Monday, December 29, 2025
Home Blog Page 395

राहुल गांधींच्या आरक्षणाबाबतच्या विधानाचे नाना पटोलेंकडून समर्थन??

Rahul Gandhi And Nana Patole

काँग्रेस सत्तेत आल्यास आरक्षण संपुष्टात आणण्यात येईल, अशी घोषणा राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी केल्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं होत. राहुल गांधी यांच्या या विधानावर काँग्रेस पक्षाने कोणतीही स्पष्ट अशी भूमिका न घेता मौन बाळगणं पसंद केलं. मात्र काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राहुल गांधी यांच्या आरक्षण विरोधी भूमिकेचा पुनरुच्चार केला आहे. आरक्षण संपवणार हे राहुल गांधी यांचे विधान काहीही चुकीचे नाही. त्यात वावगे काहीही नाही असे विधान नाना पटोले यांनी केले. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

देशात लागू असलेले आरक्षण संपवण्याचा काँग्रेसचा स्पष्ट इरादा असल्याचे नाना पटोले यांनीही स्पष्ट केले आहे. भाजपने विक्रमी बहुमत असतानाही बाबासाहेबांनी दिलेले आरक्षण कायम ठेवले. त्यावर कडी म्हणजे नॉन क्रिमी लेयर ची मर्यादाही भाजपने उठवली. वंचित वर्गाला आरक्षण मिळालेच पाहिजे अशी ठाम भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या जवळपास सर्वच नेत्यांनी घेतली आहे. उलट पक्षी संविधानाने दिलेले आरक्षण रद्द करण्याची भूमिका काँग्रेसचे सर्वोच्च नेते राहुल गांधी आणि त्यांना मानणारे छोट्या छोट्या राज्यातील नेते घेत आहेत.

आपला भारत देश 1947 रोजी स्वतंत्र झाला. आणि त्यानंतर भारतावर लगेच काँग्रेस पक्षाची सत्ता आली. पंडित जवाहरलाल नेहरू हे आपल्या स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होते. भारत स्वतंत्र झाल्यापासूनच सुरुवातच आपल्या देशात काँग्रेस या पक्षाने केली. परंतु भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच काँग्रेस या पक्षाने संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी यांच्या संविधानाला नेहमीच पराभूत केलेले आहे. त्यांना अपमानास्पद राजीनामा देखील द्यायला भाग पाडले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये ज्या काही घटनात्मक तरतुदी केल्या होत्या, त्याची पूर्णपणे अंमलबजावणी काँग्रेसने कधीच केलेली नाही. परंतु वेळ आल्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या संविधानांचा आणि तरतुदीचा वापर त्यांनी निवडणुकीसाठी एक साधन म्हणून केलेला आहे.

ज्यावेळी भारतात काँग्रेसची सत्ता होती, त्यावेळी भारतात दोन संविधान होते. त्यातील एक संविधान काश्मीरसाठी होते, तर दुसरे संविधान हे भारतासाठी होते. अशा प्रकारे दोन वेगवेगळे संविधान एकाच देशात लागू होते. परंतु काँग्रेस ज्यावेळी सत्तेत होती, त्यावेळी त्यांनी संपूर्ण भारतात एक संविधान कधीच लागू दिलेले नाही. त्याचप्रमाणे आपण जर इतिहासात जाऊन डोकावले तर असे लक्षात येईल की, दलितांवरही काँग्रेसच्या काळात जास्त अत्याचार होण्याच्या घटना घडल्या होत्या. काँग्रेसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचप्रमाणे त्यांच्या संविधानाचा वापर हा केवळ निवडणूकसाठी केलेला आहे.

काँग्रेस सत्तेत असताना तसेच आत्ता देखील त्यांना संविधान तसेच दलित लोकांपेक्षा मुस्लिम समाज जास्त प्रिय आहे. म्हणूनच त्यांनी एकदा असे वक्तव्य केले होते की, मुस्लिम हा समाजाचा पहिला अधिकार आहे. काँग्रेसच्या एका सर्वोच्च नेत्यांनी हे वक्तव्य केले होते. त्यानंतर समाजात चांगलीच स्फोटक परिस्थिती निर्माण झालेली होती. बाबासाहेबांनी दलित समाजाला आरक्षण दिले होते. परंतु काँग्रेसच्या नेत्यांनी नेहमीच्या आरक्षणाच्या विरोधात जाऊन भूमिका घेतल्याचे दिसून आलेले आहे.

