Monday, December 29, 2025
Home Blog Page 393

ONGC Bharti 2024 | ONGC अंतर्गत 10 वी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी; ईमेलने करा अर्ज

ONGC Bharti 2024

ONGC Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. ज्याचा फायदा आजपर्यंत अनेक उमेदवारांना झालेला आहे. आज देखील आम्ही नोकरीची अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत. कारण आता तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ (ONGC Bharti 2024) मर्यादित अंतर्गत एक मोठी भरती जाहीर झालेली आहे. ही भरती अप्रेंटिस या पदासाठी आहे. या पदाच्या एकूण 2236 रिक्त जागा आहेत. आणि त्या रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. त्याचप्रमाणे 10 नोव्हेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव | ONGC Bharti 2024

या भरती अंतर्गत अप्रेंटिस या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

रिक्त पदसंख्या

या भरती अंतर्गत एकूण 2236 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

वयोमर्यादा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 18 ते 24 वर्ष दरम्यान असणे गरजेचे आहे.

अर्जपद्धती

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

10 नोव्हेंबर 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.

शैक्षणिक पात्रता | ONGC Bharti 2024

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे कमीत कमी शिक्षण दहावी किंवा बारावी पास असणे गरजेचे आहे तसेच कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी परीक्षा पास असणे देखील गरजेचे आहे

वेतनश्रेणी

या भरती अंतर्गत निवड झाल्यावर तुम्हाला 9 हजार रुपये पर्यंत मासिक पगार मिळेल.

अर्ज कसा करावा ?

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील अर्ज करू शकता.
  • 10 नोव्हेंबर 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदर अर्ज करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

कारण नसतानाही थकवा जाणवत असेल तर सावधान! असू शकतो कोलेस्ट्रॉलचा धोका

Cholesterol

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल लोकांची जीवनशैली मोठ्या प्रमाणात बदललेली आहे. आणि या बदलत्या जीवनशैलीसोबत त्यांना अनेक आजारांची लागण देखील झालेली आहे. आज काल हृदयविकार, डायबिटीस सारख्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. ज्या लोकांना डायबिटीस किंवा हृदयविकाराचा त्रास असतो. त्यांना कोलेस्ट्रॉल होण्याची शक्यता खूप जास्त असते. त्यांच्यासाठी कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवणे गरजेचे असते. जर तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढले, तर त्यामुळे तुमच्या शरीरावर घातक असा परिणाम होऊ शकतो. आता कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर शरीरात कोणती लक्षणे दिसतात. हे आपण जाणून घेणार आहोत.

कॉलेस्ट्रॉल हा चरबीचा एक प्रकार आहे. जो आपल्या शरीरासाठी उपयुक्त असतो. पण जर तो जास्त प्रमाणात वाढला तर तो आपल्या शरीरासाठी अत्यंत हानिकारक असतो. शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढले, तर रक्त प्रवाहात अडथळा निर्माण होतो. कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आहार योग्य प्रमाणात आणि सकस आहार घेणे खूप गरजेचे असते. यासाठी तळलेले पदार्थ, प्रक्रिया केलेले मांस भाजलेल्या पदार्थांपासूनचे प्रमाण जास्त प्रमाणात वाढते. यामुळे लठ्ठपणा आणि जास्त वजनाचा त्रास होतो. तसेच बैठे जीवनशैली आणि प्रक्रिया केलेले पदार्थ खाल्ल्याने देखील डायबिटीस टाईप 2 यांसारखे आजार वाढतात. आणि कोलेस्ट्रॉलची पातळी देखील यामुळे वाढते.

