Monday, December 29, 2025
Home Blog Page 392

दिवाळीच्या सुट्टीत कोकण, गोव्याला जाण्याचा प्लॅन करताय ? कोकण रेल्वेच्या वेळापत्रकात ‘या’ तारखेपासून बदल

konkan railway

सध्या दिवाळीचा हंगाम सुरू असून दिवाळीमध्ये सुट्टीचा कालावधी असतो. या सुट्टीच्या कालावधीमध्ये जर तुम्ही कोकणात फिरायला जाण्याचा प्लान करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. कारण कोकण रेल्वे कडून रेल्वेच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आला आहे. हा बदल बिगर पावसाळी गाड्यांच्या वेळापत्रकात करण्याचा निर्णय कोकण रेल्वे कडून घेण्यात आला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या गाड्यांच्या फेऱ्यानुसार सुधारित वेळपत्रकाची १ नोव्हेंबर पासून अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यामुळे जर तुम्ही रेल्वे मार्गे कोकणात फिरायला जाण्यासाठी प्लॅन करत असाल तर मात्र बदललेल्या वेळापत्रक लक्षात घेऊन तुम्ही तुमचे नियोजन करायला हरकत नाही.

सिंधुदुर्ग जिल्हा आणि कोकण भागात नोव्हेंबर डिसेंबर या कालावधीमध्ये लोक आवर्जून हजेरी लावत असतात. नोव्हेंबर मध्ये दिवाळीच्या सुट्टीचा हंगाम तसेच डिसेंबर मध्ये क्रिसमसच्या सुट्ट्या अशा दोन्ही महिन्यांमध्ये सुट्ट्या लागून आल्यानं जवळचे सुंदर समुद्रकिनारे फिरण्यासाठीचे ठिकाण म्हणून कोकण समुद्रकिनाऱ्यांना लोकांची पसंती असून अनेक जण या ठिकाणी भेटी देत असतात. त्यात कोकण रेल्वे आल्यामुळे या काळामध्ये कोकण रेल्वेला गर्दी देखील असते मात्र एक नोव्हेंबर पासून कोकण रेल्वेच्या काही गाड्यांचे वेळापत्रक आणि वेळ बदलण्यात आली आहे चला जाणून घेऊया…

करमाळी लोकमान्य टिळक टर्मिनल एक्स्प्रेस

करमाळी लोकमान्य टिळक टर्मिनल (२२११६) एक्स्प्रेसचा कणकवली स्थानकात सांयकाळी ४:२२ ऐवजी ४:३२ मिनिटांनी पोहचणार आहे. ७ नोव्हेंबरपासून हा बदल लागू होणार आहे. त्याचप्रमाणे वास्को द गामा पटणा (१२७४१) एक्स्प्रेसची रत्नागिरी स्थानकावर पोहोचण्याची सुधारित वेळ रात्री १२:३५ वाजता असणार आहे. तर मुंबई सीएसएमटी ते मडगाव जंक्शन मांडवी एक्स्प्रेस नडवली स्थानकात दुपारी ४ वाजून ५ मिनिटांनी पोहचणार आहे.

लोकमान्य टिळक टर्मिनल – मंगळुरू सेंट्रल मत्स्यगंधा एक्स्प्रेस

लोकमान्य टिळक टर्मिनल – मंगळुरू सेंट्रल मत्स्यगंधा एक्स्प्रेस चिपळूण स्थानकावर सायंकाळी ७:४२ वाजता पोहचेल. १ नोव्हेंबरपासून हे वेळापत्रक लागू होणार आहे. एर्नाकुलम जंक्शन अजमेर (१२९७७), कोचुवेली – पोरबंदर एक्स्प्रेस (२०९०९), भावनगर – कोचुवेली (१९२६०) तसेच पोरबंदर ते कोचुवेली (२०९१०) एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकातही बदल केल्याचे कोकण रेल्वेने कळविले आहे.

दिवाळीसाठी विशेष गाड्यांची सोय

मध्य रेल्वेने प्रवाशांसाठी रेल्वेच्या 570 विशेष सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यातील 180 गाड्या राज्यात धावणार आहेत. लातूर, सावंतवाडी रोड, नागपूर, पुणे, कोल्हापूर, नांदेड आणि इतर ठिकाणाहून धावणार आहेत. तर, 378 सेवा या उत्तर भारतातील दानापूर, गोरखपूर, छपरा, बनारस, समस्तीपूर, आसनसोल, आगरतळ, संत्रागाछी या विविध भागातील प्रवाशांसाठी आहेत.