ही आरक्षणे रद्द करण्याच्या काँग्रेसच्या अधिकारावर भाजपने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते वंचित समुदायांमधील संतापाच्या वाढत्या भावनेकडे निर्देश करतात. काँग्रेसच्या आरक्षणविरोधी भूमिकेवरून निर्माण झालेल्या वादामुळे या समुदायांनी आगामी निवडणुकांमध्ये आरक्षणाबाबत काँग्रेसच्या भूमिकेचा विचार करण्याचा इशारा दिला आहे.

संविधानाचे रक्षण करण्याचा दावा करत असतानाही काँग्रेसवर दलितांपेक्षा मुस्लिम समाजाच्या हिताला प्राधान्य दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. भारताच्या साधनसंपत्तीवर मुस्लिमांचा पहिला हक्क आहे, असे एका सर्वोच्च काँग्रेस नेत्याच्या विधानाने अधोरेखित केले. पक्षाला आपल्या कार्यकाळात दलितांवरील अत्याचारांबद्दल टीकेला सामोरे जावे लागले आहे.

संपूर्ण राज्यात सध्या निवडणुकांची तयारी जोरदार चालू झालेली आहे. लोकसभा निवडणुका संपल्यानंतर राहुल गांधी यांनी विदेशी दौरा केला. यावेळी त्यांनी काँग्रेस हा पक्ष सत्तेत आल्यानंतर आरक्षण संपुष्टात आणण्यात येईल अशी घोषणा केली होती. राहुल गांधी यांनी केलेले या वक्तव्यावर नाना पाटोले यांनी देखील त्यांचे समर्थन दर्शवले होते. त्यामुळे विरोधी पक्ष अत्यंत त्यांच्या या वक्तव्याला मोठ्या प्रमाणात असमर्थन मिळालेले दिसत आहे.

दिवाळीच्या सणानिमित्त पुणेकरांसाठी गुड न्यूज; धावणार ‘ही’ विशेष साप्ताहिक ट्रेन

Train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी दिवाळीच्या सणामुळे अनेक प्रवासी आपल्या मायगावी जात असतात. त्यामुळे रेल्वेस्थानकावर प्रचंड गर्दी पाहण्यास मिळते. गर्दीमुळे अनेक गैरसोयी निर्माण होतात. हीच बाब लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने आपल्या प्रवाशांसाठी पुण्याहून विशेष गाडी चालणार असल्याची मोठी घोषणा केली आहे. हि गाडी पुणे जोधपूर साप्ताहिक विशेष म्हणून ओळखली जाईल. या निर्णयामुळे प्रवाशांना सणासुदीच्या काळात प्रवासासाठी मोठी सोय होणार आहे. या आनंदाच्या बातमीमुळे अनेक लोकांचा प्रवास सुखद होणार आहे.

पुणे जोधपूर विशेष गाडी

रेल्वे प्रशासनाने पुणे जोधपूर दरम्यान आठवड्याला विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सोय होईल . पुणे ते जोधपूर गाडी क्रमांक 04808 , रेल्वे 27 ऑक्टोबर ते 17 नोव्हेंबरदरम्यान दर रविवारी म्हणजे शनिवारी रात्री 12 वाजून 30 मिनिटांनी पुण्याहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 4 वाजून 50 मिनिटांनी जोधपूरला पोहचणार आहे. नंतर जोधपूर ते पुणे साप्ताहिक विशेष रेल्वे 25 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबरदरम्यान दर शुक्रवारी जोधपूरहून दुपारी 4:30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री 11:10 वाजता पुण्यात पोहोचेल. या रेलवेचा क्रमांक 04807 हा असेल.

