Monday, December 29, 2025
Home Blog Page 389

Whatsapp New Update | Whatapp ने आणले नवे फिचर; कपलला चॅट करणे होणार सोप्पे

Whatsapp New Update

Whatsapp New Update | आजकाल सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून जग अत्यंत जवळ आलेले आहे. त्यातच whatsapp हे सोशल मीडिया ॲप आजकाल प्रत्येकजण वापरतो. whatsapp शिवाय दिवसाची सुरुवातच होत नाही. कारण व्हाट्सअपच्या माध्यमातून अनेक गोष्टी सोप्या पद्धतीने होतात. आपण कोणालाही वाईस कॉल, व्हिडिओ कॉल करू शकतात. तसेच मेसेज,फोटो आणि व्हिडिओ देखील पाठवू शकतो. व्हाट्सअप त्यांच्या युजरसाठी नवनवीन फीचर्स नेहमीच लॉन्च करत असतात.

अशा whatsapp च्या युजरसाठी एक नवीन बातमी आलेली आहे. कारण आता युगेसला चॅट करणे खूप सोपे होणार आहे. यासाठी व्हाट्सअपने एक नवीन फीचर देखील लाँच केलेले आहे. याला लिस्ट असं नाव देण्यात आलेले आहे. म्हणजेच युजर आता आपली चॅटिंग कॅटेगरीत विभागू शकतात. हे फीचर यासाठी तयार केलेले आहे. या आधी व्हाट्सअपने चॅट फिल्टर चालू केलेले लोकांना खूपच आवडले. असल्याने व्हाट्सअपने हे आता नवीन फीचर लॉन्च केलेले आहेत.

या फिचरच्या मदतीने युज त्यांच्या मनाप्रमाणे कॅटेगिरी तयार करू शकतील. जसे की फॅमिली, वर्क फ्रेंड्समधील चॅट वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये ठेवू शकतात. आणि चॅट करणे देखील सोपे होणार आहे कॅटेगिरीतील चॅट शोधू शकतील. या फीचर नुसार आता लिस्ट बनवणे खूप सोपे होणार आहे. यासाठी तुम्हाला चॅट ॲपमध्ये आयकॉनवर टॅॅप करून आपली लिस्ट बनवायची आहे. त्यानंतर तुम्ही नाव देखील बदलू शकता. लिस्ट विचार ग्रुप आणि चॅट दोघांमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्हाला तुमचे चॅट देखील मॅनेज करता येणार आहे.

या लिस्टसह तुम्हाला चॅट करणे खूप सोपे होणार आहे. हे ॲप वापरून खूप सोप्या पद्धतीने तुम्ही चॅट करू शकता. आणि वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये विभागू शकता. जर तुम्हाला एखाद्या खास व्यक्तीची चॅट वेगळी ठेवायची असेल, तर हे फीचर तुमच्यासाठी अत्यंत फायद्याचे असणार आहे. खास करून कपलसाठी व्हाट्सअपचे हे फीचर खूप फायदेशीर होणार आहे.

UPI Rule Change | UPI द्वारे पेमेंट करण्याच्या नियमात बदल ; 1 नोव्हेंबरपासून मोठा बदल

UPI Rule Change

UPI Rule Change | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे डिजिटल इंडियाचे स्वप्न आता साकारताना दिसत आहे. अनेक आर्थिक व्यवहार देखील आता डिजिटल पद्धतीने व्हायला लागलेले आहे. यामध्ये UPI मार्फत ऑनलाइन पेमेंट करण्याचा खूप चांगला मार्ग आहे. यूपीआयच्या मदतीने लोक अगदी काही क्षणार्धात कोणालाही पैसे पाठवू शकतात. तसेच कोणाकडून पैसे घेऊ देखील शकतात. ही आर्थिक क्षेत्रातील एक खूप मोठी डिजिटल क्रांती मानली जाते. कारण यामुळे आर्थिक व्यवहार करणे अगदी सहज आणि सोपे झालेले आहेत. त्याचप्रमाणे लोकांना रोख रक्कम सोबत घेण्याची गरज देखील पडत नाही. त्यामुळे चोरी होण्याची किंवा इतर कुठल्या गोष्टीचा धोकाही कमी असतो.

