला पाहिजे? जाणून घ्या संपूर्ण माहिती

HDFC Bank Home Loan

HDFC Bank Home Loan | आपलं स्वतःचं एक हक्काचं घर असावं. हे प्रत्येक माणसाचं स्वप्न असतं. आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक जण अहोरात्र प्रयत्न करत असतात. आजकाल घरांच्या किमती देखील मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. आणि एक रकमी एवढे पैसे घरामध्ये गुंतवायला लोकांना शक्य होत नाही. त्यामुळे अनेक लोक गृह कर्जाचा (HDFC Bank Home Loan) सहारा घेतात. अनेक तज्ञ लोकांनी देखील सर्वसामान्य लोकांना गृह कर्ज घेऊनच घर खरेदी करण्याचा सल्ला दिलेला आहे. आता देशात अशा अनेक बँका आहेत, ज्या सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरामध्ये गृहकर्ज देतात.

गृहकर्ज देण्याचे प्रत्येक बँकेचे वेगवेगळे व्याजदर आहे. त्यात एचडीएफसी ही एक अशी बँक आहे. जी त्यांच्या ग्राहकांना अत्यंत परवडणाऱ्या आणि स्वस्त व्याजदरात गृह कर्ज देत असते. परंतु हे गृह कर्ज आपल्याला मिळणाऱ्या महिन्याच्या पगारावर अवलंबून असते. आज आपण एचडीएफसी बँकेकडून तुम्हाला जर कर्ज घ्यायचे असे,ल तर त्यासाठी तुम्हाला किती पगार असणे गरजेचे आहे? त्यावर तुम्हाला किती अर्ज मिळेल? याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

एचडीएफसी बँकेच्या गृह कर्जाची माहिती | HDFC Bank Home Loan

एचडीएफसी बँक ही त्यांच्या ग्राहकांना 9.40 ते 9.95 या व्याजदरामध्ये गृह कर्ज देत असते. तसेच स्पेशल व्याजदर हे 8.75 टक्क्यांपासून सुरू होते. परंतु या स्पेशल व्याजदरचा फायदा फक्त त्याच लोकांना मिळतो. ज्यांचा सिबील स्कोर चांगला आहे. ज्या लोकांचा सिबील स्कोर 800 च्या आसपास आहे. त्या ग्राहकांना या स्पेशल गृह कर्जाचा लाभ मिळतो.

जर तुम्हाला एचडीएफसी बँकेकडून 30 वर्षासाठी 60 लाख रुपयांचे गृह कर्ज मिळाले. तर स्पेशल व्याजदर 8.75 च्या दराने त्या व्यक्तीला दर महिन्याला 40,202 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागेल. म्हणजेच त्या कर्जदाराला एकूण 1 कोटी 40 लाख 72 हजार 720 रुपये बँकेला द्यावे लागणार आहे. म्हणजेच 84 लाख 72 हजार 720 रुपये त्या व्यक्तीला केवळ व्याज म्हणून भरावे लागणार आहे.

किती पगार असल्यास 60 लाखाचे कर्ज मिळणार ? | HDFC Bank Home Loan

तुम्हाला जर बँकेकडून 60 लाख रुपयांचे कर्ज मिळवायचे असेल तर सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला दर महिन्याला कमीत कमी 94,404 रुपये पगार असणे गरजेचे आहे. जर तुम्हाला महिन्याला 1 लाख रुपयांच्या आसपास पगार असेल. आणि तुमच्या डोक्यावर आधीपासून कोणत्याही प्रकारचे कर्ज नसेल, तर एचडीएफसी बँक तुमच्यासाठी 60 लाख रुपयांच्या गृह कर्ज लगेच मंजूर करते.

Bussiness Idea | हे व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकारकडून मिळते सबसिडी; महिन्याला होईल लाखोंनी कमाई