जर तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढली तर तुमचे डोळे आणि सांध्याभोवती लहान पिवळसर गाठ किंवा सूज आल्यासारखी दिसते. त्याचप्रमाणे कॉलेस्ट्रॉल वाढले की तुम्हाला अनावश्यक थकवा येतो. तसेच शरीरात निर्माण झालेल्या समस्यांमुळे थकवा जाणवतो. आणि रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो. तसेच कधी कधी छातीत देखील असह्य वेदना होतात. शारीरिक हालचाली केल्यावर दम लागतो. ही कोलेस्ट्रॉलची सुरुवातीची लक्षणे आहेर. सतत थकवा जाणवतो, छातीत अस्वस्थता जाणवते, त्वचेवर अतिरिक्त चरबी जमा होतेम जर तुम्हाला यातील कोणतीही लक्षण दिसत असेल, तर तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या. तुमचे वय जर 40 पेक्षा जास्त असेल तुम्हाला लठ्ठपणा, डायबिटीस, उच्च रक्तदाब यांसारख्या समस्या असतील, तर तुम्ही लवकरात लवकर डॉक्टरांची संपर्क साधा.

Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत केवळ व्याजातूनच मिळतील 12 लाख रुपये; जाणून घ्या सविस्तर

Post Office Scheme

Post Office Scheme | आर्थिक दृष्ट्या सुरक्षितता निर्माण करणे, ही आजकाल काळाची पहिली गरज झालेली आहे. भविष्याचा विचार करून आणि महागाईचा विचार करून अनेक लोक भविष्यासाठी आत्ताच गुंतवणूक करून ठेवत असतात. दे महिन्याला मिळणाऱ्या त्यांच्या पगारातून काही ना काही रक्कम ते गुंतवत असतात. बाजारामध्ये देखील गुंतवणुकीचे अनेक पर्यायी उपलब्ध आहेत. त्यातही अनेक लोक पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करतात. कारण पोस्ट ऑफिसमध्ये (Post Office Scheme ) गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देखील मिळतो. आणि ही एक विश्वास आहे योजना आहे. पोस्ट ऑफिसची अशीच एक पोस्ट ऑफिस सिनियर सिटिझन योजना आहे. यामध्ये तुम्हाला फक्त व्याजातून 12 लाख रुपये मिळणार आहेत. यामध्ये कोणतेही प्रकारचे जोखीम नसते. आता या योजनेबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

काय आहे पोस्ट ऑफिस सीनियर सिटीजन योजना? | Post Office Scheme

पोस्ट ऑफिसच्या या योजनेमध्ये तुम्ही जास्तीत जास्त 30 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. यामध्ये गुंतवणुकीचा कालावधी पाच वर्षापर्यंत असतो. या योजनेमध्ये तुम्ही कमीत कमी 1 हजार रुपयांपासून सुरुवात करू शकता. या गुंतवणुकीवर तुम्हाला दर महिन्याला 8.2 टक्के एवढा व्याजदर मिळेल. हे व्याज तुम्हाला तीनही आधारावर दिले जाईल तसेच यातून चांगला परतावा देखील मिळेल.

पोस्ट ऑफिसच्या या सीनियर सिटीजन योजनेमध्ये दर वर्षाला 30 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. पाच वर्षांमध्ये तुम्हाला 8.2 टक्के व्याजदराने 12 लाख 30 हजार एवढे व्याज मिळेल. तसेच तीमाही आधारावर 61,500 व्याज मिळेल. पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला या योजनेतील 42 लाख 30000 रुपये पर्यंत येणार आहेत.

या योजनेमध्ये तुम्ही पाच वर्षासाठी 15 लाख रुपये गुंतवले, तर 8.9% एवढे व्याजदर मिळेल. तुम्हाला 6 लाख 15 हजार रुपये एवढे व्याजदर मिळेल. या योजनेमध्ये 60 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयोगटातील लोकांना सहभाग घेऊन घेता येतो. पाच वर्षानंतर ती ही योजना तुमची मॅच्युर होईल. तसेच तुम्ही पाच वर्षानंतर देखील यामध्ये गुंतवणूक करू शकता. त्याचप्रमाणे तुम्हाला या योजना अंतर्गत कलम 80c अंतर्गत कर सूट देखील मिळणार आहे.

