Monday, December 29, 2025
Home Blog Page 388

देशातील ‘या’ नागरिकांना सरकारकडून दरमहा मिळणार 1 हजार रुपये; 6 महिने मिळणार लाभ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | केंद्र सरकार हे देशातील विविध नागरिकांचा विचार करून नेहमीच अनेक योजना आणत असतात. त्याचा फायदा आजपर्यंत अनेक नागरिकांना झालेला आहे. अशातच आता भारत सरकारने टीबी रुग्णांसाठी एक मोठी दिलासा देणारी बातमी दिलेली आहे. या टीबी रुग्णांना पोषण मिळावे तसेच त्यांचा मृत्यूदर कमी व्हावा. यासाठी आता सरकारने निक्षय पोषण योजना चालू केलेली आहे. या नीक्षय पोषण योजनेच्या अंतर्गत रुग्णांना दर महिन्याला एक हजार रुपये सरकारकडून देण्यात येणार आहेत. त्यामुळे आता या रुग्णांना सरकारकडून दर महिन्याला पोषण भत्ता मिळणार आहे. यापूर्वी या टीबी रुग्णांना दरमहा 500 रुपये पोषण भत्ता मिळत होता. परंतु आता हा भत्ता 500 रुपयांनी वाढवण्यात आलेला आहे. आपला भारत टीबीमुक्त करण्यासाठी भारत सरकारने ही मोहीम चालू केलेली आहे.

टीबी रुग्णांचा पोषण भत्ता वाढवण्याचा निर्णय हा 1 नोव्हेंबर पासून लागू झालेला आहे. यावेळी डॉक्टर बी एन यादव यांनी सांगितले की, सर्व टीबी रुग्णांना पोषण भत्ता सरकारने 1 हजार रुपये केला आहे. आता ही रक्कम तीन महिन्यांसाठी तीन हजार रुपयांपर्यंत पोहोचणार आहे. पोषण भत्ता दरवर्षी सहा हजार रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे. या सर्व लाभार्थ्यांसह जुन्या ओळख झालेल्या टीबी रुग्णांना देखील याचा लाभ मिळत असला, तरी देखील नोव्हेंबरपासून त्यांचा लाभ त्यांना दिला जाणार आहे.

जिल्ह्यामध्ये टीबीचे 25,030 रुग्ण आहेत. या रुग्णांना दरमहा सरकारकडून 500 रुपये पोषणाचा भत्ता मिळत होता. ही रक्कम सरकारने पाचशे रुपयांनी वाढवून 1 हजार रुपये एवढी केलेली आहे. ही नवी रक्कम आता 1 नोव्हेंबर नंतर जिल्ह्यातील टीबी पॉझिटिव्ह असणाऱ्या रुग्णांना दिला जाणार आहे.

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर; मनोज जरांगे पाटलांची निवडणुकीतून माघार

Manoj Jarange Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या संपूर्ण राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची गडबड चालू झालेली आहे. आणि अशातच विधानसभा निवडणुकीतील एक सगळ्यात मोठी बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे आत्ता मराठा आंदोलक प्रमुख मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभेच्या निवडणुकीतून माघार घेतल्याची बातमी समोर आलेली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी 288 जागांवर निवडून येण्याची तयारी केली होती. त्यानंतर त्यांनी 13 ते 14 जागांवर लढणार असल्याची माहिती सांगितली. परंतु आता ते विधानसभा निवडणूक लढणार नसल्याचे देखील त्यांनी जाहीर केलेले आहे. मनोज जरांगे पाटलांनी 3 नोव्हेंबर रोजी ते कोणकोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत? हे सांगितले होते. परंतु आज म्हणजे 4 नोव्हेंबर रोजी त्यांनी विधानसभा निवडणुकीतून ते माघारी घेण्यात असल्याची माहिती दिलेली आहे. तसेच एकाही जागेवर उमेदवार उभा न करण्याचे त्यांनी सांगितलेले आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी आज म्हणजे 4 नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषद घेतलेली आहे. आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी विधानसभा निवडणुकी संदर्भात त्यांची भूमिका जाहीर केलेली आहे. याबद्दल बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “आम्ही रात्री साडेतीन पर्यंत चर्चेला बसलो होतो. आम्ही निवडणुकीत मित्र पक्षासोबत दलित आणि मुस्लिम उमेदवार उभे करणार होतो. परंतु आता एका जातीच्या जोरावर निवडणूक लढणे किंवा ती निवडणूक जिंकणे शक्य होणार नाही. कारण आम्ही राजकारणात अगदीच नवीन आहोत. जर आम्ही एखादा उमेदवार उभा केला आणि तो उमेदवार पडला, तर त्या व्यक्तीची नाही, तर त्या संपूर्ण जातीची लाज जाणार आहे. त्यामुळे आम्ही विधानसभा निवडणूक लढणार नाही. असा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे मी माझ्या सगळ्या मराठी उमेदवारांना विनंती करतो की, आपले उमेदवारी अर्ज मागे घ्या. निवडणूक हा आपला खानदानी धंदा नाही.” असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले आहे.

