Monday, December 29, 2025
Home Blog Page 391

Viral Video | दिवाळीत चकल्या नीट गोल होत नाही? फॉलो करा ‘ही’ सोप्पी ट्रिक

Viral Video

Viral Video | सध्या सर्वत्र दिवाळीचा सण साजरा केला जात आहे. दिवाळी हा आपल्या भारतातील एक सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा असा सण आहे. या दिवसांमध्ये सर्वत्र धुमधाम दिसून येते. प्रत्येक घरात फराळापासून ते सजावट, रांगोळी, दिवे या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच हा सण खूप उत्साहाने साजरा करतात. दिवाळीमध्ये दिवे, आकाश कंदील, रांगोळ्या, फटाके या सगळ्या गोष्टी तर असतातच. परंतु या सगळ्यात महत्त्वाचा असतो तो म्हणजे फराळ.

दिवाळी ही फराळाशिवाय अपूर्णच म्हणावी लागेल. या दिवसांमध्ये महिला दिवाळीचा फराळ करण्याच्या तयारीत असतात. हे सगळे पदार्थ त्या अत्यंत आवडीने करतात. परंतु त्यातील सगळ्यांना आवडणारा आणि करण्यास अत्यंत अवघड असणारा प्रकार म्हणजे चकली. ही चकली बनवायला तशी अवघड असते. परंतु कुरकुरीत चकली खायला सगळ्यांनाच आवडते. चकली करताना त्याचे पीठ योग्य प्रमाणात भिजावे लागते. तसेच ते चकलीच्या सोऱ्यामधून योग्य पद्धतीने पडून गोल व्हाव्या लागतात. तसेच त्या चकल्या नीट तळाव्या देखील लागतात. म्हणजे चकली बनवणे ही महिलांसाठी एक मोठी कसरतच असते. परंतु सध्या सोशल मीडियावर एक असा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुण दिवाळीतील चकल्या अत्यंत सोप्या पद्धतीने करत आहे. सध्या हा व्हिडिओ चांगला चर्चेत आलेला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये (Viral Video) पाहू शकता की, एक तरुण घरातील सोप्यावर बसून चकली करताना दिसत आहे. तो एका अनोख्या पद्धतीने जुगाड करून चकली करत आहे. त्याच्या चकली करण्याच्या या नवीन आयडियाला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसंती देखील मिळत आहे.

साधारणपणे चकली करताना ती गोल आकारात करावी लागते. परंतु त्या तरुणाने चकलीच्या सोऱ्यातून सरळ उभे करून घेतलेले आहेत. आणि त्यानंतर त्याला पाहिजे तेवढ्या आकारात चकली गुंडाळून तयार केलेली आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगला चर्चेत आहे. आणि अनेक लोक याला पसंती दर्शवत आहे. एका युजरने या व्हिडिओवर कमेंट केली आहे की, “मजाक मजाक मध्ये तू चकली बनवण्याची खूप चांगली पद्धत सांगितलेली आहे.” त्याची चकली बनवण्याची ही पद्धत सोशल मीडियावर सगळ्यांना खूप आवडलेली आहे. आणि या व्हिडिओवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे.

PM Internship Scheme | सरकारने आणली PM इंटर्नशिप योजना; जाणून घ्या फायदे आणि वैशिष्ट्ये

PM Internship Scheme

PM Internship Scheme | केंद्र सरकार हे राज्यातील प्रत्येक वयोगटातील व्यक्तीचा विचार करून वेगवेगळ्या योजना आणत असतात. तरुणांसाठी देखील अनेक योजना आणत असतात. आपला भारत देश हा तरुणांवर आधारित आहे. त्यामुळे तरुणांसाठी देखील रोजगाराच्या अनेक संधी सरकारने उपलब्ध केलेल्या आहेत. आणि इथून पुढे देखील या सगळ्या निर्माण होणार आहेत. आणि यासाठी आता सरकारने आणखी एक नवीन योजना आणली आहे. ज्या योजनेचा लाभ सगळ्या तरुणांना होणार आहे. या योजनेचे नाव पीएम इंटर्नशिप योजना अशी आहे. या योजनेअंतर्गत आता तरुणांना नोकरीची संधी देखील उपलब्ध होणार आहे.सरकारच्या या पंतप्रधान इंटर्नशिप (PM Internship Scheme) योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करता नोकरी करता येणार आहे. या योजनेअंतर्गत 3 ऑक्टोबर पासूनच रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहे.