Lung Cancer Symptoms | ‘ही’ आहेत फुफ्फुसाच्या कर्करोगाची लक्षणे; हाताच्या बोटांवरून होईल निदान

Lung Cancer Symptoms

Lung Cancer Symptoms | आजकाल कर्करोगाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. लोकांची जीवनशैली बदलल्यामुळे त्यांना वेगवेगळ्या आजाराने ग्रासलेले आहे. आणि यामुळेच अनेक लोकांना त्यांचा जीव देखील गमावायला लागलेलआहेत. परंतु आजकाल कॅन्सर होणे ही अत्यंत सामान्य गोष्ट झालेली आहे. त्यातही फुफुसाचा कर्करोग (Lung Cancer Symptoms) आजकाल आणि लोकांना होत असतो. तुम्हाला जर कॅन्सर झाल्याचे निदान उशिरा झाले आणि त्यावर उपचार वेळेवर झाले नाही, तर अनेक लोकांचा मृत्यू होतो. परंतु तुम्हाला कॅन्सरचा धोका आहे की नाही?हे तुम्ही डायमंड फिंगर टेस्ट करून जाणून घेऊ शकता. ही चाचणी तुम्ही अगदी घरी देखील करू शकता.

काय आहे डायमंड फिंगर चाचणी ? | Lung Cancer Symptoms

ही चाचणी करण्यासाठी तुम्ही तुमचा अंगठा आणि तर्जनी यांना एकत्र आणा. त्यामध्ये जागा शिल्लक राहत नसेल. तर ते बोटांच्या प्लंबिंगचे लक्षण आहे. तसेच ही फुफ्फुसाच्या कर्करोगाचे देखील लक्षण असते. अशी स्थिती लहान पेशी नसलेल्या कर्करोग असलेल्या 35% पेक्षा जास्त लोकांमध्ये दिसून येत आहे. या लोकांमध्ये प्लंबिंग , फुफ्फुस, हृदयआणि पचन संस्थेतील समस्या निर्माण होते.

फुफ्फुसाच्या कर्करोगाची लक्षणे

फुफुसाचा कर्करोग झाला तर यामध्ये लोकांना तीन आठवड्यापेक्षा जास्त काळ खोकला राहतो. तो पूर्णपणे बरा होत नाही. तसेच छातीत जंतू संसर्ग तयार होतात, खोकल्यातून रक्त येणे, श्वास लागणे, भूक न लागले यासारख्या अनेक गोष्टींचा समावेश असतो. तसेच व्यक्तीच्या चेहऱ्यावर आणि मानेवर सूज येते. त्यांना गिळण्याचा देखील त्रास होत.

काय आहे कारण ? | Lung Cancer Symptoms

फुफुसाच्या कर्करोगाचे मुख्य कारण म्हणजे धूम्रपान करणे. तसेच जर कौटुंबिक इतिहास असेल एचआयव्ही हे देखील या आजारासाठी धोक्याचे घटक आहेत. सध्या आपल्या वातावरणात प्रदूषण देखील मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. याचा देखील परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. त्यात अनेक लोक धूम्रपान आणि मद्यपान करतात. त्यामुळे फुफुसाचा कर्करोग होण्याची शक्यता वाढते.

धनत्रयोदशी शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; भविष्यात होतील ‘हे’ फायदे

Gold

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दरवर्षी प्रमाणे यंदा ही 29 ऑक्टोबर 2024 , भारतात धनत्रयोदशी उत्सव खूप उत्साहाने साजरा केला जातोय . हा दिवस सोने खरेदीसाठी अत्यंत शुभ मानला जातो . कारण सोन्याला सुख , शांती आणि समृद्धीचं प्रतीक मानले जाते. संकटकाळातील जवळचा मित्र म्हणून याकडे पाहिले जाते. परंपरेनुसार लोक सोन्याची खरेदी करतात. पण आता याकडे गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून पाहिले जाते. कर्ज काढण्यासाठी ग्राहकाकडे काहीतरी तारण असल्याशिवाय बँक ग्राहकांना कर्ज देत नाही. त्यासाठी सोन हा उत्तम पर्याय ठरू शकतो. सोन्याच्या वाढत्या किंमती आणि त्यातील गुंतवणुकीच्या फायद्यामुळे लोकांचा सोन खरेदी करण्याकडे कल वाढत आहे. त्यासाठी आज आम्ही तुम्हाला कशात गुंतवणूक केल्यास जास्त फायदा होईल हे सांगणार आहोत.