महाविकास आघाडीचा सावळागोंध; अनेक ठिकाणी परस्परविरोधी उमेदवार

Mahavikas Aghadi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची तयारी चालू झालेली आहे. जागा वाटप देखील झालेल्या आहेत.परंतु यावेळी राज्यातील राजकारणात काही वेगळ्याच गोष्टी घडताना आपल्याला दिसत आहेत. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी तयार केलेली महाविकास आघाडी कोसळण्याच्या मार्गावर आलेली आहे. विधानसभा निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या असताना देखील या महाविकास आघाडीमध्ये मतभेद असल्याचे दिसून येत आहे. येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल देखील जाहीर केला जाणार आहे. त्याचप्रमाणे अर्ज भरण्याची अंतिम तारीख देखील संपली आहे. परंतु महाविकास आघाडीतील या पक्षांनी एकमेकांच्या विरोधातच उमेदवार उभे केले असल्याचे चित्र दिसून येत आहे. या महाविकास आघाडीमध्येच एक मत नसल्याने हा पक्ष पुढे जाऊन महाराष्ट्र कसा सांभाळू शकेल? असा प्रश्न अनेक जण विचारत आहे.

महाविकास आघाडीचे जागा वाटपाचे काम देखील अजून चालू आहे. अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस संपला आहे, तरी अजून देखील या पक्षाची अनेक कामे अपूर्ण आहेत काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या नेत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाद झाल्याचे दिसून येत आहे.या नेत्यांमध्येच आपापसात बाचाबाची झाल्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्र चालू आहे. महाविकास आघाडीमध्ये एकमेकांच्या उमेदवाराना विरोधात उभे करण्यात आलेले आहेत.

महाविकास आघाडीने परांडा, दक्षिण सोलापूर, दिग्रस आणि मिरज या ठिकाणी एकमेकांच्या विरोधातच आपले उमेदवार उभे केलेले आहेत. यामध्ये दिग्रसमध्ये काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या विरोधात उद्धव ठाकरे या गटाने पवन जयस्वाल यांना उमेदवारी दिलेली आहे. तसेच सांगली जिल्ह्यातील मिरज विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे यांनी तानाजी सातपुते यांच्या विरोधात मोहन वानखेडे उतरलेले आहे. सोलापूर दक्षिण मध्ये उद्धव ठाकरे गटाचे अमर पाटील उभे आहेत. तर त्यांच्या विरोधात काँग्रेसचे दिलीप माने यांनी अर्ज भरलेला आहे.

भायखळा विधानसभा मतदारसंघातून उबाठा गटाचे मनोज जामसूतकर यांच्या विरोधात काँग्रेसचे मधु अण्णा चव्हाण यांनाही उमेदवारी दिलेली आहे. तसेच अहिल्यानगर मध्ये संजय राऊत यांनी पैसे देऊ शरद पवार गटाला विकली असल्याचा आरोप देखील उद्धव ठाकरे यांच्यावरच आता त्यांच्या गटातील उमेदवार लागलेले आहेत. काँग्रेसने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या विरोधात स्थानिक नेते देखील नाराज झालेले आहेत. या सगळ्या गोष्टींमुळे आता या तीन पक्षांमध्ये आपापसात मतभेद निर्माण झालेले आहेत. आणि त्यांनी त्यांच्याच गटातील उमेदवार एकमेकांविरोधात उभे केलेले आहे.

महाविकास आघाडीतील शेतकरी कामगार पक्ष आणि समाजवादी पक्ष हे आघाडीचे घटक पक्ष आहेत. परंतु जागावाटप करताना या पक्षांचा विचार देखील करण्यात आलेला नाही. समाजवादी पक्षात इच्छुक असणाऱ्या जागांवर महाविकास आघाडीने त्यांचे उमेदवार दिलेले आहेत. त्यामुळे आता समाजवादी पक्षाचे नेते नाराज झालेले, असून अखिलेश यादव परस्पर उमेदवार असल्याचे त्यांनी जाहीर केलेले आहे. त्याचप्रमाणे मालेगावमध्ये या विधानसभा मतदारसंघात एक गट मतदानामुळे भाजपचे दीड लाखा पेक्षा अधिक आघाडीवर असलेले सुभाष भामरे पराभूत झाले होते. या ठिकाणी जाता समाजवादी पक्षाने त्यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे. तसेच धुळे शहर मतदार संघात देखील समाजवादी पक्षाचे उमेदवार उतरलेले आहेत.