परंतु आता या यूपीआय (UPI Rule Change) पेमेंटचा वापर करून पेमेंट करण्याच्या पद्धतीमध्ये 1 नोव्हेंबर पासून काही नियमांमध्ये बदल करण्यात आलेले आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने आता लहान डिजिटल पेमेंट सोप्या पद्धतीने करण्यासाठी ऑटो टॉप अप वैशिष्ट्य लॉन्च केलेले आहे. आणि यामध्ये व्यवहाराची मर्यादा देखील वाढवण्यात आलेली आहे.

नवीन नियमानुसार आता युजर्स त्यांचा यूपीआय पिन न टाकता 1000 रुपयांपर्यंत व्यवहार करू शकतात. यापूर्वी ही मर्यादा 500 रुपयांपर्यंत होती. परंतु आता तुम्हाला पिन न टाकता 1 हजार रुपयांपर्यंतचे व्यवहार करता येणार आहे. वॉलेटमध्ये शिल्लक ठेवण्याची कमाल रक्कम ही आता 2 हजार रुपयांवरून 5 हजार रुपये करण्यात आलेली आहे. तसेच दैनंदिन व्यवहाराची मर्यादा ही केवळ 4 हजार रुपये असणार आहे.

ऑटो टॉप अप वैशिष्ट्य काय आहे ? | UPI Rule Change

ज्यावेळी शिल्लक मर्यादेपेक्षा निर्दिष्ट कमी होते. त्यावेळी ऑटो टॉप वैशिष्ट्य युजरचे यूपीआय लाईट खाते स्वयंचलितपणे रिचार्ज करते. त्यावेळी युजर आपले यूपीआय द्वारे ऑटो टॉपअप रक्कम सेट करू शकतात. हे ऑटो टॉप अप वैशिष्ट्य वापरण्यासाठी युजर्सला त्यांच्या यूपीआय ऍपद्वारे ते सेट करणे गरजेचे आहे. जे त्यांच्या बँक खात्यातून त्यांच्या यूपीआय लाईट वॉलेट मध्ये स्वयंचलितपणे पैसे हस्तांतरित करण्यासाठी परवानगी देतात तसेच युजर्स ते कधीही रद्द देखील करू शकतात.

Prostate Cancer | पुरुषांमध्ये वाढत आहे ‘या’ कर्करोगाचे प्रमाण; या लक्षणांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष

Prostate Cancer

Prostate Cancer | आजकाल लोकांची जीवनशैली मोठ्या प्रमाणात बदललेली आहे. खाण्यापिण्याच्या सवयी, कामाचा ताण, बैठे जीवनशैली यामुळे अनेक आजार वाढत आहेत. खास करून पुरुषांना विविध मानसिक आणि शारीरिक आजारांचा सामना करावा लागत आहे. सहसा पुरुष आपल्या शारीरिक आणि मानसिक समस्या कोणालाही सांगत नाही. परंतु हळूहळू या समस्या एका मोठ्या आजारामध्ये रूपांतरित होतात. ज्या मधून सुटका मिळवणे खूप कठीण होऊन जाते. म्हणूनच जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची लक्षणे शरीरात दिसली, तर त्यावेळी उपचार घेणे खूप गरजेचे असते. आज काल पुरुषांमध्ये देखील एक प्रकारचा कॅन्सर मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

पुरुषांमध्ये प्रोस्टेट कॅन्सर चा (Prostate Cancer) धोका मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे. याला एक मुक कर्करोग असे म्हणतात. जो अगदी शांतपणे शरीरामध्ये वाढत जातो. सुरुवातीला त्याची लक्षणे सहसा दिसत नाही. परंतु हा कॅन्सर हळूहळू संपूर्ण अवयवात पसरतो. आणि नंतर त्यातून वाचणे खूप कठीण होऊन जाते. एका अभ्यासात असे समोर आलेले आहे की, दोन पैकी एका पुरुषाला प्रोस्टेट कर्करोग होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे सुरुवातीला जी काही लक्षणे दिसतात. त्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये.

प्रोस्टेट कर्करोगाची लक्षणे

लघवीमध्ये बदल

जर तुम्हाला अचानक लघवीला त्रास झाला किंवा लघवीचा प्रवाह कमी झाला तसेच वारंवार लघवीला होणे, लघवीतून रक्त येणे लघवीचा रंग वेगळा येणे, यांसारखी लक्षणे दिसली, तर हे प्रोस्टेट कर्करोगाचे एक सौम्य लक्षण आहे.