काय आहे पंतप्रधान इंटर्नशिप योजना ? | PM Internship Scheme

सरकारची ही पंतप्रधान इंटर्नशिप योजना पाच वर्षासाठी राबवण्यात आलेली आहे. या अंतर्गत 500 कंपनीमध्ये एक कोटी तरुणांना इंटर्नशिप करण्याची संधी मिळणार आहे. यासाठी सरकारने अनेक कंपन्यांसोबत पार्टनरशिप देखील केलेली आहे. या अंतर्गत 24 सेक्टरमध्ये 80 हजारापेक्षा जास्त संधी तरुणांना उपलब्ध होणार आहे.

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेची पात्रता आणि अटी

  • या प्रधानमंत्री अंतर्गत तुम्हाला सहभाग घ्यायचा असेल तर तुमचे वय 21 ते 24 वर्ष वयोगटातील असणे गरजेचे आहे.
  • पीएम इंटर्नशिप योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थी हा भारताचा रहिवाशी असावा.
  • तसेच तो व्यक्ती इतर कोणत्याही ठिकाणी नोकरी करत नसावा.
  • पदवीध किंवा बारावी पास झालेले तरुण शिक्षण करतानाही इंटर्नशिप करू शकतात.
  • ऑनलाइन कोर्स करणारे तरुण देखील या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
  • या योजनेअंतर्गत तरुणांना सरकारकडून 4500 स्टाइपेंड मिळणार आहे तसेच 6000 रुपयांचे अनुदान देखील मिळणार आहे.
  • या योजनेअंतर्गत शिक्षण घेणाऱ्या तरुणांना रोजगाराची संधी देखील निर्माण होणार आहे.

पीएम इंटरशिप योजनेअंतर्गत आत्तापर्यंत 193 कंपन्यांमध्ये 12 ऑक्टोबर पासूनच नोंदणी सुरू झालेली आहे. ज्युबिलंट फूडवर्क्स, मारुती सुझुकी इंडिया, आयशर मोटर्स, लार्सन अँड टुर्बो, मुथूट फायनान्स, रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळणार आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून हे अत्यंत चांगली योजना आहे तसेच विद्यार्थ्यांना शिक्षण घेता घेता रोजगार निर्मिती देखील होणार आहे.

Bussiness Idea | केवळ 10 हजारात सुरु करा ‘हे’ व्यवसाय; घर बसल्या होईल लाखोंची कमाई

Bussiness Idea

Bussiness Idea | अनेक लोक हे नोकरी करता करता स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची तयारी करत असतात. स्वतःचा व्यवसाय (Bussiness Idea) असावा आणि आपल्यातून चांगले उत्पन्न मिळावे, यासाठी वेगवेगळे प्रयत्न देखील करत असतात. परंतु आता हा व्यवसाय सुरू करताना नक्की कशाचा व्यवसाय करावा? मार्केटमध्ये कोणत्या गोष्टीला जास्त मागणी आहे? त्याचे मार्केटिंग कसे करावे?भांडवल कसे जमा करावे? त्यातून किती फायदा होणार आहेम या गोष्टी जाणून घेणे खूप गरजेचे असते. परंतु व्यवसाय करण्यासाठी खूप पैसे लागत असल्याने अनेक लोक व्यवसाय करण्याचा विचार सोडून देतात. परंतु आज आम्ही तुम्हाला बिजनेसच्या अशा काही आयडिया सांगणार आहोत. त्यामध्ये तुम्ही पैशांची कमीत कमी गुंतवणूक करून देखील हा व्यवसाय सुरू करू शकता. आणि तुम्हाला त्यातून महिन्याला खूप चांगले उत्पन्न देखील मिळेल. या बिझनेसमध्ये (Bussiness Idea) तुम्ही दहा हजार रुपयांपेक्षा कमी गुंतवणूक करून देखील तुमचा स्वतःचा नवीन व्यवसाय सुरू करू शकता आणि लाखोंची कमाई करू शकता.