रायगड जिल्ह्यातील उरण, नांदेड जिल्ह्यातील लोहा या मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाची ताकद आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला विधानसभा मतदारसंघात देखील शेतकरी कामगार पक्ष मजबूत आहे. या ठिकाणी महाविकास आघाडीतील पक्षांनी आपले उमेदवार देखील उतरवलेले आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख उलटून गेली आहे, तरी देखील महाविकास आघाडीमध्ये वाद होताना दिसत आहे. या जागावाटपाच्या चर्चेवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यामध्ये जोरदार बाचाबाची झाल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात फिरत आहे. उबाठा गटाच्या नेत्यांनी मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावाची चर्चा देखील चालू केलेली आहे. परंतु काँग्रेस त्यांच्या या मताशी अजिबात सहमत नाही. निवडणुकीआधी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करण्याची परंपरा काँग्रेसमध्ये नाही. असे मुख्यमंत्री गांधी परिवाराचे निकटवर्ती पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलेले आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये काँग्रेसच्या हाताला काहीच लागलेले नाही. त्यामुळे कोकणातील तिन्ही जिल्ह्यातील कार्यकर्ते आता प्रचंड नाराजी व्यक्त करत आहे.

सलमान खानला पुन्हा जिवे मारण्याची धमकी, मेसेज पाठवत केली 2 कोटींची मागणी

salman khan

अभिनेता सलमान खान वर आलेले संकटाचे वादळ काही हटण्याचे नाव घेत नाहीयेत. सलमानला वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. हा ट्रेंड मागच्या अनेक वर्षांपासून सुरू आहे, मात्र काही महिन्यांपूर्वी सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटजवळ गोळ्या झाडल्या गेल्या होत्या. त्यानंतर हे प्रकरण थांबण्याची चिन्हे दिसत नाहीये. दरम्यान, सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. काल म्हणजेच मंगळवारी मुंबई वाहतूक पोलिसांच्या ताब्यात एक मेसेज आला, ज्यामध्ये एका अज्ञात व्यक्तीने धमकी दिली आणि मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीने 2 कोटी रुपयांची मागणी केतयाची माहिती आहे.

वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

या प्रकरणावर बोलताना एका अधिकाऱ्याने सांगितले की, मेसेजमध्ये पाठवणाऱ्याने असेही म्हटले आहे की, जर त्याला पैसे मिळाले नाहीत तर सलमान खानला मारून टाकू. धमकीचा मेसेज मिळाल्यानंतर मुंबईतील वरळी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला, पोलिसांनीही तातडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला.

सलमानला अनेकदा धमक्या आल्या आहेत

दरम्यान सलमान खानचे निकटवर्तीय नेता बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सलमान आता कुठेही जाताना त्याच्यासोबत गार्ड असतात. सलमान आणि त्याचे वडील सलीम खान यांना अनेकदा धमक्या आल्या आहेत. लॉरेन्स बिश्नोईचे सहकारी फेसबुक पोस्टद्वारे एकामागून एक धमक्या आणि हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारताना दिसत आहेत. याप्रकरणी आतापर्यंत अनेकांना अटक करण्यात आली आहे.

सलीम खान यांच्या वक्तव्यावरुन वाद

नुकत्याच एका मुलाखतीदरम्यान सलमान खानचे वडील सलीम खान यांनी सलमानने काहीही चूक केलेली नाही, त्यामुळे त्याला माफी मागण्याची गरज नाही. सलमानने आजपर्यंत एक झुरळही मारलेले नाही, असेही ते म्हणाले. मात्र, सलीम खान यांनी दिलेल्या वक्तव्यावर बिष्णोई समाजातील अनेक लोक चांगलेच संतापले. शिवाय त्यांच्या वक्तव्यावर अनेक प्रतिक्रिया सुद्धा समाज माध्यमामधून उमटल्या.

देशातील वृद्ध व्यक्तींना PM मोदींकडून दिवाळी गिफ्ट ! मिळणार 5 लाखांपर्यंत मोफत इलाज

ayushman bharat

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी आयुष्मान योजनेच्या आयुष्मान भारत “निरामयम (ज्याला आजार होत नाही)” या नवीन टप्प्याचा शुभारंभ केला. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद (AIIA), दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी सुमारे 12,850 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचा शुभारंभ केला.आता आयुष्मान भारत या प्रमुख आरोग्य विमा योजनेंतर्गत ७० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या सर्व वृद्धांना मोफत उपचार घेता येणार आहेत.

दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार उपलब्ध होतील. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत 70 वर्ष आणि त्यापेक्षा अधिक वय वर्ष असलेल्या वयस्क लोकांसाठी हेल्थ कव्हरेज मिळणार आहे. ही सुविधा कोणत्याही वृद्ध व्यक्तींसाठी प्राप्त होईल प्रत्येक वर्षी पाच लाख रुपये पर्यंतचा मोफत इलाज याद्वारे करता येणार आहे. याशिवाय जे परिवारातले इतर सदस्य आहेत त्यांना देखील आयुष्मान योजनेचा फायदा होऊ शकतो. याच परिवारातील 70 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या वृद्ध व्यक्तींना दरवर्षी वेगळा 5 लाख रुपये पर्यंतचा मोफत इलाज दिला जाणार आहे. या योजनेमुळे देशातील जवळपास 4.5 करोड परिवार आणि त्यामधील सहा करोड पेक्षा जास्त वृद्ध व्यक्तींना लाभ मिळणार आहे आतापर्यंत या योजनेमध्ये कमी वय असलेल्या परिवारांना लाभ देण्यात येत होता. मात्र आता जास्त वय असलेल्या वृद्ध व्यक्तींना देखील या योजनेचा चांगल्या प्रकारे लाभ घेता येणार आहे

या योजनेअंतर्गत 70 वर्षांवरील वृद्ध व्यक्तींना आयुष्यमान कार्ड वाटप केले जाणार आहे. जे फॅमिली आयुष्मान प्लॅन पेक्षा वेगळे असेल स्पेशल असेल. हे स्पेशल कार्ड 29 ऑक्टोबर पासून मिळायला सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली येथील एका कार्यक्रमात दरम्यान वृद्ध व्यक्तींना हे कार्ड सोपवले.

हे आयुष्मान कार्ड बीआयएस पोर्टल https://bis.pmjay.gov.in/ आयुष्मान ॲपद्वारे बनवले जातील, यासाठी वृद्धांना त्यांचे आधार कार्ड अपडेट करावे लागेल आणि केवायसी देखील करावे लागेल.

तुमची वाइफ होईल सुपर इम्प्रेस , IRCTC ने आणलंय असं पॅकेज ज्यापुढे मालदीव सुद्धा फेल

irctc andman

परदेश दौऱ्यांचा रुबाब काही वेगळाच असतो. परदेश प्रवास प्रत्येकाच्या बकेट लिस्टमध्ये समाविष्ट आहे. पण काहीजण ते पूर्ण करू शकतात आणि काही नाहीत. परदेशी सहलीचे नियोजन करताना सर्वात मोठी चिंता असते ती पैशाची. बजेटमुळे तुम्ही पत्नीसोबत परदेशी सहलीला जात नसाल तर काळजी करण्याची गरज नाही. खरं तर, आज आम्ही तुम्हाला भारतीय रेल्वेची उपकंपनी असलेल्या IRCTC च्या त्या पॅकेजबद्दल सांगत आहोत, ज्याच्या समोर मालदीव देखील फेल ठरेल.

IRCTC ने कपल्ससाठी एक चांगले पॅकेज आणले आहे. यामध्ये प्रवाशांना दिल्ली ते अंदमान असा विमान प्रवास उपलब्ध करून दिला जाणार आहे. हे पॅकेज 5 रात्री आणि 6 दिवस चालेल. या प्रवासात पर्यटकांना पोर्ट ब्लेअर, हॅवलॉक, नील आयलंड, कोव्ह बीच, रॉस आयलंड आदी ठिकाणी जाण्याची संधी मिळणार आहे.

टूर पॅकेजची खास वैशिष्ट्ये

पॅकेजचे नाव- Amazing Andaman Ex Delhi (NDA13)
किती दिवस – 5 रात्री आणि 6 दिवस
प्रस्थान तारीख- 22 नोव्हेंबर 2024 / 9 डिसेंबर 2024
प्रवास मोड- फ्लाइट
हॉटेल श्रेणी- थ्री स्टार

किती खर्च येईल?

पॅकेजची किंमत ऑक्यूपेंसीनुसार असेल. पॅकेज 67,600 रुपये प्रति व्यक्ती पासून सुरू होईल. जर तुम्ही या सहलीला एकटे जात असाल तर तुम्हाला यासाठी 87,600 रुपये खर्च करावे लागतील. दोन लोकांसाठी प्रति व्यक्ती भाडे 69,400 रुपये आहे. तर 3 लोकांसह प्रति व्यक्ती भाडे 67,600 रुपये आहे.