पुढे मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “एका जातीवरून कोणीही निवडून येऊ शकत नाही. माझं एवढं राजकीय आकलन आहे. ताकदवान पक्षांनी एकत्र यावं लागेल. राजकीय प्रक्रिया हाताळणे ही साधी गोष्ट नाही. मी तर या राजकीय प्रवासात अजून लेकरू आहे. आंदोलनात हजार पाचशे लोक असले तरी चालून जातात. मात्र निवडणुकीत मात्र लोकांची गोळा बेरीज करावी लागते.” मनोज जरांगे पाटलांनी घेतलेल्या या निर्णयामुळे आता राज्याच्या राजकारणात कोणती उलथापालथ होणार आहे? कोणती समीकरणे बदलणार आहेत? हे पाहणे महत्त्वाचे आहे.

रेशनकार्ड धारकांसाठी मोठी बातमी; 1 नोव्हेंबरपासून बदलले ‘हे’ नियम

Ration Card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | केंद्र सरकार मार्फत सामान्य नागरिकांसाठी विविध योजना राबवलेल्या आहेत. ज्या योजनांचा लाभ आतापर्यंत देशातील अनेक नागरिक घेत आहेत. सरकारने देशातील गरजू आणि गरीब नागरिकांसाठी स्वस्त धान्य देखील देण्याची योजना चालू केलेली आहे. या स्वस्त धान्य दुकानातून सरकारमार्फत नागरिकांना साखर, तेल, तांदळ तसेच गव्हाचे देखील वाटप करण्यात येते. गरीब लोकांना राशन पुरवले जाते. कोरोना काळापासून ही योजना खूप लोकप्रिय झालेली आहे. कारण या योजनेअंतर्गत कोरोना काळापासून सरकारने अतिरिक्त धान्य दिलेले आहे. आता या धान्य वाटप संदर्भात काही नियम बदललेले आहे. हे नियम 1 नोव्हेंबर पासून बदललेले आहेत.

1 नोव्हेंबर पासून नियम बदल

केंद्र सरकारने रेशन कार्ड संदर्भातील नियम बदललेले आहेत. 1 नोव्हेंबर पासून या नियमात बदल केलेला आहे. आता या नवीन बदलानुसार रेशन कार्डधारकांना देण्यात येणारा तांदूळ आणि गव्हाच्या वाटपात बदल करण्यात आलेला आहे. आणि हे दोन्ही धान्य समान देण्यात येणार आहे. मागील वर्षी दिवाळीच्या काळात सरकारने या आनंदाचा शिधा वाटप केला होता. परंतु यावेळी दिवाळीत आचारसंहिता लागल्यामुळे कोणताही निर्णय घेता आलेला नाही.

तांदळाचे वाटप कमी होणार

1 नोव्हेंबर पासूनच रेशन कार्ड धारकांसाठी तांदूळ आणि गव्हाच्या वाटपासाठी नवीन नियम लागू झालेले आहेत. यापूर्वी तीन किलो तांदूळ आणि दोन किलो गव्हाचं वाटप होत होतं. परंतु आता राशन कार्डवर दोन किलो ऐवजी अडीच किलो गहू आणि तीन किलो ऐवजी अडीच किलो तांदळाचे वाटप होणार आहे. य

इ केवायसी करणे गरजेचे

केंद्र सरकारने या आधीच रेशन कार्डधारकांना ई केवायसी पूर्ण करण्यास सांगितले होते. याआधीही ईकेवायसी पूर्ण करण्याची अंतिम तारीख 31 सप्टेंबर होती. परंतु खूप अडथळे आल्यामुळे ई केवायसी करता आले नाही. आणि त्यानंतर 31 ऑक्टोबर ही केवायसी करण्याची शेवटची तारीख दिलेली होती. परंतु अजूनही अनेक लोकांचे ईकेवायसी पूर्ण झालेले नाही. त्यामुळे सरकारने ही तारीख वाढवून 31 डिसेंबर पर्यंत ठेवलेली आहे.

