Sunday, December 28, 2025
Home Blog Page 396

Google Pay Loan Scheme | G Pay वरून मिळणार 1 लाख रुपयांपर्यंत कर्ज; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Google Pay Loan Scheme

Google Pay Loan Scheme | आज काल डिजिटल इंडियाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात झालेला आहे .अनेक गोष्टी आता डिजिटलायजेशनच्या पद्धतीने होत आहेत. पीएम मोदींनी डिजिटल इंडियाचे स्वप्न पाहिलेले होते. ते पूर्ण होत आहे. त्यामुळे आता आर्थिक क्षेत्रात देखील डिजिटलायझेशन आलेले आहेत. त्यानंतर गुगल पे आणि फोन पे यांसारखे थर्ड पार्टी ॲप आले. आणि ऑनलाईन पेमेंट करणे खूप सोपे झालेले आहे. गुगल पे (Google Pay Loan Scheme) किंवा फोन पेच्या माध्यमातून आपल्याला दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीला पैसे पाठवता येतात. किंवा पैसे घेता देखील येतात. परंतु जे लोक गुगल पे वापरतात. त्यांच्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी आम्ही घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता गुगल पेच्या माध्यमातून तुम्हाला कर्ज देखील मिळेल.

गूगल इंडियाने आता google पे मध्ये एक नवीन फीचर लॉन्च केलेले आहे. यामध्ये पात्र असणारे ग्राहक गुगल पेद्वारे एक लाख रुपयांपर्यंत वैयक्तिक कर्ज घेऊ शकतात. यासाठी त्यांना कोणत्याही बँकेत जाण्याची गरज नाही. आता हे कर्ज नक्की कोणाला मिळणार? कर्ज मिळणासाठी कोणती कागदपत्रे लागतात? अर्ज कसा करावा? किती व्याजदर असेल? या सगळ्याची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

गुगल पे कर्ज योजना काय आहे? | Google Pay Loan Scheme

गुगल इंडियाने नुकतेच यावर्षी गुगल पे यूजरसाठी एक लाखापर्यंत वैयक्तिक कर्ज देण्याची सुविधा लॉंच केलेली आहे. यामध्ये तुम्ही जर गुगल पे नियमित वापरत असाल, तर तुम्हाला यातून खूप लवकर कर्ज मिळू शकते. यामध्ये तुम्हाला कोणत्याही कागदपत्राची किंवा बँकेत जाण्याची गरज नाही.

गुगल पे कर्ज काय आहे ?

गुगल पेद्वारे तुम्हाला कर्ज हे तुमच्या आर्थिक व्यवहार आणि क्रेडिट स्कोरच्या आधारावर दिले जाते. तुम्ही गुगल ॲप द्वारे त्यासाठी अर्ज करू शकता. डीएमआय बँक आयडीएफसी फर्स्ट बँक आणि फेडरल बँक यांसारख्या गुगल पे भागीदार बँकांकडून कर्ज उपलब्ध आहे. आणि या ॲपद्वारे तुम्ही मासिक हप्ते भरू शकता.

गुगल पे कडून कर्ज घेण्याची पात्रता काय आहे ?

जे लोक google सातत्याने वापरतात. त्यांचा क्रेडिट स्कोर चांगला आहे. तसेच ज्या लोकांनी कोणत्याही बँकेचे किंवा वित्तीय संस्थेचे याआधी कर्ज घेतलेले नाही. ते यासाठी अर्ज करू शकतात.
गुगल पे द्वारे कर्ज घेण्यासाठी तुम्हाला नियमित उत्पन्नाचा दाखला दाखवावा लागतो.

गुगल पे करून कर्ज घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

आधार कार्ड
पॅन कार्ड
बँक खाते माहिती आणि आयएफएससी कोड
मोबाईल नंबर गुगल पे खात्याची लिंक असणे गरजेचे आहे.

गुगल पे वरून वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी अर्ज कसा करावा ?