सोन्यात गुंतवणुकीचा स्मार्ट फंडा ! 10-20 आणि 30 रुपयांच्या गुंतवणुकीवरही सोनं घरी आणण्याची संधी

gold

आज धनोत्रयोदशी आहे. या दिवशी सोनं खरेदी करण्याची पद्धत आहे. मात्र सध्याचे गगनाला भिडलेले सोन्याचे दर पाहता सोनं घेणे म्हणजे ‘हमारे बस की बात नही’ अशी काहीशी स्थिती आहे. मात्र या दिवाळीत सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर मुकेश अंबानींनी तुमच्यासाठी एक उत्तम योजना आणली आहे. होय, मुकेश अंबानींची कंपनी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसने दिवाळीपूर्वी धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर आणखी एक भेट दिली आहे. JioFinance ॲपवर कंपनीने स्मार्ट गोल्ड फीचर सुरू केले आहे. याद्वारे ग्राहक डिजिटल सोने खरेदी करू शकतात. भौतिक सोन्यापेक्षा डिजिटल सोने खरेदी करणे स्वस्त आणि सुरक्षित आहे.

रोख, सोन्याचे नाणे किंवा दागिन्यांमध्ये रूपांतर

स्मार्ट गोल्ड फीचर अंतर्गत वापरकर्ते फक्त 10 रुपयांपासून सोन्यात गुंतवणूक सुरू करू शकतात अशी सुविधा देण्यात आली आहे. त्याचा फायदा असा होईल की तुमच्याकडे पैसे कमी असले तरी तुम्ही सोन्यात सहज गुंतवणूक करू शकता. ॲपवर स्मार्ट सोने खरेदी करण्यासाठी पूर्णपणे डिजिटल प्रक्रिया देण्यात आली आहे. तुम्ही ॲपद्वारे स्मार्ट गोल्ड स्कीममध्ये डिजिटल पद्धतीने सोने खरेदी करून सोन्यामधील तुमची गुंतवणूक रिडीम करू शकता. सोन्यामधील गुंतवणुकीतून मिळालेल्या स्मार्ट गोल्ड युनिट्सचे कधीही रोख, सोन्याची नाणी किंवा दागिन्यांमध्ये रूपांतर करता येते.

दोन प्रकारे गुंतवणूक करण्याची सुविधा

जिओ फायनान्स ॲपवर स्मार्टगोल्ड स्कीममध्ये सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी ग्राहकांकडे दोन पर्याय आहेत. प्रथम, तुम्ही एकूण गुंतवणुकीची रक्कम ठरवून गुंतवणूक करू शकता. अशा प्रकारे, त्या दिवसाच्या दरानुसार तुम्हाला युनिट्सचे वाटप केले जाईल. दुसरे म्हणजे, तुम्ही सोन्याच्या वजनानुसार म्हणजेच ग्रॅमनुसार गुंतवणूक करू शकता. भौतिक सोन्याची डिलिव्हरी 0.5 ग्रॅम आणि त्याहून अधिक होल्डिंगवर असेल. सोने तुम्हाला 0.5 ग्रॅम, 1 ग्रॅम, 2 ग्रॅम, 5 ग्रॅम आणि 10 ग्रॅमच्या मूल्यांमध्ये उपलब्ध असेल.

२४ कॅरेट सोने मिळेल

ग्राहक थेट ॲपवर सोन्याची नाणी खरेदी करून होम डिलिव्हरीच्या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. दुसरे म्हणजे, ग्राहकाचे सोने सुरक्षित ठेवण्यासाठी, गुंतवणुकीनंतर, स्मार्ट गोल्डमधील गुंतवणुकीच्या बरोबरीचे २४ कॅरेट सोने खरेदी केले जाईल आणि ते विमा उतरवलेल्या लॉकरमध्ये तिजोरीत ठेवले जाईल. याचा फायदा असा होईल की, सोने हाताळण्यापासून मुक्तता मिळेल आणि चोरीची भीतीही राहणार नाही. ही सुविधा जिओ फायनान्स ॲपवर देखील उपलब्ध असेल ज्याद्वारे तुम्ही तुम्हाला पाहिजे तेव्हा सोन्याची थेट बाजारभाव पाहू शकता. स्मार्ट गोल्ड हा डिजिटल सोने खरेदी करण्याचा एक सोयीस्कर, सुरक्षित आणि अंतर्ज्ञानी मार्ग आहे.