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर; पनवेल ते नांदेड दरम्यात चालू होणार विशेष एक्सप्रेस ट्रेन

Express Railway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाने एक आनंदाची बातमी दिली आहे. पनवेल ते नांदेड दरम्यान विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही ट्रेन मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार असून , यामुळे प्रवाशांची निर्माण होणारी अतिरिक्त गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे प्रवास करणाऱ्यासाठी हि बातमी महत्वाची आहे.

पनवेल ते नांदेड विशेष ट्रेन

पनवेल ते नांदेड सुटणाऱ्या गाडीचा क्रमांक 07636 असून , हि ट्रेन पनवेल येथून 7 नोव्हेंबरला दुपारी 4:30 वाजता सुटणार आहे आणि ती दुसऱ्या दिवशी 8 नोव्हेंबरला दुपारी 1 वाजता नांदेड येथे पोहोचणार आहे. तसेच नांदेड ते पनवेल गाडी 6 नोव्हेंबर रोजी रात्री 9 वाजता नांदेड येथून सुरू होईल, आणि 7 नोव्हेंबरला दुपारी 2:45 वाजता पनवेल येथे येईल.

12 स्थानकांवर थांबणार

हि विशेष ट्रेन कर्जत, लोणावळा, पुणे, दौंड, कुर्डुवाडी, लातूर, लातूर रोड, परळी, गंगाखेड, परभणी, पूर्णा या महत्त्वाच्या 12 स्थानकांवर थांबणार आहे. त्यामुळे अनेक प्रवाश्यांच्या प्रवासातील समस्या दूर होणार आहेत. दिवाळीच्या सणाच्या वेळी होणाऱ्या प्रवाशांच्या अतिरिक्त गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ही ट्रेन अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांना या गाडीमुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

BSNL ग्राहकांसाठी आनंदाची बातमी ; आता निवडा तुमचा आवडता मोबाईल नंबर

BSNL

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतातील प्रमुख टेलिकॉम कंपन्यांनी आपले रिचार्ज प्लॅन वाढवले आहेत. त्यामुळे असंख्य ग्राहकवर्ग कमी किमतीत चांगल्या सुविधा देणाऱ्या BSNL कडे वळत आहेत. बीएसएनएलने वाढता ग्राहकवर्ग तसेच मागणीचा विचार करत देशभरात 4G आणि 5G सेवांचा विस्तार केला आहे. या सेवा 1000 हून अधिक ठिकाणी उपलब्ध झाल्या असून , त्यामुळे ग्राहक याकडे आकर्षित होऊन नवीन सिम घेत आहेत , अशा ग्राहकांसाठी बीएसएनएल एक आनंदाची बातमी घेऊन आले आहे. आता BSNL तुम्हाला तुमचा आवडीचा मोबाईल नंबर निवडण्याचा पर्याय उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे प्रत्येकाला त्याच्या आवडीनुसार मोबाईल नंबर निवडण्याची मुभा मिळेल.

आवडीनुसार फोन नंबर मिळणार

तुम्हाला तुमच्या आवडीनुसार फोन नंबर हवा असल्यास प्रथम तुम्ही कोणत्याही सर्च इंजिनवर BSNL Choose Your Mobile Number असे सर्च करा. त्यानंतर तुमच्या समोर cymn असे येईल त्या लिंकवर क्लिक करा . ते केल्यानंतर तुम्ही स्थायी असलेले राज्य आणि झोन पर्याय येईल, त्यामध्ये दक्षिण, उत्तर, पूर्व, पश्चिम असे ऑपशन दिसतील त्यातील योग्य पर्याय निवडा. तुम्हाला नंबरची सुरुवात , शेवटचा नंबर किंवा संख्यांची बेरीज या आधारावर तुमचा पसंतीचा नंबर शोधावा लागेल. जर तुम्हाला फॅन्सी नंबर पाहिजे असेल तर फॅन्सी नंबर टॅबवर क्लिक करून फॅन्सी नंबरही तपासू शकता. नवीन नंबर घेण्यासाठी तुम्हाला सध्या वापरात असलेल्या नंबरवर एक OTP येईल , तो ओटीपो टाकल्यानंतर तुम्हाला नवीन नंबर उपलब्ध होईल . हि सर्व प्रक्रिया झाल्यानंतर निवडलेला नंबर मिळवण्यासाठी BSNL कार्यालयाला भेट द्यावी लागेल .