रात्री लघवीला उठणे

तुम्हाला जर रात्री झोपेत देखील लघवी येत असेल, तर हे देखील एक प्रोस्टेट कर्करोगाचे सौम्य असे लक्षण आहे. याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.

अशक्तपणा किंवा थकवा येणे

जर तुम्ही पुरेशी झोप घेतली असेल विश्रांती घेतली असेल, तरी देखील तुम्हाला सतत थकवा येत असेल. अशक्तपणा जाणवत असेल, तसेच भूक देखील लागत नसेल, तरी देखील तुम्ही सावध राहणे गरजेचे आहे.

पाठ दुखी

जर तुम्हाला कोणत्याही कारणाशिवाय पाठीमध्ये वेदना होत असेल, तर तुम्हाला सावध होण्याची गरज आहे. कारण हे एक प्रोस्टेट कर्करोगाचे मोठे लक्षण आहे. हा कर्करोग जेव्हा हाडांमध्ये पसरू लागतो. त्यावेळी पाठ दुखीची समस्या निर्माण होते. त्यामुळे लवकरच डॉक्टरांशी संपर्क साधा.

शरीरावर गुठळ्या तयार होणे

शरीरावर कुठेही गुठळ्या दिसणे ही एक चिंतेची बाब आहे. जर पुरुषांमध्ये शरीरावर अशा कोणत्याही प्रकारच्या गुठळ्या निर्माण झाल्या असेल, तर त्याकडे अजिबात लक्ष न देता डॉक्टरांचा सल्ला घ्या.

पोट दुखी आणि अपचन

जर पुरुषांना पोटाच्या वरच्या भागात असामान्य वेदना होत असतील, तरी हे देखील प्रोस्टेट कर्करोगाचे एक मोठे लक्षण आहे. जर तुमचे वजन वारंवार कमी होत असेल. आणि सारखा खोकला येत असेल, तरी देखील तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणे खूप गरजेचे आहे.

Mukhymantri Ladaki Bahin Yojana | नोव्हेंबरमध्ये ‘या’ तारखेला महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचे पैसे; एकनाथ शिंदेनी दिली माहिती

Mukhymantri Ladaki Bahin Yojana

Mukhymantri Ladaki Bahin Yojana | महायुती सरकारने राज्यातील नागरिकांसाठी अनेक विविध योजना राबवलेल्या आहेत. याचा फायदा सगळ्यांनाच झाला आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची (Mukhymantri Ladaki Bahin Yojana) घोषणा केली. या योजनेची संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. आणि ही योजना अगदी काही दिवसातच खूप लोकप्रिय झाली. या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये सरकारकडून देण्यात आले होते. परंतु विरोधकांनी या योजनेवर अनेक टीका देखील केल्या.

विधानसभा निवडणुकीचा विचार करून मत मिळवण्यासाठी सरकारने ही योजना आणली असल्याचा आरोप देखील सरकारवर करण्यात आला. लोकसभा निवडणुकीत महायुती सरकारला अपयश मिळाले म्हणून ही योजना चालू केली आहे. असे विरोधकांचे म्हणणे होते. परंतु महायुती सरकारने हे सगळे आरोप नेहमीच खोडून काढलेले आहेत.

याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माध्यमांना मुलाखत देताना म्हणाले की, “लाडकी बहीण योजना एवढ्या मोठ्या प्रमाणात चालवली जाऊ शकते, असे विरोधकांना वाटले नव्हतं. आणि त्यांच्यासाठी हे खूप अनपेक्षित होते. लाडकी बहिण योजनेचे पैसे आचारसंहितेत अडकू नये यासाठी महिलांना नोव्हेंबर महिन्याचे पैसे ऑक्टोबर महिन्यातच देण्यात आलेले आहे. 20 नोव्हेंबरला निवडणूकचे मतदान आहे. तर निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबरला आहे. त्यामुळे आता महिलांना डिसेंबरचे पैसे नोव्हेंबर मध्ये देण्यात येणार आहे.”