  • तुम्ही तुमच्या मोबाईलवर गुगल पे ॲप चालू करा आणि त्यावर लॉगिन करा.
  • त्यानंतर तुम्ही व्यवसाय किंवा पेमेंट टॅबच्या खाली असलेल्या कर्ज विभागात जा.
  • तुम्ही जर पात्र असाल तर तुमची संपूर्ण हिस्टरी आणि क्रेडिट स्कोर तिथे दिसेल.
  • त्यानंतर कर्जाचे रक्कम व्याजदर आणि पेमेंट या सगळ्या अटी तपासा.
  • अर्ज सुरु करण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  • त्यानंतर तुमच्या आधार आणि पॅन कार्ड क्रमांक बँक खाते क्रमांक आयएफएससी कोड यांसारखी माहिती द्या.
  • त्यानंतर ईएमआय योजना निवडा आणि अटी आणि शर्तीना सहमती द्या.
  • नंतर तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल हा ओटीपी टाकल्यानंतर तुमच्या तुमच्या अर्ज सबमिट केला जाईल.

Bussiness Idea | घरबसल्या फ्लिपकार्टसोबत करा ‘हा’ व्यवसाय; महिन्याला होईल लाखोंची कमाई

Bussiness Idea

Bussiness Idea | भारतात अनेक ई कॉमर्स कंपन्या आहेत. ॲमेझॉन, फ्लिपकार्ट या भारतातील आघाडीच्या कंपन्या आहेत. या कंपन्यांच्या माध्यमातून विविध प्रकारच्या गोष्टींची डिलिव्हरी अत्यंत वेगाने लोकांना घरपोच होत असते. सध्या या दोन कंपन्या ई-कॉमर्स मार्केटमधील सगळ्यात वेगाने चालणाऱ्या कंपन्या आहेत. कोरोनानंतर ऑनलाईन शॉपिंगचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. आणि याचाच फायदा ई-कॉमर्स कंपन्यांना झालेला दिसत आहे. अनेक लोकांना बाहेर पडून शॉपिंग करण्यासाठी वेळ नसतो. त्यामुळे लोक ऑनलाईन गोष्टी ऑर्डर करत असतात. परंतु यामुळे आता याचा फायदा ई-कॉमर्स साईटला मोठा प्रमाणात होत आहे. यामध्ये फ्लिपकार्ट ही अत्यंत लोकप्रिय अशी कंपनी आहे. या ठिकाणी दररोज लाखोंच्या संख्येने ऑर्डर दिल्या जातात. आणि त्या पूर्ण देखील होतात.

अशातच आता तुम्ही जर flipkart सोबत फ्लिपकार्ट डिलिव्हरीचा फ्रेंचाईजी घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू केला, तर यातून तुम्हाला खूप चांगला व्यवसाय करता येईल. आणि तुम्हाला नफा देखील होईल. ही फ्रेंचाईची घेतल्यानंतर तुम्हाला ग्राहकांपर्यंत ऑर्डर पोचवण्याचे काम करायचे आहे. जर तुम्ही देखील व्यवसाय करण्याचा विचार करत असाल, तर फ्लिपकार्ट डिलिव्हरीचे मॉडेल हे तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकते. यामध्ये अनेक प्रकार असतात.

घेतल्यानंतर तुम्हाला ग्राहकांच्या माध्यमातून ऑर्डर घेतल्या जातील. आणि तो माल ग्राहकांपर्यंत घरी देखील पोहोचवला जाईल. पिकअप स्टोअर, flipkart पिकअप पॉईंटच्या स्वरूपात घेऊ शकता. या पद्धतीने जर तुम्ही व्यवसाय केला तर त्यातून तुम्हाला खूप कमी कालावधीमध्ये चांगला व्यवसाय करता येईल. आता फ्लिपकार्ट डिलिव्हरी फ्रेंचायसी घेण्यासाठी काय पात्रता असावी लागते? यासाठी किती खर्च येतो ? आणि तुम्ही किती नफा कमावू शकता? याची माहिती जाणून घेऊया.

फ्लिपकार्ट डिलिव्हरी फ्रेंचाईजीसाठी पात्रता ? | Bussiness Idea

  • तुम्हाला जर flipkart डिलिव्हरी फ्रेंचायसी घ्यायची असेल तर त्यासाठी तुम्हाला आधीच लॉजिस्टिकचा अनुभव असणे गरजेचे आहे. म्हणजे तुम्ही लॉजिस्टिक कंपनीमध्ये काम करून अनुभव घेतला असेल तर तुम्ही यासाठी पात्र आहात.
  • फ्लिपकार्टची डिलिव्हरी फ्रेंचायसी घेण्यासाठी तुमच्याकडे काही सुरक्षा रक्कम असणे गरजेचे आहे.
  • फ्लिपकार्टच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या ग्राहकांना 24× 7 सेवा द्यावी लागेल. म्हणजेच तुम्हाला 24 तास उपलब्ध असावे लागेल.
  • फ्लिपकार्ट हा एक खूप मोठा ब्रँड आहे. त्यामुळे या ब्रँडशी एकनिष्ठ राहून तुम्हाला हा व्यवसाय करावा लागेल.
  • तसेच तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स खूप गरजेचे आहे. यासाठी तुमच्याकडे 500 ते 1500 स्क्वेअर फुट जागा असावी. त्या ठिकाणी तुम्ही ही फ्रेंच जीव देऊ शकता. .