रेल्वे थांबण्याची स्थानके

हि गाडी विशेष स्थानकावर थांबणार आहे. त्यामध्ये लोणावळा, पनवेल, वसई रोड, पालघर, वापी, सुरत, भरूच, वडोदरा, रतलाम, भवानी मंडी, कोटा, दुर्गापूर, जयपूर, फुलेरा, नवा शहर, कुचमन शहर, मकराना, डेगाणा आणि मेटरा या रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. त्यामुळे बऱ्याच लोकांना प्रवास करताना अडचणी येणार नाहीत .रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे सणाच्या काळात प्रवाशांना अधिक सोयीचा प्रवास मिळेल आणि प्रवासातील गर्दी कमी होईल.

Amla Juice | दररोज रिकाम्या पोटी प्या आवळ्याचा रस; शरीराला होतील अद्भुत फायदे

Amla Juice

Amla Juice | आजकाल लोकांची जीवनशैली मोठ्या प्रमाणात बदललेली आहे. आणि त्यामुळेच त्यांना वेगवेगळे आजार होत आहेत. परंतु अजूनही अनेक अशा नैसर्गिक गोष्टी उपलब्ध आहेत, ज्या आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानल्या जातात. परंतु अनेक लोक आजकाल या नैसर्गिक गोष्टींचे सेवन न करता बाजारातील पदार्थ विकत घेतात. आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे तो म्हणजे आवळा. आवळा हा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो. यामध्ये विटामिन सी, अँटीऑक्सिडंट, फायबर आणि इतर आवश्यक पोषक तत्व असतात. ज्यामुळे आपल्या शरीराला खूप फायदा होतो.

तुम्ही जर नियमितपणे महिनाभर आवळ्याचा रस (Amla Juice) पिला तर त्यामुळे आरोग्याला खूप फायदे होतील. आता आवळ्याचा रस सतत एक महिना जर तुम्ही पीत असाल, तर तुमच्या आरोग्याला कोणते फायदे होतील ?हे आज आपण जाणून घेणार आहोत.

आवळ्याचा रस पिण्याचे फायदा | Amla Juice

  • आवळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात विटामिन सी, लोह, कॅल्शियम आणि अँटिऑक्सिडंट यांसारखे पोषक तत्व असतात. ज्यामुळे आपल्या शरीराला खूप फायदा होतो. तसेच आंबट फळांचा रस हा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो.
  • सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आवळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात विटामिन सी असते. ज्यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. आणि इतर आजारांशी लढण्यामध्ये मदत होते. तुम्ही जर रोज आवळ्याचा रस पीत असाल तर शरीराची रोगप्रतिकार शक्ती चांगली होते.
  • नियमितपणे आवळ्याच्या रसाचे सेवन केल्यावर तुमची पचनक्रिया सुधारते. त्यामुळे बद्धकोष्ठता, आम्लपित्त, अपचन यांसारख्या अनेक समस्या दूर होतात आणि आतडे देखील चांगले राहते.
  • आवळ्यामध्ये नैसर्गिक अँटिऑक्सिडंट आहे. ज्यामुळे तुमची त्वचा चमकदार होते. चेहऱ्यावरील डाग कमी होतात. तसेच मुक्त रॅडिकल्स पासून होणाऱ्या नुकसानी पासून तुमची त्वचा वाचते. आणि तुमची त्वचा जास्त काळ तरुण दिसते.
  • नियमितपणे आवळ्याचा रस पिल्याने चयापचय गतिमान होते. तसेच तुमच्या कॅलरी बर्न होण्यामध्ये याची मदत होते. तुम्ही जर महिन्यावर आवळ्याचा रस पिला, तर तुमचे वजन देखील झपाट्याने कमी होईल.
  • आवळ्याच्या रसामध्ये अनेक पोषक तत्वे असतात. त्यामुळे तुमचे केस अगदी मजबूत होतात. केस गळण्याची समस्या देखील कमी होते. तसेच केस जाड आणि चमकदार बनतात.
  • आवळ्याचा रस पील्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. त्यामधील असणारे अँटिऑक्सिडंट आणि गुणधर्म ज्यांना मधुमेहाचा त्रास होतो, त्यांच्यासाठी फायदेशीर आहे.
  • आवळ्याचा रस नियमितपणे पिल्याने तुमचा रक्त प्रवाह शुद्ध होतो. तसेच शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकले जातात. आवळ्याच्या रसाला हा एक नैसर्गिक डीटॉक्सिफायर असे म्हणतात. त्यामुळे तुमचे यकृताचे काम देखील चांगले होते.