Bussiness Idea

Bussiness Idea | तुम्हाला जर स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा असेल आणि तुम्हाला कोणता व्यवसाय सुरु करावा हे समजत नसेल तर आज आम्ही तुमच्यासाठी व्यवसायाच्या काही संधी सांगणार आहोत. ज्यामध्ये सरकार देखील तुम्हाला मदत करणार आहे. आज आम्ही तुमच्यासाठी अशा 2 छोट्या व्यवसायाच्या कल्पना आणल्या आहेत, ज्यासाठी भारत सरकारकडून आर्थिक मदत देखील दिली जाते, ज्यासाठी तुम्हाला सरकारच्या मुद्रा योजनेमध्ये अर्ज करावा लागेल. या योजनेमुळे सरकार छोट्या व्यावसायिकांना 75 ते 80 टक्के कर्ज देते. या कर्जावरील व्याजदर इतर कर्जाच्या तुलनेत 1 ते 2 टक्के स्वस्त आहे.या छोट्या व्यवसायासाठी (Bussiness Idea) तुम्हाला फक्त 2 ते 3 लाख रुपयांची छोटी गुंतवणूक करावी लागेल. हा व्यवसाय तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. चला जाणून घेऊया या व्यवसायांबद्दल सविस्तर

पापड व्यवसाय | Bussiness Idea

प्रधानमंत्री मुद्रा योजनेंतर्गत तुम्ही पापड बनवण्याचा व्यवसाय अल्प प्रमाणात सुरू करू शकता. यामध्ये तुमची सुरुवातीची गुंतवणूक 2.05 लाख रुपयांपर्यंत असू शकते, ज्यामध्ये सरकार पापड युनिट उघडण्यासाठी 8.18 लाख रुपयांपर्यंत कर्ज देते. याशिवाय तुम्हाला उद्योजक सपोर्ट स्कीम अंतर्गत सरकारकडून 1.91 लाख रुपयांची सबसिडी देखील मिळेल.

करी आणि तांदूळ पावडरचा व्यवसाय | Bussiness Idea

देशात करी आणि तांदूळ पावडरची मागणी काळानुरूप सातत्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत करी पावडरचा व्यवसाय तुमच्यासाठी खूप फायदेशीर सौदा ठरू शकतो. यामध्ये तुम्हाला प्रथम 1.66 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करावी लागेल. यावर तुम्ही मुद्रा योजने अंतर्गत बँकेकडून 3.32 लाख रुपयांचे मुदत कर्ज आणि 1.68 लाख रुपयांचे खेळते भांडवल कर्ज देखील घेऊ शकता. हा व्यवसाय (Bussiness Idea) सुरू करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या अनुभवाची गरज भासणार नाही.

BSNL New Plan | BSNL ने आणला सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन; 150 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह मिळणार हे फायदे

BSNL New Plan

BSNL New Plan | यावर्षी जुलै महिन्यामध्ये अनेक खाजगी टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या रिचार्ज दरात वाढ केलेली आहे. त्यामुळे अनेक ग्राहक देखील नाराज झालेले आहेत. आणि तेव्हापासून बीएसएनएल कंपनीचे चांगले दिवस यायला लागलेले आहेत. बीएसएनएल ही एक सरकारी ही कंपनी आहे. आणि गेल्या काही महिन्यांपासून बीएसएनएलच्या ग्राहकांमध्ये खूप जास्त वाढ झालेली आहे. जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांमध्ये 50 लाख नवीन बीएसएनएल सोबत जोडले गेलेले आहेत. आता बीएसएनएल त्यांच्या ग्राहकांना टिकून ठेवण्यासाठी नवनवीन रिचार्ज प्लॅन लॉन्च करत असते.

तुम्ही तर bsnl चे (BSNL New Plan) ग्राहक असाल तर तुमच्यासाठी कंपनीने एक नवीन प्लॅन आणला आहे. त्यामध्ये तुमचे सिम रिचार्ज न करता देखील पाच महिने ऍक्टिव्ह राहू शकेल. जर तुम्हाला तुमच्या रिचार्ज प्लॅनमध्ये जास्त पैसे खर्च करायचे नसेल, तर हा प्लॅन तुमच्यासाठी अत्यंत चांगला आहे .

बीएसएनएलचा 150 दिवसांचा प्लॅन | BSNL New Plan

बीएसएनएलने त्यांच्या ग्राहकांसाठी नवीन 150 दिवसांचा व्हॅलिडीटी असलेला रिचार्ज प्लॅन आणला आहे. बीएसएनएलच्या या प्लॅनची सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे याची व्हॅलीडिटी जास्त आहे. त्यामुळे तुम्हाला जास्त पाहिजे पैसे खर्च करावे लागणार नाही. आता आपण या प्लॅनची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

बीएसएनएलच्या ग्राहकांसाठी एक चांगला प्लॅन कंपनीने लॉन्च केला आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना मोफत कॉलिंग, डेटा आणि एसएमएस सुविधा देत आहे. या प्रीपेड प्लॅनची किंमत 400 रुपयांपेक्षा कमी आहे. हा प्लॅन तुम्हाला केवळ 397 मध्ये खरेदी करता येईल. आणि या प्लॅनची व्हॅलिडीटी दीडशे दिवसांची आहे.