फ्लिपकार्ट डिलिव्हरी फ्रेंचाईजी घेण्यासाठी किती खर्च येतो?

  • तुम्हाला जर फ्लिपकार्ट डिलिव्हरी फ्रेंचायजी घ्यायची असेल तर यासाठी तुम्हाला जवळपास 50 हजार रुपये ते 3 लाख रुपयेपर्यंत खर्च येऊ शकतो.
  • ही फ्रेंच आईची घेण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला 5 हजार रुपयांचे सुरक्षा शुल्क म्हणजे डिपॉझिट देखील जमा करावे लागते.
  • तसेच या व्यवसायासाठी ऑफिसचा सेटअप करण्यासाठी तुम्हाला फर्निचर तसेच डिलिव्हरी पिकअपसाठी बाईक असणे गरजेचे आहे. तसेच पाच ते दहा कर्मचाऱ्यांचा स्टाफ तुमच्याकडे असावा.

फ्लिपकार्ट डिलिव्हरी फ्रेंचायसी मधून किती पैसे कमवता येईल ?

तुम्ही फ्लिपकार्टची डिलिव्हरी फ्रेंचाईची घेतली, तर तुमच्या स्थानानुसार तुम्ही दरवर्षाला 5 लाख ते 15 लाख रुपयांची कमाई करू शकता.

अर्ज कसा करावा ? | Bussiness Idea

तुम्हाला फ्लिपकार्ट डिलिव्हरी त्यांच्यासाठी अर्ज करण्यासाठी तुमच्या शहराच्या प्रादेशिक ई-कार्ड समर्थनशी संपर्क साधावा लागेल. किंवा flipkart च्या प्रादेशिक कार्यालयात जाऊन देखील तुम्ही आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करू शकता.

Viral Video | पाहावं ते नवलंच ! पोलिसांपासून वाचण्यासाठी चोर लटकला थेट विजेच्या तारेला

Viral Video

Viral Video | सोशल मीडिया हे एक असे ठिकाण आहे.जिथे आपल्याला प्रत्येक गोष्ट घरबसल्या पाहायला मिळते. जवळपास सगळेच लोक आजकाल सोशल मीडिया वापरतात सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होताना आपण पाहत असतो. काही व्हिडिओ 9Viral Video) हे मनोरंजनात्मक असतात, तर काही व्हिडिओ आपल्याला विचार करायला लावणारे असतात. रिल्स, स्टंट आणि जुगाड करणारे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. अशातच आता एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

अनेक ठिकाणी आजकाल चोरांचा सूळसुळाट सुटलेला आहे. मोठ्या प्रमाणात चोर चोरी करताना दिसत आहेत. असाच एका चोराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओच्या सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलेले आहे. या व्हिडिओमध्ये त्या चोराच्या मागावर पोलीस असतात. त्यावेळी तो चोर पळून जाण्याचा प्रयत्न करतो. परंतु त्या चोराने पोलिसांपासून वाचण्यासाठी असे काही केले, ज्यामुळे सध्या तो चांगलाच चर्चेत आलेला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

https://www.instagram.com/reel/DBJvyZcp286/?utm_source=ig_embed&ig_rid=fcfb4558-8741-495c-a4d9-87be552f54e0

व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, स्वतःला वाचवण्यासाठी चोर पोलिसांपासून पळत असतो. त्यानंतर तो एका विजेच्या तारेला लटकताना दिसत आहे. हे दृश्य एखाद्या चित्रपटातील ॲक्शन सारखे दिसत आहे. तो चोर पोलिसांपासून वाचण्यासाठी प्रयत्न करत असतो. शेवटी तो विजेच्या खांबावर चढतो. आणि तारेला लटकतो. पोलीस त्याला खाली उतरवण्यासाठी खूप प्रयत्न करत असतात. सोशल मीडियावर हा व्हिडिओ पाहून सगळ्यांचे चांगलेच मनोरंजन होत आहे. परंतु हा व्हिडिओ कुठला आहे, हे अजूनही समजलेले नाही.