Personal Loan | घरबसल्या काही तासातच मिळेल वैयक्तिक कर्ज; जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

Personal Loan

Personal Loan | दिवाळी हा आपल्या भारतातील एक सगळ्यात मोठा सण आहे. दिवाळीला सुरुवात झालेली आहे. या दिवाळीनिमित्त अनेक लोक नवीन वस्तूंची खरेदी करत असतात. काही लोक घरात नवीन फ्रीज, गाडी तसेच नवीन घर घेत असतात. कारण दिवाळीतील लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त हा एक शुभ मुहूर्त मानला जातो. त्यामुळे या दिवशी अनेक लोक नवीन वस्तूंची खरेदी करत असतात. अनेक वेळा आपण नवीन गोष्ट ही घ्यायची असेल , तर त्यासाठी वैयक्तिक कर्ज घेत असतो. वैयक्तिक कर्ज हा कर्जाचा खूप चांगला प्रकार आहे. यामध्ये तुम्हाला काही मिनिटातच पैसे मिळतात. तुम्ही अर्ज केल्यानंतर काही तासातच पैसे तुमच्या अकाउंटमध्ये जमा होतात. आता हे वैयक्तिक कर्ज (Personal Loan) घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा? तसेच याबद्दल पात्रता काय लागते? याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

झटपट वैयक्तिक कर्ज कसे असते? | Personal Loan

वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी तुम्ही बँकेला भेट न देता ऑनलाइन पद्धतीने देखील अर्ज करू शकता. या झटपट वैयक्तिक कर्जामध्ये हे पैसे पटकन तुमच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केले जातात. अगदी काही तासातच तुमची कर्जाची सगळी प्रक्रिया पूर्ण होते. जर तुम्हाला अगदी इमर्जन्सी पैसे लागत असतील, तर हा पर्याय तुमच्यासाठी अत्यंत योग्य पर्याय आहे.

पर्सनल लोनसाठी अर्ज कसा करायचा ?

  • तुम्हाला जर वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला बँकेत जाऊन तुमचा आधार कार्ड आणि पॅन कार्डशी लिंक असलेला नंबर रजिस्टर करावा लागेल.
  • तुमची सगळी माहिती दिल्यानंतर बँक तुमची सगळी वैयक्तिक माहिती व्हेरिफाय करेल आणि तुम्ही कर्जासाठी पात्र आहात की नाही या गोष्टीचे मूल्यांकन करतील.
  • जर बँकेच्या सगळ्या पात्रतेमध्ये तुम्ही अगदी फिट होत असाल, तर तुमच्या गरजेनुसार तुम्हाला कर्जाची रक्कम दिली जाईल आणि परतफेडीचा कालावधी किती ठेवायचा आहे? हे तुम्ही तुमच्या सोयीनुसार मिळू शकतात.
  • तुमची ही अर्जाची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली, तर अगदी काही तासातच तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाईल. कधीकधी हा निधी जमा होण्यासाठी 24 तासापेक्षाही जास्त कालावधी लागतो.

पर्सनल लोन घेण्यासाठी पात्रता | Personal Loan

  • वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुमचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असणे गरजेचे आहे.काही बँकांमध्ये अर्जदाराची वय 21 वर्षे असणे आवश्यक आहे.
  • दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी तुमचा क्रेडिट स्कोर चांगला असणे गरजेचे आहे. बहुतेक बँका या 700 पेक्षा जास्त असलेल्या क्रेडिट स्कोर चांगला मानतात. जर तुमचा क्रेडिट स्कोर 700 पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला लगेच कर्ज मिळेल.
  • कर्ज घेताना तुम्ही नोकरी करत असाल तर तुमच्या सध्याच्या मालकाकडे तुम्ही किमान एक वर्ष तरी काम केले असले पाहिजे. तसेच व्यवसाय असला, तर उत्पन्नाचा स्त्रोत दाखवणे देखील गरजेचे आहे.