Ration Card | रेशन कार्ड धारकांना मिळणार नाही गहू; E- KYC करण्याच्या तारखेतही वाढ

Ration Card

Ration Card | आपले राज्य सरकारने केंद्र सरकार हे सामान्य जनतेसाठी विविध योजना आणत असतात. त्याचा फायदा अनेक नागरिकांना होतो. सरकारने गरीब नागरिकांसाठी रेशन कार्ड योजना आणलेली आहे. या योजनेअंतर्गत रेशन कार्डधारकांना स्वस्त दरामध्ये धान्य मिळत असते. तसेच इतर अनेक गोष्टी देखील मिळत होत्या. परंतु आता सोयगाव तालुक्यातील रेशन कार्ड ( कांसाठी दिवाळीत रेशन येणार होते. त्यात एक बदल करण्यात आलेला आहे. तो म्हणजे आता या रेशन धारकांना गहू कमी दिले जाणार आहे. आणि त्या ऐवजी नागरिकांना ज्वारी देण्यात येणार आहे. सोयगाव तालुक्यातील नागरिकांसाठी जवळपास 1000 क्विंटल ज्वारी आलेली आहे. आणि ती तालुक्यातील लोकांना वाटप केली जाणार आहे. या तालुक्यातील विविध योजनेचा 24000 शिधापत्रिकाधारक आहेत. यामध्ये शिलापत्रिकाधारकांना रेशन दुकानातून जवळपास 15 किलो गहू देण्यात येत होता.

परंतु आता त्यामध्ये 6 किलोची कपात केली जाणार आहे. आणि नागरिकांना 9 किलो गहू आणि 6 किलो ज्वारी देण्यात येणार आहे. रेशन कार्ड धारकांना तांदूळ देखील देण्यात येतो. परंतु या तांदळात कोणत्याही प्रकारची कपात केलेली नाहीये. रेशन कार्डधारकांना 7 किलो तांदूळ आणि अन्न सुरक्षा योजनेतील कार्डधारकांना 4 किलो तांदूळ दिला जाणार आहे. सरकारच्या या योजनेचा फायदा आतापर्यंत राज्यातील अनेक नागरिकांना झालेला आहे.

या आधी सरकारने रेशन कार्डधारकांनाही केवायसी पूर्ण करण्यास सांगितलेले होते. सुरुवातीला 31 सप्टेंबर ही केवायसी करण्याची शेवटची तारीख दिली होती. परंतु अनेक नागरिकांनी ही केवायसी केलेली नाही. त्यामुळे सरकारने ही तारीख वाढवून 31 ऑक्टोबर पर्यंत केली होती. परंतु अद्यापही अनेक लोकांची ई केवायसी पूर्ण झालेली नाही. म्हणून सरकारने ही केवायसी करण्याची प्रक्रिया 31 डिसेंबर पर्यंत वाढवलेली आहे. जर 31 डिसेंबर पर्यंत कोणत्या नागरिकाने केवायसी केले नाही, तर त्याला रेशन मिळणार नाही असे देखील सांगण्यात आलेले आहे. त्यामुळे जर तुम्ही तुमच्या रेशन कार्डचे इ केवायसी केले नसेल तर लवकरात लवकर करून घ्या.

IIM Mumbai Bharti 2024 | इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई अंतर्गत भरती सुरु, असा करा अर्ज

IIM Mumbai Bharti 2024

IIM Mumbai Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही नोकरीची अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई (IIM Mumbai Bharti 2024 ) यांच्या अंतर्गत एक मोठी भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत फायनान्स आणि लेखा सहाय्यक या पदाच्या रिक्त जागा आहेत. या पदाच्या एकूण 2 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन ईमेलच्या पद्धतीने भरायचे आहेत. त्याचप्रमाणे 10 नोव्हेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखे अगोदरच अर्ज करायचे आहेत. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव | IIM Mumbai Bharti 2024

या भरती अंतर्गत फायनान्स आणि लेखा सहाय्यक या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

रिक्त पद संख्या

या भरती अंतर्गत 2 रिक्त पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत.

वयोमर्यादा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 30 वर्ष दरम्यान असते गरजेचे आहे.

नोकरीचे ठिकाण

या भरती अंतर्गत तुमची निवड झाली तर तुम्हाला मुंबई या ठिकाणी नोकरी करावी लागेल.

अर्ज पद्धती | IIM Mumbai Bharti 2024

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन ईमेलच्या माध्यमातून करावा लागेल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

10 नोव्हेंबर 2024 या अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज.

ई-मेल आयडी

[email protected]

वेतनश्रेणी

या भरती अंतर्गत तुमची निवड झाली तर तुम्हाला दर महिन्याला 60000 ते 75 हजार रुपये दरम्यान पगार मिळेल.

अर्ज कसा करावा ?