परंतु जर काही अनुचित घटना घडली असती, तर त्या चोराचा जीव जाण्याची देखील शक्यता होती. कारण विजेच्या तारांमध्ये शॉक लागण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते. या व्हिडिओवर अनेक लोक कमेंट्स करत आहेत. काहीजण त्याला सुपरमॅन म्हणत आहेत, तर काहीजण त्याला टार्जन म्हणत आहे. असा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर सगळ्यांचेच लक्ष वेधून घेताना दिसत आहे. परंतु अशी धोकेदायक स्टंटबाजी करणे एखाद्याच्या जीवावर देखील बेतू शकते.

घरच्या बाहेर पडताना खिशात ठेवा कापूर ; होतात ‘हे’ फायदे

camphor

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक गोष्टीला काही ना काही महत्त्व आहे. आपल्या घरात देवपूजा करायची असेल किंवा कोणत्याही महत्त्वाचे काम असेल, तर देवापुढे कापूर हा नेहमीच जाळला जातो. देव पूजेमध्ये कापराला खूप जास्त महत्त्व आहे. कापूर जाळल्याने देव देवता प्रसन्न होतात, असे समजले जाते. यासोबतच कापरामुळे घरातील निगेटिव्ह एनर्जी निघून जाते. आणि प्रसन्न असे वातावरण होते. परंतु हा कापूर जर तुम्ही तुमच्या खिशात ठेवला, तरी देखील तुमच्या आयुष्यात त्याचे खूप जास्त फायदे होतात. आता हे नक्की कोणते फायदे होतात आपण जाणून घेणार आहोत.

अडचणी दूर होतात

तुम्ही जर रोज घरातून बाहेर निघताना तुमच्या खिशामध्ये कापूर ठेवला, तर तुमच्या आजूबाजूची नकारात्मक ऊर्जा दूर होते. आणि जीवनातील अडचणी देखील दूर होतात.

पैशाशी संबंधित समस्या दूर होतात

ज्या लोकांना पैशाशी संबंधित अनेक अडचणी येतात. त्यांनी त्यांच्या खिशात कापून ठेवावा. खिशात कापूर ठेवल्याने पैसा टिकून राहतो. किंवा जास्त पैसा आपल्याकडे आकर्षित करतो. आणि पैसे संबंधित समस्या दूर होतात.

कामात यश

तुम्ही जर खूप मेहनत करत असाल, तरी देखील एखादे काम होत नसेल, तर तुम्ही त्या कामानिमित्त बाहेर जाताना खिशात कापूर ठेवा. तुम्ही जर खिशात कापूर ठेवला तर आपोआप ते यश तुमच्याकडे आकर्षित होईल. आणि तुमचे काम देखील यशस्वी होईल.

शांतता राहते

तुम्ही जर खिशात कापूर ठेवला, तर तुमचे मन देखील शांत होईल. तसेच तुम्ही आयुष्यात तान तणावाचा सामना करत असाल, तर ते दूर होईल आणि तुमचे आरोग्य देखील सुधारेल.

कौटुंबिक सुख

कौटुंबिक सुखासाठी खिशात कापूर ठेवणे, अत्यंत चांगले मानले जाते. खिशामध्ये कापून ठेवल्याने शुक्र ग्रह प्रसन्न होतो. आणि पती-पत्नीमधील नाते देखील चांगले होते.

नकारात्मक ऊर्जा दूर होते

घरात कापूर जाळल्याने नकारात्मकता दूर होते. तसेच परिसरातील वातावरण देखील शुद्ध होते आणि चांगल्या गोष्टी आपल्याकडे आकर्षित होतात.