Weather Update | राज्यात दिवाळीवर पावसाचे सावट; ‘या’ ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता

Weather Update

Weather Update | दिवाळीला सुरुवात झालेली आहे. आज म्हणजेच 28 ऑक्टोबर रोजी दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस आहे. परंतु या दिवाळीवर पावसाचे सावट आलेले आहे. ते म्हणजे आता यंदाच्या दिवाळीत पाऊस येण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे. हा पाऊस जास्त प्रमाणात पडणार नाही, परंतु रिमझिम स्वरूपात का होईना? हा पाऊस (Weather Update) येणार आहे. त्यामुळे यावर्षी फटाके वाजवण्यावर थोडेफार नियंत्रण असणार आहे. दिवाळी आलेली आहे, रब्बी हंगाम सुरू झाला आहे. शेतीमध्ये शेतकऱ्यांनी रबी हंगामातील पिके काढण्यास सुरुवात देखील केलेली आहे. परंतु पावसाची शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण तयार झालेले आहेत.

हवामान विभागाने वर्तवलेला अंदाजानुसार पुढील चार दिवस राज्यात पावसाची(Weather Update) शक्यता आहे. 29 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये रिमझिम स्वरूपात पाऊस पडणार आहे. त्यासोबतच कोकण, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी पाऊस पडणार आहे. तसेच विजांच्या कडकडाटासह 32 ते 40 किलोमीटर प्रतितास वेगाने वादळी वारा वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

त्याचप्रमाणे मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव, परभणी या ठिकाणी देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. 29 ते 31 ऑक्टोबर दरम्यान या ठिकाणी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. हा पाऊस येत असल्याने लोकांमध्ये काहीशा प्रमाणात नाराजी देखील येणार आहे. त्याचप्रमाणे रब्बी हंगामामधील पिके काढणीस आल्याने शेतकऱ्यांना देखील या पावसाचा थोडाफार फटका बसू शकतो.

दमदार फीचर्ससह OPPO A3x 4G फोन लाँच ; फक्त 8999 रुपयात करा खरेदी

OPPO A3x 4G

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । OPPO ने गेल्या दोन महिन्यापूर्वी नवीन फोन लाँच केला आहे. हा OPPO A3x 5G स्मार्टफोन म्हणून ओळखला जात असून , लवकरच हा फोन 4G वेरिएंटमध्ये बाजारात मिळणार आहे. दिवाळीमध्ये फोनची किंमत 10000 रुपयांपेक्षाही कमी ठेवण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला परवडण्याजोगा फोन मिळणार आहे. अनकेजण या फोनकडे आकर्षित होताना दिसत आहेत. तसेच हा बजेट फोन मिलिटरी ग्रेड शॉक रेसिस्टन्स आणि मल्टिपल लिक्विड रेसिस्टन्ससह सादर करण्यात आला आहे.

OPPO A3x 4G फीचर्स

या शानदार फोनचा डिस्प्ले 6.67 इंचाचा असून 90Hz रिफ्रेश रेट आणि 1604×720 पिक्सेल रिझोल्यूशन पाहण्यास मिळणार आहे. तसेच 1000 निट्स पीक ब्राइटनेस व 180Hz टच सॅम्पलिंग रेट आहे. याचे प्रोसेसर Qualcomm Snapdragon 6s 4G Gen 1 चिपसेट, Adreno GPU ग्राफिक्स कार्डसोबत आहे. माहिती साठवण्यासाठी फोनमध्ये 4GB LPDDR4x रॅम आणि 64GB/128GB स्टोरेज ऑप्शन उपलब्ध आहे. ज्यामुळे ग्राहक त्याकडे जास्त प्रमाणात आकर्षित होत आहे. याची ऑपरेटिंग सिस्टम ColorOS 14 बेस्ड Android 14 एवढी आहे.

ड्युअल कॅमेरा

फोटोग्राफ काढण्यासाठी ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. जो 8MP असून , सेल्फीप्रेमींसाठी 5MP कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमध्ये 45W चार्जिंगला सपोर्ट करणारी 5100 mAh बॅटरी देण्यात आली आहे. ज्यामुळे कमी वेळेत लगेच चार्जिंग होणार आहे. कनेक्टिव्हिटीसाठी 4G, ड्युअल-बँड Wi-Fi, ब्लूटूथ, GPS, USB टाइप C पोर्टची सेवा मिळणार आहे. सुरक्षेसाठी साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर आहे.