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • वर दिलेल्या ई-मेलवर तुम्हाला हा अर्ज पाठवायचा आहे.
  • 10 नोव्हेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
  • या तारखे अगोदर अर्ज करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

मुकेश अंबानींची धमाकेदार दिवाळी भेट ! खरेदी करा 4G फोन फक्त 699 रुपयांना

jio

रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांना दिवाळीची एक अप्रतिम भेट दिली आहे. कंपनीने JioBharat K1 कार्बन आणि JioBharat V2 4G फोनच्या किमती कमी केल्या आहेत. त्यानंतर हे दोन्ही फीचर फोन आणखी स्वस्त झाले आहेत. हे कीपॅड फोन कमी किमतीत चांगले फीचर्स देतात. ते दोघेही JioCinema, JioPay आणि कॉल रेकॉर्डिंग सारख्या सुविधा देतात.

4G फोन फक्त 699 रुपयात

Jio च्या दोन्ही 4G फोनवर उपलब्ध डील ग्राहकांना मर्यादित काळासाठी दिली जात आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर अधिकाधिक लोकांना 2G वरून 4G कडे वळवणे हा किंमत कमी करण्यामागील जिओचा उद्देश आहे. JioBharat K1 कार्बन आणि JioBharat V2 4G फोनची किंमत यापूर्वी 999 रुपये होती, परंतु दिवाळी ऑफर अंतर्गत ते केवळ 699 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत. म्हणजेच तुम्ही थेट 300 रुपयांची बचत करत आहात.

कुठून खरेदी कराल ?

दोन्ही फोन रिलायन्स डिजिटल स्टोअर, जिओ मार्ट आणि ॲमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध आहेत. JioBharat K1 कार्बन ग्रे-रेड, व्हाइट-रेड, ब्लॅक-ग्रे कॉम्बिनेशनमध्ये येतो, तर V2 ॲश ब्लू आणि सोलो ब्लॅक ब्लॅक कलरमध्ये घेता येतो.

K1 कार्बन आणि V2 ची वैशिष्ट्ये

दोन्ही 4G फोनमध्ये 1.77 इंच डिस्प्ले आहे. यामध्ये डिजिटल रियर कॅमेरा, 1000mAh बॅटरी आणि 128GB स्टोरेज आहे. यामध्ये, UPI पेमेंट करण्यासाठी प्रीलोडेड JioPay ॲप प्रदान केले आहे. जिओचॅट आणि जिओसिनेमा यांचाही त्यात समावेश आहे. हे कॉल रेकॉर्डिंग फीचरसह येतात. हे थेट टीव्ही चॅनेल आणि 23 भाषांसाठी समर्थन प्रदान करतात. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे फोन सक्रिय ठेवण्यासाठी फक्त 123 रुपयांचा रिचार्ज लागतो. ज्यामध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉल्स आणि 14GB डेटा रोल आउट करण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी जिओने इंडिया मोबाइल काँग्रेस (IMC 2024) मध्ये स्वस्त किमतीत आपले दोन नवीन फीचर फोन लॉन्च केले होते. JioBharat V3 आणि V4 फोन परवडणाऱ्या किमतीत चांगल्या वैशिष्ट्यांसह आणले होते. Jio च्या नवीन 4G फीचर फोन JioBharat V3 आणि V4 ची किंमत फक्त 1,099 रुपये आहे. हे सर्व मोबाईल स्टोअर्स तसेच JioMart आणि Amazon वरून खरेदी केले जाऊ शकतात.

नोकर भरतीत पारदर्शकता, लाखो युवकांना नोकरीची सुरक्षा; शिंदे सरकारने करून दाखवलं

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गेल्या काही वर्षांपासून आपल्या राज्यामध्ये सुशिक्षित बेरोजगारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले होते. अनेक तरुण हे त्याचे करिअर घडवण्यासाठी नोकरीसाठी मुंबई, पुणे यांसारख्या शहरांमध्ये लाखो स्वप्न त्यांच्या डोळ्यात घेऊन येत होते. परंतु गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात सरकारी नोकऱ्या मिळणे, खूप कठीण झाले होते. या काळात अनेक घोटाळे झाले, तसेच प्रशासकीय कामकाज लांबवले गेले. पेपर फुटी झाली. यामुळे या तरुणांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले. त्यामुळे सरकारी नोकरी करण्याचे त्यांचे स्वप्न मात्र बाजूला राहिले. परीक्षा जरी झाली, तरी नोकर भरती वेळेवर होत नव्हती. निकाल वेळेवर लागत नव्हते. यामुळे अनेक तरुणांचा सरकारी यंत्रणांवरील विश्वास देखील उडायला लागला होता.