घरगुती डब्याची सर्व्हिस | Bussiness Idea

घरगुती डब्यांचा व्यवसाय आजकाल मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अनेक लोक हे शिक्षणासाठी तसेच नोकरीसाठी गावावरून शहरात येत असतात. अशावेळी तुम्ही डब्याची सर्व्हिस देण्याचा व्यवसाय सुरू करू शकता. हा व्यवसाय तुम्ही दहा हजार रुपयांपेक्षाही कमी खर्चात सुरू करू शकता. कमी गुंतवणुकीत केला जाणारा हा एक चांगला व्यवसाय आहे. आणि या माध्यमातून तुम्ही चांगले पैसा देखील कमवू शकता.

लोणच्याचा बिझनेस

भारतीय जेवणामध्ये लोणच्याचा समावेश असतो. लोणच्याला देखील बाजारात खूप जास्त मागणी आहे. अशा वेळी तुम्ही लोणच्याचा व्यवसाय सुरू करू शकता. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला 10 हजार रुपयांपेक्षा कमी भांडवल लागेल. तुम्ही जर लोकांना लोणच्याची चांगली चव दिली, तर तुम्ही कमी वेळात आणि कमी पैशात हा एक चांगला व्यवसाय उभारू शकता.

ऑनलाइन फिटनेस कोच | Bussiness Idea

आजकाल फिटनेस कडे गांभीर्याने लक्ष दिले जात आहे. लोकांच्या कामामुळे त्यांना त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. त्यामुळे अनेक लोक हे ऑनलाईन फिटनेस कोर्स जॉईन करतात. अशा प्रकारे जर तुम्ही ऑनलाईन फिटनेस ट्रेनिंग देण्याचे क्लासेस सुरू केले, तर तुम्ही अगदी कमी खर्चात आणि कमी वेळात चांगल्या पद्धतीने नफा कमवू शकता.

PM Kisan Yojana | PM किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठे अपडेट; आता करावे लागणार ‘हे’ काम

PM Kisan Yojana

PM Kisan Yojana | केंद्र सरकारने देशातील नागरिकांसाठी तसेच शेतकऱ्यांसाठी अनेक हिताच्या योजना आणलेल्या आहेत. ज्याचा फायदा आजपर्यंत अनेक शेतकऱ्यांना झालेला आहे. त्यातीलच एक अत्यंत लोकप्रिय योजना म्हणजे पीएम किसान योजना पी एम किसान योजनेचा (PM Kisan Yojana) देशातील लाखो शेतकऱ्यांना आजपर्यंत फायदा झालेला आहे. या योजनेसाठी एक नवीन नियमावली तयार करण्यात आलेली आहे. आणि या नियमावलीनुसार वारसा हक्क वगळता 2019 पूर्वी जमिनी खरेदी केली असेल, तर त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. आता या योजनेसाठी नाव नोंदणी करताना पती-पत्नी आणि मुलांच्या आधार कार्ड देखील जोडावे लागणार आहे.

कुटुंबातील एकालाच मिळणार लाभ | PM Kisan Yojana

केंद्र सरकारने 2019 मध्ये ही पीएम किसान सन्मान निधी योजना चालू केलेली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षाला 6 हजार रुपये दिले जातात. हे 6000 रुपये 2000 रुपयांच्या समान हा तीन हप्त्यात शेतकऱ्यांना वितरित केली जाते. आतापर्यंत या योजनेचे फायदे अनेक शेतकऱ्यांना मिळालेले आहेत. या योजनेअंतर्गत शेतकरी म्हणून कुटुंबातील पती- पत्नी यापैकी एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

जर सातबाराच्या उताऱ्यावर 2019 पूर्वी तुमची नोंद असेल किंवा वारसा हक्काने जर तुमचे नाव नोंदवले असेल, तरी देखील तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पती पत्नी व मुलगा तसेच 2019 नंतर जमीन नावावर झालेले माहेरवाशिन करून आपल्या नावावर असल्याचे दाखवून लाभ घेता येणार आहे.