Bandra Railway Station | वांद्रे टर्मिनसवर लोकांच्या चेंगराचेंगरीत 9 जण जखमी; एकाची मांडी फाटली तर एकाच मोडला हात

Bandra Railway Station

Bandra Railway Station | सोशल मीडियावर अनेक बातम्या व्हायरल होत असतात. अशातच एक सगळ्यात मोठी आणि धक्कादायक घटना घडलेली आहे. ती म्हणजे वांद्रे (Bandra Railway Station) टर्मिनस रेल्वे स्थानकावर प्रवाशांमध्ये मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी झालेली आहे. आणि यामध्ये नऊ जण जखमी झालेले आहेत. प्रवाशांच्या या घटनेमुळे या 9 जनांची परिस्थिती देखील गंभीर आहे. सगळ्या रुग्णांवर रुग्णालयात उच्चार देखील चालू झालेले आहे. या घटनेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून ही घटना किती गंभीर रित्या घडल्याची आपल्याला माहिती मिळते.

हाती आलेल्या माहितीनुसार वांद्रे टर्मिनसवर (Bandra Railway Station) ही चेंगराचेंगरीची घटना घडलेली आहे. सकाळी जवळपास सहाच्या सुमारास ही घटना घडलेली आहे. वांद्रे टर्मिनसवर पहाटे गोरखपुरला जाण्यासाठी रेल्वे लागते. परंतु ही रेल्वे अनारक्षित असते. म्हणून या रेल्वेने जाण्यासाठी प्रवाशांची गर्दी देखील मोठ्या प्रमाणात असते. जे लोक मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशला जातात ते लोक या रेल्वेतून प्रवास करत असतात. दिवाळी आणि छटपूजा लवकरच तोंडावर आलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये नोकरीच्या निमित्ताने आलेले अनेक लोक त्यांच्या गावी जात असतात. गोरखपुरला जाणाऱ्या या रेल्वेतून प्रवास करणाऱ्या लोकांसोबत ही घटना घडलेली आहे. रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे. आणि या गर्दीमुळे ही घटना घडलेली आहे.

गोरखपुरला जाणाऱ्या या रेल्वेमध्ये चढण्यासाठी प्रवाशांमध्ये खूप गर्दी झाली आणि मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी घडली. या चेंगराचेंगरीमध्ये जवळपास 9 लोक जखमी झालेले आहेत. त्यातील दोघांची प्रकृती देखील गंभीर आहे. ही अत्यंत हृदयद्रावक घटना घडलेली आहे. प्रवाशांमधील एकाची मांडी फाटलेली आहे. एका प्रवासाचा हात तुटलेला आहे तसेच लोक काही लोकांचे कपडे देखील फाटलेले आहेत. प्रवाशांच्या कमरेला मार लागलेला आहे. तसेच प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात रक्त देखील सांडलेले आहे.

Maharashtra Weather | मुंबईत थंडीची सुरुवात; राज्यातील तापमानात झाला मोठा बदल

Maharashtra Weather

Maharashtra Weather | राज्यातील परतीचा पाऊस बऱ्यापैकी संपलेला आहे. वातावरणात सकाळी आणि सायंकाळी थंडी पडलेली दिसत आहे. हवामान विभाग नेहमीच हवामानाबद्दल माहिती देत असतात. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील तीन ते चार दिवस पावसाची ये जा राहणार आहे. परंतु पुढील काही दिवसातच राज्यामध्ये थंडीला सुरुवात होणार आहे.

ऑक्टोबर महिन्यामध्ये राज्यात किमान तापमानात 3 अंश सेल्सिअसने घट झालेली आहे. आणि कमाल तापमान जास्त असल्याचे दिसत आहे. परंतु आता संपूर्ण राज्यात थंडीची चाहूल देखील लागलेली आहे. मुंबईमध्ये रात्री हवेमध्ये गारवा निर्माण झालेला आहे. तसेच दिवसा चांगलाच उन्हाचा उकाडा दिसून येत आहे. मागील दोन दिवसाच्या तुलनेत शनिवारी किमान तापमान 30° c ने घट झालेली आहे. परंतु कमाल तापमान 12 अंशापेक्षा जास्त देखील निर्माण झालेला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आता सांताक्रुज प्रदेशात 21.4 असेल तापमानाची (Maharashtra Weather) वाढ झालेली आहे. तसेच किमान तापमान शुक्रवारपेक्षा 30 अंशांनी कमी होत आहे. उत्तरेकडून देखील मोठ्या प्रमाणात वारे येत असल्याने किमान तापमानात घट झालेली आहे. त्यानंतर दोन दिवसांनी पुन्हा एकदा कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. राज्यामध्ये उन्हाचा उकाडा जरी वाढत असला, तरी मुंबईकरांना आता हळूहळू थंडीची चाहूल लागली आहे.