आत्तापर्यंत या लाडक्या बहिणी (Mukhymantri Ladaki Bahin Yojana) योजनेचे पाच हप्ते महिलांच्या खात्यात जमा झालेले आहेत. आतापर्यंत एकूण 7500 हजार महिलांना मिळालेले आहेत. परंतु आचारसंहिता आल्याने आता पुढे या योजनेचे काय होणार? त्याचप्रमाणे सरकार निवडून आल्यावर देखील ही योजना चालू राहील का? असे अनेक प्रकारचे प्रश्न महिलांच्या मनात आहे. परंतु आता निवडणुकीचा निकाल लागल्यावरच या योजनेचे नक्की करून काय होईल हे ठरेल.

Weather Update | राज्यातून थंडी झाली गायब; अनेक ठिकाणी पावसाचा ईशारा

Weather Update

Weather Update | नोव्हेंबर महिना सुरू झालेला आहे, तरी देखील राज्यात अनेक ठिकाणी पावसाचे वातावरण दिसत आहे. तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील पडताना दिसत आहे. वातावरणातून थंडी गायब झालेली आहे. आणि ढगाळ वातावरण सर्वत्र दिसत आहे. हवामान विभाग पावसाबद्दल तसेच थंडी बद्दल रोज अंदाज व्यक्त करत असतात. अशातच हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज म्हणजे 3 नोव्हेंबर रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. अनेक शेतकऱ्यांनी शेतातील पिके काढण्यास सुरुवात केलेली आहे. त्यामुळे हवामान विभागाने शेतकऱ्यांना देखील सतर्कतेचा इशारा दिलेला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज कोकण, मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग तसेच मराठवाड्यातील औरंगाबाद, नांदेड, अहमदनगर, नाशिक, पुणे या जिल्ह्यांमध्ये विजेचा कडकडाटांसह पाऊस (Weather Update ) पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. या ढगाळ वातावरणामुळे नागरिकांमध्ये आजारी पडण्याची शक्यता देखील आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये संध्याकाळी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

संपूर्ण राज्यात ढगाळ वातावरण (Weather Update ) असल्यामुळे थंडी काहीशा प्रमाणात नाहीशी झालेली आहे. तरी पुढील काही दिवसांमध्ये पुन्हा एकदा थंडी परतणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलेला आहे. ढगाळ वातावरण कमी झाले की, थंडीचे प्रमाण आपोआप वाढणार आहे. अशी माहिती देखील हवामान विभागाने दिलेली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनी शेतातील पिके काढलेली आहेत. त्यांची देखील योग्य ठिकाणी साठवणूक करण्यास सांगितले आहे.

IPL Retention: मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये कोणाची वर्णी ? बुमराहला 18 कोटींसह केले रिटेन

IPL

IPL 2024 मध्ये हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सची कामगिरी खूपच खराब होती. गेल्या मोसमातही मुंबई इंडियन्सला अनेक वादांना सामोरे जावे लागले होते. त्यामुळे संघाचे मोठे नुकसान झाले. तथापि, संघ पुन्हा एकदा नवीन हंगामासाठी सज्ज झाला आहे आणि त्यांनी आयपीएल 2025 साठी त्यांच्या सर्व कायम ठेवलेल्या खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत. मुंबई इंडियन्स संघाने पुढील हंगामासाठी मेगा प्लेयर्स लिलावापूर्वी कायम ठेवल्या जाणाऱ्या खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत. यामध्ये फ्रँचायझीकडून धक्कादायक निर्णय समोर आला आहे.रोहित शर्मासोबतच्या वादामुळे तो संघ सोडणार असे मानले जात होते, मात्र त्याला कायम ठेवण्यात आले आहे.

‘या’ खेळाडूंना कायम ठेवण्यात आले

मुंबई इंडियन्स संघाने २०२० मध्ये आयपीएलचे विजेतेपद जिंकले होते. त्यानंतर आगामी हंगामाबाबत त्यांच्या कोचिंग स्टाफमधून प्रत्येकामध्ये अनेक मोठे बदल दिसून आले आहेत. संघाने यावेळी अनेक बड्या खेळाडूंना वगळले आहे. जे चाहत्यांसाठी एखाद्या धक्क्यापेक्षा कमी नाही. मेगा प्लेयर लिलावापूर्वी मुंबई इंडियन्सने कायम ठेवल्या जाणाऱ्या खेळाडूंच्या नावांची यादी पाहिली तर त्यात त्यांनी पाच खेळाडूंना कायम ठेवले आहे. ज्यामध्ये रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांच्या नावाचा समावेश आहे. त्यांनी एकाही अनकॅप्ड खेळाडूला कायम ठेवलेले नाही.