इतर टेलिकॉम कंपन्यांना टक्कर

हि सर्व प्रोसिजर ऑनलाईन असून, या नवीन सेवेमुळे ग्राहक जास्त प्रमाणात आकर्षित होणार आहेत. त्यामुळे इतर टेलिकॉम कंपन्यांना जोरदार टक्कर मिळणार आहे. हि सगळी प्रक्रिया अगदी विनामूल्य देण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांना फॅन्सी नंबर घेण्यासाठी पैसे देण्याची गरज नाही .

PM Vishvkarma Yojana | काय आहे सरकारची PM विश्वकर्मा योजना? 3 लाखापर्यंत मिळणार कर्ज

PM Vishvkarma Yojana

PM Vishvkarma Yojana | आपले केंद्र सरकार हे देशातील वेगवेगळ्या नागरिकांचा विचार करून अनेक विविध योजना राबवत असतात. ज्याचा फायदा आजपर्यंत अनेक लोकांना झालेला आहे. लोकांना आर्थिक मदत मिळावी. तसेच त्यांचे जीवनमान उंचवावे. या उद्देशाने सरकारकडून या योजना राबवल्या जातात. सरकारने अशीच एक नवीन योजना आणलेली आहे. या योजनेचे नाव पीएम विश्वकर्मा योजना (PM Vishvkarma Yojana) असे आहे. या योजनेअंतर्गत सामान्य नागरिकांना आर्थिक पाठबळ दिले जाते. आता ही योजना नक्की काय आहे? योजनेचा उद्देश काय आहे? याबद्दलची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

पीएम विश्वकर्मा योजना | PM Vishvkarma Yojana

पीएम विश्वकर्मा योजना ही सरकारची एक विश्वासहार्य योजना आहे. या योजनेअंतर्गत लोकांना कोणत्याही गॅरंटीशिवाय स्वस्त व्याजदरात कर्ज मिळते. तसेच दीड लाख रुपयांची आर्थिक मदत देखील केली जाते. या योजनेमधून लोकांना 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळते. तसेच हे कर्ज तुम्हाला पाच टक्के व्याजदर यांनी दिले जाते. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात व्यवसाय सुरू करण्यासाठी 1 लाख रुपये दिले जातात. दुसऱ्या टप्प्यात दोन लाखांचं कर्ज दिले जाते. लोकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारकडून हे स्वस्त कर्ज दिले.

या योजनेमध्ये लोकांना 18 पारंपारिक कौशल्य व्यवसायाचे प्रशिक्षण दिले जाते. ज्यामध्ये त्यांना दर महिन्याला 500 रुपये विद्या वेतन देखील दिले जाते. 18 ते 50 वर्षे वयोगट असलेला कुठलाही व्यक्ती या योजनेअंतर्गत सहभाग घेऊ शकतो. तसेच योजनेत सहभाग घेण्यासाठी उमेदवार हा भारतीय नागरिक असणे गरजेचे आहे.

अर्ज कसा करावा ? | PM Vishvkarma Yojana

या योजनेअंतर्गत जर अर्ज करायचा असेल तर तुम्हाला सगळ्यात आधी पीएम विश्वकर्मा योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल आणि तिथे जाऊन तुम्हाला हा अर्ज करावा लागेल.

अर्ज करण्यासाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्र

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • उत्पन्नाचा दाखला
  • जातीचा दाखला
  • ओळखपत्र
  • रहिवाशी दाखला
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • बँकेचे पासबुक
  • मोबाईल नंबर

Viral Video | पतीसोबत भांडण झाल्याने बायकोने धावत्या ट्रेनमधून घेतली उडी; पहा थरारक व्हिडीओ

Viral Video

Viral Video | सोशल मीडिया हे एक असे ठिकाण आहे. जिथे क्षणार्धात अनेक गोष्टी व्हायरल होत असतात. आपण सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ (Viral Video) पाहत असतो. काही व्हिडिओ मनोरंजनात्मक असतात. तर काही व्हिडिओ आपल्याला चांगलेच ज्ञान देणाऱ्या असतात. आज पर्यंत आपण पती-पत्नींमध्ये भांडणाच्या अनेक व्हिडिओ देखील पाहत आहोत. परंतु सध्या असा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. जिथे पती-पत्नीमध्ये भांडण झाल्याने चक्क महिलेने चालत्या ट्रेनमधून उडी घेतलेली आहे.