आवश्यक कागदपत्रे

  • लाभार्थी शेतकऱ्याचा नवीन सातबारा उतारा
  • शेतकऱ्याचा आठ अ उतारा
  • लाभार्थी शेतकऱ्यांच्या पती-पत्नीचे आधार कार्ड
  • लाभार्थी शेतकऱ्यांचा फेरफार
  • विहित नमुना अर्ज
  • शिधापत्रिका

महत्वाची बातमी ! आता ट्रेनमधून मर्यादित सामानच नेता येणार ; नवा आदेश जारी

train rule

मुंबईतील वांद्रे टर्मिनस येथे झालेल्या चेंगराचेंगरीनंतर पश्चिम रेल्वेने नवा आदेश जारी केला आहे. त्यात म्हटले आहे की, प्रवाशांचे सामान त्यांच्या संबंधित प्रवासी वर्गासाठी अनुज्ञेय आणि विहित मर्यादेपेक्षा जास्त असल्यास त्यांना दंड आकारला जाईल. रेल्वेनेही लोकांना स्थानकांवर गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे.

नवीन नियम

पश्चिम रेल्वेने मंगळवारी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ‘रेल्वे त्यांच्या प्रत्येक प्रवाशाला प्रवासादरम्यान कोणतेही शुल्क न घेता विशिष्ट प्रमाणात सामान नेण्याची परवानगी देते. परंतु स्कूटर आणि सायकलीसारख्या वस्तूंसह 100 सेमी लांबी, 100 सेमी रुंदी आणि 70 सेमी उंचीच्या वस्तू मोफत नेण्याची परवानगी दिली जाणार नाही.

‘विहित सामान मर्यादा देखील पाळा’

त्यात पुढे म्हटले आहे की, ‘पश्चिम रेल्वे सर्व प्रवाशांना विनंती करते की त्यांनी स्थानकांवर गर्दी टाळावी आणि ट्रेनच्या वेळापत्रकानुसार आवश्यक असेल तेव्हाच आवारात प्रवेश करावा आणि विहित सामान मर्यादेचे पालन करावे.’

कालावधी

पश्चिम रेल्वेने सर्व प्रवाशांना मोफत सामानाच्या कमाल मर्यादेशी संबंधित नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. विविध वर्गांच्या प्रवासासाठी मोफत सवलती वेगवेगळ्या असतात असे रिलीझमध्ये म्हटले आहे. सामान जास्त असल्यास, त्यानुसार दंड आकारला जाईल. ही सूचना तत्काळ लागू झाली असून ती 8 नोव्हेंबरपर्यंत लागू राहील.

Jio Recharge Plan | जिओने आणला सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन; 11 महिन्यांच्या वैधतेसह मिळणार फ्री ओटीटीचे सब्स्क्रिप्शन

Jio Recharge Plan

Jio Recharge Plan | रिलायन्स जिओ हे आपल्या भारतातील एक सगळ्यात मोठी आणि लोकप्रिय टेलिफोन कंपनी आहे. भारतामध्ये जिओचे अनेक ग्राहक देखील आहेत. जिओ त्यांच्या ग्राहकांसाठी नेहमीच वेगवेगळ्या नवीन योजना आणत असतात. नवीन रिचार्ज प्लॅन देखील लॉंच करत असतात. त्याचा फायदा सगळ्यांना होत असतो. जास्तीत जास्त वैद्यतेसह असणारे अनेक रिचार्ज प्लॅन (Jio Recharge Plan) जिओने त्यांच्या ग्राहकांसाठी लॉन्च केलेले आहे. आज देखील आम्ही तुम्हाला जिओच्या अशा एका प्लॅन बद्दल सांगणार आहोत ज्यामध्ये तुम्हाला कमी गमतीमध्ये अनेक ऑफर मिळतील.

जिओचा 1899 रुपयांचा प्लॅन | Jio Recharge Plan

जिओचा नवीन 1899 रुपयांचा प्लॅन आहे. या प्लॅनची वैधता 336 दिवसांची आहे. म्हणजेच 11 महिने तुम्हाला या प्लॅनचा लाभ घेता येईल. यामध्ये तुम्हाला एकूण 24 जीबी हाय स्पीड डेटा मिळेल.