सोमवारी मुंबईमध्ये किमान तापमान (Maharashtra Weather) हे 21°c दरम्यान असणार आहे. तर मुंबईत पहाटे आणि रात्रीच्या वेळी तापमानात घट झालेली दिसणार आहे. सायंकाळी अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. दिवाळीमध्ये राज्यात हवामानात बराच फरक पडणार आहे. दिवसभर उन्हाचा उकाडा असला तरी सकाळी आणि संध्याकाळी हवामानात थंड वातावरण असल्याची माहिती हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे येत्या 5 ते 10 दिवसांमध्ये संपूर्ण राज्यात थंडी पडण्याची शक्यता आहे.

Edible Oil | ऐन दिवाळीत सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री; खाद्यतेलाच्या किमतीत पुन्हा वाढ

Edible Oil

Edible Oil | दिवाळीला अगदी दोन-तीन दिवस शिल्लक राहिलेले आहे. दिवाळी हा आपल्या भारतातील एक सर्वात मोठा सण आहे. हा सण संपूर्ण भारतात मोठा उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो. अगदी सामान्य लोकांपासून केली श्रीमंत लोकांपर्यंत सगळेच दिवाळीचा सण साजरा करत असतात. या सणासुदीच्या काळातघरात वेगवेगळ्या गोष्टींची गरज लागते. अनेक नवीन पदार्थ देखील केले जातात. परंतु अशातच या सणासुदीच्या काळात सर्वसामान्य माणसाच्या खिशाला मात्र कात्री लागणार आहे. कारण खाद्य तेलाच्या (Edible Oil) दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. त्यामुळे ज्या रेस्टॉरंटमध्ये किंवा दुकानांमध्ये दिवाळीचा फराळ तयार केला जातो. त्यांनी देखील त्यांच्या मिठाईच्या आणि फराळाच्या किमती वाढवलेल्या आहेत. तसेच मोहरीच्या तेलाच्या किमतीत देखील 29 टक्क्यांनी वाढ झालेली आहे.

सप्टेंबर महिन्यापासूनच भाज्या आणि खाद्य तेलाच्या (Edible Oil) किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. भाज्या आणि खाद्य तेलाच्या किरकोळ महागाई दर 5% हा 9 महिन्याच्या उच्चांकावर पोहोचलेला आहे. मागील महिन्यात सरकारने क्रूड सोयाबीन पाम आणि सूर्यफूल तेलावरील आयात शुल्कात वाढ केली होती. त्यामुळे हे भाव वाढले होते. तसेच 14 सप्टेंबर पासून क्रूड पाम सोयाबीन आणि सोयाबीन सूर्यफूल तेलावरील आयात शुल्क हे 5.5 टक्क्यावरून 27.5% एवढी करण्यात आलेले होते.

मागील महिन्यामध्ये क्रूडपाम सोयाबीन आणि सूर्यफल तेलाच्या जागतिक किमती या 10.6% आणि 16.8% एवढ्या होत्याम परंतु त्या आता 12.3 टक्क्यांनी वाढलेल्या आहेत. भारत जवळपास 58% खाद्यतेल हे आयात करत करतो.

Devendra Fadanvis | जपानच्या निधीतून देवेंद्र फडणवीसांनी मुंबईत उभारल्या पायाभूत सुविधा; पुन्हा विजयी होईल विश्वास केला व्यक्त