परंतु या सगळ्या वातावरणात देखील आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र लाखो तरुणांना एक आशेचा किरण दाखवला. आणि त्यांनी राज्यातील शैक्षणिक प्रक्रियेमध्ये सुधारणा केली. भरती प्रक्रियेत देखील मोठ्या प्रमाणात परिवर्तन झाल्याचे दिसून आले आहे. नोकरीमध्ये पारदर्शकता आली आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्यक्षमतेवर नोकऱ्या देखील मिळाल्या. आता आपण सुशिक्षित बेरोजगारांचे प्रमाण वाढण्यामागे तसेच सरकारी भरती न होण्यामागे नक्की कोणती कारणे होती? आणि महायुती सरकारने यासाठी कोणती पावले उचलली हे जाणून घेणार आहोत.

पेपर फुटीचे आरोप

गेल्या काही वर्षापासून सरकारी भरतीच्या पेपर फुटीचे प्रकार मोठ्या प्रमाणात आढळून आलेले आहेत. त्यामुळे नोकर भरतीमध्ये विलंब आलेला आहे. शिक्षक पात्रता परीक्षा असो किंवा महाराष्ट्र आरोग्य विभाग भरती परीक्षा असेल अनेक परीक्षांमध्ये भ्रष्टाचाराच्या आरोप लावले गेले. त्याचप्रमाणे 2020 ते 22 या दरम्यान अनेक उमेदवारांची निराशा झालेली होती.

पारदर्शकतेसाठी यंत्रणेत सुधारणा झाल्या

गेल्या काही वर्षापासून परीक्षा तसेच इतर अनेक गोष्टींबद्दल नागरिकांच्या मनात संभ्रम निर्माण होता. परंतु महायुती सरकारने या शिक्षण प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याचा चांगला प्रयत्न केलेला आहे. या परीक्षेच्या प्रणालीत त्यांनी वेगवेगळ्या सुधारणा केलेल्या आहेत. आणि योजना देखील असलेल्या आहेत. गेल्या दोन वर्षात विविध विभागांमध्ये 1 लाखापेक्षाही अधिक कर्मचाऱ्यांची भरती झालेली आहे. आणि या बदलांमुळे राष्ट्रीय मानकांच्या बरोबरीने मूल्यमापन देखील झालेले आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्ताला आणि त्यांच्या कष्टाला देखील वाव मिळाला आहे.

शैक्षणिक क्षेत्रात सुधारणा

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील शिक्षण पद्धतीमध्ये अनेक अमुलाग्र बदल घडविण्यात आलेले आहेत. शिक्षक भरतीसाठी पवित्र ऑनलाईन पोर्टलची ओळख देखील झालेली आहे. तसेच या प्लॅटफॉर्ममुळे गावात प्रदीर्घ काळाची शिक्षकांच्या कमतरतेमुळे याचा थेट निराकरण झालेले आहे. 2024 च्या सुरुवातीस या पोर्टल द्वारे 11 हजारांपेक्षा जास्त शिक्षकांची पदे भरण्यात आलेली आहे. यामुळे भ्रष्टाचाराचा धोका देखील कमी झालेला आहे. आणि खेड्यातील मुलांना देखील चांगले शिक्षण मिळत आहे.

पोलीस भरती सुधारणा

राज्यामध्ये सर्वात मोठी पोलीस भरती आयोजित करण्यात आलेली होती. यामध्ये कॉन्स्टेबल या पदाच्या 17000 रिक्त जागा होत्य. आणि या पदासाठी तब्बल 1.7 दशलक्ष अर्ज आलेले होते. ही भरती संपूर्ण डिजिटल पद्धतीने झालेली आहे. तसेच नवीन पडताळणी देखील झालेली आहे. यामुळे या भरतीत येणारे अनेक अडथळे दूर झालेले आहे. या पारदर्शक पद्धतीमुळे गुणवत्तेत देखील सुधारणा झालेली आहे.

फसवणुकीविरोधी कडक कायदे

राज्यामध्ये अनेक गैरप्रकार तसेच फसवणूक होत होते. यावेळी महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा कायदा 2024 लागू केला. या नवीन कायद्यात फसवणूक करणाऱ्यांना पाच वर्षापर्यंत तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात येणार आहे. तसेच जे पात्र उमेदवार आहे, त्यांना सरकारी नोकऱ्या आता चांगल्या पद्धतीने मिळणार आहेत. असा विश्वास देखील तरुणांच्या मनात निर्माण झालेला आहे.