अमर्यादित कॉलिंग आणि एसएमएस

जिओच्या या 1899 यांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला अमर्यादित कॉलिंग मिळेल. तसेच फ्री एसएमएसचा लाभ देखील तुम्हाला या रिचार्ज प्लॅनवर घेता येईल. तुम्हाला देशभरातील कोणत्याही नेटवर्कवर एकूण 3600 एसएमएस पाठवता येईल. त्याचप्रमाणे तुम्हाला जिओ टीव्ही जिओ, जिओ सिनेमा, जिओ लाऊडचे फ्री सबस्क्रिप्शन देखील मिळणार आहे.

तुम्ही जर जिओचे ग्राहक असाल आणि तुम्ही कमी पैशांमध्ये जास्त दिवसांसाठी एखादा रिचार्ज प्लॅन शोधत असाल, तर हा प्लॅन तुमच्यासाठी अत्यंत योग्य असा प्लॅन आहे. एकदा प्लॅन केल्यावर तुम्हाला 11 महिने रिचार्ज करण्याची गरज पडणार नाही. तसेच तुम्हाला ओटीटी प्लॅटफॉर्मचा देखील लाभ घेता येईल. त्यामुळे जिओचा हा रिचार्ज तुमच्यासाठी अत्यंत योग्य रिचार्ज प्लॅन आहे

10 वी, 12 वीच्या 17 नंबरचा फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; ‘या’ तारखेपर्यंत भरता येणार अर्ज

10 th And 12 th students

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अंतर्गत दहावी बारावीच्या परीक्षा घेण्यात येतात. यातही अनेक विद्यार्थ्यांना 17 नंबरचा फॉर्म भरून परीक्षा देता येते. म्हणजेच एखाद्या विद्यार्थ्याने काही वर्षे शिक्षण घेतले नसेल, तरी त्याला थेट 17 नंबरचा फॉर्म भरून परीक्षा देता येते. आता हा 17 नंबरचा फॉर्म भरण्याची ऑनलाईन प्रक्रिया सुरू झालेली आहे. आता दहावी आणि बारावीच्या खाजगी विद्यार्थ्यांना 31 डिसेंबर 2024 पर्यंत अतिरिक्त परीक्षा शुल्क भरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थ्यांना सर्व शाळा विद्यालय मंडळाच्या अटी शर्तीनुसार नाव नोंदणी करण्यासाठी उपलब्ध आहे. शिक्षण मंडळाने सर्व माध्यमिक शाळांना आवाहन केले आहे की, शिक्षण प्रवाहाच्या बाहेर राहिलेल्या परंतु दहावी उत्तीर्ण असलेल्या मुला मुलींना या माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेत बसून द्यावी. आणि त्यांना एक नवीन संधी उपलब्ध करून द्यावी.

दहावी-बारावीच्या खासगी विद्यार्थ्यांना 31 डिसेंबर 2024 पर्यंत अति विलंब शुल्क भरून ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र दहावी व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र 12 वी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खाजगीरित्या फॉर्म नं. 17 भरुन परीक्षेस प्रविष्ट होण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे

फेब्रुवारी आणि मार्च 2025 मध्ये होणाऱ्या माध्यमिक प्रमाणपत्र दहावी आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र बारावी या परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थ्यांची नाव नोंदणी फॉर्म नंबर 17 ऑनलाईन पद्धतीने भरण्याचे तारखा निश्चित करण्यात आलेले असून 31 ऑक्टोबर 2024 ते 31 डिसेंबर 2024 पर्यंत विद्यार्थी प्रति दिन 20 रुपये अधिनियम शुल्क म्हणून परीक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. खाजगी विद्यार्थी इयत्ता दहावी आणि बारावीची नाव नोंदणी अर्ज प्रक्रिया विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे. ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारला जाणार नाही. असे मंडळाने देखील सांगितलेले आहे.

अर्ज भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • शाळा सोडल्याना दाखला (मूळ प्रत), नसल्यास द्वितीयप्रत व प्रतिज्ञापत्र
  • आधारकार्ड
  • स्वतःचा पासपोर्ट आकारातील फोटो
  • ऑनलाईन अर्ज भरताना सदर कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करावयाची आहेत

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी; सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याबाबत महत्वाचा निर्णय

Government Employee

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | या दिवाळीत मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे. सेवानिवृत्तीच्या वयासंदर्भात केंद्र शासनाने माहिती दिलेली आहे. ती म्हणजे आता केंद्रशासन हे कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढण्याबाबत सकारात्मक विचार करत आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तेचे वय वाढू शकते.