मुंबईने इतके कोटी दिले

जसप्रीत बुमराह (18 कोटी), सूर्यकुमार यादव (16.35 कोटी), हार्दिक पांड्या (16.35 कोटी), रोहित शर्मा (16.3 कोटी), तिलक वर्मा (8 कोटी)

‘या’ राज्यात धावणार 20 डब्यांची हायस्पीड ‘वंदे भारत’ ट्रेन ; जाणून घ्या

highspeed vande bharat

भारतामध्ये वंदे भारत ट्रेन्सचा खूप बोलबाला आहे. ही खास रेल्वे लोकांच्या पसंतीस उतरत आहे. भारतीय रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केरळमधील वंदे भारत ट्रेनसाठी नवीन डब्यांची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याला दिलेली ही दिवाळी भेट मानली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. राज्यात वंदे भारत ट्रेन आधीच धावत आहेत. यामध्ये तिरुअनंतपुरम ते मंगळुरूपर्यंत दोन गाड्या धावत आहेत, तर तिरुअनंतपुरम ते कासारगोडपर्यंत एक जोडी धावत आहे.

कासारगोड वंदे भारतमध्ये 20 डबे बसवण्यात येणार

सध्या मंगळुरू ट्रेनला आठ डबे असून लवकरच तिला 16 डबे लागतील अशी अपेक्षा आहे. कासारगोडला जाणाऱ्या दुसऱ्या गाडीला 16 डबे असून त्यात आणखी चार डबे जोडल्यास डब्यांची संख्या 20 होईल. त्यामुळे ती वीस डब्यांची हायस्पीड ट्रेन होईल.

तिरुअनंतपुरम ते मंगलोर 8:35 मिनिटांत

तिरुवनंतपुरम ते मंगलोर या वंदे भारत ट्रेनला 8 तास 35 मिनिटे लागतात, तर त्याच मार्गावरील पुढील सर्वात वेगवान ट्रेनला 12 तास 50 मिनिटे लागतात आणि इतर दोन ट्रेनला सुमारे 15 तास लागतात. जेव्हापासून या हाय-स्पीड सुपरफास्ट अत्याधुनिक गाड्या राज्यात सुरू झाल्या, तेव्हापासून तेव्हापासून या गद्य प्रचंड यशस्वी झालया आहेत आणि पूर्ण क्षमतेने चालू आहेत. या गाड्यांमध्ये तिकीटाचे दर खूप जास्त असूनही लोक या हायस्पीड सुपरफास्ट ट्रेनला पसंती देत ​​आहेत.

प्रवाशांना मिळत आहेत सुविधा

या दोन जोड्यांच्या गाड्यांचे यश पाहून तिसरी ट्रेनही सुरू करण्यात आली, जी आठवड्यातून तीन वेळा बेंगळुरू आणि कोची दरम्यान धावते. या सुपरफास्ट गाड्यांमधून वारंवार प्रवास करणाऱ्या एका व्यावसायिकाने सांगितले की, जेव्हापासून वंदे भारतने केरळमध्ये काम सुरू केले आहे. त्यानंतर राज्यभरातील सहलींसाठी कारचा वापर कमी केला आहे.

दिल्ली-वाराणसी सर्वात वेगवान वंदे भारत

इतर अनेकांनीही आनंद व्यक्त केला आणि सांगितले की वंदे भारत ट्रेनचा त्यांना खूप फायदा झाला आहे. वंदे भारत गाड्या सर्व मार्गांवर सर्वात वेगवान पर्याय आहेत. नवी दिल्ली-वाराणसी हा सर्वात लांब मार्ग असूनही, त्याचा वेग ताशी ९५ किलोमीटर इतका आहे. ही ट्रेन कानपूर, अलाहाबाद मार्गे वाराणसीला पोहोचते. ही भारतातील पहिली वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन होती, जिचा सरासरी वेग सर्वाधिक आहे.

महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत उमेदवार कोण ? किती आहे त्यांची संपत्ती ? जाणून घ्या

parag shaha

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. सर्व पक्षातील उत्सुक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. विधानसभा निवडणुकांसाठी ८ हजार उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यातील सर्वात श्रीमंत उमेदवार कोण ? हा उमेदवार कोणत्या पक्षाचा आहे ? याची उत्सुकता तुम्हालाही असेल तर चला जाणून घेऊया महाराष्ट्र विधसभा २०२४ मधील सर्वात श्रीमंत उमेदवार कोण ?