फोनची किंमत

हा फोन निळ्या आणि लाल रंगात उपलब्ध आहे. स्मार्टफोन दोन वेरिएंटमध्ये लॉन्च झाला असून , 4GB/64GB फोनची किंमत 8999 रुपये आणि 4GB/128GB याची किंमत 9999 रुपये आहे. हा फोन ग्राहकांच्या सेवेत 29 ऑक्टोबरपासून ओप्पो इंडिया ई-स्टोअर तसेच प्रमुख ऑनलाइन आणि ऑफलाइन स्टोअर्सवर उपलब्ध होणार आहे.

ग्राहकांसाठी दिवाळी खास ऑफर; 699 रुपयांमध्ये खरेदी करा JioBharat 4G फोन

JIo BHarat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिवाळीच्या सणानिमित्त मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांना आकर्षित भेट दिली आहे. त्यांनी लाँच केलेल्या जिओभारत 4G फोनची किंमत कमी केली आहे. त्यामुळे तुम्हाला कमी रिचार्ज पासून ते ऑनलाईन पेमेंट करण्यापर्यंतची सुविधा प्रदान केली आहे. या फोनच्या किमतीत सुमारे 30 टक्क्यांनी कमी केल्याने ग्राहकांच्या खर्चात जवळपास 300 रुपयांची बचत होणार आहे.

123 रुपयांचा रिचार्जमध्ये अनेक सेवा

जिओभारत 4G फोनमध्ये केवळ 123 रुपयांच्या रिचार्जवर अनलिमिटेड फ्री व्हॉइस कॉलिंग आणि 14 जीबी डेटा मिळेल, त्यामुळे हे अन्य कंपनीच्या तुलनेत 40 टक्के स्वस्त आहे. इतर नेटवर्क्स फीचर फोनसाठी किमान 199 रुपयांचे रिचार्ज करावा लागतो .पण जिओमुळे ग्राहकांच्या पैशाची बचत होणार आहे. हा फोन फक्त कॉल करण्यासाठी नसून तो 2G वरून 4G वर शिफ्ट होण्याची उत्तम संधी आहे. तसेच यामध्ये तुम्ही 455 पेक्षा जास्त लाईव्ह टीव्ही चॅनेल्स, मूव्ही प्रीमियर, नवीन चित्रपट, लाईव्ह स्पोर्ट्स शो आणि जिओसिनेमा हायलाइट्ससारख्या सुविधांचा समावेश आहे. यासोबत जिओपे आणि जिओचॅट सारखे प्री लोडेड अँपसुद्धा उपलब्ध आहेत, ज्यामुळे डिजिटल पेमेंट आणि चॅटिंग करणे खूपच सोपे होते.

किंमत

अलीकडेच जिओने इंडिया मोबाइल काँग्रेस ( IMC 2024 ) दरम्यान जिओभारत सीरीज अंतर्गत दोन नवीन 4G फीचर फोन जिओभारत V3 आणि V4 लाँच केले आहेत. या दोन्ही फोनची किंमत केवळ 1099 रुपये आहे, आणि ते जिओमार्ट, अ‍ॅमेझॉन किंवा जवळच्या मोबाइल स्टोअरवरून खरेदी करता येऊ शकतात. जिओभारत 4G फोन जो आधी 999 रुपयांमध्ये लाँच केला गेला होता तो आता लिमिटेड टाइम ऑफरमुळे फक्त 699 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे.

इस्रोची नवी घोषणा ; 2026 मध्ये गगनयान तर 2028 मध्ये चांद्रयान 4 मिशन लाँच

Isro

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संशोधन क्षेत्रात प्रचंड प्रगती होत असून भारताने वेगवेगळे प्रयोग करून अनेक मोहिमा यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत. त्यातच आता इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी गगनयान आणि चांद्रयान मोहिमांबाबत मोठी घोषणा केली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार भारत 2026 मध्ये गगनयान मिशन अवकाशात पाठवणार आहे, तर चांद्रयान 4 मिशन 2028 मध्ये प्रक्षेपित करणार आहेत. सध्या जागतिक अंतराळ अर्थव्यवस्थेत भारताचा वाटा 2 टक्के असून, येत्या दहा वर्षांत हा वाटा 10 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट इस्रोने डोळ्यासमोर ठेवले आहे.