या प्लॅनच्या पहिल्या 30 दिवसांमध्ये तुम्हाला इंटरनेट आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. तसेच पहिल्या 30 दिवसांमध्ये डेटाचे देखील अनेक फायदे आहेत. कंपनी त्यांच्या ग्राहकांना 30 दिवसांसाठी दररोज 2 जीबी डेटा ऑफर करते. तसेच डेटा लिमिट संपल्यावर देखील तुम्हाला 40 केबीपीएसच्या वेगाने इंटरनेट वापरता येईल. तुम्हाला मोफत कॉलिंग आणि डेटासह 100 मोफत एसएमएसचा देखील लाभ मिळणार आहे.

Saree Cancer | महिलांप्रमाणे पुरुषांनाही साडी कॅन्सरचा धोका; संशोधनात आली नवी माहिती समोर

Saree Cancer

Saree Cancer | आजकाल लोकांची जीवनशैली बदलत चालल्यामुळे अनेक आजारांचा धोका देखील वाढलेला आहे. त्यात कॅन्सरचा धोका मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. कॅन्सरचे अनेक प्रकार आहेत. कॅन्सरचे नाव घेतले, तरी अनेक लोकांना भीती वाटते. महिलांमध्ये आता एका नवीन कॅन्सरची भीती निर्माण झाली आहे. तो म्हणजे साडी कॅन्सर. (Saree Cancer) हा कॅन्सर महिलांमध्ये दिसून येतो. ज्या महिला वर्षांपासून घालत असतात. त्यांना या कॅन्सरचे निदान झाल्याची माहिती समोर आली आहे. परंतु हाती आलेल्या माहितीनुसार पुरुष देखील या साडी कॅन्सरला बळी पडत आहेत. आता याबद्दल आरोग्य तज्ञ काय म्हणतात? हे आज आपण जाणून घेणार आहोत.

साडी कॅन्सर हा एक नवीन प्रकारचा कॅन्सर आहे. भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रिया गेल्या अनेक वर्षापासून साडी नेसतात. त्यामुळे त्यांना हा कॅन्सर होतो. परंतु महिलांसोबत पुरुषांनाही आता साडी कॅन्सरचे निदान झालेले आहे. साडीच्या कर्करोगाचा संबंध हा साडीशी नसून साडी खाली घातल्या जाणाऱ्या पेटिकोटशी आहे. 1945 मध्ये धोती कॅन्सर नावाचा कॅन्सर आला होता. पुरुषांनी कमरेला घट्ट धोतर बांधल्याने हा कॅन्सर होत होता. त्याचप्रमाणे आता घट्ट पेटिकोट किंवा घट्ट जीन्स घातल्यामुळे देखील हा कर्करोग होत आहे.

2011 मध्ये या बाबतची 2 प्रकरणे देशात आढळली होती. घट्ट साडी बांधल्याने कमरेच्या त्वचेखाली जखमा होतात. त्यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो. साडीच्या या कर्करोगाला वैद्यकीय भाषेत वेस्ट लाईन कॅन्सर असे देखील म्हणतात. हा त्वचेच्या कर्करोगाचा एक प्रकार आहे. तज्ञांच्या मते जेव्हा आपण घट्ट पेटीकोट, साडी किंवा जीन्स घटल्यो. तेव्हा खूप जळजळ आणि खाज सुटते. त्याचबरोबर जास्त वेळ घट्ट कमरेला असल्याने त्वचेवर जखमा तयार होतात. आणि त्याचमुळे साडीचा कॅन्सर होऊ शकतो. आता महिलाप्रमाणे पुरुषांना देखील या कर्करोगाचा धक्का आहे.