सध्या केंद्र कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे 60 वर्षे एवढे आहे. परंतु या वयामध्ये वाढ करण्याचा निर्णय सरकार घेणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्य शासकीय सेवेत असणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय 58 वरून 60 करण्याबाबत सरकार पाठपुरावा करत आहे. राज्य सरकार देखील या निर्णयाबाबत सकारात्मक विचार करत आहे. परंतु याबाबत अजूनही कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही.

या सगळ्या परिस्थितीचा केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय आणखी दोन वर्षांनी वाढणार असल्याची चर्चा सुरू आहे. म्हणजेच केंद्रीय कर्मचाऱ्यांचे वय हे 60 वर्षा वरून 62 वर्ष केले जाऊ शकते. अशी माहिती समोर आलेली आहे. या वय वाढीबाबत केंद्रीय कर्मचारी संघटनांच्या माध्यमातून सरकारकडे वेळोवेळी मागणी करण्यात आलेली आहे. आणि या मागणीवर आता केंद्र सरकार सकारात्मक निर्णय घेणारा असल्याचे समोर येत आहे. सरकारने जर याबाबत सकारात्मक निर्णय घेतला, तर केंद्र शासनाच्या अधिनस्त असणाऱ्या जवळपास 23 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय जर 62 वर्ष झाले, तर महाराष्ट्र राज्य सरकार शासकीय सेवेत असणारी कर्मचारी देखील सेवानिवृत्तीचे वय वाढण्याबाबत आणखी आक्रमक होतील. कारण त्यांच्या सेवानिवृत्तीचे वय अजूनही 60 वर्ष झालेले नाही. गेल्या अनेक वर्षापासून राज्य कर्मचाऱ्यांची वय हे 58 वर्षावरून 60 वर्षे व्हावे यासाठी पाठपुरावा करत आहे. परंतु अजूनही त्यांच्या या मागणीला यश आलेले नाही.

Jioचा एक प्लॅन चालणार 4 लोकांच्या सिम साठी ; काय आहे किंमत? जाणून घ्या

jio family plan

भारतातील टेलिकॉम क्षेत्रातील अग्रगन्य कंपन्यांपैकी एक असलेली कंपनी म्हणजे रिलायन्स जिओ. परवडणाऱ्या दरात मोबाईल, परवडणाऱ्या दरात रिचार्ज देऊन सुरुवातीला जिओ ने अक्षरशः बाजार व्यापून टाकला होता. आता देखील जिओ कडून वेगवेगळ्या प्लान्स आपल्या ग्राहकांसाठी देण्यात येतात आज आपण अशाच एका प्लॅन बद्दल माहिती करून घेणार आहोत. सध्याचा विचार करता जिओचे अनेक प्लॅन्स उपलब्ध आहेत ज्याद्वारे यूजर त्याच्या गरजेनुसार प्लॅन निवडू शकतात. आजच्या लेखात आपण अशाच एका खास प्लॅन बद्दल जाणून घेणार आहोत.

जिओचा फॅमिली प्लॅन

होय आज आम्ही तुम्हाला जिओच्या फॅमिली प्लॅन बद्दल सांगणार आहोत. एक असा प्लान ज्यामध्ये प्लान एक आणि त्यामध्ये जास्तीत जास्त चार सिम कार्ड चालवले जाऊ शकतात.

काय आहे किंमत?

जिओच्या या फॅमिली प्लॅनची किंमत आहे 449 रुपये. हा प्लॅन एक पोस्टपेड प्लॅन आहे आणि या प्लॅनमध्ये युजर्स ना अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटा याशिवाय आणखीन सुविधा मिळतात.

जिओच्या या प्लॅनमध्ये 75 जीबी डेटा एक्सेस करण्यासाठी मिळतो आणि एक सीम ऑन केल्यानंतर ५ जीबी डेटा एक्स्ट्रा ऍड होतो. जिओचा हा रिचार्ज केल्यानंतर यूजर ना अनलिमिटेड कॉलिंग चा फायदा तर मिळतोच याशिवाय यामध्ये STD आणि लोकल कॉल्सचा सुद्धा समावेश करण्यात आला आहे.