2040 चे उद्दिष्ट

भारत आणि अमेरिकेचा संयुक्त प्रकल्प मिशन NISAR 2024 मध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे. तसेच जपानच्या अवकाश संस्थेसोबत LUPEX नावाच्या मिशनसाठी इस्रो काम करणार आहे, ज्याला चांद्रयान 5 असे म्हणता येईल. या मिशनसाठी भारत लेंडर देणार आहे आणि जपान रोव्हर तयार करणार आहे . चांद्रयान 5 मधील रोव्हर 350 हे किलो वजनाचे असणार आहे , जे चांद्रयान 3 मधील रोव्हरपेक्षा खूप मोठा आणि जाड असेल. चांद्रयान 3 रोव्हरचे वजन केवळ 27 किलो होते. या मोहिमेचे उद्दिष्ट चंद्रावर मानव पाठवण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा तयार करणे असून , भारताचे उद्दिष्ट 2040 पर्यंत चंद्रावर मानव पाठवण्याचे आहे.

भारत संशोधनात आघाडीवर

इस्रोचे अध्यक्ष यांनी चांद्रयान 3 च्या यशा बद्दल बोलताना सांगितले की, या मिशनने केवळ चंद्रावर सॉफ्ट लैंडिंगच केले नाही, तर चंद्राबद्दल मनोरंजक आणि महत्त्वाची माहिती देखील पाठवली आहे. चांद्रयान 1 च्या यशस्वी मोहिमेप्रमाणे, ज्याने चंद्रावर पाण्याचे अस्तित्व असल्याचे उघड केले, त्याचप्रमाणे चांद्रयान 3 ने देखील चंद्राच्या पृष्ठभागाबद्दल माहिती समोर आणली आहेत. इस्रोच्या या यशस्वी मोहिमांमुळे भारत अवकाश संशोधनात आघाडीवर येत असून भविष्यातील अंतराळ संशोधनात मोलाचा वाटा असेल.

मासे खाणाऱ्यांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता कमी? संशोधनात आली मोठी माहिती समोर

Fish

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतातील अनेक लोक हे सी फूड मोठ्या प्रमाणात खातात. मुंबई तसेच कोकणातील अनेक लोक हे चिकन मटणपेक्षा सागरी पदार्थांना म्हणजेच माशांना जास्त पसंती दर्शवतात. माशांची विक्री देखील मोठ्या प्रमाणात होत असते. यामध्ये सुरमई, पापलेट, बोंबील मांदेल यांसारखे अनेक मासे बाजारात विकले जातात. माशांची नावे घेतली तरी मासे प्रेमींच्या तोंडाला पाणी सुटते. परंतु नुकताच एक मोठा दावा करण्यात आलेला आहे. या अभ्यासात असे म्हणण्यात आलेली आहे की, जे लोक जास्त प्रमाणात मासे खातात. त्यांना हार्ट अटॅक येण्याचा धोका कमी असतो. परंतु या दाव्यामध्ये किती तथ्य आहे? हे आज आपण जाणून घेणार आहोत.

अमेरिकेतील एका डॉक्टरांनी असे सांगितले आहे की, आठवड्यातून तुम्ही दोनदा तरी मासे खाणे गरजेचे आहे. कारण माशांमध्ये सर्व प्रोटीन, व्हिटॅमिन्स आणि मिनरल असतात. यामध्ये चरबी युक्त ओमेगा थ्री फॅटी ऍसिड असते. याचा आपल्या शरीराला खूप फायदा होतो. तसेच हृदयाचे आरोग्य देखील चांगले राहते. ओमेगा थ्री फॅटी ऍसिड हे फॅट्सचा एक प्रकार आहे. ज्यामध्ये आपल्या शरीरातील अनेक कमतरता भरून काढण्याची ताकत असते. यामुळे शरीरातील जळजळ कमी होते. आणि आपल्या हृदयाचे आरोग्य देखील खूप चांगले राहते.