तुमचा मोबाईल खरंच वॉटरप्रूफ आहे का? अशाप्रकारे करा चेक

WaterProof Mobile

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अन्न, वस्त्र, निवारा याप्रमाणे आजकाल मोबाईल देखील खूप गरजेचा असतो. प्रत्येक ठिकाणी मोबाईलचा वापर केला जातो. तरुण पिढी तर मोबाईल शिवाय देखील राहत नाही. त्यांना सतत त्यांचा मोबाईल त्यांच्यासोबत असावा लागतो. परंतु मोबाईल बाळगताना अनेक वेळा त्याबत पाणी सांडले किंवा पाण्यात मोबाईल पडल्याच्या घटना घडलेल्या आहेत. परंतु यासाठी तुमचा मोबाईल वॉटरप्रूफ असणे खूप गरजेचे असते. परंतु वॉटरप्रूफ म्हणजे तुमच्या मोबाईलला कितपत संरक्षण मिळते ? आणि ते कसे तपासायचे? हे जाणून घेणे देखील खूप गरजेचे आहे. आज आपण जाणून घेणार आहोत.

तुमचा मोबाईल वॉटरप्रूफ आहे की नाही? आणि किती प्रमाणात आहे? हे त्याच्या IP रेटिंग वरून तपासता येतो. आयपी म्हणजे इंटरेस्ट प्रोटेक्शन यामुळे याचाच अर्थ धूळ आणि पाण्यासाठी बाहेरच्या गोष्टी पासून फोनची सुरक्षा कितपत होते. हे सांगणारे रेटिंग असतं. या आयपी रेटिंगमध्ये दोन अंक असतात. या अंकावरून धूळ आणि पाण्यापासून मोबाईलच्या सुरक्षेची पातळी किती आहे? हे आपल्याला समजू शकते. उदाहरणार्थ जर IP 69 यात पहिला अंक दोन्हीपासून किती संरक्षण देऊ शकतो? हे सांगतो त्याची सर्वोच्च पातळी 6 असते. म्हणजेच मोबाईल पूर्ण संरक्षण दुसरा अंक पाण्यापासून किती संरक्षण मिळू शकते. यामध्ये याची सर्वोच्च पातळी असल्याने तो जास्तीत जास्त काळ राहू शकतो.

तुमचा मोबाईल हा पाण्यापासून तसेच धुळीपासून सुरक्षित असतो. परंतु किती वेळ पाण्यात बुडाला तरी सुरक्षित राहू शकतो. हे महत्त्वाचं आहे. अनेक वेळा पाण्याचे शिंतोडे रिमझिम पाऊस आणि चुकून पाणी सांडलं तरी मोबाईल सुरक्षित राहू शकतो. हे त्याच्या IP रेटिंग वर अवलंबून असते.

IP69 रेटिंग

जर तुमच्या मोबाईलचा हे रेटिंग असेल, तर तुमचा मोबाईल हा पाण्यापासून आणि धुळीपासून सर्वाधिक सुरक्षित समजला जातो. परंतु तो जास्त वेळ पाण्यात ठेवणे देखील योग्य नसते. त्यामुळे मोबाईल खराब होऊ शकतो. जर काही प्रमाणात तुमच्या मोबाईलवर पाणी सांडले किंवा दूर बसली तरी मोबाईल सुरक्षित राहील.

IP68 रेटिंग

हे रेटिंग तुमच्या मोबाईलला पाण्यापासून आणि धुळीपासून सर्व संरक्षण देणारे चांगले रेटिंग मानले जाते.

IP67 रेटिंग

हे रेटिंग तुमचा फोन एक मीटर खोल पाण्यात 30 मिनिटापर्यंत सुरक्षित राहू शकतो. हे दर्शवते तसेच धुळीपासून देखील चांगले संरक्षण दिले जाते.

IPX4

हे रेटिंग असेल तर तुमच्या मोबाईलवर पाण्याच्या शिंतोडे पडले. तरच तुमचा फोन सुरक्षित राहू शकतो. परंतु जर मोबाईल जास्त वेळ पाण्यात असेल, तर याबाबत कोणतीही खात्री देता येत नाही.

तुमचा मोबाईल फोन किती वेळ पाण्यात राहू शकतो. किंवा धुळीत राहू शकतो. याची शक्यता IP रेटिंग वरून समजली जात शक्यतो IPX रेटिंग असलेले फोन सर्वाधिक सुरक्षित असतात. परंतु ते पूर्णपणे वॉटरप्रूफ नसतात. ते जास्त काळ पाण्यात राहू शकतात. पण ते सुरक्षित असतीलच याची काही हमी देता येत नाही. चीनमध्ये लॉन्च केलेल्या वन प्लस 13 या मोबाईल मध्ये सर्वोत्तम IP रेटिंग आढळून आले आहे.