तुम्ही या प्लानचा वापर करत असताना युजर माय जिओ ॲप मध्ये जाऊन प्लानला मॅनेज करू शकतो याशिवाय यामध्ये डेटा सुद्धा ऍड करू शकतो. फॅमिली प्लॅन मध्ये एक सिम ऍड ऑन केल्यानंतर 150 रुपये प्रति सीम एक्स्ट्रा ऍड केले जातात आणि त्याच्यानंतर GST सुद्धा ऍड केला जातो.

Symptoms Of Kidney failure | किडनी खराब झाली असल्यास सकाळी उठताच दिसतात ही लक्षणे; वेळीच व्हा सावधान

Symptoms Of Kidney failure

Symptoms Of Kidney failure | आपल्या शरीरातील प्रत्येक भाग खूप महत्त्वाचा आहे. प्रत्येक भागाचे एक वेगळे आणि महत्त्वाचे असे काम आहे ल. परंतु त्यातील किडनी हा खूप महत्त्वाचा असा अवयव आहे. किडनीच्या माध्यमातून आपल्या शरीरातील टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर टाकले जातात. त्याचप्रमाणे रक्त फिल्टर केले जाते. त्यामुळे किडनीचे (Symptoms Of Kidney failure) आपल्या शरीरात खूप महत्त्वाचे काम आहे. त्यामुळे मूत्रपिंडाविषयी कोणतीही समस्या असेल, तर ती समस्या ओळखणे आणि त्यावर लवकरात लवकर उपचार घेणे खूप महत्त्वाचे असते. अन्यथा यामुळे तुमच्या किडन्या खराब होऊ शकतात. जर तुमच्या किडन्यांविषयी कोणतीही समस्या असेल तर तुम्हाला काही लक्षणे ही सकाळी दिसतात. जर ही लक्षणे दिसत असेल तर तुम्ही वेळीच उपचार घेणे खूप गरजेचे आहे..

थकवा आणि अशक्तपणा | Symptoms Of Kidney failure

तुम्ही जर सकाळी झोपेतून उठल्यावर तुम्हाला थकवा जाणवत असेल, तर हे किडनी संबंधित एक अत्यंत गंभीर लक्षण आहे. जर तुमची किडनी योग्य रीतीने काम करत नसेल, तर तुमच्या शरीरातील विषारी पदार्थ हे शरीराबाहेर योग्यरित्या टाकले जात नाही. ते विषारी पदार्थ शरीरात जमा होतात. त्यामुळे सकाळी उठल्यावर तुम्हाला थकवा जाणवतो.

लघवीचा रंग

दररोज सकाळचा लघवीचा रंग आणि प्रमाण हे किडनीच्या आरोग्य बद्दल योग्य माहिती देत असतात. जर तुमची लघवी खूप पिवळी तसेच आसामान्य रंगाची असेल, तर तुम्हाला वारंवार लघवी करण्याची गरज आहे. मूत्रपिंडाच्या समस्येमुळे देखील हे लक्षण दिसू शकते.

पोटात दुखणे

तुम्ही सकाळी झोपेतून उठल्यावर तुमचा पाय, पोटात सूज असेल किंवा क्रॅम्स जाणवत असतील, हे देखील तुमचे मूत्रपिंड योग्यरीत्या काम करत नसल्याचे एक लक्षण आहे.

तहान लागणे

तुम्ही जर सकाळी उठल्यावर तुम्हाला सारखी सारखी तहान लागत असेल, हे देखील किती खराब होण्याचे एक लक्षण आहे. किडनीच्या समस्यांमुळे शरीरातील पाण्याचे संतुलन बिघडते. त्यामुळे सारखी तहान लागते. तसेच जर तुमच्या त्वचेला देखील सारखी खाज सुटत असेल, तरी देखील हे किडनी खराब होण्याचे लक्षण आहे. तुमच्या शेतात जर विषारी पदार्थ जास्त प्रमाणात जमा झाले, तर तुमच्या त्वचेला खाज सुटते. पुरळ येतात. यांसारख्या अनेक समस्या उद्भवतात. अशा समस्या जर तुम्हाला जाणवत असेल, तर तुम्ही लवकरात लवकर डॉक्टर आणि संपर्क साधून योग्य उपचार घ्या.