तर सर्वात श्रीमंत उमेदवाराचं नाव आहे पराग शाह. हे भाजपाचे उमेदवार असून ते घाटकोपर पूर्वचे विद्यमान आमदार आहेत, निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची संपत्ती ₹ 3383.06 कोटी आहे. गेल्या 5 वर्षात शाह यांच्या संपत्तीत 575 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत, त्यांनी त्यांच्या मालमत्तेचे मूल्य ₹ 550.62 कोटी घोषित केले होते.

50 टक्के रक्कम दान

पराग शाह यांनी टीव्ही चॅनल ला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितले की, ‘मी एक प्रामाणिक उमेदवार आहे. मी प्रामाणिक नाही असा दावा माझ्या शत्रूंनीही केला नाही. माणसाची संपत्ती म्हणजे पैसा नसून त्याच्या भावना आहेत असे ते म्हणाले, ‘अनेक लोकांकडे पैसा आहे, पण मला त्याचा चांगला वापर करायचा आहे. मला विश्वास आहे की मला देवाने सर्व काही दिले आहे, देशाने मला सर्व काही दिले आहे, म्हणून मी देखील काहीतरी दिले पाहिजे.मी एक नेता, व्यापारी आणि सामाजिक कार्यकर्ताही आहे. मी माझ्या बचतीच्या 50 टक्क्यांहून अधिक समाजसेवेसाठी देतो.” असे ते म्हणाले.

व्यावसायिक पराग शहा

पराग शहा यांचा देशाच्या अनेक भागात मोठा व्यवसाय आहे. त्यांचा अनेक राज्यांमध्ये रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे. शाह यांनी 2017 मध्ये बीएमसीची निवडणूक लढवली आणि त्यादरम्यान ते बीएमसीच्या इतिहासातील सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले. शाह यांच्याकडे महाराष्ट्र, गुजरात आणि उत्तर प्रदेशमध्ये अनेक जमिनी आहेत. त्याचे घाटकोपर, चेंबूर येथे फ्लॅट आणि ठाण्यात बंगला आहे. पराग शाह हा उस्मानिया विद्यापीठातून वाणिज्य पदवीधर आहे.या काळात त्यांनी 690 कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली होती.

Hero ने लॉंच केली Hero Optima CX 5.0 ; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

Hero Optima CX 5.0

मित्रांनो तुम्हाला जर नवनवीन गाड्या खरेदी करण्याची क्रेझ असेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. कारण भारतातील विश्वसनीय हिरो कंपनीने एक नवी इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली आहे. तर आम्ही ज्या गाडीबद्दल बोलत आहोत त्याचे नाव आहे Hero Optima CX 5.0. चला पाहूया या नव्या गाडीची वैशिष्ट्य आणि किंमत

129 km रेंज

तर आता जर आपण Hero च्या Optima CX 5.0 स्कूटर मधील उपलब्ध फीचर्स बद्दल बोलायचे झाले तर Optima CX 5.0 अतिशय मजबूत आणि उत्कृष्ट फीचर्ससह सज्ज आहे. उदाहरणार्थ, या बाईकमध्ये तुम्हाला डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, स्पीडोमीटर, ओडोमीटर, ट्रिप मीटर यांसारखी सर्व महत्त्वाची वैशिष्ट्ये पाहायला मिळतील.

4.38 इंच एलईडी स्क्रीन सह ही बाईक उपलब्ध आहे. ज्यामध्ये बाईकची स्पीड मायलेज असे सगळे फीचर्स दिसू शकतात. शिवाय या गाडीमध्ये तुम्हाला तुमचा फोन चार्ज करण्यासाठी चार्जिंग पोर्ट सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. या गाडीचे वजन 99 किलोग्रॅम इतके आहे

बॅटरी

या गाडीच्या बॅटरी बद्दल सांगायचं झालं तर ३.३ किलोमीटर ची बॅटरी या स्कूटर मध्ये तुम्हाला मिळेल. एकदा सिंगल चार्ज केल्यानंतर ही गाडी 129 किलोमीटर पर्यंत चालवली जाऊ शकते. आणि शंभर टक्के चार्ज होण्यासाठी ही गाडी जवळपास दोन तास 45 मिनिटांचा वेळ घेते.