हा व्हिडिओमध्ये प्रदेशातील आहे. मध्य प्रदेशातील ओराई यांनी अटादरम्यान धावणाऱ्या एक्सप्रेस मध्ये ही घटना घडलेली आहे.बया घटनेचा एक थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये पाहू शकता की, एक महिला धावत्या ट्रेनच्या दरवाजा जवळ उभी राहून बडबड करताना दिसत आहेत. तर इतर प्रवासी मात्र या महिलेचा व्हिडिओ (Viral Video) त्यांच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत आहे.बत्यानंतर ती महिला ट्रेनच्या दाराजवळ जाते आणि उडी मारण्याच्या प्रयत्न करते. तितक्यात एक महिला येऊन तिला अडवण्याचा प्रयत्न करते. तरीही ती ट्रेनच्या खाली उडी मारते आणि त्यानंतर लगेचच ही ट्रेन थांबवण्यात येते. परंतु त्या महिलांचा जीव वाचला की नाही? ही माहिती अजूनही समोर आलेली नाही.

सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या दोघांमध्ये मोठ्या प्रमाणात भांडण झालेले अशी देखील माहिती तिथे लोकांनी दिलेली आहे. तर तो व्यक्ती दारूच्या नशेत असल्याचे देखील म्हटलेले आहे. दारू पिऊन त्या व्यक्तीने त्याच्या पत्नीशी भांडण केली आणि तिला स्वतःहून उडी मारण्यास सांगितले अशी माहिती देखील समोर आली आहे. व्हिडिओमध्ये असलेले प्रवासी आणि लोक यांनी त्यांच्या या कृत्याबद्दल माहिती दिलेली आहे.

घरबसल्या मतदान कार्डला मोबाईल नंबर लिंक कसा करायचा ? जाणून घ्या प्रक्रिया

voter Id

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | देशातील 18 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या प्रत्येक नागरिकाकडे मतदान कार्ड असते. मतदान कार्ड अत्यंत महत्त्वाचा आपल्या ओळखीचा पुरावा आहे. आपण भारतीय असल्याचा तसेच अठरा वर्ष पूर्ण असल्याचा हा एक खूप मोठा पुरावा आहे. आपली ओळख पडताळून पाहण्यासाठी या मतदान ओळखपत्राचा फायदा होतो. शासकीय कागदपत्रांमध्ये हे एक अत्यंत महत्त्वाचे असे कागदपत्र आहे. जर तुमचे हेच ओळखपत्र हरवले असेल, तरी देखील तुम्हाला ते ऑनलाईन पद्धतीने डाऊनलोड करता येते. परंतु त्यासाठी तुमचा मोबाईल नंबर हा तुमच्या मतदान कार्डला लिंक असणे खूप गरजेचे असते. परंतु तुमचा हा मोबाईल नंबर तुमच्या वोटिंग कार्डला लिंक नसेल तर तो लिंक करणे खूप गरजेचे असते. आता यासाठी ऑनलाइन पद्धतीने अपडेट करणे, खूप सोपे झालेले आहे. आता मतदान कार्डला तुमचा मोबाईल नंबर घरबसल्या तुम्ही कशा प्रकारे लिंक करू शकता. हे आज आपण जाणून घेणार आहोत.

अनेकवेळा लोकांकडून त्यांचे मतदान कार्ड हरवते. अत्यंत महत्त्वाच्या कामानिमित्त हे मतदान कार्ड लागले, तरी त्यांना ते मिळत नाही परंतु अशा वेळेला तुमचा मोबाईल क्रमांक तुमच्या मतदान कार्डला लिंक असेल, तर हे ऑनलाईन पद्धतीने हे मतदान कार्ड पुन्हा डाऊनलोड करू शकता. त्यासाठी आधी मोबाईल नंबर ओळखपत्राची लिंक कसा करायचा? हे आज आपण जाणून घेणार आहोत.

मतदान काढला मोबाईल क्रमांक लिंक कसा करावा ?