त्यामुळे आठवड्यातून दोन वेळा तरी मासे खा असा सल्ला आरोग्य तज्ञांकडून दिला जातो. कारण यामध्ये ओमेगा थ्री फॅटी जास्त प्रमाणात असतात. यामुळे हृदयविकाराचा धोका येण्याची शक्यता कमी असते . म्हणजेच ओमेगा थ्री फॅटी ऍसिड हे आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी खूप चांगले असते. आणि ते आपल्याला माशांमधून नैसर्गिक रित्या मिळते. म्हणून आरोग्य तज्ञांकडून माशांचे सेवन आठवड्यातून दोन वेळा तरी करावे. असे सांगण्यात आलेले आहे. म्हणजे जे लोक नियमित माशांचे सेवन करतात. त्यांना हार्ट अटॅक शक्यता काही प्रमाणात कमी असते. कारण त्यांच्या हृदयाला ओमेगा थ्री फॅटी ऍसिडचा पुरवठा योग्य प्रमाणात होतो.

BSNL | खाजगी टेलिकॉम कंपन्यांना मोठा झटका: गेल्या महिन्यात BSNL ने कमावले 30 लाख नवे ग्राहक

BSNL

BSNL | यावर्षी जुलै महिन्यात अनेक लोकप्रिय टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या रिचार्ज दरामध्ये वाढ केलेली आहे. आणि याचा फायदा सरकारी टेरिकॉम कंपनी बीएसएनएलला (BSNL) मोठ्या प्रमाणात झालेला आहे. बीएसएनएल कंपनीला आता अच्छे दिन यायला लागलेले आहेत. गेल्या काही महिन्यातच बीएसएनएलच्या ग्राहकांमध्ये खूप झपाट्याने वाढ झालेली आहे जिओ, एअरटेल आणि त्यांच्या रिचार्ज दरामध्ये वाढ केल्यामुळे त्यांच्या अनेक ग्राहक नाराज झाले आहे. आणि चांगल्या सेवेसाठी ते बीएसएनएलकडे वळाले आहेत.

हाती आलेल्या माहितीनुसार गेल्या दोन महिन्यात बीएसएनएलच्या (BSNL) ग्राहकांची संख्या खूप जास्त वाढलेली आहे. बीएसएनएल अगदी कमी दरांमध्ये रिचार्ज प्लॅन उपलब्ध करत आहेत. तसेच बीएसएनएल त्यांची ४ Gसेवा देखील लाँच केलेली आहे. बीएसएनएल कडे जवळपास 30 लाख नवीन ग्राहक जोडलेले आहे. तर इतर टेलिकॉम कंपन्यांच्या ग्राहकांची संख्या मात्र कमी झालेली आहे.

यामध्ये एअरटेलने 17 लाख युजर्स गमावले आहे. वोडाफोन आयडियाने 14 लाख युजर्स कमावले आहे. तर जिओने 8 लाख युजर गमावलेले आहे. परंतु बीएसएनएल ही एकमेव अशी कंपनी आहे, जिच्या ग्राहकांची संख्येमध्ये वाढ झालेली आहे. या महिन्यात जवळपास 25 लाख नवीन ग्राहक जोडले गेलेले आहेत.

बीएसएनएलचा (BSNL) बाजारातील शेअर खाजगी कंपन्यांच्या तुलनेत अगदीच कमी आहे. यावर्षी ऑगस्ट महिन्याच्या शेवटी जिओ 40.5% मार्केट शेअर्सह आघाडीवर आहे. त्यानंतर एअरटेलचा शेअर हा 33% आहे. वोडाफोन आयडीचा शेअर हा 18% आहे. तर बीएसएनएल 7.8% एवढा आहे. बीएसएनएलचा रिचार्ज अगदी कमी आहे. यामध्ये अगदी कमीत कमी पैशांमध्ये लोकांना सेवा प्रदान केली जाते. कंपनीने अनेक ठिकाणी त्यांचे 4 G हाय स्पीड इंटरनेट स्पीड लाँच केलेले आहे. त्यामुळे बीएसएनएलच्या अनेक ग्राहकांना याचा फायदा होत आहे. आणि यामुळेच अनेक ग्राहक बीएसएनएलसी जोडले गेलेले आहेत.