Devendra Fadanvis

Devendra Fadanvis | राज्यातील विधानसभा निवडणूक अगदी तोंडावर आलेल्या आहेत. येत्या 20 नोव्हेंबर रोजी राज्यात मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. अनेक लोक आता उमेदवारीचा अर्ज देखील दाखल करत आहेत. अशातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी नागपूरमधून उमेदवारीचा अर्ज देखील दाखल केलेला आहे. हा अर्ज दाखल करताना त्यांनी पुन्हा एकदा मी पुन्हा विजयी होईल असा विश्वास देखील व्यक्त केलेला आहे.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची काम करण्याची एक वेगळी पद्धत आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी केलेले प्रयत्न हे अनेक लोकांना माहित आहे. राज्याच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी त्यांनी चांगले योगदान दिलेले आहे. तसेच मुंबईमधील अनेक पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना देखील त्यांनी गती देण्याचे काम केलेले आहे. मुंबईमध्ये सध्या अनेक पायाभूत सुविधांचा विकास झालेला आहे. यामागे राजकीय ताकद आहे. आणि देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी खूप जास्त प्रयत्न केलेले आहेत. या प्रकल्पामध्ये रस्ते, मेट्रो, पुनर्विकास उपक्रम यांसारख्या बऱ्याच कामांचा समावेश आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून अनेक प्रकल्प हे पूर्ण होत नव्हते. त्यांना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागत होता. राजकीयवाद तसेच इतर अनेक गोष्टींमुळे हे प्रकल्प रखडले होते. या सगळ्यामुळे मुंबईमधील असणाऱ्या लोकांना पायाभूत सुविधा देखील मिळत नव्हत्या. यातच महाविकास आघाडीच्या शासनाने यांमधील अनेक प्रकल्पाची प्रगती केलेली आहे. 2014 ते 2019 पर्यंत मुख्यमंत्री आणि आत्ताच्या काळात उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी अनेक पायाभूत सुविधांचा विकास केलेला आहे. तसेच त्यांच्या प्रयत्नामुळे मुंबईतील लँडस्केपला देखील पुन्हा आकार देण्यास सुरुवात केलेली आहे.

नागरिकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी सगळ्या प्रभावशाली प्रकल्पांना त्यांनी प्राधान्य दिलेले आहे. आणि हे प्रकल्प पूर्ण केलेले आहे. 2015 मध्ये सुरू झालेल्या वॉर रूममध्ये सुरुवातीला पोस्टल रोड म्हणून नवी मुंबई विमानतळ दुसरी तिसरी मुंबई मेट्रो लाईन आणि मुंबई ट्रांसफारभरली यांसह त्यांनी दहा पायाभूत सुविधा प्रकल्पावर लक्ष केंद्रित केलेले आहे. आणि त्यांच्या काळात चांगली प्रगती देखील झालेली आहे.

त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस 2014 ते 2019 या पाच वर्षाच्या काळामध्ये मुख्यमंत्री होते. त्यावेळी त्यांनी जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी यांच्यासोबत मुंबईतील प्रकल्पासाठी निधी मिळवून देण्यासाठी देखील पुढाकार घेतलेला होता. त्यामुळेच मुंबईतील अनेक प्रकल्प हे वेळेवर पूर्ण झालेले आहेत. आणि नागरिकांना देखील त्याचा फायदा झाला आहे. या विविध जागतिक विकास उपक्रमांसाठी आर्थिक आणि तांत्रिक सहाय्यप्रदान करण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यामध्ये वाहतूक औद्योगिक ऑर्डर पाणीपुरवठा प्रकल्प यांसारख्या गोष्टींचा समावेश होतो. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कार्यकाळात जपान उद्योग आणि तंत्रज्ञान महाराष्ट्रातच जपानी इंडस्ट्रियल पार्कचा प्रस्ताव ठेवला यामुळे त्यांनी महाराष्ट्रातील वाहतूक शहरी विकास आणि आरोग्य सेवा या खूप चांगल्या प्रमाणात लोकांना मिळाल्या.

यंदा दिवाळीचा फराळ महागणार; घरगुती वस्तूंसोबत ड्राय फ्रूट्सच्या दरातही मोठी वाढ

Diwali

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिवाळीला पाच ते सहा दिवस उरले आहेत . त्यामुळे प्रत्येकांच्या घरात फराळ करण्याची लगबग सुरु आहे. पण यावर्षी फराळासाठी लागणाऱ्या साहित्यांच्या किंमतींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, त्याचा परिणाम सर्वसामान्य जनतेवर होतोय. या महागाईमुळे नागरिकांच्या खिशाला मोठा फटका बसणार आहे. म्हणजेच यंदाच्या दिवाळीत फटक्यासोबत महागाईचा आर्थिक फटका देखील फुटताना दिसणार आहे.