  • मतदान कार्डला मोबाईल क्रमांक लिंक करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी ऑफिशियल नॅशनल वॉटर सर्विस या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
  • या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर ईमेल आयडी पासवर्ड कॅपच्या कोड टाकून लॉगिन करायचे आहे.
  • तुम्ही जर नवीन युजर असाल तर तुम्हाला साइन इन करावे लागेल.
  • यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर वन टाइम पासवर्ड प्राप्त करण्यासाठी रिक्वेस्ट ओटीपी येईल त्यावर क्लिक करा.
  • त्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी टाका आणि त्यानंतर एक नवीन पेज उघडेल.
  • तुमच्या ओळखपत्रांमध्ये तुम्हाला मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी किंवा बदलण्यासाठी तुम्ही होम पेजवर फॉर्म 8 वर क्लिक करा.
  • त्यानंतर सेल्फ सिलेक्ट करा आणि सबमिट या बटणावर क्लिक करा.
  • त्यानंतर ऑदर ऑप्शनवर सिलेक्ट करून लिपिक भरा आणि सबमिट करा
  • त्यानंतर स्क्रीनवर तुम्हाला मतदाराचे सगळे डिटेल्स दिसतील त्यानंतर ओके या बटणावर क्लिक करा.
  • नंतर दुसऱ्या क्रमांकावरील करेक्शन पर्याय निवडा.
  • त्यानंतर तुमच्यासमोर फॉर्म आर्ट ओपन होईल तुमचा आधार क्रमांक मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी टाकून नेक्स्टवर क्लिक करा.
  • तुम्ही प्लेस भरा आणि कॅपच्या कोड देखील टाका मग सेंट ओटीपी या बटनावर क्लिक करा.
  • त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी प्राप्त होईल तो ओटीपी टाकून सबमिटवर क्लिक करा.
  • त्यानंतर 48 तासात तुमचा मोबाईल क्रमांक तुमच्या ओळखपत्राला लिंक होईल.

Papaya Benefits | रिकाम्या पोटी पपई खाल्याने शरीराला होतात अनेक फायदे; जाणून घ्या सविस्तर

Papaya Benefits

Papaya Benefits | फळे ही आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. फळांमधून शरीराला अनेक पोषक मिळतात. त्यामुळे शरीरातील अनेक समस्या दूर होतात. प्रत्येक फळ खाण्याचे काही वेगवेगळे फायदे होतात. त्यातही पपई आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. तुम्ही जर पपई रिकाम्यापोटी खाल्ली तर तुम्हाला त्यातून दुप्पट फायदा होईल. पपई हे उन्हाळी फळ आहे. पपईमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे खास करून उन्हाळ्यामध्ये पपई (Papaya Benefits) खाली जाते. ज्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी योग्य प्रमाणात राखता येते. त्यामुळे डॉक्टर देखील उन्हाळ्यात पपई खाण्याचा सल्ला देत असतात.

पपईमध्ये (Papaya Benefits) जास्त प्रमाणात विटामिन सी असते. त्यामुळे आपले पोट, केस आणि त्वचेला देखील खूप फायदा होतो. परंतु पपई खाण्याचा एक योग्य वेळ असते. जर त्यावेळी तुम्ही खाल्ली तर तुमच्या शरीराला अधिक फायदे होतील. त्यातही जर तुम्ही रिकाम्यापोटी खाल्ली, तर खूप जास्त फायदे होतात. आता आपण रिकाम्या पोटी पपई खाल्ल्याने आपल्या शरीराला कोणते फायदे होतात हे जाणून घेणार आहोत.

रिकाम्या पोटी पपई खाल्ल्याने कोणते फायदे होतात |Papaya Benefits

तुम्ही जर रिकाम्या पोटी खाल्ली तर तुमची पचनक्रिया ही वेगवान होते. कारण पपईमध्ये फायबर युक्त पदार्थ जास्त असतात. त्यामुळे तुमची चयापचय प्रक्रिया नीट होते. तसेच पपई मध्ये असलेल्या विटामिन सीमुळे तुमचा दिवस देखील अत्यंत उत्साहात जातो. आणि अनेक रोगांपासून तुमच्या शरीराचे संरक्षण होते. तुम्ही जर रिकाम्या पोटी पपई खाल्ली तर रक्तातील साखरेची पातळी देखील संतुलित राहते. आणि डायबिटीस सारख्या आजारापासून मुक्तता देखील होत होते.

पपईमध्ये (Papaya Benefits) अँटिऑक्सिडंट आणि अँटी-इम्प्लिमेंटरी घटक असतात. तुम्ही जर रिकाम्यापोटी पपई खाल्ली तर जळजळ कमी होते. तसेच अनेक आजार देखील बरे होतात. त्वचेच्या आरोग्यासाठी पपई खाणे खूप फायदेशीर असते. यामुळे मुरूम डाग कमी होतात. तसेच अकाली येणारे वृद्धत्व देखील कमी होते. त्याचप्रमाणे पपईमध्ये फायबर, पोटॅशियम, अँटिऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात. हे आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी खूप गरजेचे असते. पपईमुळे कोलेस्ट्रॉलची पातळी देखील नियंत्रणात राहते.