सोन्यात गुंतवणुकीचे आधुनिक पर्याय

तुम्हाला सोने खरेदी करण्यासाठी अधिक पर्याय उपलब्ध आहेत. फिजिकल सोन खरेदी करण्यापेक्षा तुम्ही डिजीटल गोल्ड आणि गोल्ड ईटीएफ या पर्यायाच्या माध्यमातून गुंतवणूक करू शकता. या पर्यायामुळे भविष्यात सोनं अधिक चांगला नफा मिळवून देऊ शकतो . त्यामुळे याकडे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पाहिले जाते.

डिजीटल गोल्ड

घरबसल्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे सोनं खरेदी आणि विक्री करता येते. तसेच काही प्लॅटफॉर्मवर 1 रुपये इतक्या कमी रकमेत सोनं खरेदी करण्याची सुविधा आहे. खरेदी केलेलं डिजिटल गोल्ड सुरक्षित तिजोरीत ठेवले जाते. डिजिटल गोल्डची विक्री आणि खरेदी बाजारातील सध्याच्या दरांनुसार होते, ज्यामुळे गुंतवणूकदारांना योग्य वेळेत व्यवहार करण्याची संधी मिळते. डिजिटल गोल्ड हा एक नवीन आणि सोयीस्कर पर्याय म्हणून उदयास आला आहे.

गोल्ड ईटीएफ

गोल्ड ईटीएफ म्हणजे सोन्यात गुंतवणुकीचा आणखी एक सोपा पर्याय आहे. हे डीमॅट अकाउंटमध्ये ठेवले जाते, आणि शेअरप्रमाणे खरेदी विक्री करता येते. गोल्ड ईटीएफ हे म्युच्युअल फंडाच्या स्वरुपात असते आणि याच्या युनिटचा अर्थ एक ग्रॅम सोनं . कमी रकमेसह देखील तुम्ही गुंतवणूक सुरू करू शकता. स्टॉक मार्केटमधून सोनं विकत घेणे किंवा विकणे सोपे असल्याने, गोल्ड ईटीएफ आर्थिकदृष्ट्या सोयीस्कर आहे. धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर सोनं खरेदी करणे फक्त परंपरा नव्हे, तर आर्थिक सुरक्षा आणि चांगल्या परताव्याचा मार्गही आहे.

Weather Update | दिवाळीवर पावसाचे सावट; पुढील 3 दिवस राज्यात कोसळणार सरी

Weather Update

Weather Update | सर्वत्र दिवाळीला सुरुवात झालेली आहे. आणि दिवाळीच्या तोंडावर राज्यात पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुढील तीन दिवस पाऊस (Weather Update) पडण्याची शक्यता आहे. हा पाऊस वादळी वाऱ्यासह येणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 30 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर दरम्यान राज्यातील विविध भागात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

दिवाळी हा सण आपल्या भारतामध्ये मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो. परंतु या येणाऱ्या पावसामुळे दिवाळी हा सण लोकांना नीट साजरा करता येणार नाही. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 30 ऑक्टोबर रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, आहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली, संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर यासारख्या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस (Weather Update) पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामान विभागाने या जिल्ह्यांना येलो अलर्ट दिलेला आहे.

त्याचप्रमाणे 31 ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, सोलापूर, गडचिरोली, नांदेड, लातूर, यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने येल्लो अलर्ट केलेला आहे.

त्याचप्रमाणे 1 नोव्हेंबर रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, परभणी, बीड, या जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. राज्यात पाऊस जरी अधून मधून येत असला, तरी थंडीला सुरुवात झालेली आहे. वातावरणात बाष्पाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे हवामान कोरडे झालेले असून सकाळी आणि रात्री थंडी पडायला सुद्धा सुरुवात झालेली आहे.