फराळासाठी साहित्यांच्या किमतीत वाढ

फराळ तयार करत असताना तेल, तूप, रवा, साखर, खोबरे यांचा मोठया प्रमाणात वापर होतो. त्यामुळे या आवश्यक साहित्याच्या किंमतीमध्ये 10 ते 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच सुकामेव्याच्या किंमती 5 ते 10 टक्क्यांनी वाढलेल्या दिसत आहेत. याशिवाय काजू दरात मोठी वाढ झाली असून, घाऊक बाजारात याची किंमत 895 रुपये प्रति किलो आणि किरकोळ बाजारात 1100 रुपये प्रति किलोवर विकला जात आहे. चोरोळीचा दर 2500 रुपये प्रति किलो आहे तर वेलचीचे दर 3000 रुपये किलोवर पोहोचले आहेत. खजूर सध्या 200 रुपये किलोवर विकला जात असून, पिस्ता 1090 रुपये घाऊक आणि 1800 रुपये किलो किरकोळ बाजारात उपलब्ध आहे.

नागरिकांच्या खिशाला फटका

मनुके देखील महागले असून घाऊक बाजारात 200 रुपये आणि किरकोळ बाजारात 300 रुपये किलोने विकले जात आहेत. यामुळे फराळाचे साहित्य खरेदी करताना सामान्य नागरिकांच्या खिशाला मोठा फटका बसत आहे. त्यामुळे अनेक लोकांची खरेदीबाबत चिंता वाढली आहे. या वाढत्या दरांमुळे दिवाळीच्या सणासाठी आवश्यक साहित्य खरेदी करताना लोकांना विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागत आहे. खासकरून मिठाईच्या तुलनेत सुख्या मेव्याचे गिफ्ट बॉक्स महाग झाले असून त्यांची किंमत 500 रुपयांपासून सुरू होत आहे. त्यामुळे खर्चात मोठी वाढ दिसून येत आहे.

Whatsapp Update | व्हाट्सअँप आणणार नवीन अपडेट; दुसऱ्या कोणत्याही डिव्हाइसवर ऍक्सेस करता येणार कॉन्टॅक्ट

Whatsapp Update

Whatsapp Update । जगभरातील सर्वाधिक लोकप्रिय मेसेजिंग अँपमध्ये व्हाट्सअँपला (Whatsapp Update) पाहिले जाते. अगदी कुटुंबापासून ते ऑफिसपर्यंत सर्व क्षेत्रात या प्लँटफॉर्मचा वापर केला जातो. त्यामुळे हे प्लॅटफॉर्म आपलया ग्राहकांसाठी नेहमी नवनवीन फीचर्स घेऊन येत असतात. आता ते युजर्ससाठी कॉन्टॅक्ट मॅनेजरची सुविधा घेऊन येत आहेत. यामुळे तुमचा चॅटिंगचा अनुभव आणखीन सुधारणार आहे. या फीचर्समुळे तुम्हाला फोनची गरज भासणार नाही . तर चला पाहुयात या नव्या फीचर्स बदल माहिती .

कॉन्टॅक्ट्स मॅनेज | Whatsapp Update

या नव्या फीचरसोबत युसर्सना कोणत्याही डिव्हाइसवरून कॉन्टॅक्ट्स मॅनेज करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यासाठी तुम्हाला मोबाईलची गरज लागणार नाही . सुरुवातील हे नवीन फिचर व्हाट्सअँप वेब आणि विंडोज प्लॅटफॉर्मसाठी आणले जाणार आहे. WABetaInfo या व्हाट्सअँपच्या फीचर्सवर नजर ठेवणाऱ्या वेबसाइटने या फीचरचा स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे. तसेच यामध्ये तुम्ही डेकॅस्टाप आणि इतर लिंक केलेल्या डिव्हाईसवर नंबर सेव्ह करू शकता.

व्हाट्सअँपवर सेव्ह नंबर्स

याआधी बऱ्याच लोकांना कॉन्टॅक्ट्स बाबत समस्या येत होत्या, कारण व्हाट्सअँप हे फोन बुकमधील कॉन्टॅक्ट्सवर अवलंबून होते. तसेच फोनमधील नंबर डिलीट केल्यानंतर व्हाट्सअँपवरून नाव डिलीट व्हायचे. पण आता युसर्सने व्हाट्सअँपवर सेव्ह केलेले नंबर्स दुसऱ्या डिव्हाईसवर ऑटोमॅटिकली मिळवू शकतील. हे दमदार फीचर्स लवकरच ग्राहकांच्या सेवेत येणार असून, ज्यामुळे युसर्सना व्हाट्सअँपचा वापर आणखीन सोपा आणि सुलभ होणार आहे. या फीचरचा लोकांना खूप जास्त फायदा होणार आहे. यामुळे मोबाईलचा वापर देखील कमी होणार आहे.