अमित शाह यांच्या हस्ते भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध; पुढील 5 वर्षात करणार या सुधारणा

BJP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यातील विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत. आणि या निवडणुकीच्या आधी सगळ्या पक्षांकडून आश्वासनांचा पाऊस पडताना दिसत आहे. अशातच आता भाजप पक्षाचे केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी पक्षाचा जाहीरनामा जाहीर प्रसिद्ध केलेला आहे. या जाहीरनाम्यात पुढील पाच वर्षात राज्यात कसे चित्र असणार आहे? या सगळ्याची माहिती दिलेली आहे. तसेच मतदारांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा देखील या जाहीरनाम्यात केलेल्या आहेत. आता या जाहीरनाम्यात नक्की कोणत्या सूचना दिलेल्या आहेत? ते आपण जाणून घेणार आहोत.

भाजपच्या जाहीरनाम्यात काय काय?

  • आमच्या यांनी दिलेल्या जाहीरनाम्यात लाडक्या बहिणींना आता दर महिन्याला 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये देण्यात येणार आहे. तसेच महिलांमध्ये साक्षरता निर्माण करण्यासाठी तसेच महिला सुरक्षिततेसाठी 2500 महिलांचा पोलीस दलात समावेश केला जाणार आहे.
  • शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे. तसेच शेतकरी सन्मान योजनेतून दर वर्षाला 12000 ऐवजी 15000 रुपये देण्यात येणार आहे.
  • राज्यातील गरीब आणि गरजू लोकांना अन्न आणि निवारा देण्यात येणार आहे.
  • वृद्ध पेन्शन धारकांना दर महिन्याला दीड हजार रुपयांवरून 2100 रुपये देण्यात येणार आहे. जेणेकरून महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सुरक्षा देखील मिळणार आहे.
  • त्याचप्रमाणे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर ठेवण्यात येणार आहेत. येणाऱ्या काळामध्ये 25 लाख रोजगार निर्मिती होणार आहे. आणि दर महिन्याला दहा लाख विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये विद्या वेतन देण्यात येणार आहे.
  • राज्यातील ग्रामीण भागांमध्ये जवळपास 45000 गावांमध्ये पांधण रस्ते बांधण्यात येणार आहे.
  • अंगणवाडी आणि आशा सेविकांचे आर्थिक सुरक्षा आणि कल्याण या सगळ्याचा विचार करून त्यांना दर महिन्याला 15 हजार रुपये आणि विमा संरक्षण देण्याचे देखील जाहीर केलेले आहे.
  • वीज बिलामध्ये 30% कपात केली जाणार आहे आणि सौर आणि अक्षय उर्जेवर जास्तीत जास्त भर दिला जाणार आहे.
  • 2018 पर्यंत महाराष्ट्राला एक ट्रिलियन अर्थव्यवस्था बनवण्याचे लक्ष देखील त्यांनी समोर ठेवलेले आहे.
  • मेक इन महाराष्ट्र धोरण राबवून महाराष्ट्राचे भारतातील प्रमुख उत्पादक राज्य म्हणून असलेली स्थान मजबूत करण्यावर अधिक भर दिला जाणार आहे.
  • राज्यातील जागतिक फिलटेक आणि कृत्रिम बुद्धिमत्ता राजधानी बनवण्यात येणार आहे.
  • नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, आहिल्या नगर आणि नाशिकला आधुनिक ॲरोनॉटिकल आणि स्पेस उत्पादक केंद्र बनवून प्रगत एरोस्पेस तंत्रज्ञान आणि उत्पादक हब म्हणून विकसित करण्यात येणार आहे.
  • शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या खतांवरील संपूर्ण राज्य वस्तू व सेवा कर अनुदानाच्या स्वरूपात शेतकऱ्यांना परत दिले जाणार आहेत.
  • सर्व ज्येष्ठ नागरिकांनी मागणी केलेली कागदपत्रे आरोग्य नोंदणी ओळखपत्र पेन्शन संबंधित कागदपत्रे थेट त्यांच्या घरी पोहोचवण्याची व्यवस्था केली जाणार आहे.
  • सरकारी रुग्णालयांमध्ये जेष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र बाह्य रुग्ण कक्ष सुरू केले जाणार.
  • बळजबरीने तसेच फसवून केलेल्या धर्मांतराविरुद्ध कायदा करण्यात येणार आहे.