1 लाखांपेक्षा कमी किंमतीत परदेशात फिरण्याची संधी, कसे कराल बुकिंग ?

bali tour

जर तुम्ही लॉन्ग ट्रीपसाठी आंतरराष्ट्रीय सहलीचा विचार करत असाल, तर इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लि. (IRCTC) एक उत्तम टूर पॅकेज घेऊन आले आहे. ज्याद्वारे तुम्ही कमी पैशात बाली एक्सप्लोर करू शकता. बाली इंडोनेशियामध्ये स्थित आहे, जे एक अतिशय सुंदर बेट आहे. देशभरातून आणि जगभरातून लाखो पर्यटक दरवर्षी येथे येतात. हे एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. एवढेच नाही तर अनेक जोडपी हनिमूनसाठीही येथे येतात. अशा परिस्थितीत, IRCTC बाली टूर पॅकेज आणि ते बुक करण्यासाठी किती पैसे द्यावे लागतील चला जाणून घेऊया…

IRCTC पॅकेज

IRCTC ची बाली टूर पॅकेज दिवाळी स्पेशल आहे. ज्याचे नाव आहे “पूजा स्पेशल अमेझिंग बाली एक्स मुंबई” टूर पॅकेज. या पॅकेजच्या माध्यमातून तुम्हाला बालीतील प्रसिद्ध पर्यटनस्थळे पाहण्याची संधी मिळणार आहे. पॅकेज बुक करण्यासाठी अधिकृत वेबसाइट www.irctctourism.com/pacakage वर जावे लागेल. जिथे तुम्ही आवश्यक तपशील टाकून तुमचे तिकीट कन्फर्म करू शकता.

4 रात्री आणि 5 दिवसांचे पॅकेज

बाली टूर पॅकेज हे एक हवाई टूर पॅकेज आहे जे 4 रात्री आणि 5 दिवसांसाठी असेल. यामध्ये बालीतील सर्व प्रमुख धार्मिक स्थळांना भेटी देऊ शकता. हे पॅकेज 12.11.2024 पासून सुरू होईल आणि 17.11.2024 रोजी संपेल. या टूर पॅकेज अंतर्गत प्रवाशांना मुंबई ते बाली (इंडोनेशिया) विमानाने जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

‘या’ असतील सुविधा

IRCTC आपल्या प्रत्येक टूर पॅकेजमध्ये प्रवाशांना अनेक मूलभूत सुविधा पुरवते, जेणेकरून प्रवासादरम्यान कोणत्याही प्रवाशाला कोणत्याही समस्येचा सामना करावा लागू नये. या पॅकेजमध्ये प्रवाशांच्या प्रत्येक गरजेचीही काळजी घेण्यात आली आहे. उड्डाणे आणि प्रवासादरम्यान प्रवाशांना खाण्यापिण्याची सुविधा दिली जाईल. हॉटेल बुकिंग देखील पॅकेजमध्ये समाविष्ट आहे. बाली येथे पोहोचल्यानंतर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी वाहनाची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे.

काय आहे किंमत ?

सिंगल ऑक्युपन्सी तिकीट बुक करणाऱ्यांसाठी – रु. 99600
डबल ऑक्युपन्सी तिकीट बुक करणाऱ्यांसाठी – रु 89900
ट्रिपल ऑक्युपन्सी तिकीट बुक करणाऱ्यांसाठी – रु 89900
2 ते 11 वयोगटातील मुलासह (बेडसह) – रु 84700
2 ते 11 वर्षांच्या मुलासह (बेडशिवाय) – 80200 रु

Sharad Pawar NCP List: अभिनेत्री स्वरा भास्करच्या पतीला शरद पवार गटाकडून उमेदवारी ; पक्षाकडून आणखी एक यादी जाहीर

sharad pawar

Sharad Pawar NCP List: महाराष्ट्रातील राजकारण म्हणजे गुंतागुंतीचे राजकारण इथे पुढच्या क्षणाला काय होईल याचा काही नेम नाही. अशातच अत्यंत मातब्बर राजकीय व्यक्तिमत्व म्हणून ओळख शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणाला विधासभेचे तिकीट मिळणार याकडे सम्पूर्ण देशाचे लक्ष लागून होते. अशातच आता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने (Sharad Pawar NCP List) तिसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये अभिनेत्री स्वरा भास्करचे पती फहाद अहमद यांना पक्षाने तिकीट दिले आहे.

राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार यांची तिसरी यादी जाहीर झाली आहे. या यादीतील 9 उमेदवारांची नावे पक्षाने जाहीर केली आहेत. त्यात शरद पवार गटाने फहाद अहमद यांना अणुशक्ती नगरमधून उमेदवारी दिली आहे. फहाद अहमद हे सपामध्ये होते, पण आता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत अभिनेत्री स्वरा भास्कर सहभागी झाली होती. इतकंच नाही तर राहुल गांधी मुंबईत पदयात्रेला निघाले होते, तेव्हाही स्वरा भास्कर सहभागी झाली होती. तेव्हा त्यांच्या मोठ्या चर्चा रंगल्या होत्या.

तिसऱ्या यादीत या 9 उमेदवारांना स्थान (Sharad Pawar NCP List)

कारंजा – ज्ञायक पाटणी
हिंगणघाट – अतुल वंदिले
हिंगणा – रमेश बंग
अनुशक्तीनगर – फहाद अहमद
चिंचवड – राहुल कलाटे
भोसरी – अजित गव्हाणे
माजलगाव – मोहन बाजीराव जगताप
परळी – राजेसाहेब देशमुख
मोहोळ – सिद्धी रमेश कदम

आतापर्यंत 76 उमेदवारांची घोषणा (Sharad Pawar NCP List)

शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने नऊ उमेदवार जाहीर केल्यानंतर एकूण उमेदवारांची संख्या 76 वर पोहोचली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने पहिल्या यादीत 45 तर दुसऱ्या यादीत 22 उमेदवार जाहीर केले होते. महाविकास आघाडीचे तीन घटक पक्ष ९०-९० जागांवर लढण्याची शक्यता आहे. उर्वरित 18 जागा मित्रपक्षांमध्ये वाटल्या जातील. अशा स्थितीत राष्ट्रवादीकडून (शरदचंद पवार) अजून १४ उमेदवारांची घोषणा होणे बाकी आहे. सुप्रिया सुळे यांनी स्वरा भास्करचे पती फहाद अहमद यांच्या समर्थनार्थ अणुशक्ती नगरमध्ये एका सभेला संबोधित (Sharad Pawar NCP List) केले होते.

दिवाळीपूर्वी शेअर बाजारात तेजी ! गुंतवणूकदारांना 6 लाख कोटींचा नफा, काय आहे कारण ?

share market

ऑक्टोबर महिन्यात मोठी घसरण झाल्यानंतर सोमवारी शेअर बाजारात काहीसा दिलासा मिळाला आहे. सोमवारी दोन्ही निर्देशांकांमध्ये मोठी उसळी पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराच्या बेंचमार्क सेन्सेक्सने 1,100 हून अधिक अंकांची वाढ नोंदवली आहे, तर निफ्टीने 24,450 ची पातळी ओलांडली आहे. सेन्सेक्स 1,124 अंकांनी किंवा 1.4 टक्क्यांनी वाढून 80,527 वर, तर निफ्टी 308 अंकांनी किंवा 1.27 टक्क्यांनी वाढून 24,489 वर होता.

6 लाख कोटींचा नफा

दिवाळीपूर्वी सोमवारी झालेल्या या वाढीमुळे गुंतवणूकदारांना 6 लाख कोटी रुपयांचा नफा झाला आहे. खरं तर, BSE वर सूचीबद्ध सर्व कंपन्यांचे मार्केट कॅप 5.7 लाख कोटी रुपयांनी वाढून 442.66 लाख कोटी रुपये झाले आहे. यामध्ये ICICI बँक, RIL, M&M, Infosys आणि TCS यांनी एकत्रितपणे आज सेन्सेक्समध्ये 685 अंकांचे योगदान दिले. हिंदुस्थान युनिलिव्हर, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि टाटा मोटर्स यांनीही या तेजीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

जोरदार खरेदी

ऑक्टोबर महिन्यात मोठ्या घसरणीनंतर गुंतवणूकदारांनी याचा फायदा घेतला, त्यामुळे दोन्ही निर्देशांकांमध्ये मोठी वाढ झाली आहे. निफ्टी त्याच्या अलीकडील उच्च पातळीपासून 8% पेक्षा जास्त खाली आहे.