किंमत

आता या गाडीच्या किमती बद्दल सांगायचं झालं तर एक लाख चार हजारांच्या आसपास या गाडीची किंमत आहे. मात्र जर तुम्ही बँक ऑफर्स सह ही गाडी खरेदी करत असाल तर तुम्हाला पाच ते दहा हजार रुपयांचा डिस्काउंट सुद्धा मिळून जाईल.

Google Pay, PhonePe आणि Paytm वापरकर्त्यांसाठी महत्वाची बातमी ! 1 नोव्हेंबरपासून UPI ​​पेमेंट बदलणार

UPI payment

कोरोना काळापासून UPI ​​पेमेंट सिस्टीम आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनली आहे. आता सहसा कुणी रोख रक्कम बाळगण्याची तसदी घेत नाही सर्रास लोक UPI ​​पेमेंट सिस्टीम चा वापर करतात. तुम्ही सुद्धा UPI ​​पेमेंट सिस्टीम वापरत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. कारण 1 नोव्हेंबर 2024 पासून त्यांच्या UPI Lite प्लॅटफॉर्ममध्ये दोन मोठे बदल होणार आहेत. 1 नोव्हेंबरपासून, UPI Lite वापरकर्ते अधिक पेमेंट करू शकतील. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने देखील अलीकडेच UPI Lite ची व्यवहार मर्यादा वाढवली आहे.

इतर बदलांबद्दल बोलायचे झाल्यास , 1 नोव्हेंबर नंतर, तुमची UPI Lite शिल्लक एका विशिष्ट थ्रेशोल्डच्या खाली गेल्यास, नवीन ऑटो टॉप-अप वैशिष्ट्याद्वारे पैसे परत UPI Lite मध्ये जोडले जातील. यामुळे मॅन्युअल टॉप-अपची गरज नाहीशी होईल, ज्यामुळे युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) लाइटच्या मदतीने पेमेंट्स अखंडपणे करता येतील.

कधी सुरू होईल नवीन वैशिष्ट्य?

UPI Lite ऑटो-टॉप-अप वैशिष्ट्य 1 नोव्हेंबर 2024 पासून सुरू होण्याची अपेक्षा आहे. UPI Lite हे एक वॉलेट आहे जे वापरकर्त्यांना UPI पिन न वापरता छोटे व्यवहार करू देते. सध्या, UPI Lite वापरकर्त्यांना पेमेंट करणे सुरू ठेवण्यासाठी त्यांच्या बँक खात्यातून त्यांचे वॉलेट शिल्लक मॅन्युअली रिचार्ज करावे लागेल. तथापि, नवीन ऑटो-टॉप-अप वैशिष्ट्यासह, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) मॅन्युअल रिचार्जची गरज काढून टाकून प्रक्रिया सुलभ करण्याचे उद्दिष्ट ठेवते. UPI Lite ऑटो-पे बॅलन्स वैशिष्ट्याची घोषणा NPCI च्या 27 ऑगस्ट 2024 रोजीच्या अधिसूचनेत करण्यात आली होती.

UPI Lite Wallet बॅलन्स ऑटो टॉप-अप

लवकरच तुम्ही UPI Lite वर किमान शिल्लक सेट करू शकाल. जेव्हाही तुमची शिल्लक या मर्यादेपेक्षा कमी होते, तेव्हा तुमचे UPI Lite वॉलेट तुमच्या लिंक केलेल्या बँक खात्यातून निश्चित रकमेने आपोआप भरले जाईल. रिचार्जची रक्कम देखील तुमच्याद्वारे सेट केली जाईल. या वॉलेटची मर्यादा 2,000 रुपयांपेक्षा जास्त असू शकत नाही. UPI Lite खात्यावर एका दिवसात पाच टॉप-अप्सना अनुमती दिली जाईल.

NPCI नुसार, UPI Lite वापरकर्त्यांना 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत स्वयं-पे शिल्लक सुविधा इनेबल करावी लागेल. यानंतर, तुम्ही 1 नोव्हेंबर 2024 पासून UPI ​​Lite वर ऑटो टॉप-अप वैशिष्ट्य वापरण्यास सक्षम असाल.