तेलाच्या किमतीत घसरण

भू-राजकीय तणावातील सुधारणांमुळे सोमवारी कच्च्या तेलाच्या किमतीत घट नोंदवण्यात आली. सोमवारी तेल प्रति बॅरल 3 डॉलरपेक्षा जास्त घसरले. ब्रेंट आणि यूएस वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट दोन्ही क्रूड फ्युचर्स 1 ऑक्टोबरपासून त्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचले आहेत. 12:40 PM IST पर्यंत, ब्रेंट $72.49 प्रति बॅरल होता, तर WTI $3.23 किंवा 4.5% घसरून $68.56 प्रति बॅरल झाला.

आशियाई बाजारावर परिणाम

जपानच्या राजकीय घडामोडींदरम्यान, सोमवारी शेअर्समध्ये वाढ झाली, जपानच्या सत्ताधारी पक्षाने खालच्या सभागृहात बहुमत गमावल्यानंतर, येनच्या घसरणीने शेअर्सना नवीन आशा दिली आहे. जे आज भारतीय बाजारपेठेतही पाहायला मिळत आहे.

1 नोव्हेंबरपासून कॉलिंगचे ‘हे’ नियम बदलणार ; Airtel, Jio, Vodafone वापरकर्त्यांनी काळजी घ्या

calling

फेक कॉल्स आणि मेसेजमुळे प्रत्येकजण हैराण झाला आहे. हे सर्व टाळण्यासाठी सरकारकडून नवनवीन पावले उचलली जात आहेत. ट्रायने अशा वापरकर्त्यांसाठी काही निर्णयही घेतले आहेत. यामुळे फेक कॉल्सवर आळा घालण्यास मदत होईल. यावर ट्रायने तातडीने निर्णय घेतला आहे. याशिवाय दूरसंचार ऑपरेटर्सनाही या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्यास सांगण्यात आले आहे. आज आम्ही तुम्हाला याबद्दल सांगणार आहोत कारण 1 नोव्हेंबरपासून कॉलिंगमध्ये काही बदल होणार आहेत.

स्पॅम कॉल पासून बचावासाठी ट्रायचा पुढाकार

संवादासाठी स्मार्टफोनचा वापर केला जातो. पण आता काही युजर्स त्याचा वापर चुकीच्या कामांसाठी करत आहेत. बनावट कॉल्स आणि मेसेजच्या मदतीने घोटाळेबाज सर्वसामान्यांची बँक खाती रिकामे करत आहेत. यावर तात्काळ नियंत्रण ठेवण्यासाठी नवे निर्णय घेतले जात आहेत. TRAI ने टेलिकॉम नियमांमध्ये बदल केले आहेत. नवीन नियम पुढील महिन्यापासून लागू होणार आहेत. ट्रायने सर्व टेलिकॉम ऑपरेटरना आदेश दिले आहेत. बनावट आणि स्पॅम कॉलचा सामना करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

काय आहे नवीन नियम

1 नोव्हेंबरपासून मेसेज ट्रेसिबिलिटी लागू करण्यात येणार आहे. तुम्ही तुमच्या फोनवर येणारे मेसेज तपासण्यास तुम्ही सक्षम असाल. बनावट कॉल आणि स्पॅम रोखण्यासाठी काही कीवर्ड ओळखले जातील. जर त्या संदेशांमध्ये याचा समावेश असेल तर ते त्वरित ब्लॉक केले जातील. तुम्ही या संदेशांबद्दल तक्रार देखील करू शकाल. शिवाय, त्यांना ब्लॉक करणे देखील सोपे होईल. अशा परिस्थितीत वापरकर्त्यांच्या सुरक्षेसाठी तातडीने निर्णय घेतले जात आहेत. ट्रायने टेलिकॉम कंपन्यांना या मॉडेलवर तातडीने काम करण्यास सांगितले आहे. अशा परिस्थितीत टेलिकॉम वापरणे युजर्ससाठी सुरक्षित ठरणार आहे.